चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंजि, बरोबर आहे. मी वेजिटेरियन आहे. अंडं खाते पण फक्त आणि फक्त ऑम्लेट किंवा बॉईल्ड एग ह्याच पद्धतीने खायला आवडतं. त्यामुळे हा एक आणि तोफू हे मेन सोर्सेस आहेत प्रोटीनचे माझ्याकरता.
कुरुडी, आणखीन एक. जर तुम्ही ट्रेडमिल किंवा एलिप्टीकलवर कार्डिओ करत असाल तर स्पीड इंटर्वल मोड ट्राय करुन पहा. मी ट्रेड्स्मिलवर दोन मिनिटं चालून दोन मिनिटं पळणं असं करते. तुमच्या स्टॅमिनाप्रमाणे हा स्पीड कमी जास्त करु शकता.

ओह.. केदार परत चार कप चहा चालू.. oops!
दोन कप चार वेळा पी .. हाहा...
>> Happy Happy येस , प्रयत्न चालू आहे Happy

मलापण आता व्यायाम मिस झाला तर चुकल्याचुकल्यासारखं होतं.
बाकी आता दिवाळी, लग्नसराई, परदेशात हॅलोविन, थँक्सगिव्हिंग वगैरे सिझनमध्ये डाएट सांभाळणे हे आव्हान आहे.

मधे काही महिने वाईट गेलेत. कामाचे टेन्शन, घरातले प्रॉब्लेम्स आणि एकुणच रुटीन मधे झालेले बदल ह्यामुळे सगळ विस्कळीत झाले होते/आहे. पण परत ट्रक वर येण्याचा प्रयत्न करत आहे.

कुरुडी, आणखीन एक. जर तुम्ही ट्रेडमिल किंवा एलिप्टीकलवर कार्डिओ करत असाल तर स्पीड इंटर्वल मोड ट्राय करुन पहा. मी ट्रेड्स्मिलवर दोन मिनिटं चालून दोन मिनिटं पळणं असं करते. तुमच्या स्टॅमिनाप्रमाणे हा स्पीड कमी जास्त करु शकता. >> हे ट्राय करून झालय पण नही जमेश. वेग जास्त केला की जास्त वेळ पुढे चालू नाही शकत. म्हणून सध्या स्टॅमिना वाढवण्यावर भर देतेय. जेवढा जास्त झेपतो तेवढा वेग पण वेळ वाढवतेय हळू हळू. आता व्यायाम क्रम बदलला की तुमची टिप पुन्हा वापरून पाहते.

सिंजी, वजन कमी करणे हा हेतू नाहिये सध्यातरी. बाकी प्रथिनाबद्दल तुमचं म्हणणं पटलं. मध्यंतरी माझ्या skin specialist मैत्रीणिकडून ऐक्लं की प्रथिनांमुळे water binding capacity वाढते आणि त्वचा कोरडी पडत नाही, म्हणून हिवाळ्यातच नाही तर सर्व ऋतुंमध्ये प्रथिनयुक्त आहार पाहीजे. एकंदरीत, प्रथिनांचं महत्व अबाधित आहे.

म्हणून हिवाळ्यातच नाही तर सर्व ऋतुंमध्ये प्रथिनयुक्त आहार पाहीजे. एकंदरीत, प्रथिनांचं महत्व अबाधित आहे.
>> ++१०० . विशेषतः आपल्या हल्लीच्या दिवाळी फराळात प्रथिन फारच कमी असतात , त्यामुळे वेगळी प्रथिन खात राहण लक्षात ठेवायला हव Happy

काल एक गॅस्ट्रीक बायपास सर्जरी बघितली युट्युबवर.आतड्याला इतकं व्हिसेरल फॅट चिकटलं होतं की डोक्टरला आतडं शोधायला वेळ लागला.ते पिवळं चिकट फॅट बघून कसेसेच झाले.
ज्यांचे बिएमाय ३५ ,४० च्या पूढे आहे आणि वजन उतरायला खूप त्रास होतो आहे.त्यांनी गॅस्ट्रीक बायपासचा ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही.वजन लक्षणीयरित्या कमी होते.अर्थात त्याचे ड्रॉबॅक्सही आहेत.
सध्या माझे वजन ७२ कीलो आहे ,मी ॲन्टीडिप्रेसंट घेत असल्याने वजन वाढले आहे .आदर्श वजन ६४ किलो आहे पण माझा प्रयत्न ५८ ते ६० जवळ जाण्याचा आहे.गेल्या आठवड्यात फक्त चालण्याने एक कीलो कमी झाले आहे.आहारात अजून प्रोटीन मात्रा वाढवली नाही आहे.रेट अजुन वाढेल.कॉलेजमध्ये चिपाड काटक्या असे मित्र् चिडवायचे.सध्या बैठी जीवनशैली असल्याने वजन वाढले आहे .
एक सल्ला.गृहीणींसाठी-बैठी जीवनशैली सोडा ,चालणे हा जीवनशैलीचा भाग बनवा.

खरंतर मी माबोवर वर्षभरानंतर येतोय. या आधिही फक्तं वाचकच होतो. पण मागच्या वर्षी हा धागा पहिलेला आणि त्यानंतर वजन कमी करायचं असही ठरवलेले. पण हो नाही म्हणता मे २०१७ मधे वजन कमी करायला सुरवात केली. माझं वजन ८५ होतं ते मला ७५ वर आणायचं होतं. सध्या ७६ आहे. तर मी काय केलं ते खाली देतोय.

१. दररोज ४५ मि. ते १ तास ब्रिस्क वॉक.
२. साखर जवळ जवळ बंद्
३. चहा ५-६ वेळा व्हायचा तो फक्तं एक वेळ, तोही बिन साखरेचा.
४. तळलेल अगदीच नगण्यं
५. ग्रीन टी १ ते २ वेळा
६. जेवणात बदल करण्या आधी मी दररोज किती कॅलरीज घेतो हे अंदाजे मोजलं. आणि ते प्रमाण बदलुन १२०० ते १५०० कॅलरीज मॅक्स असं केलं. आता ह्या १२०० ते १५०० कॅलरीज दिवसातल्या तीन मुख्य खाण्यात आणी २ फुटकळ खाण्यात विभागल्या. जेव्णात भाज्या आणी दाळीचं प्रमाण वाढवलं. जेवणातला भात कमी केला, अगदीच बंद नाही केला. खरंतर भाताने वजन वाढत असतं तर अक्खा साऊथ इंडिया वजनग्रस्तं असायला हवा होता. तेव्हा सध्या जे खातोय त्यात तेल साखरेवर नियंत्रण ठेऊन आणी आहारात थोडा बदल करुन वजन कमी करता येते

माझं २ महिण्यात ६ किलो कमी झालं. त्यानंतर १ महिन्यात अजून २ किलो.
पण मग कामानिमित्त्म भरताबाहेर जावं लागल्याने नियमितपणा तुटला आणि सध्या गाडी ७६ वर अडकली आहे. २०१७ संपेपर्यंत ७५ करायचच आहे. बघुया.

रात्रीच्या जेवणाचे काही ऑप्शन्स हवे आहेत..
डाएट सुरु केलं आहे.. त्यात रात्री फक्त व्हेज सुप आणि सलाड खायला सांगितलं आहे.. ते ठीक आहे पण रोज तेच नाही
खाता येणार सो रात्रीसाठी अजुन काही पर्याय आहेत का?

१) सकाळी ग्रीन टी + अ‍ॅपल
२) चने उकडलेले +ओट्स
३) एक फळ / मिक्स फ्रुट्स
४) दुपारी भाकरी भाजी
५) बटर मिल्क
५) सलाड
६) डिनर व्हेज सुप्+सलाड

असा प्लॅन आहे ..
रात्री चा थोड इशु आहे .. बाकी फॉलो कराय्ला सुरुवात केली आहे..
अवघड आहे पण हेल्थ फारच घसरत चालली आहे .. त्यामुळे सध्या तरी ही काळाची गरज आहे..
सो रात्रीसाठी अजुन काही पर्याय आहेत का?

रात्री विशेषतः ७ नंतर कमी खाण योग्यच आहे. सूपचा सल्ला बरेच जण देतात , पण पोट भरल्याची फिलिंग येत नाही.
मी एक फुलका अन वाटीभर वरण खायचो. पोट भरल्याचे फिलिंग पण अन कॅलरीजही कमी .
पण तुमचा ओव्हरऑल डाएट खूपच कमी वाटतोय , संध्याकाळी कमी खायचे असेल तर नाश्ता तगडा हवा.

आणखी एक , हे डाएट कुणी सजेस्ट केलय , कारण यात चणे वगळता प्रोटीन्स फारसे नाहीयेत , जे योग्य प्रकारे वजन कमी करायला अतिशय आवश्यक आहेत

धन्यवाद केदार..
दोनच दिवस झाले जिम सुरु केली आहे..तिथल्या इन्स्ट्रक्टर ने सान्गितलं.. परत जाउन शनीवारी डिटेल विचारायच आहे..
मी व्हेज आहे ..अंड पण खात नाही... काय स्त्रोत आहेत प्रोटिन चे व्हेज लोकांसाठी?
सकाळी ओटस दुधामधे सांगितले आहेत.. आणि नटस पण .. पण मी एकदम कमी तेल आणि टोमॅटो , कांदा टाकुन उपमा करुन खात आहे.. आणि दुध वेगळ घेत आहे विदाउट शुगर..
ओट्स उपमा पण ओके आहे ना?

कसं खायच?
म्हणजे प्रोटिन किति प्रमाणात कार्ब्ज किती..कळत नाही मला खुप वाचुनही...

Lol ..barobar aahe tumach.. tyane general sangital.. pan mala exactly kay khaw te kharach kalat nahiye .. kami plan karun khall tari lokanche hech prashn yetat pan protein tar nahiye.. carbs jast aahet.. fiber kuthey? .. mhanun wicharat aahe

आनंदी,
दही, दूध, कडधान्ये, पालक, सरसू वगैरे पालेभाज्या, फ्लॉवर,ब्रोकोली या सारख्या भाज्या, राजगिरा वगैरे पर्यायातून प्रोटिनची गरज भागवता येइल. मेथी दाण्यातही प्रोटिन असते. उसळ करता येइल.
ओट्स क्विक कुकिंग वाले वापरु नका.

डाळ डोसे करून खा.. (चणाडाळ, मुगडाळ, उडिदडाळ.. ) प्रोटीन साठी. किंवा ८/१० बदाम, ४ अक्रोड ...
कॅलरी, कार्ब, प्रोटीन वगैरे मोजायचे असेल तर MyFitnessPal ची App लाऊन घ्या. खाल्लेली प्रत्येक गोष्ट त्यात टाका. त्यावर हजारो भारतीय मण्डळींनी भारतीय पदार्थ टाकले आहेत. केळफुलाची भाजी, नारळाची चटणी पासून सगळे पदार्थ सापडतात.

त्यात रात्री फक्त व्हेज सुप आणि सलाड खायला सांगितलं आहे.. ते ठीक आहे पण रोज तेच नाही खाता येणार >>>>>

रोज सलाड खाऊ शकता. मी गेली दोन अडीच वर्षे झाली एक वेळ फक्त सलाड वर असतो. त्यातले एक वर्ष चार पाच किलो वजन कमी करायचे होते तेव्हा दोन्ही वेळ फक्त सलाड आणि उकडलेले पदार्थ खाऊन राहत होतो.

काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्ही बनवलेले कोणतेही सलाड हमखास चांगले होते.

१. सलाड मध्ये कायम एक पदार्थ ज्यूसी हवा म्हणजे टोमॅटो/ डाळिंब, काकडी, मका वगैरे. जे नैसर्गिकरित्या कोरडे आहेत ते पदार्थ एकाच वेळी सलाड मध्ये जास्त घेऊ नका. उसळी, कोबी,बीन्स वगैरे. बिट आणि गाजर शक्यतो तुकडे करून न टाकता किसून टाका. चव आणि रस दोन्ही मिळते.

2. पदार्थांची नैसर्गिक चव ध्यानात घ्या. सप्पक/आंबट/गोड/कडवट तिखट वगैरे. सगळे सप्पक पदार्थ एका वेळी सलाड मध्ये टाकू नका. किंबहुना एकाच चवीचे पदार्थ एका वेळी सलाड मध्ये घेऊ नका. एकाच घासात जिभेवर वेगवेगळ्या चवी आल्यास जास्त मजा येते.

3. डाळिंब, सुका मेवा, सुकवलेले बेरी, ऑलिव्हज, बाजारात मिळणारी मूग डाळ (माझी फेव्हरेट हल्दीराम), चांगले फरसाण, चिवडा, रोस्टेड सोयाबीन सिड्स, कॉर्न, बेबी कॉर्न यासारखे तुमच्या डाएट मध्ये चालू शकणारे पदार्थ हाताशी ठेवा. जर सलाडची चव बिघडली तर पटकन वरून थोडे टाकून खाता येतात. हे सगळे पदार्थ थोड्या क्वांटीटी मध्ये सुद्धा तुमची सलाडची पूर्ण चव बदलू शकतात.

4. बाजारात मिळणाऱ्या सॅलड्स किंवा नेट वरच्या सलाड पाककृती रेग्युलर सॅलड खाणाऱ्या लोकांसाठी फारकाही उपयोगी नाहीत. त्यातून पालेभाज्या, उसळी, फळभाज्या योग्य प्रमाणात मिळत नाहीत. तुम्ही तुमच्या डाएटीशीयन कडून दिवसभरात कोणते पदार्थ किती प्रमाणात पोटात गेले पाहिजेत हे लिहून घ्या. सकाळी ते सर्व पदार्थ सरळ टेबलवर मांडून घ्या. म्हणजे एक वाटी उसळ, एक वाटी डाळ, दोन वाट्या पालेभाज्या, दोन फळभाज्या, दोन फळे वगैरे जे काही असेल ते आणि मग ते दिवसभरात सलाड मधून कसे खाता येईल ते पहा. जे सलाड मध्ये जमणार नसेल ते शिजवून घ्या.
ज्या भाज्या अगदी कच्च्या खायच्या नसतील त्या वाफवून घ्या. त्या साठी बाजारात स्टीम बास्केट वगैरे मिळतात. वाफवून घेतल्यावर खाली जे पाणी राहील ते सूप म्हणून पिऊ शकता किंवा भाज्या, कणिक मळणे, शिरा, उपमा, थालीपीठ वगैरे जिथं पाणी लागतं त्या ठिकाणी वापरा.

5. डाळी, धान्य, सलाड ची चव बिघडवणाऱ्या वांगं वगैरे भाज्या ह्या नेहमीच्या भारतीय पद्धतीने शिजवून घ्या. सगळी धान्य खाण्यासाठी थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे.

६. शाकाहारी असाल तर सोयाबीन, फेटा चीज, पनीर वगैरे कायम आहारात ठेवा. काही ठिकाणी सोयाबीनची चांगली पावडर मिळते ती दुधातून वगैरे घेता येते.

सॅलड्सची चव जिभेवर रुळायला वेळ लागतो. पण एकदा सॅलड्स ची चव लागली की आपले नेहमीचे तिखट मसालेदार तेलकट जेवण नक्को नक्को वाटायला लागते Happy
पण त्याची सवय पूर्णपणे पण सोडू नका, कारण कधी प्रवासात काही खाल्लं गेलं किंवा कोण्या पैपाहुण्यांकडे आग्रहाखातर जेवायला लागलं की दुसऱ्यादिवशी पोटाची आणि आपली वाट लागते. Lol

अतरंगी, मस्त फोटो. माझं नुसत्या सॅलडवर भागत नाही. काहीतरी कार्ब्ज हवेत असं सारखं वाटत रहातं.
एक सांगू का? मका टाळता आला तर बघा. मला एका डाएटिशियनने डाएट करायचं तर कॉर्न नको सांगितलं होतं. बहुतेक एम्प्टी कॅलरीज म्हणून असावं.

सायो,

सॅलड्स प्रत्येक जण सारख्या कारणासाठी नाही खाणार ना ? प्रत्येकाचे डाएट वेगवेगळे असणार.

म्हणूनच मी "यासारखे तुमच्या डाएट मध्ये चालू शकणारे पदार्थ" हे लिहिले होते.

माझं नुसत्या सॅलडवर भागत नाही. >>>>

हे मानसिक असावे का? मला सलाड खाताना बघून बरेच जण हेच म्हणतात. आपल्याला पोळी भाजी भात भाकरीची सवय असल्याने असे वाटत असावे असे वाटते.

हो, प्रत्येकाचं डाएट वेगळंच असणार. पण मला म्हणायचं होतं की मका पौष्टीक वगैरे नाही मुद्दाम खायला. म्हणजे तुम्ही बीट घातलंत तर त्याचे फायदे आहेत, छोले घातलेत तर त्याचे आहेत. तसं मक्याचं नाही.
माझं सध्याचं आवडतं (काईंड ऑफ) हेल्दी फूड म्हणहे तोफू, मश्र्रुम्स, कलर्ड पेपर्स, एदामामे वगैरे स्टरफ्राय करुन खायचं. ह्याबरोबर बाकी कशाशी गरज नाही पण मला अर्धी वाटी भात खाल्ला तर जीवाला शांतता वाटते.

Pages