गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपूर्ण असहमत!

मला ऑफिसमध्ये रोज ८ तास काम करून ८० हजार पगार मिळत असेल, आणि भले त्यात माझे मस्त भागत असेल, तरी मी एखाद्या शनिवारी फक्त तासभर रमतगमत काम करून मिळणारे १० हजार रुपये सोडणार नाही.

पैसा मिळेल तितका कमी असतो, आणि तो देखील सहज मिळणारा कोणी सोडेल का?

चित्रपटापेक्षा जाहीरातींची कमाई नक्कीच श्रमाच्या तुलनेत जास्त असते, तसेच त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीही मिळते जी या क्षेत्रात गरजेची असते.

<< मला ऑफिसमध्ये रोज ८ तास काम करून ८० हजार पगार मिळत असेल, आणि भले त्यात माझे मस्त भागत असेल, तरी मी एखाद्या शनिवारी फक्त तासभर रमतगमत काम करून मिळणारे १० हजार रुपये सोडणार नाही. >>

नाही, हे तितके सोपे गणित नव्हे. तुम्ही शनिवारी रमतगमत काम करून १० हजार मिळणार असले पण जर का ते काम न केल्याने तुम्हाला जबर प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळणार असेल व त्या प्रसिद्धीमुळे पुढे तुमचा भाव आणखी वधारणार असेल तर ते काम सोडण्यातच जास्त फायदा आहे, फक्त तुम्ही ते काम सोडल्याची पुरेशी प्रसिद्धी होईल असे पाहावे. हल्ली पी आर (पब्लिक रिलेशन्स) एजन्सीज् (अर्थात जनसंपर्क दलाल) ह्याच कामाचे चोख पैसे घेतात.

क्या बाता है, आधीच या देशात चांगले विचार आणि चांगली माणसे कमी आहेत आणि जे तसे करताहेत त्यांना ते पब्लिसिटी स्टंट किंवा इमेज सुधारायचा प्रयत्न तर नाही ना हे आधी सिद्ध करावे लागतेय.

या न्यायाने अगदी स्वातंत्र्यवीरांनाही त्यांची देशभक्ती सिद्ध करावी लागेल. की त्यांनी देखील ईतिहासाच्या पुस्तकात आपले नाव यावे, तसेच आपल्या वारसांना स्वातंत्र्यवीराच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी तर नाही ना तुरुंगाची हवा खाल्ली.

असो, पण हे क्लिष्ट गणित असू शकते असे मानले तरी ते या केसमध्ये आहे की नाही हे ओळखायचे कसे?
तसेच यातून मिळणार्‍या प्रसिद्धीच्या फायद्याची बेरीज वजाबाकी मांडता नक्कीच कंगणाला तितका फायदा होईल का याचा? आणि नेमका कसा होईल? म्हणजी नवनवीन जाहिराती मिळतील वा तिचे चित्रपटाचे मानधन वाढेल वगैरे? आणि किती? कारण त्याची खात्री असल्याशिवाय कोणी हातातली कोंबडी सोडायचा जुगार खेळेल का? बरे वर आपण म्हणता तसे त्या पी आर (पब्लिक रिलेशन्स) एजन्सीज् (अर्थात जनसंपर्क दलाल) यांना पैसेही द्यावे लागतात, ते देखील चोख. म्हणजे हातातले पैसे सोडत वर स्वताचेही चार जोडायचे.

असो, मी माझ्यातर्फे एक गोष्ट इथे क्लीअर करू इच्छितो, मला हा धागा काढून तिला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी एकही पैसा मिळाला नाही. Happy

या न्यायाने अगदी स्वातंत्र्यवीरांनाही त्यांची देशभक्ती सिद्ध करावी लागेल. की त्यांनी देखील ईतिहासाच्या पुस्तकात आपले नाव यावे, तसेच आपल्या वारसांना स्वातंत्र्यवीराच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी तर नाही ना तुरुंगाची हवा खाल्ली.
>>>

तुमचे डोके ठिकाणावर आहे का?

Hmm

हा हा.. नो प्रॉब्लेम रीया.. झालीच तर अनप्रेडीक्टेबल अशी नवीन इमेज होईल, आणि ती पण खूप ईंटरेस्टींग आहे Happy

आपल्या पैसे मिळवण्याच्या कामाची आणि नट/नटी म्हणून बय्रापैकी स्थिर झाल्यानंतर त्यांनी नाकारलेल्या कामाची बरोबरी/तुलना कशी होईल?सलमान वगैरे नट गोविंदा /गणेशविसर्जनात हजेरी लावतात -आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आणि एवढा वेळ काढताना काही निर्मात्यांना तारखा देत नाहीत.एखादा नवखा नट अशा जाहिराती नाकारून पैसा आणि प्रसिद्धि दोन्ही गमावेल.देशभक्ताीचा संदर्भ इथे नाही पटला.
कंगनाला चांगल्या जाहिराती मिळोत हीसदिच्छा देतो.

बय्रापैकी स्थिर झाल्यानंतर त्यांनी नाकारलेल्या कामाची >>>

हाच द्रुष्टीकोणच मला चुकीचा वाटतो.
या केसमध्ये तर असले काम स्थिर झाल्यावरच ऑफर होणार.
तसेच स्थिरस्थावर व्हायच्या आधी झाले असते तर ते स्विकारले गेले असते हे आपण खात्रीने सांगू शकत नाही.

मुळात माझा आक्षेप त्या ठराविक मानसिकतेला होता ज्यात अशी एखादी बातमी ऐकल्यावर अभिनंदनाच्या आधी शंकाकुशंका काढायला आपण आतुर होतो.
(आपले वाक्य कोट केले तरी हे आपल्यासाठी नाही)

ह्या http://www.loksatta.com/desh-videsh-news/muzaffarpur-court-directs-fir-a... असल्या प्रकरणांमुळे कुणीही अभिनेता / अभिनेत्री असल्या फालतू उत्पादनांची जाहिरात करण्यास धजावणार नाही. नसतं कायद्याचं लचांड कोण मागे लावून घेईन? तेव्हा असल्या उत्पादनांची जाहिरात नाकारण्यात फारसं कौतुक करण्याजोगं काही नाही.

शिवाय हा गोरेपणाच्या क्रीमचा मुद्दाही फार शिळा झाला आहे. यावर समाजप्रबोधनात्मक दूरचित्रवाणी कार्यक्रम देखील यापूर्वीच होऊन गेला आहे.

https://www.youtube.com/watch?v=0xBzKrf99WE

^^^

ईंटरेस्टींग .. खरेच या कलाकारांना शिक्षा होईल का? आणि दंडाची रक्कम त्यांच्या खिशातून जाईल का?

तरीही अश्या प्रकरणाचा हवाला देत फेअरनेस क्रीमची जाहीरात नाकारणे हे काही कौतुक करण्याजोगे नाही म्हणने हे काही पटले नाही. किंबहुना कौतुक करायचेच नाही हा अट्टाहास वाटला. अश्या भविष्यात होणार्‍या केसच्या भितीने कोणी करोडो रुपयांची जाहीरात नाकारेल हे खरेच नॉनपटणेबल आहे.. Happy

अवांतर - आता धागा वर आलाच आहे तर माझ्या लेखाच्या सुरुवातीच्या वाक्यांना खालिज करून मी नम्रपणे नमूद करू इछितो,

तनूमनू द्वितिय पाहिल्यानंतर आता मी कंगणाच्या अदाकारीचा फॅन झालो आहे. Happy

गायत्री जोशी नावाच्या एका मॉडेल / अभिनेत्रीवर यापूर्वी एक खटला दाखल करण्यात आला होता. कुठल्याशा वयनिरोधक (अ‍ॅन्टी एजिंग) क्रीमची जाहिरात होती. तिचे शब्द असे होते - "आय अ‍ॅम थर्टी टू अ‍ॅन्ड स्टिल आय लव द सरप्राईज् इन् युवर आईज्" सोबत गायत्री जोशीचे छायाचित्र. आता बत्तीशीतली तरूणी इतकी सुंदर व तरूण दिसते म्हंटल्यावर साहजिकच क्रीमचा खप वाढला. कोणा चिकित्सक नागरिकाने माहिती काढली तेव्हा त्याला कळले की जाहिरातीतल्या छायाचित्रातली गायत्री जोशी प्रत्यक्षात पंचविशीचीच आहे. झाले मग खटला भरला गेला. गायत्री जोशीने आपल्या जबानीत असा पवित्रा घेतला की तिने फक्त छायाचित्राकरिता पोज् दिली पुढे जाहिरातदारांनी त्यात काय शब्द टाकले हे तिला ठाऊक नव्हते. इतक्या असंख्य वाचकांनी जी तिची ही जाहिरात पाहिली ती तिने स्वतः पाहिली नसेल हे अविश्वसनीय वाटते. पुढे खटल्याचा काय निकाल लागला याविषयी माहिती नाही.

@चेतनजी,

ह्या खटल्याची/बातमीची काही लिंक आहे का? भरपूर गूगल केले पण अशा खटल्याची बातमी तर सोडाच असा काही प्रकार झाला आहे याचा मागमूसही नाही. गायत्री जोशी जर स्वदेसवाली म्हणत असाल तर तिच्या सर्व साईट्स वरच्या मिळून असलेल्या जाहिरातींच्या यादीत एकाही अ‍ॅन्टी एजिंग उत्पादनाचे नाव मिळाले नाही.

ईटरेस्टींग, मी सुद्धा जाणून घेण्यास उत्सुक..
कारण मुळातच गायत्री जोशी मला प्रौढ वाटते.. स्वदेशमध्येही शाहरूखची मोठी बहीण वाटत होती..

हे प्रकरण फार जुने आहे (जेव्हा गायत्री खरंच पंचविशीच्या आतच होती - आता ती ३८ वर्षांची आहे.) त्यावेळी ती केवळ मॉडेलच होती. स्वदेस चित्रपटाच्या फार आधीची ही हकीगत आहे. तेव्हा वृत्तपत्रे ऑनलाईन नव्हती. त्यामुळे संदर्भ नाहीत.

मग तर तुमची हकिगत मुळीच पटत नाही. स्वदेस मध्ये ती २७ वर्षांची होती. कोणता शहाणा दिग्दर्शक एका कोर्ट केसमध्ये अडकलेल्या स्ट्रगलरला कास्ट करेल? दुसरा मुद्दा, गायत्री जोशीच्या यादीत सौन्दर्यप्रसाधानांची एकच कंपनी दिसली - ponds. ponds एक मोठी कंपनी आहे, तिच्यावर जर असा खटला झाला होता तर किमान विकी पेजवर controversy म्हणून उल्लेख आला असता. मुद्दा ३ एक मोठी कंपनी इतकी बावळट आहे का की ज्या मुलीने नुकतीच मिस इंडिया (१९९९, यानंतर तिने करिअर सुरु केले) मध्ये भाग घेतला होता तिला कोणीच ही ३२ वर्षांची नाही म्हणून ओळखणार नाही. बाकी तुमची माहिती खरीही असेल पण तिचे पडसाद काहीच उमटलेले दिसत नाहीत.

हा खटला एका सामान्य नागरिकाने ग्राहक मंचात दाखल केला होता. सौंदर्य प्रसाधन उत्पादक व जाहिरात संस्थेसोबतच त्याने गायत्री जोशीलाही प्रतिवादी केले होते. खटला दाखल झाला तेव्हा त्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती व सोबतच गायत्री जोशीचा वर दिलेला पवित्राही.

अजून खोदून खोदून शोधून पाहिले पण या बातमीला दुजोरा देणारा एकही दुवा मिळाला नाही. गायत्री जोशी विषयक शोध परिणाम ३०व्या पानापर्यंत पाहिले पण तिला ग्राहक मंचात जावे लागल्याचा तुटपुंजा देखील उल्लेख कुठेही नाही. मराठीत 'गायत्री जोशी ग्राहक मंच' असे देखील शोधून पाहिले - परिणाम शून्य. इतर सर्च इंजिन्स वापरली तरी गायत्री व ग्राहक मंच हे दोन्ही शब्द कुठल्याही भाषेत/लिपित, कोठेही एकत्र आढळले नाहीत.

आता यापेक्षा घालवायला माझ्याकडे अधिक वेळ नसल्यामुळे केवळ चेतन यांच्या स्मरणावर हवाला ठेवत हा विषय इथेच थांबवत आहे. पण अजूनही ही बातमी विश्वसनीय वाटत नाही(कारणे वर आहेतच).
हेमाशेपो

कंगना की कंगणा??? एक भाबडा प्रश्न....

कंगणा खटकतेय डोळ्याला Wink

की कंगना म्हणजे तनू आणि कंगणा म्हणजे दत्तो (कुसूम)..... :स्मितः

चेतनजी वृत्तपत्रे ऑनलाइन नसली तरी जाहीरात तरी शोधू शकता.
बातमी नको, जाहिरात.

तुर्तास ईतकेच, बाकी संध्याकाळी येतो मी.

गायत्री जोशी १९९६ पासून जाहिरात क्षेत्रात आहे. त्यामुळे सदर जाहिरात ती मिस इंडिया व्हायच्या आधी देखील चित्रीत झाली असू शकेल. इंटरनेटवर ही बातमी मिळणे अशक्यच आहे. त्याकाळी वर्तमानपत्रांची इंटरनेट आवृत्ती नसायची. तसेच ग्राहक मंचात एखाद्या नागरिकाने खटला दाखल केला व तो मोठ्या प्रतिष्ठीत उद्योगाबद्दल असेल तर त्याची बातमी व्हायची. तरी पुढे खटला तडीस लागेपर्यंत चालविण्याची सामान्य नागरिकाची तयारी असायचीच असे नाही.

अवांतरः- मी ऑगस्ट १९९७ मध्ये रॉयल एन्फिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड ३५० सीसी) मॉडेल खरेदी केले होते. ते सदोष असल्याकारणाने मी अनेकदा ते परफेक्ट मोटर्सच्या सेवा केंद्रात दुरुस्तीकरिता दाखल करीत असे. थातूरमातूर दुरुस्ती करून ते पुन्हा माझ्या हवाली केले जाई. असमाधानकारक सेवेबद्दल बुलेटच्या प्रादेशिक केंद्राकडे तक्रार केली असता त्यांनी मला मधू स्कुटर्स या दुसर्‍या सेवा केंद्रात दुरुस्ती करण्यास सुचविले. तिथेही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. एक वर्षानंतर हमी कालावधी संपताच या सेवा केंद्रास दोष बरोबर सापडला व त्यांनी रु.३२००/- (तीन हजार दोनशे फक्त) भरून वाहन दुरुस्त करण्याची तयारी दर्शविली. ज्याकरिता मी तयार नव्हतो. मी ग्राहक मंचात खटला दाखल केला व

  1. रॉयल एन्फिल्ड मोटर्स, चेन्नई मुख्यालय,
  2. रॉयल एन्फिल्ड मोटर्स, पुणे विभागीय कार्यालय
  3. परफेक्ट मोटर्स, पुणे
  4. मधू स्कुटर्स, पुणे

या चौघांना प्रतिवादी केले. जून २००२ मध्ये खटल्याचा निकाल लागुन मला रु.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्त) मानसिक त्रासापोटी + रु.१,०००/- (रुपये एक हजार फक्त) दाव्याचा खर्च + वाहन मोफत दुरुस्त करून मिळाले. अर्थात माझ्या आजी (म्हणजे वडिलांच्या सख्ख्या मामी) श्रीमती लक्ष्मी अमर चोपडा या आमच्यातर्फे वकील होत्या आणि त्या प्रत्येक तारीख गुरुवारीच येईल असे पाहत त्यामुळे वडिलांना (कारण वाहन त्यांच्या नावे होते) कार्यालयात रजा वाया न घालविता ग्राहक मंचात हजर राहता येत असे. अर्थात इतका संयम व असे नात्यातले नि:स्वार्थी वकील प्रत्येकच वादीपाशी नसल्याने ग्राहक मंचातले कितीतरी खटले हे दोन चार तारखांनंतर बंद पडलेले आढळतात.

शिवाय आमचे व्यक्तिशः नुकसान झाले असल्याने खटला नेटाने चालविला गेला. सदर सौंदर्यप्रसाधनावर दावा दाखल करणार्‍याचे व्यक्तिशः नुकसान झाले नसल्याने त्याने केवळ तत्कालीन प्रसिद्धीकरिता दावा दाखल करून नंतर तो अर्धवट सोडून दिला असल्याची शक्यता जास्त आहे.

<< चेतनजी वृत्तपत्रे ऑनलाइन नसली तरी जाहीरात तरी शोधू शकता.
बातमी नको, जाहिरात. >>

जाहिरात मी स्वतः पाहिल्याचे आठवते - वुमेन्स इरा अथवा फेमिना अशा कुठल्या तरी चकचकीत नियतकालिकात. रद्दीत सापडले तर स्कॅन करून डकवितो.

Pages