गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतः आदित्य पांचोलीमुळे लॉंच झाली हे काय गर्वाची गोष्ट आहे? >> आदित्य पांचोलीला स्वतःला आणि स्वतःच्या पोराला लाँच करायला जमले नाही त्याने कंगणाला लाँच केले म्हणे. Lol

तिच्या आपकी अदालत विडीयो चं अचानकच का एव्हढं कौतुक व्हायला लागलं. आधीही तिचा फ्रँक अ‍ॅटिट्युड दिसला होताच की. ती भूमिका ही बर्‍यापैकी तशाच करते.

वादाच्या भोवर्‍यात राहणं हे तिला आवडत असावं.

बाकी टॅब्लॉइड टाईप स्टोर्‍यांची सत्यासत्यता आपल्याला कधीच कळणार नाही. ती (पिक्चर मध्ये) अ‍ॅक्टींग मात्र झकास करते हे मात्र १००% सत्य. Happy

तिचा हा व्हिडीयो ह्याआधी बराच गाजला होता: https://www.youtube.com/watch?v=ncajg8Tki3M

मलाही ती अ‍ॅक्ट्रेस म्हणून खूप आवडते. पण तीचे जे सेन्सशनल, फ्रँक व्हिडीयोज् दिसतात तीही एक प्रकारची स्ट्रॅटेजी असावी असं वाटतं. बॉलीवूड इन्डस्ट्री एव्हढी मोठी आहे की जसं कपूर चोप्रा जोहर लोकांची स्वतःची स्पेस आहे तशीच ह्या पॅरॅलल वाल्यांची (अनुराग कश्यप इत्यादी, टियर २ (?)) वाल्यांचीही स्वतःची स्पेस आहे. आणि कमर्शियलिआइजेशन कसं व्हावं ह्याकरता प्रचंड एक्स्पर्टीज ही असेल. तेव्हा असं मात्र वाटत नाही की तिच्या डोक्यावर कोणाचा तरी हात असल्याशिवाय ती इतकी सडेतोडपणे बोलत नसेल.

तसंच वरच्या (आँपकी अदालत) व्हिडीयो मध्ये तीने बाकी सगळ्या अ‍ॅवार्ड्स ना बोगस म्हंटलं. नॅशनल अ‍ॅवार्ड्स धुतल्या तांदळासारखे असतील असं तर नाही ना? Happy

हा बघतो वेळ झाला की.
नॅशनल अ‍ॅवॉर्डला कोणाला कोणाची पडलेली नसते म्हणून आवडतात म्हणाली ती. तिला धुतल्या तांदळाचे आहेत का नाही यात कदाचित रस नसेल Biggrin Light 1

>> नॅशनल अ‍ॅवॉर्डला कोणाला कोणाची पडलेली नसते
अशी समजूत नाईव्ह नाही का? Happy कोणाला कोणाची पडलेली नसणे = न्युट्रल = धुतल्या तांदळाचे

गेल्या काही वर्षातले 'काही' राष्ट्रीय पुरस्कार बघता असे नाही वाटत,

खास करून सैफ ला पद्म मिळाले ते बघता

हायझेनबर्ग
गहाण ठेऊन वाचतात का? तिच्या अॅक्टिंगवर नाहीतर तीने चालू केलेल्या बिनडोकी आरोपाबद्दल बोलतोय हा फरक तुमच्यात आणि माझ्यात आहे.
<<<<तुम्ही कंगनाच्या नावाने कुठला आवयव घासत आहात ते जरा क्लीअर करा पाहू>>>
आमचे सगळे अवयव परिपुर्ण व जागच्याजागी आहे. तुमचे काही परिपुर्ण नसतील म्हणून असले प्रश्न तुम्हाला पडत आहे. वेळीच उपचार करून घ्यावे. काय विचारत आहेत हे पुन्हा एकदा वाचून घ्या कदाचित तुम्हाला चुक कळेल.

तुमचे सगळीकडे खपवून घेतील या गैरसमजूतीत राहू नका. तुमचे प्रतिसाद अतिकेविलवाणे होत आहे.

कधी कधी या धाग्यावरचे प्रतिसाद वाचुन असं वाटत की लोकांची वैचारिक शुद्ध हरपत चालली आहे.
किंवा वैचारिक शुद्धीत नसताना प्रतिसाद लिहीतात.

काही मुद्दे मला खटकले जसे आपंची मुलगी माझ्यापेक्षा मोठी आहे किंवा राकेश रोशनच्या नातीच्या वयाची मी आहे. आपंची मदत घेतली तेव्हा ती लहान होती व कुणावरही विश्वास ठेवायची पण जो स्वत: फ्लॅाप आहे आणि ज्याच्यावर आधीच अशा प्रकारच्या केसेस आहेत तो हीला काय मदत करणार आणि तो हिला मुलीसारखं वागवेल असं हिला कसं वाटलं. रितीकही तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा आहे हे तीला माहीत होतं. फक्त हिनेच त्याला मेल्स पाठवल्या का, त्याचे काहीच मेल्स किंवा मेसेजेस नाहीत. मुळात त्याने तीला नोटीस का पाठवली आणि तीही क्रिमीनल लाॅयरकडून, एवढं काय झालं होतं. म्हणजे ती म्हणाली तसं, क्वीनमुळे ती प्रसिद्ध झाल्यावर त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं मग तो तिच्या प्रेमात होता हे कोणाला कळलं तर काय झालं असतं आणि त्याचा घटस्फोटही झालेला होता मग त्यानेही केस का केली. अशी अफेअर्स तर टीव्ही कलाकारांमध्येही होत असतात मग त्यानेे एवढा ईशू का केला कारण त्याचेे काही हे पहिले अफेअर नव्हते, काईटच्या फाॅरेनर हिरवीणीसोबतही होतेच की त्याचे प्रेमप्रकरण.

असे प्रश्न काढले तर जंत्री तयार होईल. याची कुठे उत्तरे मिळतील का? दोन व्यक्ती, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या असू देत. त्यांच्यात काय नक्की झालं हे त्या दोघांनाच ठावूक. कधी कधी तर त्या दोघांनाही ठावूक नसतं.... आपण का कुणाचं खरं खोटं करत बसायचं... ?

काही लोकं तिला चांगले म्हणत आहेत, काही वाईट म्हणत आहेत, दोन टोकाच्या प्रतिक्रिया येत आहेत, या दोन टोकांच्या मध्ये संभ्रमात अडकलेलेही बरेच आहेत. कोणाला आपला थांग लागून देत नाहीये बया, तरी लोकांना (सध्यातरी) तिच्याबद्दल बोलायला आवडतेय Happy

काही लोकं तिला चांगले म्हणत आहेत, काही वाईट म्हणत आहेत, दोन टोकाच्या प्रतिक्रिया येत आहेत, या दोन टोकांच्या मध्ये संभ्रमात अडकलेलेही बरेच आहेत. कोणाला आपला थांग लागून देत नाहीये बया, तरी लोकांना (सध्यातरी) तिच्याबद्दल बोलायला आवडतेय Happy

>>>> हे स्वत"बद्दल लिहिलंय का ऋ? तिकडे हाबने विचारले आहे काही, त्याचे उत्तर देणार की टाळंटाळ करणार?

अरे पण तुम्हाला काय करायचंय? कोणी लग्न करुन आणणारेय का तिल अघरी? शांतपणे बसुन बघ अकी काय चाल्लाय ते

मला आवडते बाबा ती आणि तिचा अ‍ॅटिट्युड

थँक्स दक्षिणा.
सशल,
नॅशनल अ‍ॅवॉर्ड बाबतीत आय थिंक ती म्हणाली टीआरपी साठी बनवलेला हा शो नाही , लो प्रोफाइल दूरदर्शन वर वर येणारा साधा शो आहे जिथे कोणी बक्षिस घ्यायला आलं किंवा नाही आलं कोणाला फरक पडत नाही म्हणून तिला तिथे जायला आवडतं.
इतर अ‍ॅवॉर्ड शोज मधे टीआरपी ड्रामा , कोण परफॉर्म करणार , कंपुबाजी इ. जास्तं असते, कंगना जात नाही म्हणून तिला ऑर्गनायझर्सनी धमकीवजा प्रेशर आणतात सतत फोन करून असं काहीतरी म्हंटली आपकी अदालत मधे.
अर्थात फिक्सिंग कुठे चालतं कुठे नाही माहित नाही आणि नॅशनल अ‍ॅवॉर्ड्स सगळी फेअर असतात असं काही नाही पण कंगनाला मिळालेली नॅशनल अ‍ॅवॉर्ड्स तरी डिझर्विंग वाटली.
असो , रजत शर्मा बाकी फार इंप्रेस झालेला दिसत होता , ह्रितिक प्रकरणात रजत शर्मानी कंगनाला तनु वेड्स मनु२ मधला डॉयलॉग आठव्ण करून दिला, " अभी तो और जलील करना बाकी है' Happy

मला तनू वेड्स मनु मधला हरयाण्वी रोल जेव्हढा डिजर्वींग होता तेव्हढे फॅशन आणि क्वीन होते का ह्याबद्दल शंका आहे Happy पण ही फक्त शंकाच. मी काही सर्व पिक्चर (इतर भाषेतले) बघत नाही तेव्हा अर्थातच हे लिमीटेड ज्ञानावर आधारीत मत आहे.

तिच्या अभिनय कौशल्याबद्दल दुमत नाही अर्थातच.

उद्या ऑस्कर ला सुद्धा भाव देणार नाही हे ही मत थोडं बालिश वाटलं मला. माझं म्हणणं एव्हढंच आहे की हे फक्त आणि फक्त तिच्या डोक्यात आलं आणि ती तसं वागते हे मला पटत नाही तर ही वेल कार्व्हड आऊट स्ट्रॅटेजी आहे अशी शक्यता वाटते.

ऑस्कर च्या प्रश्नाला उत्तर देताना ही मुलाखत स्क्रीपटेड न्हवती असं वाटलं का? टोटल बालिश उत्तर होतं.

ऑस्कर बद्दल +१
बालिश आणि घाइघाईत केलं ते स्टेटमेन्ट (ऑस्कर बद्दल फार माहिती नसावी तिला ,टाळ्या घेण्यासाठी घाइघाईत उगीच काहीतरी बोलली असं वाटलं मला )

अरे पण तुम्हाला काय करायचंय? कोणी लग्न करुन आणणारेय का तिल अघरी?
><><>><>>>
मी तयार आहे Happy

बाके ते ऑस्कर म्हणजे काही भारी आहे का? उगाच ईम्पोर्टेड ते भारी. आमीरला फिल्मफेअर एवार्ड मिळत नाही म्हणून त्याने ऑस्करला जास्तीचा भाव दिला आहे. अन्यथा आपला संबंधही नाही त्या पुरस्कारांशी.

अरे पण तुम्हाला काय करायचंय? कोणी लग्न करुन आणणारेय का तिल अघरी?
><><>><>>>
मी तयार आहे Happy >> देव करो आणि तिच्यावर ही वेळ न येवो Proud

http://www.loksatta.com/manoranjan-news/this-is-shocing-text-messages-wi...

हंसल मेहता आणि अपूर्व असरानींसोबतही भांडतेय. या बातमीसोबत असलेल्या छायाचित्रात अजून एक इंटरेस्टींग गोष्ट समोर येतेय ती म्हणजे म्हणजे कंगनाने हाय हिल्स चढविल्या आहेत. त्याही थोड्याथोडक्या नव्हे तर चक्क दोन इंच अथवा अधिक उंचीच्या. घोट्याच्या सांध्यापाशी जवळपास १६० अंशाचा कोन झाल्यासारखा दिसतोय. अशा हाय हिल्समुळे घोटा, पंजा आणि कंबरेचे आजार होऊ शकतात. अर्थात बहुसंख्य महिला हाय हिल्स वापरतातच पण गोरा रंग म्हणजे सौंदर्य नाही म्हणत फेअरनेस क्रीमला नकार द्यायचा आणि दुसरीकडे कमी उंचीचा न्यूनगंड बाळगत हाय हिल्स चढवायच्या ये बात कुछ हजम नही हुई.

{{{ अरे पण तुम्हाला काय करायचंय? कोणी लग्न करुन आणणारेय का तिल अघरी?
><><>><>>>
मी तयार आहे }}}

सध्याच्या गर्ल्फ्रेंडसोबत प्रामाणिक आहे आणि तिच्याशीच लग्न करणार असल्याचं मायबोलीवर चिक्कार वेळा लिहिलंय ते खोटं का?

कंगना तिच्या झालेल्या ईमेजच्या प्रेमात आहे नि आता सगळे वागणे बोलणे त्यानुसार होतेय - कळत नकळत, असे वाटत राहिले.

दुसरीकडे कमी उंचीचा न्यूनगंड बाळगत हाय हिल्स चढवायच्या ये बात कुछ हजम नही हुई.
>>>>>

हा निष्कर्श घाई घाई तला वाटतो.
स्टाईल असू शकते ती

कंगना तिच्या झालेल्या ईमेजच्या प्रेमात आहे नि आता सगळे वागणे बोलणे त्यानुसार होतेय - कळत नकळत, असे वाटत राहिले.
>>>>>
ईमेज तिच्या स्वभावामुळेच बनली ना?
आणि मग स्वभावानुसारच वागणे गैर काय?
किंबहुना ईमेज अमुकतमुक बनावी म्हणून किंवा बनू नये म्हणून स्वभावाविपरीत वागणे चुकीचे.

>>बाके ते ऑस्कर म्हणजे काही भारी आहे का? उगाच ईम्पोर्टेड ते भारी. आमीरला फिल्मफेअर एवार्ड मिळत नाही म्हणून त्याने ऑस्करला जास्तीचा भाव दिला आहे. अन्यथा आपला संबंधही नाही त्या पुरस्कारांशी.>> यालाच म्हणतात प्रोव्होकेटिव्ह पोस्ट्स. अशा पोस्ट्स हा आयडी पेरून ठेवतो. कोणी मृदू काळजाचा आला आणि त्याने भावनाला दुखावलं की रणधुमाळी चालू. हा आयडी वन्ही विझणार नाही याची काळजी घेत तेल पाणी टाकत असतो.
अशा अनेक पोस्टी सगळीकडे टाकल्या की कुठेना कुठे एक पेट घेतेच.
दुर्दैव... दुसरं काय?

जराही अभिनय न करत रोखठोक आणि खरे बोलत कंगणाने ऑस्करबद्दल असेच काहीसे मत मांडले आहे आणि टाळ्या खेचल्या आहेत Happy

Pages