चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदी,
ऑफिसमधील नाष्ट्याऐवजी/ त्याला पुरक म्हणून घरुन फळं , जोडीला बदाम, अक्रोड असे नेता येइल. बाकी व्यायाम सुरु केलाय तर त्याने हळू हळू फरक पडेलच.

ऑफिसमधील नाष्ट्याऐवजी/ त्याला पुरक म्हणून घरुन फळं , जोडीला बदाम, अक्रोड असे नेता येइल> +१
१०० ग्रॅ. बदाम रात्री भिजवून, (सोलायला जमणार नसेन तर भाजलेले), १-२ अवाकाडो, उकडलेली अंडी (खात असाल तर)

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी LCHF डाएटचा विचार करायला हरकत नाही. मागे मी माहितीसाठी एक धागा काढला होता, सवडीने माझा अनुभव टाकते.

ब्लडप्रेशरसाठीच्या औषधाने - कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा ACE inhibitor प्रकारातील औषध असेल तर वॉटर रिटेंशन होवू शकते. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.>> थँक्स स्वाती!! संज्ञा कळली की त्यादृष्टीने डॉक्टरांना विचारणे सोपे जाते. मी बोलेनच नक्की माझ्या डॉकशी.

वजन
कमी करायच आहे तर .. बदाम काजू खाउ शकतो का?

हो.... तर दिवसातुन जस्तित जास्त किती?

बदाम नेहमी भिजवुन खायला का सांगतात?

साधे कडक का नाही?

बदाम नेहमी भिजवुन खायला का सांगतात?>> बदाम तसेच इतर नट्स (सुका मेवा), कडधान्य ह्यात phytic acid असते. ते पाण्यात विरघरळते. त्यामुळे बदाम हे साधारण १२ तास भिजवले की त्यातले phytic acid कमी होते किंवा बाहेर पडते. हे भिजवलेले बदाम परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायला हवे असतात. phytic acid हे पचनाच्या कामात बाधा आणते.
बदाम भिजवण्याचा दुसरा फायदा असा होतो की त्यातले न्युट्रिश्नल एन्झाइम्स हे बीज अंकुरण्याच्या कालावधीत सक्रीय होतात.

काही कारणाने बदाम भिजवणे शक्यच नसेन तर ते तुपावर भाजून मग वापरावे. भाजण्याच्या प्रक्रीयेत phytic acid कमी होते.

एका दिवसातून साधारण १०० ग्रॅ. (सधारण ७०-१०० नग) बदाम खावू शकता, अर्थात ही एका वेळच्या जेवणाला / नाश्त्याला रिप्लेसमेंट होऊ शकते.

शाकाहारी लोकांनी भिजवलेले बदाम(१२ तास), अक्रोड(८ तास), मकाडामिया(४ तास) , पिकन्स(८ तास), जवस ह्यांचा आवर्जून आहारात समावेश करावा. ह्यातून ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड (linolenic acid) मिळते.

कंसात भिजवण्याचा कालावधी दिला आहे.

macadamia, pecan हे ही नट्स आहेत. ह्यांना गुगलून पाहा.

काजू पण खायला हरकत नाही. चवीला अतिशय चांगले असल्याने जास्त खाल्ले जाणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यायला लागते. बदामात व्हिटामिन ई, कॅल्शिअम, फायबर हे अधिक असतात.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

धन्यवाद नलिनी. कमला सोहोनींच्या 'आहारगाथा' मधे कडधान्यांमधील phytic acid आणि tanin चा उल्लेख आहे, तसंच काही कारण बदामांचंही असेल असा अंदाज होता, पण खात्री नव्हती.

धन्यवाद केदार!

आज वजन परत चेक केलं. कंट्रोलमध्ये आहे. पण बॉडी फॅट काही कमी होत नाहीये. २७% आहे. नेमकं काय करायला हवं?

या धाग्यावर (बहुतेक) स्मूदी मद्दल वाचलं होतं. वेगवेगळ्या भाज्या/पालेभाज्या एकत्र मिक्सर मधून बारीक करून त्याचा ज्यूस पिल्याने भरपूर फायदा होतो.

कुणाला त्याची कृती माहिती आहे काय? अथवा दुसरी कुठली लिंक असल्यास कृपया द्यावी.

मैत्रीणीने स्मूदी पिऊन १० पौन्ड वजन कमी केले <<< असे करता येते, पण ते फार दिवस टिकत नाही.
इथे न्यू-जर्सी मधे कुणीतरी Accu-pressure वाल्याने बर्‍याच बायकाना वजन कमी करण्यास मदत केली.
कानामागे एक डाळीचा दाणा टेपने चिकटवला. आणि जोरदार डायेट.
(म्हणजे पहिल्या २४ तासात ११ औंस दुध फक्त... आणि असे बरेच काही)...
मधे भूक लागली की तो डाळीचा दाणा दाबायचा की मग भूक लागत नाही म्हणे....
महिन्याभरात या बायका एकदम सडसडीत बारीक झाल्या.
एकी दोघीना तर मी रस्त्यात भेटल्या तर ओळखू शकलो नसतो..
डायेट संपल्यावर, आता सहा महिन्यानी त्या पूर्वी होत्या त्या आकारात आहेत.

मला वाटते की पुर्णपणे फक्त स्मूदीचा आहारात समावेश करण्यापेक्षा (दुपारचे / संध्याकाळचे) जेवण किंवा नश्त्याऐवजी आठवड्यातून दोन चार वेळेस स्मूदी घ्यायला हवी.

भूक लागली की तो डाळीचा दाणा दाबायचा << म्हणजे कानामागे दाबायचा की कुठलीतरी नस दाबली जाते, आणि त्यामुळे मेंदूला भूकेचा संदेश पोहोचत नाही.. म्हणजे भूक लागत नाही.. असे आहे ते...

>>मला वाटते की पुर्णपणे फक्त स्मूदीचा आहारात समावेश करण्यापेक्षा (दुपारचे / संध्याकाळचे) जेवण किंवा नश्त्याऐवजी आठवड्यातून दोन चार वेळेस स्मूदी घ्यायला हवी.<< सहमत.

मी पण फक्त स्मूदीच घेणार नाहीये. मला भूक सहन होत नाही Sad आणि गेली काही वर्षे फक्त बाहेरचं खात होतो. आत्ता नाष्टा आणी दोन वेळचं जेवण व्यवस्थित आहे. पण अधून मधून खात राहायची सवय सुटत नाहीये :-(.

त्यासाठी अरबट-चरबट खाऊन भूक मारण्यापेक्षा स्मूदी नक्कीच चांगला पर्याय आहे. भूक पण मिटेल आणि आरोग्यदायी खाल्लं जाईल. त्या जोडीला व्यायाम पण सुरु करतोय.

नुकत्याच टेस्ट्स केल्यात ज्यात कोलेस्ट्रॉल जास्त आहे हे आढळलयं (अर्थातच!) आणी बी-१२/डी-३ ची भरपूर कमतरता आढळलेली आहे.

या सार्‍या अनुशंगाने हळूहळू जीवनशैली बदलायची आहे. Happy

बदामात ओमेगा ३ असते हे मी मायबोलीवर आणि देशातल्या आहारतज्ञांनी सांगितलेलं अनेकदा ऐकलं/वाचलं आहे. बहुतेक सगळ्या न्युट्रिशन वॅल्यु देणार्‍या वेबसाइट्सवर वॉलनट, जवस, काही प्रकारचे फिश हे सोर्सेस दिलेले दिसतात पण इतर कुठलेही नट्स त्या यादीत नसतात. काय गौडबंगाल आहे?

स्मूदी प्यायला सुरुवात होऊन २ दिवस झाले.
पहिल्या दिवशी, संध्याकाळी, शेपू Lol आणि आंबा वापरुन ग्लासभर पिलो, २.५-३ तास भूक लागली नाही.
आज सकाळी नाष्टाऐवजी एक मोठ्ठा ग्लास (पालक + केळी + ४-५ बदाम) स्मूदी घेतली पण यावेळी जास्त वेळ भूक सहन झाली नाही. Sad

म्हणजे सुरुवातीच्या काही दिवसात स्मूदी ही सप्ल्मीमेंट म्हणून घ्यावी लागेल असं दिसतय.

--

सिंडरेला,

ओमेगा-३ मलाही बाकीच्या नट्स मधे आढळले नाहीत. पण जवस हा उत्तम स्रोत आहे.

Pages