गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू हो, प्रियांका गांधी यांची शैली मस्त आहे. मिश्किल बोलतात आणि योग्य तिथे गरजतात. पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा एक एक्स फॅक्टर आहे.
हल्ली माझे इन्स्टा फेसबुक फीड राजकीय व्हिडिओनी भरले असते म्हणून बघण्यात येते.

. >> कळले नाही. >>>

राज अज्ञानी,
म्हणजे असे की मी राजकीय घडामोडी फार फोलो करत नाही. गेले काही वर्षे देशातच नाही तर महाराष्ट्रात देखील फारच गचाळ राजकारण सुरू असल्याने, म्हणजे कोणीही कोणाच्याही मांडीवर जाऊन बसत असल्याने, राजकारण या विषयातील इंटरेस्टच संपून गेला होता. अश्या दलबदलू, संधीसाधू, सत्तापिपासू राजकारण्यांची बाजू घेऊन त्यांचे समर्थक जे दंगा घालायचे त्यापासून सुद्धा दूर राहू लागलो होतो. न्यूज बघून तर कित्येक वर्षे लोटली आहेत. ते चॅनेलच नाहीत आमच्याकडे..

पण गेले काही महिने जेन झी आंदोलन निमित्त देशात काहीतरी इंटरेस्टिंग घडतेय म्हणून त्यांच्या रीळ बघू लागलो तसे इतर राजकीय व्हिडिओ सुद्धा दिसू लागले. आता माझ्या अल्गोरिदमनुसार मला सरकारविरोधी रीळ जास्त दिसतात. त्यामुळे प्रियांका गांधी यांचे काही व्हिडिओ बघण्यात आले. बहुतांश संसदेतील. त्यात त्या मस्त बोलतात हे समजले. किंबहुना म्हणून ऐकले सुद्धा गेले. अन्यथा राजकीय जुमलेबाजी ऐकण्यात फार इंटरेस्ट आजही नाहीच.

भारतात राहून क्रिकेट आणि राजकारणावर बोलत नाही असा(शी) व्यक्ती विरळा. क्रिकेट मी कधीच बंद केलं आहे (भारतीय संघ हा देशाला नाही तर बीसीसीआयला रिप्रेझेंट करतो हे शपथपत्र दाखल केल्यानंतर).

राजकारण आवडत नाही असे म्हणत नाही, कारण सध्याचे राजकारणी आवडत नाहीत. माझ्या आधीच्या लोकांबद्दल आदर वाटतो, कारण आपल्या जन्माआधीच्या लोकांचं चांगलं तेच वाचलं, ऐकलेलं असतं, त्यांना अनुभवलेलं नसतं. पण राजकारण हे सर्वस्पर्शी आहे. त्याचा आयुष्यावर प्रभाव पडतो. जेव्हां आपण मत द्यायला जातो तेव्हां आपण राजकारणापासून अलिप्त राहत नाही. कितीही अलिप्त राहिले तरी राजकारणाच्या बातम्या कळतात. रील आपल्या फीडमधे येतात. युट्यूब, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर या सर्व ठिकाणी आघाडीचे ब्रॅण्डस आणि राजकीय पक्ष यांना टाळणे अशक्य आहे. मला मराठी मालिका अजिबात आवडत नाहीत. पण त्याच्या बातम्या माझ्या फीडमधे येतात. त्याची तक्रार त्या त्या प्लॅटफॉर्मवर केल्यावर प्रमोशन असलेल्या पोस्टस दिसणार असा एक संदेश आला होता.

त्यामुळं फीड स्वतःच्या नियंत्रणात ठेवणे ही समजूत चुकीची आहे. . राजकारणापासून अलिप्त असणे ही भूमिका आहे, असू शकते, पण त्याबद्दल सातत्याने नैतिक टेंभा मिरवण्यात काहीही हंशील नाही. राजकारणावर न बोलणारेही डुआयडीद्वारे मत व्यक्त करत असतातच. काही तर ओळखू येतात. तेच सरळ सरळ व्यक्त केले तर काय बिघडते?

Pages