चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना बी.. Happy सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, तर बरोबर आहे अन सं. काळी सैपाक करून जेवेपर्यंत ८:३० - ९:०० होतात तर तोपर्यंत रहावत नाई... दुपारी १- १:३० जेवलेले असते ना.. Sad

मला वजन ६८ वरून ४८ वर करावे लागेल.

मला भात खूप आवडतो किती प्रयत्न केला तरी बंद नाही होत.
ताटात घेताना मात्र तो योग्य प्रमाणात घेतला जात नाही.
>>
तुमचे वजन ह्या जन्मी तरी कमी होणे शक्य दिसत नाही. स्पष्टच बोलतो माफ करा...

इथे येऊन रोज चार पाच वेळा जेवावे लागते हे नवीनच माहिती पडले. आणि वर वजन कमी करण्याच्या गप्पा. केवढा तो विरोधाभास >>> चार पाच वेळा जेवावे लागते हे चुकीचे विधान आहे. तुम्हाला तुमच्या शरीराच्या गरजेप्रमाणे जितक्या कॅलरीज लागतात त्या चार-पाच वेळांत विभागून खा असे आहे ते.

अगो, आमच्या योगाभ्यासात असे सांगितले आहे की सकाळची न्याहरी/जेवण हे जेंव्हा पचून पोटातून साफ होईल तेंव्हा ती वेळ संध्याकाळच्या जेवणाची झाली असे समजा. मला हा नियम एकदम पटला. पोटात आधीच केंव्हाचे तरी अन्न असताना नवीन अन्न खाणे म्हणजे पोटावर प्रेशर येते.

हर्ट, तुम्ही प्लीज एखादा लेख लिहाल का योगाभ्यासावर....
वाचायला आवडेल...नवीन माहिती कळेल..आणि शक्य असेल तर आचरणात सुद्धा आणता येइल...

सूर्यनमस्कार कसे घालायचे , कधी किती काय कसे खायचे ई ई मुद्दे घेउन एक लेख लिहिवा ही विनंती...

शक्य असल्यास एक एक आसन details लिहा फक्त सूर्य नमस्कार नको पुर्ण योगाभ्यास होइल जमले तर chalenge म्हणुन बाकिचे पण सहभागी होतील

हर्ट, सुर्यनम्स्कारांबद्दल नक्कि लिहाच, बरोबर-चुकिचं यात्ला फरक सम्जेल. एखादा व्हिडीओ असेल तर तोही टाका इथे.

हर्ट, सुर्यनम्स्कारांबद्दल नक्कि लिहाच, बरोबर-चुकिचं यात्ला फरक सम्जेल. एखादा व्हिडीओ असेल तर तोही टाका इथे.

भात सोडला आहे मी १ जून पासून ( फक्त दोनच दिवस झाले आहेत ). अजून १ महिना तरी खाणार नाही असे ठरवले आहे. (बघू कितपत जमते ते पुढच्या ३ तारखेला नक्की सांगेन)

रात्रीचा आहार पण कमी केला आहे.

माझे काही प्रश्न आहेत -
१) सकाळी लिंबू - मध कोमट पाणी घेवून पीत होते पण खूप पित्ताचा त्रास चालू झाला.

लिंबू मुळे पित्त होते का ? लिंबू सोडून दुसरा काही वापरू शकते का? (कधी कधी साफी पिते मी)

२) मी रात्री जेवण न घेता फक्त कोमट दुध + women's horlicks घेते

रात्री दुध घेतले तर चालते का? अंड्याचे पांढरे बलक सकाळी नाश्तासाठी खाणे योग्य की रात्री जेवण न करता खाणे योग्य ?

संकेता, तुम्ही जसा महिनाभरासाठी भात सोडलात तशी महिनाभरासाठी साखर पण सोडायला जमेल का ?
अंड्यातले पिवळे बलकपण तितकेच महत्वाचे असते. जेवण किंवा नाश्त्याऐवजी उकडलेली ३-४ अंडी खाऊ शकता.

दुधात हॉर्लिक्स, बोर्नव्हीटा, साखर, गुळ हे न घालता फक्त हळद घालून घेणे उत्तम.

मला मदत हवी आहे. माझ्या पायाला दुखापत झाल्यामुळे व्यायामावर निर्बंध आले आहेत. डावा गुडघा दुखावलाय, फिजिओथेरपीचे व्यायाम चालू आहेत. ते झाल्यावर पायाच्या आवश्यक हालचालीसाठी २० ते २५ मिनिटं रोजच्या नॉर्मल गतीने चालणं, आणि ५ मिनिटं कूलडाऊन टाईम असं जास्तीत जास्त ३० मिनिटं चालायला सांगितलंय. सकाळी डब्याची घाई, कधीही येणारा पाऊस आणि गल्लीतले कुत्रे यामुळे मॉ वॉ बंद पडलं. जिममधे चौकशी केली तर ३ महिन्यांचं पॅकेज घ्यायला लावतायत, ज्यातला कोणताही व्यायाम मी सध्या करू शकत नाही. घरी ट्रेडमिल घेता येत नाही कारण लहान मूल असल्यामुळे रिस्क आहे.
तर, सिंहगड रस्त्याला असा काही 'ओन्ली ट्रेडमिल' पर्याय आहे का? मुलीच्या शाळेच्या वेळेत जास्त लांब न प्रवास करता चालायला जाता येईल म्हणून सिंहगड रस्ता.

वजन कमी करणं वगैरे कोणताही उद्देश सध्या नाही. फक्त पायाला (आणि पर्यायाने संपूर्णपणे) आवश्यक फिटनेस हवाय.

. सकाळी डब्याची घाई, कधीही येणारा पाऊस आणि गल्लीतले कुत्रे यामुळे मॉ वॉ बंद पडलंजास्त ३० मिनिटं चालायला सांगितलंय>>>>>>> संध्याकाळी तुमच्या इमारतीभोवती फेर्‍या मारा.पाऊस असेल तरच घरात फेर्‍या मारा.खरच याची मदत होते.

काल संध्याकाळी एफेम वर केदार जाधव म्हणुन आलेले ते तुम्ही होतात का? ते ही वजन वाढी/ वजन कमी करण्याबद्दल बोलत होते.१०६.४ वर बहुतेक

वर्ष झालं. व्यायाम, खाण्याच्या वेळा, पोर्शन कंट्रोल सगळच गंडलय.. इथे आले जरा मोटिव्हेशन साठी पण इथेही शुकशुकाट आहे.. सगळ्यांची वजनं आटोक्यात आलेली दिसतात..

जिम मध्ये व्यायाम करण्याचा बरोबर क्रम कोणता आहे, कोणी मार्गदर्शन करु शकेल का?
सध्या वेळ मिळत आहे आणि आवड तर आहेच म्हणून २० मि पासून चालू करून आता १००-१२० मि. व्यायाम करु शकत आहे. पण जिम मध्ये कोणी नसतं म्हणून मनानेच cardio, legs-arms stretching, weights, crunches असा क्रम ठेवलाय. हे बरोबर आहे का ? की ह्यात बदल केला पाहिजे?

कुरुडी, जिममध्ये आधी मशिन्स करुन मग कार्डिओ करायचं असं माझ्या ट्रेनरने सांगितलंय. >> धन्यवाद सायो. म्हणजे cardio सगळ्यात शेवटी करायचे का ? अगदी मॅट वरच्या व्यायामानंतर ?

मी मॅटवरचे व्यायाम करत नाही. जेव्हा ट्रेनरबरोबर वर्काऊट करते त्यावेळी ठरल्यावेळेच्या आधी पोचल्यास ती मला दहा मिनिटं ट्रेडमिलवर वॉर्म अप करायला सांगते आणि मग तिच्याबरोबर. ते झाल्यावर कार्डिओ. (एलिप्टीकल, ट्रेडमिल, स्टेअर मास्टर वगैरे काहीही).

वजन कमी करायचे असल्यास एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे चयापचय क्रियेचा वेग वाढवने.ज्याला मेटाबॉलिक रेट म्हणतात.रोज अर्धा तास एकतास व्यायामाने तात्पुरता मेटाबॉलिक रेट वाढतो.त्याऐवजि जिवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.रोजची कामं करताना चालत जाणे शक्य असल्यास तसे करावे.रोजचे किमान पाच किलोमीटर चालणे झाले पाहीजे.आहारात प्रथिनांचा वापर वाढवावा.त्याने मसल मास वाढते.मसल कॅरी करायला फॅटपेक्षा जास्त कॅलरी लागतात.

केदार गुर्जी कहां हो??
हा धागा सुरु झाल्यापासून जे मोटिवेशन मिळालं ते कायम आहे बर्का..
इथे बरीच नवीन नवीन माहिती मिळत राहिली..intermittent fasting बद्दल इथेच समजलं. सर्व फाॅलो ही केलं.
हवं तेव्हढं वजन कमी झालं कि maintain करायला हुरूप येतो. गेली दोन वर्ष वजन थांबलं आहे वाढायचं
थोडक्यात वजन मेंटेन करणे has become addiction
Happy
48kg. Forever!!!!
आता खाण्यात काही चीटिंग केलं.. तर दुसर-या दिवशी उपास किंवा नुसती फळं घेते. एक तास व्यायामाचा वाढवते.
This technique is working good for me.

केदार गुर्जी कहां हो??
हा धागा सुरु झाल्यापासून जे मोटिवेशन मिळालं ते कायम आहे बर्का..
इथे बरीच नवीन नवीन माहिती मिळत राहिली..intermittent fasting बद्दल इथेच समजलं. सर्व फाॅलो ही केलं.
हवं तेव्हढं वजन कमी झालं कि maintain करायला हुरूप येतो. गेली दोन वर्ष वजन थांबलं आहे वाढायचं
थोडक्यात वजन मेंटेन करणे has become addiction
Happy
48kg. Forever!!!!
आता खाण्यात काही चीटिंग केलं.. तर दुसर-या दिवशी उपास किंवा नुसती फळं घेते. एक तास व्यायामाचा वाढवते.
This technique is working good for me.

>> मस्त वर्षू.

माझही छान चालू आहे , वजन ८१ ८२ ला कॉन्स्टंट आहे . कितीही काम असल तरी एक तास व्यायाम चालू आहे . इन फॅक्ट एखाद दिवस नाही झाला तर आता कससच होत . फळ अन भाज्यापण आता Integral (अविभाज्य ?) भाग झाल्या आहेत जेवणाच्या .
फक्त हा चहा परत ४ कपावर पोचलाय , कुछ तो करना पडेगा Happy

Pages