हे घडतं कसं?

Submitted by केअशु on 16 January, 2018 - 09:58

या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.

खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं.जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींचा यासाठी उपयोग केला आहे.जगाच्या कोणत्याही ठिकाणी याचा समान प्रत्यय येतो.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शाळेतच न गेलेल्या मुलाला शाळेत १ लीत गेलेल्या मुलाने मी २ रीत आहे म्हणून सांगितलं तर त्याला काय कळणार?>>>>>>> केअशु तुम्ही पहिलित आहत की दुसरीत? तसं पहायला गेलं तर वयाच्या मनाने अभ्यास चांगलाच दाण्डगा दिसतोय तुमचा.

सूर्य मालिकेतला सगळ्यात मोठा ग्रह सूर्य आहे.
-अखिल भारतीय सुर्यप्रेमि संघटना

ज्योतिषी जोमत
गुरु कोमात

शाळेतल्या गुरुविषयी एवढ़ा राग आहे तुमच्या मनात की तुम्ही तो राग सूर्य मालिकेतल्या गुरु ग्रहावर काढ़ताय.कुठे फेड़ाल ही पापं, कुठे नेउन ठेवलाय गुरु माझा

कल्पतरू,
<<शाळेतल्या गुरुविषयी एवढ़ा राग आहे तुमच्या मनात की तुम्ही तो राग सूर्य मालिकेतल्या गुरु ग्रहावर काढ़ताय.>>

हे तुम्हाला कुठून दिसलं?

केवढी लाही लाही होतेय अंगाची! माझं ऐका एखादी पंचबॅग घ्या आणि त्यावर ठोसे मारत जा.नैतर एखाद्या दिवशी पानं झडून जातील या कल्पतरुची.

केअशू
तुमचा आता विदूषक होऊ लागला आहे विचारल्ल्या प्रश्नांची उत्तरे न देता आल्याने असा आक्रोश आणि बैचेनी वाढून हास्यास्पद बोलणे चालू आहे. भलेभले स्वतःला महान वक्ता समजणारे देखील या सिंड्रोमने ग्रासलेले आहे. वेळीच स्वतःला सावरा अन्यथा परिस्थिति हाताबाहेर गेली तर माबोशुक्राचार्यांसारखी अवस्था होईल. Wink

खरं सांगायचं तर जेव्हा हा धागा आला तेव्हा वाटलं एक दर्जेदार चर्चा वाचायला मिळेल. नवीन कमेंट्स आल्या की अपेक्षेने धागा उघडायचो, पण चर्चा राहिली बाजूला केअशु याच्या त्याच्याबरोबर वाद घालतानाच जास्त दिसले. शिवधनुष्य उचलायला गेले आणि पेलता न आल्यामुळं उताणी पडलेल्या रावणासारखी त्यांची अवस्था झाली. ताजमहाल बांधायच्या गोष्टी करायच्या आणि दिवाळीतील किल्ला बनवताना नाकी नऊ यांच्या.

गमभन

तुम्हाला काय माहित? तुम्ही होतात रामदासांच्या काळात?
>>

केअशु,
खरंच काहीच्या काही बालिश, अतर्क्य प्रतिसाद देत आहात. अश्या आक्रस्ताळपणाने चर्चा करुन काय मिळणार काय माहित?
उगाच स्वतःचे हसे नका करुन घेऊ. तुमच्या बरोबर ज्या शास्त्रासाठी भांडताय त्याचेदेखील हसे होतेय.
असो! माझ्यातर्फे इथे पुर्णविराम.

लोकांना कसे फसवले जाते याचा एक किस्सा.
१०-१२ वर्षांपूर्वी कोकणातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी जत्रेला गेलो असताना तिथे कोणी 'काका भुजंडर' नामक भंपक ज्योतिषी ओम्नी व्हॅन घेऊन आला होता. (बिच्चारी ओम्नी! चित्रपटासोबत वास्तविक आयुष्यातही बदनामी). त्या ओम्नीमध्ये एक laptop, एक लेझर प्रिंटर आणि एका खोक्यावर काच बसवून त्याखाली एक वेबकॅम आणि उजेडासाठी बल्ब लावला होता (स्कॅनरची रचना डोळ्यासमोर आणा).
त्या भोंदूची लोकांना फसवण्याची पद्धत खालीलप्रमाणे:
laptop वर अत्यंत बेसूर आवाजात जाहिरातीची रेकॉर्ड लावून ठेवली होती, की "computer च्या सहाय्याने भविष्य जाणून घ्या."
लोकांकडून (समोर आलेल्या बकऱ्याकडून) १० रु. मिळाले की तो त्यांना त्या खोक्याच्या काचेवर हात ठेवायला सांगत असे, जो हात लोकांना laptop च्या स्क्रीनवर दिसत असे. मग तो प्रिंटर मध्ये पेपरचा गठ्ठा सरकवून प्रिंटरवरील बटन दाबत असे. (laptop ला हातही लावत नसे.) मग प्रिंटरने एक कागद ओढून घेतला की उर्वरीत गठ्ठा पुन्हा बाहेर काढून ठेवत असे. प्रिंटरमधून प्रिंट बाहेर आली की लोकांना वाटत असे की laptop ने आपला हात वाचून आपले भविष्य सांगितले!!!

याचा बारकाईने विचार केल्यास माझ्या लक्षात आलेले काही मुद्दे:
१. मुळात वेबकॅमने हात वाचणे (हातावरील बारीक रेषा पाहणे) शक्यच नाही. १०-१२ वर्षांपूर्वी वेबकॅमही जास्तीतजास्त 2MP चे होते.
२. खरोखरच जर laptop तुमचा हात वाचत असेल तर त्याने laptop ऑपरेट करायला पाहिजे, प्रिंटर नाही.

वास्तविक त्याने एखाद्या word file मध्ये निरनिराळ्या प्रकारची १०-१५ भविष्ये type करून एकदमच ५०-६० पानांची (दिवसभर पुरेल इतकी) प्रिंट order दिली असेल परंतु प्रिंटरमध्ये पेपर नसल्याने ती ऑर्डर पेंडिंग राहिली. मग जेव्हा जेव्हा तो लोकांकडून १० रु. घेऊन प्रिंटरमध्ये पेपर सरकवत असे तेव्हा पेंडीग ऑर्डर पैकी एक पेज प्रिंट होऊन बाहेर येत असे उर्वरित गठ्ठा पुन्हा बाहेर काढल्याने इतर पेजेसची ऑर्डर पुन्हा पेंडिंग राहत असे. laptop च्या स्क्रीनवर वेबकॅमचे live footage दाखवून समोरच्याला त्याचा हात दाखवणे ही निव्वळ वातावरणनिर्मिती !

अर्थात त्यावेळी माझे वय कमी असल्याने पुरेसे धाडस नव्हते, तसेच सोबत कोणीही ठाम भूमिका घेणारे नसल्याने मला त्याचे बिंग फोडणे शक्य झाले नाही. जर मी बनावट गिऱ्हाईक बनून गेलो असतो आणि इतरांप्रमाणेच १० रु. देउन काचेवर हात ठेवून प्रोसेस सुरु केली असती आणि मग मात्र त्याला प्रिंटर मधून कागदाचा गठ्ठा बाहेर काढू दिला नसता तर माझी एकट्याचीच किमान २०-२५ निरनिराळी भविष्ये प्रिंट होऊन बाहेर आली असती!!! Proud Proud Proud

दत्तु,
आक्रोश आणि बैचेनी माझी का तुमची?

तुमची
एकतरी उत्तर देता आले का? अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा प्रयत्न केला की असे होते.

Pages