सून म्हणजे रोबोट असते अस का वाटत ह्याना?

Submitted by अस्मि_ता on 9 April, 2018 - 04:41

Maz lagna houn 2 varsha zali pan ajun mazya sasari mala kuthlyach nirnyat consider kel jat nahi. Kahich kimat nahi. Hya ulat kamachya babtit mhanaje sagalech gruhit dhartat. Gharat sagal mazya nanandechya mhananyanusar chalat. Maza kahich vichar kela jat nahi. Mazi khup ghusmat hote. Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. Pan jevha pasun lagna zalay tevhapasun maza sagala swatantrya hiravun ghetalay asa vatat. Tyatach maza job gela ani situation ajunach kathin zaliy. Maza confidence low zalay. Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. Me robot nahiy. Mala emotions ahet he hyana ka kalat nahi?
Maaybolikar apal manun salle detat mhanun ethe post karate.

Group content visibility: 
Use group defaults

च्रप्स हे म्हणजे एकाने गाय मारली तर आपण वासरू मारण्याजोगं झालं.
चेष्टेत पण असं लिहू नका, कारण लोक कोणत्या परिस्थितीत आपल्या पोस्ट वाचत असतात याची आपल्याला कल्पना नसते.

कल्पतरू - कोती मनोवृत्ती नाही पण सून आपली स्वप्नं घेऊन येते संसाराची, तिथे तिला थोडी फार किंमत मिळावी निर्णय स्वातंत्र्य मिळावं हे अपेक्षा रास्त आहे, अर्थात हे सर्व त्यागण्याचीही एक वेळ असते पण तितकी प्रगल्भता यायला एका विशिष्ट वयाला पोहोचावे लागते, तोवर व्हायची ती भरड झालेली असते सुनेची. (दुर्दैवाने)

चांगल्या काळाची सुरुवात चांगली नोकरी लागण्यापासून लवकरच सुरु होईल. >> +१००००
एकत्र राहत असाल तर २ वर्षे हा पुष्कळ मोठा कालावधी आहे माणसांचे स्वभाव समजायला. भारतीय स्त्रीची आयुर्मर्यादा ६८ वर्ष सरासरी धरली तर २ वर्ष त्रास होणे म्हणजे आयुष्याचे ३% त्रासात गेले. २५ वय असताना २ वर्ष त्रासात म्हणजे १०% त्रासात. इथे एकूण सूर ३५% ला पासिंग देवू असा दिसतो (म्हणजे १०-१२ वर्षे राबलीस की चार लोक "सगळं कसं व्यवस्थित झालं, शाबास आहे तुझी" म्हणतील - हे आयुष्याचे पासिंग).

तुझे पासिंग ठरवायचा तुला हक्क आहे. आपल्या आयुष्याचे ध्येय काय ह्याचा शांतपणे विचार हवा. निव्वळ नोकरी-व्यवसाय असे नाही, त्यात इतरही गोष्टी आल्या- घरात शांतता, सामंजस्य, आपुलकी हवी असणे, समाजात आपला आदर असणे इ. हे ही आले. हे सगळं आत्ता हवे आहे हे सांगण्यात काही चूक नाही. "उर्वशी, उर्वशी, टेक इट इझी" अप्रोच बरोबरच आहे पण शांतता, सामंजस्य इ हा "बीस की उमर का है जो खेल साठ मे खेल के होगा क्या" हे भान असू दे.

तुम्ही पण तुमच्या भावाच्या घरात निर्णय घेत जा.>>> च्रप्स..+१..पण एक शंका....भाऊ नसेल तर? Wink
तुमचा जॉब जावून तुमचा कॉन्फिडन्स लो झाला...माझ्या मते, हे मूळ कारण आहे. लवकरात लवकर नोकरी शोधून आर्थिकद्रुष्टया स्वावलंबी व्हा. याने तुमचा लो झालेला आत्मविश्वास परत यायला मदत होईल. बाकी तुमचे इतर जे संसारातील प्रॉब्लेम्स(?) आहेत, त्यावर एकच लक्षात ठेवा...तुम्ही ९५% विवाहीत महिलांपैकी एक आहात. घरोघरी मातीच्या चुली आणि दुरुन डोंगर साजरे.

अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. गाडी कुठली घ्यावी, मोबाइलला कुठला घ्यावा इतपत ठीक आहे पण ह्या असल्या पर्सनल प्रॉब्लेमवर समाजाकडून कधीच सल्ले मागू नका. फुकटचे सल्ले देण्यात भारतीय जनता आघाडीवर आहे, पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला हातपाय कसे हलवायचे हे सांगायला १०० जण किनाऱ्यावर येतील, कोहली मैदानात उतरला कि कुठल्या बॉलवर कुठला शॉट मारायला पाहिजे होता हे सांगणारे लाखो टीव्हीसमोर बसलेले दिसतील. सध्या तुमची परिस्थिती तशीच आहे फक्त तुम्हालाच माहित आहे तिथे काय कंडिशन आहे त्यामुळे फ्रंट फुटवर खेळायचं की बॅकफूटवर ते तुम्हीच ठरवा आणि विजयश्री खेचून आणा

ह्या असल्या पर्सनल प्रॉब्लेमवर समाजाकडून कधीच सल्ले मागू नका>>
चांगला सल्ला! Wink

प्रॉब्लेमवर समाजाकडून कधीच सल्ले मागू नका. फुकटचे सल्ले देण्यात भारतीय जनता आघाडीवर आहे -
सगळ्यात आवड्ला हा सल्ला..
अगदि खर आहे

पहिल्या पानावरील प्रतिसाद वाचले आणि थक्क झालो. पुढच्या पानावर जाण्याचे साहस माझ्यात नाही.

१. इंग्रजी भाषेत लिहिलेला हा धागा व त्यातील मुद्दा अगदी जसाच्या तसा खरा आहे हे कशावरून हे कळले नाही.

२. जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने महिला मंडळ पदर खोचून मैदानात उतरलेले दिसते. पण धागाकर्तीलाच सबूरीचे सल्ले दिले जात आहेत. म्हणजे आजवर ज्या महिला इथे प्रखर स्त्रीवादी, सूनवादी वगैरे प्रतिसाद द्यायच्या त्या अचानक इथे सुनेला संयम ठेवायला सांगत आहेत.

३. इथे मिळालेले सल्ले वाचून धागाकर्तीचा प्रश्न सुटेल किंवा थोडाफार रिलिफ मिळेल हे तरी खरे कसे म्हणावे?

म्हणजे आजवर ज्या महिला इथे प्रखर स्त्रीवादी, सूनवादी वगैरे प्रतिसाद द्यायच्या त्या अचानक इथे सुनेला संयम ठेवायला सांगत आहेत. >> पथेटिक आहे हे सगळं!

पूर्वी खरंच स्त्रीवादी, सूनवादी प्रतिसाद यायचे का इथे? मी गेलं एकाध वर्षच माबो नियमित वाचत आहे म्हणून विचारतेय.

त्या आधीचा इतर मराठी साईटचा अनुभव आहे. स्त्रीवादी, पुरोगामी, विचारवंत वगैरे ढोल बडवत फिरणारे लोक काय लायकीचे असतात तेदेखील अनुभवल आहे.

एकंदर सगळंच पथेटिक आणि नौशिएटिंग....

बेफिकीर, पण इतरही ( सूनवादी Happy ) प्रतिसाद आहेत की इथे .. माझा, दक्षिणाचा, अॅमीचा, सीमंतिनी आणि अजूनही आहेत .

इंग्रजी भाषेत लिहिलेला हा धागा व त्यातील मुद्दा अगदी जसाच्या तसा खरा आहे हे कशावरून हे कळले नाही.>>
ज्याअर्थी इतरांनाही असे किंवा यासारखे अनुभव आलेले आहेत किंवा येत आहेत त्याअर्थी थोडंफार तरी तथ्य असायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीला दुसरी, तिसरी बाजू असते हे खरं आहे. पण ' सून' म्हणताच जे एक दुय्यम नागरिकत्व गृहीत धरलं जातं ते विशेषतः आमच्या पिढीतल्या सुनांना अपमानास्पद वाटतं हे खरं आहे.

माझा प्रतिसाद "सूनवादी" नसून २ वर्षे म्हणजे "टू सून" विरोधी आहे. बाकी "माणसे तोडणे सोपे असते" म्हणणे सोपे आहे. लोचट लोक सोडत नाहीत. "बस्स झालं" हे वाक्य तोंडातून आल्यावरही ५-५० वर्षे पीडणारे पिडणार. तेव्हा हा सगळा कालावधी आपल्या आयुष्यातून त्रासात जाणार आहे हे गृहित धरून काय ते वागावे लागते.

न बोलून शहाणे होता येतय का ते बघा. आपण बर की आपलं काम बरं! कोणाशी काही बोलायचे नाही. काही सांगायचं / विचारायचे नाही. आपलं काहीही अडायला नको. सांगकामा कस काम करेल! आपलं मत विचारले जात नाही तर आपणही प्रतेक गोष्ट विचारायचे- भाजी कशी चिरु? तेल किती घालू पासून सुरू. काम झाली की नोकरी शोधायला/ मजा करायला बाहेर पडायचे. नवरा यायचा वेळेस घरी. माहेर गावात असेल तर कुठे जाणार परशन नाही.

They can see you are hurting because of their behavior so they are having time of their life. Don't show them how much their disregard for you is troubling. Let them see you happy and busy. Unless you stop caring about them,they would not care for you. Public library, temples etc are the places where you can go out to. If money is not a constraint then coffee shops. One cup coffee would buy you lot of hours and place to sit. Till you get a job maybe find a place where you can keep yourself busy like helping in Montessori, start your own coaching/ activity class at home for little kids etc

<< पण धागाकर्तीलाच सबूरीचे सल्ले दिले जात आहेत. म्हणजे आजवर ज्या महिला इथे प्रखर स्त्रीवादी, सूनवादी वगैरे प्रतिसाद द्यायच्या त्या अचानक इथे सुनेला संयम ठेवायला सांगत आहेत. >>
------ सुनेला संयम ठेवायला सांगणे यात गैर काय आहे? त्या किती समतोल विचार करतात याचे तर कौतुकच व्हायला हवे. त्यान्चा सोशिकपणा, समन्जसपणा, अनेक कारणामुळे (किव्वा इतर पर्याय अधिक धोकादायक असल्यामुळे) तडजोड करण्याच्या गुणान्मुळेच ९५+ % सन्सार एकत्र आहेत, चालत आहेत, यशस्वी होत आहेत. याला अपवाद असतीलही... पण ते केवळ अपवाद आहेत.

साधना आणि देवकी यांनी दिलेले प्रतिसाद, असा प्रश्न घेऊन कोणी नवविवाहिता आली, तर एखादी पोक्त महिला जो सल्ला देईल तोच आहे.
थिऑरिटिकली (प्रचलित शब्द वापरायचा तर तत्त्वत:) स्त्रीपुरुष समानता, हक्क, व्यक्तिअस्वातंत्र्य इत्यादीवर चर्चा छान वाटतात.
पण प्रश्न 'थेयरी तर पाठ केली, प्रॅक्टिकल देऊ कशी?" हा आहे.
तिथे असलेल्या अ ने क कन्स्ट्रेंट्समुळे तडजोडी करण्यावाचून पर्याय नसतो. स्वानुभवाचे बोल लिहिणार्‍या अनेकींनीही तसंच काही सुचवलेलं आहे.

मीही या धाग्यावर उद्वेग व्यक्त केलाय. दीड-दोन पिढ्या बदलल्या, तरी प्रश्न तेच आहेत, याबद्दलचा तो उद्वेग आहे.

काय करणार आहात ? घुसमट होते आहे तर ठोस उपाय शोधायला हवेत.
- सर्वप्रथम नोकरी/ काम शोधा आणि स्वतःची स्वावलंबी बाजू बळकट करा. कुठल्याही परिस्थितीत शक्यतोवर नोकरी मात्र सोडू नका.
- समजून वगैरे घेणारे सासरचे लोकं कमी पाहिलेत. त्यामुळे ती अपेक्षा कमीच ठेवाल तर तुम्हालाच मानसिक त्रास कमी होईल.
- नवरा बरा आहे का? त्याच्यापासून कोणतेही सुख अथवा आनंद तुम्हाला मिळतो का ? ते आधी स्वतःला विचारुन पहा. नवर्याची आणि तुमची स्वप्ने काय आहेत त्याचा विचार करुन पहा.
- तडजोडी शिवाय संसार होत नाहीत , हे खरे असले तरी किती आणि कुठल्या बाबतीत तडजोड करावी हे तुमचे तुम्हाला ठरवावे लागेल.
- माहेरचेही सोयिस्कररित्या सपोर्ट करतात फक्त. किती सक्रीय मदत करणार आहेत खरंच ते पडताळून पहावे लागेल.
- थोडक्यात कोणीही 'येऊन' हा प्रश्न सोडवणार नाही. तो तुम्हालाच सोडवावा लागेल. आणि कुठलाही निर्णय घेतला तरी मानसिक त्रास अटळ आहे.

म्हणजे आजवर ज्या महिला इथे प्रखर स्त्रीवादी, सूनवादी वगैरे प्रतिसाद द्यायच्या त्या अचानक इथे सुनेला संयम ठेवायला सांगत आहेत. >>> हे फार फनी आहे. जजमेन्टल होण्याची घाई.
सिरियसली? हाणा मारा घटस्फोट घ्या , पोलिसात जा असे सल्ले आले असते तर इथल्या स्त्रिया स्त्रीवादी असल्याची खात्री पटली असती का ? उलट ते सल्ले देणे तर सोप्पं आहे की. हे म्हणजे दुखवटा बाफावर लिहिले नाही म्हणजे दु:ख झाले नाही म्हणण्याचे लॉजिक झाले जे इथे बरेच वेळा दिसते . तेच कारण, जज करण्याची घाई , आपलेच (फक्त) पुढारलेले विचार आणि इतरांचे मागास हे दाखवण्याची एक विचित्र गरज Happy
असो, सौम्य / संयमाचे सल्ले आले त्याचे कारण हे असावे की त्या अस्मिताने डीटेल मधे काही लिहिलेले नाहीये. जे लिहिले त्यावरून सासरी छळ असे वगैरे चित्र समहाऊ येत नाही आहे समोर, संवादाची कमी असे मात्र वाटले. त्यामुळे बरेच आयडी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असावे असे मला बरेच प्रतिसाद वाचून वाटले.
अ‍ॅमी - काय आहे, इथे नव्याने आलेल्या स्त्री आयडी "तलवार निकालके" मोड मधे असतात बर्‍याच वेळा . त्यांना वाटते की बाबा इथे कुणी अन्यायाविरोधात प्रखर विचार का बरं मांडत नाहीत? अन आपणच काय ते स्त्रीवादी विचारांची क्रांतीची मशाल घेऊन इथे आलेल्या आहोत की काय. पण तसला गैरसमज नका करून घेऊ Happy तुम्ही स्त्रीवादी असलात तर कितीतरी हजाराव्या वगैरे असाल इथे. फक्त बरेचसे जुने आयडी जगातल्या सर्व सांसारीक, स्त्री पुरुष, देव, अंधश्रद्धा इ. विषयावर तलवार चालवून आपली मते मांडून मूव्ह ऑन झालेले आहेत. जुने बाफ सर्च करून पहा. हल्ली त्याच त्याच विषयावर तीच मते द्यायला लोक येत नाहीत इतकेच. कारण तेच तेच भांडण किती वेळा करणार किंवा समान मतांवर अ‍ॅग्री तरी कितीदा करणार !! Happy
(मनात -माबोचे वाढते वय हेही एक कारण असावे का : Wink Happy )

Saglyanche manapasun dhanyawad. Me khup emotional zale hote mhanun je manat ahe te patkan lihil. Ata jara savistar lihite.
Mazya sasubaincha swabhav khup vichitra ahe. Tya spasht bolat nahit tyanchya manat kay ahe te. Me mhanaje tyana telepathy expert vatate. Sagal tyanchya manatal samjun gheun karav. Ani nahi kel tar abola dhartat. Ani nusata abola nahi tar khunnas deun khau ki gilu asa baghtat. Mala khup bhiti vatate asha attitude chi. Ani rag pn yeto are thodi limit theva na samjavun sangnyacha prayatna kara na kadhi tari me karnar nahi asa kadhich mhanat nahi. Ulat kadhi kadhi Chhotya mulakade durlaksh karate pn maz kam adhi karate. Ekda khup asahya zal mhanun me ulat bolale tar hya ajun chidalya ani mazyashi asa bolayach nahi tuzya vadlanshi bolate thamb ase sanskar ahet ka vagaire bolalya. Maze baba heart che patient ahet he tyana mahitiy. Shevati me paya padale tyanchya tevha kuthe shant zalya. Pn ajunahi badalalya nahit.
Nanand ugach agit tel otayach kam karate. maz 1 varshach pillu asalyamule mala tyachyakadehi laksha dyav lagat tar hi aai la sangate tuzi kambar dukhel tyachya mage jast palu nako, tyala uchalu nako. Sagal kam tu karu nako ti ahe na tila sang.. Me balach karun kam hoil tevadh kam karate. Tari me kahich kam karat nahi sagal kam aaich karate asa bolate.
Maze sasare tar MNC madhe mothya post var ahet mala te jara sensible ahet asa vatayach pn tyanche vichar tar eka ashikshit mansala pn lajavtil ase ahet. Parwach me shantpane mala kahi vicharat nahi mhanun bolat hote tar mazyavarach ulatale. Hyana kahi mahit nasalyasarkh karat tu kuthe asates mg sagale discuss karat asatat tevha asa malach vicharal. Ek tar me kitchen madhe asate nahitr balachya mage asate tevha he lok discuss kartat. Me kahi bolatala gele tar he asa bolayach nahi, me eke thikani mala chalnar nahi asa shabd vaparala tar mhane tula bolayala shikval nahi ka? Tula chalnar nahi mhanje kay? Chalvun ghyaylach pahije. Gharat lahananchi jababdari asate mothyanchya manapramane vagayachi. Tu swatala adjust kar amhi adjust nahi karu shakat. Me mhanale me 9 paval pudhe ale tar tumhi ekhad paul pudhe takayla hav tar mhantat tulach karav lagnar sagal amhi pudhe yenar nahi. Pratyek veli boltana maze sanskar pudhe karat malach tu kiti chukich vagtey te sangnyacha prayatna kela. Me speechless zaley. Navra mhanato ase bhandun baher padayach nahi. Me kashi sahan karatey maz mala mahit. Evadh sagal bolunahi me shant ahe hyacha malach ashcharya vatatay.
Lagna zal mhanaje mala kahich self respect nahi ka, me mazya marjine kahich karu shakat nahi ka, mazya ichha akanksha kahich nahit ka?

घरोघरी (more or less similar) मातीच्याच चुली >> Mumbai sarkhya shahrat rahnari ani swatala sushikshit samjnari lok asa vagu shaktat ka? Mala vatal navhat

Sagal tyanchya manatal samjun gheun karav. Ani nahi kel tar abola dhartat. Ani nusata abola nahi tar khunnas deun khau ki gilu asa baghtat.
>> अरे चांगलं आहे ना... जाच न करणारी, घालून पडून न बोलणारी सासू.. रुसून बसते तर बसू दे..

खरा सल्ला देऊ - तुम्ही बाळाबरोबरचा टाईम एन्जॉय करा हो.. रिलॅक्स राहा..हा टाईम गोल्डन टाईम आहे.. फालतू स्ट्रेस घेताय.
जो सासरा mnc मध्ये मोठ्या पोस्ट ला आहे त्याच्या दृष्टीने तुम्ही फ्रेशर, तुम्हाला म्हणून कन्सिडर करत नाही.
आणि असे मागून मिळत नसते हो.. आणि भांडून तर बिलकुल नाही.. चांगले inputs द्या चर्चे मध्ये, आपोआप पुढच्या वेळेस तुम्हाला इम्पोर्तन्स मिळेल.

Talking about these from your comments :
Parwach me shantpane mala kahi vicharat nahi mhanun bolat hote tar mazyavarach ulatale. Hyana kahi mahit nasalyasarkh karat tu kuthe asates mg sagale discuss karat asatat tevha asa malach vicharal. Ek tar me kitchen madhe asate nahitr balachya mage asate tevha he lok discuss kartat. Me kahi bolatala gele tar he asa bolayach nahi, me eke thikani mala chalnar nahi asa shabd vaparala tar mhane tula bolayala shikval nahi ka?

Pratyek veli sanskarachya navakhali je manat ahe te dekhil bolayach nahi ka? Mulagi hyana kiti vela ghalun padun bolate tevha aikun ghetat ki. Tevha kuthe jatat sanskar.

अस्मिता बिग हग.

रावी तसंच ह्या प्रकारचा त्रास भोगणा-या, भोगलेल्या सर्वांनाच बिग हग.

सल्ले वगैरे मी देऊ शकत नाही पण चांगला मार्ग निघून शांततेने आयुष्य जगायची संधी सर्वांनाच मिळूदे यासाठी शुभेच्छा देऊ शकते, प्रार्थना करु शकते.

मला राजसीचा सल्ला बरोबर वाटतोय. ( न बोलून शहाणं होण्याचा) . अर्थात मला वाटून उपयोग नाही, तुम्हाला बरोबर वाटला पाहिजे Happy
पण खरंच, डोक्याला ताप करून घेऊ नका. ्

अस्मिता, बिग हग.
जनरली बाळ्/मॅटर्निटी लीव्ह्/अचानक फुल नोकरी रुटिन सोडून घरात अश्या संकुचित पॉलिटिक्स मध्ये डोकं घालावं लागणं इरिटेटिंग होतंच.
नोकरी+बाळ थोडं मोठं/बाळाला घेऊन बाहेर वेळ याने बराच फरक पडेल.तोवर हँग इन देअर.(आमची एक मैत्रिण आधी थोडी +नंतर ६ महिने मॅटर्निटी लीव्ह घेऊन या सर्व कारणांमुळे ४ महिने झाल्यावरच लवकर जॉइन झाली होती.)

तुमचं बाळ लहान आहे, त्याच्याकडे पहीलं लक्ष द्या. त्याची आबाळ होता कामा नये.

अरे चांगलं आहे ना... जाच न करणारी, घालून पडून न बोलणारी सासू.. रुसून बसते तर बसू दे..>> nahi ho. Nusati rusun basat asati ani rag gelyavr swatahun sangat asati tar thik ahe. Me kunitari shatru ahe khup motha apradh kelay asa dakhvtat. Me shabdat sangu shakat nahi ki me kay feel karate asha veli. Sarkha vichar karayacha ata kay zal asel baba chidayala, te environment ch evadh vegal asat ani he me sarkh anubhavate. Satat tanavakhali asate me.

अस्मि_ता,
आपल्या बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस.तू सर्वांना नाही बदलू शकत ना,मग त्यांच्याकडे (त्यांच्या बोलण्याकडे ) दुर्लक्ष कर.हे असं लिहायला सोपे आहे.पण यात तुझा तुलाच मार्ग काढला पाहिजे हे तर खरं आहे ना!
दुर्लक्ष कर, म्हणजे त्यांच्या खवचट बोलण्याला किंमत देऊ नकोस.तूच सर्व सहन केले पाहिजे असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही.सासरच्यांनी संस्कार वगैरे काढणे अजिबात चूक आहे.पण जमेची गोष्ट नवरा तुझी बाजू समजत आहे.एखादी छोटीमोठी नोकरी बघ.पैसे महत्वाचे नाहीत तर अशा वातावरणातून नोकरीच्या निमित्ताने काही काळ बाहेर रहा.
लवकरात लवकर तुमचे वेगळे घर होवो ही सदिच्छा!

<<<माबोचे वाढते वय हेही एक कारण असावे का :>>>
म्हणजे पूर्वी एकदा मराठी रंगभूमी वयात आली होती तसे काही झाले आहे का काय मायबोलीचे?

बाकी इंग्रजीमधून विचार मांडले म्हणजे ते खरेच असणार! इंग्रजीत लिहिले आहे!!
एक गोष्ट लक्षात येते - आमच्या वेळेपेक्षा, शिक्षणामुळे नि सामाजिक परिस्थिती बदलल्यामुळे (सुधारल्यामुळे म्हणावे की काय याची खात्री नाही), बायकांचा आत्मविश्वास भरपूर वाढला आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. दुर्दैवाने जुन्या खोंडांना ते अजून मानवत नाही. त्यामुळे असे संघर्ष होतच रहाणार.
ज्याप्रमाणे मुले मुली १७-१८ वर्षाच्या झाल्यावर त्यांच्या नि आईवडीलांच्या विचारात प्रचंड तफावत पडते. मग त्यातल्या त्यात जो जास्त ठाम राहील त्याची सरशी होते.
दुसरी गोष्ट - अश्या संघर्षांतून मार्ग कसा काढावा? कठीण. कारण जुनी खोंडे मुळी ऐकायलाच तयार नसतात - अगदी शिकलेली, पुरोगामी म्हणवणारी सुद्धा. नि सुनांनी तरी का पडते घ्यावे? त्या शिकलेल्या आहेत, कर्तबगारी सिद्ध करताहेत.

त्यामुळे सभ्य पणे चर्चा करून मार्ग निघणे कठीण. शिवाय प्रत्येक व्यक्तिची परिस्थिती, भावना वेगळ्या - उगाच सल्ले देऊन काय उपयोग??

बाकी मायबोलीवर या सगळ्या गोष्टींची चर्चा दोन तीनदा पूर्वीच होऊन गेल्यामुळे जुन्या मायबोलीकरांना आता लिहायचा कंटाळा येऊ लागला आहे हे स्पष्ट जाणवते.

इतके वर्षात मायबोली वाच्ल्यामुळे कधी कुठे काही बदल झाल्याचे ऐकीवात नाही - आता तरी कशाला होतील? म्हणूनच तेच तेच विषय सारखे समोर येतात.

maitreyee,

तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे समजलं नाही

नै म्हणजे मी असेनही
• "तलवार निकालके" मोड मधे बर्याच वेळा
• अन आपणच काय ते स्त्रीवादी विचारांची क्रांतीची मशाल घेऊन इथे आलेल्या आहोत अशा गैरसमजात
वगैरे

पण ते बेफ़ी तर जुनेच आहेत ना? त्यांनी अस का लिहिलंय "म्हणजे आजवर ज्या महिला इथे प्रखर स्त्रीवादी, सूनवादी वगैरे प्रतिसाद द्यायच्या त्या अचानक इथे सुनेला संयम ठेवायला सांगत आहेत."

ते म्हणतायत तसं पूर्वी स्त्रीवाद घालणारे आयडीच इथे सबुरीचा सल्ला देतायत?

कि तुम्ही म्हणताय "बरेचसे जुने आयडी जगातल्या सर्व सांसारीक, स्त्री पुरुष, देव, अंधश्रद्धा इ. विषयावर तलवार चालवून आपली मते मांडून मूव्ह ऑन झालेले आहेत. हल्ली त्याच त्याच विषयावर तीच मते द्यायला लोक येत नाहीत इतकेच. कारण तेच तेच भांडण किती वेळा करणार किंवा समान मतांवर अॅग्री तरी कितीदा करणार !!" तसं जुने तलवार चालवणारे आयडी इथे आलेच नाहीयत?

Pages