गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ,

चित्रपट रिलिज झाल्यावर तीन महिन्यांनी सदर सिचुएशनचा रिव्यू घेऊया....

नानाकळा, मी तो चित्रपट बघेल याची खात्री कमीच. तनू मनू मी माधवनसाठी पाहिलेला.
तरी बघूया पुढे या घडामोडी किती आणि कुठवर घडतात.

हो ते कळले, मी आपले असेच माहिती पुरवली.
आणि पुढे म्हटलेय ना, की चित्रपट येऊन गेल्यावर हे वाद चालूच राहतात, वाढतात, कमी होतात की गायबतात...

काल मुद्दाम मुलाखत बघितली.
कंगना कुठलाही आड पडदा न ठेवता मस्त बोलली. जे बोलली ते खरं असावं असंच वाटलं. जिकडे अ‍ॅनॉमिनिटी हवी तिकडे उगाच नावं घेत न्हवती. रोखठोक मुलाखत प्रंचड आवडली. अभिनेत्री म्हणून आवडायचीच आता आणखी आवडू लागली.

दक्षिणा, वेलकम बॅक
तुम्हाला या धाग्यावर परत आलेले बघून मला फिलींग शाहरूख खान झाले.

ती अभिनय करत असेलही वा नसेलही. खरे खोटे तिलाच ठाऊक. कुठलीही शक्यता नाकारता येत नाही.

नंदिनी सध्या माबोवर फारश्या येत नाहीत. हे असे शो स्क्रिप्टेड असतात की कसे यावर त्यांनी अचूक भाष्य केले असते.

जर चित्रपट नाही मिळाले तर मनालीला जाऊन राहीन असे म्हणाली आहे ती. आता आणखीन काय वाईट होणार आणि गमावण्यासारखे काही राहिले नाही असेही. मटामध्ये वाचले मी. खूपच सडेतोड आणि खंबीर आहे.

खूपच सडेतोड आणि खंबीर आहे. >> यातच तिचा सच्चेपणा दिसतो. तो स्क्रिप्टेड असूच शकत नाही.
बुरखा १०-१५ दिवस टिकतो, नन्तर तो उघडा पडतोच.

रामरहीम आणि आसूमल सारख्या लोकांचा बुरखा फाटलाय म्हणून आपण आज त्यांना शिव्या घालतोय. पण बुरखा न फाटलेले बाबा अजूनही समाजात आहेच की... सत्यसाईबाबांचे अजूनही फोटो कुठे कुठे दिसतातच की..

गूगल वर दिसतात.. बाकी कोणी फोल्लवर नसावा
>>>>>
सचिनच्या चित्रपटात अगदी मोठ्या पडद्यावर दिसलेले Happy

असो, मुद्दा ईतकाच आहे, दिसते तसे नसते, म्हणून जग फसते !

Lol
कंगना अभिनय करत होती म्हणणे आत्ता स्मार्ट आहे.
ती खरं बोलत असेल तर ते प्रुव्ह करायला तिने नावं घेतलेल्या सगळ्या लोकांची जबानी घ्यावी लागेल, परत ते खरं बोलत आहेत का खोटं ते ठरवावं लागेल. पण तिने बोललेल्यातील एकही वाक्य भविष्यात काही प्रमाणात जरी वेगळ निघालं तर लग्गेच, बघा!!!! मी बोललो न्हवतो! करुन आर्ग्युमेंट करुन दोन धाग्यांची सोय लावली जाईल. हे अभिनय करते आहे म्हणणं म्हणजे भविष्य सांगणारे जी युक्ती वापरतात त्याचं वेगळ वर्जन आहे. प्रचंड काही बोललं (इथे सगळ्या दाव्यांना अभिनय म्हटलं) की एक दोन नेम लागतातच. आणि मग नवसाला पावणारा देव जन्मतो.

इथेही बघा की, नंदिनी जे सांगेल ते हे महाशय डो़ळ्यावर पट्टी लावून खरं मानायला एका पायावर तयार आहेत. तसही नंदिनीने समजा कुठल्या एका फॅक्ट वर आक्षेप घेतला असता तर सुतावरुन स्वर्ग गाठून इंडक्शन प्रिंसिपलने यांनी सगळं थोतांडच आहे असा निष्कर्ष काढला असता. दिसतं तसं नसतं हेच म्हटलं असतं. (नंदिनी हे यांनीच दिलेलं उदा. पुढे चालू ठेवलंय. पर्सनल व्यक्तीचा संबंध नाही)
माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर यांना कुठल्या बातम्या खर्‍या आणि कुठल्या फेक हे ही समजत न्हवतं, आणि धागा काढावा लागलेला. आता तो धागा मी मायबोली वरच्या व्यक्तींना खरी साईट कशी ओ़ळखावी हे सांगण्यासाठी आणि ती चर्चा घडावी या साठी काढलेला असं लार्जर दॅन लाईफ स्पष्टीकरण ही येईल कदाचित.

अमितव,
नंदिनी यांनी मागे एकदा मलाच सुनावले होते की फिल्मी दुनियेत सारेच किंवा बरेच स्क्रिप्टेड असते. आता ते मी शोधू शकत नाही, पण त्यांचे एकंदर चित्रपटविषयक ज्ञान पाहता मी त्यांच्या या विधानावर आर्ग्युमेंट केले नव्हते. आता सहज त्याची आठवण झाली ईतकेच.

बाकी तुम्हीही प्रामाणिकपणे सांगा,
तुम्हाला हे असे जनता अदालत मध्ये सेलिब्रेटी बोलवून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप हे सारे उत्स्फुर्त असेल असे वाटते का?

अर्थात जर कोणी ईथे म्हटले की सेलिब्रेटी कौन बनेगा करोडपती खेळायला येतात ते सुद्धा खरेखुरेच असते तर मी त्याच्याशीही वाद घालणार नाही.

शेवटी ज्याने त्याने आपापला कॉमनसेन्स वापरायचा आहे . सिद्ध मी देखील काहीकरू शकत नाही. सिद्ध तुम्ही देखील काही करू शकत नाही. Happy

पोस्ट मस्त अमित.
आणि कसंय ना हे सगळं सोयिस्कर आहे. म्हणजे इथे आपण काहीतरी बोलायचं तर नंदिनीने सांगितलेलं कसं बरोबर आहे याची भलामण सुरू ठेवायची. या उलट जर बरचसं स्क्रिप्टेड असलं तरी थोडं खरं पण असतं असं नंदिनीने सांगितलेलं ही सोयिस्करपणे वापरलं जाईल. म्हणजे जेव्हा आपण खरं म्हणू तेव्हा स्क्रिप्टेड आणि स्क्रिप्टेड म्हणू तेव्हा खर्याचं टुमणं लावून धरायचं.

तुझ्या माझ्या पोस्टचा सारांश साधारण जवळपासचाच आहे तसं पाहिलं तर.

तुम्हाला हे असे जनता अदालत मध्ये सेलिब्रेटी बोलवून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप हे सारे उत्स्फुर्त असेल असे वाटते का? >> मला जनरलाईज्ड काही कल्पना नाही की आतल्या गोटातली काही माहिती नाही.
आधी प्रश्न माहित असण्याला जर तुम्ही स्क्रिप्टेड म्हणत असाल तर जगातील जवळ जवळ सर्वच मुलाखती स्क्रिप्टेड कॅटेगरीत जातील. ती जे बोलली त्याला दुसरी बाजू असेल असं तुम्ही म्हटलं असतं तरी मी समजू शकलो असतो. पण काहीही सपोर्ट न देता अभिनय आहे म्हणणे आणि असु ही शकेल नसु ही शकेल असं भोंगळ विधान शुन्य अ‍ॅनेलॉजी देउन करणे हे मला झेपत नाही.

पण काहीही सपोर्ट न देता अभिनय आहे म्हणणे आणि असु ही शकेल नसु ही शकेल असं भोंगळ विधान शुन्य अ‍ॅनेलॉजी देउन करणे हे मला झेपत नाही.
>>>>>

का नाही झेपत?
जर कोणीतरी ठामपणे तिला सच्चे बोलत असेल तर त्यांना दुसरीही बाजू असू शकते हे दाखवण्यात काय गैर आहे.
मुळात तिला सच्चे बोलणे याचाच अर्थ तिने ईतरांवर केलेले सारे छोटे मोठे चांगले वाईट छान घाणेरडे आरोप मान्य केल्यासारखे नाही का? ती लोकं जर तसे वागले नसतील वा तितकी वाईट नसतील तर हा त्यांच्यावर अन्याय नाही का झाला?

थोडी मागची चर्चा वाचली तर नानाकळा यांनीही सिमरन चित्रपट येत आहे त्यामुळे हे सारे आता उकरले गेले अशी शक्यता वर्तवली आहे.
त्यावरही कोणी भाष्य केले तर आवडेल. मी स्वत: ती शक्यता मान्य करून बघूया असे म्हटले आहे.

परत एकदा >>ती जे बोलली त्याला दुसरी बाजू असेल असं तुम्ही म्हटलं असतं तरी मी समजू शकलो असतो. पण काहीही सपोर्ट न देता अभिनय आहे म्हणणे आणि असु ही शकेल नसु ही शकेल असं भोंगळ विधान शुन्य अ‍ॅनेलॉजी देउन करणे हे मला झेपत नाही. >> हे संपूर्ण वाक्य वाचा आणि विचार करा. वरील दोन प्रतिसादां वरुन याचा अर्थ तुम्हाला समजला नाही असं दिसतय.

अमितव + १
सुरवातीला वाटलं कंगना राखी सावंत स्टाइल बोलून करमणुक करायच्या इराद्याने आलीये ,पण इंटरव्यु पुढे गेला तसा आवडला.
नाण्याला दुसरी बाजु नक्कीच असेल पण हिंमत करून दुसरी बाजु येउन बोलावी मग दुसर्या पार्टीने .
खरं खोटं माहित नाही पण केजो फिल्मी कंपु , फिल्मी पापाज बॉइज फार काही रिस्पेक्ट वाटण्यासारख्या पर्सनॅलिटीज नाहीतच.
केजो तर बिथरल्यासारखा जिथे तिथे नेपोटिझम वरून सारखा सो कॉल्ड जोक्स मारायचा प्रयत्न करतो, चांगलीच मिर्ची झोंबलीये !
आयफाला स्वतः च्याच सिनेमातलं बोले चुडीया बोले 'कंगना' गाण्याची आठवण काढत ये कंगना आखिर बोलती क्युं है यार म्हणणं कमालीचा केविलवाणा जोक होता, that just shows he is scr***d by a strong voice raising her point !
Btw , कंगनाला ह्रितिक आध्ययन सारखे लग्गेच बाबांना जाऊन नाव सांगणारेच का भेटतात Proud

अर्र.... ऋ भौ. तुम्ही राव कन्सिस्टन्ट राहत नाही बघा.... क्रिकेट फिक्सिंगवर तुम्ही वेगळी भूमिका घेतात, आणि इथे पब्लिसीटी फिक्सिंग वर त्याच्या अगदी उलट.... मला तर तुमचे प्रतिसाद म्हणजे अगदी क्रिकेटवरचे माझेच प्रतिसादाची नक्कल वाटत आहेत.

नानाकळा, तिथेही तीच भुमिका होती.
तिथे तुम्ही म्हणत होता की सारेच सामने फिक्स असतात. किंवा पर्टीक्युलरली भारत पाक अंतिम सामना फिक्स होता.
असे पुरावा नसताना कोणतीही बाजू ठामपणे घेणे वा तसेच आहे असे बोलणे हे चूक आहे.
हेच माझे मत आणि भुमिका आहे Happy

ही सायको सगळीकडे काय वेड्यासारखी "पापाने तुझे लॉंच किया" बोलत आहे.
स्वतः आदित्य पांचोलीमुळे लॉंच झाली हे काय गर्वाची गोष्ट आहे?
एक लिमीट असते जी कंगणा क्रॉस करत आहे.

Aho ti documentry aahe.. je ghadlay te dakhwalay..jamel tas
>>>>
असे नसते हो. अप्रिय गोष्टींना टाळता येते थोडेफार. जसे की विनोद कांबळी.
जर सत्यसाईबाबांचे बिंग पकडले गेले नसते तर त्यांचे फूटेज आणखी वाढले असते हे नक्की.
असो, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न. आपण कोण काय बोलणारे ..

ही सायको सगळीकडे काय वेड्यासारखी "पापाने तुझे लॉंच किया" बोलत आहे. >> हायला, आम्ही शाखा बद्दल बोललो तर आम्ही टाच घासतो.
मग प्राण साहेब तुम्ही कंगनाच्या नावाने कुठला आवयव घासत आहात ते जरा क्लीअर करा पाहू Rofl

>>एक लिमीट असते जी कंगणा क्रॉस करत आहे.>> कोणती लिमिट आणि कोणी ठरवली? करण जोहर, ऋतिकने?

Pages