१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.
पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.
बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...
यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.
कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.
तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.
पण खरे बोलणाऱ्याचा खरेपणा
पण खरे बोलणाऱ्याचा खरेपणा चेहऱ्यावर दिसतो, जो कंगनाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
>>>>>
ती अभिनयात तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे हे विसरू नका
हो, ते आहेच. पण तरीही.
हो, ते आहेच. पण तरीही. तिने ऑस्कर बद्दल जे बोलली तेही आवडले.
ऐश्वर्या राय सिमी गरेवालच्या रांदेऊ विथ सिमी मध्ये आलेली. इतका नाटकीपणा त्या आधी व त्या नंतर कधीही पाहिला नाही. त्या मानाने ही एकदम फ्रॅंक, हे आहे ते आहे सांगणारी वाटली.
बिपिनचन्द्र, मी गॉनकेस सायको
बिपिनचन्द्र, मी गॉनकेस सायको वैगेरे काही म्हटलं नाहीये तिला.
मला कशाला +१ देताय
मला सांगायला अत्यंत मजा आणि
मला सांगायला अत्यंत मजा आणि लाज वाटते की मी या शब्दाचा उच्चार मनात रॅंडेझॉवस असा करायचे
सुदैवाने प्रकट उच्चार करण्याची वेळ आलीच नाही
ती अभिनयात तीन राष्ट्रीय
ती अभिनयात तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे हे विसरू नका >>
एकाच चष्म्यातून सर्वांना पहायची सवय असेल तर असे घोळ होऊ शकतात. अभिनेत्री असली आणि पुरस्कार विजेती असली तरिही शेवटी माणूस आहे ना? आणि आपल्या काही हळव्या आणि संवेदनशील क्षणांबद्दल बोलताना अभिनय कोण करेल? आणि केला तरी तो कळलाच असता की. तिच्या चेहर्यात तिचा सच्चेपणा दिसतोय हे रजत कपूर ने ही मान्य केलं.
मि अनु, मी पण सेम टू सेम बै
मि अनु, मी पण सेम टू सेम
बै मला तर उच्चार पण नीट् लिहिता आला नसता इथे 
मी पण सेम टू सेम Lol बै मला
मी पण सेम टू सेम Lol बै मला तर उच्चार पण नीट् लिहिता आला नसता इथे>>>
फ्रान्समध्ये शब्दाचे
फ्रान्समध्ये शब्दाचे स्पेल्लिंग जसे दिसतेय तसाच शब्द उच्चारला तर कायमचे देशाबाहेर फेकून देतात.

(No subject)
साधना हो, मी ते असेच गंमतीने
साधना हो, मी ते असेच गंमतीने म्ह्टले. माझेही तिच्याबद्दलचे मत सकारात्मकच आहे. किंबहुना या विडिओची लिंक ईथे मी त्याच नोटवर दिलीय. निम्मा विडिओ अजून बघायचा बाकी आहे. निम्मा पाहिला त्यात भारी वाटली म्हणून हा धागा आठवला.
@ दक्षिणा, कुठला चष्मा? मला नंबर नाहीये. मी फक्त गॉगल वापरतो आणि ते ड्रेसला मॅचिंग बदलतो.
बाकी मी माझे मत कोण्या रजत कपूरने काय मान्य अमान्य केलेय यावर ठरवत नाही. हजार लोकं ज्या माणसाला वाईट बोलत असतील पण मला त्यात चांगले गुण आढळले तर मी त्याला चांगलेच बोलतो. हजार लोकं काय विचार करतात हे माझ्यासाठी महत्वाचे नाही
दक्षिणा, कुठला चष्मा? मला
दक्षिणा, कुठला चष्मा? मला नंबर नाहीये. मी फक्त गॉगल वापरतो आणि ते ड्रेसला मॅचिंग बदलतो.
बाकी मी माझे मत कोण्या रजत कपूरने काय मान्य अमान्य केलेय यावर ठरवत नाही. हजार लोकं ज्या माणसाला वाईट बोलत असतील पण मला त्यात चांगले गुण आढळले तर मी त्याला चांगलेच बोलतो. हजार लोकं काय विचार करतात हे माझ्यासाठी महत्वाचे नाही >>
टोटली असंबद्ध प्रतिसाद दिला आहेस तु ऋन्मेष. रजत कपूर चा उल्लेख कॅश करणं गरजेचं नव्हतं. त्याचा उल्लेख निव्वळ इतक्यासाठी केला की अनेक मातबर लोकांचे (मुरलेल्या अभिनेत्यांचे) इन्टरव्ह्यु घेतल्याने तो माणसे बरोब्बर ओळखू लागला असेल त्यामुळे त्याने जर एखादे स्टेटमेंट केले असेल तर ते सत्य म्हणून ग्राह्य धरायला हरकत नाही.
पण मी हे तुला का सांगतेय तेच मला कळत नाही.. कारण त्या इंग्रजी बोलण्यावरून काढलेल्या धाग्याच्या वेळेसच मला कळून चुकलं होतं की मी जे बोलते (माझ्या पोस्ट्स) ते तुला कळत नाही.
रिडिंग बिटविन द लाईन्स नावाचा एक प्रकार आहे अस्तित्वात तो तुला माहित असेल असं धरून चालते.
बाकी माझ्या प्रतिसादात जे कमी महत्वाचं होतं ते तु बरोब्बर उचललंस...
बाकी >> अभिनेत्री असली आणि पुरस्कार विजेती असली तरिही शेवटी माणूस आहे ना? आणि आपल्या काही हळव्या आणि संवेदनशील क्षणांबद्दल बोलताना अभिनय कोण करेल? आणि केला तरी तो कळलाच असता की.>> हे महत्वाचं गाळलंस... :टाळ्या:
दक्षे
दक्षे

हे महत्वाचं गाळलंस... :टाळ्या
हे महत्वाचं गाळलंस... :टाळ्या: Happy
>>>>>>>
बहुतेक आपण माझ्या येथील पोस्ट गाळल्यात. हा धागा मी कंगणाच्या कौतुकातच काढला आहे आणि आताही तिच्या विडिओचे कौतुकच करत वर आणला आहे.
साधना यांना मी फक्त एवढेच सांगितले की पडद्यावर जे दिसते वा समोरची व्यक्ती आपल्याला जसे दाखवते तसे ते असेलच असे नसते.
तर आपण चष्म्यामध्ये शिरलात ज्याचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वगह बाळगणे. पण मूळात मी कंगणाचे कौतुक केले आहे हेच विसरलात
राहिला प्रश्न रजत शर्माचा, तर ....
<<<<< अनेक मातबर लोकांचे (मुरलेल्या अभिनेत्यांचे) इन्टरव्ह्यु घेतल्याने तो माणसे बरोब्बर ओळखू लागला असेल त्यामुळे त्याने जर एखादे स्टेटमेंट केले असेल तर ते सत्य म्हणून ग्राह्य धरायला हरकत नाही. ><<<<<<<
याला म्हणतात चष्मा
अगेन टोटली असंबद्ध प्रतिसाद.
अगेन टोटली असंबद्ध प्रतिसाद.
तु कंगनाचं कौतुक केलं नाहिस असं आम्ही म्हटलंच नाही. पण तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती त्याच्या जोरावर स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी मॅनिप्युलेट करेल हे तुझं विधान आहे त्याला मी चष्मा म्हणाले.
आणि रजत कपूर बद्दल मी जे स्टेटमेंट केलं तो चष्मा नसून, त्याच्या प्रोफेशनमुळे त्याला प्राप्त झालेल्या कौशल्याचं कौतुक आहे. शिवाय त्याने बोललं ते ब्रह्मवाक्य असं सुद्धा मी म्हणाले नाही, फक्त ग्राह्य धरू शकतो इतकंच बोलले.
बाकी झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही हेच खरं.
पण तिच्या अभिनय कौशल्यामुळे
पण तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती त्याच्या जोरावर स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी मॅनिप्युलेट करेल हे तुझं विधान आहे त्याला मी चष्मा म्हणाले.
>>>>>>
का नाही???? का मॅनिप्युलेट करू शकत नाही??
तुम्हाला पुर्ण खात्री आहे का की हे असले शो अगदी सरप्राईजिंगली असतात... ईथे काय प्रश्न विचारले जाणार आहेत याची आधीच माहिती असणे सहज शक्य आहे.. आणि त्याची उत्तरे ठरवूनही जाणे शक्य आहे.. तसेच त्या उत्तरांवरून निघणारे प्रश्नही.. म्हणजे सारे स्क्रिप्टेड ही असू शकतेच. जर या मुलाखती उत्स्फुर्त नसतील तर ठरवून अभिनय करणे शक्य आहेच
राहिला रजत शर्मा...... तर हे >>>> त्याने जर एखादे स्टेटमेंट केले असेल तर ते सत्य म्हणून ग्राह्य धरायला हरकत नाही. ><<<<<<< कोणीही महान आत्म्याने म्हटले म्हणून ते सत्य मानून मी पुढे जात नाही ईतकेच. बाकी रजत शर्माबद्दल मनात आदर आहेच
कृपया मला माफ कर __/\__ उगिच
कृपया मला माफ कर __/\__ उगिच आले तुझ्या धाग्यावर.
बाय.
फर्स्ट हाफ तर नुसता ट्रेलर
फर्स्ट हाफ तर नुसता ट्रेलर होता... असली पिक्चर तर हृतिक शो ला सुरू झाला. केवढे ते नाट्य, केवढे ते लफडे, जराही कल्पना नव्हती या सर्वाची. प्रश्न पडलाय की हृतिक खरेच असा वाह्यात होता की येड्यासारखा चुकांवर चुका करत वाहावत गेला. मला कालपर्यंत भला माणूस वाटायचा तो
बाकी मेरे बड्डे पार्टी मे लोटपोट होके नाचता था, आणि फ्लॉप हो जाता है तो बाप के पैसे पे फिर लॉंच हो जाता है वगैरे भारी डायलॉग आहेत एकेक
आता ईतर संबंधित
आता ईतर संबंधित सेलेब्रेटींच्या प्रतिक्रिया बघायलाही मजा येईल... कोण कोण या प्रकरणात गुंतलेय बघायला हवे..
बाकी त्या वूमन्स कमिशन की काय त्याचीही भारी लाज काढली !
आताच बघितली ही अदालत...
आताच बघितली ही अदालत...
अच्छा है......! असो!
कृपया मला माफ कर __/\__ उगिच
कृपया मला माफ कर __/\__ उगिच आले तुझ्या धाग्यावर.
अगदी असेच करावे लागते. साधा ऋन्मेऽऽषचा प्रतिसाद जरी आला तरी पुढील धोका लक्षात घेऊन स्क्रोल करावे लागते. त्यामुळे चांगल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष होते. आणि त्याच्या आवडीचे विषय असतील तर विचारायलाच नको.
बाय. >>>>
तेच तेच चघळून चोथा झालेले विषय दुसर्यांच्या गळी उतरवण्याचे काम
मायबोलिवर हे खुपच खेदजनक आहे.
अरेच्या त्याच्या धाग्यावर तोच
अरेच्या त्याच्या धाग्यावर तोच मते मांडणार ना
मुळात धागा माझा किंवा तुझा
मुळात धागा माझा किंवा तुझा असे काही नसते. आपण सारेच मायबोलीनामक प्लॅटफॉर्म वापरून चर्चा करत असतो. त्यामुळे हा धागा कंगणाचाच आहे, तिच्यावरच चर्चा करूया.
माझ्या अजून या वादावरच्या विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया बघायच्या बाकी आहेत,
मात्र आदित्य पांचोली, त्याची बायको, हृतिक रोशन, त्याचे पिताश्री, करण जोहार, आणि त्याचा कंपू ईत्यादी बरीच मंडळी कंगणावर संतापली आहेत. अगदी ते वूमन कमिशनवाले सुद्धा भडकले आहेत. आणि सर्वच कंगणावर कायदेशीर कारवाई करनार आहेत असे वाचण्यात आले आहे.
त्या केसचा निकाल लागेल तो लागेल मात्र कंगणाची चित्रपट कारकिर्द धोक्यात आहे हे नक्की. आणि तिने देखील यासाठी मनाची तयारी केली आहे असे वाटतेय.
चील धोंडू चील.... पडदे की
चील धोंडू चील.... पडदे की पिछे बहोत बडी हलचल है.... 'सिमरन' आ रही है...
मुलाखत छान होती फक्त ते सतत
मुलाखत छान होती फक्त ते सतत टाळ्या वाजवणं डोक्यात जातं. तीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच टाळ्या.
'सिमरन' आ रही है...
'सिमरन' आ रही है...
>>>>>
पब्लिसिटी साठी वाद निर्माण करणे वेगळे, पण या लेव्हलचे आरोप करत पंगे घेणे... जरा पचायला जड जातेय.
म्हणजे कंगणा नाटक करतही असेल.. पण पांचोली, जोहर, ऋत्विक, वूमन्स कमिशन वगैरे सर्वांना याची कल्पना असेल का आणि ते यात सामील असतील का? नसतील तर हे पंगे खरोखर महागात नाही का पडणार? की त्यांनाही दोनचार करोड पोहोचले असतील आणि तेवढ्या पैश्याकडे बघून ते यात सामील झाले असतील? नेमके काय???
मुलाखत छान होती फक्त ते सतत
मुलाखत छान होती फक्त ते सतत टाळ्या वाजवणं डोक्यात जातं. तीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच टाळ्या.
>>>>>
त्या लोकांना त्याच कामासाठी वा त्याच अटीवर तिथे बसवलेले असते.
दक्षिणा यांच्याशी चर्चा
दक्षिणा यांच्याशी चर्चा करताना मी त्यांना एक प्रश्न विचारलेला, पण त्यानंतर त्या धागा सोडून गेल्याने त्याचे उत्तर राहिलेय,
ईतरांसाठी तोच प्रश्न इथे पुन्हा कॉपीपेस्ट करतो. ईतरांनी उत्तरे दिल्यास आवडेल
"
का नाही???? का मॅनिप्युलेट करू शकत नाही??
तुम्हाला पुर्ण खात्री आहे का की हे असले शो अगदी सरप्राईजिंगली असतात... ईथे काय प्रश्न विचारले जाणार आहेत याची आधीच माहिती असणे सहज शक्य आहे.. आणि त्याची उत्तरे ठरवूनही जाणे शक्य आहे.. तसेच त्या उत्तरांवरून निघणारे प्रश्नही.. म्हणजे सारे स्क्रिप्टेड ही असू शकतेच. जर या मुलाखती उत्स्फुर्त नसतील तर ठरवून अभिनय करणे शक्य आहेच
"
मर्फी'ज लॉ > जे होण्यासारखं
मर्फी'ज लॉ > जे होण्यासारखं असतं ते होतंच... तेव्हा तुम्ही वर लिहिलेल्या सर्व शक्यता खर्या असू शकतात ना?
सिमरन चा ट्रेलर बघा भाऊ, काही लिण्का लागल्यात तर लागल्या....
या वेडसर सायकोचा चित्रपट दूर
या वेडसर सायकोचा चित्रपट दूर ट्रेलरही पाहवत नाही
पाहिला आताच सिमरनचा ट्रेलर.
पाहिला आताच सिमरनचा ट्रेलर.
दर दुसर्या चित्रपटात कंगणा जशी असते तशीच दिसली. त्यामुळे ते कॅरेक्टर उचलून घ्यायला असले काही स्टंट करायची गरज भासू नये.
Pages