सून म्हणजे रोबोट असते अस का वाटत ह्याना?

Submitted by अस्मि_ता on 9 April, 2018 - 04:41

Maz lagna houn 2 varsha zali pan ajun mazya sasari mala kuthlyach nirnyat consider kel jat nahi. Kahich kimat nahi. Hya ulat kamachya babtit mhanaje sagalech gruhit dhartat. Gharat sagal mazya nanandechya mhananyanusar chalat. Maza kahich vichar kela jat nahi. Mazi khup ghusmat hote. Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. Pan jevha pasun lagna zalay tevhapasun maza sagala swatantrya hiravun ghetalay asa vatat. Tyatach maza job gela ani situation ajunach kathin zaliy. Maza confidence low zalay. Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. Me robot nahiy. Mala emotions ahet he hyana ka kalat nahi?
Maaybolikar apal manun salle detat mhanun ethe post karate.

Group content visibility: 
Use group defaults

स्वाती२ आणि ऋन्मेऽऽष, प्रतिसाद आवडले. खासकरून हे भाग:

• मात्र लग्नाच्या नात्यात मूल हे त्याचे एक्स्टेंशन झाले. मूल क्रेंद्र नाही होऊ शकत, तसे होणे योग्यही नाही. तुम्हाला कसलीच किंमत न देणार्या लोकांसोबत दिवसभर घरी रहाणे आणि जोडीला आर्थिक दृष्ट्याही दुसर्यावर अवलंबून हे तुमच्या परीस्थितीत योग्य नाही. त्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवावे लागले तरी नोकरीसाठी आणि तुमचा स्किलसेट उंचावण्यासाठी प्रयत्न करत रहाणेच योग्य राहील.

• सध्या तुमचे मूल लहान आहे. जसे ते मोठे होईल तसे तुमचे घरातील कमकुवत स्थान बघता त्याला वाढवतानाचे असंख्य निर्णय घेणे हे देखील तुमच्यासाठी आव्हानचे होईल. घरातील इतर सदस्य तुम्हाला आदराने वागवत नसतील तर उद्या मूल देखील त्यांचेच अनुकरण करण्याची शक्यता आहेच. मूल तणाव ग्रस्त वातावरणात तुमच्या सोबत दिवसभर रहाण्यापेक्षा ते काही काळ पाळणाघरात असलेले चांगले.

• मूल दोघांचे असते. आईनेच त्याचा विचार करत तडजोड करावी हे आपण कश्याला एका स्त्रीवर लादतो?

• नाहीतर मग सांभाळा एकापाठोपाठ दुसरे मूल आणि गेली करीअरची चारपाच वर्षे...

===
अजून काही मुद्दे ऍड करते.

• १ किंवा जास्तीजास्त २ मुलं जन्माला घालून, त्यांनाच आयुष्यभराच प्रोजेक्ट समजनाऱ्या बायकाच भावी 'सासू' बनण्याची शक्यता अधिक असावी.

• घरातली अंगमेहनतीची कामं आऊटसोर्स केली आहेत. घरात ३ स्त्रिया आहेत. त्या फक्त स्वैपाक करतात आणि मुल सम्भाळतात. ते मूलदेखील जास्तीजास्त २.५ वर्षांपर्यंत घरात फूल टाईम असणार आहे. पुढे त्याची शाळा, कॉलेज, टिवशन, इतर ऍक्टिव्हिटी मधे घराबाहेरच वेळ वाढतच जाणार आहे. मग या बायका काय करणार घरात? किती ते मनुष्यबळाच वाया घालवणं.

• आपण १-१.५ वर्षाचे असताना कोणासोबत काय बॉण्डिंग करत होतो हे कोणाला आठवतंय हात वर करा बरं? पण तेच ८+ वयाचे होऊ लागल्यावर पडलेला मार, १२+ झाल्यावर झालेलं मेंटल टॉर्चर कोणाकोणाला लक्षात आहे?? नाती नक्की कोणत्या वयात बनतात आणि तुटतात?

अमी, तुमचा मुद्दा योग्य आहे, मलाही स्वाती2 यांचा मुद्दा खूप आवडलेला, तसा विचार करता येणे खूप गरजेचे आहे.

दुर्दैवाने इथे जनता असले विचार करत नाही. तुम्हाला या बायका नंतर करणार काय हा प्रश्न पडतोय, मी प्रत्यक्ष पाहतेय बायका काय करतात ते. एकमेकांची उणीदुणी काढणे, नावे ठेवणे, टीव्हीवरच्या सिरीयलमधल्या बाईने कसे बररोबर अमुक्तमुकला नमवले, मीही तसेच करणार या चर्चा करणे.... अनंत कामे आहेत हो. तुमचे डोके गरगरून जाईल तुम्ही ऐकले तर. Happy स्किलसेट, पर्सनल स्पेस, डेव्हलपमेंट,स्ट्रेस इत्यादी गोष्टी कधीही कानावरून गेल्या नाहीयेत, कुणी घातल्या तर त्या करणारे लोक वेगळे असतात, आम्हाला त्याची गरज नाही हे ऐकायला मिळते. घरात मुलांचे लग्न होऊन त्यांनी कारभार चालवायला सुरवात केली तर आपल्या हातून सत्ता गेली असे आईबाबांना वाटते.

घरातील सर्व धुस्फुशीचे मूळ या सत्ता प्रकरणात आहे. सुनेची सासू व मुलाचे वडील मुलाच्या लग्नाआधी जे घरासाठी काही करत आले त्याला स्वतःची सत्ता समजतात, मुलाच्या लग्नानंतर त्या जबाबदाऱ्या मुलगा व सून घ्यायला लागले की ती सत्ता आपल्या हातून जातेय असे समजून ती सत्ता आपल्या हातात घट्ट धरून ठेवायला बघतात. ती सत्ता मिळत नाही म्हणून मुलगा व सून यांची घुसमट व्हायला लागते.

लग्न झाले की मुलाला स्वतःहून वेगळी चूल मांडून देणे हा यावर चांगला पर्याय आहे पण कुणीही याचा विचार करत नाही.

आईनेच त्याचा विचार करत तडजोड करावी हे आपण कश्याला एका स्त्रीवर लादतो? >> कारण बरेच वेळा तिची बाजू कमकुवत असते.

अकेले हम सिनेमातील मनीषा कोईराला (मूळ क्रेमर व्हर्सेस क्रेमर मध्ये मेरिल स्ट्रीप) सारखे आर्थिक स्थैर्य, मूल तसे मोठे सुटवंग इ. परिस्थिती सामान्य आईची नसते. परिस्थिती चिघळली, नवर्‍याने माहेरी सोडले तर तिला बळ नाही. त्यामुळे तिला ताणून धरता येत नाही. जोडून धरण्यात व्यावहारिक शहाणपण असते.
बायको निघून गेली तर खरंच किती नवरे आमिर सारखं एकहाती मूल वाढवतील? १५ दिवसात दुसरी बायको आणतील, नाहीतर बाई "ठेवतील". बरं, बायांना परिकथेतील सफेद घोड्यावरच्चा राजकुमार नाही मिळाला तरी परिकथेतील दुष्ट सावत्र आई आपल्या पोरांच्या वाट्याला येईल याची पक्की खात्री असते. त्यामुळे त्याही तडजोडीत धन्यता मानतात.

घरातील सर्व धुस्फुशीचे मूळ या सत्ता प्रकरणात आहे. सुनेची सासू व मुलाचे वडील मुलाच्या लग्नाआधी जे घरासाठी काही करत आले त्याला स्वतःची सत्ता समजतात, मुलाच्या लग्नानंतर त्या जबाबदाऱ्या मुलगा व सून घ्यायला लागले की ती सत्ता आपल्या हातून जातेय असे समजून ती सत्ता आपल्या हातात घट्ट धरून ठेवायला बघतात. ती सत्ता मिळत नाही म्हणून मुलगा व सून यांची घुसमट व्हायला लागते. >>> +१११११११११

घरात मुलांचे लग्न होऊन त्यांनी कारभार चालवायला सुरवात केली तर आपल्या हातून सत्ता गेली असे आईबाबांना वाटते. >>>>>>> असंच काही नाही.मला सासुरवास झाला तसा माझ्या सुनेला होऊऊ नये.तिला तिक्च्या मनासारखे वागू दे म्हणून मुलाच्या लग्नानंतर ४-५ महिन्यांनी गावी येऊन जाऊन असणारी सासू पाहिली आहे.प्रसंगी स्वतःच्या मुलीवर नकळत अन्याय करून सुनेला मुलीसारखी माया करण्यार्‍या सासूबद्द्ल सुनेचे उदगार होते की हो लगेच सासूने संसार गळ्यात टाकला.नंतर घरात सासुरवासाऐवजी सूनवास,भावजयवास असे पहायला मिळाले होते..तेव्हा हे नातेच अतर्क्य आहे.

असो धाग्याशी अवांतर आहे.

परिस्थिती चिघळली, नवर्‍याने माहेरी सोडले तर तिला बळ नाही. त्यामुळे तिला ताणून धरता येत नाही. जोडून धरण्यात व्यावहारिक शहाणपण असते.
>>>>>>

त्या दिवशी मुलींनी आईवडिलांना सांभाळायच्या धाग्यावर प्रॉपर्टीचा मुद्दा मी याचसाठी काढलेला की ते बळ येण्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि त्यासाठी समान आर्थिक हक्क असणे गरजेचे. मुलगी अशी लग्न मोडून आपल्याच वडिलांच्या घरी परत आली की तिच्या भावाच्या आणि त्याच्या बायकोच्या कपाळावर आठ्या पडतात अरे ही आता ईथे कशाला परत आली..

असो,
आर्थिक स्थैर्य म्हणाल तर कमावते असणे वा ती क्षमता असणे पुरेसे नाही का? शिक्षणाच्या जीवावर ते आजकालच्या मुलींना बायकांना शक्य झालेय. दुर्दैवाने अश्या बायकाही कचरतात. कारण तो निर्णय सध्याच्या समाजमान्यतेविरुद्ध जाऊन घ्यायचा असल्याने धाडसी ठरतो.

आणि हो, मी अकेले हम अकेले तुम चित्रपटाची आठवण काढली म्हणून आपणही लग्न तुटले, सावत्र आई आणली ईथवर पोहोचलात. बायकोने आपल्या आयुष्याचा आणि करीअरचा निर्णय घ्यायचा हक्क मागताच लगेच तिथवर परीस्थिती जाईलच असे नाही. अर्थात गेलीच तर यासाठी तयार राहायला हवे. पण त्या केसमध्ये कायद्याने स्त्रियांना बळ दिले आहे. करीअर सेट होताच मुलांची कस्टडी घेऊ शकतात. वा त्या आधीही तुटपुंज्या उत्पन्नात त्यांना पोसू शकतात.
तुम्ही जे बळ नाही म्हणता ते न कमावत्या स्त्रियांना लागू. ज्यांना नवरयाने सोडलेली बायको हा शिक्का घेऊन आश्रितासारखे माहेरी येऊन पडावे लागते. पण जी स्त्री करीअरसाठी असा निर्णय घेतेय तिच्यात कमवायची क्षमता साहजिकच असणार ना..

. बायकोने आपल्या आयुष्याचा आणि करीअरचा निर्णय घ्यायचा हक्क मागताच लगेच तिथवर परीस्थिती जाईलच असे नाही. अर्थात गेलीच तर यासाठी तयार राहायला हवे. पण त्या केसमध्ये कायद्याने स्त्रियांना बळ दिले आहे. करीअर सेट होताच मुलांची कस्टडी घेऊ शकतात. वा त्या आधीही तुटपुंज्या उत्पन्नात त्यांना पोसू शकतात.
तुम्ही जे बळ नाही म्हणता ते न कमावत्या स्त्रियांना लागू. ज्यांना नवरयाने सोडलेली बायको हा शिक्का घेऊन आश्रितासारखे माहेरी येऊन पडावे लागते. पण जी स्त्री करीअरसाठी असा निर्णय घेतेय तिच्यात कमवायची क्षमता साहजिकच असणार ना..>> +७८६ पोर घेउन बाहेर पडून प्रथम भाड्या चया व मग स्वतःच्या घरात शिफ्ट होता येइल. एक मेड ठेवा किंवा पाळणा घर पर्याय शोधता येइल एक नोकरी व अर्थार्जनाचा मार्ग निस्चित करा. दोन नोकरी किंवा फ्रीलान्स करता येइल आर्थिक तोंड मिळवणी करण्या साठी. तुम्ही अ‍ॅडल्ट आहात. स्वाभिमान
व सेल्फ रिस्पेक्ट का काँप्रमाइज करता ? आयदर सेट ऑफ पेरेंट ची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या जीवनातील महत्वाच्या लोकांचा भावनिक आधार व्हायला पाहिजे. नॉट द अदर वे राउंड. मुलांना हसरी आनंदी मेहन ती आई हवी असते. आहे त्या पैशात त्यांच्या मेन गरजा भागवता येतील असे बघा पण तुम्ही मानसिक दॄ ष्ट्या सुखी असाल. व डोक्यावर कोणाचा मूड सांभाळायचे टेपर २४ गुणिले ७ असायचे कारण नाही. पतींना तुमची रिलेशन शिप महत्वाची वाटत असेल तर ते तुम्हाला जॉइन होतील नाहीतर हे ही एक लर्निंग लेसन.!! बी सेल्फ अवेर, सेल्फ सफिशिअंट भावनिक गुर्हाळ किती चालवणार? यू ओन्ली लिव्ह वन्स.

प्रतिसाद आव्डला नाहीतर इग्नोअर मारा. कोणालाही चिथवायचा त्रास अपमान करायचाआ जिबात उद्देश नाही. पन
आठवडा भर वाचून पिट्ट्या पडला म्हणून लिहीले.

हो, सिलबस मध्ये अकेले हम दिला होतास म्हणून अकेले हम वर रेंगाळले. इतर सिनेमे आउट ऑफ सिलबस असतील वाटले मला. "चक दे इंडिया" मधल्या सारखं "विद्या शर्मा इंडिया" अलाउड असेल तर तसे तसे पण प्रतिसाद लिहू शकते. Happy

माझ्या आजेसासुने त्यांच्या सूनेला म्हणजे माझ्या सासुबाईंना खूप छळले, कारण त्यांना त्याही काळात ६ तोळे सोने आणी ५ हजार हुंडा हवा होता ( १९७० साली ) पण सासर्‍यांना नको होता. त्याचे उट्टे आसासुने काढले. म्हणून सासुबाईनी ठरवले की माझ्या सुनांना मी तसे वागवणार नाही जे मी भोगले. आणी त्या तशा माझ्याशी खरच चांगल्या वागल्या. पण मला नंणंद नसली तरी जाऊ आहे की. तिने सतत खोटे बोलुन माझ्या सासुला पकवले व साबांनी मग मला त्रास द्यायला सुरुवात केली. पण म्हणतात ना भगवान के घर में देर होती है, अंधेर नही. तसे जावेचे झाले.तिला असा काही झटका बसला की आली आपोआप वठणीवर. साबा पण नरमल्यात, मी शांत होते. जशी जाऊ वेगळी रहायला गेली, तशी मी खंबीर बनले.

या सासु लोकांचा इगो जबरी असतो आणी तो त्या पदोपदी दाखवतात. अस्मिता, आतल्या आत स्वतःला त्रास करुन घेऊन तुझी मनःशांती ढळु देऊ नकोस. ठाम रहा.

हे पहा तुमचे मिस्टर किती स्वावलंबी आहेत त्यावर खूप काही आहे. वेळ आलीच तर घर सोडून मुंबई सारख्या शहरात दुसरीकडे सदनिका घेऊन आपला वेगळा संसार थाटायची त्यांची ऐपत आणि मानसिक तयारी आहे का? ते स्वत:च जर अजून वडिलांवर (जे कि एमएनसी मध्ये उच्च हुद्द्यावर काम करत आहेत) अवलंबून असतील (भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या) आणि आईवडीलाना सोडून वेगळे राहणे त्यांना परवडणारे नसेल (पुन्हा, दोन्ही अर्थाने) तर तुमची समस्या सुटण्याची अपेक्षा सोडून द्या. तुम्हाला कोम्प्रोमाईज करतच वैवाहिक आयुष्य जगावे लागेल. पण जर तसे नसेल आणि मिस्टर सुद्धा हिमतीने पत्नी मुलांची जबाबदारी वेगळे राहून घेऊ शकत असतील तितकी त्यांच्यात धमक असेल तर मग नक्की अडचण काय आहे? दोन्हीहि हवे हे जमणार नाही. तुमच्यासाठी इतरांनी त्यांचे स्वभाव का बदलावेत? आणि त्यांचे स्वभाव तसे आहेत म्हणून तुम्ही तरी का सफर व्हावे?

ता.क. भारतीय एकत्र कुटुंब पद्धती हि बदलत्या काळात आउटडेटेड आणि म्हणून फेल गेलेली सिस्टीम आहे. इंटरनेट आणि युएसबी प्लेअर च्या जमान्यात तुम्ही जुन्या रेडीओला कवटाळून बसून त्यात खरखर आवाज येत आहे अशी तक्रार करत आहात.

असे म्हणतात की दर २० वर्षांनी पिढी बदलते. पुढील पिढीची मते आपल्या मतापेक्षा वेगळी असतात. आपण कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरी सलोखा राहीलच याची खात्री नसते. हे जसे भविष्यकाळाला लागू होते तसे भूतकाळात/ वर्तमानकाळात ही घडते आहे.

सन्माननीय अपवाद वगळता सर्वांना यातून जावेच लागेल. त्यामुळे आपण आपली मते कितीही मांडली तरी पुढील काळ कोणी पाहिला आहे?

एक पुरुष म्हणून मला कोणी सांगितले की लग्नानंतर तुला बायकोच्या घरी राहायचे आहे तर माझे माझ्या गर्लफ्रेंडवर कितीही का प्रेम असेना मी लग्नच करणार नाही
ऋन्मेष, उलट काही वर्षे मुलांना लग्नानंतर मुलींकडे रहायला पाठवायला पाहिजे मग त्यांना समजेल मुलींची अवस्था !!

शिल्पा, असे दुसरयाच्या घरात एडजस्ट होणे हे किती कर्मकठीण असू शकते हे मी ते अनुभवताही समजू शकतो. आणि म्हणूनच मी अशी अट असल्यास लग्नच करणार नाही असे बोलत आहे.

आजवर हे होत आले कारण हे समाजमान्य होते, हे असेच चालत आले आहे, सर्वच मुलींना हे करावेच लागते या आधीपासूनच रुजलेल्या मानसिकतेमुळे.. पण आता हळूहळू जमाना बदलत जाईल, नवनवीन पर्याय उपलब्ध होतील, आधुनिक आणि स्वतंत्र विचारांच्या कमावत्या मुलींना हे पटणार नाही, ते नवनवीन पर्याय शोधू लागतील, आणि समाजालाही बदलावे लागेल. मी तरी स्वत:ला आणि माझ्या येत्या पिढीला या बदलासाठी तयार करेन.. येत्या काळात एकत्र कुटुंब पद्धती ही फक्त सर्वांची सोय म्हणून बघितली गेली पाहिजे बंधन म्हणून नाही.

Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. >> मला तुमच हे वाक्य सर्वात जास्त आवडल. कुठल्याही इतरांनी दिलेल्या सल्यापेक्षा, सारासर विवेकी विचार करा व तसेच वागा.

तरीपण. कुणीतरी वर सल्ला दिलाय, तो फार महत्वाचा आहे अस मला वाटत. उगाच छोट्या, छोट्या गोष्टीत अडून बसायच नाही. काही फरक पडत नाही. माझा एक साधा रूल आहे. टाईम टेस्ट . एक वर्षानी तुम्हाला कोणी विचारल, १८ एप्रिल २०१८ ला मेथी ऐवजी भोपळ्याची भाजी केली होती, काय फरक पडला? नाही न. मग जाउ दे न. करा तुम्हाला काय करायचय ते. तुम्ही म्हणाल काळ सोकावतो, तर तस काही होत नाही.
बर सोकावला, तर कधी तरी एकदा आपली बाजू १०० % बरोबर आहे असे पाहून एक धक्का द्यावा.

अवांतर : मला बायकांची एक गोष्ट कधीच कळाली नाही. इतरांशी अगदी आदर्श वागणार्‍या बायका सून, नणंद व सासू म्हणून अगदीच वेगळ्या का वागतात. आणि स्वतःचा रोल बदलल्यास वागणूकही का बदलतात.?

असो, आमच्या कडे सुदैवाने हा प्रोब्लेम नव्हता/नाही (असे मला वाटते. Happy )

अवांतर : मला बायकांची एक गोष्ट कधीच कळाली नाही. इतरांशी अगदी आदर्श वागणार्‍या बायका सून, नणंद व सासू म्हणून अगदीच वेगळ्या का वागतात. आणि स्वतःचा रोल बदलल्यास वागणूकही का बदलतात.? >>>> Lol
हे समोरच्या माणसाच्या वागण्यावर पण डीपेंड असत.कोनीही स्वतःहुन मुळ स्वभावाला फारकत घेऊन मुद्दाम वेगळे वागत नाही.
त्या त्या रोलमधे आपले सत्तास्थान काय त्यावरही वागणे डिपेंड असावे Wink Lol

मला बायकांची एक गोष्ट कधीच कळाली नाही. इतरांशी अगदी आदर्श वागणार्‍या बायका सून, नणंद व सासू म्हणून अगदीच वेगळ्या का वागतात. आणि स्वतःचा रोल बदलल्यास वागणूकही का बदलतात.? >>>> हे फक्त स्त्रियां बाबत होते असे नाही, सर्वांसोबत होते असे मला वाटते. एखादी व्यक्ती जेव्हा समाजात वावरते तेव्हा स्वत:ची एक चांगली ईमेज बनवायचा प्रयत्न करते, पण हे असले मुखवटे नात्यात चालत नाहीत तीथे कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही ईतकेच

ऊदा. जेव्हा एखादे लग्न ठरते तेव्हा पहिले काही दिवस सगळेच खुप लाडे लाडे चालते पण जसजसे दिवस जातात , नव्याची नवलाई संपते तसे एकुणच काहिनाकाही बदल दिसतात. आधी ज्या गोष्टी एन्जॉय केल्या जायच्या त्या कदाचित खटकतात सुद्धा, कारण रोजच्या सहवासाने ते बुरखे गळुन पडलेले असतात. अर्थात हेमावैम.

इतरांशी अगदी आदर्श वागणार्‍या बायका सून, नणंद व सासू म्हणून अगदीच वेगळ्या का वागतात. आणि स्वतःचा रोल बदलल्यास वागणूकही का बदलतात.?>>>>> Proud लग्नानंतर मी पण प्रेमळ सुनेसारखी वागत होते. ( माझ्या मनात भेदाभेदाला थारा नाही ) पण घरात अजूनही माझा काहीही दोष नसतांना मी व माझी जाऊ यात भेदभाव केला गेला, त्याने आता माझे मन दुभंगलेच आहे. पूर्वीची सहानुभुती व प्रेम जाऊन आता कोरडेपणाच उरलाय. आता मी करते ते निव्वळ कर्तव्य म्हणून करते. का बदलु नये मी सून झाल्यावर? माझे आई वडील दूर एकटे रहातात, माझ्या संसारात त्यांची कसलीच ढवळाढवळ करत नाही, तरीही माझ्या समोर माझ्या अई वडीलांना शिव्या दिल्या जातात, मग काय मी एकनाथ महाराज किंवा गौतम बुद्धांचा अवतार धारण करु? ते कालत्रयी शक्य नाही. मुलींनी बदलायलाच हवे. इतके मात्र आहे की मी मात्र माझी माणुसकी कधीच सोडणार नाही.

माझे आई वडील दूर एकटे रहातात >>> मुलाचे आईवडील मात्र सुनांकडून सर्व सेवा घेतात परंपरा म्हणून आणि वर तिच्या आईबाबांना नावे ठेवतात. घरोघरी मातीच्या चुली..
आमचे झाले.. आता तुमची पिढी काही बदल घडवा...

माझ्या समोर माझ्या अई वडीलांना शिव्या दिल्या जातात, मग काय मी एकनाथ महाराज किंवा गौतम बुद्धांचा अवतार धारण करु? ते कालत्रयी शक्य नाही. मुलींनी बदलायलाच हवे. >>>>>>>> बरोबर आहे.अशावेळी सहन अजिबातच करू नये.

शिल्पा, असे दुसरयाच्या घरात एडजस्ट होणे हे किती कर्मकठीण असू शकते हे मी ते अनुभवताही समजू शकतो.
अनुभव घे, अनुभवाने जास्त समज येते Happy

आणि म्हणूनच मी अशी अट असल्यास लग्नच करणार नाही असे बोलत आहे.
अशी अट असल्यास आजच्या 'तिनेही' हेच म्हणावे पण या understanding / रुजलेल्या मानसिकतेमुळे सगळे डिफॉल्ट मोडमध्ये सुरु असते आणि त्यानुसार मुलगीच आपले घर सोडणार हे ठरलेले असते .

Baapre kiti pratisad ani kiti baykanche same dukhne!

Samaj parivartan kevha honar?????????

tiche 2 tar majhe 5 parastiti same ch ahe! Ase ka he vicharnyach sadh dhadas hou naye.

vicharava kunala? kunach chukta sasu ch ki sune cha?

he sgle fakt mudde ahet charcha karnyache.

Asmita mi solution dete..... Ultimately kay tar tu happy rahayla havi. Tu happy tar navra happy ani ghar happy.

2 point sangte

1. kunihi kahihi bolla na ki tyatun kai tari vinod nakki nirman hoto... to vinod manat shodhun tyala vinodane pratiuttar karaych (Pan Manat lya manat! ani konti hi adhi na thevta)

2. Thodasa chavat ani kamchukar banaych Happy ho! ugach kantala ala thaklis ki washroom madhe jaun mast 20 min timepass karaycha! Swatat guntane visarloy apan. baher kya situation la apan aplyawae havi hou deto. Te hou dydych nai.

Ata tu juni jhali ahes so thod ulta bolla tari chalta...... ulta mhanje god bolaych pan tomna lagla pahije.... te mhantat na bolun vait vhaych nai. God bolatch janiv karun dyaychi...... ani mahatvachi gosht... Navryavar priyakarasarkh bhar bharun prem karaych! ugach i love u naa vagere msgs send karayche. Bagh Saunsar kasa fulto te!

Majhya 5 varshyachi story sangte short made

pahili 2 varsha khup jach.. hundya warun disnya paryant sagla problem.. tomne.... navryache vikshipta vagne... majha confidence paar dhulila milalesa.
Job dharla 3 mahinyat TL post milali... sagle tarif pe tarif.. man sukhavle ani confidence back jarasa

3rd year navryache affair kalale, mi mhanje fakt samjhota kelela....
mi apla sthan ahun bhakkam karat hote gharat ani manat
4th year majhya bahini sobat affair... manatun kolmadle chidle watla jiv dyava
5th year planning for divorce... navra chan wagto ata, mhane ata kuni nia fakt tu.

Ata thodi emotionally stable ahe.

Pages