सून म्हणजे रोबोट असते अस का वाटत ह्याना?

Submitted by अस्मि_ता on 9 April, 2018 - 04:41

Maz lagna houn 2 varsha zali pan ajun mazya sasari mala kuthlyach nirnyat consider kel jat nahi. Kahich kimat nahi. Hya ulat kamachya babtit mhanaje sagalech gruhit dhartat. Gharat sagal mazya nanandechya mhananyanusar chalat. Maza kahich vichar kela jat nahi. Mazi khup ghusmat hote. Lagna adhi me job sathi punyat rahat asalyamule maze vichar swatantra ahet. Pan jevha pasun lagna zalay tevhapasun maza sagala swatantrya hiravun ghetalay asa vatat. Tyatach maza job gela ani situation ajunach kathin zaliy. Maza confidence low zalay. Khup ghusmat hote. Kay karu kahi kalat nahiy. Maheri kahi bolu shakat nahi ani navara mhanato thode diwas thamb. Pan ata pani dokyavarun chalalay. Me robot nahiy. Mala emotions ahet he hyana ka kalat nahi?
Maaybolikar apal manun salle detat mhanun ethe post karate.

Group content visibility: 
Use group defaults

एक जेन्युईन प्रश्न पडलाय, जर सासरच्या घरात आपल्या मताला किंमत येईपर्यंत काही काळ संयम आणि समजूतदारपणा दाखवायची गरज असेल. तर त्याच सूनेला आपल्या स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी देखील लग्नानंतर घ्यावीशी वाटत असेल तर तो निर्णय घ्यायला आणि तो सासरच्यांकडून पास करून घ्यायला साधारण काय करावे लागेल?

दुसरया एका धाग्यावर मुलीने लग्नानंतरही आईवडिलांची जबाबदारी घ्यायला हरकत नाही वा घ्यायला हवी असे विचार पुढे येत होते. जे योग्यच होते. पण ते या प्रॅक्टीकल घरोघरी मातीच्या चुली सिच्युएशनमध्ये कसे आचरणात आणता येतील हा प्रश्न पडलाय..

वाईट वाटलं ऐकून.

सासू-सासरे तुम्हांला वडिलांच्या तब्येतीच्या कारणामुळे ब्लॅकमेल करतायत, तो त्यांचा हुक्मी एक्का आहे.
आईला थोडी कल्पना देउन ठेवा.
नवर्‍याला सासू-सासरे 'संस्कार' काढतात हे माहिती आहे का? त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ताबडतोब स्वयंपाक्/ इतर सगळी वरची कामं करायला मदतनीस ठेवा. बाळाला वेळ द्यायचाय / अभ्यास करायचाय असं सांगा.
नणंद काय करते? छोटे-मोठी कामं नणंदेकडे सोपवा , कामं वाटून घ्या. म्हण्जे भाजी तुम्ही आणली तर तिला निवडायला बसवा.तुम्ही कणिक भिजवली तर तिला पोळ्या लाटायला लावा.
गेले २ वर्ष असंच चालू असेल तर खूप दिवस सहन करताय तुम्ही.

काय माहीत, पण दुसर्‍याला छळणारे कसे तोंडावर आपटतात ते मी याची डोळा बघीतले आहे. लिहीन नंतर, पण स्वतःला सुशिक्षीत म्हणणार्‍या याच बायका सासु झाल्या की लगेच हिटलरगिरी करतात ते पण बघीतले आहे.

अस्मिता, वाघ म्हणले तरी खातो आणी वाघोबा म्हणले तरी खातो अशी तुझ्या सासुची वृत्ती असेल तर त्यांच्या धमक्यांना घाबरु नको. तुझ्या माहेरच्यांना विश्वासात घे, त्यांच्या समोर ( आई बाबांसमोर ) रडगाणे न गाता तू ठाम रहाणार आहेस असे त्यांना सांगुन टाक, म्हणजे तुझ्या सासुने त्यांच्याकडॅ चुगल्या केल्या तरी ते टेन्शन घेणार नाहीत. आणी सासुला सांग की बिनधास्त माझ्या वडिलांना सांगा. त्या ( सासु ) तुला घाबरवत असतील तर तुझ्या ठामपणाने मागे हटतील. एक लक्षात घे तुझी लढाई तुलाच लढायची आहे. आम्ही सल्ला देणा व्यतीरीक्त काही करु शकत नाही.

मी यातुन गेलेय. माझ्या सासुबाई ७५ टक्के चांगल्या आहेत, पण उरलेले २५ टक्के त्यांनी मला लेकी बोले सुने लागे याच पद्धतीने वागवले आहे. आता मी खंबीर बनलेय, व आमचे आर्थिक सगळे चांगले असल्याने त्यांची गोची झालीय. आता तू पण नवर्‍याला विश्वासात घेऊन नोकरी शोध. मुलाला सासु वर न सोपवता माहेर जवळ असेल तर आई लक्ष ठेऊ शकेल अशा पाळणा घरात ठेव. आई वडिला ना पण गृहीत धरु नकोस, कारण तब्येतीने ते पण जाम आहेत. तुला चांगल्या आयुष्याकरता शुभेच्छा.

प्रामाणिक मतानं... घरातली सगळीच कामं अगदी टॉयलेट्स साफ करण्यापासून ते भाज्या निवडणे, कचरा बाहेर ठेवणे इ. घरातल्या सगळ्यांची आहेत आणि घरातल्या सगळ्यांनीच ती केलीच पाहीजे. खायला आणि ***ला सगळ्यांना असतंच ना?
यातही टास्क रोटेशन्स हवेत. म्हणजे सगळ्यांना सगळी कामं करता येतात. नाहीतर एक माणूस सगळीच कामं करतो अन दमून जातो, कालांतरानी चिडचिडही होतेच आणि प्रॉब्लेम्स डोकं काढायला लागतात.
आणि हो, कामं पूर्ण करावी हाही आग्रह हवा उदा. एकानी भाजी आणली तर दुसर्‍यानी निवडणं साफ करणं झालंच पण नंतर चा केर आवरणं, तो कचरा मोस्टली ओला असतो तो वेगळा बाहेर ठेवणं, फळ भाज्या आधी धूवून ठेवणं आणि मग पालेभाज्या निवडून झाल्यावर; फळभाज्या बॅग्स मध्ये घालून आणि पालेभाज्या पेपरमध्ये गुंडाळून फ्रिज मध्ये ठेवणं हे ही कामं आलेच.
वॉम असल्यानी कपडे एकदा लावले की काम बरंच सोपं होतं पण रंग जाणारे नंतर धुणे वगैरे व्याप असतातच.
ऑकेजनल कामं सगळ्यांनी वाटून करावी, उदा. पंखे पुसणं, जाळी काढणं, दरवाजे पुसणं इ.
कपाटं आपापली आवरावी कारण ते शेवटी पर्सनल आहे; महत्त्वाचे कादपत्रं असतात इ. कारणं; यातही एक खण एकावेळी आवरावा लवकर होतं आणि भसकन सगळं कपाट अंगावर येत नाही.
बरंच अवांतर झालंय खरं पण आता डिलीट नाही मारत एव्हढं लिहिलेलं...

आता तुम्ही सविस्तर लिहिल्यावर तुमचा प्रॉब्लेम थोडाफार लक्षात येतो आहे.

१. तुम्ही सर्वप्रथम माहेरच्यांना विश्वासात घ्या. वडील हार्ट पेशन्ट असले तरी त्यांना मेजर धक्का बसण्यासारखं यात काहीही नाहीये. मी तुमचा प्रॉब्लेम लहान आहे असं म्हणत नाहीये, पण तुम्ही आयुष्यात ज्या टप्प्यावर आहात, त्यासाठी नवलाचा नाहीये. उलट तुम्हाला त्रास होत होता हे आईवडिलांना नंतर किंवा इतर कोणाकडून कळलं तर त्यांना 'आपली मुलगी आपल्याशी का मोकळेपणाने बोलली नाही' याचं जास्त वाईट वाटेल.
दुसरं म्हणजे त्यामुळे सासूच्या 'तुझ्या घरी सांगेन' या धमकावणीतली हवा निघून जाईल.

२. लवकरात लवकर जॉब बघायला लागा. 'मी आता नोकरी शोधायला लागणार आहे' हे घरी नीट सर्वांसमोर डिक्लेअर करा. त्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करावे लागतील (रेझ्युमे बनवणं, काही नवीन स्किल शिकणं, जुनी स्किल्स रीफ्रेश करणं, इन्टरव्ह्यूजना जाणं इ.) त्याची त्यांना समजेलशा भाषेत आणि आदरपूर्वक त्यांना थोडक्यात माहिती द्या, आणि या काळात तुमचा सर्वांचा सपोर्ट मला लागणार आहे हेही सांगा, आणि तुमच्या जॉबमुळे घराला हातभारच लागणार आहे हेही. 'फेअर डिस्कशन' करा: मी अमुक देऊ करेन, आणि तुम्ही तमुक देऊ करावं अशी माझी अपेक्षा आहे - असं. कोणालाच त्यात राबवल्याचं किंवा गृहित धरलं गेल्याचं फीलिंग येऊ नये असा प्रयत्न करा. त्यातून ते आलंच तर स्वभाव म्हणून सोडून द्या, पण आपण आपल्या वागण्यात फेअर होतो हे समाधान आपल्याला रहायला हवं.

३. त्यांनी तुमच्या अपरोक्ष तुमच्याबद्दल बोलणं, तुमच्या संस्कारांचा उद्धार करणं अजिबात योग्य नाही. हे त्यांना स्पष्ट सांगा. सांगूनही ते तसं करायचं सोडणार नाहीत ही मनाशी खूणगाठ असू दे. पण तुम्हीही त्यांच्या अपरोक्षच त्यांच्याबद्दल बोललात तर तुम्हीही त्यांच्यासारख्याच झालात, हो की नाही?

तुम्हाला शुभेच्छा!

स्वाती यान्चा क्र १ साठी - सहमत. सर्वान्च्या मनाची तयारी करायची.

जॉब (आर्थिक स्वतन्त्र) असणे महत्वाचे आहे हे अनेकान्नी सान्गितलेच आहे, तुम्ही तसा प्रयत्न करतही असाल. मुलाला खुप चान्गला पगार आहे, त्याचे घर आहे, आपल्याला दोन पगाराची अवशक्ताच नाही असे कारण पुढे करुन मुलीला असलेली चान्गली (१०,००,०० रु +) नोकरी सोडायला लावणारे बघितलेत. नोकरी (किव्वा अर्थाजनासाठी स्वत:चा व्यावसाय) करण्याचे खुप फायदे आहेत. त्याने तुमचे आताचे ७५ % प्रश्न सुटतील, आणि २० % नवे प्रश्न तयार होतील.

लहान्ग्यास प्राधान्य#१ द्यावे, हे सर्वात आनन्दाचे दिवस आहेत त्याचा पुरेपुर वापर करा... मग पुढे शिक्षण, जिवघेणी स्पर्धा... स्ट्रेस आहेच.

तुम्हाला मनापासुन शुभेच्छा....

तुमच्या तक्रारीतून तरी असं दिसतंय, की सासरी तुम्ही तुमचं एक अस्तित्व शोधताय. घरातली एक व्यक्ती म्हणून ऑफिशिअली तुम्ही आला असलात, तरी अजून कुटुंबात तिर्हाईतासारखी वागणूक मिळते, असा एकंदर नूर तुमच्या बोलण्यात दिसतो.

नोकरी धंद्यात कसं, एका कामाची जबाबदारी आपल्यावर असते. कामं नीट झाली, की समोरच्याचा आपल्याबद्दल विश्वास आपसूक निर्माण होतो. मॅनेजर सुध्दा आपल्याला हक्काने वेळ (अवेळी ?) पडल्यास बोलावतात, आपणसुद्धा आपल्या कामात हक्काचे सजेशन्स त्याला देतो. आपण आपल्या कंपनीचा एक महत्वाचा भाग आहोत, ही जाणीव निर्माण व्हायला लागते.

माणसाला, कुठेतरी आपण हवेहवेसे आहोत, ही जाणीव असणं फार महत्वाचं असतं. जुन्या सासवा, बायकांना बोलताना नीट पहा. "माझ्यामुळे म्हणून इतकं सगळं निभावलं", किंवा "मी होते म्हणून .." या छापाची बोलणी कानावर येतील (अतिशयोक्ती सोडली, तरी बऱ्याचदा ते खरेही असते ). या गृहिणींना बाहेर आपली ओळख मिळवताना अडचणी आल्या, पण त्यांनी ती कसर घरच्या जबाबदाऱ्या घेऊन पुरी केली.

तुमच्या सुदैवाने, तुम्ही ही ओळख बाहेरसुध्दा, स्वतःच्या हिकमतीवर मिळवू शकता.

तुम्हाला बाहेर स्वतःची ओळख मिळवायची का ? - लगोलग नोकरी शोधा, घरच्या किडूक - मिडूक गोष्टीत डावलला जाण्याचा सल बराचसा कमी होईल.

नोकरी न करता कुटुंबात स्वतःची जागा हवीय ? घरची रोजची काम , जसं स्वयंपाक, सामानसुमान , कपडेलत्ते , फर्निचर इत्यादीत निर्णय घेताना तुमच्याकडे कानाडोळा होतोय का ? - वेळ मिळाला, तर कधी कधी तुम्ही स्वतःहून साधी साधी कामं मागा. विना तक्रार (आपली पद्धत कितीही बरोबर असली तरी ) ती त्यांच्या पद्धतीने करून द्या. कधी कधी समोरच्याच्या मनात विनाकारण अविश्वास असतो नव्या माणसांबद्दल... अशा कामात तुम्ही स्वतःहून रस घेताय असं दिसलं, तरी चटकन माणसे आपल्याला विश्वासात घेतात. हळूहळू तुम्ही घरच्या वर्तुळात फिट्ट झालात की तुमच्या मताला पण किंमत देतील.

याउप्पर काहीच झाले नाही , तर "कुत्र्याचं शेपूट" म्हणून सरळ सोडून द्या.

मै देवी,

तुम्ही एवढा आकांत का केलात हे समजले नाही

धाग्यातील एक वाक्य फार भयंकर वाटले

नवरा म्हणतोय थोडे दिवस थांब

थोडे दिवस थांब म्हणजे थोडे दिवसात मी काहीतरी उपाय करेन असे की थोडे दिवसच ह्या परिस्थितीत थांब अन नंतर कुठेही जा?

थोडे दिवस थांब ही पळवाट काढण्याचे उत्तर आहे. आणि ते तेव्हाच दिले जाते जेव्हा हे उत्तर देणार्याला कोणताच मार्ग माहित नसतो. प्रामाणिक पणे मला असं वाटतं की आपल्या अडचणींवर आपल्यालाच मात करावी लागते.
अशा घरात एकटे पडल्याची भावना बळावू शकते. प्लिज मित्र मैत्रिणींच्या संपर्कात रहा.

You should really inform your parents about all these things. Whatever they suggest would have better effect on you. After all we are strangers and parents really know what kind of person you are and what kind of strategy / pep talk works for you.

Why did you leave the job? After getting hint of kind of people you are dealing with why didn't you try to get a job? If your SIL is unmarried then your troubles on that front is not going to get over till she gets married. Your SIL and MIL are going behave like this till she is married.
I still feel that not talking to the people who behaves badly with you is best way. Just start assuming there is only three of you in the home. You do your responsibility and what has been told. Don't go extra mile. Don't even have a single ray of hope in your mind that they would eventually say good things about you. They are not going to change, period. From lot of examples and talk above it looks that you are not alone here and almost everyone has gone through one or more of similar situations in the past.
Keep faith in -' he hi divas jatil. Aahe he asa aage, chalaychach.
Solutions shodhnyat ugich shakti davdavu naka. Mast paiki bal enjoy kara. Navra changla asel tar tyanchi company enjoy kara.

@ अस्मिता,
आता आपली सविस्तर प्रॉब्लेमवाली पोस्ट वाचली.
त्यावरून जे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले त्यावरून वाटते आता आपल्याला संयमाला बॅकफूटला टाकत थोडे आक्रमक सल्ले मिळू शकतील.
अर्थात ईथे सल्ला देणारा स्वत:च्या स्वभावाला अनुसरून सल्ले देणार हे लक्षात ठेवा. तो सल्ला तुमच्या स्वभावाला आणि कॅरेक्टरला सुटेबल असेलच असे नाही. त्यातही ईथे विविध जनरेशनचे लोकं आहेत. या पिढीतील स्त्रीवादी आणि गेल्या पिढीतील स्त्रीवादी यांच्या विचारातही फरक असेल. या पिढीतील एक पाऊल पुढे असेल. उदाहरणार्थ माझ्या बाबतीत, म्हणजे माझ्या बहिणीच्या बाबतीत असे घडत असते तर हे मला समजताच मी तिला दुसरयाच दिवशी तिथून बाहेर काढले असते. विथ नवरा ऑर विदाऊट नवरा.
अर्थात असा काही सल्ला मी ईथे आपल्याला देणार नाही. कारण मी जे केले असते ते माझ्या स्वभावाला अनुसरून केले असते आणि तो मार्ग आपल्याला झेपू शकतो हे माहीत असताना केले असते.

सांगायचा मुद्दा हा की आपला प्रॉब्लेम मोठा आहे. आपण ईथली चर्चा वाचा. पण आपल्याला योग्य आणि सूटेबल सल्ला आपल्याला ओळखणारी व्यक्तीच देऊ शकते.
माहेरच्यांचा सल्ला घ्या.. ते बेस्ट !
शुभेच्छा !!

You should really inform your parents about all these things>>> अगदी... त्यातल्या त्यात तुमच्या माहेरची सगळ्यात सेन्सीबल व्यक्ती जी वाटते तिच्याशी शेअर करा. कारण तुमची होणारी मानसिक कुचंबणा लक्षात घेता माहेरच्यांकडूनही काळजीपोटी टोकाचे सल्ले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या लहानग्याचा विचार करुन योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

आस्मिता, आता साधारण कळतेय तुझी समस्या.
सासू सासरे नणंद अनफेअर वागत आहेत हे कळले. पण नवरा काय करतोय तुझा यात? तुझा त्रास त्याला दिसत नाही का?
की काहीच न करून कुणाचाच वाईटपणा न घेणे हा सोयिस्कर कातडीबचाव स्टँड घेत आहे? तसे असल्यास हे चालवून घेऊ नये.
तुला खंबीर बनणे हे मस्ट आहे. वर इतरांनी लिहिलेच आहे तसे प्रथम आई बाबांना सर्व कल्पना देणे ( पण जो काही प्रॉब्लेम आहे तो मीच सोडवेन असा विश्वासही देणे). याउप्पर मी सुचवेन की नवर्‍याला अल्टिमेटम देऊन यावर काहीतरी करण्यस भाग पाडणे!
हो आणि काहीही करताना आपल्या बोलण्या वागण्याचा परिणाम काय होईल याचे अंदाजे वर्स्ट आणि बेस्ट केस सिनारिओ कन्सिडर करून त्यानुसार केव्हा काय स्टँड घ्ययचा त्याचा आधीच शांत डोक्याने विचार करून ठेवणे. त्यामुळे तुझा तुलाच कॉन्फिडन्स येईल. गुड लक!!

थोडे दिवस थांब ही पळवाट काढण्याचे उत्तर आहे. >> Happy पळवाट नाही, अगदी बेश्ट उत्तर आहे. अस्मि_ता, तू कधी त्याला थोडे दिवस थांब म्हणाली आहेस का?

इथले सल्ले सोपे आहेत - अडचण अशी की हे सगळे सासरच्यांना सांगायला खंबीरपणा पाहिजे. तो नसला, बोलायची भीति असली तर हे सगळे बोलता येत नाही. मुळात म्हणूनच या सगळ्या अडचणी उभ्या रहातात. त्यातून सासरचे जास्त खंबीर व पक्के असतील, मोठ्याने बोलून किंवा कुणाचे काही न ऐकता लष्करी अधिकार्‍यांसारखे हम करेसो कायदा असे वागणारे असतील तर हिंमत आहे का त्यांच्या विरुद्ध बोलण्याची?
तिथेच घोडे पेंड खाते.
अहो पुरुषा सारखा पुरुष मी, अमेरिकेत आल्यावर स्वतःच्या पायावर उभा राहिलेला, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असूनहि माझ्या सासरच्यांनी माझ्या बायकोच्या मदतीने माझी वाट लावली. कारण मी मुळमुळीत. ठामपणे सांगू नाही शकलो की मला असे करायचे आहे.
त्यामुळे मला अत्यंत साहानुभूति आहे अश्या लोकां बद्दल ज्यांना उत्तरे माहित असून त्याप्रमाणे बोलता येत नाही.

ase nemke kay discuss karat aste tumchi family. faar mothe kutumb aahe ka? lagnache deer, nanda aahet ka faar mothi property aahe tyachi vyavstha kashi lavayachi? kinva vyavsayat faar mothe nuksaan hotey tar kay karave ? ase kaahi.

aho myadam ya ashya paristhititun saglyanach jaave laagte keval aaplyala discussion madhye consider karat naahit mhanun tumhi lagnachi ji suvarn kaal asto to enjoy karit naahi aahat. ektar lagnala don varshe jhalit, tyatun tumhi eka balachya aai aahat shvay nokri karnarya tumhi sadhya bekar aahat. mag yach velecha upyog mulache changle sangopan karnyat ghalva. navryabarobar quality time spend kara, changli pustke vaacha. aani ho sasu bai na patvayche asel tar aadhi ekhadya situation madhe tyanche mat vichara mag sanga jar aapan hi gosht ashya tarhene (mhanje tumchya padhtine)karun baghuya ka ? jar te salle upyogi padle tar nantar tya swathun vichartil. asech nandela (jar ti tumchya peksha lahan asel aani tiche lagn jhale asel tar ) ekda kadak shabdat tila sanga jara swatachya gharakade laksh de. urle sasre tar te ase saglyanvar dafrtaat ki keval tumchyavarach dafrle he bagha aani tyana hi halu halu aaple vichar patvun dya.
अस्मि_ता ताई, मुलासाठी नाव सुचवा असे जेव्हा तुम्ही मा.बो. कराणा विचारता तेव्हा हे सेम discussion तुमच्या घरीसुद्धा ठेवले होते का? घरच्याचे मत घेतले होते का? का तेव्हाही तुमचे मत कोणि विचारात घेतले न्हव्ह्ते.
me lihilele shabd jar kadak vatat astil tar sorry.

मला वाटलं हा आयडी अपर्णा रामतीर्थकरांचा आहे की काय Light 1
पण त्या वकील आहेत, तुम्ही डिप्लोमा जर्नालिझम आहात Happy

मला वाटलं हा आयडी अपर्णा रामतीर्थकरांचा आहे की काय Light 1
पण त्या वकील आहेत, तुम्ही डिप्लोमा जर्नालिझम आहात Happy >>>>>>>>>> ????????????????????

रामतीर्थकर बाईंनी मधल्या काळात अभ्यास करुन जर्नालिझम चा पण डिप्लोमा मिळवला असणे अशक्य नाही Happy
Submitted by mi_anu on 12 April, 2018 - 13:46 >>>>>>>>>> ??????????????????

अस्मि_ता, तुझा त्रास वाचून खरेच वाईट वाटले.

इथे अनेकांनी नोकरी शोधून तितका वेळ तरी बाहेर राहायचा सल्ला दिलाय. पण तुझे बाळ एक वर्षाचे आहे असे तू लिहिलेस, त्यामुळे हा सल्ला तुझ्यासाठी जरी चांगला असला तरी बाळासाठी चांगला नाही. अर्थात कित्येकांना तीन महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात ठेऊन नोकरी करावी लागते, पण त्यांना नोकरिशिवाय पर्याय नसतो म्हणून. नोकरी हाच एकमेव पर्याय आहे अशी तुझी स्थिती नसल्याने तू तुझा त्रास कमी करण्यासाठी बाळाला त्रासात टाकावेस हे योग्य नाही असे मला वाटते.

सध्या आपल्याला कुणी विचारतेय का, कुणी किंमत देतेय का वगैरे सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तू फक्त तुझ्याकडे व बाळाकडे लक्ष दे. घरात कुणीतरी काम करणे गरजेचे असते जे तुझ्या गळ्यात पडलेय. लादी/भांडी/कपडे करायला बाई मिळते का बघ. तुझेही हात/पाय/कंबर दुखू शकतात. ते तसे दुखताहेत हे जाहिर करून ही कामे टाक बाईच्या गळ्यात. Happy नवऱ्याकडे गोड बोलून हे काम करून घे. मुलाकडे दुर्लक्ष होते , तुला थकवा येतो वगैरे कारणे सांग. तुमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असावी असे वाटतेय.

तू सासारच्यांच्या स्वभावाबद्दल जे लिहिलेस त्यावरून तू त्यांच्याकडे कामापुरते बोलून बाकीचा वेळ मुलात गुंतवावास हे जास्त योग्य होईल. आता दोन वर्षात त्यांना तुझा व तुला त्यांचा स्वभाव कळलाय, ते तुला आपली म्हणत नाहियेत मग तू तरी कशाला आटापिटा करतेयस त्यांनी आपली म्हणावे, सर्व निर्णयात सामील करावे यासाठी? सासू फुगून बसते तर बसुदे. किती दिवस बसेल? तुला ते असह्य होते हे तिला दिसते व ते ती एन्जॉय करते. त्यांच्या क्रियेवर तू प्रतिक्रिया देणे बंद कर, त्यांची सगळी मजाच निघून जाणार.

नवरा बाहेर पडायला तयार नाही, तुला कुणाचा पाठिंबा नाही, नोकरी करायला बाहेर पडलीस तर मुलाला त्रास होणार, मूल अजून तितके मोठे नाही अशा स्थितीत अडकल्यावर घरातील लोकांकडे पाठ फिरवून फक्त कामापूरती संबंध ठेवून आपली शांती आपण स्वतःच मिळवायला हवी. तुला घरातल्यांकडून जे हवेय ते द्यायची त्यांची कुवत नाही/तयारी नाही/ते न दिल्याने तुला होणाऱ्या त्रासाची त्यांना मजा वाटते. अशा वेळी त्यानच्यापासून ही अपेक्षा ठेवणे बंद करून तू घरात तुझे वेगळे बेट तयार कर. जी कामे तुझ्या गळ्यात आहेत त्यापैकी पैसे देऊन जी करता येतील ती करून घ्यायचा प्रयत्न कर. शक्य नसेल तर कामाचे योग्य नियोजन करून ती भराभर संपवून बाकीचा वेळ मुलाला घेऊन बस. एक वर्षाच्या मुलांबरोबर भरपूर वेळ घालवता येतो, तसा देणे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने खूप गरजेचे असते. आपण तिकडे दुर्लक्ष करतो. तो बोलायला लागला असेल तर त्याच्याशी बोल, चालत असेल तर हाताला धरून हळूहळू फिरव, चित्रांची पुस्तके दाखव, रंग ओळखायला शिकव. मुलांबरोबर करायची हजारो कामे आहेत. आता जो वेळ त्याच्याबरोबर घालवशील त्याने तुम्हा दोघांचे नाते मजबूत व्हायला मदत होईल, मुलाची भावनिकदृष्ट्या चांगली वाढ होईल. सध्या हे करण्याची जास्त गरज आहे, त्यापूढे मला घरचे विचारत नाहीत, निर्णयात सामील करत नाहीत वगैरे सगळे तुच्छ आहे/तितक्या गरजेचे नाही.

तुला काय हवंय यापेक्षा काय जास्त गरजेचे आहे याचा विचार कर व तसे स्वतःला बदल. घरातील कामाला किती वेळ द्यायचा हे ठरव, मुलाला किती वेळ, कधी द्यायचा हे ठरव, याचे वेळापत्रक बनव स्वतःसाठी. मग मुलाकडे तू असताना सासू काम सांगायला आली तर तिला सांगायचे की हा वेळ मुलाचा आहे, तुमचे अमुक्तमुक काम पेंडिंग आहे मला माहित आहे, मी ते अमुक्तमुक वाजता करणार आहे. सासू संस्कार काढायला लागली तर सरळ सांगायचे की यात संस्काराचा काही भाग नाही, संस्कार आहेत म्हणून मी घरात बसून काम करतेय, अन्यथा पळून गेले असते एव्हाना. तुला असह्य होते म्हणून ती फुगते हे लक्षात घे. घरी वडिलांशी बोलून ठेव की अशी अशी परिस्थिती आहे, मी असा असा मार्ग काढलाय, तरी तुम्हाला फोन आलाच तर तुम्ही त्यांचे बोलणे ऐकून घ्या व बरं म्हणून फोन ठेवा. तू मार्ग काढला आहेस हे ऐकल्यावर त्यांना बरे वाटेल, नुसते प्रॉब्लेम ऐकायला त्रास होईल. मोबाईलवर तर कळतेच कुणाचा फोन आलाय ते. सासू सासऱ्यांचा असेल तर उचलूच नका. प्रश्न मिटला. तुझ्या सासरच्यांना भांडण आवडते हे दिसतेय, तू किंवा माहेरचे उलटून भांडले तर त्यांना हवेय. तू ते करूच नकोस, बसतील गप्प.

शेवटी आपला आनंद आपल्या हातात आहे, समोरचा अमुक्तमुक वागला तर मी आनंदी होईन असे आपल्याला वाटायला लागले तर आपण कधीही आनंदी होणार नाही.

Pages