सून म्हणजे रोबोट असते अस का वाटत ह्याना?

Submitted by अस्मि_ता on 9 April, 2018 - 04:41

Maz lagna houn 2 varsha zali pan ajun mazya sasari mala kuthlyach nirnyat consider kel jat nahi. Kahich kimat nahi. Hya ulat kamachya babtit mhanaje sagalech gruhit dhartat. Gharat sagal mazya nanandechya mhananyanusar chalat. Maza kahich vichar kela jat nahi. Mazi khup ghusmat hote. Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. Pan jevha pasun lagna zalay tevhapasun maza sagala swatantrya hiravun ghetalay asa vatat. Tyatach maza job gela ani situation ajunach kathin zaliy. Maza confidence low zalay. Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. Me robot nahiy. Mala emotions ahet he hyana ka kalat nahi?
Maaybolikar apal manun salle detat mhanun ethe post karate.

Group content visibility: 
Use group defaults

इथे प्रॉब्लेम लिहिणारे फेक असू शकतात याची खूप मोठी शक्यता आहे, हे माहीत असूनही मी खूप वेळा सल्ले देते करण 1 टक्का शक्यता प्रॉब्लेम खरा असायची सुद्धा असते, 99 खोट्या लोकांमुळे एक खरा का खोटा ठरवा?.

वर काहीना स्त्री वादी म्हणजे तलवारी घेऊन सज्ज असले पाहिजे किंवा काही वर्षांपूर्वी तलवारी उपसल्या होत्या मग आता का नाही असे प्रश्न पडले हे वाचून आश्चर्य वाटले. माझया प्रतिसादावर त्यांचा वरील प्रतिसाद नाही हे मला माहित आहे पण तरी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेगळे असू शकते, काही प्रश्न सामोपचाराने मिटु शकतात, काहींना तलवारीच उपसाव्या लागतात हे का लक्षात घेत नाहीत?

साधना यांची प्रतिक्रिया चांगली आहे. सहमत.

अनेक कुटुंबांमध्ये एखाद्या बाबीची निरपेक्षपणे योग्यायोग्यता न पाहता व्यक्तीसापेक्ष निर्णय घेतले जातात. त्यामुळे निर्णय/विचार काय आहे यापेक्षा तो कुणी मांडलाय (लहान कि थोर, स्त्री कि पुरुष, सासू कि सून, वडील कि मुलगा, सासरकडचे कि माहेरकडचे) यालाच जास्त महत्व असते. ते थोरले आहेत मग ते म्हणतात तेच बरोबर, तो अजून लहान आहे त्याचे काय ऐकायचे, बायकांना यातले काय कळते, ते सुनेच्या माहेरचे लोक त्यांच्या म्हणण्याला काय किंमत इत्यादी अशा प्रकारचा विचार करून ती व्यक्ती काय म्हणते याला मुळात महत्वच दिले जात नाही. भले ती अगदी योग्य बोलत असेल तरीही. अर्थातच हे निरोगी व्यवस्थेचे लक्षण नव्हे. यापद्धतीची कलंडलेली मानसिकता असेल तर त्याचे कधीकधी किती भयंकर परिणाम होऊ शकतात याबाबत एक दोन प्रसिद्ध अशी उदाहरणे (कौटुंबिक नव्हे) आठवत आहेत. पहिले उदाहरण पानशेत धरणफुटीचे. कुठेतरी वाचल्याचे आठवतेय कि व्यक्तीचे केवळ वय बघून बढती देण्याचा प्रकार याच्या मुळाशी होता असे म्हणतात. त्यामुळे तेंव्हाच्या ज्युनियर इंजिनीअरनी सांगूनही तिकडे दुर्लक्ष करून तत्कालीन वरिष्ठांनी काही चुकीचे निर्णय घेतले व त्याचे परिणाम धरणफुटीत झाले, असा एक प्रवाद आहे. दुसरे उदाहरण अमेरिकेतले. पॅनअॅम आणि केएलएम यांच्यात १९७७ साली झालेली आजवरची सर्वात भयंकर विमान दुर्घटना. तिथे सुद्धा ज्युनियर पायलटला पुढील धोक्याची जाणीव झाली होती. पण तो काय म्हणतोय याकडे सिनियर पायलट महाशयांनी साफ दुर्लक्ष केले (ज्युनियरच तो. त्याचे काय ऐकायचे) आणि त्याची परिणीती एका भयंकर दुर्घटनेत झाली. अशी अजूनही कैक उदाहरणे असतील.

असो. यावरून आता मूळ मुद्द्याकडे. अशा बाबीत पतीची भूमिका महत्वाची असते. किंबहुना त्यांनी कणखर राहून कोण एकाची बाजू न घेता जे योय आहे ते योग्य व अयोग्य ते अयोग्य अशी भूमिका घेणे इथे महत्वाचे आहे. "थोडे दिवस थांब" म्हणजे एकप्रकारे वेळकाढूपणा आहे. किंवा पेशंस ठेव नंतर आपोआप सगळे सुरळीत होईल असा एक आशावाद पण त्यामागे असावा.

लग्न करताना स्वभाव महत्वाचे असतात. त्यातून एकत्र कुटुंबपद्धती म्हणजे तर दीर्घकाळ (किंबहुना आयुष्यभर) सुरु असलेला बिगबॉसचा खेळच असतो. स्वभाव जुळले, इझी गोइंग लोक असतील, समजूतदारपणा असेल, मी मोठा/मोठी वगैरे फालतुचे इगो नसतील तर ठीक. अन्यथा कोणीतरी वरचढ कोणाचीतरी घुसमट मग त्यातून होणाऱ्या आदळाआपटी हे सगळे ठरलेले.

अपर्णा रामतीर्थकर>>
ज्यांचे हात पोळले असतिल त्यांना अगदी अगदी वाटलं असेल हे ऐकुन..

टवणे सर , आणि mi_anu, अपर्णा रामतीर्थकर कोण आहेत ? कोण होत्या ? मला माहित नाहि पण जोक तर नक़्किच नसाव्या, मला उगिच वाटुन राहिल कि इथे सर्व माझि मज्या घेत आहेत (माझ्या नावाची, जे मी मायबोली हि genuine site आहे असे समजुन सुरुवातिपासुन ID साठि खरेच वापरले आहे), तर please लोकाना समजेल असे लिहा. उगीच हाताला काहिच लागत नाहि म्हणुन लोकान्चि नावे रिलेट करुन comments वाढवण्यात काय मजा आहे ....

"तुला काय हवंय यापेक्षा काय जास्त गरजेचे आहे याचा विचार कर व तसे स्वतःला बदल"
साधना..तुमच्या प्रतिसादातील वरिल वाक्य...खुपच सुंदर आहे.
अस्मिता...यांनांच नाही तर एकुणातच कोणालाही लागु होतेय.
पुर्ण प्रतिसाद हि उत्तम.

तुम्हाला हे जे वाटतं ते नवरा सोडून इतर कुणाला ( चांगल्या शब्दात) सांगून पाहिले का? करून पहा. काही वेळा मोकळेपणाने चांगल्या शब्दात सांगून टाकल्याने बरेच प्रश्न सुटतात. काही वेळा गोष्टी चालल्यात त्या तशाच चालू राहतात आणि जोवर कुणी दाखवून देत नाही तोवर त्यात बदल करायची गरज आहे हे लोकांना समजत नाही >>>>>>>> खुपच विचारशिल आहेत हि वाक्ये maitreyee ताई.

अपर्णा ताई, तुमची मजा घेणे/सामुदायिक बुलिइंग वगैरे उद्देश नव्हता.
अपर्णा रामतीर्थकर या व्यक्तीमत्वाची मजा घेतली जाते हे मात्र खरं आहे.अपर्णा असल्याने नामसाधर्म्य, प्रतिसादाचा सूर (खरं तर तो ईंग्लिश मध्ये असल्याने मी वाचलाच नव्हता.माझा रिस्पॉन्स आधीच्या रामतीर्थकर एल एल बी आणि तुम्ही जर्नालिझम डिग्री या एका फॅक्ट वर होता.) यामुळे रामतीर्थकर रिलेशन लावले गेले असावे. तुमच्या इंग्लिश कमेंट्स/आधीचे लिखाण मी अजून वाचलेले नाही आणि मायबोलीवर बुलिंग करण्याइतका मोठा ग्रुप बिप माझा नाही त्यामुळे तसे भासले असल्यास सॉरी.

अपर्णा रामतीर्थकर' यांची भाषणे युट्युब वर ऐकल्यास तुम्हाला त्यांची मजा इथे का घेतली जाते हे व्यवस्थित कळेल Happy

साधना यांची प्रतिक्रिया चांगली आहे पण पूर्ण प्रतिक्रियेत बाईनेच स्वतःला बदलायला हवं, जो नवरा काही सपोर्ट करत नाही, वेळकाढूपणा करतो त्याला बदलायसाठी काहीच उपाय दिसत नाहीत Sad

अनेक कुटुंबांमध्ये एखाद्या बाबीची निरपेक्षपणे योग्यायोग्यता न पाहता व्यक्तीसापेक्ष निर्णय घेतले जातात. त्यामुळे निर्णय/विचार काय आहे यापेक्षा तो कुणी मांडलाय (लहान कि थोर, स्त्री कि पुरुष, सासू कि सून, वडील कि मुलगा, सासरकडचे कि माहेरकडचे) यालाच जास्त महत्व असते. ते थोरले आहेत मग ते म्हणतात तेच बरोबर, तो अजून लहान आहे त्याचे काय ऐकायचे, बायकांना यातले काय कळते, ते सुनेच्या माहेरचे लोक त्यांच्या म्हणण्याला काय किंमत इत्यादी अशा प्रकारचा विचार करून ती व्यक्ती काय म्हणते याला मुळात महत्वच दिले जात नाही. भले ती अगदी योग्य बोलत असेल तरीही. अर्थातच हे निरोगी व्यवस्थेचे लक्षण नव्हे. यापद्धतीची कलंडलेली मानसिकता असेल तर त्याचे कधीकधी किती भयंकर परिणाम होऊ शकतात याबाबत एक दोन प्रसिद्ध अशी उदाहरणे (कौटुंबिक नव्हे) आठवत आहेत>>> +१११
सहमत. त्या विमान अपघाताच्या आधी ज्युनियर पायलटने संभाव्य धोका ओळखून सूचना दिली होती पण ती धुडकावून लावण्यात आली कारण तो ज्युनियर होता आणि मुख्य पायलट अतिशय अनुभवी, सिनियर, आणि केएलएम चा 'पोस्टर बॉय' होता. दुर्दैवाने ज्युनियर पायलट दबून राहिला आणि त्यानेही जोशाने आपले म्हणणे कसे बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे गप्प बसणेही तितकेच घातक ठरले जितके घातक त्याची पहिली सूचना दुर्लक्शित करणे ठरले Sad
आपल्याकडे ज्येष्ठ लोकांचे ऐकावे, त्यांना मान द्यावा असेच सगळ्यांच्या मनावर बिंबवले असते त्यामुळे ही chain सहजासहजी मोडणे तितके सोपे नाही हे ही खरेच.

इथे प्रॉब्लेम लिहिणारे फेक असू शकतात याची खूप मोठी शक्यता आहे, हे माहीत असूनही मी खूप वेळा सल्ले देते करण 1 टक्का शक्यता प्रॉब्लेम खरा असायची सुद्धा असते, 99 खोट्या लोकांमुळे एक खरा का खोटा ठरवा?. >> +१००

तेच तेच विषय येत असले तरी प्रतिसाद गरजेचे आहेत कारण त्या त्या व्यक्तिसाठी ती एक समस्या असते.
साधना - तुमच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत नसले तरी अशी कळकळ आपुलकी दाखवता हे योग्यच आहे. घरात कुठे आधार सापडत नाही तेव्हा असा "व्हर्च्युअल" आधार उपयोगी होतो.

>>> पूर्ण प्रतिक्रियेत बाईनेच स्वतःला बदलायला हवं, जो नवरा काही सपोर्ट करत नाही, वेळकाढूपणा करतो त्याला बदलायसाठी काहीच उपाय दिसत नाहीत Sad
कारण दुसर्‍या कोणाला 'बदलणं' हे जवळपास अशक्य आणि अनावश्यक लोढणं आहे. आपण आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवायला शिकणं हाच उपाय असतो. तो त्यातून काही शिकला तर उत्तमच. त्याला 'मला तुझा सपोर्ट इतका आणि असा मिळाला तर आवडेल' हे सांगणं निराळं (आणि ते करावंच), आणि त्यावर विसंबून राहणं निराळं.

Saglyanche pratisad vachun jara confidence alyasarkha vatatoy.
Tumachya manat khup kahi hot te kunala tari sangital, tyachya khandyavar dok thevun mansokt radalat ani mg tyachyakadun tu asa kar me sangate/sangato na sagal kahi thik hoil.. Asa dhir milato.. Tasach exactly feel hotay mala hyakshani..
Me mazya navryala sagal sangate manatal, radate suddha tyanchyasamor. Pn tyachi awastha arjuna sarkhi zaliy. Jyanchyashi ladhayach te apalech ahet...
Pn me tumache salle tyachyashi discuss kele, tyalahi vatatay ki, ekatra rahun ekmekanchi uni duni kadhnyapeksha vegal rahun hum sath sath hai asa mhanlel kadhihi changal. Mala suddha he patatay.
Ata tari. Hope for the best.
Khup khup dhanyawad..

अस्मिता, तुमचे समस्या वाचून वाईट वाटले आणि चीडही आली.
स्वाती आंबोळे आणि मैत्रेयी यांनी दिलेला सल्ला आवडला. साधनाने खूप कळकळीने सल्ला दिला आहे मात्र लग्नाच्या नात्यात मूल हे त्याचे एक्स्टेंशन झाले. मूल क्रेंद्र नाही होऊ शकत, तसे होणे योग्यही नाही. तुम्हाला कसलीच किंमत न देणार्‍या लोकांसोबत दिवसभर घरी रहाणे आणि जोडीला आर्थिक दृष्ट्याही दुसर्‍यावर अवलंबून हे तुमच्या परीस्थितीत योग्य नाही. त्यामुळे मुलाला पाळणाघरात ठेवावे लागले तरी नोकरीसाठी आणि तुमचा स्किलसेट उंचावण्यासाठी प्रयत्न करत रहाणेच योग्य राहील.
घरातील माणसे जर का सुनेच्या वडीलांचे दुबळे आरोग्य ही बाब इमोशनल ब्लॅकमेल साठी वापरत असतील तर तो निव्वळ क्रूरपणा आहे. या क्रूर वर्तनाची जाणीव नवर्‍याला ठाम शब्दात करुन द्यावी. फक्त सांगितलेले काम निमुटपणे करायचे , मत व्यक्त करायचे नाही, विरोध तर अजिबात करायचा नाही ही अशी वर्तनाची अपेक्षा, जोडीला इमोशनल ब्लॅकमेलिंग हे सगळे आपल्या पत्नीबाबत घडत आहे , पुढे याचा अयोग्य परीणाम आपल्या मुलावर तसेच नवरा-बायकोच्या नात्यावर होणार आहे याची जाणीव नवर्‍याला नसेल तर ती करुन द्या. सध्या तुमचे मूल लहान आहे. जसे ते मोठे होईल तसे तुमचे घरातील कमकुवत स्थान बघता त्याला वाढवतानाचे असंख्य निर्णय घेणे हे देखील तुमच्यासाठी आव्हानचे होईल. घरातील इतर सदस्य तुम्हाला आदराने वागवत नसतील तर उद्या मूल देखील त्यांचेच अनुकरण करण्याची शक्यता आहेच. मूल तणाव ग्रस्त वातावरणात तुमच्या सोबत दिवसभर रहाण्यापेक्षा ते काही काळ पाळणाघरात असलेले चांगले.
घरात तुमच्या नवर्‍याचे स्थान काय आहे? त्याच्या मताला किती किंमत आहे? भावनिक कारणांसाठी नवरा वेगळा राहू इच्छित नसला तरी पत्नीची मानसिक कोंडी होत आहे हे कबूल करुन ती कमी होईल यासाठी प्रयत्न करणे एवढे तरी त्याने करायलाच हवे , 'थोडे दिवस थांब' हे पोकळ वाक्य! पॅसिव राहून तो तुमच्या मानसिक कोंडीला अप्रत्यक्षपणे मदतच करतोय या गोष्टीची नवर्‍याला जाणीव करुन द्या. 'एकत्र कुटुंबात राहून संसार करायचा तर त्यातही आपले तिघांचे नाते घट्ट करायला जे काही उपाय करायचे ते आपण दोघे मिळून ठरवणार आहोत, तू पॅसिव रहाणार असशील तर मग लग्न करुन, एकत्र राहूनही आपण दोघे एकेकटे. अशा प्रकारचे लग्न तुला आवडणार आहे का? हे आपल्या बाळासाठी तरी योग्य आहे का 'असे विचारून नवर्‍याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करुन द्या.
तुम्हाला शुभेच्छा!

>> katra rahun ekmekanchi uni duni kadhnyapeksha vegal rahun hum sath sath hai asa mhanlel kadhihi changal

अगदी सहमत. वेगळे राहिले म्हणजे मतभेद आले एकोपा संपला असे मुळीच नाही. एकत्र राहण्यासाठी सुद्धा एक ठराविक अंतर आणि स्पेस आवश्यक आहे. मी एक घर असे पाहिले आहे कि तिथे फक्त दिवाणखाना कॉमन आहे. बाकी प्रत्येक जोडीचे आपले असे वेगळे किचन आणि बेडरूम आहे. प्रत्येकाचे आपापले संसार सुरळीतपणे सुरु आहेत. एकमेकाच्या पायात पायात येत नाहीत. अर्थात अगदी असे सर्वाना शक्य होणार नाही. पण मतितार्थ असा कि वेगवेगळे राहिल्याने उलटपक्षी दुरावा कमी होतो.

मी सल्ला देणार नाहीये पण एक गोष्ट लिहिणार आहे Happy

एका बाईचे तिच्या जावेशी पटत नसे. बाई खूप शांत स्वभावाची व जाऊ आक्रमक होती. तिच्या आक्रस्ताळ्या स्वभावाचा, सतत घालून पाडून बोलण्याचा या बाईला फारच मनस्ताप होत असे. पण जावेशी भांडणे तिला स्वभावानुसार होत नव्हते. एकदा तिने आपल्या गुरूंना हे सर्व सांगितले. गुरूंनी अर्थातच तिला दुर्लक्ष करायला सांगितले. पण बाई काही ऐकेना- तिचे म्हणणे की जाऊ मला इतका मनस्ताप देते. मलाही तिला मानसिक त्रास द्यावासा वाटतो.
पुष्कळ समजावूनही बाई काही ऐकेना, तेव्हा गुरू शेवटी म्हणाले- ' ती तुला वाईटसाईट बोलते. त्याने तुझी मनःशांती ढळते. त्यात तिला आसुरी आनंद मिळतो. तो आनंद तिला मिळू न देणे इतकेच तू करायचे. बस्स... प्रश्न मिटला.'

सुपर मॉम या गोष्टीसाठी टाळ्या. आमच्या घरातल्या एका सिनीयर सिटीझन साठी आम्ही हेच करतो. बाकी जास्त लिहीत नाही, लिहावेसे वाटते. पण खूप मनस्ताप सहन केल्याने दुनियामें कितना गम है, मेरा गम कितना कम है असे वाटुन आम्ही शांत असतो.

साधना,स्वाती२ ,उत्तम प्रतिसाद! >>> + १११११
मी तर इथे काही लिहीणार नव्हते, पण अस्मिता यांचा एक प्रतिसाद वाचून राहवले नाही

माफ करा, तुमच्या सासरचे लोक तर चुकीचेच वाटताहेत पण मला तुमच्या नवर्याचाच खूप राग येतोय (खरेतर त्यांची बाजू माहित नसताना हे चुकीचे आहे, तरीही), म्हणजे तुमच्या वडिलांच्या नाजूक प्रकृती वरून तुम्हाला असे वेठीस धरणे चुकीचेच आहे अन तेही त्यांच्या पाया पडायला लागणे इथवर. काहीही असो, तुम्ही कदाचित त्यावेळी असालही चुकीच्या, पण तरीही ते तर समंजस अन मोठे आहेत ना, मग त्यांनी असे वागणे योग्य आहे का. मला वाटते किमान तेव्हा तरी तुमच्या नवऱ्याने तुमची बाजू घ्यायला हवी होती, म्हणजे तुमच्या सासुसासर्यांना जाणविले असते की तुम्ही एकट्या नाही आहात, अन कदाचित तुमचा त्रासही बर्यापैकी कमी झाला असता. शेवटी संसार दोघांचा असतो, अन तो सुखाचा करायचा असेल तर तडजोडीला पर्याय नाही, पण ती तडजोडही प्रेमाने केलेली असावी, एकमेकांसाठीची असावी, जबरदस्तीची किंवा लाचारीची नसावी

पण जे झाले त्यावर आता विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुमच्या आवडीच्या गोष्टींत मन गुंतवा, इथे बऱ्याच जणांनी खूप चांगले सल्ले दिलेत, त्यावर विचार करून जे तुम्हाला योग्य वाटतात तसे करा.

<<< तुमच्या नवर्याचाच खूप राग येतोय >>>
चला, कुणाला तरी पटले मी काय म्हणत होतो ते.

<<< खूप मनस्ताप सहन केल्याने दुनियामें कितना गम है, मेरा गम कितना कम है असे वाटुन आम्ही शांत असतो. >>>
याच्यावरून माझ्या पहिल्या बॉसची आठवण झाली. ऑफिसमध्ये खूप पॉलिटिक्स होते आणि जाम चिडचिड व्हायची, तेव्हा तो एकदा मला म्हणाला होता: When someone screws you, just smile. At least, the other person won't get satisfaction of screwing you.
नंतर डोळे मिचकावत म्हणाला: But then don't smile so much that the other person will think that you are actually enjoying it.
हा सल्ला मला आयुष्यात खूप उपयोगी पडला आहे. Happy

वरील काही प्रतिसाद वाचून दोन मुद्दे-

पहिला मुद्द्दा -

मूल दोघांचे असते. आईनेच त्याचा विचार करत तडजोड करावी हे आपण कश्याला एका स्त्रीवर लादतो?

परवाच पुन्हा एकदा आमीर खान आणि मनिषा कोईरालाचा "अकेले हम अकेले तुम" पाहिला. मनिषा कोईराला बिनधास्त सोडून जाते आपल्या मुलाला, आपली करीअर घडवायला. आणि आमीरखानचे वागणे पाहता ती तिच्या जागी योग्यच असते. तो तिला मुलाचा वास्ता देत रोखायचा प्रयत्न करतो. पुढे जाऊन त्यालाच त्याची चूक कळते.

अर्थात तिथले मूल मोठे होते. पण हल्ली लहान मुलांनाही पाळणाघर असतेच. घरीच कोणी सांभाळणारे असेल वा मदतीला बाई ठेवणे शक्य असेल तर उत्तमच.
ऑफिसमधील बायका सहा महिन्यात जॉईन होताना पाहिल्या आहेत.
उलट मी त्यांच्याकडून ऐकले आहे की एकदा मूलाला समजायला लागले की मग त्याला तोडणे आणखी अवघड होते. त्यापेक्षा सहा आठ महिन्यातच त्याची दुसरी सोय लावून कामावर रुजू होणे योग्य. नाहीतर मग सांभाळा एकापाठोपाठ दुसरे मूल आणि गेली करीअरची चारपाच वर्षे..

दुसरा मुद्दा -

आणखी एक मुद्दा वर काही प्रतिसादात पाहिलाय,
समोरचा त्रास देत असेल तर त्याला इग्नोर करा किंवा स्माईल देऊन पुढे जा, थोडक्यात त्याला त्रास देण्यातून मिळणारा आनंद मिळू देऊ नका...
हे असे सोशलसाईटवर वगैरे सोपे आहे. मी देखील हे बरेचदा करतो.
पण प्रत्यक्ष आयुष्यात ती त्रास देणारी व्यक्ती आपल्याच घरातील, जवळची वा ऑफिसमधीलच असेल जिच्याशी आपला दिवसभरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क येत राहतो, तसेच ती वारंवार आपल्याला दिसत राहते, तर हे असे आपल्याला काहीच फरक न पडल्यासारखे दाखवणे कितपत सोपे आहे? मला तरी खूप कठीण वाटते..
किंबहुना हे स्वभावानुसार सहज जमले पाहिजे. नाहीतर सतत मनाला बजावत बसला की अरे याला तर इग्नोर करायचे आहे, मग तर मानसिक स्वास्थ विसराच.
मायबोलीच्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या आयडीला आपण इग्नोर करतोय हे त्यालाच दहा वेळा बोलून दाखवायचे.. हे आणि कसले इग्नोर करणे. याचा अर्थ तुम्ही ते विचार सतत डोक्यात घोळवत आहातच. आणि मग हे तुमचे नाटक त्या समोरच्या त्रास देणारया व्यक्तीलाही समजतेच. ईथे तुमचा हेतू फसला..

बाकी सल्ला उत्तम आहे. पण आपल्या स्वभावाला झेपत नसेल तर आपल्या स्वभावानुसारच रिएक्ट होणे उत्तम. जमले तर बेस्टच !

एखाद्या आयडीला आपण इग्नोर करतोय हे त्यालाच दहा वेळा बोलून दाखवायचे.. हे आणि कसले इग्नोर करणे. याचा अर्थ तुम्ही ते विचार सतत डोक्यात घोळवत आहातच. आणि मग हे तुमचे नाटक त्या समोरच्या त्रास देणारया व्यक्तीलाही समजतेच. ईथे तुमचा हेतू फसला..

बाकी सल्ला उत्तम आहे. पण आपल्या स्वभावाला झेपत नसेल तर आपल्या स्वभावानुसारच रिएक्ट होणे उत्तम. जमले तर बेस्टच ! >>>> +१११११

एखाद्याला ईग्नोर करणे म्हणजे त्याला पूर्णतः दुर्लक्षित करणे, त्या व्यक्तीला सारखे जाऊन सांगणे कि बाबा तू काहीही कर आता मला फरक पडत नाही म्हणजे ईग्नोर करणे नव्हे. पण असे ईग्नोर करणे प्रत्येकालाच जमत नाही रादर ते खूप कठीण आणि क्लेशदायक असते. एकवेळ सोशल साईटवर किंवा मित्र मैत्रिणी, अगदीच वेळ आली तर ऑफिसमध्ये करू शकतो असे पण घरी किंवा जिथे आपण मनाने गुंतलोय त्या व्यक्तिंना दुर्लक्षित करायचे म्हणजे एक प्रकारचे अग्निदिव्य असते , अन आपण ते तोवर करत नाही जोवर सहन होत असते . ते तेव्हाच होते जेव्हा आपल्या त्रासाचा घुसमटीचा कडेलोट होतो, आपल्या सगळ्या अपेक्षा सगळे आशा संपतात अन आपल्या लेखी खऱ्या अर्थाने त्याचे किंवा तिचे अस्तित्व संपते. इथेतरी ह्या अन ह्यांच्या सासूबाई दोघी घरी म्हणजे दुर्लक्ष करायचे म्हटले तरी किती करणार, नवर्यानेच दोघींची बाजू समजून घेऊन काहीतरी सुवर्णमध्य काढणे गरजेचे वाटते

सगळ्यांनी विचारपूर्वक, सुज्ञपणे वागले तर जगात काहीच प्रश्न उरणार नाही. पण तसे न होता प्रत्येकजण आपली बाजूच बरोबर असे धरून वागतो. अस्मिताच्या केसमध्ये सासू, नणंद, सासरा, नवरा या सगळ्यांनीच स्वतःचे वागणे बदलायला हवेय. पण ते लोक आपल्याला सल्ला विचारायला आले नाहीयेत, आपण त्यांना काही सांगूच शकत नाही तर आपण त्यांना कसे बदलणार? त्यांनी अमुक्तमुक करायला हवे असे अस्मिताला सांगून काय उपयोग? ते तिला खिजगणतीतही धरत नाहीत. अशा वेळी जी व्यक्ती सल्ला विचारायला आली तिलाच तिचे वागणे बदलायचा सल्ला दिला जाणार.

वर काहींना वाटतेय की आजही स्त्रीलाच सांभाळून घे म्हणून सल्ले दिले जाताहेत, त्याचे कारण स्त्री विचारायला आलीय. या जागी अस्मिताचा नवरा आला असता तर त्याला कुणीही आई पूजनीय आहे त्यामुळे तू सध्या बायकोला थांब म्हणून सांग व आईकडे लक्ष दे म्हटले नसते. सध्याच्या परिस्थितीत थोडे लांब राहा हेच म्हटले असते.

अस्मिताच्या नवऱ्याने तोच निर्णय घेतलाय असे तिच्या पोस्टवरून वाटतेय. त्यांना निर्णयाची अंमलबजावणी फारशी कटुता न येता करता यावी, सुरवातीला थोडी कटुता आली तरी तिकडे दुर्लक्ष करून निर्णय अंमलात आणावा व दीर्घकालीन शांतता मिळवावी यासाठी मनापासून शुभेच्छा!!!

Pages