गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमीर खान आणि सचिन तेंडूलकर यांनी अनेकदा शीत पेयांच्या जाहिराती केल्या आहेत . या शीत पेयान अनेकदा धोकादायक पदार्थ सापडले आहेत .

आणि चांगल्या दारुत कधीही धोकादायक पदार्थ सापडले नाहीत ...

ऋन्मेऽऽष ओल्ड मंक ने सुरुवात करा ... आजीबात पास्तावणार नाहीस .. आणि GF पण ती आवडेल ..

तुम्हाला कंगना आवडत नाही ह्यावर तेल का घालवले आहेत काही कळले नाही.
>>>
सहज, त्या क्षणाला जे जाणवले त्यानुसार मांडणी केली. कदाचित ती माझी आवडती नटी आहे, मी तिचा फॅन आहे म्हणून हे मला कौतुकास्पद वाटलेय अश्यातला भाग नाही हे दर्शवण्यासाठी म्हणून लिहिले असावे. Happy

आणि हो, ती मला (हिरोईन म्हणून) आवडत नाही म्हणजे नावडती आहे असा अर्थ न घेता मी तिचा विशेष चाहता नाही असा अर्थ घ्या Happy

पण तरीही, या सर्व कलाकारांनी लोकशिक्षणासाठी जाहीराती कराव्यात असे मला वाटते.
>
हो, चांगली इमेज असलेल्या फिल्मी तारकांच्या जाहिराती खेड्यापाड्यातील त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष प्रभावी ठरू शकतात.

तेच त्यांनी दारूची जाहीरात करणे तेवढेच घातक ठरू शकते.
कारण ते करत असलेली दारूचे प्रॉडक्ट विदेशी उच्च प्रतीचे असू शकते, पण त्यांचे अनुकरण करणारे देशी वा बनावट दारूला कवटाळू शकतात.

>>>पण तरीही, या सर्व कलाकारांनी लोकशिक्षणासाठी जाहीराती कराव्यात असे मला वाटते<<<

असे असेल तर मग जाहिरातीच कशाला समाजप्रबोधनासाठी करायच्या? मूळ भूमिकाच प्रबोधनात्मक करा की?

पडद्यावर 'चिपकाइले सैंया' आणि जाहिरातीत 'ओ मेरे भैय्या'!

विद्या बालनने निदान डर्टी पिक्चरमध्ये भूमिका तरी सिल्क स्मिता ह्या नटीची केली होती.

दिनेशदांना असे म्हणायचे असावे की या सर्व कलाकारांनी लोकशिक्षणासाठी सुद्धा जाहीराती कराव्यात. ते इश्युड इन पब्लिक इन्टरेस्ट असते ना तसे.

दिनेश,

तुम्ही माझा प्रतिसाद मनावर घेऊ नयेत अशी विनंती! माझ्या पोस्टमधील तो राग दुटप्पी कलाकारांवरचा आहे. कलाकाराला व्यक्तीगत आयुष्यात पूर्ण स्वातंत्र्य असावे व भूमिकांच्या साच्यात त्याने वागले पाहिजे ही अपेक्षा फोल आहे हे मलाही समजते. पण खूप पतप्रतिष्ठा आणि पैसा मिळाल्यानंतरही कलाकार सामान्य जाहिराती करतात आणि प्रबोधनात्मक काही करत नाहीत हे पाहून तिडीक येते. आता महानायक अमिताभ बच्चन नवरत्न तेलाची हिडीस जाहिरात करतोय. उबग आला. त्यापेक्षा:

'रस्त्यावर दिसणारी एकटी मुलगी म्हणजे संधी नव्हे तर जबाबदारी आहे'

असा एक चांगला मेसेज जो मध्यंतरी फिरत होता तो अश्या महानायकांनी बिंबवायला हवा, तेही स्वतःहून! पैश्याकडे न बघता. (ही सगळी मते वैयक्तीक आहेत. चुकीचीही असू शकतील). ह्या लोकांना पैसा मिळाला आहे ना? मग करा की काहीतरी भले?

बेफि, शेवटी त्या भुमिकाच असतात, बहुसंख्य प्रेक्षक तेच सत्य मानतात हे वाईट ।
अर्थात यात कलाकारांची मूक संमती असते असे म्हणायला हवे. जॅकी चॅनच्या चित्रपटात त्याचे स्टंट्स कसे खोटे होते ते आवर्जून दाखवत असत. ( आपल्याकडच्या संगीत नाटकातही, सर्व कलाकार नांदी आणि भरतवाक्यासाठी एकत्र ऊभे रहात ) तसे धाडस आपल्याकडचे चित्रपट कलाकार दाखवत नाहीत हे खरे.

तसेच त्यांच्या फायद्यासाठि ते एकत्र येतातच कि, ( उदा, पायरसी विरुद्धचा प्रचार किंवा एखाद्या चॅनेलची जाहीरात ) तसेच त्यांनी थोडावेळ लोकशिक्षणासाठी दिला तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल असे वाटते. तिथे म्हणजे त्या जाहीरातीत ते स्वतःच्याच भुमिकेत असतील.

वरच्याच उदाहरणात कंगनाने मेकप न करता एखादी जाहीरात करावी आणि सांगावे कि गोरेपणा हा मुलीच्या गूणी असण्याचा निकष असू नये.. करेल ती ?

सर्व कलाकारांनी असं केलं तरी चालेल. इतकं की या क्रिमं वाल्यांना सजीव न मिळून अ‍ॅनिमेशन वापरावे लागावे.
गोरेपणा देणारी माणसा बायकांची क्रिम, साबणं, तेलं, मॉश्चरायझर हा चुकीचा पायंडा अनेक वर्षापूर्वी पडला आहे. मला आठवतं कॉलेजात असताना हॉस्टेलची सर्व मुली व मुले यांच्याकडे अगदी हटकून फेअर अँड लव्हली ची ट्युब असायची. त्यावर बरेच पैसे खर्च करण्याची ऐपत नसलेल्यांकडून पण बरेच खर्च केले जायचे. कंगवा इ. जसं "मस्ट हॅव" असतं तशी ती ट्युब. ब्लीच ने गोरी बनवलेली कातडी परत उन्हात गेल्यावर जास्त वेगानी काळी पडणार, परत जास्त क्रिम फासा असं दुष्ट चक्र.
अजूनही जन्मलेल्या कोणत्याही बाळाला बघायला येणार्‍यांकडून "चेहरा बापाचा पण बरं झालं रंग आईचा घेतलाय(किंवा उलट)" हे उद्गार न ऐकलेली कुटुंबं शून्य आहेत. व्हॉटसअ‍ॅप वर टायटॅनिक बुडाली होती जळली नव्हती वाला फालतू पी जे फिरत असतो.लहान मुली स्विमिंग चालू केल्यावर हमखास नातेवाईकांकडून "फारच काळी पडली" इ.इ. ऐकू येतं.
माईंड सेट बदलायला बरीच वर्षं लागतील. यांना फ्रेंडस मधली चार्ली व्हिलर किंवा तत्सम सुंदर्‍या कोणी दाखवल्या नसाव्यात.

कंगणा राणावतचे अश्या भपकेबाज आणि लोकांना फसवणार्‍या जाहिराती नाकारण्याच्या भुमिकेचे मनापासून कौतुक वाटते.

प्रतिथयश कलाकारांनी/खेळाडूंनी लोककल्याणकारी योजनांच्या आणि सामाजिक संदेश देणार्‍या जाहिरातीत विनामोबदला काम करायला पाहिजे हा मुद्दा आवडला आणि पटला.

बेफिकीर,

>> गोरे करणार्‍या क्रीमची जाहिरात करणे म्हणजे गोरे नसणारे कमी सुंदर असतात असे कुठेतरी मान्य करणेच नाही
>> का?

हो, बरोबर. पण या मान्यतेचं ओझं कलाकारावर नसून जाहिरातीच्या मालकावर आहे. शिवाय माझा मुद्दा लोकांच्या समजुतीशी संबंधित नसून बहिणीचा वैयक्तिक अपमानाशी निगडीत आहे.

आ.न.,
-गा.पै.

हे पहा शास्त्रीय अभ्यास काय सांगतो ?

http://www.businessinsider.com/abstaining-from-alcohol-significantly-sho...

A newly released study shows that regular drinkers are less likely to die prematurely than people who have never indulged in alcohol. You read that right: Time reports that abstaining from alcohol altogether can lead to a shorter life than consistent, moderate drinking.

गोरी तेरा गांव बडा प्यारा गाण्यावर बंदी आणायला हवी.केरळातल्या सर्व चर्मम जाहिराती ,जोयालुका,कल्याण ज्युलर्स मधल्या अशक्य गोय्रा ललना एक कहरच आहे.राजा रविवरमाची चित्रे आठवली.
अवांतर-खाइके पान बनारसवाला या गाण्यावरही.
मेट्रो{ऋन्मेष}गोल्डविन मेयरची अजून एक डरकाळी.

कोणत्याही कोल्ड्रींकची, दारूची अथवा सिगारेटची जाहीरात करणार नाही हे पुलेला गोपीचंदने काही वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं हे कोणाला आठवतं का?
त्यालाही अशीच जवळपास एक कोटीची ऑफर होती.

गोरी तेरा गांव बडा प्यारा गाण्यावर बंदी आणायला हवी>>>>:हहगलो: अहो ती गोरी म्हणजे गोर्‍या रन्गाची नसावी बहुतेक. ती गोरी, छोरी वाली गोरी असावी. या न्यायाने चन्दनसा बदन, गोरे गोरे बान्के छोरे, चान्द जैसे मुखडेपे तसेच आणखीन काही रन्गाचे वर्णन करणार्‍या गाण्यान्वर बन्दी येईल.

गोरी गोरी पान , फुलासारखी छान या गाण्यावर बन्दी येईल.

हो देशमुख आठवतेय ती बातमी, लोकसत्तात पण आली होती. पण आपल्याकडे क्रिकेटपटु सोडले तर बाकी कुणाला महत्वच नसते ना.

>>>गोरी गोरी पान , फुलासारखी छान या गाण्यावर बन्दी येईल.<<<

काळी काळी पान, कोळश्याची खाण, दादा मला एक वहिनी आण - असे नवीन गीत जन्माला येईल.

काळी काळी पान, कोळश्याची खाण, दादा मला एक वहिनी आण - असे नवीन गीत जन्माला येईल
>>
आणि मग या गाण्यामुळे गो-या लोकांची कशी कुचंबणा होते आहे, तेही मुंबईसारख्या शहरात असे सांगणारी पोस्टरबाळाची नवी पोस्ट येईल.

पण आपल्याकडे क्रिकेटपटु सोडले तर बाकी कुणाला महत्वच नसते ना.
>>
हे सगळीकडे असते, आपल्याकडे क्रिकेटचे वेड तर ईतर ठिकाणी आणखी काही..

असो,
बॉक्सर विजेंदरसिंगने देखील असेच मद्य-तंबाखूच्या जाहिरातींची ऑफर धुडकावली होती.

स्पॉक,

>> आणि मग या गाण्यामुळे गो-या लोकांची कशी कुचंबणा होते आहे, तेही मुंबईसारख्या शहरात असे सांगणारी
>> पोस्टरबाळाची नवी पोस्ट येईल.

तुमच्या तोंडात साखर पडो. मग सुवर्णमध्य म्हणून गामा पैलवान गाणं लिहील :

काळीगोरी छान, झेबऱ्यावाणी जाण
दादा मला, एक वहिनी आण

आ.न.,
-गा.पै.

उत्तम चर्चा!
अती अवांतर-
कंगना ची बहिण जर गोरी गोरी असती तर तीने ही जाहिरात 'नाकारली' असती का?

कंगना ची बहिण जर गोरी गोरी असती तर तीने ही जाहिरात 'नाकारली' असती का?
>>
याचे उत्तर कंगणाच देऊ शकेल कारण ते तिचे स्टेटमेंट आहे,
पण मला वाटते ते केवळ एक उदाहरण होते, त्यामागचा विचार महत्वाचा. बहीण गोरी असती तर एखाद्या सावळ्या मैत्रीणीचे उदाहरण दिले असते.

बाकी वरची चर्चा फार गंमतीशीर चालू आहे,

एखादा खेळाडू दारूच्या जाहीरातीला नकार देतो तेव्हा आता दारू असलेली सारी गाणी बॅन करायची का असा सवाल देखील विचारायाला हवा ना, त्यालाच खडसावून Happy

स्पॉक, गामा .. इथे आफ्रिकेत मी सहज एका तरुणाला विचारले होते, तूम्ही तरुणीच्या सौंदर्याचे वर्णन कसे करता.. तो जे बोलला ते इथे लिहिणे अशक्य.. पण त्यात रंगाला काहीच महत्व नव्हते एवढे मात्र नक्की.

कंगनाला आता नटी म्हणून मागणी आहे याचे तिला चांगलेच भान आहे.इतकी महत्त्वाची नसती तर वीस लाखालापण जाहिरात सोडली नसती तिने.कॅामेंट थोडी तिक्ष्ण वाटेल परंतू दिसण्याचेच पैसे मिळतात ना या क्षेत्रात?शुभ्रम चर्मम् शुभ्रम चर्मम सारखे जिंगल लागत असतात ऐंशी टक्के स्त्रीया उजळ नसणाय्रा केरळाच्या टिव्ही चॅनेलांवर.

<< Srd | 26 May, 2015 - 14:32 नवीन

कंगनाला आता नटी म्हणून मागणी आहे याचे तिला चांगलेच भान आहे.इतकी महत्त्वाची नसती तर वीस लाखालापण जाहिरात सोडली नसती तिने.कॅामेंट थोडी तिक्ष्ण वाटेल परंतू दिसण्याचेच पैसे मिळतात ना या क्षेत्रात?शुभ्रम चर्मम् शुभ्रम चर्मम सारखे जिंगल लागत असतात ऐंशी टक्के स्त्रीया उजळ नसणाय्रा केरळाच्या टिव्ही चॅनेलांवर. >>

संपूर्ण सहमत.

Pages