Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधाक्काला उखळीवर मसाला
राधाक्काला उखळीवर मसाला कांडतानाची गाणी हवीत. त्वरा करा.>>> रश्मीला appoint करा.
राधाक्का नेहमीच शन्यावर धाऊन
राधाक्का नेहमीच शन्यावर धाऊन जाते, तिचा हात धरून मुरगळायचा प्रयत्न करते. राक्षसिण कुठची!!! >>> अरे देवा! एवढा मेकओवर केला तरी हिचा मूळचा रा़क्षसीपणा जायचा नाही हिचा. आता तरी डिसेन्ट वाग म्हणाव.
वरती तुम्हाला माझी गरज लागेल हे पण त्यात आहेच. का? कशाला? >>> तिचे टेबल पुसण्यासाठी.
ते राधिका ला सारखं चणा चणा का
ते राधिका ला सारखं चणा चणा का बोललं जातंय....नाही म्हणजे दिसते ती सुजल्या सारखी किंवा जाडी पण सारखं सारखं तेच काय... एखाद्याच्या शरीरावर इतकी चिप कमेंट का करावी...
हे मा वै म
घ्यायचं तर घ्या नैतर फाट्यावर मारा
मी तर सिरीयल केव्हाच सोडली मी
मी तर सिरीयल केव्हाच सोडली मी फक्त दक्षि चे बोबड्या भाषेतील कमेंट वाचायला येते इकडे...पण बाकी कमेंट वाचून कळतंय की सिरीयल अगदीच टाकाऊ झालीय
अहो अनिसका.. इथं शनाया आणि
अहो अनिसका.. इथं शनाया आणि गरी च्या character वर कंमेंट्स चालतायत, शनाया ला चपटी म्हटलेले चालते तर फुगलेल्या धारकका ला चण्या बोललं तर काय बिघडतंय.. सूट होतंय की नाव. चणा आणि शना ☺️
मला शरीरावर कमेंट केलेली आवडत
अनिश्काचं बरोबर आहे. मला शरीरावर चीप कमेंट केलेली आवडत नाही, कोणाच्याच. ना राधिकाच्या ना शनायाच्या. ना अजून कोणाच्या. मीपण गॅरीचा चेहरा खप्पड दिसतो हे लिहीलं तेपण चुकीचंच आहे.
फुलपाखरु सीरीयल चा धागा आहे
फुलपाखरु सीरीयल चा धागा आहे का माबोवर >>> झी युवा च्या कॉमन सिरीयल्सचा आहे . एकट्या फुलपाखरूचा माहिती नाही.
हे जरा अतिच चाललंय ऑफिस घेणं
हे जरा अतिच चाललंय ऑफिस घेणं वगैरे. म्हणजे क्रोनोलोजिकल ऑर्डर मध्ये जनरली आधी स्टार्ट अप, अशी जागा जिथे मेन प्रोडक्शन इ. महत्त्वाच्या गोष्टी होतात. मग ऑर्डर मिळवणे त्या पूर्ण करून स्टाफ वाढवून व्यवसाय वाढवायचा आणि मग जम बसला, प्रॉफिट वगेरे झाला की चांगल्या पॉश जागी ऑफिस वगैरे!!
म्हणजे क्रोनोलोजिकल ऑर्डर
म्हणजे क्रोनोलोजिकल ऑर्डर मध्ये जनरली आधी स्टार्ट अप >>>>>
कायच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या
मला पण तिला चणा म्हटलेलं
मला पण तिला चणा म्हटलेलं आवडलं नव्हतं पण मी विरोध न दर्शवता स्वतः तिला कधी चणा म्हणणार नाही याची दक्षता घेतली, सेम अप्लाईज टु गुरू आणि शनाया.
अरे हापिसे की रसवंतीगृह? आँ!!
कालचा भाग म्हणजे अती म्हणजे अती होता.
राधिका एकाच दिवसात भारी ड्रेस घालून रस्त्याने चालत निघाली होती रस्त्यावरून. बनहट्टी ने पाहिले तिला आणि बोलायला गेले, राधिका ने त्याला ओळ्खले. झाले. इतक्या वर्षांनी झालेली भेट अत्यंत फुसकेपणाने सादर केली झी ने.
राधिका त्या एस बी ला हापिसात घेऊन आली आणि सगळ्यांशी ओळ्ख करून दिली ( ते ठिके) पण मग सगळे कोचावर बसून गप्पाच मारायला लागले एकमेकांशी..
तिथून उठून मग राधिका त्याला "चल केबिन मध्ये आरामात गप्पा मारू" म्हणून घेऊन गेली. मग काम कधी करणार?
अगदी पुचाट मेकओव्हर.
अगदी पुचाट मेकओव्हर.
ती सुट घालून भाजीला निघाल्यासारखी चालत होती. जरा म्हणून ग्रेस नाही.
मला पण तिला चणा म्हटलेलं
मला पण तिला चणा म्हटलेलं आवडलं नव्हतं पण मी विरोध न दर्शवता स्वतः तिला कधी चणा म्हणणार नाही याची दक्षता घेतली, >>> +१११ ईथेच नव्हे तर कुठेही मला जर काही आवडले नाही तरी मी शक्यतो गप्प बसणे पसंद करते, कशाला उगाच कोणाला नाव ठेवायचे
अरे अद्वैत आला. म्हणजे रात्रभर भिजत घातलेल्या चण्यासाठी हा वरून दाबलेला कुरमुरा. >>>> खरेतर ह्या वाक्याची चिडच आली होती
खरतर राधिकाला सुट वगेरे घालुन
खरतर राधिकाला सुट वगेरे घालुन तिचा मेकओव्हर करण्याची काहीच गरज नव्हती.
ती जे सारखी म्हणते "माझ्यासारखी एक साधी ग्रुहिणी ब्ला ब्ला ब्ला" त्याच्या अगदी विरुद्ध आहे हा मेकओव्हर. एका अर्थाने ते हेच दाखवत आहेत की यशस्वी वगेरे होण्यासाठी असा सुट घालावा लागतो. हे एका साध्या ग्रुहिणीच काम नाही. आता बायका साडी, सलवार-कमीझ वगेरे घालून काय यशस्वी होत नाहीत काय?
शनायानी परत ऑफिसमधे जाण्यासाठी नवीन कपड्यांची शॉपंग करण आणि हातात एकही ऑर्डर नसताना एवढ मोठ ऑफिस, महागड interior, सुट घालून मेकओव्हर करण ह्यात काहीही फरक नाही. दोन्ही तितकच मुर्खपणाचं आहे.
मी नताशा टोटल पोस्टला मम! एक
मी नताशा टोटल पोस्टला मम! एक न एक शब्द पटलेला आहे.
यशस्वी वगेरे होण्यासाठी असा सुट घालावा लागतो. हे एका साध्या ग्रुहिणीच काम नाही. आता बायका साडी, सलवार-कमीझ वगेरे घालून काय यशस्वी होत नाहीत काय? >> हे तर इतकं पटलं की माझ्याच मनातलं बाहेर आलं तुझ्या पोस्टीतून.
मला आपलं गुप्तेभाउ आणि
मला आपलं गुप्तेभाउ आणि रेवतीवैनी आल्या की मजा येते . ते एकच जरा बरं कपलं वाटतं आणि हल्ली समिधा आणि पंकज .
ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशी तिला किती सांभाळून सांभाळून घेत होता तो .
राधिका नानीजीं साठी शिरा घेउन येते तेन्व्हा एक्दम विद्या बालनची स्टाईल वाटली . साडी , सैलसर बांधलेले कुरळे केस .
इतक्या वर्षांनी झालेली भेट अत्यंत फुसकेपणाने सादर केली झी ने.......अरे हापिसे की रसवंतीगृह? आँ! >>> +१०००००००
एका अर्थाने ते हेच दाखवत आहेत की यशस्वी वगेरे होण्यासाठी असा सुट घालावा लागतो. हे एका साध्या ग्रुहिणीच काम नाही. आता बायका साडी, सलवार-कमीझ वगेरे घालून काय यशस्वी होत नाहीत काय? >>> प्रचंड अनुमोदन .
ती सुट घालून भाजीला निघाल्यासारखी चालत होती. >> आणि किती वेळ चालत होती ती . घरून चालतच निघालेली वाटतं .
आता बायका साडी, सलवार-कमीझ
आता बायका साडी, सलवार-कमीझ वगेरे घालून काय यशस्वी होत नाहीत काय? >> नक्कीच होतात .
पण शिरेल आहे ती . असं काहीतरी वेड बागड असायचंच
होना ! खरंच अगदी भाजीला
होना ! खरंच अगदी भाजीला निघाल्या सारखी चालत होती.. जराही कॅरी करता येत नाहीये तिला हा गेट अप!
आणि हाईट म्हणजे गुरु म्हणत होता.. केड्याला.............की राधिका किती क्यूट आणि छान दिसत होती!! ...कुणी ऐकलं नाही का हे?
इट वॉज हायलाईट ऑफ यस्टरडेज एपिसोड. !! गुरवाला तिच्यात काय इंटरेस्टींग वाट्लं कोण जाणे!
एक तो लेखक आणि बकुळा मावशी सोडून कुणाला राधक्का अगदी दृष्ट काढण्यागत वाटते ते देवच जाणे! तो सौमित्र पण म्हणे..."राधा....राधा....ओह!! मला कॉलेज मधे नाही म्हणालीस...नाहीतर आत्ता हे ऑफीस अमेरिकेत असतं आणि श्रेयस चं नाव जॉन असतं!!!"..... ही काय कुणी मिस कॉलेज क्वीन वगैरे होती की काय?
:रागः
आंबटगोड मी ऐकलं ते पण ते इतकं
आंबटगोड मी ऐकलं ते पण ते इतकं हास्यास्पद होतं की त्यावर कमेंट करावी तरि काय?
इतकी पट्टी बांधली आहे का डोळ्यांवर की त्याचा मुर्खपणा अजूनही गुरूच्या लक्षात येऊ नये?
नुसता वेष बदलल्यावर गुरू ला राधिका क्युट वाटली का? म्हणूनच बहुधा तो शनायाचा बेअकलीपणा सहज निभावून नेतोय. (चांगली दिस्त्ये स्टाईलिश आहे, झालं तर)
आणि गुरू पण काय मठ्ठ आहे तो त्याचे प्रॉब्लेम्स त्या केडी बरोबर काय शेअर करतो?
आणि शनाया हापिसात येऊन काय माज करत होती. हाऊ इम्मॅच्युअर
नताशा गुड पोस्ट.
नताशा गुड पोस्ट.
गुरु राधिकाबद्दल असंच म्हणणार हे मला अपेक्षित होतं आंगो. ती मठ्ठ मानबा टीम असंच दाखवणार, त्यामुळे माझ्या दोन दिवसापूर्वीच्या प्रतिसादात मी लिहिलं होतं तसं.
अरे sorry इथे नाही लिहिलंय मी प्रतिसादात पण कोणाबरोबर तरी w a चर्चेत लिहिलेलं.
दक्षिणा..
दक्षिणा..
मी हल्ली कधी नव्हे ते
मी हल्ली कधी नव्हे ते इंटरेस्ट ने ही सिरियल पाहत आहे.
राधिका ने सुट मधे त्या दोघांसमोर येणे, कुठली लिपस्टीक सुट होते की नाही हे शनायाला एकवणे, तिला झाडु पोछा गिफ्ट करणे आदी प्रसंग प्रोमो मधे पाहिले असल्याने उत्सुकता वाढली होती.आता तरी राधिका कॅरेक्टेरने काहीतरी लॉजिकल वागावे.गुरु ला अजिबात माफ करु नये.आनि वेळ आल्यांवर दोघांना घराबाहेर काढावे.
गुरु पायाशी आला तरी लाथाडावे
गुरु पायाशी आला तरी लाथाडावे त्याला तिने, हीच लायकी आहे त्याची. आता अजून खालच्या पातळीला जाईल तो अडथळे आणेल. ती सक्सेस झाली की पश्चाताप, मुलाला मध्ये आणेल पण नो वे. राधिकाने काही ऐकू नये. नवरा म्हणून कसा आहे त्यापेक्षा एक बाप म्हणून तो अतिशय नालायक आहे हे नक्की.
पण ती मूर्ख आहे ना. झाल्या
पण ती मूर्ख आहे ना. झाल्या प्रकारात चूक तिच्या नवऱ्याची आहे पण चिडते शना वर.
सर ते मला कुठे मान्य. मी तर
सर ते मला कुठे मान्य. मी तर सिरीयल सुरु झाली तेव्हाच झी च्या फेसबुकवर लिहून आले होते. नवरा गुन्हेगार आहे तुझा, त्याला जेल मध्ये टाक केस करून आणि divorce घे. पण असं केलं असते तर सिरीयल महिन्यात संपली असती ना
एक शनाया गेली तर दुसरीच्या पाठीमागे जाईल, तुझा नवराच दोषी आहे असंही लिहिलं होतं.
शनायाही तिला गुड for nothing
शनायाही तिला गुड for nothing सारखं म्हणते ते चूक नाही का, तिचे स्वतःचं कर्तृत्व काय आहे as a charactor.
शनायाला काहि कर्तृत्व नसणं
शनायाला काहि कर्तृत्व नसणं हेच तिचं यु एस पी आहे. कचकड्याची बेअक्क्ल बाहुली. दॅट्स इट!
समाजातल्या असंख्य स्त्रिया नवर्याची चूक पोटात घालून बाहेरच्या बाईला सर्व दोष देतात, मग राधिका त्याला अपवाद कशी काय ठरेल?
खरं आहे दक्षे.
खरं आहे दक्षे.
(No subject)
खरंतर चण्यासोबत त्या
खरंतर चण्यासोबत त्या फुटाण्याला (अद्वैत दादरकरला) लवकर आणायला पाहिजे होतं...नाहीतरी त्यांना couple च बनवतील शेवटी मग प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पहाण्याची गरजच नव्हती..बकवास अन् बिनडोक मालिका...आता परत कॉलेजात असं होतं अन् तसं होतं...दळण दळत बसतील....
यशस्वी वगेरे होण्यासाठी असा
यशस्वी वगेरे होण्यासाठी असा सुट घालावा लागतो. हे एका साध्या ग्रुहिणीच काम नाही. आता बायका साडी, सलवार-कमीझ वगेरे घालून काय यशस्वी होत नाहीत काय? >> खरे आहे. उलट मोठ्या पोस्ट वरील भारतीय बायका साडी नेसूनच असतात सहसा.
Pages