सून म्हणजे रोबोट असते अस का वाटत ह्याना?

Submitted by अस्मि_ता on 9 April, 2018 - 04:41

Maz lagna houn 2 varsha zali pan ajun mazya sasari mala kuthlyach nirnyat consider kel jat nahi. Kahich kimat nahi. Hya ulat kamachya babtit mhanaje sagalech gruhit dhartat. Gharat sagal mazya nanandechya mhananyanusar chalat. Maza kahich vichar kela jat nahi. Mazi khup ghusmat hote. Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. Pan jevha pasun lagna zalay tevhapasun maza sagala swatantrya hiravun ghetalay asa vatat. Tyatach maza job gela ani situation ajunach kathin zaliy. Maza confidence low zalay. Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. Me robot nahiy. Mala emotions ahet he hyana ka kalat nahi?
Maaybolikar apal manun salle detat mhanun ethe post karate.

Group content visibility: 
Use group defaults

अस्मिता,
२ वर्षांचा कालावधी म्हणजे जास्त नाही.तुला घरच्या निर्णयात सामील केले जात नाही ही तुझी तक्रार आहे,पण नवरा म्हणतो तसे थोडे थांब.तुला सासरी रुळायला आणि सासरच्या सर्वांना सून म्हणून एक नवीन माणूस सामावून घ्यायला वेळ लागतोच.
सासरच्यांना न दुखावता तरीही ज्या गोष्टी तुला नको असून कराव्या लागतात ठामपणे त्या ठामपणे नाकारु शकतेस की.नवीन जॉब लागेपर्यंत इतर काही छोटया गोष्टी करू शकतेस.

2 वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला. प्रत्येक घराची वागण्याची एक पद्धत सेट झालेली असते. सून आली आणि लगेच त्या पद्धतीत बदल झाला असे होत नाही.

तुम्ही डोके तापवून न घेता ऐकण्याचे काम करा. तुमचे मत राखून ठेवा व खाजगीत नवऱ्याला सांगा. तुम्ही प्रत्येक गोष्टीत खरेच विचारपूर्वक मत देत असाल तर त्याला हळूहळू विश्वास वाटेल व तो निर्णय घेताना सर्वांसमक्ष तुम्हालाही विचारेल.

तुम्हाला तुम्ही हुशार आहात असे कितीही वाटले तरी सासरच्या प्रौढ मंडळींच्या नजरेत तुम्ही कच्चे लिंबू राहणार हे लक्षात ठेवा. ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार व ती वेळ तुम्ही घरात किती समजूतदारपणा दाखवता यावर अवलंबून आहे.

तुमच्या तक्रारीत बाकी कसल्याही त्रासाचा उल्लेख नाही म्हणजे बाकी सारे ठीक असावे असे म्हणायला वाव आहे.

घरचे निर्णय घेणे हे वाटते तितके सोपे नाही. तुमच्यावर अजून ही जबाबदारी पडली नाहीय याबद्दल देवाचे आभार माना व आनंदात आयुष्य जगा. तुमचा आनंद, घराबद्दल व घरातल्याबद्दलचे प्रेम तुमच्या वागणुकीतून दिसले की आपोआप तुमच्या सासरच्यांना तुमच्याबद्दल विश्वास वाटू लागेल.

राहिली नण्न्देची गोष्ट , माझ्या घरी गेल्या पन्धरा वर्षापासुन हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतेय पण काहि सुटला नाहिये.
शेवटि नवर्‍यानेच हा प्रश्न सोडवलाय वेगळे रहाण्याचा निर्णय घेवुन. पण त्याला वेळ जावा लागला. त्यामुळे काहि दिवस नवरा म्हणतो तसे थाम्बुन बघा. घरातील परीस्थिती त्यानाहि कळत असतेच.

खूप वर्षां पूर्वी मी गेले होते यअतून. तेव्हा फार घाबरायचे मी सासूबाईंना. फार चतुर , राजकारण करत त्या घरात. कधीही घरात याय्चं, कधीही कुठेही जाय्चं ते ही काही न कळवता. कोणी आलं की त्यन्च्यासमोर नातवाला घेऊन बसाय्चं. मधूनच पाहुणे आले की त्यन्च्यासमोर राडाय्च. माझ्या सासर्यांशी पण त्यांच पटत नव्हत. त्यांची आणि घरात्ल्या ह.कु. , सवाष्ण, गणपती सर्वांची जबाबदारी माझ्यावरच. या फक्त चुका काढायला. कायम घरात पाहुणे ; ते ही फक्त त्यांच्या माहेरचेच आणि माझ्या नणंदा . टोमणे माराय्चे. उदा. माहेरी जाऊन आले की जेवाय ला बसताना ` मला वाटल जेवून आली अस शील ` आणि जेवून आले की कष्टाच्या कमाईच वाया जातं म्हणायच्या (मी मुलाच्या तब्बेतीमुळे नोकरी सोडली होती). फार त्रास सहन केला.

२ वर्ष काय आणि कित्तेक वर्ष गेली . या सुधारल्या नाहीत. पण आता मी सुधारल्येय. त्या असतील तेव्हा जातच नाही फरशी त्यन्च्या समोर. काही वर्षांनी नोकरी शोधली. शक्यतो बोलतच नाही आणि फारच झालं तर तिथल्या तिथे सुनावते . आणि आश्चर्य म्हणजे आता बर्या वागतात. पण आता माझीच इच्छा होत नाही कामाशिवाय बोलायची. पण गेलेल्या दिवसांची जबर किंमत मोजल्ये मी. तब्बेतीवर फार परिणाम झाला. उमेदीची वर्ष वाया गेली. असो. या अनुभवातुन काही कोणाला उपयोग झाला तर व्हावा हा उद्देश.

घरचे निर्णय घेणे हे वाटते तितके सोपे नाही. तुमच्यावर अजून ही जबाबदारी पडली नाहीय याबद्दल देवाचे आभार माना व आनंदात आयुष्य जगा. तुमचा आनंद, घराबद्दल व घरातल्याबद्दलचे प्रेम तुमच्या वागणुकीतून दिसले की आपोआप तुमच्या सासरच्यांना तुमच्याबद्दल विश्वास वाटू लागेल. >>>> अगदि बरोबर आहे साधना म्यडम. तुमचे म्हणणे पटले.
सासरच्यान्चा विश्वस सम्पादन करणे पण जरुरी आहे.

साधना, अप्रतीम प्रतीसाद. खूपच छान लिहीले आहेस. नवीन लोकांना खरच उपयोगी पडेल. फक्त एकच सांगते. आपली बाजू कितीही खरी असली आणी माणुसकी आणी व्यवहारा ला धरुन असली तरी पहिली काही वर्षे नवर्‍याला ती पटायला वेळ लागतो. मी यातुन गेले आहे.

आता लग्न लोणच्यासारखे मुरल्याने नवरा पण माझी बाजू ऐकुन घेतो, पण आम्ही दोघेही वादापासुन दूर रहातो. नवरा- बायकोने एकमेकांवर विश्वास ठेवावा बाकी लोक आपली बाजू आणी वागणे चांगले असुनही ऐकत नसतील तर मग लांब रहा. लांब रहा याचा अर्थ घरी सासु सासरे असतील तर त्यांच्यापासुन लांब रहा असे नाही तर घरात आपली योग्य ती मदत करुन आपल्या मतांवर, वागणे व निर्णयावर ठाम रहा.

पण साधना म्हणतेय तसे रहा, कारण माणसे जोडणे फार कठिण, तोडणे सोपे असते.

रावी, तुझ्याबद्दल वाचुन वाईट वाटले, कारण एकवेळ भांडणे परवडली पण राजकारण नको वाटते. घरात हा अनूभव घेतलाय. पण नाईलाज को क्या ईलाज.

घरातले वातावरण कसे आहे? तुमचा घरात सर्वांशी संवाद कसा आहे ? एरव्ही गप्पा , सहज संवाद साधणे हे होते का घरात? घरात तुम्हाला २ वर्षानंतर आपलेपणा वाटतो का? ( हे दोन्ही बाजूने मह्त्त्वाचे आहे, तुम्ही घरातल्यांना आपले मानणे आणि घरातल्यांनी तुम्हाला)
तसंच, तुम्हाला हे जे वाटतं ते नवरा सोडून इतर कुणाला ( चांगल्या शब्दात) सांगून पाहिले का? करून पहा. काही वेळा मोकळेपणाने चांगल्या शब्दात सांगून टाकल्याने बरेच प्रश्न सुटतात. काही वेळा गोष्टी चालल्यात त्या तशाच चालू राहतात आणि जोवर कुणी दाखवून देत नाही तोवर त्यात बदल करायची गरज आहे हे लोकांना समजत नाही. आपोआप बदल होणार नाहीत. तुम्हाला घडवून आणावे लागतील. गोड बोलून, नाहीतर गरज लागल्यास ठाम भूमिका घेऊन.
शक्य असल्यास एखादा लहानसा निर्णय स्वतः घेऊन पहा, किंवा एखाद्या निर्णयात आपले मत आवर्जून सांगा. बघा काय होते रिअ‍ॅक्शन. त्यावरून हे मुद्दाम केले जातेय की नकळत तेही लक्षात येतेय का पहा.
शुभेच्छा तुम्हाला!

तु आधि नोकरी बघ कुठे तरी. बाहेर पडलीस की थोड बर वाटेल.
बाकी त्यान्च्या कडुन सुधारण्याची अपेक्षा ठेवण्या पेक्शा तुच या सगळ्यान्कडे दुर्लक्श करायला शीक.

रावी, मी अगदी अश्याच परिस्थिती ला तोंड देऊन त्यावर अगदी तुमच्या सारखाच पर्याय शोधलाय त्यामुळे तुमचा प्रतिसाद वाचून खूप बार वाटलं.
सुरुवातीला मलाच चुकल्या सारखं वाटायचं पण आपण जरा बर बोललं कि त्यांचं पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरु होत.
अस्मिता, प्रत्येक घरातली परिस्थिती थोड्या फार फरकाने अशीच असते. काळ बदलल्या खरा पण फक्त मुलींकरता सुनांकरता नाही. एक लक्षात ठेवायचं सासरच्यांकडून काही अपेक्षा ठेवायच्या नाही म्हणजे अपेक्ष भंगा च दु:ख होत नाही. आपला आनंद, समाधान आपणच शोधायचं. हळू हळू सवय होतेच.

आजच्या काळात असले प्रकार वाचून आश्चर्य वाटले, मी
सध्या बरीच उदाहरणे पहिली आहेत त्यात सुना या सास्वाना त्रास देतात.
आम्ही दोघे जॉब ला जातो, जेवण आणि घरकामात काही मदत नाही करू शकत, कामे करा मणजे या वयात ऍक्टिव्ह राहाल वगैरे वगैरे... कीव येते बिचाऱ्या अशा सासूची...

1) नवरा थोडे थांब बोलतोय, तुमची तक्रार उडवून लावत नाहीये ही जमेची बाजू आहे. शेवटी त्या घरात तुमची आपली हक्काची आणि आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती तीच आहे.

2) तुम्ही आधी जॉबला असाल आणि आता नसाल तर हा पिरीअड फ्रस्ट्रेटिंग असू शकतो. त्या फ्रस्ट्रेशनमुळे प्रत्येक गोष्टीला नकारात्मक नजरेने बघण्याचा धोका असतो. त्याची काळजी घ्या.

3) बरेचदा माणसे चांगली वाईट नसतात तर परिस्थितीनुसार रिएक्ट करतात. या नात्यात तर हमखास असेच होते. अगदी स्वभावाने खूप चांगल्या असलेल्या स्त्रिया देखील जेव्हा या सासू-सून नात्यात येतात तेव्हाही त्यांच्यात पटेनासे होऊ शकते. कारण यासाठी नुसते स्वभावाने चांगले असून चालत नाही तर वेगळ्या लेव्हलचा समंजसपणा लागतो. तो तुम्ही समोरच्याला शिकवायला न जाता आपल्या वर्तणूकीत आणा आणि बघा काही फरक पडतोय का?

4) स्वतंत्र राहणे हा सुद्धा चांगला पर्याय आहे. पण ते योग्य पद्धतीने झाले पाहिजे. भांडून बाहेर पडण्याऐवजी हसत बाहेर पडणे झाले पाहिजे. एकदा स्वतंत्र घडी व्यवस्थित बसली की नाती चिरायू होतात. अर्थात यासाठी आधी तुम्हाला जॉब शोधणे गरजेचे. कारण यात आर्थिक गणिते बदलतात. ईतरही फायदे तोटे असतात, सर्व बाजूंचा आणि सर्वांच्या भल्याचा विचार करून ठरवा.
आणि हो, स्वतंत्र राहणे म्हणजे घर तोडणे नाही. काही जण हा अर्थ तुमच्या वा संबंधितांच्या डोक्यात घालून काड्या करायचा प्रयत्न करतील त्यांना इग्नोरून फक्त हितचिंतकांचे ऐका..

5) तुमच्या घरची परिस्थिती नक्की काय आहे हे माहीत असल्याशिवाय कोणीही तुम्हाला ईथे पिन पॉईण्ट सोल्युशन देऊ शकणार नाही. आपल्याला काय लागू ते तुम्हालाच शोधायचे आहे. उदाहरणार्थ माझ्या प्रतिसादात मी स्वतंत्र राहण्याचा पर्याय सुचवला म्हणून तेच डोक्यात ठेवून विचार करायची गरज नाही.

येनीवेज, ऑन ए लायटर नोट, एक पुरुष म्हणून मला कोणी सांगितले की लग्नानंतर तुला बायकोच्या घरी राहायचे आहे तर माझे माझ्या गर्लफ्रेंडवर कितीही का प्रेम असेना मी लग्नच करणार नाही Happy
एक स्त्री म्हणून सासरच्यांशी जुळवून घेण्याची जी मानसिकता प्रत्येक स्त्रीच्या स्वभावात रुजली असते तिचा अभिमान बाळगून निर्णय घ्या.. शुभेच्छा Happy

ऋन्मेष, खूप छान पोस्ट. लग्नाळु असूनही ( म्हणजे लग्नाचा अनूभव नसतांनाही ) एवढा समतोल राखु शकलास तर तुझी आई व बायको दोन्ही सुखी रहातील. ( तू जर कर्क राशीचा असशील तर मात्र कठिण आहे, कारण असे लोक ममाज बॉय असतात, आणी त्यांचे बायको व आई या दोन्हीत चटणी व सॅलेड होते )

रश्मी, ज्योतिष कुंडली पत्रिकेचे ज्ञान ठेवता का. अचूक ओळखलेत. मी कर्क राशीचाच आहे.. एवढेच नाही तर शाळा कॉलेजपासून मम्माज बॉय म्हणूनच ओळखला जातो. कारण मी एकुलता एक असल्याने माझी जवळची मैत्रीण आईच असल्याने माझ्या बोलण्यात फार आई आई असते. जसे ईथले लोक माझे गर्लफ्रेंडपुराण ऐकतात तसे मित्र आईपुराण ऐकायचे Happy

आता हा विषय निघालाय म्हणून सांगतो,..
मम्माज बॉय म्हटलं की बेटाचा अनिल कपूरच डोळ्यासमोर आणायची गरज नाही. आईवर प्रेम करूनही मुलगा स्वत:ची स्वतंत्र मते राखू शकतो. जसे की माझी आई देवावर फार विश्वास ठेवणारी आणि सारे वार पाळणारी आहे. एका वयापर्यंत माझ्याकडूनही तिने देव देव करून घेतले. मग मी स्वत:च्या विचारांनी नास्तिक झालो तेव्हा माझ्यावर देव लादायचा प्रयत्न तिने केला नाही. हल्ली तर मी सणवाराला घरच्या देवासमोरही हात जोडत नाही आणि ते तिला चालून जाते. ईतकेच नाही, तर ईतर नातेवाईकांनी अपेक्षा ठेवल्यास त्यांनाही सांगते, नाही त्याचा विश्वास नाही. तेच अपेक्षा धरणारी कोणी वडिलधारी व्यक्ती असेल तर मात्र मला सूचक ईशारा करते, मग मी त्या वडिलधारी व्यक्तीचा आणि त्यांच्यासमोर माझ्या आईचा मान राखायला देवाच्या पाया पडतो Happy

सांगायचा मुद्दा हा की प्रेम एका जागी असते आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करणे एका जागी.
आईवर प्रेम करणारा मुलगा बायकोवरही तितकेच प्रेम करू शकतो आणि त्याचवेळी दोघींच्या विचारांचा आदर स्वतंत्रपणे करू शकतो. शेवटी तोच सासूसूनेच्या नात्याला आणि पर्यायाने घराला बांधून ठेवणारा महत्वाचा दुवा असतो.
प्रत्येक पुरुषाने म्हणजे नवरयाने याचा अभिमान बाळगायला हरकत नाही Happy

अस्मि_ता
तुझा प्रॉब्लेम तु खूप वरवर सांगितला आहेस. म्हणजे सध्या कोणत्या शहरात आहेस, बाकी घरी कोण कोण असते. नक्कि काय इश्यू फेस करते आहेस त्याचे फारसे डिटेल्स लिखाणात नाही आलेले. आणि ते साहजिक आहे. त्यामुळे साधारण चार चौघी सुना ज्या प्रकारचा त्रास सहन करतात तोच तु ही फेस करत्येस असं दिसतंय.
लग्ना आधी पुण्यात नोकरी म्हणजे थोडं व्यक्तिस्वातंत्र्य शिवाय आर्थिक ही असल्याने ते विचारात चांगलंच रूजतं आणि नेमकं सासरच्या लोकांना ते रूचत नसावं. २ वर्षं तसं म्ह्टलं तर खूप कमी आणि तसं पाहिलं तर एखाद्या घरात रूळायला खूप आहेत. पण काही केल्या "सून" हा प्राणी बाहेरून घरी आल्याने त्या प्राण्याला "वेगळ्याने" वागवण्याची जणू परंपराच आहे आपल्या समाजात. त्याला इलाज नाही असे नाही. पण आपण जेव्हा परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा परिस्थितीनूसार स्वतःला बदलणे कधीही इष्ट.
साधना म्हणाली तसं, की घरच्या कोणत्याही महत्वाच्या निर्णयात तुला सामिल केलं जात नाही ही तक्रार रास्त असली तरिही एका अर्थी ते बरेच आहे. उगिच कोणत्या निर्णयात तुझ्या एका शब्दाने काही कमी जास्त झाले तर खापर फोडायला त्यांना एक मोठं डोकं मिळेल. त्यापेक्षा कच्चा लिंबू म्हणून कुठे कुठे मागे राहिलेलंच बरं असतं.

ऋन्मेष म्हणतो तसं नोकरी नसल्याचा फ्रस्ट्रेटिंग पिरियड असू शकेल हा. तेव्हा धीर धरी. लगेच वेगळे होणे वगैरे पण विचार करू नको कारण कधी कधी नाही आजकाल बर्‍याच घरात एकत्र असण्याचे अनेक फायदे असतात. थोड्या कुरबुरी होतील पण लाँग टर्म ला ते चांगले असते. घरात वडिलधारी माणसे असतील तर घराला एक शिस्त राहते, नातवंडांवर लक्ष, सणासुदिला योग्य प्रमाणात न्याय दिला जातो शिवाय नवरा बायकोच्या कुरबुरी सुद्धा आपापल्या खोलित राहतात, घरभर पसरत नाहीत.
कुणाशी तरी जवळच्या माणसाशी या गोष्टी बोल कधी कधी आपल्याला सोल्युशन नव्हे तर फक्त एक ऐकणारा कान हवा असतो. तो मिळाला की अर्धे प्रॉब्लेम्स आपल्याला प्रॉब्लेम्स वाटत नाहीत.

तुला शुभेच्छा!

कधी कधी आपल्याला सोल्युशन नव्हे तर फक्त एक ऐकणारा कान हवा असतो. तो मिळाला की अर्धे प्रॉब्लेम्स आपल्याला प्रॉब्लेम्स वाटत नाहीत.
>>>

दक्षिणा +786

हे मला फार पूर्वी एकाने सांगितले होते जे मी आता लवगुरू बनत ईतरांना सांगत असतो, की तुमच्या गर्लफ्रेण्ड वा बायकोला आपल्या छोट्यामोठ्या समस्या तुम्हाला सांगायची सवय असते. त्यांना त्या प्रत्येक समस्येवर समाधान नको असते, फक्त तुम्ही ते वेळ देऊन मन लाऊन ऐकून घ्यावे ईतकी अपेक्षा असते. हे एवढे केले की तुम्ही रिलेशन टिकवले म्हणून समजा..

तुमच्या गर्लफ्रेण्ड वा बायकोला आपल्या छोट्यामोठ्या समस्या तुम्हाला सांगायची सवय असते. त्यांना त्या प्रत्येक समस्येवर समाधान नको असते, फक्त तुम्ही ते वेळ देऊन मन लाऊन ऐकून घ्यावे ईतकी अपेक्षा असते. हे एवढे केले की तुम्ही रिलेशन टिकवले म्हणून समजा..>>>> व्वा! हेच माझ्या नवर्‍याला आज मी वाचायला देणारे.

मला maitreyee ची पोस्ट सगळ्यात प्रॅक्टिकल वाटली. समोरचा माणुस मन वाचायला काही देव नसतो किंवा अंतरज्ञानी ऋषी ही नाही. Pl. speak out your mind. Express your feelings and say out what do you want. यात कमीपणा काहीच नाही. 'मी च का सांगु, एवढं सुद्धा कळत नाही का' या अ‍ॅप्रोचमुळे आपलीच घुसमट होत रहाते आणि काही वर्ष गेल्यावर न बोलता एकमेकांच्या अपेक्षा, आवड नावड कळत जाते, पण तो पर्यंत सांगा, मागा, म्हणा हा मंत्र असायला हवा. मुद्दाम करतात असं आपणच ठरवुन मिळवण्याची संधी का वाया घालवायची? नसेल समजलं असं म्हणुन एक benefit of doubt दिला तर कदाचित हवं ते मिळण्याची शक्यता आहे.

maitreyee - मला तुझ्या या खालच्या लाइन्स खुप आवडल्या आणि मला वाटतं कोण्त्याही नात्यात अप्लाय केल्या तर अर्धे प्रश्न सुटतील

तुम्हाला हे जे वाटतं ते नवरा सोडून इतर कुणाला ( चांगल्या शब्दात) सांगून पाहिले का? करून पहा. काही वेळा मोकळेपणाने चांगल्या शब्दात सांगून टाकल्याने बरेच प्रश्न सुटतात. काही वेळा गोष्टी चालल्यात त्या तशाच चालू राहतात आणि जोवर कुणी दाखवून देत नाही तोवर त्यात बदल करायची गरज आहे हे लोकांना समजत नाही

मने मला पण पोस्ट पटली होती, पण सासरच्या लोकांत इतक्या धाडसाने बोलायला सर्वच सुनांना जमेल असे नाही ना. अगदी कितीही चांगले शब्द वापरायचे म्हटले तरिही. त्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स यायला वेळ लागेल ना . सासर म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहिर, त्यातून माहेरून जर (आता सासर हेच तुझं घर असे संस्कार असतील) आणि समाजाचा पगडा खूप मोठा असेल. शिवाय सासरकड्च्यांना काय? वाईट शब्द तर टोचतीलच पण चांगल्या शब्दात मांडल्या तरी तिच्या भावना समजून घेण्या ऐवजी आमच्या मोठ्यात तोंड वर करून बोलते असं म्हणायला कमी नाही करणार. मग त्या निमित्ताने माहेरी हेच शिकवले का? हा उद्धार फुकट वरून.

सगळ्यांचे प्रतिसाद चांगले आहेत.

सुरुवातीला नवीन घरात बर्‍याच गोष्टी आपल्याला नाही पटत, पण त्या मनात नाही ठेवता येत. तेव्हा ऐकणारा/री कोणी हवा असतो.
नवर्‍याने सुरुवातीलाच सांगितले होते कि लगेच आपले मत कोणासमोर मांडायची घाई करु नकोस. मला सांग. तसेच मीही त्याला सांगितले होते कि मी जर तुला काही सांगितले/बोलले तर ते फक्त ऐकून घे. त्यामधे कोणाचे बरोबर कोणाचे चूक हा विचार करू नको. याघरात ज्याला मनातले सांगता येईल असा तूच आहेस Happy

अगदी छोट्या गोष्टी असू शकतात ज्या डोक्यात जातात.
मी लग्न होऊन सासरी आल्यावर जाऊबाईंना(ज्यांच्या लग्नाला १२+ वर्षे झालीत) दरवेळी 'नाष्टयाला, जेवायला काय कारायचे' तसेच बरेच काही सासूबाईंना आणि नंदेला विचारुन करताना पाहिले आणि 'हे काय सारखे विचारायचे' असे वाटले. नंतर त्यांनी मला सांगितले कि तेवढेच आपण त्यांना विचारुन करतो याचा त्यांना आनंद होतो. घरात ज्या भाज्या आहेत त्यापैकी एक करायची असते, फक्त त्यांना विचारुन करायची एवढाच फरक.
त्यावर मी विचारले होते कि आपल्या ईच्छेचे काय? त्यावर त्या बोलल्या कि मग प्रश्न फिरवायचा, 'हे करु का?/ हेच करते, चालेल ना?' असे विचारल्यासारखे करून आपल्याला हवे ते करायचे Wink
शक्यतो अश्या छोट्या गोष्टींत नाही अडकून रहायचे. मात्र आपल्याबाबतीत जे मोठे निर्णय घ्यायचे असतात ते नवर्‍याला बरोबर घेऊन त्यावर ठाम रहायचे. मग बाकिचे काही करू शकत नाहीत.

2 वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला, घरचे निर्णय घेणे हे वाटते तितके सोपे नाही. तुमच्यावर अजून ही जबाबदारी पडली नाहीय याबद्दल देवाचे आभार माना व आनंदात आयुष्य जगा...या असल्या भंपक गोष्टींशी मी अज्जिबात सहमत नाही.
मुळात लग्न झाले की नवर्‍याने ठामपणे बायकोच्या मागे उभे राहिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. वेळप्रसंगी स्वतंत्र राहायची वेळ आली तरी चालेल.

तुम्ही मोकळेपणाने नवर्‍याला विश्वासात घेऊन परिस्थिती सांगा आणि यातून मार्ग काढा.

अरे उपाशी बोक्या, का रे घरे फोडतोयस? नवऱ्याला माहीत आहे सगळे, तो सबुरीचा सल्ला देतोय.. तोही काहीतरी विचार करूनच बोलतोय ना.. जरा थांबून त्याचेही ऐकूदे की.. एक घाव दोन तुकडे करण्याआधी दहा वेळा विचार केलेला बरा.

वर अस्मिताने तिच्या बाजूने लिहिलेय, तिच्या सासरच्यांच्या बाजूने काय कथा आहे आपल्याला कुठे माहीत आहे?. या असल्या कथांमध्ये नवरा हा प्राणी कॉमन असतो, त्याला दोन्ही बाजू दिसत असतात. पण एकाला धरलं की दुसरं चावतं त्याला तो घाबरतो.

ऋन्मेष, खूप छान पोस्ट. लग्नाळु असूनही ( म्हणजे लग्नाचा अनूभव नसतांनाही ) एवढा समतोल राखु शकलास तर तुझी आई व बायको दोन्ही सुखी रहातील. ( तू जर कर्क राशीचा असशील तर मात्र कठिण आहे, कारण असे लोक ममाज बॉय असतात, आणी त्यांचे बायको व आई या दोन्हीत चटणी व सॅलेड होते )
नवीन Submitted by रश्मी.. on 9 April, 2018 - 17:47
>>>>>
ऋ हा आयडी लग्नाळू आहे पण तो ड्यु आयडी आहे हे लक्षात ठेवा.
मुळ आयडीची अनुभवी पोस्ट छान आहे असे म्हणा.
Proud

2 वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला>>
हे वाक्य मलाही खटकलं.
सून येते ना तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या घरात? तिच्या माहेरची माणसं त्यांच्या लाडाकोडाच्या मुलीला तुमच्या भरवशावर पाठवतात ना तुमच्या घरी? मग तिच्यावर तुम्हाला ( सासरच्यांना) विश्वास टाकता येत नाही?
बाकी अस्मिता, तुला शुभेच्छा या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी. इथले सल्ले तुला उपयोगी पडोत.

लग्न होऊन नवी सून घरी आली की लगेच तीला सर्व कामकाजात सामील करून घेतले जाईल हे आदर्श वाटत असले तरी तसे प्रत्यक्षात होत नाही. यात कायम सून दोषी किंवा सासरचे दोषी असतात असे नाही तर दोघेही एकमेकांना जोखत असतात. इस्टेब्लिशेड लोकांनी नव्यांना एकटे पाडू नये ही त्यांची जबाबदारी तशीच नव्यांनीही घराला आपले म्हणावे ही त्यांची जबाबदारी.

मुलगी लग्न करून सासरी गेली की तिचे आयुष्य बदलते, तिला नवीन जागी, नव्या लोकांत ऍडजस्ट करावे लागते, नव्या घरच्यांचे आयुष्य आधीपासून जसे असते तसेच सुरू राहते, त्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडत नाही. हे सगळीकडे होते, एकत्र राहा किंवा वेगळे राहा.

अस्मिता बहुतेक एकत्र कुटुंबात राहतेय. तिला आधी स्वतंत्र राहत असल्यामुळे आता एकत्र कुटुंबात त्रास होतोय. हे शक्य आहे की सासरचे तिला अजून आपली समजत नाहीत पण त्यांनी तसे समजावे यासाठी अस्मिता काय करतेय हे तिने लिहिले नाही. नवरा थांब म्हणतोय यामागेही काही कारण असेलच ना..

मी हे सगळे लिहायचे कारण माझी एक चुलत वहिनी सेम अस्मितासारख्या तक्रारी करते. नणंद सगळे निर्णय घेते, नवरा सासू विचारत नाही, काही सांगत नाहीत, घुसमटल्यासारखे वाटते, स्वातंत्र्यच नाही वगैरे वगैरे सगळ्या तक्रारी सारख्याच, तेच शब्द. मला अस्मिताची तक्रार वाचून घरचीच कथा आठवली Happy Happy . पण याची दुसरी बाजू ही आहे की चुलत भावाने आजवर एकट्याने कधीही काही केलेले नाही, त्याला तेवढा कॉन्फिडन्स नाहीय. कायम मोठ्या बहिणीच्या खांद्यावर भार टाकून चालला, त्याला प्रत्येक गोष्टीत बहिणीचीच आठवण येते. घरात जे काही बोलले जाते, ठरवले जाते त्या सगळ्याला वहिनी समोर असते. तिच्यासमोर सगळे निर्णय घेतले जातात. कुणी बंद दरवाजामागे, मुद्दाम तिच्यापासून लपवून काही ठरवत नाही. निर्णय घेताना ती समोरच असल्यामुळे भाऊ परत तिला समोर बसवून सांगत नाही. आणि असे वेगळे सांगत नाही म्हणून ती भडकते. गावातच माहेर असल्यामुळे भांडून माहेरी जाते. भाऊ म्हणतो अजून अल्लड आहे, तिला काय कळतेय. ती म्हणते मला सगळे कळते, मला विचारत नाही. असा सगळा तिढा गेले दोन वर्ष सुरू आहे. तिच्या ननंदेने आता माहेरी जाणे बंद केले, कायती तुमची तुम्ही झक मारा म्हणत.. आता याच्यात कुणाला दोषी ठरवणार?. आमच्यासारखे बाहेरून बघणारे कपाळाला हात लावतात. इन मिन तीन माणसांचे घर आणि तिघांची तोंडे तीन दिशांना. हट्टाने, गावाचा रोष पत्करून लग्न केले. घरात आल्यावर घरातल्यांना आपलेसे करून घ्यायचे, नाही जमत तर निदान भांडून माहेरी जाऊन आपले हसे करून घेऊ नये, एवढेही कळत नाही.. आईवडिल समजावून परत पाठवतात. पंधरा दिवस चांगले जातात, परत येरे माझ्या मागल्या.

2 वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला>>
हे वाक्य मलाही खटकलं. >> एक्झॅक्ट्ली. मला पण खूप खटकलं. खरं तर नव्या सुनेला घरात मोकळं वाटावं, तिने रुळावं यासाठी सासरच्या लोकांनी खासे प्रयत्न करायला हवेत. त्यात नवर्‍याची जबाबदारी मोठी कारण तो पत्नी आणि त्याच्या घरचे यांमध्ये महत्वाचा दुवा असतो. बर्‍याच घरांमध्ये नव्या सुनेसाठी आम्ही इतक्या सर्वांनी बदलायची काय गरज? त्यापेक्षा तिने एकटीने बदलणे महत्वाचे आहे असा सूर मी स्वतः ऐकला आहे. खरंतर कुणी कुणासाठी बदलायची गरज नसते. थोडे तुझे थोडे आमचे आणि एकमेकांच्या मतांचा आदर इतकेच असते. त्यातून मग तुझ्या माहेरी असे असेल, पण आमच्या इथे असे नसते हे बोलून नव्या सुनेचे खच्चिकरण केले जाते, आणि ती कटुता मग सुनेच्या मनात कायमची घर करून राहते. त्यामुळे नवरा आणि सासरचे लोक अतिशय समजूतदार आणि प्रगल्भ असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ज्या घरी मुलगा जन्मला असेल त्या घरच्यांना सुरूवातीपासून (सून येण्याच्या कमीत कमी १० वर्षे अगोदर पासून) ट्रेनिंग गरजेचे आहे Proud

Pages