सून म्हणजे रोबोट असते अस का वाटत ह्याना?

Submitted by अस्मि_ता on 9 April, 2018 - 04:41

Maz lagna houn 2 varsha zali pan ajun mazya sasari mala kuthlyach nirnyat consider kel jat nahi. Kahich kimat nahi. Hya ulat kamachya babtit mhanaje sagalech gruhit dhartat. Gharat sagal mazya nanandechya mhananyanusar chalat. Maza kahich vichar kela jat nahi. Mazi khup ghusmat hote. Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. Pan jevha pasun lagna zalay tevhapasun maza sagala swatantrya hiravun ghetalay asa vatat. Tyatach maza job gela ani situation ajunach kathin zaliy. Maza confidence low zalay. Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. Me robot nahiy. Mala emotions ahet he hyana ka kalat nahi?
Maaybolikar apal manun salle detat mhanun ethe post karate.

Group content visibility: 
Use group defaults

ते' मुलगी झाली हो ' नाटक येऊन तीस वर्षं तरी झाली असतील. तरी ते अजूनही रेलेव्हंट असावं हे दुर्दैवी आहे.
अजूनही मुलीलाच," बाई, सांभाळून घे, पड खा ," असं सांगितलं जातंय.
तेव्हाच्या मुली आता आया आणि सासवा झाल्यावर सॉंस भी कभी बहु थी हे विसरल्यात का?

पण याची दुसरी बाजू ही आहे की चुलत भावाने आजवर एकट्याने कधीही काही केलेले नाही, त्याला तेवढा कॉन्फिडन्स नाहीय. कायम मोठ्या बहिणीच्या खांद्यावर भार टाकून चालला, त्याला प्रत्येक गोष्टीत बहिणीचीच आठवण येते. घरात जे काही बोलले जाते, ठरवले जाते त्या सगळ्याला वहिनी समोर असते. >> समोर असण आणी निर्णयात सामिल करुन घेण यात फरक आहे , " मला अस वाटत तुम्हाला काय वाटत?" तुझ काय मत आहे? हे विचारल्याने समोरच्या माणसाला आपलस करुन घेता येत ,महत्व देता येत... सन्सार बहिणिबरोबर करायचा नाहिये बायकोबरोबर करायचाय, एखाद्य ठिकाणि द्यावा लिड, समोरच्याची कुवतही कळते.
अस्मिता! तुमची अपेक्षा अगदी रास्त आहे आणि व्हायलाही तसच हव पण बहुतेकदा तस होत नाही आणखी एक सान्गु का ? नविन नविन सर्वच सुना आपण आहोत त्यापेक्षा वेगळ वागुन सुपरवुमन असल्यासारखा सगळ करायला जातात जे काहिकाळाने अवघड होवुन बसत तेव्हा "जेवढ झेपतय तेवढेच काम करा "

तेव्हाच्या मुली आता आया आणि सासवा झाल्यावर सॉंस भी कभी बहु थी हे विसरल्यात का?>>> याच्या उलटही अजून तेवढंच खरंय, क्योंकी बहू भी कभी सॉस होगी तो वैसेइच होगी ना Wink
बाकी, काळ हेच सगळ्यावरचं रामबाण औषध आहे.

धागा मालकिणीने दुखरी नस पकडली आहे तमाम भगिनी मंडळाची. Happy

@ अस्मि_ता आपली घुसमट योग्यच आहे. "Somebody to Nobody" असा तुमचा प्रवास गेल्या २ वर्षात घडला आहे. माझे वैयक्तिक मत आहे की सकारात्मक विचार सोडू नका. हातातला वेळ तुमच्या keyskills related activies updation मधे गुंतवा. जेणेकरून जगाबरोबर रहाल आणि मिळणार्या नवीन नोकरीला फायदा होईल.
बाहेर पडलात की तुमची किंमत ही वाढेल अन मन रमले की डोक्यातील नकारात्मक विचारही कमी होतील
पुढील प्रवासाला शुभेच्छा.

>>>>एक स्त्री म्हणून सासरच्यांशी जुळवून घेण्याची जी मानसिकता प्रत्येक स्त्रीच्या स्वभावात रुजली असते तिचा अभिमान बाळगून निर्णय घ्या.. शुभेच्छा Happy<<<<<<

रुजली वगैरे नसते, “रुजवली/बिंबवली” असते. वाक्य अगदी चतुर आहे. अगदी स्त्री देवी अस्स्ते टाईप मधल. Wink

——
बाकी , लिहते जराश्याने

दक्षिणा, अगदी बरोबर.
खरंतर कुणी कुणासाठी बदलायची गरज नसते. थोडे तुझे थोडे आमचे आणि एकमेकांच्या मतांचा आदर इतकेच असते>> पर्फेक्ट!
प्राजक्ता, समोर असण आणी निर्णयात सामिल करुन घेण यात फरक आहे , " मला अस वाटत तुम्हाला काय वाटत?" तुझ काय मत आहे? हे विचारल्याने समोरच्या माणसाला आपलस करुन घेता येत ,महत्व देता येत...>> अगदी!

२ वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला>>
हे वाक्य मलाही खटकलं. >> एक्झॅक्ट्ली.
मुळात तो प्रतिसाद संसाराची जबाबदारी फक्त आणि फक्त सुनेचीच आहे ह्या अँगलने लिहिल्यासारखा वाटला.
प्राजक्ता , वावे यांनी अचूक लिहिलेलं आहे

सगळ्या घरात जर तीचती बोंब होत असेल तर याच्यावर रूट कॉज शोधूनच उपाय काढायला हवा.

• स्त्री आर्थिक स्वतंत्र नसणे
• स्त्रीने 'दुसऱ्याच्या' घरी राहायला जाणे
हे दोन रूट कॉज आहेत. तेच बंद करा.

• प्रत्येक सज्ञान व्यक्ती आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असेल.
• लग्नानंतरही फ्लॅटमेटसारखा TTMM खर्च करून राहणार. घरकामदेखील शेअर करणार.
• कोणीही दुसऱ्याच्या कुटुंबात रहायला जाणार नाही.
• तुमच्या फ्लॅटमेंटच्या कुटुंबासोबत तुम्ही जितका काळ, जितकी अड्जस्टमेंट करता तेवढीच जोडीदारच्या कुटुंबियासोबत कराल.
• तुझ्या नातेवाईकांच्या खर्च, जबाबदारीबद्दल तू बघ माझ्या नातेवाईकांच मी बघते.
• मुलांचा खर्च, जबाबदारी शेअर करायची.

याशिवाय दुसरा काहीच उपाय मलातरी दिसत नाहीय. अशा अटी घालणारे आणि मान्य करणारे मुलगे, मुलगी कधी दिसणार Uhoh

२ वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला >> हायला, तिला संसार करायचाय का लाईफचा पाकिझा टाईप्स प्रोलॉग्न्ड ट्रॅजिक पण हिट्ट मेलोड्रामा बनवायचाय?

<< स्त्री आर्थिक स्वतंत्र नसणे >>
------- परिस्थिती कितीही चान्गली असली तरी आर्थिक स्वतन्त्र असणे खुप महत्वाचे आहे. "आमच्या कडे आर्थिक सुबत्ता आहे, त्यामुळे मुलीने नोकरी करण्याची अवशक्ताच नाही... होय घर सन्म्बाळणे, मुलान्कडे लक्ष देणे गरजेचे आहे. " असल्या विचारान्ना मागे सारायला हवे.

Sun mhnun aapan kiti sosl he jewha aapan sangto tewha nehami dusrya bajucha pan vichar karawa.
Nehami aapan barobar hi mansikata root cause aste problem che.
Aarthik swatanrya chya jorawar eka diwsat sasrche tumach sagal aiktil ashi apeksha chukichich aahe.
Tumhi kiti zijla tyanchyasathi he dekhil tapasa.
generally thoda vel dya donhi side julawun ghetil.
aapan lagnala wiwah "BANDHAN' mhnto so pahile ekda saptpadi cha home work hawa.Aaplya maheri jasa environment aahe tase exactly same kase asel sasri.
Aaapn Julwun ghenyacha kti try karta.Dusryanchya chuka dakhwne sope aste .Swathachya chuka disat nait generally .
Ekda tatastha rahun paristhiti bagha.
Sasune ,kiva maheri aaine adjustment karunch sansar kela asel.Mulat lagn kiva sadh roommate jari asla tari Adjustment karawi lagte.
aaplya maherchyancha jasticha hastkshep(warnwar phone,kiva chat) he dekhil aplya awastaw apekshansathi ek reason asu shakte
Note:Konalahi personally hurt karnyacha uddesh nahi.

<<< अरे उपाशी बोक्या, का रे घरे फोडतोयस? नवऱ्याला माहीत आहे सगळे, तो सबुरीचा सल्ला देतोय.. तोही काहीतरी विचार करूनच बोलतोय ना.. जरा थांबून त्याचेही ऐकूदे की.. एक घाव दोन तुकडे करण्याआधी दहा वेळा विचार केलेला बरा. >>>
मी हे मुद्दाम भांडण लावायला म्हणत नाहीये. मुळात बायको सासरी येते तेव्हा अगदीच परकी असते. सासरचे सगळेच वाईट असतील, असे मी म्हणत नाही. पण एक जरी नाठाळ व्यक्ती असली तरी त्याचा त्रास नवख्या मुलीस होऊ शकतो. ती बिचारी एकतर नवखी, नवीन घरात जुळवून घ्यायला बघणारी, त्यातून बर्याचदा सासूला वाटणार की हिच्यामुळे माझा मुलावरचा हक्क कमी झाला, मग कळत-नकळत टोमणे मारणे...अशी सुरुवात होते. अशा वेळी ती नवऱ्याकडेच आधारासाठी बघणार ना? उगीच माहेरी काळजी वाटायला नको, म्हणून त्यांना शक्यतो नाहीच सांगणार.

एक सत्य घटना सांगतो. माझ्या मित्राची आई अशीच कटकटी होती. (म्हणजे आहे अजून). माझ्या मित्राचे लग्न खूप लवकर झाले. बायको पण फॉरेन बँकेत नोकरीला होती. म्हणजे मित्राला ६,००० पगार होता तेव्हा तिला २५,००० महिना पगार होता. स्वभावाने पण गरीब, म्हणजे मी किती कमावते असा माज वगैरे काही नाही. तरीपण अपेक्षा अशी की रोज पोळी-भाजी, आमटी-भात सगळा स्वयंपाक करायचा. बाई ठेवा म्हटले, तर नको. का तर म्हणे गृहिणीच्या हातची चव नाही. एकदा मी असाच त्याच्या घरी गेलो होतो तर मला म्हणे, माझी सून टिकली लावत नाही. मी म्हणालो की फॉरेन बँकेत कुणी टिकली लावून जात नाही. आणि मंगल (मित्राची बहीण) कुठे टिकली लावते? मला वाटलं, विषय संपला. पुढच्या वेळी घरी गेलो होतो, तर म्हणे "कश्या ह्या आजकालच्या मुली? टिकली लावत नाहीत, पण आता कसं बोलणार? आमची मंगल पण लावत नाही ना". आता त्यांची सून टिकली लावते की नाही, हे मला (तिर्हाईताला) सांगायची गरज काय मुळात? पण अश्याने एक कल्पना येईल काय चालले आहे ते? मी खाजगीत मित्राच्या बायकोला सांगितले की घरातून निघताना टिकली लाव, ट्रेनमध्ये काढ आणि स्टेशनवर उतरलीस की घरी येताना टिकली लावून येत जा. आणि मित्राला सांगितले की स्वतःचा फ्लॅट घेऊन तिथे राहायला जा. सांगायचा मुद्दा इतकाच की छोट्या छोट्या गोष्टीतून पण त्रास होऊ शकतो.

<<< Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. >>>
हे वाचून तरी तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की परिस्थिती गंभीर असू शकते. अशा परिस्थितीत खरोखरच नवऱ्यानेच तिची साथ दिली पाहिजे आणि दोघांनी मिळून निर्णय घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे शिकवण अशी की "मुलीनेच नेहमी पडती बाजू घेऊन अ‍ॅडजस्ट केले पाहिजे". हे चुकीचे आहे. माझ्या धाकट्या मेव्हण्याचे लग्न झाले तेव्हा मीच पुढाकार घेऊन त्याला आणि त्याच्या बायकोला सांगितले की तुम्ही स्वतंत्र रहा. ते दोघेही त्याच सोसायटीत स्वतःची मालकीची जागा घेऊन राहातात. (घरात पाहिजे ती खरेदी करतात आणि कंटाळा आला तर बाहेर जेवायला जातात वगैरे). त्यामुळे नवरा-बायको पण खुष आहेत आणि सासू-सासरे पण.

अस्मि_ता,
तुम्ही लगेच स्वतंत्र बिर्हाड करा असे मी म्हटत नाहीये. गैरसमज नसावा. पण नवऱ्याशी नीटपणे संवाद साधा आणि त्याला तुमची बाजू पण कळू दे. पुढच्या नोकरीसाठी शुभेच्छा.

<<< याशिवाय दुसरा काहीच उपाय मलातरी दिसत नाहीय. अशा अटी घालणारे आणि मान्य करणारे मुलगे, मुलगी कधी दिसणार >>>
हे तुमचे उपाय पुस्तकी उपाय आहेत. खरी परिस्थिती घरोघरी वेगळी असू शकते.
मुळात नवरा-बायकोमध्ये सामंजस्य असणे जरूरीचे आहे (जे बहुतेकदा लग्नाला बरीच वर्षे झाली की आपोआप येते) आणि महत्वाचे म्हणजे इतरांनी त्यांच्या संसारात नाक खुपसणे बंद केले पाहिजे (जे आपल्या समाजात जरा कठीण वाटते).

दोन वर्षे कमी आहेत हे इतकं खटकलं नाही. इथले बरेचसे सल्ले मला योग्य वाटले. आपल्यासमोर एकच बाजू असताना टोकाचे सल्ले देणे बरोबर नसते.
नोकरी किंवा इतर अर्थाजनाचे उद्योग लवकरात लवकर सुरू करावेत. रिकामे डोळे सैतानाचे घर असते (विशेषतः जेव्हा नोकरीची सवय असते तेव्हा).
एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माणसं स्वभावाने चांगली/प्रेमळ आहेत का? If they are good kind loving people they'll come around eventually. वरती सुचवल्याप्रमाणे मनमोकळा संवाद, नवीन कुटुंबातील सदस्यांविषयी जिव्हाळा उत्पन्न होईल (एकत्र मजा करणे, सहलीला/सिनेमा - नाटकाला जाणे) अशा गोष्टी जाणीवपूर्वक आणि मनापासून करा. You need to work on the relationship for it to work! शुभेच्छा!

तुमच्या पोस्ट मध्ये मला काही वर्षापुर्वीची मी दिसले. खरेतर माझ्या लग्नाला ९ वर्षे होतील, अजुनही मला सासरचे कोणतेही निर्णय घेताना मला विचारत नाहीत. पण आपण वाईट नाही वाटुन घ्यायचे. खरं सांगु का मला विचारत चला निर्णय घेताना. असे म्हणुन कोणीही आपल्याला विचारत नाही. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींतुन आपण आपले मत/ विचार मांडत रहायचे. पण आपलं म्हणने कोणाला पटणार नाही याची खात्री बाळगायची. जर खरेच आपले म्हणने योग्य असेल तर ते त्याचा विचार करतात पण कबुल करत नाहीत. आता तो सासरच्यांचा स्वभावच आहे. पण आपला हेतु काय आहे क्रेडिट हवेय की गाडी योग्य मार्गावर हवीय हे आपण ठरवायचे.
आत्ता नुकतेच माझ्सा दिराचे लग्न झाले. साखरपुड्यापासुन प्रत्येक गोष्टीत पुढे होउन चांगले कसे होईल याकडे लक्ष दिले. प्रत्येक ठिकाणी न विचारता मतं दिली. काही मतं विचारात घेतली तर काही मतं माझ्यावरच उलटली. स्वयंपाक, भांडी मी करणार हे ग्रृहीत होतं. मग पडद्यामागुन सुत्र हलवायला सुरवात केली. जसे मला हवे तसेच झाले. कारण जे मी सांगितले की पटायचे नाही, तेच नव-याने किंवा ईतर कोणी सांगितले की त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव व्हायचा. थोडक्यात काय जर आपले ऐकायचंच नाही म्हटल्यावर सुर्य पुर्वेला उगवतो म्हटले तरी विरोध करणारच Happy
सो, मस्त रहा. नवरा थोडे थांबा म्हणतोय तर बघा परिस्थितीनुसार निर्णय घ्या. नव-याला तुमची मतं सांगा. योग्य मत नवरा देखील सासरच्यांकडे पोहोचवेल. त्यासाठी काय करता येईल ते पहा.
आणी हो स्वत:चा आत्मविश्वास कमी होउ देउ नका. सकारात्मक विचार करा. जे करताना मनाला आनंद वाटेल ते करा. सासरच्यांना बदलवण्यापेक्षा स्वत: बदलणे कायम सोपे. मी तेच करते. जेवढं जमतंय, झेपतेय तेवढंच करते. उगाच स्वत:ला त्रास करुन नव-याला त्रास देउन सुपरवुमन नाही बनत. नाहीतर फक्त आपल्याला त्रास होतो आणी नवरा-बायकोच्यात भांडणं होतात.

आणी दुसरा विचार हा सुद्धा करते की, जाउ दे. विचारत नाहीत डोक्याला ताप नाही. उगाच प्रत्येक गोष्टीचं बिल आपल्यावर फाडत नाहीत मग.
प्रतिसाद थोडा विस्कळीत आहे, समजुन घ्या.

इला
तुझी प्रॅक्टीकल प्रतिसाद आवडला.

२ वर्षे खूप कमी आहेत सासरच्यांचा विश्वास कमवायला >>>>. आजिबात नाही. दोन वर्ष जास्तच आहेत.
ऋन्मेषचा पहिला प्रतिसाद अगदी योग्य मुद्देसुद आहे.
दक्षिणाचाही प्रतिसाद छान आहे.

पाफा, सारखं सारखं काय त्याच त्याच झाडावर.

अस्मिता, बिग हग! प्रत्येक परिस्थिती वेगळी.सोल्युशन्स वेगळी.तुम्हाला सोल्युशन नक्की सापडेल.चांगल्या काळाची सुरुवात चांगली नोकरी लागण्यापासून लवकरच सुरु होईल.

हम्म...घरोघरी मातीच्या चुली... आपण 21 व्या शतकात आलोत तरी काही गोष्टी अजूनही काळाच्या मागे आहेत...त्यातलंच हे एक...
माझ्या ओळखीत एकजण आहे..तिथे तिच्या नणंदेचा घटस्फोट झाल्यामुळे ती तिच्या मुला बाळांसकट माहेरी राहते.. त्यामुळे सगळे निर्णय तीच घेते..पण जॉब करत नसल्यामुळे त्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च तिचा नवराच करतो... आणि हाईट म्हणजे आता तर नणंदच बाहेर प्रकरण पण चालू आहे... तिच्या सासर कडाच्याना सगळं माहिती आहे पण असं दाखवतात की आम्हाला काहीच माहीत नाही आणि आमच्या घरात काहीच प्रॉब्लेम नाही.. सगळी सूत्र सासरे,नणंद, सासू कडे.. नवऱ्याला सगळं माहिती आहे..पण त्याला घर तोडायचे नाही असं म्हणतो ...

नात्यांमधले ताण झेलणं आणि सहन करणं कठीणच असतं. कुठलंही नातं असू देत. त्यामानानं प्रोफेशनल रिलेशन्स त्यातल्यात्यात हाताळायला सोपे... (अर्थात हे माझं वैयक्तिक मत)
लोकं म्हणतात पैसा महत्त्वाचा नाहीय/नसतो पण जिथे तो लागतो तो लागतोच. मोठ्या शहरांमध्ये वाढते खर्च अन लहानसहान गोष्टींवर लागणारा पैसा सम-अप केला तर बराच होतो. त्यात न्युक्लिअर फॅमिली + होम लोन/काही बाकी कर्जे असतील तर परिस्थिती जरा नाजूक असते.
धीरानं घ्यायला हवंय आणि वेळही अजून द्यायला हवा हे माझं मत. हळूहळू का होईना तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते अ‍ॅटलीस्ट जोडीदाराला तरी कळायलाच हवं. यातूनच काहीतरी तुमचं तुम्हालाच सुचेल. या मनस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडाल ही आशा आहे.
अजून एक, नोकरी शोधत राहा (जर करायची आहे आणि मनापासून तशी इच्छा आहे तर). फक्त फ्रॉड्स पासून सावध राहा आणि फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन कुठलेही निर्णय घेऊ नका... Happy

नात्यांमधले ताण झेलणं आणि सहन करणं कठीणच असतं. कुठलंही नातं असू देत. त्यामानानं प्रोफेशनल रिलेशन्स त्यातल्यात्यात हाताळायला सोपे... >>> सही बोला तुम योकु. असं का असतं पण ? कारण नात्यातले निर्णय इमोशनली घेतले जातात आणि शिवाय नात्याच्या टायटल सोबत येणारे पूर्वग्रह हे एक बॅगेज ही येतं!
त्या मानाने नोकरी व्यवसायात जरा ऑब्जेक्टिवली विचार केला जातो, जरा जास्त पॉजिटिव्हली मार्ग काढले जातात असे म्हणता येईल का?

अग्रीड मै.
बर्‍याच विचारांची/प्रश्नांची गर्दी आहे डोक्यात... जरा स्ट्रिमलाईन करून मांडायला हवे.

नोकरी व्यवसायात जरा ऑब्जेक्टिवली विचार केला जातो, जरा जास्त पॉजिटिव्हली मार्ग काढले जातात असे म्हणता येईल का? >> हो मला हे खूपच पटलं.

मुळात ननंदेच्या इशाऱ्यावर घर नाचतंय हे पाहवत नाही तुम्हाला. मत्सर सोडा, प्रेमभावना जागृत करा सासरच्या लोकांबद्दल. घरातल्या निर्णयात तुम्हाला सामील करून घेत नाहीत याची खंत वाटते तुम्हाला, घरातले निर्णय म्हणजे फ्रिज कुठला घ्यायचा tv कुठला घ्यायचा हेच ना? अहो एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे नका विचार करत जाऊ.

नानंदेच्या घरी तिला कोणी विचारात नसेल म्हणून इकडे लुडबुड.
तुम्ही पण तुमच्या भावाच्या घरात निर्णय घेत जा.

Pages