बातमीचा सारांश आणि नंतर लिंक देत आहे,
ऋतुराज साहनी हा भारतीय संगणक अभियंता १९९७ मधे अमेरिकेत जाऊन राहिला आहे.
मुंबईत लो़खंडवाला येथील बेलस्कॉट टॉवर नामक सोसायटीत दहाव्या मजल्यावर त्यांच्या दोन सदनिका आहेत.
वृद्ध आई वडिल दोघेच मुंबईत रहात होते, वडिलांचे २०१३ मधे निधन झाले आहे. नंतर आई (आशा) एकटीच रहात होती.
या मुलाचा आईशी शेवटचा संपर्क झाला होता एप्रिल २०१६ मधे, त्यानंतर काही संपर्क नाही.
काही दिवसांपुर्वी तो मुंबईत आला आणि सदनिकेचे दार आतुन कोणी उघडत नाही, म्हणुन चावीवाल्याच्या मदतीने दार उघडले,
तर आत शयनगृहात आशा साहनी यांचा मृतदेह आढळून आला तो सुद्धा अगदी सांगाडा अवस्थेत,
कारण त्यांचे निधन होऊन काही आठवडे / महिने झाले होते.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-woman-s-skeleton-found-...
लोक करिअरमुळे एवढे भावनाशून्य कसे होत चालले आहेत ? वृद्ध आई एकटी कशी रहात असेल ? काय करत असेल ? कशाचीच काळजी कशी वाटली नसेल या माणसाला ? काय झाले आहे माणुसकीला ? 
फार चांगली चर्चा आहे. जितकी
फार चांगली चर्चा आहे. जितकी घरं तितक्या कहाण्या, व्यक्ती तितक्या प्रकृती. इथे बसून अंदाज लावून कुणाला तरी एकाला दोषी ठरवणे अत्यंत चूक आहे.
तरिही मला पडलेले प्रश्न म्हणजे कितीही वाईटपणा असला मुलात आणि आईत तरिही दिड वर्ष त्या मुलाने कुणाकरवी तरी साधी चौकशी पण करू नये? कि केली असेल? त्या शिवाय कुणीच नातेवाईक दिड वर्ष या बाईंकडे फिरकले नाहीत? मृत शरिराचा वास कुणालाच आला नसावा? इतकं एकटेपण आवडतं का लोकांना? त्या बाई कोण त्या परिस्थितीत कधी वारल्या हे आपल्याला काहीही माहिती नाही. त्यामुळे मुलाला किंवा खुद्द त्यांना दोष देणं योग्य नव्हे. नातेसंबंधांना अनेक कांगोरे असतात आपण नक्की कुठला धागा पकडावा ते कळत नाही. मुळात आधी पकडावा का त्याचा विचार करायला हवा. अशा घटनांमधून आपण फक्त धडे घेऊ शकतो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात त्याप्रमाणे. आपले आईवडिल किंवा इतर वयोवृद्ध माणसे जर एकटे राहू ईच्छित असतील तर त्यांची योग्य ती सोय लावणे. त्याउप्पर ही काही घडलेच तर समाज दुषण देणारच, पण निदान आपल्या मनाला समाधान.
आजकाल जसे कोणालाही कामावर ठेवताना पोलिस व्हेरिफिकेशन होते तसे आपले कोणतेही पालक जे एकटे राहतात त्यांचा डेटा उदा. नाव, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, त्यांना असलेले मेडिकल प्रॉब्लेम्स इ. ची एक फाईल जवळच्या पोलिस स्टेशन ला असावी, हा सगळा डेटा कोणत्या तरी विश्वासू एन जी ओ ला देऊन त्यांच्याकडून या लोकांची वेळोवेळी चौकशी/भेट व्हावी आणि संबंधित लोकांना अपडेट दिला जावा. कल्पना फार आयडीयल आहे आणि कितपत डुएबल आहे माहित नाही पण सुचली.
वर च्रप्स नी लिहिलं आहे की अगदी त्या मुलाला कुणी माहिती नव्ह्तं समजा शहरातलं तर त्याने निदान पोलिसांना मदतीसाठी संपर्क करायला हवा होता.. हे बरोबर आहे.
आमचे वडील सुद्धा एकटे राहतात. पण आम्ही न चुकता त्यांना रोज ५ मिनिटं का होईना वेळ काढून फोन करतो. काय कसं काय? जेवला का इ. बोलतो. जर त्यांनी फोन नाही उचलला तर अर्धा पाऊण तासाने परत प्रयत्न करतो त्यातूनही प्रतिसाद नाही मिळाला तर चुलत भाऊ जवळ राहतो आण आत्या पण... त्यांना तिकडे जाऊन पहायला सांगतो. शक्य तितकी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुलांना पण आपल्या आई वडिलांची काळजी असते जरूर आणि त्यांना शक्य ते ती करतच असतात. त्यातूनही नियतीला जे मंजूर असते तेच होते. अशावेळी माणसे, पैसे काहेही उपयोगी पडत नाही. ज्याची जशी वेळ तसे फळ
झाले ते मान्य करून पुढे चालावे हेच बरे!
ह्याच ऊदाहरणाची दुसरी बाजू ,
ह्याच ऊदाहरणाची दुसरी बाजू ,
ज्यांची लग्नं न झालेली बॅचलर मुले परदेशी किंवा देशातंच दूर ठिकाणी शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेली आहेत अश्या किती मुलांच्या पालकांना आपला मुलगा कुठे राहतो, त्याचा पत्ता, तिथला ईमर्जन्सी नंबर, राहण्याच्या/कामाच्या ठिकाणचे कॉन्टॅक्ट नंबर्स, मित्रांचे नंबर्स गरज पडल्यास ईमर्जन्सी मध्ये त्या देशात जाण्याची तयारी असे माहित असते?
अश्या केसेस मध्ये जुजबी माहिती घेवून आपला पाल्यं समंजस आहे आणि तो स्वतःची काळजी घेईलच हा विश्वास पालकांना वाटतो. पण दुर्दैवाने काही ईमर्जन्सी आल्यास दुसर्यांवर अवलंबून राहण्याशिवाय पालकांना फार काही करता येण्यासारखे नसते.
जसे अॅडल्ट मुलांनीच आपली काळजी स्वतः घेणे अपेक्षित असते तसेच अॅडल्ट पालकांनीही आपली काळजी स्वतः घेणे अपेक्षित आहे ज्यात कोणाशी तरी रेग्यूलर कॉन्टॅक्ट ठेवणे, गरज पडल्यास मदतीसाठी ईतरांना बोलावणेही येतेच.
रात्री अपरात्री देशातून/परदेशातून आलेल्या नंबरवरून वाजणारी फोनची रिंग ह्यापेक्षा मोठे नाईटमेअर कुटुंबापासून लांब राहणार्यासाठी क्वचितंच दुसरे कोणते असेल.
हायझेनबर्ग, एक स्टेज येते
हायझेनबर्ग, एक स्टेज येते जेव्हा म्हातारी माणसं लहान मुलांसारखी वागू लागतात. सगळ्याच बाबतींत नाही. पण काही बाबतींत. आणि तिथे , "तुमची जबाबदारी तुमच्यावरच", असं तुम्ही ठळक अक्षरांत लिहिलंय, ते म्हणणं अशक्य किंवा काळजावर दगड ठेवावा इतकं कठीण होऊन बसतं.
आणि अशा म्हाताऱ्या माणसांसाठी, आपण निर्धास्तपणे सोपवावे असे प्रोफेशनल केअर गिव्हर्स भारतात तरी असल्याचं ऐकलं/ पाहिलेलं नाही.
अर्थात परदेशात असलेल्या मुलांसाठी हे प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळले जात असतील. माझा span भारतात आईवडिलांसोबत किंवा जवळपास राहणाऱ्या मुलांचा आहे.
भरत मी असे नाही म्हणालो.
भरत मी असे नाही म्हणालो. माझ्या म्हणण्याचा अर्थ,
तशी स्टेज येणार आहे / येवू शकते हे वेळीच गृहीत धरून त्यानुसार तजवीज करण्याची जबाबदारी स्वतःवर आहे असे म्हणालो. अशी शारिरिक किंवा आर्थिक परावलंबत्वाची स्टेज आल्यास आणि काही तजवीज ( उदा. रेग्यूलर डॉ. विजिट्स, ईंश्यूरन्स अभावी आजारपाणाचा आर्थिक बोजा, फायनॅन्शिअल डिस्प्यूट्स, अनहेल्दी लाईफ स्टाईलचा त्याग न करणे, प्रोफेशनल केअर गिव्हर्स ) केलेली नसल्यास त्या व्यक्तीचे वेल-बीईंग ऊपलब्धं कौटुंबिक मदतीवर आणि कुटुंबातल्यांच्या प्रेमभावनेवर अवलंबून आहे असेही म्हणालो.
<<रात्री अपरात्री देशातून
<<रात्री अपरात्री देशातून/परदेशातून आलेल्या नंबरवरून वाजणारी फोनची रिंग ह्यापेक्षा मोठे नाईटमेअर कुटुंबापासून लांब राहणार्यासाठी क्वचितंच दुसरे कोणते असेल.>>+11111
https://www.thequint.com
https://www.thequint.com/india/2017/08/08/asha-sahani-skeleton-in-mumbai...
बरेच अँगल आहेत ह्याला..
आनंदी ने दिलेल्या लिंकवरची
आनंदी ने दिलेल्या लिंकवरची बातमी अतिशय बॅलन्स्ड आहे.
प्रत्येकाची बाजू योग्य पद्धतीने मांडली आहे शिवाय कुणाला दोष दिलेला नाही.
अशा साहनी यांची मनःस्थिती त्यांच्या पतीच्या निधनानंतर फार चांगली नसावी, असे होऊ शकते, एका विशिष्ट वयानंतर मनुष्य कुठेच रमत नाही, त्याची सतत तगमग होते, खुद्द त्याचे त्याला कळत नाही की नक्की होतय काय तर इतरांना काय कळणार? मग आशावेळी आपण म्हातारी माणसं लहान मुलासारखं वागतात असं म्हणतो. त्यातून आशाजींना संशय होता की त्यांच्या संपत्तीवर बर्याच जणांचा डोळा आहे (अगदी मुलाचा सुद्धा) त्यामुळे बहुधा त्यांनी नातेवाईकांशी संपर्क तोडला असावा... आणि एकटं राहात असाव्यात. दरम्यान एकदा त्या अमेरिकेला जाऊन आल्याचा उल्लेख आहे पण एका आठवड्यात परतल्या.. वृद्धाश्रमाचा विचार बोलून दाखवला होता पण त्या अगोदर त्यांनी स्वतःचे जीवन संपवले कदाचित (बातमीत आत्महत्येपुर्वीच्या चिठ्ठीचा उल्लेख आहे) मृत्यूला अनेक महिने उलटल्याने नक्की कशामुळे त्या गेल्या हे सान्गता येत नाहिये.
मुलाची बाजू ही अवघड.. डिव्होर्स केस सुरू होती आणि मुलगा रहात होता, त्याला एकटे ठेवून येणे शक्य नव्हते. पण निदान एक आठवडा यायला हरकत नव्हती मुलाला घेऊन. किंवा कोर्टाची परवानगी घेऊन बायकोला एक आठवडा मुलाला सांभाळायची विनंती करून. अर्थात मुलाने ही हा विचार केला असेल पण त्यातही काही प्रॅक्टिकल अडचणी
असाव्यात.
फार दुर्दैवी घटना आहे.
धन्यवाद, खुप चांगली चर्चा
धन्यवाद, खुप चांगली चर्चा चालू आहे, अनेक नविन मुद्दे कळत आहेत.
लवकरच अजुन काही मुद्दे लिहायचा प्रयत्न करतो.
मी पण ही बातमी वाचली. एक
मी पण ही बातमी वाचली. एक गोष्ट सोडली तर बर्याच गोष्टीत तथ्य वाटते. मात्र
"He did come once, but since his mother didn't answer the door, he left. This was late last year," said Madhu Kedia, a 59-year-old woman residing in the building,
हे कळले नाही, यात he म्हणजे त्या बाईचा मुलगा वाटतो. तसे असेल तर मुलगा अमेरिकेतुन भारतात येउन आई दार उघडत नाही म्हणुन परत अमेरिकेला जातो. मात्र काही महिन्यानी परत आल्यावर मात्र चावी वाल्या ला मदतिने घर उघडतो ही गोष्ट पटत नाही.
कदाचित news editor ने proof reading केले नसेल किंवा तो येउन गेला ही पण अफवा असेल....
चर्चा भलतीकडेच नेता येईल असे
चर्चा भलतीकडेच नेता येईल असे मुद्दे असतांनाही चांगली चालली आहे चर्चा..
कुठेतरी वाचलाय, मुलाने ऑन्लाईन पोलिस कंम्प्लेन केली होती पण पोलिसांनी दारावर नॉक करण्याशिवाय काहीही अॅक्शन घेतेली नव्हती.
मुलगा अमेरिकेतुन भारतात येउन आई दार उघडत नाही म्हणुन परत अमेरिकेला जातो << कदाचित तेव्हा आई ने आतुन रिस्पॉन्स दिला असेल ?(चालता हो मी दार उघडणार नाही .. वैगरे )
मिडीयावाले शहानिशा न करता
मिडीयावाले शहानिशा न करता काहीही बडबडतात. करिअरपुढे आईची पर्वा नाही त्या मुलाला असं काय काय बोलत होते. ह्यांची न्यूज होते पण एखादा आयुष्यातून ऊठू शकतो अशा बदनामीमुळे
चंपा तेच तर आहे ना.. सर्व
चंपा तेच तर आहे ना.. सर्व न्युज चॅनल्स एकमेकांबरोबरच्या स्पर्धे पायी काहीतरी सनसनीखेज बोलतात, मग त्यातून कुणाचे नुकसान होतेय याची पर्वा त्यांना नसते.
विठ्ठ्ला पान्डुरन्गा काळ फार
विठ्ठ्ला पान्डुरन्गा काळ फार बदलला रे
वीस पंचवीस दिवस मिडीयापासून
वीस पंचवीस दिवस मिडीयापासून दूर होते . आज ही भयंकर बातमी कळली. जे झालं ते वाईट झालं ...
माझ्या शेजारी ८४ वर्षांच्या काकू राहतात. चार मुली एक मुलगा. काका जाऊन पंधरा वर्षे झाली. तेव्हापासून एकट्याच राहतात व्यवस्थित . एक मुलगी नाशिक ला असते तिने तिच्या घराजवळ एक फ्लॅट बघितला त्यांना स्वतंत्र राहता येईल म्हणून पण जायला तयार नाही कुठेच. दुसऱ्या मजल्यावर राहतो. ३६ पायर्या चढाव्या लागतात. आम्ही आजकाल फार कमी दिवस नागपुरात असतो. आता त्या पूर्ण मजल्यावर एकट्याच असतात. त्यांची निर्भयता व आत्मविश्वास जबरदस्त आहे. त्यांची मुलं व आम्ही संपर्कात असतो. म्हाताऱ्या ंंंंंंंंकडे सहानुभूती ने पाहिलं जातं. मुलांना तोंड द्यावे लागते. कुठे एडजस्ट करण्यापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचे असं काकुंचे म्हणणे ते ही पटण्यासारखे आहे. असो!
मी पाहिलेली मोस्ट अध्यात्मिक व्यक्ती ! ह्या
दुसऱ्या ८६ वर्षांच्या आजी आहेत गुवाहाटी ला राहतात ज्यांच्या
दारावरची बेल कधी वाजवावी लागत नाही बाहेरगावी गेल्या तरच कुलूप. दारावर पाटी डॉ सरजू c/o Vivekananda Kendra. Philosophy मध्ये डॉ. _/\_
काही काळ लिहिता आले नाही, एक
काही काळ लिहिता आले नाही, एक मुद्दा लिहायचा होता.
वृद्धाश्रम ही कल्पना सर्वांनाच माहिती आहे, पण हल्लीच एक वेगळा पर्याय ऐकण्यात आला.
काही समान असणारे वृद्ध (वय, छंद, आवडी, विचार, इ.) एकत्र येऊन एखाद्या बंगल्यात, सदनिकेत राहतात.
हे बंगले, सदनिका सर्व सोयींनी युक्त असतात, अगदी केअरटेकर (याला मराठीत काय म्हणता येईल) पण असतात.
हा पर्याय तसा महाग आहे, पण ज्यांना एकटेपणा नको आहे आणि वृद्धाश्रमही नको आहे, तसेच परवडते आहे अशा लोकांना हा पर्याय चांगला असू शकतो.
असे खरेच काही आहे का भारतात ? की नुसतीच कल्पना आहे ?
असे खरेच काही आहे का भारतात ?
असे खरेच काही आहे का भारतात ? की नुसतीच कल्पना आहे ?
>>> आहे. सिनियर सिटीझन टाउनशिप हा प्रकार लवकरच दिसायला लागणार आहे. सध्या रिअल इस्टेट ढेपाळलंय गेल्या तीन चार वर्षांपासून म्हणून अन्यथा किमान दहा बारा प्रोजेक्ट तरी दिसले असते. माझ्याच ओळखीतल्या रिअलइस्टेटवाल्यांचे चार-पाच प्रोजेक्ट डेवलपमेंट सुरु व्हायच्या आत थांबलेत....
दिशा डायरेक्ट या कंपनीने नुलाइफ नावाचा प्रोजेक्ट सुरु केला होता... http://www.gagannulife.com/aboutnulife.html
आता काय परिस्थिती आहे माहित नाही.
(माझा आणि सदर कंपनी-प्रोजेक्टचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. सदर माहिती केवळ विषयानुरुप देत आहे. यात सदर प्रोजेक्टची कोणतीच भलामण नाही याची नोंद घ्यावी)
धन्यवाद नाना,
धन्यवाद नाना,
पण या प्रकल्पांचे नक्की स्वरूप काय ? म्हणजे स्वतःचे घर सोडून तिकडेच जाऊन राहणे असे नसावे. काही काळ जाऊन रहायचे सुट्टीसारखे का ?
स्वतःचे घर सोडून तिकडेच जाऊन
स्वतःचे घर सोडून तिकडेच जाऊन राहणे असे नसावे. काही काळ जाऊन रहायचे सुट्टीसारखे का ?
>> तुमच्या या प्रश्नात बरेच फ्लॉज आहेत.... या प्रश्नावरच मनन करा... उत्तर सापडेल.
पुण्यात अथश्रीची रिटायरमेंट
पुण्यात अथश्रीची रिटायरमेंट होम्स आहेत. माझी एक मैत्रिण तिथे आहे. हल्लीच कळले की सासरची एक नातलगही मुळ जागा विकुन वगैरे तिथे गेलीय. तिथे सर्व सुविधा असतात आणि स्वतःच स्वतःचे मॅनेज करायचे असेल तर तसेही करता येते. म्हणजे म्हटला तर वृद्धाश्रम, म्हटले तर स्वतःचे घर.
भारतात आजही वृद्धाश्रम हा पर्याय खिशात पैसे असणार्यांसाठीच आहे. सरकारी सोय आहे का माहित नाही पण इतक्या मोठ्या लोकसंखेला सरकारी सोय कितपत
पुरेशीपडणार,?
वर कोणीतरी लिहिलेय शेतकर्याचे आईबाबा दिसतात का वृद्धाश्रमात. शेतकर्याला वृद्धाश्रम परवडणारच नाही
भारतात आजही वृद्धाश्रम हा
भारतात आजही वृद्धाश्रम हा पर्याय खिशात पैसे असणार्यांसाठीच आहे. >> बरोबर. यात वाईट काय आहे? किमान तसा पर्याय उपलब्ध होत आहे.
शेतकर्याचे आईबाबा दिसतात का वृद्धाश्रमात. शेतकर्याला वृद्धाश्रम परवडणारच नाही. >> परवडत असेल तर कदाचित दिसतीलही.
शेती वडिलोपार्जित असते.आई
शेती वडिलोपार्जित असते.आई/बापाच्या नावावर असते,त्यामुळे झक मारत पोरं सांभाळतात.
शक्यतो जिवंतपणी कुठलाही शेतकरी वाटण्या करत नाही,तसेच बँक, सोसायटी,वगैरे ठिकाणी बापाच्या नावावर जमीन असल्याने त्यांनाच कर्ज वगैरे मिळते.
त्यामुळे सर्व एकत्र राहतात,पण अशा वेळेस घरात खूप अशांतता असते.सारखी धुसफूस चालू असते.
सबब, ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या घरात वेगळेच प्रकार चालू असतात.
आता विविध योजनांखाली शेतकऱ्यांनाही पेन्शन वगैरे मिळते,त्यामुळे त्यांचे एकंदरीत तसे बरे चाललेले असते.
आजारपणासाठी सरकारी दवाखाने असतातच.
लिहिताना ह्यात बरे वाईट काय
लिहिताना ह्यात बरे वाईट काय असे काहीच डोक्यात नव्हते पण आता तुम्ही विचारलेत तर यात वाईट हे आहे की एखाद्याने पैशांची सोय केली नसेल, आयुष्य जेमतेम पगारात गेले असेल तर त्याचे म्हातारपण जास्त कष्टात जाणार. लोकांना वृद्धाश्रम हा पर्याय वाईट वाटला तरी माझ्या मते आपले हातपाय थकल्यावर कोणीतरी सगळे हातात दिलेले बरे. मुले त्यांच्या व्यापात आणि नोकर ठेवले तरी त्यांच्या सुट्ट्या असणारच. त्यांच्या सुट्टीच्या काळात आपली गैरसोय होणार. तेव्हा सिनियर सिटिझन होम्स हा पर्याय सगळ्यात बेस्ट. हा पर्याय प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे असता तर बरे झाले असते. पण आजतरी तो महाग पर्याय आहे. गरिबाला परवडणारा नाहीय.
हो, श्रीमंत शेतकर्याला परवडेल. पण श्रीमंत व शेतकरी हे दोन शब्द सहसा एकत्र येत नाहीत, mutually exclusive..
हे बघा कोट्यावधी रुपये
हे बघा कोट्यावधी रुपये कमावणारे "गरीब शेतकरी, " त्यापैकी एक जण स्वतः अपंग आहे.
उबो, शेतीत श्रीमंत झालेले
उबो, शेतीत श्रीमंत झालेले शेतकरी पाहुन आनंदच होतोय. let their tribe grow so that more n more young population turns to agriculture.
पण हे अपवाद आहेत हो. सामान्य शेतकरी किसान सन्मानकडे डोळे लाऊन बसतो. शहरात कोणाला किसान सन्मान खिजगणतीत नसेल. पण इथे गावात किसान सन्मान निधी अमुक तारखेला दिला जाणार हे टिविवर ऐकले की पुढचे आठ पंधरा दिवस जो तो आपापला मोबाईल चेक करत बसतो आणि पैसे एकदाचे आले की बँकेत धाव घेतो.
यावरून हे निर्विवादपणे सिद्ध
यावरून हे निर्विवादपणे सिद्ध होते की सगळे, निदान बहुतेक, शेतकरी श्रीमंत असतात, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स गरीब असल्याचे नाटक करतात.
मानव
मानव

तुमच्या तोंडात आवडीचा पदार्थ पडो, तो दिवस लवकर येवो.
गेल्या काही दिवसात आपण ज्या
गेल्या काही दिवसात आपण ज्या समूहाचा हिस्सा नाही,ज्याबद्दल जास्त माहिती नाही त्यांच्याबद्दल पूर्वग्रहदूषित मतं जोरात व्यक्त होताना दिसतात.
कदाचित अशाने मायबोली ही फक्त विशिष्ट मंडळींच्या मतांसाठीच आहे असा समज होऊन लोक इथे व्यक्त होणार नाहीत.
खेडोपाडी वृद्धाश्रमात आईवडलांना ठेवणे हे लांच्छन समजतात. आजूबाजूच्या लोकांचा दबाव असतो. लोकनिंदा होते. आईवडलांना सांभाळण्यावरून भावाभावात भांडणं असंही उदाहरण दिसतं. पण ते सर्रास होत नाही. उतारवयात कदाचित प्रेमाने नाही पण समाजाच्या दबावापोटी म्हातार्या माणसाला सांभाळतातच. शहरात आल्यनंतरही तो कल्चरचा भाग असल्याने परवडत असो किंवा नसो सांभाळतात.
वृद्धाश्रमात राहणे हा विचाराअंती घेतलेला निर्णय असू शकतो हे जसं अशा लोकांना माहिती नसतं तसंच कष्टकरी, शेतकरी लोक जमिनीसाठी झक मारत सांभाळतात असा ग्रह करून घेणारेही असतात.
ज्या वातावरणात आपण राहत नाही त्याबद्दल येता जाता पिंका मारणे हे दोन्हीकडे दिसतं. एका बाजूला अशी संकेतस्थळं उपलब्ध आहेत. दुसरीकडे पारावर बसून आईवडलांना वृद्धाश्रमात ठेवणार्यांबद्दल अशीच टोकाची मतं दिसतात. ती मतं इथे येण्याची सुरूवात झाली कि दोन्ही बाजूंनी टोकाची मतं यायला सुरूवात होऊन समानता येईल.
राभु, तुझे निरीक्षण बरोबर
राभु, तुझे निरीक्षण बरोबर आहे. गावात सामाजिक दबाव खुप जास्त आहे, तो शहरातल्यासारखा झिडकारुन टाकता येत नाही. त्यामुळे जड झालेले आईबापही सांभाळावे लागतात. वृद्धाश्रम ही कल्पना इथे माहित नाही. जिथे आईबाप नकोसे झालेत तिथे त्यांना मुला सुनेच्या हातुन त्रासही सहन करावा लागतो. अर्थात हे सगळ्या घरात होते. पण शहरातले पैसे असणारे लोक स्वतः सिनियर सिटिझन होममध्ये जाऊ शकतात किंवा मुले तिथे सोडु शकतात. गावात पैसे असले तरी असे करता येणार नाही, लोकनिंदेचे खुप मोठे भय इथे आहे.
गावातल्या एका सुसंस्कृत घरातले बाबा आता नव्वद्दीत आहेत आणि अल्झायमरच्या खुप पुढच्या स्टेजला आहेत. शारिरीक मलमुत्रादी धर्मही कळत नाहीत. पण एल्डर केअर होममध्ये ठेवायला घरचे तयार नाहीत, बदल्यात येणारा ताण ते सहन करताहेत. उद्या त्यांनी ठेवले तर लोक तोंडावर बोलुन दाखवतील.
वृद्धाश्रमात राहणे हा
वृद्धाश्रमात राहणे हा विचाराअंती घेतलेला निर्णय असू शकतो हे जसं अशा लोकांना माहिती नसतं तसंच कष्टकरी, शेतकरी लोक जमिनीसाठी झक मारत सांभाळतात असा ग्रह करून घेणारेही असतात. +1
वरील सर्व विचार चर्चा यात
वरील सर्व विचार चर्चा यात काही गोष्टी पटतात काही नाही पटत.
एक वेगळा विचार म्हणून, जैन लोकांमध्ये संथारा घेणे अशी एक प्रथा आहे, ज्यात मरणासन्न किंवा पूर्ण विरक्त व्यक्ती अन्न पाणी सोडून देते आणि नैसर्गिक मृत्यू स्वीकारते.
आपल्या वृद्धत्वात कोणावरही अवलंबून असणे कोणासाठीही क्लेशकारक असते, अशावेळी त्या व्यक्तीने स्वतःच निर्णय घेऊन जवळच्या नातेवाईकांना समजावून सांगून सर्व निरवानिरव करून संथारा घेणे श्रेयस्कर नाही का? आपल्या परंपरेत हि पूर्वी वानप्रस्थाश्रम अशी प्रथा होती, आता सर्व परित्याग करून जंगलात जाणे शक्य नसले तरीही संथारा नक्कीच शक्य असेल, ७०/७५ वर्ष जगून झाल्यावर बहुतेक सर्व आवडी निवडी चोचले यांची पूर्ती झालेली असते मग अशी वेळ येऊच का द्यावी?
माझे हे विचार ९९ टक्के लोकांना पटणार नाहीत, परंतु किमान मी स्वतः तरी एकूलयता एक मुलीवर ओझे होऊन राहू इच्छित नाही, स्वतःची व मुलीची जमा पुंजी वैद्यकीय उपचारावर खर्च करून आर्थिक शारीरिक मानसिक त्रास कुणालाच देऊ घेऊ इच्छित नाही, मला स्वतःला संथारा घेत निरोप घ्यायला खूपच आवडेल.
Pages