लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

पूर्वी मी माझी चित्रं ही पद्धत वापरून मा.बो.वर टाकू शकत होतो.पण, आता मी हवे ते चित्र निवडल्यावर "Send to Text" हा दुवाच कां येत नाही ?

गुगल ड्राईव्हवर 'Public on the web' असा ऑप्शन निवडल्यावर माझ्या इमेजची लिंक खालीलप्रमाणे दिसते.
img src="http://drive.google.com/uc?export=view&id=7259/6955194030_43e2dd2017_o" width="75%" height="75%"
ह्यातला कुठला भाग कट - पेस्ट करायचा आणि नक्की कुठे? हे कोणी सांगू शकेल का? धन्यवाद!

@ अनया, मी कदाचित आपणांस मदत करू शकेन.

वरील लिंक उघडत नाहीए.
Document looked up failed, असा मेसेज येतोय. आपण फोटो डिलीट केलाय का?

किंवा उदाहरणाकरिता दुसरी लिंक टाका.
आपण मोबाईल वर आहात की pc वर हेही सांगावे.

सचिन काळे, तुमचे मनापासून आभार!
साधना ह्यांच्या लेखात व्हॉटस् अॅपचा उपयोग करून इमेज अपलोड करता येते, असा उल्लेख वाचला. ते जमलं, असं दिसतंय.
लिंक जरा वेळाने पोस्ट करते.

मी एक नवीन लेख प्रकाशित केला आहे. त्यातली प्रकाशचित्रे मी लॉग-ईन केल्यावर दिसतात. नाहीतर नाही. असं का होत असेल? काय चुकतय माझ?

"हवे ते चित्र निवडल्यावर "Send to Text" हा दुवाच कां येत नाही ?" - आसा.

मोबाइल फायरफॅाक्समध्ये "incert file" button दिसत आहे. मोबाइल IE11मध्ये " send to text" येत नाही. आता काही नवीन सुधारणा आहे का?
फेसबुक/ ब्लॅागरच्या लिंक्स टाकून फोटो सहज टाकता येतो. पण हे एक टेस्ट म्हणून.

मला रंगपेटी उपक्रमात चित्र पाठवायचे आहे . गुगल फोटो मधून चित्र कॉपी होते आहे पण प्रतिसाद तपासा म्हणले कि खालील मेसेज येतोय .

The trimmed version of your post shows what your post looks like when promoted to the main page or when exported for syndication. You can insert the delimiter "" (without the quotes) to fine-tune where your post gets split.

मदत करा .

मला एका लेखात काही उभ्या इमेजेस टाकायच्या आहेत.
खाजगी जागेत त्या इमेजेस अपलोड केल्यावर आडव्या दिसतात. लेखात इन्सर्ट केल्यावरही आडव्याच राहतात. त्या रोटेट कशा करायच्या?

मी गुगल ड्राईव्ह वरुन फोटो अपलोड करायला खालील पद्धत वापरत आहे.

१. गुगल ड्राइव्हवर फोटो शेअर करताना Who Can Access मध्ये "Public on the web - Anyone on the Internet can find and view"
असे सिलेक्ट करतो.
२. Get sharable link वर टिचकी मारुन लिंक paste करुन घेतो, खालील प्रमाणे.
https://drive.google.com/open?id=1PSblRPObFPx9QM4-4MLukOG3143ye16J

३. वरील paste केलेल्या लिन्क मधुन id कॉपी करुन तो खालील लिन्क मध्ये पेस्ट करतो:
< img src="https://drive.google.com/uc?export=view&id=1PSblRPObFPx9QM4-4MLukOG3143ye16J" width="100%" height="100%"/ >
( < image आणि / > मधली स्पेस काढुन).

असा अपलोड केलेला फोटो काही लोकांना दिसतो, तर काही लोकांना दिसत नाही.
माझे काय चुकतेय?

वरील पद्धतीनेच खाली फोटो देत आहे.

मानव, हे करून पाहा.
गुगल ड्राइव/ फोटोजमधले फोटो साइटवर टाकणे.

हे करण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात.
१) गुगल ड्राइव उघडून त्यामध्ये " गुगल फोटोज" हा फोल्डर आहे का पाहणे, नसल्यास तो आणणे. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन पाहता येईल. मोबाइलवरून करत असल्यास ब्राउजरमधल्या सेंटिंग्जमधून प्रथम डेस्कटॅाप पेज ओपन करणे.
२) गुगल फोटोजमध्ये दोनतीन फोटो अपलोड करा आणि सिलेक्ट फोटोज, क्रिएट न्यु अॅल्बम, मग ओप्शनस उघडून पब्लिक अॅक्सेस द्या.
म्हणजे ते दोनतीन फोटो त्या शेअरेबल अॅल्बममध्येही जातात. आता तो अॅल्बम उगडल्यावर ते दोन फोटो दिसले पाहिजेत. मग एकावर क्लिक करा , फोटो मोठा दिसल्यावर टुलबारमधून शेअरिंग लिंक(A) कॅापी करा.
३) आता https://ctrlq.org/google/photos/
ही साइट उघडून त्यातल्या "paste your link here" चौकोनात ती (A) लिंक पेस्ट करा. खालच्या चौकोनात "generate code" बटणावर क्लिक केल्यावर पेज आपोआप स्क्रोल होऊन direct link आणि embed link चे चौकोन येतात त्यातली direct link कॅापी करून फोटोला वापरा.

जर का पेज स्क्रोल न होता "try another link" हा मेसेज आला तर तुमच्या वरच्या १ ) आणि २) स्टेपमध्ये चूक आहे.
आताच्या तुम्ही दिलेल्या फोटोची लिंक या तिसऱ्या साइटवर टाकल्यावर हेच होत आहे.

गुगल फोटोज फोल्डर "ड्राइव"मध्ये नसला तर फक्त अॅल्बम शेअरिंग करून काही उपयोग नाही.

Srd विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.
हे करून बघतो.

-----------
केले, मला तरी दिसतोय फोटो, होप सगळ्यांना दिसेल.
डायरेक्ट लिंक ऐवजी Image Embed Code कॉपी पेस्ट केल्यावर फोटो दिसतोय.
परत एकदा धन्यवाद.

मानव,
तुमची image link मायबोली खासगी जागेतली नसेल ,इतर कुठल्या शेअरिंग साइट्सवरची असेल तर खालील टेम्प्लेट्स वापरा.

आडव्या फोटोसाठी

फोटो क्र
<img src="इथेलिंकपेस्टकरा" width="640"/>

उभ्या फोटोसाठी

फोटो क्र
<img src="इथेलिंकपेस्टकरा" width="480"/>

इथेलिंकपेस्टकरा हा शब्द बदलून लिंक पेस्ट करा आणि जिथे फोटो हवा असेल तिथे तयार झालेलं टेम्प्लेट लेखात टाका. हे विशेष उपयोगी आहे कारण आपण एखादा लेख ओफलाइन नोटमध्ये लिहू शकतो आणि नंतर लेख पटकन अपलोड करता येतो.
फोटो क्र हा लिंकच्या बाहेर मुद्दाम टाकला आहे. कारण फोटो उमटल्यावर त्याला क्रमांक राहतो आणि बरेच फोटो लेखनात असले की निर्देश करणे सोपे जाते.

( ज्या नोट अॅप्समध्ये लिंक्स अॅक्टीवेट न होता राहतात ती अॅप्स वापरायची.)
__________
( आणखी महत्त्वाचं ---

गुगल ड्राइववर फोटो टाकण्यापेक्षा गुगल फोटोजमध्ये अपलोड करा आणि टीप क्र १ मधली फोल्डर add कृती करा.

अॅन्ड्राइड मोबाइल वापरत असाल तर फोनमध्ये एक Gmail account सेटअपमध्ये कायम लॅागिन असते त्या मेल अकाउंटशी संलग्न गुगलफोटोज वापरायचे नाही. कारण फोटो डिलीट होऊ शकतात चुकून. दुसरे एक gmail account क्रोम अथवा फायरफॅाक्स ब्राउजरमधून लॅागिन करून त्याच्या ड्राइववर फोटो टाकायचे. )

माझ्या व्हिएतनाम प्रवासवर्णनाचे काही फोटो वाचकांना दिसत नाहीत, त्याऐवजी लिंक दिली जाते,जर त्यांना ते फोटो पहायचे असतील तर त्यांना काय करावे लागेल?

मी आता खालील संमिश्र पद्धत वापरतो. यात गुगल ड्राइव्हमध्ये फोटो फक्त तात्पुरता ठेवावा लागतो. एकदा माबोवर फोटो दिला की मग गुगल ड्राइव्हमधून काढून टाकला तरी चालतो. मोबाईल फोनवरुनही फोटो माबोवर चटकन देता येतो.
खाली मोबाईल फोन वरून माबोवर फोटो देण्याच्या स्टेप्स दिल्या आहेत.

१. हवा तो फोटो गुगल ड्राइव्हमध्ये नेऊन ठेवा.
२. गुगल ड्राइव्हमध्ये त्या फोटोची लिंक शेअरिंग एनेबल करा आणि मग कॉपी लिंक वर टिचकी मारून क्लिपबोर्डला लिंक कॉपी करून घ्या.
३. आता https://ctrlq.org/google/photos/ या साईटवर जा.
४. तिथे "Paste google photos link here" मध्ये ही गुगल ड्राइव्हची लिंक पेस्ट करा. आणि "Generate Code" वर क्लिक करा.
५. ती वेबसाईट आता आपोआप स्क्रोल डाऊन होईल (न झाल्यास तुम्ही करा) आणि तिथे "Direct Link (URL)" व "Image Embedded Code" या फिल्ड्स दिसतील. त्यातील "Image Embedded Code" आपल्या कामाचा आहे. त्यातील लिंक कॉपी करून माबोवर हवी तिथे पेस्ट करा.
झाले.

माबोवर फोटो दिसला की आता गुगल ड्राइव्हमध्ये लिंक शेअरिंग बंद करू शकता किंवा तिथून फोटो काढूनही टाकू शकता.

>>एकदा माबोवर फोटो दिला की मग गुगल ड्राइव्हमधून काढून टाकला तरी चालतो>>>

???
नाही.

------
एकतर गुगल ड्राइव किंवा फोटोज वापरा. पण तो मायबोली लेखात टाकल्यावर गुगलमधून काढल्यावर लेखात दिसणार नाही.

भाग दुसरा मध्ये दोन फोटोंच्या लिंकस पाहिल्या त्या मायबोली अकाउंटवरच्याच आहेत पण ब्राउजर अॅड्रेसबारमध्ये टाकल्यावरही 'फोटो नॅाट फाउंड' मेसेज येतोय.

खासगी जागेत अपलोड केलेले फोटो पुन्हा तपासा. एकेक फोटो एन्ट्रीवर क्लिक केल्यावर खाली फोटो मोठा दिसला पाहिजे. त्या मोठ्या फोटोवर क्लिक करून त्यातली लिंक कॅापी करा.
ती लिंक

<img src="लिंक" width ="480"/>

या टेम्प्लेटात टाकून प्रतिसादात ( अथवा संपादन करून लेखात) टाका. फोटो दिसतील.

Pages