माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब या अगोदर कधी आले नाहीत वाटत ऑफिसला . तेन्व्हाही त्याना सगळी गॅन्ग कॉफी पिताना किन्वा जेनीच्या डेस्कवर गप्पा मारताना दिसली असती. >>> Lol

कालच्या भागात ,
1. नविन ऑफिस तयार झालं.
2. राधिका ने फक्त गुरु चा ex-staff नाही तर बकुळामावशी , watchman चा भाऊ , दूधवाला भय्या संगळ्यांसाठी कामाची सोय करते सांगितले आहे.
3.राधिका CEO बनली च शेवटी.
4.युरोपचा plan cancel झाला म्हणून बच्चा चिडली.गुरू ने समजूत काढली.
5.नागपूरचे आजी आजोबा नातवासाठी ,तिथल्या घरी AC लावणार
6 बकुळा मावशी नुसती आगाऊ नाही तर भोचक आणि वेडसर आहे याची खात्री पटली.
7.झी च presentation प्रेम काल परत दिसलं. गुरु , त्या रश्मि ला विचारतो , presentation च काय झालं ? ती तततपप करते तर भडकतो.अरे यड्या , ती receptionist आहे रे!! तिच्या roles and responsibilities वेगळ्या हव्यात

कालच्या भागात रेवती ` राधिका ज्या बिल्डिंग समोर उभं राहुन बघायची त्याच बिल्डिंग मधे तिने ऑफिस घेतल ` म्हणत होती. ती तर गुरूच्या ऑफिस च्या बिल्डिंग कडे बघत स्वप्नं बघायची ना ?

2. राधिका ने फक्त गुरु चा ex-staff नाही तर बकुळामावशी , watchman चा भाऊ , दूधवाला भय्या संगळ्यांसाठी कामाची सोय करते सांगितले आहे.>>>>>> इथ्थेच अगदी इथ्थेच मला चक्कर यायची बाकी होती काल. धन्य आहे ही बाई आणी हिचा आशावाद. त्यातुन लेखकाबद्दल क्या कहने!

गुरुचा बच्चा ६ की ७ हजाराचे फेशियल करणार होता ट्रिप ला जाण्या आधी. अय्यो! गुरुला परवडतं??

राधिकाची नविन हेअरस्टाईल फार वैताग आणतेय , किती पोक्त आणि सुजलेली दिसतेय ती .
>>> Lol.. म्हणून तर तिला चणा ( रात्रभर भिजून फुगलेला) म्हणतात.

राधिका ने फक्त गुरु चा ex-staff नाही तर बकुळामावशी , watchman चा भाऊ , दूधवाला भय्या संगळ्यांसाठी कामाची सोय करते सांगितले आहे.>>>>>> आणि तेही हातात एकही ओर्डर नसताना.

घराची दुरुस्ती करायची तर एकात एक कामं निघून overbudget होतं. इथे राधिकाने मिळालेल्या कर्जातून नवीन ऑफिस घेतले आणि interior , furniture सगळं केलं. की त्या पाठाऱ्यानाही 'दादा , आत्ता माझ्या कडे एवढे पैसे नाहीत . पण मला वाटून राहीलं की लवकरच आम्हाला एक मोठी order मिळेल आणि मग एकदा का काम सुरु झालं की आम्ही मेहनत करू. ही सगळी मंडळी माझ्यासोबत आहेतच. आणि कंपनी मोठी झाली की नवीन शहरात ऑफिस सुरु करावं लागेल ना ...... '

नवीन मेकोव्हर मधे डायरेक्ट ऑफीस पेहराव >>> Not a bad make over. पण हा मेकओवर कम्पनी नीट Established झाल्यानन्तर करायचा ना. अजून Orders चा काही पत्ता नाही, आणि हे लोक शेखचिल्लीची स्वप्ने बघतायत.

बातमित दाखवला तस मेकोव्हर असेल तर नक्किच बराच बदल आहे पण त्याबरोबर " बोलुन राह्यले, हाव ना" ते पण बदलणार की कस.. >>> अगदी अगदी. नाहीतर हिने जर तोन्ड उघडले तर क्लायन्टस पळून जायचे. Lol

पण निघताना गुरुशी हात मिळवता , केड्या त्याचा फोटो काढतो. >>>> गुरुशी अन्तर राखून बोलल तरी चालल असत, हात मिळवायची काय गरज होती? मूर्ख श्रेयस! Angry

Vacancy,
Urgent Opening

For New Comers
Newly Started Company
Marketing Executive
Feshers/Experience Welcome

Salary :15k/20k

RADHIKA MASALE

Contact:
Radhika Gurunath Subhedar
0987654321

Regards
Gurunath Subhedar
Mazya Navryachi Bayko

<<< सौजन्य - ,कायेप्पा

काल अख्खा एपि दादा ताईच्या कौतुकात घालवला. बाली किती महान याची सखोल चर्चा. वहिनी दिसली नाही २ दिवसात. शन्याचे काल जरा बरे कपडे होते, मला वाटल....परत .... घालुन बसते की काय.

काल बर्याच दिवसांनी नीट बघितली.

स्वप्नात का होईना शनाया टेबल पुसताना दिसली. अंजुला बरं वाटलं असेल Proud

राधिकानी ओफिस घेतलं म्हणाजे तिला किमान एक मोठी ओर्डर मिळाली असेल असा लॉजिकल विचार शनायानी पण केला Wink

तो दादा कुठल्याश्या कुरिअर कंपनीत डिलिवरी बॉय म्हणून नोकरी करायचा ना मग एकदम सेल्स च्या ट्रेनिंगसाठी १० दिवस औरंगाबाद Uhoh आणि ते सोडुन हा बावळट उद्घाटनासाठी इथे थांबणार. अरे मुर्खा काम मिळतय ते कर ना नुसत बहिणिच्या जीवावर बसुन बायकोला सारखी नावं ठेवत असतो Angry

तो दादा कुठल्याश्या कुरिअर कंपनीत डिलिवरी बॉय म्हणून नोकरी करायचा ना मग एकदम सेल्स च्या ट्रेनिंगसाठी १० दिवस औरंगाबाद Uhoh आणि ते सोडुन हा बावळट उद्घाटनासाठी इथे थांबणार. अरे मुर्खा काम मिळतय ते कर ना नुसत बहिणिच्या जीवावर बसुन बायकोला सारखी नावं ठेवत असतो Angry >>>>>> आईशपथ.... सेम सेम सेम.. रात्रि हाच विचार माझ्या मनात आला कि ह्या माणसाला जनाचि नाहितर मनाचि तर लाज कशि वाटत नाहि.

राधिकाचे काही ही न करता ओव्हर कौतूक ऐकून कान किटले. ह्यापेक्षा जास्त अपमान सोसून मेहनत करणारे, बिझनेस चालव णा रे मुलं वाढवणारे लोक्स असतात व त्यांना एकही शब्द कौतूकाचा मिळत नाही. ते नानाजी व नानी पण पेन मारतात. इतकी कशी काय राधिका गुणवंत वैताग आला मला. आणी आधीचे पैशाचे प्र्शन एकदम संपले का? तो दादा तर बघितले मला दोन लाफा माराव्य वाटतात त्याला. दीपस्थंभ म्हणे. फुकट कौतूक यार.

खरं सांगायचं तर आता त्या दादाला काही वाटेनासं झालयं, गुरू त्याला एवढा बोलला त्याला काहीही वाटलं नाही. त्याची बायको त्याच्या बहिणीला अप्रत्यक्ष त्रास देत्ये त्याचही काही नाही, तिला कधी समज देताना दिसत नाही, नुसता हे काम कर, बालीला मदत कर बास एवढचं.

कोणाला आठवत असेल तर बँकेने आधीही एकदा लोन दिलचं होतं राधिकाला, ते फेडलं की नाही, दुकान होतं ते अचानक बंद केलं, गॅरीची कंपनी नक्की काय करते हे गौडबंगालच आहे.

रच्याकने, ती मावशी का गायब झाल्ये ? कंटाळा आलेला दिसतोय Wink

दादा मूर्ख आहे. इतका घालून पादून बोलतो बायकोला, का नाही ती अस वागनार?
स्वत काही ढेकळे काम करत नाही, हिला ऑर्डर देतो , बलीला चहा कर, नाश्ता कर.. अत्यंत नालायक आहे.

कोणाला आठवत असेल तर बँकेने आधीही एकदा लोन दिलचं होतं राधिकाला > हो हो. आणि तेव्हा एक गुप्ते भाऊन्ची बहीण आली होती. पण नंतर ती काही दिसली नाही कधी. लग्नात होती का?

रच्याकने, ती मावशी का गायब झाल्ये ? कंटाळा आलेला दिसतोय >>>>> मावशीने इथल्या प्रतीक्रिया वाचल्या असतील आणी त्या वाचुन तिला उपरती झाली असेल. Proud

च्रप्स Rofl तुम्ही फारच कठिण आहात.

खरयं, तो दादा अगदी मेषपात्र आहे. आपल्या बायकोला नुसते बोलण्यापेक्षा, तिच्या हाताला धरुन ओढत कामाला लावले असते तर बरे झाले असते. आणी आमच्या राधाक्का तर काय, उदारता, चांगुलपणा, वैराग्य, संसारीपणा यांचे बेमालुम मिश्रण असलेल्या वर्‍हाडी मसाला आहेत.

इतके लुप होल्स आहेत ना या सिरीयल मध्ये की बस!

हातात एकही ऑर्डर नसताना मोठे office थाटून बसली आहे राधक्का. आता मोठी ऑर्डर मिळाल्यावर त्या चाळीतल्या बायका त्यांच्या घरी उखळात कुटून (किंवा मिक्सर मधे) ती पुर्ण करणार तेही अगदी कमी वेळात. धन्य!!!

आज भैताड राधिका जे बोलते ते आधीच बोलून कान उपटायला पाहिजे होते गुरु शनायाचे. आम्ही स्त्रिया यंव त्यांव...अग एवढी धमक आहे तर सहन का केलंस इतके दिवस दुसऱ्या बाईला स्वतःच्या घरात...गुरु तिला बोलतो तेव्हा आसुरी आनंदाने हसत होते मी ,☺️ आणि एकदा वाटल बरोबर च बोलतोय तो...खरतर रायटर ची चूक आहे तीच पात्र अस बुजगावण्या सारखं बनवलय ते.

झीच्या सगळ्याच सिरीयल जवळपास अशाच बिनबुडाच्या आहेत. हिंदी सिरीयल च तर बोलायलाच नको. खऱ्या लाईफ मधलं काहीही कुठल्या सिरीयल मधे बघायला मिळत नाही. सगळीकडे नुसती भपकेबाजी आणि खोटी माणसं.

च्रप्स जरा शुद्ध लिहा ओ
>>> लोल.. हे असे झालाय होय..आता संपादन मारायची मुदत निघून गेली.. मी कंमेंट करुण लगेच पळलो होतो .

Pages