हे घडतं कसं?

Submitted by केअशु on 16 January, 2018 - 09:58

या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.

खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं.जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींचा यासाठी उपयोग केला आहे.जगाच्या कोणत्याही ठिकाणी याचा समान प्रत्यय येतो.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?>>>>>>>

असे काहीही होत नाही. कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ग्रहांवरून पाहिले असता तुलनेत पृथ्वीचे अस्तित्व एखाद्या चेंडूएवढे किंवा त्याहून लहान आहे व मानवी अस्तित्व तर शून्य आहे. त्यामुळे जो मानव शनिवरून दिसुच शकत नाही त्याला साडेसाती सुरू असताना शनी पिडतो म्हणणे हास्यास्पद आहे.

ज्योतिष कुठल्या न कुठल्या स्वरूपात जगभर अस्तित्वात आहे. याचे प्रमुख कारण मानवाला उद्या काय होणार याबद्दल वाटत असलेली उत्सुकता. आजचे तंत्रज्ञान तुम्हाला येत्या पूर्ण वर्षाचे हवामान सांगू शकते, 5000 वर्षांपूर्वी ती सोय नव्हती. त्या काळी पुढे काय होणार हे सांगणारी जी तंत्रे विकसित झाली ती सर्व आकाशात स्थिर भासणाऱ्या ग्रह ताऱ्यांची मदत घेऊन विकसित झाली. जमिनीवरचे जग सतत बदलत होते, त्या तुलनेत आकाशातले तारे स्थिर भासत होते.

ज्योतिषही असेच ग्रहताऱ्यांच्या मदतीने विकसित झाले. जन्म होताना, इतर महत्वाच्या घटना घडताना ग्रह ताऱ्यांची स्थिती काय होती यावर अभ्यास करून अंदाज बांधले गेले, जेवढा टेस्ट डेटा जास्त तेवढा अंदाज अचूक ठरत गेला. याचा अर्थ असा नाही की ग्रह तारे माणसावर परिणाम करत होते. अमुक ग्रहाचे चलन अमूक तमुक हे सगळे इथे पृथ्वीवर राहून माणसानेच ठरवले व ते ज्योतिष शास्त्रात फिट केले कारण त्याला अंदाज वर्तवायला या समिकरणांची मदत होत होती.

आजही माणसे तेच जुने ठोकताळे वापरून अंदाज बांधतात. आजही ज्याने या शास्त्राचा सखोल अभ्यास केलाय त्याचे अंदाज बरोबर येतात कारण अंदाज बांधताना जितका अभ्यास तितक्या जास्त शक्यता विचारात घेतो. बाकी शनिवरून किरणे निघून एकाच घरातल्या दोघांपैकी एकाला जखडतात व दुसऱ्याला सोडतात असे समजणे चूक आहे. ग्रहतारे तेव्हा स्थिर आहेत हे मानले गेले होते, ते स्थिर नाहीयेत हे आज आपल्याला कळतेय. तेव्हाची ग्रहस्थिती आज बदल्लीय. खरे तर त्या अनुषंगाने ज्योतिशाचा नव्याने विचार करणे गरजेचे आहे.

>>आजचे तंत्रज्ञान तुम्हाला येत्या पूर्ण वर्षाचे हवामान सांगू शकते<<

आपल्या हवामानखात्याची कामगिरी किती भरवशाची आहे हे सांगायला हवं का?

<<तेव्हाची ग्रहस्थिती आज बदल्लीय. खरे तर त्या अनुषंगाने ज्योतिशाचा नव्याने विचार करणे गरजेचे आहे.>>

हे मात्र पटलं.पण यासाठी करायचं काय?पुणे विद्यापीठात हा विषय शिकवायचं ठरलं होतं.त्याला विरोध झाला.

आपल्या हवामानखात्याची कामगिरी किती भरवशाची आहे हे सांगायला हवं का?>>>>>

मी हे एकूण वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. भारतीय हवामान खाते कुठल्या दर्जाची उपकरणे वापरते मला माहित नाही पण त्यांचे अंदाज बरेचसे बरोबर आहेत. ती जुनी स्थिती आता राहिलेली नाही.

हे मात्र पटलं.पण यासाठी करायचं काय?पुणे विद्यापीठात हा विषय शिकवायचं ठरलं होतं.त्याला विरोध झाला.>>>>>

भारतीय विद्यापीठे संमत अभ्यासक्रम शिकवतात. नवीन शोध/नवा विचार/नवा अभ्यास हे कदाचित पीएचडीचा भाग असू शकेल पण ग्रॅज्युएशन लेव्हलला नवे शोध किंवा नवे विचार मांडले जात नाहीत. बाहेरची विद्यापीठे काय करतात माहीत नाही. अशा वेळी ज्योतिष विषयक काही संस्था असतील तर त्यांनी हे संशोधन करावे.

रेडिओ वेव्ह्ज वापरून सॅटेलाइट ट्रान्समिशन करता येऊ शकतं हा शोध गेल्या १०० वर्षातच लागला. पण त्या आधीही रेडिओ वेव्ह्ज अस्तित्वात होत्याच. त्या वेव्हज चा अचूक वापर कसा करायचा हे माणसाला ठावूक नव्हतं. तसचं कोट्यावधी किलोमीटर अंतरावर असणार्‍या ग्रह तार्‍यांपासून निघणार्‍या विशिष्ट लाहरींचा माणसाच्या तब्येतीवर, मानसिक घडामोडींवर परिणाम होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा नक्की काय परीणाम होतो हे माणसाला अजून अचूक सांगता येत नाहीये. कुणी सांगावं, अजून १०००वर्षांनतर ते परीणाम अचूक सांगता येतील आणि त्या लहरी आपण नियंत्रितही करू शकू. त्यांचा वापर करून आपण माणसाचं आयुष्य सोपं किंवा आता आहे त्यापेक्षा वेगळं करू शकू.

फार छान आणि इंटरेस्टिंग धागा आहे.
अजून वाचायला आवडेल.
माझा थोडा फार का होइना पण या ग्रह तार्‍यांच्या पोझिशन वर विश्वास आहे नक्की. कारण गेल्या काही महिन्यात तसे अनुभव घेतले आहेत.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.
>>
ग्रह, नक्षत्र, तारे माणसाच्या आयुष्यात चांगले-वाईट काहीच घडवत नाहीत. माणसाला चांगले-वाईट दिवस त्याच्या कर्मामुळे येतात. जसे कर्म तसे फळ! हे फळ कधी मिळणार, कधी पक्व होऊन माणसाच्या झोळीत पडणार तो काळ ग्रह तारे दाखवतात.
जसे उन्हाळा आला म्हणजे आंबा, फणस यांचा सिझन आला, हिवाळा आला म्हणजे बोरे, आवळे यांचा सिझन आला तसेच साडेसाती आली की माणसाची वाईट कर्मे फळ द्यायला तयार झाली म्हणजे वाईट कर्माच्या फळांचा सिझन चालू झाला.
मे महिना आला आणि आंब्याचे झाड आणि आवळ्याचे झाड अगदी बाजुबाजुला असले तरी आंब्यालाच फळे लागतात, आवळ्याला नाही. त्यातही हापुस आंब्याला रसाळ फळे, रायवळी आंब्याला बिटक्या, नीट मशागत फवारणी न केलेल्या आंब्याला नासकी फळे लागतील.

तसेच शनी अमक्या राशीत आला म्हणजे सगळ्याच मानव जातीला वाईट दिवस येत नाहीत. ज्या राशीला साडेसाती असते, त्या राशीच्या सगळ्याच व्यक्तींना त्रास होतो असे नाही. त्यांच्या पुर्वकर्मानुसार फळ मिळते.

माझा थोडा फार का होइना पण या ग्रह तार्‍यांच्या पोझिशन वर विश्वास आहे नक्की. कारण गेल्या काही महिन्यात तसे अनुभव घेतले आहेत.>>>>

माझाही खूप आहे. पण बुद्धिबळात जसे हत्ती घोडे हे प्रतीक म्हणून आलेत, त्यांचे रुल सेट झालेत व त्या बेसिसवर पूर्ण खेळ खेळला जातो तसेच ज्योतिषात ग्रह तारे प्रतीक म्हणून आले, तसे रुल सेट झाले. कुणाच्या कुंडलीत काय लिहिले हे या ग्रह ताऱ्यांच्या स्थानावरून ठरवले गेले. प्रत्यक्ष ग्राहवरूनची किरणे वगैरे अर्थ हीन आहे. मेबी, मला काय म्हणायचंय ते नीट मांडता येत नाहीय

राहुल123 सहमत. कर्मफळ मिळतेच मिळते.

सर्व दहाचे दहा पॉइन्ट टोटल भंकस आहेत. वरच्या सर्व मुद्द्यांबद्दल विधिवत आकडेवारी असेल तर ज्योतिषातल्या विज्ञानाबद्दल बोला. विज्ञानाचे नाव घेऊन 'अनुभव, प्रत्यय, ९०% असे शब्द वापरुन भंपकबुवाबाजी करणे योग्य नव्हे.

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.>>>>>>

हे माझे वारंवार झालेले आहे. राग थंड झाला की उगीच बोलले असे वाटते. त्यामुळे या पॉईंटमध्ये तथ्य असावे.

सहसा, बर्याचदा, ९०% वेळा, हे आणि असे शब्दप्रयोग या पळवाटा असतात. जेव्हा ज्योतिषांचे भाकीत जुळत नाही तेव्हा ते कामी येतात‌.
रेडिओ वेव्ह्ज वापरून सॅटेलाइट ट्रान्समिशन करता येऊ शकतं हा शोध गेल्या १०० वर्षातच लागला. पण त्या आधीही रेडिओ वेव्ह्ज अस्तित्वात होत्याच. त्या वेव्हज चा अचूक वापर कसा करायचा हे माणसाला ठावूक नव्हतं. तसचं कोट्यावधी किलोमीटर अंतरावर असणार्‍या ग्रह तार्‍यांपासून निघणार्‍या विशिष्ट लाहरींचा माणसाच्या तब्येतीवर, मानसिक घडामोडींवर परिणाम होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा नक्की काय परीणाम होतो हे माणसाला अजून अचूक सांगता येत नाहीये. कुणी सांगावं, अजून १०००वर्षांनतर ते परीणाम अचूक सांगता येतील आणि त्या लहरी आपण नियंत्रितही करू शकू.>>
जेव्हा/ जर अशा लहरींचे अस्तित्व सिद्ध होईल/ झाले, तेव्हा/ तर त्या लहरींबद्दल बोलणे योग्य ठरेल

सहसा, बर्याचदा, ९०% वेळा, हे आणि असे शब्दप्रयोग या पळवाटा असतात. >> वैद्यकशास्त्रातही अश्या पळवाटा अनेकदा दिसतात. मग वैद्यकशास्त्र हे सुद्धा विज्ञान नाही असं आपणं म्हणावे का?
उदा: अमेरिकेत मुल आईच्या पोटात असतानाच मुलगा आहे कि मुलगी हे कळण्याची सोय असते. पण आपण हा प्रश्न एखाद्या डॉक्टरला विचारला तर ते आवश्यक त्या सर्व चाचण्या झाल्यानंतरही असच उत्तर देतातः ९०% चान्सेस आहेत की तुम्हाला मुलगी होईल (किंवा मुलगा होईल.)

पहिलाच मुद्या माझ्यासाठी तरी न पटण्यासारखा आहे..

मला एक जुळा भाऊ आहे..आमच्या दोघांचीही रास धनु आहे..

आम्ही जुळे जरी असलो तरी आमच्यात काहीच साम्य नाहीये..

आणि हो माझा भाऊ माझ्यापेक्षा उंचीने कमी आहे 5.3 आणि शरीरानेही बारीक आहे.. वरील मुद्यानुसार माझी उंची जरी बर्यापैकी (5.7) आणि मी दणकट जरी असलो तरी एकाच राशीचा माझा भाऊ तसा नाहीये...

त्यामुळेच हा मुद्दा मला तरी पटण्यासारखा नाहीये..

९०% चान्सेस आहेत की तुम्हाला मुलगी होईल (किंवा मुलगा होईल.)>> मी डॉक्टर नाही आणि अमेरिकेत रहात नाही, त्यामुळे या विशिष्ट उदाहरणाबद्दल मला काही माहिती नाही. पण १०% वेळा भाकीत नक्की का चुकतं याचं शास्त्रीय स्पष्टीकरण जर वैद्यकशास्त्रात असेल तर ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरते.

मुलगा की मुलगी हे गर्भजळात कोणते हार्मोन्स आहेत यावरून ठरते की डॉक्टरला डोळ्यांनी काय दिसते त्यावर ठरते? डोळ्यांनी काय दिसते त्यावर ठरत असेल तर त्यावेळच्या इमेजिंग मध्ये काय दिसले, इमेजिंग केले तेव्हा बाळाची आतली पोजिशन काय होती, त्यामुळे क्लरिटी किती मिळाली यावर निर्णय ठरत असणार. लोक बाळाचे नावसुद्धा आधीच ठरवतात म्हणजे बरेच अंदाज बरोबर येत असणार. यात अंदाज चुकण्याचे प्रसंग केवळ मनुष्य किंवा मशीनची चूक यामुळे येत असणार.

ज्योतिष व वैद्यक यांची तुलना होऊ शकते व शकतही नाही.

शकते यासाठी की एखादा अडाणी पोटार्थी डॉक्टर किंवा निष्णात डॉक्टर चुकीचे निदान करू शकतो. एखादा अडाणी पोटार्थी ज्योतिषी किंवा निष्णात ज्योतिषी असेच चुकीचे अंदाज वर्तवू शकतो. दोघांचाही त्यावेळेस अभ्यास कमी पडला असे आपण म्हणू शकतो.

पण डॉक्टरी निदान चुकीचे कसे याची पूर्ण चिकित्सा होऊ शकते कारण डॉक्टर जरी अभ्यासात कमी पडला तरी तो मूळ अभ्यास उपलब्ध आहे. त्याच्या रेफेरेन्सने दुसरा डॉक्टर काय चुकले हे सांगू शकतो.

ज्योतिषशास्त्रात ह्या प्रकारचे पूर्ण ज्ञान देणारे ग्रंथ आता अस्तित्वात आहेत का याबद्दल शंका आहे. ते आधी होते व हे शास्त्र आज आहे त्यापेकशा जास्त प्रगत होते याबद्दल मला अजिबात शंका नाही. कालौघात आपण बऱ्याच गोष्टी नष्ट होऊ दिल्या, नष्ट झाल्या. आयुर्वेद व ज्योतिष या त्यापैकी आहेत. योग सुद्धा नष्ट होता होता वाचला, आयुर्वेदाचेही थोडेफार पुनः रूज्जीवन झाले. या सगळ्याचे बरेचसे श्रेय मूळ भारतीय नसलेल्या अभ्यासकांना आहे. भारतीयांना स्वतःच्या वारशाची काहीही किंमत नाही.

ज्योतिषशास्त्रात ह्या प्रकारचे पूर्ण ज्ञान देणारे ग्रंथ आता अस्तित्वात आहेत का याबद्दल शंका आहे. ते आधी होते व हे शास्त्र आज आहे त्यापेकशा जास्त प्रगत होते याबद्दल मला अजिबात शंका नाही. कालौघात आपण बऱ्याच गोष्टी नष्ट होऊ दिल्या, नष्ट झाल्या. आयुर्वेद व ज्योतिष या त्यापैकी आहेत. योग सुद्धा नष्ट होता होता वाचला, आयुर्वेदाचेही थोडेफार पुनः रूज्जीवन झाले. या सगळ्याचे बरेचसे श्रेय मूळ भारतीय नसलेल्या अभ्यासकांना आहे. भारतीयांना स्वतःच्या वारशाची काहीही किंमत नाही. >> हे मला पटलं. त्यामुळेच पुणे विद्यापीठात ज्योतिषविषयक अभ्यासक्रम सुरू व्हावा असं मलाही वाटत होतं. माझं इतकच म्हणण आहे की ज्योतिष हे सुद्धा शास्त्र असू शकतं (आयुर्वेद किंवा योगा सारखं). पण त्याचा सखोल अभ्यास झाल्यावरच आपण ठाम पणे ते शास्त्र आहे का नाही हे सांगू शकू. ते जर आपण केल नाही तर आपला हाही वारसा आपण गमावून बसू.

सोहा, अभ्यास व्हायला हवा याबाबत सहमत. पण विद्यापीठ लेव्हलला गांभीर्याने एखाद्या गोष्टीचा अभ्यास होऊ शकतो यावर माझा फारसा विश्वास उरलेला नाही. मुंबई विद्यापीठाचा भयाण अनुभव मिळतोय सध्या. शिकणारे व शिकवणारे दोन्ही पक्ष सारखेच अनुत्सुक आहेत.

ज्यांना या विषयात गती आहे, काही जुनेपुराने ग्रंथ अजूनही शिल्लक असलेले हाती आहेत असे लोक काही करू शकतील. त्यांना उत्तेजन कोण देणार हा प्रश्न आहेच.

काहीतरी नवे अवश्य निघेल यातून. -> हो ना, पण ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या कुणीतरी ह्या "भविष्या"बद्दल भाकीत का व्यक्त करत नाही हा मला प्रश्न पडलाय.

<<भारतीय विद्यापीठे संमत अभ्यासक्रम शिकवतात. नवीन शोध/नवा विचार/नवा अभ्यास हे कदाचित पीएचडीचा भाग असू शकेल पण ग्रॅज्युएशन लेव्हलला नवे शोध किंवा नवे विचार मांडले जात नाहीत. अशा वेळी ज्योतिष विषयक काही संस्था असतील तर त्यांनी हे संशोधन करावे.>>

एखाद्या ज्योतिषविषयक संस्थेने केलेल्या संशोधनाला शासनमान्यता किंवा सर्वमान्यता मिळेल का?

मेघपाल,
<<सर्व दहाचे दहा पॉइन्ट टोटल भंकस आहेत. वरच्या सर्व मुद्द्यांबद्दल विधिवत आकडेवारी असेल तर ज्योतिषातल्या विज्ञानाबद्दल बोला. विज्ञानाचे नाव घेऊन 'अनुभव, प्रत्यय, ९०% असे शब्द वापरुन भंपकबुवाबाजी करणे योग्य नव्हे.>>

ज्योतिषशास्त्रामागचं विज्ञान शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न! मग यात भंपकबुवाबाजी कुठं आली बरं? शिवाय हे मुद्दे तुम्हाला पटत नाहीत म्हणून सर्वांनी अमान्य करायचे का?

हे मुद्दे भंकस असल्याचं तुम्ही आकडेवारी देऊन सिध्द करा.

मला एक जुळा भाऊ आहे..आमच्या दोघांचीही रास धनु आहे..

आम्ही जुळे जरी असलो तरी आमच्यात काहीच साम्य नाहीये..

आणि हो माझा भाऊ माझ्यापेक्षा उंचीने कमी आहे 5.3 आणि शरीरानेही बारीक आहे.. वरील मुद्यानुसार माझी उंची जरी बर्यापैकी (5.7) आणि मी दणकट जरी असलो तरी एकाच राशीचा माझा भाऊ तसा नाहीये...

त्यामुळेच हा मुद्दा मला तरी पटण्यासारखा नाहीये..

अजय चव्हाण,
या साठीच ९०% वेळा म्हटलं आहे.तुमचा भाऊ १०% मधे येत नसेल का? या अपवादांवरही संशोधन व्हायला हवं हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय.

जुळ्या मुलांमधे एक मुल सुदृढ आणि दुसरं तुलनेने किरकोळ असू शकतं.दुसरं असं की जुळ्या मुलांचं भविष्य सातखं का नसतं या विचारातूनच कृष्णमुर्ती ज्योतिष पध्दतीचा शोध लागला.याचाच अर्थ यातही संशोधन होतं आहे.

दोन्ही भावांमधे तुम्ही उंच आणि सुदृढ आहात याचाच अर्थ मी मांडलेल्या मुद्द्यात तथ्य आहे हे सिध्द होत नाहीये का?

तुमची हरकत नसेल तर तुमची आणि तुमच्या जुळ्या भावाची जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींची माहिती विपुमधे देऊ शकाल का? अभ्यासासाठी चांगली मदत मिळेल.

सर्वांसाठी,

ग्रहांवरुन किरणे निघत नसतीलही.लहरी,तरंग असं काहीतरी असेल. किंवा इतर काही माध्यम असेल.माध्यमाशिवाय तर काही घडणार नाही.तेच माध्यम काय असेल हा विचार मांडलाय.त्यावर संशोधन,चर्चा व्हायला हव्यात. कारण ज्योतिषशास्त्रात इनपुट(ग्रह,नक्षत्रे)आणि आऊटपुट (भाकित) याबद्दल लेखन आहे.पण हे घडतं कसं याबद्दल नाहीये.तेच शोधायचंय.

नागरत्ना हेगडे या केंब्रिज विद्यापीठात थिओस्ट्रेफ्टॉनवर संशोधन करणाऱ्या भारतीय संशोधिका. नागरत्ना यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा कर्करोग पसरण्याला आळा घालण्यावर झाला आहे. कर्नाटक राज्यातल्या छोट्याशा गावातून केंब्रिजपर्यंत गाठलेली वेगळी वाट ज्योतिषशास्त्रामुळे वेगवान झाली.त्यांचे पती ज्योतिषी आहेत.त्यांची ही मुलाखत.

केंब्रिजमध्ये तुम्ही थिओस्ट्रेफ्टॉनवर काम करायचं ठरवलं त्याचं कारण काय होतं? तुमच्या पतीने दिलेल्या ज्योतिषविषयक सल्ल्याचाच तो परिणाम होता का?

केंब्रिजमधल्या सुरुवातीच्या नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर माझ्या गाइडने मला एक संशोधन प्रोजेक्‍ट दिला, पण तो विषय मला अगदीच सामान्य वाटला. म्हणून मी जास्त आव्हानात्मक अशा कामाची मागणी केली. शेवटी त्यांनी मलाच नवीन विषय काढण्यासाठी सुचवलं. म्हणून पुढचा आठवडाभर मी नवीन शक्‍यतांची चाचपणी केली आणि तीन नवीन विषय काढले. त्यातला एक थिओस्ट्रेफ्टॉन हा होता. या तीन विषयांमधला एक विषय निश्‍चित करण्यासाठी मी माझ्या पतीकडून ज्योतिषविषयक मार्गदर्शन घेतलं आणि नंतर त्यात इतरही कारणांची भर पडली. त्यात सगळ्यात प्राथमिक कारण होतं, की थिओस्ट्रेफ्टॉनमधल्या अँटी-कॅन्सर प्रॉपर्टीजवर एक लेख आला होता, पण ते कसं काम करतं याचं मेकॅनिझम माहीत नव्हतं. त्यावर अनेक संशोधनं झाली होती, पण तरीही काही निष्कर्ष मिळाला नव्हता. त्याचमुळे मला हा पर्याय खूप आव्हानात्मक वाटला. एक तर तो प्रश्‍न अजून अनुत्तरित होता आणि त्यात एक आशाही होती. हाच पर्याय निश्‍चित करून तो मी माझ्या गाइडसमोर ठेवला, पण त्यांनी तो विद्यार्थ्यांसाठीच्या दोन-तीन वर्षांसाठीचा विषय नसून सीझन्ड सायंटिस्ट्‌सचा पंधरा वर्षांसाठीचा विषय आहे, असं म्हणून नाकारला. पण मी माझ्या मागणीवर काहीशी ठाम राहिले आणि या प्रक्रियेत मला मिळालेल्या ज्योतिषविषयक सल्ल्याचाही उल्लेख केला. आणि शेवटी मला परवानगी मिळाली. पण माझ्या गाइडने मला तीन महिन्यांचा एक प्रायोगिक काळ दिला, ज्यात मिळालेल्या रिझल्ट्‌सवरून याच विषयात पुढे जायचं की नाही ते ठरवायचं होतं. तीन महिन्यांनंतर आलेल्या रिझल्ट्‌सवर गाइड बरेच समाधानी झाले आणि नंतर त्यांनी तो विषय फक्त निश्‍चितच केला नाही तर त्याच्यात मला पूर्ण सहकार्य दिलं.

*_तुम्ही केलेल्या संशोधनाचा जगासाठी नेमका कोणता उपयोग आहे?_*

फॉक्‍स एम1 हे गुणसूत्र कर्करोगासाठी, विशेषतः स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतं, हे आधीपासून निश्‍चित झालं होतं. हे गुणसूत्र स्तनांचा कर्करोग असलेल्यांमध्ये मुबलक असतं आणि कर्करोगाच्या पेशींचा प्रसार करण्यासाठी ते कारणीभूत होतं. माझ्या संशोधनाने सिद्ध केलं, की थिओस्ट्रेफ्टॉन हे या गुणसूत्राशी थेट जोडलं जातं आणि त्याच्या कार्याला प्रतिबंध करतं. त्यामुळे अर्थातच कर्करोग शरीरात पसरायला आळा बसतो आणि ते इतर उपचारांसाठी फायदेशीर ठरतं. आता थिओस्ट्रेफ्टॉनच्या मॉलिक्‍युलर स्ट्रक्‍चरवर आधारलेलं वॉटर सोल्युबल डेरिव्हेटिव्ह शोधणं हे औषधनिर्मितीसाठी करावं लागेल. स्तनांच्या कर्करोगाच्या पेशंट्‌ससाठी ते उपयुक्त ठरेल.

*_तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्‍वास ठेवता. तुमचे पती ज्योतिषी आहेत. विज्ञान आणि ज्योतिष या दोन्ही विषयांना तुम्ही एकत्रितपणे कसं मानता? ही एक प्रकारची विसंगती वाटत नाही का?_*

ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्‍वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही विसंगती वाटते, कारण लोकांमध्ये ज्योतिषशास्त्राविषयीची गोंधळलेली समजूत आहे. ज्योतिषशास्त्र आणि ऍलोपॅथी किंवा आयुर्वेदासारख्या क्षेत्रातला फरक सांगायचा, तर ऍलोपॅथी इ. क्षेत्रांबद्दल सामान्य माणसाच्या पातळीवरचं ज्ञान हे लोकांना असतं. त्यामुळे दवाखाना आणि डॉक्‍टर्सकडून काय अपेक्षा ठेवाव्या आणि त्यांच्या सेवा कशा वापराव्या हे ते समजू शकतात. पण ज्योतिषशास्त्राबद्दल हे सामान्य पातळीवरचं ज्ञान लोकांमध्ये जवळजवळ शून्य आहे. हा ज्ञानाचा अभावच लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतो. त्यामुळे लोक एक तर आंधळेपणाने त्यावर विश्‍वास ठेवतात किंवा ते पूर्ण नाकारतात. हे शास्त्र विज्ञानावरच आधारलेलं असूनही त्याबद्दल गोंधळ असण्याचं ते कारण आहे. काही प्रमाणात त्याबद्दल सामान्य ज्ञान असेल तर हा गोंधळ दूर होऊ शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्या शास्त्राचा अर्थ लावण्याची वस्तुनिष्ठ पद्धत विकसित करू शकतो. हे शास्त्र कसं काम करतं व ते कधी, कुठे आणि किती प्रमाणात लागू करायचं हे त्यामुळे समजू शकतं. वैज्ञानिक संशोधनात अनेकदा समोर अनेक मार्ग असतात आणि त्यातला एक पर्याय आपल्या अंदाजाआधारे निवडला जातो. तो मार्ग बरोबर आहे की नाही हे प्रयोगाअंती सिद्ध होतं. अशा वेळी ज्योतिषशास्त्राचा हुशारीने उपयोग केला तर फायदा होऊ शकतो. माझ्या संशोधनाविषयी नेमकेपणाने सांगायचं तर थिओस्ट्रेफ्टॉन हे कुठे जोडलं जातं हे शोधण्यासाठी बरेच प्रयोग करावे लागले असते. एका यशस्वी प्रयोगासाठी अनेक अयशस्वी प्रयोग त्यात करावे लागले असते. त्यामुळेच तो पंधरा वर्षांचा प्रोजेक्‍ट मानला जात होता. इथेच आम्ही ज्योतिषशास्त्राचा उपयोग केला. या अयशस्वी प्रयोगांची संख्या त्यामुळे कमी होऊन हे संशोधन आधीपेक्षा सात ते आठ पटींच्या वेगात पुढे गेलं. त्यामुळे आम्ही शेवटच्या निष्कर्षापर्यंत नुसते पोचलो असंच नाही तर खूप वेगाने पोचलो. या वेगाने अनेकजण आश्‍चर्यचकित झाले.

<हे मुद्दे भंकस असल्याचं तुम्ही आकडेवारी देऊन सिध्द करा>

अहो मुळात ते मुद्दे सत्य आहेत, हे तुम्ही सिद्ध केलंय का? की आपण काहीही प्रतिपादन करायचं आणि विरोधकांनी ते चुकीचं आहे हे सिद्ध करा, असं आव्हान फेकायचं याला तुमच्यात विज्ञान म्हणतात?

तुमच्या बर्‍याच वाक्यांत "असेल" असा प्रयोग आहे. विज्ञानात "आहे" असा असतो.

एखादी गोष्ट नियमात बसत नसेल, तर तो नियम चुकीचा आहे, हे मान्य केलं जातं. ती गोष्ट नियमात बसवायचा आटापिटा केला जात नाही.

माझीही रास धनू आहे आणि माझी उंची आणि चण दोन्ही बेताचेच आहेत.

धन्यवाद भरत.

केअशु. तुम्ही शाळेत शिकलात की पाठशाळेत? विज्ञान कशाशी खातात माहित आहे का? वरच्या दहा मुद्द्यांवर काय संशोधन झाले आहे? पीअररिव्ह्युड जर्नल्समध्ये ते छापून आलं का? एखाद्याच्या बिनबुडाच्या धारणा म्हणजे विज्ञान नसते. आपल्या विधानांना सिद्ध करायची जबाबदारी आपलीच असते.

तुमचे दहा मुद्दे म्हणजे मानवाला पण दोन डोळे असतात, घोड्याला पण दोन डोळे असतात म्हणून मानव व घोडा हा एकच प्राणीप्रकार आहे असे मानण्यासारखे आहे याला शुद्ध भाषेत बावळटपणा म्हणतात.

<<तुम्ही शाळेत शिकलात की पाठशाळेत?>> यातूनच तुमचा दृष्टीकोन समजला.धन्यवाद!

<<पीअररिव्ह्युड जर्नल्समध्ये ते छापून आलं का?>>
यात छापून अालं तरच ते खरं ठरणार का? हे म्हणजे एखाद्या नटाला अॉस्कर मिळालं तरच तो चांगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

रच्याकने, धागा नीट वाचला असतात तर समजलं असतं की धागा संशोधन व्हावं याच उद्देशानं काढला आहे.त्यासाठी पूर्वग्रह असू नयेत असंही लिहिलंय. तरीही हे थोतांडच आहे. अमुकतमुक जर्नलमधे संशोधन आलेलं नाही म्हणजे खोटं याच गृहितकावर अडून आकांडतांडव करणं योग्य वाटलं नाही.
थोतांडच आहे असं ठाम वाटत असेल तर वाटू द्या. तुम्हाला वाटलं ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि पुढचा संवाद होता कामा नये असं थोडंच आहे?

चालुद्या भंकस. बिनबुडाचा लोट्यागत लुडकनं.... अपनी व्यक्तीगत धारणाओंको विग्यान समझनेवाले मूर्ख इस भारत में अब तेजीसे बढ रहे है.

केअशु पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष? हा प्रयोग करायचा असल्यास त्यातील तर्क सुसंगतता तपासता येईल. फलज्योतिष हा विषय नेहमीच वादग्रस्त राहणार आहे. आपण माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्नोत्तरातून सुसंवाद जरुर वाचु शकता.

प्रकाश घाटपांडे,
मी आपले पुस्तक वाचले आहे.मी सदर विषय संशोधन व्हावं याच उद्देशानं आणला आहे.पण थोतांड आहे असं म्हणून यावर संशोधनंच होऊच द्यायचं नाही हा कुठला न्याय? माझा यालाच आक्षेप आहे.

Pages