हे घडतं कसं?

Submitted by केअशु on 16 January, 2018 - 09:58

या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.

खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं.जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींचा यासाठी उपयोग केला आहे.जगाच्या कोणत्याही ठिकाणी याचा समान प्रत्यय येतो.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

1. शतकाच्या सुरुवातीला जी गोष्ट दैवी वाटत होती ती गोष्ट त्याबद्दलचे ज्ञान मिळवून माणूस आता स्वतःच करू लागला असे असेल तर ती गोष्ट मुळात दैवी राहिलीच नाही. मग ती करणारा माणूस देव कसा होऊ लागला?
>>>

अहो म्हणजे जी गोष्ट देव करतो असे म्हटले जाते ती मनुष्याला अवगत झाल्याने माणूस "देव" होऊ लागला असे त्यांना म्हणायचे आहे.

>>
माणसाला कसलीही औथोरिटी मिळालेली नाही. निसर्गातली कुठलीही गोष्ट अजून त्याला निर्माण करता येत नाहीय.
>>
हे पण खरे नाही. माणसाने अनेक कृत्रिम गोष्टी निर्माण केल्या आहेत ज्या निसर्गात आपोआप निर्माण होऊ शकत नाहीत. उदा प्लास्टिक. नैसर्गिक रित्या प्लास्टिक तयार होते का? नाही, पण माणसाने ते निर्माण केले. वैद्यक शास्त्र प्रगत झाले नसते तर आज जगत असलेली करोडो लोकं केव्हाची मेली असती.
समजा आपण कृत्रिम बुद्धी तयार केली जिला शरीराची गरज नाही, एका आभासी जगात ती कृत्रिम बुद्धी (ए.आय.) जगू शकत असेल तर निसर्ग आज जसा आहे तसा असण्याची गरज असेल का? मॅट्रिक्स चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पृथ्वीवर सुर्याचा एक किरण जरी नाही पडला तरी चालेल की मग.

Thanks टवणे सर,
साधना, मी नास्तिक पणा बद्दल वाद घालताना " अरे देवा,!!" उद्गारलो तर ,झालास ना आता आस्तिक, आली ना देवाची आठवण? म्हणून भांडावे या धाटणीचा तुमचा प्रतिसाद वाटला,

असो,
तुम्ही कोट केलेली वाक्ये वरचे साल होते, आतला गर " या "शास्त्रात" गेल्या दशकात काय प्रगती झाली, न झाल्यास का झाली नाही, आणि त्याचे काय डॉक्युमेंटेशन आहे" हा प्रश्न आहे,

साल चघळायचे की गर खायचा ते आपल्या आपण ठरवायचे.

मूळ लेखातलं वाक्य : १.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

एक प्रतिसाद : हिलाच मुद्या माझ्यासाठी तरी न पटण्यासारखा आहे.. मला एक जुळा भाऊ आहे..आमच्या दोघांचीही रास धनु आहे.. आम्ही जुळे जरी असलो तरी आमच्यात काहीच साम्य नाहीये.. आणि हो माझा भाऊ माझ्यापेक्षा उंचीने कमी आहे 5.3 आणि शरीरानेही बारीक आहे.. वरील मुद्यानुसार माझी उंची जरी बर्यापैकी (5.7) आणि मी दणकट जरी असलो तरी एकाच राशीचा माझा भाऊ तसा नाहीये... त्यामुळेच हा मुद्दा मला तरी पटण्यासारखा नाहीये..

त्यावर उत्तर : अजय चव्हाण,
या साठीच ९०% वेळा म्हटलं आहे.तुमचा भाऊ १०% मधे येत नसेल का? या अपवादांवरही संशोधन व्हायला हवं हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय.
दोन्ही भावांमधे तुम्ही उंच आणि सुदृढ आहात याचाच अर्थ मी मांडलेल्या मुद्द्यात तथ्य आहे हे सिध्द होत नाहीये का?

माझ्या पहिल्या प्रतिसादात माझी रास धनु आहे आणि माझी उंची व चण दोन्ही बेताच्या आहेत असं लिहिलंय, त्याला महाशयांनी पास दिलाय.

Pseudoscience describes any belief system or methodology which tries to gain legitimacy by wearing the trappings of science, but fails to abide by the rigorous methodology and standards of evidence that are the marks of true science.

Promoters of pseudoscience often adopt the vocabulary of science, describing conjectures as hypotheses, theories, or laws, providing "evidence" from observation and "expert" testimonies, or even developing what appear to be mathematical models of their ideas. However, in pseudoscience there is no honest attempt to follow the scientific method, provide falsifiable predictions, or develop double blind experiments.

Although pseudoscience is designed to appear scientific, it lacks all of the substance of science.
One of the primary demarcations between real science and pseudoscience is that pseudoscience relies on pushing ideas that cannot be falsified. Unfalsifiable claims shield pseudoscience from criticism since there can be no "proof" of an unfalsifiable idea.

Sometimes specific concepts and claims within a pseudoscience can be falsified, such as the efficacy of alternative medicines. When this happens, the usual tactic is to change the criteria for falsification – a strategy known as "moving the goalposts". (ठळक केलेलं वाक्य)
दोन्ही भावांमधे तुम्ही उंच आणि सुदृढ आहात याचाच अर्थ मी मांडलेल्या मुद्द्यात तथ्य आहे हे सिध्द होत नाहीये का?

If you are in possession of this revolutionary secret of science, why not prove it properly and be hailed as the new Newton?
Of course, we know the answer. You can't do it. You are a fake.
—Richard Dawkins,

माझ्या वरच्या पोस्टला अनुसरुन इथे अजुन एक उदाहरण वानगीदाखल द्यावसं वाटतं. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ज्योतिष शास्त्राचे फायदे मूळ प्रवाहात आणले जाऊ शकतात. सध्याचे ज्योतिषी वापरत असलेला फाउंडेशनल डेटा (ग्रह-तारे, त्यांच्या पोझिशन्स इ. रिलेटेड मास्टर डेटा), आकडेमोड करायच्या पद्धती एक अ‍ॅडिशन्ल डेटा सोर्स आणि प्रोसेस या रुपात आणुन अ‍ॅनलिटिक्सचा रिझ्ल्टंट डेटासेट थोड्या वेगळ्या पद्धतीने स्लाइस आणि डाइस करुन एखादि वैशिष्ठ्यपुर्ण इन्साइट देऊ शकतात...

म्हणजे उपलब्ध तंत्रज्ञान ज्योतिषासाठी वापरणार. हरकत नाही.
त्यामुळे ज्योतिष विज्ञान आहे हे सिद्ध होईल का? कसे?

>>त्यामुळे ज्योतिष विज्ञान आहे हे सिद्ध होईल का? कसे?<<

एखादं तंत्रज्ञान जे शास्त्राच्या कसोटिवर उतरलेलं आहे, ते वापरुन एखादी कान्सेप्ट प्रुव केली जाते हे प्रमाण पुरेसं नाहि का?

सध्याचे ज्योतिषी वापरत असलेला फाउंडेशनल डेटा (ग्रह-तारे, त्यांच्या पोझिशन्स इ. रिलेटेड मास्टर डेटा), आकडेमोड करायच्या पद्धती एक अ‍ॅडिशन्ल डेटा सोर्स आणि प्रोसेस या रुपात आणुन अ‍ॅनलिटिक्सचा रिझ्ल्टंट डेटासेट थोड्या वेगळ्या पद्धतीने स्लाइस आणि डाइस करुन एखादि वैशिष्ठ्यपुर्ण इन्साइट देऊ शकतात>>>>>>

म्हणजे ग्रह ताऱ्यांची स्थिती, आणि ज्योतिषाच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या ग्रहांच्या पोसिशन प्रमाणे होणारे योग याचा अल्गोरिहम बनवणार का?
आणि सामान्य ज्योतिषी 100 शक्यता विचारात घेऊन काम करत असेल तर कॉम्पुटर 1000 शक्यता विचारात घेऊन काम करणार,

पण या मुळे ज्योतिष शास्त्र आहे हे कसे prove होणार?

ANY way,
कृपया, मला पडलेल्या प्रश्नांचे ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी निराकरण करावे.
मला ज्योतिष शास्त्रच आहे यावर विश्वास ठेवायला फार फार आवडेल.

भरत./सिम्बा - शास्त्र किंवा शास्त्रोक्त पद्धतीची हि ढोबळ व्याख्या तुम्हाला मान्य असेल तर अ‍ॅनलिटिक्स टेक्निक वापरुन वर्तवलेलं भविष्य शास्त्रोक्त का मानलं जाऊ नये, हे समजाउन सांगा...

Step-by-step approach consisting of (1) identifying and defining a problem, (2) accumulating relevant data, (3) formulating a tentative hypothesis, (4) conducting experiments to test the hypothesis, (5) interpreting the results objectively, and (6) repeating the steps until an acceptable solution is found.

(या व्याख्यातल्या #३ आणि #४ स्टेप्स प्रॉडक्ट बिल्ड्/मेंटेनंस फेजमध्ये अंतर्भुत आहेत)

Step-by-step approach consisting of
(1) identifying and defining a problem, - युरोप मधल्या छोट्याश्या गावातून भारतात तिंबकटुला पोहोचणे
(2) accumulating relevant data, - जगातल्या यच्चयावत ट्रान्सपोर्ट सिस्टमस चे टाइम टेबल
(3) formulating a tentative hypothesis, - टाइमटेबल मधील गृहितकला प्रमाणे ट्रॅव्हल प्लॅन करणे 1 वा अधिक प्लॅन्स बनवणे
(4) conducting experiments to test the hypothesis,- प्रत्यक्ष ट्रॅव्हल करून सगळे प्लॅन टेस्ट करणे
(5) interpreting the results objectively,- कोणता प्लॅन workable आहे ते ठरवणे and
(6) repeating the steps until an acceptable solution is found.
तो workable प्लॅन मिळे पर्यंत विविध ट्रान्सपोर्ट मोड शोधत राहणे.

तुमच्या सगळ्या पायऱ्या वर पूर्ण होतायत, मग ट्रॅव्हल बुकिंग प्लॅंनिंग ला आपण शास्त्र म्हणू शकतो का?

तुम्ही म्हणताय ती "पद्धत" श्रास्तोक्त आहे, पण पद्धत ज्या बरोबर डिल करते ते शास्त्र आहे की नाही यावर प्रकाश टाकत नाही.

जसे मी मागे म्हंटले,
शास्त्र म्हंटले ,की त्यात मला(community ला) काय माहीत नाहीये याचे सम्यक ज्ञान असते, ज्योतिषा बाबत तुम्ही काय म्हणाल?

{सध्याचे ज्योतिषी वापरत असलेला फाउंडेशनल डेटा (ग्रह-तारे, त्यांच्या पोझिशन्स इ. रिलेटेड मास्टर डेटा), आकडेमोड करायच्या पद्धती एक अ‍ॅडिशन्ल डेटा सोर्स आणि प्रोसेस या रुपात आणुन अ‍ॅनलिटिक्सचा रिझ्ल्टंट डेटासेट थोड्या वेगळ्या पद्धतीने स्लाइस आणि डाइस करुन एखादि वैशिष्ठ्यपुर्ण इन्साइट देऊ शकतात...}

हे म्हणजे आफ्रिकेतल्या काळविटांचा डेटा अ‍ॅनालाईझ करून इनविजीबल पिंक युनिकॉर्न चा ठावठिकाणा मिळू शकतो असं म्हणण्यासारखं आहे.
ह्यांव होऊ शकतं आणि त्यांव होऊ शकतं असं कोणीही उठून काहीही म्हणेल. जोपर्यंत प्रत्यक्ष संशोधन होऊन पुराव्याने शाबीत होत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नाही.

बाकी कोरिलेशन डज नॉट इंप्लाय कॉजेशन हे देखील कुठे ऐकले असेलच.

अर्थशास्त्र सामाजिक विज्ञानात मोडतं. ते निसर्गविज्ञानाइतकं काटेकोर असू शकत नाही. अर्थशास्त्र माणसाच्या वागण्याचा अभ्यास करतं. माणसाचं वागणं प्रेडिक्टेबल असतंच असं नाही. सामाजिक विज्ञानात प्रयोग करायची सोय नसते. व्हेरिएबल्स कंट्रोल करता येत नाहीत.
तरीही कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

सिम्बा+१. व्यत्यय+१.

मुळात ज्या लेखात वैदिक मॅथ्स सारख्या मुळात नसलेल्या गोष्टीचा संदर्भ दिलाय, तो किती सायंटिफिक होऊ शकेल?

त्या पाच स्टेप्सनी फारतर सगळ्यांची भाकिते एकसारखी येण्याची सोय होईल. त्या भाकिताप्रमाणे घडणे हा पुढचा भाग. त्यापुढे जाऊन त्या दोन्ही गोष्टींचा संबंध कसा *सिद्ध* करणार?

आता एक शंका - ज्योतिषातले ग्रह(तारे) राशींमधून भ्रमण करत असतात. त्यात आणि आकाशातल्या त्या त्या ग्रहतार्‍यांच्या स्थितीत काही को-रिलेशन असते का? की दोघांची गणितं वेगवेगळी असतात?
http://earthsky.org/astronomy-essentials/what-is-the-zodiac

आता गृहीत धरू कि या विषयावर संशोधन सुरु झालं तर काही वर्षांनी दोन निष्कर्ष समोर येतील. पहिला निकष हा कि हे बुवाबाजी करतात. आणि दुसरा निकष हा कि हे खरोखरच एक शास्त्र आहे. आत या दोन्ही निकषांमध्ये नुकसान या लोकांचंच होईल, पहिला निकष आला तर लोक यांच्याकडे जायचे बंद होतील आणि दुसरा निकष आला तर सगळेच लोक आपली कुंडली स्वतःच पाहून कधी काय होणार हे ठरवतील. मग लोकांकडून येणारे प्रत्येक प्रश्नाचे शे, दोनशे, ५०० रुपये बंद होऊन यांची आरामात सुरु असलेली जिंदगी संपुष्टात येऊन यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. हे सगळं टाळण्यासाठी हे लोक कधीही या विषयावर संशोधन होऊन देणार नाहीत. हे जे काय आपल्यासोबत एवढा वाद घालताहेत हा त्याचाच एक भाग आहे. यांची बुवाबाजी आणि इन्कम कमी झाली कि फक्त हुलाहूल करायची आणि लोकांना संभ्रमात ठेवायचं.

केअशु,
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कृपया वाईट वाटून घेऊ नका.

ज्योतिषशास्त्र हे शास्त्र की थोतांड? यावर वाद घालण्याआधी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची किती माहिती आहे ते सांगाल का? तुम्ही या विषयाचा किती अभ्यास केला? कुठे व किती ज्योतिष शिकलात हे सांगाल का?

आत या दोन्ही निकषांमध्ये नुकसान या लोकांचंच होईल, पहिला निकष आला तर लोक यांच्याकडे जायचे बंद होतील आणि दुसरा निकष आला तर सगळेच लोक आपली कुंडली स्वतःच पाहून कधी काय होणार हे ठरवतील. मग लोकांकडून येणारे प्रत्येक प्रश्नाचे शे, दोनशे, ५०० रुपये बंद होऊन यांची आरामात सुरु असलेली जिंदगी संपुष्टात येऊन यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. हे सगळं टाळण्यासाठी हे लोक कधीही या विषयावर संशोधन होऊन देणार नाहीत>>>>>

1. कुठलाही धंदा आरामाचा नसतो. आज ज्योतिष कुठल्याही जातीची मक्तेदारी राहिली नाहीय. कुणीही 'ज्योतिष पाहतो' असा बोर्ड लावून बसु शकतो. अशा वेळी, तुम्ही म्हणता तसा तो आरामाची धंदा, आरामात सुरू असलेली जिंदगी असती तर सगळेच लोक हा धंदा उघडून बसले असते. तसे होत नाहीये म्हणजेच हा आरामाचा धंदा नाहीये.

2. ज्योतिष विषयक काही सॉफ्टवेअर्स डेवलोप झालीत जी वापरून तुम्ही तुमची कुंडली छापू शकता. कुंडली छापणारी सॉफ्टवेअर्स नेटवर काही मर्यादेत उपलब्ध आहेत. काही स्पेसिफिक सॉफ्टवेअर्स आहेत जी विकत घ्यावी लागतात. त्यामुळे या क्षेत्रात अजिबातच काम झाले नाही असे म्हणता येणार नाही. असे असतानाही लोक ज्योतिषाकडे जातात. असे धंदे बसत नाहीत हो.

हल्लीच्या हल्ली काही प्रसिद्ध बुवा गजाआड गेले म्हणून बाहेर असलेल्या बुवांचा धंदा बंद पडलेला नाही. बुवा हवा असणे ही एक वेगळी गरज आहे. जे गजाआड गेले त्यांच्या भक्तांना एव्हाना दुसरा कोणी बुवा सापडला असणार.

>>हे म्हणजे आफ्रिकेतल्या काळविटांचा डेटा अ‍ॅनालाईझ करून इनविजीबल पिंक युनिकॉर्न चा ठावठिकाणा मिळू शकतो असं म्हणण्यासारखं आहे<<
व्यत्यय - तुम्हाला विषयाचा आवाका ध्यानात न आल्याने पोपटवाला ज्योतिषी, युनिकॉर्न अशी हास्यास्पद उदाहरणं तुमच्या कडुन यायला लागलेली आहेत. विषय तुमच्यासाठी क्लिष्ट आहे पण तो सोप्पा करायचा प्रयत्न करताना तुमच्या बालीश कामेंट्सचा अडथळा त्यात होऊ नये म्हणुन यापुढे तुमच्या कामेंट्स्ना केराची टोपली...

>>Relevant data मधे काय काय येईल?<<
वावे - ज्योतिषाचा मी डोमेन एक्स्पर्ट नाहि. पण ज्योतिषी आडाखे जन्माच्या आणि सध्याच्या पॅरामिटर्स (ग्रहस्थिती, फेज, इ.) वरुन आखले जातात याची कल्पना आहे. हा डेटा सहजरित्या अ‍ॅनलिटिक्स मध्ये आणण्यासारखा आहे. इथे यानिमित्ताने या ब्लॉगचा संदर्भ द्यावासा वाटतो. मला हा सगळा प्रकार कंसेप्ट्युअली फिजीबल का वाटतो आणि ते अ‍ॅनलिटिक्स द्वारे कसं साध्य करता येइल हे चांगल्या शब्दात आर्टिक्युलेट केलेलं आहे. शेवटचे दोन पॅराग्राफ जास्त महत्वाचे आहेत...

>> तुमच्या बालीश कामेंट्सचा अडथळा त्यात होऊ नये म्हणुन यापुढे तुमच्या कामेंट्स्ना केराची टोपली...

Rofl झाकली मूठ सव्वा लाखाची Lol
प्रतिवाद करता येत नसल्याने पळून जाण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता तुम्हाला.
ते कॉजेशन चं ध्यानात आसुद्या ब्र का

>>मला हा सगळा प्रकार कंसेप्ट्युअली फिजीबल का वाटतो

आरेच्या, कंसेप्ट्युअली फिजीबल मंजी सगळा कल्पनेचा खेळ हाय मंता का..... आसुद्या आसुद्या..... काय पुराव्यानं शाबीत झालं की कळवा आमाला

तुमच्या कमेंट्स ना केराची टोपली
... हा नक्की तोंडावर केलेला धडधडीत विखारी अपमान आहे,

याची डिग्री काय असते? माबोचा मालकांनी ठरवून दिलीय का? अजून कोणते वाक्प्रचार अलौड आहेत?

राज,
>>>>पण ज्योतिषी आडाखे जन्माच्या आणि सध्याच्या पॅरामिटर्स (ग्रहस्थिती, फेज, इ.) वरुन आखले जातात याची कल्पना आहे. हा डेटा सहजरित्या अ‍ॅनलिटिक्स मध्ये आणण्यासारखा आहे. >>>>>

अनलिटिक्स मध्ये आणण्यासारखी कोणतीही गोष्ट शास्त्रच आहे, यावर तुमचा ठाम विश्वास दिसतोय, त्यामुळे यापुढे तुमच्याशी बोलण्यात अर्थ दिसत नाही.

केअशु, जमले तर माझे शंका निरसन करा,
तुमच्या संशोधनाला ऑल द बेस्ट

गुड नाईट,

सिम्बा - तुम्ही अजुन शास्त्र कि थोतांड यातच अडकुन पडला आहात. एखादी कान्सेप्ट सायंटिफिक मेथड्सने प्रुव करता येण्याजोगी असणे, अ‍ॅनलिटिक्स फ्रेमवर्क मध्ये बसण्याजोगी असणे हे कॅरॅक्टरिस्टिक माझ्या आणि बर्‍याच जणांकरता पुरेसं आहे. आता अ‍ॅनलिटिक प्रोसेस हि सायंटिफिक मेथड नाहि हे तुमचं ठाम मत असेल तर विषय संपला...

पूर्वग्रहदुषीत दृष्टीकोनाच्या प्रभावाखाली असताना, एखादि नविन कान्सेप्ट गळी उतरवुन, समजुन घेतलीच पाहिजे असा माझा आग्रह नाहि... Happy

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

>>>>>>>>

मी कर्क आहे. आणि हे मला जुळते . Happy
.
मला वाटते १२ राशींची अशी ठळक स्वभाववैशिष्ट्ये लिहून एक पोल काढला, तुमच्या राशीशी तुमचा स्वभाव जुळतो का? हो किंवा नाही.. तर त्या पोलच्या निकालावरून काही निष्कर्श काढता येईल.
जर असा पोल याआधी कुठे मोठ्या सँपल गटासाठी घेतला गेला असेल तर त्याचे रिझल्ट्स जाणून घ्यायला आवडतील.

Promoters of pseudoscience often adopt the vocabulary of science, describing conjectures as hypotheses, theories, or laws, providing "evidence" from observation and "expert" testimonies, or even developing what appear to be mathematical models of their ideas.

कन्सेप्ट प्रुव्ह कशी होणार हाच तर कळीचा मुद्दा आहे.मेथड कोणतीही वापरा.

ग्रहतार्‍यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम सिद्ध करता येईल?
लेखकाने ते किरण जिथे अन्य काही पोचत नाही, तिथे पोचून परिणाम करतात , असे म्हटले आहे. हे जोपर्यंत सिद्ध करता येत नाही, तोवर विज्ञान त्याला मान्यता देणार नाही.
हे समजणं फार अवघड नसावं. समजून घ्यायचंच नसेल तर प्रश्न मिटला.

Pages