हे घडतं कसं?

Submitted by केअशु on 16 January, 2018 - 09:58

या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.

खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं.जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींचा यासाठी उपयोग केला आहे.जगाच्या कोणत्याही ठिकाणी याचा समान प्रत्यय येतो.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

संशोधन करा की. कोणी हात धरलेत तुमचे?
तसं तर कोपर्निकस , ग्यालिलिओपासून अनेकांनी रोष सहन केला. तुम्ही करा संशोधन आणि त्याचे निष्कर्ष तोंडावर फेकून मारा विरोधकांच्या.

संशोधनाची आपली कळकळ मी समजू शकतो. मी ही त्या फेज मधून एके काळी गेलेलो आहे. पुस्तकातील संशोधना बाबत असलेला ६२ नं चा प्रश्न मी इथे उधृत करतो
६२) परदेशातील फलज्योतिष संशोधनावरची उदाहरणे नेहमी उगाळली जातात मग आपल्याकडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?

संशोधनासाठी लागणारा पैसा हा सहजपणे उपलब्ध होत नाही. माहिती संकलन वा संपादन हा मूलभूत संशोधनासाठी आवश्यक असणारी बाब आपल्याकडे अपवादाने आढळते. अशासकीय संस्थांकडून सर्वेक्षण उपलब्ध करुन मग त्यावर संशोधन हा उपाय आहे पण मूळ प्रश्न असा की संशोधन कशासाठी? कुणासाठी? आणि करणार कोण? फलज्योतिष समर्थक म्हणतात हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जर संशोधन असेल तर त्याची आम्हाला गरज नाही. बहुसंख्य लोकांचा विश्वास, श्रद्धा व अनुभव हीच आमची सिद्धता. विरोधक म्हणतात कि जे शास्त्रच नाही त्यावर संशोधन करण्यात वेळ, श्रम व पैसा घालण्याची काय गरज आहे? फलज्योतिष हे शास्त्र आहे असे म्हणणाऱ्यांची आपले विधान सिद्ध करण्यासाठी संशोधन करणे ही जबाबदारी ठरते.
वि.म. दांडेकरांनी जेव्हा हा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विश्वासार्ह डाटा मिळण्यात सुद्धा अडचणी आल्या. फलज्योतिषावरील संशोधन करण्यासाठी जन्मवेळ, जन्मतारीख व जन्मठिकाण हा महत्वाचा डाटा आहे. तो विश्वासार्ह मिळण्यासाठी हॉस्पिटल मधील बिनचूक नोंदणी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे कुटुंबात सुद्धा व्यक्तिची ही माहिती बिनचूक असेल अशी खात्री नसते. समजा हा डाटा मिळाला तरी ग्रहयोग व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध ही बाब तपासण्यासाठी कुठले मॉडेल सॅम्पल म्हणून निवडावे ? या विषयी एकवाक्यता नाही. चिकित्सक बुद्धीच्या विवेकवादी लोकांना असे वाटते की जर हे शास्त्र इतके लोकप्रिय आहे तर त्याच्यात खरोखरी काही तथ्य आहे की नाही ते आपणच तपासून पाहिले पाहिजे. ते तपासून पहाण्यासाठी त्यांच्यापुढे काही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे या शास्त्राचा मुळापासून चिकित्सकपणे अभ्यास करुन त्यात काही तथ्य असू शकेल का ते ठरवायचे. हा मार्ग आम्ही निवडला व या शास्त्रात वैज्ञानिक दृष्टया तथ्य असणे का अशक्य आहे ते अन्यत्र दाखवून दिले आहे. दुसरा मार्ग असा की एखादे समान लक्षण असलेल्या शेकडो माणसांच्या कुंडल्या जमवायच्या आणि त्या कुंडल्यात काही समान ग्रहस्थिती आढळते का व ती किती प्रमाणात आढळते ते पहायचे, किंवा असे करायचे की एकाच प्रकारची ग्रहस्थिती असलेल्या पुष्कळ कुंडल्या घेउन त्या कुंडल्यांच्या माणसांत काही समान लक्षणे आढळतात का व ती किती प्रमाणात आढळतात ते पहायचे, व त्यावरुन हे शास्त्रातील तथ्य ठरवायचे. तिसरा मार्ग असा की घडून गेलेल्या निसंदिग्ध घटना व त्याचा काळ यापैकी एकच माहिती ज्योतिषांना पुरवायची व उर्वरित दुसरी माहिती ज्योतिषांनी वर्तवायची हा प्रयोग करणे. एखादा निष्कर्ष हा जेव्हा आपल्याला प्रतिकूल ठरतो त्यावेळी डाटा पुरेसा नव्हता अथवा विश्वासार्ह नव्हता. असे म्हणण्याची सोय आहे. अशा प्रकारचे संशोधन पाश्चात्य देशात मुबलक प्रमाणावर झालेले आहे. त्याचे निष्कर्ष बहुतांशी या शास्त्राला प्रतिकूल असेच निघाले आहेत. पण त्यांचा विशेषसा परिणाम सामान्य लोकांवर झालेला दिसत नाही. अशा संशोधनात ज्योतिष्यांची मदत घ्यावी लागते. आपल्याकडचे ज्योतिषी अशी मदत करण्यास कधीच पुढे येणार नाहीत. हात दाखवून अवलक्षण कोण करुन घेईल ?
आपल्याकडे यूजीसीने विद्यापीठात फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याच्या अगोदर या विषयात काही तथ्य आहे काय? हे तपासण्यासाठी जर एखाद्या विद्यापीठास पायलट प्रोजेक्ट म्हणून संशोधन करण्यास अनुदान दिले असते तर ते अधिक उचित ठरले असते.

घाटपांडे, चांगली पोस्ट. मलाही असे वाटते की जिथे संदिग्धता आहे व ज्याचा लोकहितासाठी थेट उपयोग होणार नाही अशा बाबीत सरकारी पैसा, जो आपल्या सर्वांचा आहे, वाया घालवू नये.

त्याचवेळी ज्यांनी आजवर भरपूर कुंडल्या पाहिल्यात, निष्कर्ष काढलेत त्यांनी डेटाबेस बनवायला सुरवात करावी, आपापले निष्कर्ष समअभ्यासकात चर्चेला आणावेत. जो डेटाबेस तयार होईल त्यातली नावे गाळून टाकून बाकी डेटाबेस सर्व अभ्यासकांसाठी खुला करावा. हे लहान प्रमाणात करायला फारसा पैसा लागणार नाही. रिझल्ट यायला लागले तर फंडिंगही मिळू शकेल. पण कुणी सुरवात तर करायला हवी ना?

हे वर लिहिलेय ते ज्योतिष अभ्यासकांनी स्वतः साठी आधी करावे. त्यांनी जातकांना जे सांगितले त्याचा बेस काय होता हे लिहून ठेवावे, जातकाकडून वेळोवेळी फीडबॅक घेत रहावा म्हणजे काय चुकले ते कळेल, का चुकले याचे अंदाज बांधता येतील, ज्यांचा अभ्यास जास्त आहे त्यांच्याकडून ते अंदाज तपासून घेता येतील. स्वतःच्या अभ्यासातल्या त्रुटी दूर करता येतील.

केअशु, तुम्ही स्वतः ज्योतिषी असाल तर तुम्ही स्वतः हे सुरू करू शकता, तुमच्या ओळखीतल्या ज्योतिषांशी बोलून डेटाबेस वाढवू शकता.

इथे मायबोलीवर चर्चा करून हे थोतांड आहे की कसे हे कसे ठरणार? त्याचा प्रेस्टीज इशू होऊन दोन्ही बाजूने चिखलफेकीशीवाय काहीही निष्पन्न होणार नाही. याआधी या विषयावर इथे भरपूर काथ्याकूट झालाय, लोक आता कंटाळलेत.

त्यापेक्षा असे डेटाबेस तयार करून त्याचे निष्कर्ष प्रकाशित करत राहा. वर लिहिलेत तसे लिहिले तर ज्यांना लागू पडणार नाही ते लोक विरोध करत राहणारच. इथल्या चर्चेने काहीही होणार नाही. जे कराल ते विरोधकांना खोटे ठरवण्यासाठी करू नका तर हे शास्त्र कितपत खरे खोटे हे परत परत स्वतःला कळावे या साठी करा.

मी स्वतः कित्येक बाबीत ज्योतिष सल्ला घेतलेला आहे. जिथे बरोबर निघाले तिथे 'चांगला ज्योतिषी' व जे चुकले तिथे 'माझें नशीबच खोटे' हे मला स्वतःला पटत नाही. खोटे नशिब पत्रिकेत का नाही दिसले? लॉजीकली दिसायला हवेच होते. म्हणजे एकतर वाचणारा खोटा किंवा पत्रिकच खोटी. माझा जन्म भारताच्या स्वातंत्र्यदिनी झाला असल्याने आईबाबा तारखेच्या बाबतीत चुकलेले नाहीत व हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लीपवर स्वतः डॉक्टरने वेळ लिहिलेली असल्याने वेळही अजिबात चुकलेली नाही. असे असतानाही निष्कर्ष का चुकावेत? जे चुकले त्याचे विश्लेषण मला मिळायला हवे ना? नशीब ही कल्पना का मान्य नाही हे वर लिहिलेय.

घाटपांडेजी,

मी स्वत: चिकित्सक या प्रकारातलाच ज्योतिष अभ्यासक आहे.ज्योतिषशास्त्राचा थोडाफार प्रत्यय आला म्हणूनच याचा अभ्यास करु लागलो.पण तो आंधळेपणानं नाही.
१) निर्वैय्यक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता या तीन निकषांमधेच बसणारे ज्योतिषशास्त्रातले नियम शोधण्याचा माझा प्रयत्न असतो.इतर ज्योतिषांनी किंवा ज्योतिषशास्त्रविषयक पुस्तकांत दिलं म्हणून मी ते लगेच मान्य करत नाही.वरील तीन कसोट्यांमधे पारित झालेले निकषच मी वापरतो.वरील ठोकताळे मांडण्यापूर्वी मी स्वत: निरीक्षण केलं आहे.त्याचे जे अपवाद असतील ते सुध्दा नीट तपासून घेतले आहेत.वरील प्रत्येक ठोकताळ्याच्या मांडणीपूर्वी मी सरासरी ३० विविध जाती-धर्म,आर्थिक स्थिती असमान असणार्‍या,शहर,खेडेगावात राहणार्‍या व्यक्तींची(स्त्री-पुरुष दोन्ही) निरीक्षणे केली आहेत.निरीक्षणापूर्वी त्यांच्या त्यांनी दिलेल्या जन्मठिकाण,जन्मतारीख,जन्मवेळ या डेट्याचा वापर करुन,पत्रिका बनवून खातरजमा करुन घेतली आहे.

आता यावर ज्योतिष विरोधकांचा लगेच आक्षेप येऊ शकतो की जगाची लोकसंख्या साधारण ८ अब्ज धरली तरी ३० जणांचं निरीक्षण हे म्हणजे १% सुध्दा होत नाही.मी तर याही पुढे जाऊन म्हणतो की ज्योतिष हे जर थोतांड असेल तर यातला एकही ठोकताळा अज्जिबात बरोबर येता कामा नये. ३० पर्यंत पोचावंच लागता कामा नये.सपशेल चुकायला हवं.पण मला निरीक्षणाअंती तसं काही आढळलं नाही.मिळणार्‍या निष्कर्षांमधे बर्‍यापैकी सातत्य येत गेलंय.हे का यावं?शिवाय जसजशी पत्रिकांची संख्या वाढत जात आहे तसंतसे या सातत्य संख्येत वाढच होत आहे.

मी आध्यात्म मानत नाही.त्यामुळे पूर्वजन्म वगैरे गोष्टी मला पटत नाहीत.बरेचसे तज्ञ ज्योतिषीसुध्दा जातकाला येणार्‍या अडचणींसाठी त्या जातकाच्या मागच्या जन्मातील पाप,दुष्कृत्यांना जबाबदार धरतात.हे सुध्दा पटत नाही.कारण पूर्वजन्माचा प्रत्यय सार्वत्रिक नाही.निर्वैय्यक्तिक नाही.अगदी थोडे सँपल्स वापरुन जरी निरीक्षण करायला गेलं तरीही सातत्य आढळत नाही.यामुळेच पूर्वजन्मातील पातक दूर करण्याच्या दृष्टीने सुचविलेल्या धार्मिक उपायांना मी मानत नाही.
अर्थात हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.उद्या पंचेद्रियांना जाणवणारे,वरील तीन कसोट्यांमधे बसणारे पुरेसे निष्कर्ष मिळाले तर पूर्वजन्म मान्य करण्यासही माझी हरकत नाही.तितका लवचिकपणाही ठेवला आहे.

साधना,

<<त्यापेक्षा असे डेटाबेस तयार करून त्याचे निष्कर्ष प्रकाशित करत राहा. वर लिहिलेत तसे लिहिले तर ज्यांना लागू पडणार नाही ते लोक विरोध करत राहणारच.>>

हे कशावरुन? मी वर म्हटल्याप्रमाणे यावरही ज्योतिष विरोधकांचा लगेच आक्षेप येऊ शकतो.जगाची लोकसंख्या साधारण ८ अब्ज धरली आणि १२ राशींमधे विभागली तरी एकाच राशीच्या ६५० कोटी पत्रिकांचा,किमान ५०० कोटी पत्रिकांचा अभ्यास करुन तुम्ही हा डाटाबेस तयार केलाय का? नसेल तर तुमचं शास्त्र खोटं,तुम्हीही खोटे असे आरोप होणार नाहीत कशावरुन?

<<<मी स्वतः कित्येक बाबीत ज्योतिष सल्ला घेतलेला आहे. जिथे बरोबर निघाले तिथे 'चांगला ज्योतिषी' व जे चुकले तिथे 'माझें नशीबच खोटे' हे मला स्वतःला पटत नाही. खोटे नशिब पत्रिकेत का नाही दिसले? लॉजीकली दिसायला हवेच होते. म्हणजे एकतर वाचणारा खोटा किंवा पत्रिकच खोटी. माझा जन्म भारताच्या स्वातंत्र्यदिनी झाला असल्याने आईबाबा तारखेच्या बाबतीत चुकलेले नाहीत व हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लीपवर स्वतः डॉक्टरने वेळ लिहिलेली असल्याने वेळही अजिबात चुकलेली नाही. असे असतानाही निष्कर्ष का चुकावेत? जे चुकले त्याचे विश्लेषण मला मिळायला हवे ना? नशीब ही कल्पना का मान्य नाही हे वर लिहिलेय.>>>

माझंही हॉस्पिटलने दिलेलं जन्म रेकॉर्ड आहे.मी सुध्दा माझ्या बाबतीत नामांकित ज्योतिषांचा सल्ला घेतला आहे.यात काही जण चुकले,काहीजणांचे थोडे बरोबरही आले.हे होऊ शकतं.ज्योतिषी हा सुध्दा माणूस आहे. प्रत्येक ज्योतिषाचा अभ्यास,भाकितासाठी वापरली जाणारी पध्दत,साधने,पत्रिका पाहतानाची मनस्थिती अशा बर्‍याच गोष्टींमुळे भाकित पूर्णपणे किंवा काही प्रमाणात चुकू शकतं. किंवा तुम्ही नेमक्या अर्धवट ज्ञान असणार्‍या ज्योतिषाकडे गेलात असंही म्हणता येईल.

तसंही ज्योतिषशास्त्रावर फारसं संशोधन झालेलं नाही.शेकडो वर्षापूर्वीचे नियम,फलिते वापरुन भाकिते केली जाताहेत.याऊलट वैद्यकशास्त्रावर सातत्यानं संशोधनं होत आहेत.अगदी वारेमाप पैसा संशोधनासाठी वापरुन हे होतंय.तरीदेखील असे काही आजार,विकार आहेत ज्यावर हमखास असे वैद्यकिय उपाय आजही नाहीयेत.का बरं? आता नसतील अजून काही वर्षांनी मिळतील असं असेल तर हाच निकष ज्योतिषशास्त्राला का नको?किंबहुना फारसे आर्थिक पाठबळ नसल्याने वैद्यकशास्त्राच्या तुलनेत ज्योतिषशास्त्रीय निष्कर्ष येण्यास विलंब लागू शकतो तो सुध्दा मान्य करायला काय हरकत आहे?

"विश्लेषण मिळायला हवं" हा मुद्दा मात्र मान्य आहे.

तुम्ही शास्त्रीय पद्धतीने संशोधन न करण्याची कारणं फक्त देताय.
संशोधन, डेटा असलं काही न करता विज्ञान म्हणा हा आग्रह करताय.
त्यासाठी भलतीसलती उदाहरणं देताय.
पुन्हा, विज्ञान आज, आता मागतं, पुढे काय होईल किंवा होऊ शकेल.
उद्या माणसाला उडता येईल असा शोध मी आज लावून उपयोग नाही. आज उडून दाखवलं पाहिजे.

विरोधक सगळ्या क्षेत्रात आहेत. भारताने मंगळयान पाठवले तेव्हाही करोडो भूके मरत असताना या खर्चाची गरज काय म्हणणारे होतेच.

त्यामुळे कोणीं काय आक्षेप घेतंय किंवा तुम्ही जे म्हणतात त्याला विरोधक मान्यता देताहेत का? त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते याला शास्त्र मानायला लागताहेत का याला तुम्ही का महत्व देताय? तुम्ही तुमचे संशोधन सुरू ठेवा.

जगाची लोकसंख्या साधारण ८ अब्ज धरली तरी ३० जणांचं निरीक्षण हे म्हणजे १% सुध्दा होत नाही.मी तर याही पुढे जाऊन म्हणतो की ज्योतिष हे जर थोतांड असेल तर यातला एकही ठोकताळा अज्जिबात बरोबर येता कामा नये. ३० पर्यंत पोचावंच लागता कामा नये.सपशेल चुकायला हवं.पण मला निरीक्षणाअंती तसं काही आढळलं नाही.मिळणार्‍या निष्कर्षांमधे बर्‍यापैकी सातत्य येत गेलंय.हे का यावं?शिवाय जसजशी पत्रिकांची संख्या वाढत जात आहे तसंतसे या सातत्य संख्येत वाढच होत आहे.>>>>>

जागतिक लोकसंख्या लक्षात घेता 10 लाख पत्रिका जरी बरोबर आल्या तरी त्याला योगायोग म्हणता येईल.

"यात छापून अालं तरच ते खरं ठरणार का? हे म्हणजे एखाद्या नटाला अॉस्कर मिळालं तरच तो चांगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे."

चुकीची तुलना आहे. छापून येणे म्हणजे कुठले पारितोषिक नाही. सध्याच्या विज्ञान संशोधनाची ती एक पद्धत आहे. एखाद्या संशोधनास मान्यता मिळवण्यासाठी सम-अभ्यासू संशोधकांकडून ते तपासले जाते व त्यांच्या कसोटीवर ते उतरले तरच ते छापण्यात येते (म्हणून त्याला 'पियर रिव्ह्यू' म्हणतात). जर छापले गेले नाही, तर त्या संशोधनास मान्यता प्राप्त होत नाही. नटाचे तसे तसते. ऑस्कर नाही मिळाले तरी चालते, अगदी लोकांना त्याचा अभिनय नाही आवडला तरी तो स्वतःला 'नट' म्हणवून घेऊच शकतो.

मला वाटते की एखाद्या गोष्टीला 'वैज्ञानिक' म्हणावयाचे असेल किंवा विज्ञानाशी संबंध लावायचा असेल तर त्यासाठी लागणारी प्रक्रिया काय असते ते आधी पहावे. हायपॉथिसीस, प्रयोग, सिद्धता, पुनःप्रत्ययकारकता (रिपीटॅबिलिटी), अपवादात्मकता, पियर रोव्ह्यू आणि पब्लिकेशन या सर्व पायर्‍या पार करत जाणे गरजेचे आहे. सध्या तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते फार तर हायपॉथिसीस म्हणता येतील. आता त्या पुढची प्रोसेसच झाली नसल्याने अजून त्याला 'वैज्ञानिक' म्हणणे शक्य नाही. सध्या त्यास 'खोटे' सुद्धा म्हणू शकत नाही कारण प्रयोग केलेले नाहीत त्यामुळे परिणाम माहित नाहीत, किंवा ज्यांनी केलेत त्यांनी ते अजून वैज्ञानिक पद्धतीने छापले नाहीत. सबब सध्या त्या मुद्द्यांना वैज्ञानिक संबंध लावता येणार नाही.

ज्योतिषाला विज्ञानाचा आधार मिळावा असे काही लोकांना वाटत. त्यासाठी ते प्रयत्न करतात. पण विज्ञानाच्या आधाराची आम्हाला काही आवश्यकता नाही. नसेल ठेवायचा विश्वास तर नका ठेवू. एखादा झटका बसेल तेव्हा समजेल असे म्हणणाराही वर्ग मोठा आहे.शंतनू म्हणूनच या ज्योतिषाच काय करायचं? हा प्रश्न पडतो.

मला वाटतं की तो श्रद्धेचा भाग आहे. तिथे कुणी काय मानावं ह्याला मर्यादा नाहीत आणि कुणी मर्यादा घालू पण नयेत. 'एखाद्याने अमुकच मानावं' आणि 'एखाद्याने अमुक मानूच नये' ह्या दोन्ही गोष्टीत जवरदस्ती झाली! ज्याची श्रद्धा आहे, त्याने ठेवावा विश्वास आणि ज्याची नाही त्याने नका ठेवू. माझा आक्षेप फक्त त्याचा संबंध विज्ञानाशी जोडण्याबद्दल आहे. तो जोडायचा असेल तर वर दिलेल्या प्रक्रियेतून जाणे भाग आहे.

कोणतं संशोधन न करताच "अहो, मान्य करा की हे विज्ञानच आहे" असे बेंबीच्या देठापासून कलवळून जिथेतिथे बोंबलत हिंडायचं हा कुठला न्याय? माझा यालाच आक्षेप आहे.

आजच्या डिजिटल कनेक्टीवीटीच्या जगात जिथे खरेखोटे ऑनलाईन सर्वे कोट्यावधीच्या संख्येत घेतात, निदान दावा करतात तिथे ही आकडेवारी जमवणे फार काही मोठी गोष्ट अजिबात नाही. पण आकडेवारी समोर आली तर थोतांड उघडे पडेल याची भीती वाटत असल्याने कदाचित आपल्याच विधानांना थेट न भिडता लपून छपून षड्डू ठोकत भीमगर्जना करत राहयाच्या इतकेच धागालेखकासारख्या लोकांची नीती असेल.

संशोधन व्हावं म्हणून हळूच असे विषय चर्चेला आणले जातात. त्यातले की पॉइन्ट्स चर्चेत ठेवून ठेवून बझवर्ड्स मध्ये आणतात. मग बझवर्डची स्टेटमेंट्स बनवून ती फॅक्ट्स आहेत असे पसरवले जाते. अफवाशास्त्रानुसार "संशोधन झालं पाहिजे" चे "संशोधन झालं" पर्यंत प्रवास बिनबोभाट विनाअडथळा विनाविरोध सामान्यांपर्यंत होऊन जातो. असे होण्याची अनेक दिग्गज उदाहरणे आजमितीस भारतात पहायला मिळत आहेत. बिनदिक्कत खोटे घोळवून घोळवून असे फिरवायचे की कालांतराने खर्‍याखोट्याचा मागमूस लागूच नये आणि संभ्रमाच्या अवस्थेचा फायदा घेऊन आप्ले अजेंडे मुरवत राहायचे. असल्या करतुतींना वेळीच पायबंद घालायला आमच्यासारखे एक घाव दोन तुकड्याची मागणी करतात तेव्हा धागालेखकांसारख्या विचारांच्या लोकांना झुंडशाही, अंधविरोध आणि काय काय वाटत असते.

काय ते एकदाच दणदणीत संशोधन करा, प्रयोग, आकडेवारी, निष्कर्ष जाहिर करा, त्याचा इतरांनाही अभ्यास करु द्या. चर्चा-वाद-विवाद होऊ द्या दुसर्‍या बाजूचे खंडन करणारे संशोधन येऊ द्या. मग काय ते कुठेतरी एक बेसपोईन्ट तयार होउ द्या. मग पुढे जनमानसात न्या.

पण तसे नकोच आहे. हे तर आजवर अनेक चर्चांमधुन कळले आहे. संशोधन करा म्हटले की आधुनिक विज्ञानाला ज्योतिष मोजायला मर्यादा पडतात असे म्हणून पळवाट काढायची जुनी सवय आहे तुम्हा लोकांची. मग वाद जरा निमाला की हळूच मागच्या दाराने परत "अहो, मान्य करा की हे विज्ञानच आहे" असे बेंबीच्या देठापासून कलवळून जिथेतिथे बोंबलत हिंडायचं. माझा यालाच आक्षेप आहे.

मेघपाल,
एवढा आकांडतांडव करण्याआधी धागा नीट वाचा. तो संशोधनाला प्रेरणा देण्यासाठीच उघडलाय. "मान्य करा की
विज्ञानंच आहे" हे जे तुमच्या पदरचं वाक्य माझ्या तोंडी घालू पाहताय त्या आधी जरा धागा नीट वाचायचात तरी.पण त्या शिवाय बोंबलून दंगा तरी कसा करता येणार?

आजची वैज्ञानिक माहिती ही उद्या अंधश्रद्धा ठरू शकते. उदा. एके काळी सिफिलीस (परमा} हा रोग मानसिक तणावामुळे होतो असे 20 व्या शतकातील पूर्वार्धात डॉक्टर समजत असत.
हायगेन्स च्या तरंग सिद्धांता प्रमाणे अवकाश हे इथर ने भरलेले आहे. नंतर अवकाश हे पोकळी आहे हे सिद्ध झाले आणि ल्युमिनिफेरस इथर अस्तित्वात असू शकत नाही हे समजल्यावर शास्त्रद्यांच्या डोक्यावर बॉम्ब पडल्यासारखे झाले होते.
तेंव्हा नास्तिक म्हणतात तसे आज एखादी गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाली म्हणजे ती उद्या चुकीची ठरणार नाही असेही नाही.

फालतू बडबड बंद करा. गरज नाही त्या भाषणांची.
डेटा कुठे आहे डेटा, कुठे आहे संशोधन?
आजकाल पोकळ भाषणं मारणार्‍यांचा फारच सुळसुळाट झालाय या देशात.

तेंव्हा नास्तिक म्हणतात तसे आज एखादी गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाली म्हणजे ती उद्या चुकीची ठरणार नाही असेही नाही.>>>>

ह्याच्याशी सहमत.

फालतू बडबड बंद करा. गरज नाही त्या भाषणांची.
डेटा कुठे आहे डेटा, कुठे आहे संशोधन?
आजकाल पोकळ भाषणं मारणार्‍यांचा फारच सुळसुळाट झालाय या देशात.>>>>>

13व्या शतकात पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्यांनाही असेच सुनावले गेले असेल का??? Wink Wink

निसर्ग व विज्ञानाची सगळी गुपिते अजून मानवाला कळली नाहीत, कधी पूर्णपणे कळतील हे माहीत नाही. त्यातले काही शोधायचा प्रयत्न करणाऱ्यांचा उपमर्द करणे शेकडो वर्षे तसेच चालू आहे. प्रयत्न करणार्यांना कदाचित दिशा सापडली नसेलही, पण करू द्या त्यांना प्रयत्न.

साधनाताई तुम्ही उदाहरण चुकीचे देत आहे.

केअशू
विज्ञान आणि ज्योतिष यांत फरक आहे.
विज्ञानात एका संकल्पनेत एक सुत्र दिले असेल तर ते जगात कोणीही वापरल्यास त्याने येणारे उत्तर एकच असते.
H2+O =H2O पानी हे तयार होते
पण ज्योतीष मध्ये अमुक तमुक पत्रिकेत अमुक ग्रह अमुक जागी असेल तर सगळ्यांना एकच फळ देतो असे छातीठोक पणे बोलता येईल का? परिक्षण करणार्या व्यक्तिला ते निष्कर्ष पडताळून पाहता येईल का?
नाही.. माझा शनि 7व्या ग्रहात असताना प्रमोशन देत असेल तर तुमच्या 7व्या ग्रहात आल्यावर उलटे फळ देईल. मग पडताळून कुठल्या बेसिक वर बघणार?
प्रत्येक गोष्टीला एक आधारभूत बेस असतो. जो ज्योतिष मध्ये दुरवर दिसत नाही.

बघा पटतय का..

साधना,
मेघपाल हे असे पहिलेच नाहीत. बोलू द्या त्यांना! याला विज्ञानवादाचा अहंकार असं म्हणतात. विज्ञान संशोधनाला प्रवृत्त करतं.इथं अहंकार दिसतोय.संशोधन पूर्ण झालंय. मान्य करा गपचुप असा. विज्ञान संशोधन ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. अशा अहंकाराने संशोधनाला खीळच बसते. हे विज्ञानाहंकार्‍यांना कधी कळणार देव जाणे!

दत्तु,
तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलाय का? चार दोन ठोकताळे म्हणजे पुर्ण ज्योतिषशास्त्र नव्हे.

<<माझा शनि 7व्या ग्रहात असताना प्रमोशन देत असेल तर तुमच्या 7व्या ग्रहात आल्यावर उलटे फळ देईल. >>

हे असं का याचे नियम असतात. ते न जाणताच बोलणं योग्य का?

साधना मॅडम. अचाट दावे करणार्‍यांना पुरावे व संशोधनाची मागणी करणे हा उपमर्द वाटत असेल तर धन्य आहे बॉ.

संशोधन करा आणि समोर ठेवा, विषय संपला. ते काही न करता हाताची घडी घालून "हो हो हे सायन्सच आहे, फक्त अजून शोध लागायचा आहे हां, तोवर आम्हाला चिडवू नका ना गडे" असलं कुजबूजी गप्पा करुन विज्ञान सिद्ध होत नसतं. आपण आता १३ व्या शतकात नाही. वरचा विषय पृथ्वी गोल का सपाट असाही नाही. ज्योतिषला विनापुरावा विनासंशोधन जनसामान्यात घुसवायचे प्रयत्न हाणून पाडलेच पाहिजेत कारण ह्यामुळे जनसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडण्याचे १००% चान्सेस आहेत. रामदेवबाबासारखे लोक कॅन्सरला पूर्वजन्माचे पाप म्हणत आहेत, अजून कोण कोण काय काय म्हणत आहे,

केअशु, विनाकारण विषय बदलू नका बरे. विज्ञान म्हणून घोषित करायचे आहे ना ज्योतिषाला? मग त्याचे नियम पाळायला नको का? इथे जणू तुमच्या संशोधनावर बंदी घालायच्या मागण्या होत आहेत असे चित्र का बनवत आहात?

एकाच प्रश्नाचे उत्तर द्या - विनासंशोधन विनापुरावा तुम्हाला विज्ञानाची मान्यता हवी आहे का?

हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं>>>>>
बंद पडलेले घड्याळ दिवसातून दोन वेळा योग्य वेळ दाखवतं याचा अर्थ ते काही अंशी चालू असलं पाहिजे असे म्हणणार का तुम्ही?
बर ते जाऊ देत.
"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात" >>>>
त्या काही लोकांना चुकीचे सिद्ध करायचे असेल तर "शास्त्र नाही" किंवा "थोतांड" कशाला म्हणायचे याची व्याख्या करू या का?
केआशु तुम्हीच करा ना सुरुवात .

संशोधन करा आणि समोर ठेवा, विषय संपला. >>>

मीही केअशु यांना तोच सल्ला दिलाय. या विषयावर पुराणकालीन जे काही होते ते काळाच्या ओघात वाहून गेले. आता जे शिल्लक आहे ते अवगत विज्ञानाने सिद्ध करता येत नाही, ते आजच्या अपेक्षाही पुऱ्या करू शकत नाही. ज्या स्वरूपात हे शास्त्र आज आहे ते खूप थिटे आहे. अशावेळी लोकांना ते पटवून देण्यात वेळ वाया न घालवता ज्यांना रस आहे त्यांनी वेळ द्या संशोधनाला. जे फंडे आहेत ते सार्वत्रिक रित्या खरे ठरायला हवेत. अर्थात माझी ही अपेक्षा आजच्या विज्ञानावर आधारित आहे. अजून 50 वर्षांनी अपेक्षा कदाचित वेगळ्या असतील.

केअशु यांनी त्यांच्या शंका प्रदर्शित करायला चुकीचा फोरम निवडला आहे. ज्योतिषाला वाहिलेल्या फोरमवर त्यांनी चर्चा केली तर कदाचित काही माहिती मिळेल.

पण म्हणून त्यांचा इतक्या वाईट शब्दात उपमर्द करणेच योग्य हे मला ठीक वाटत नाही. आपण सरळ दुर्लक्ष करू शकतो. राहता राहिला आम जनतेचा प्रश्न. जी मूर्ख आहे, फसवली जाते, ज्योतिष खोटे हे त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे असे आपल्याला वाटते. पण हे असे नसते बऱ्याचवेळा. लोकांना कानांना गोड लागते ते ऐकायला आवडते. त्यासाठी पैसे द्यायची तयारी असते.

<<< याला विज्ञानवादाचा अहंकार असं म्हणतात. >>>
केअशु, जमल्यास पुढील व्हिडिओ बघा. https://youtu.be/QkhBcLk_8f0

Richard Feynman - The Uncertainty Of Knowledge
From The Pleasure of Finding Things Out, BBC Horizon 1981

If you expect science to give all the answers to the wonderful questions about what we are, where we are going, what the meaning of universe is and so on, then I think you could easily become disillusioned and then look for some mystic answers to these problems.

We are exploring, we are trying to find out as much as we can about the world. People say to me are you looking for the ultimate laws of Physics? No, I am not. I am just looking to find out more about the world. Then if it turns out that there is simple ultimate law that explains everything, so be it. That would be a very nice discovery. If it turns out that it is an onion with millions of layers and you are sick and tired of looking at the layers, then that's the way it is.

But whatever way it comes out, it's nature and she's going to come out the way she is. Therefore, when we go to investigate we shouldn't pre-decide what it is we are trying to do except to find out more about it.

So altogether I can't believe the special stories that have been made up about our relationship to the universe at large because they seem to be too local, too provincial. The earth, He came to the earth. One of the aspect of the god came to the earth, mind you. And look at what's out there. How can it... It isn't in proportion.

There's also another thing. It has to do with how do you find out if something is true? And if you have all these theories of different religions and all different theories about the thing, then you begin to wonder. Once you start doubting, which I think, to me it is a very fundamental part of my soul is to doubt and to ask. When you doubt and ask, it gets little harder to believe.

I can live with doubt and uncertainty and not knowing. I think it's much more interesting to live not knowing than have answers which might be wrong. I have approximate answers and possible beliefs and different degrees of certainty about different things, but I am absolutely not sure of anything and there are many things I don't know anything about. But I don't have to know an answer. I don't feel frightened by not knowing things. By being lost in the mysterious universe without having any purpose, which is the way really is as far I am tell possibly. It doesn't frighten me.

<<< मला वाटते की एखाद्या गोष्टीला 'वैज्ञानिक' म्हणावयाचे असेल किंवा विज्ञानाशी संबंध लावायचा असेल तर त्यासाठी लागणारी प्रक्रिया काय असते ते आधी पहावे. हायपॉथिसीस, प्रयोग, सिद्धता, पुनःप्रत्ययकारकता (रिपीटॅबिलिटी), अपवादात्मकता, पियर रोव्ह्यू आणि पब्लिकेशन या सर्व पायर्‍या पार करत जाणे गरजेचे आहे. >>>
शंतनू यांच्या वरील मताशी १००% सहमत.

म्हणून त्यांचा इतक्या वाईट शब्दात उपमर्द करणेच योग्य हे मला ठीक वाटत नाही.
-- पुरावे संशोधन न करता परत परत तीच ती पाल्हाळे लावणार्‍यांचा मान राहत नाही. केअशु यांच्याशी माझी काही वैयक्तिक दुष्मनी नाही. पण त्यांच्यासारखे विचार असणारे कित्येक दशकांपासून त्याच जागी तसेच उभे आहेत व विज्ञान म्हणून मागच्या दाराने मान्यता मिळावी यासाठी छुप्या चळवळी करत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे सोशल फोरम वर चर्चा घडवुन आणण्याच्या निमिषाने अर्धसत्य पसरवणे, कालांतराने असे खोटे दावे खरेच असतात अशी लोकभावना बनत जाते. अशांना कोणताही सन्मान मिळणे दुरापास्त आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ही फार सोपी म्हण आहे आपल्याकडे. ती अवलंबवावी, कोणी काही म्हणत नाहीये त्यासाठी.

ज्या ज्या संदर्भात ज्योतिषाकडे उत्तर आहे असे वाटते त्या त्या संदर्भात नुसतं वातावरण बनवण्यापेक्शा खनपटीला बसून संशोधन करावे ना? पण ते होतच नाही, नुसत्या सामुहिक चर्चांच्या नावाखाली प्रोपगंडा पसरवणे. वरील लेखातली शब्दरचना, भाषा, विधानं केलेली आहेत, त्यामागे काही पुरावा नाही, डेटा नाही, काहीही नाही. आहे काय तर "मला असे आढळले, तसे भासले, म्हणजे असेच असले पाहिजे". ह्याला काही अर्थ नाही.

विद्यानाहंकारी म्हणून हे केअशु मला उद्धटुन बोलत आहेत. वेगवेगळ्या तर्‍हेने वाद घालत आहेत. पण एक साधी गोष्ट ते करु शकत नाहीयेत. संशोधन. करत आहेत त्या फक्त संशोधनाच्या गप्पा. त्याला शून्य महत्त्व असते.

कुमार१ यांचा मधुमेहावरचा इन्सुलिन संशोधनचा धागा वाचा. इन्सुलिन शोधाचा इतिहास आहे. विज्ञान खरोखर काय असते ते थोडे तरी कळेल. तेवढे झटावे लागते, काम करावे लागते. नुसत्या वल्गना करुन मला वैज्ञानिक म्हणा असे होत नसते.

आणि दुर्लक्ष करु शकता या सल्ल्याबद्दलः सॉरी, दुर्लक्ष करुन अशा अवैज्ञानिक गोष्टींच्या प्रसाराला हातभार लावू शकत नाही.

तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलाय का? चार दोन ठोकताळे म्हणजे पुर्ण ज्योतिषशास्त्र नव्हे.

सगळे ज्योतिषशास्त्र ठोकताळ्यांवर अवलंबून आहे साहेब.
तुम्ही अजून बेस सांगितला नाही. पडताळीसाठी एक तरी फुल्ल प्रुफ बेस द्या

>>चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे<< सुरवातीलाच कन्डिशन ठेवल्याने माझ्यासारख्या ' अज्ञानी' माणसाला काही बोलण्याचा हक्कच नव्हता म्हणुन गप्प वाचत होतो. हे मात्र बरे आहे.. सोशल फोरम वर विषय काढायचा, एन्ट्रि कन्डिशन काय तर ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास, म्हणजे ज्या लोकाचा आधिच हे "शास्त्र" आहे यावर विश्वास आहे ; फक्त तेच बोलणार...! मग मेघपाल सारखे कुणी यांना पुरावे मागायला आले की त्यांना म्हणणार की त्यासाठीच ही मैफल जमवलीय. आधी हे शास्र आहे हे मान्य करा मग 'असेल, शकेल, असावे' इत्यादी स्वरुपात पुरावे देण्यात येतील.
असो मेघपाल यांच्या वरच्या प्रतीसादातील शेवटच्या वाक्याला तरी अनुमोदन द्यावे म्हणुन हा प्रतीसाद.

मेघपाल,
<<ज्योतिषला विनापुरावा विनासंशोधन जनसामान्यात घुसवायचे प्रयत्न हाणून पाडलेच पाहिजेत कारण ह्यामुळे जनसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडण्याचे १००% चान्सेस आहेत.>>

एवढं असेल तर माबोला हा ज्योतिष विषयक विभागंच का बंद करायला सांगत नाही? निदान तुमचा त्रागा तरी होणार नाही.
तुम्ही म्हणता ज्योतिष हे शास्त्र नाही.ठिक आहे.मग ते कला या प्रकारात येतं का? पण तुमच्यामते लोक ज्योतिषामुळं नागवले जातात.कलेमुळे आनंद मिळायला हवा.नागवंलं जाता कामा नये.म्हणजे ज्योतिष ही कलाही नव्हे.मग ज्योतिष आहे तरी काय? थोतांड आहे का? तसं असेल तर स्वतंत्र विभाग उघडून माबो या थोतांडाला मदतच करत नाही का? माबोवर ज्योतिषविषयक पोस्टला परवानगी आहे म्हणून हा विषय मांडला.ज्योतिष शास्त्र नाही,कलाही नाही.मग माबोच्या ज्योतिष विभागामुळे लोक नागवले जाण्याला मदत होत असली पाहिजे.त्यामुळे आधी माबोलाच का नाही सांगत हा विभाग बंद करायला? तुमच्या समाजाला शहाणं करण्याची सुरुवात तिथूनच का नाही करत?

केअशुंना ज्योतिष संशोधन करण्यापेक्षा आणि ते शास्त्र आहे हे सिद्ध करण्यापेक्षा वादविवादातच अधिक रस दिसतोय. नाहीतर त्यांनी मेघपाल यांच्या व्यतिरिक्त इतरही प्रतिसादांची दखल घेतली असती.

>>>एवढं असेल तर माबोला हा ज्योतिष विषयक विभागंच का बंद करायला सांगत नाही?

दादा तुम्हाला ज्योतिषला विनापुरावा विनासंशोधन जनसामान्यात घुसवायचे प्रयत्न करायचा अधिकार आहे. आणि ते प्रयत्न हाणुन पाडायचा आम्हाला अधिकार आहे. जेव्हा कोणाची फसवणुक होईल तेव्हा त्यांना कायदेशीर गुन्हा दाखल करुन बदमाशांना गजाआड करायचाही अधिकार आहे.

विज्ञान म्हणून मागच्या दाराने मान्यता मिळावी यासाठी छुप्या चळवळी केल्यात तर विरोध तर होणारच! करारा जबाब मिलेगा!! Lol

व्यत्यय
छुप्या चळवळी कसल्या?आणि लोक विश्वास ठेवताना काय तुमची परवानगी घेऊन विश्वास ठेवतात का काय? विज्ञानाची मक्तेदारी तुमच्याकडं दिली की काय?

Pages