आशा साहनी यांचा दुर्दैवी अंत

Submitted by महेश on 12 August, 2017 - 05:50

बातमीचा सारांश आणि नंतर लिंक देत आहे,

ऋतुराज साहनी हा भारतीय संगणक अभियंता १९९७ मधे अमेरिकेत जाऊन राहिला आहे.
मुंबईत लो़खंडवाला येथील बेलस्कॉट टॉवर नामक सोसायटीत दहाव्या मजल्यावर त्यांच्या दोन सदनिका आहेत.
वृद्ध आई वडिल दोघेच मुंबईत रहात होते, वडिलांचे २०१३ मधे निधन झाले आहे. नंतर आई (आशा) एकटीच रहात होती.
या मुलाचा आईशी शेवटचा संपर्क झाला होता एप्रिल २०१६ मधे, त्यानंतर काही संपर्क नाही.
काही दिवसांपुर्वी तो मुंबईत आला आणि सदनिकेचे दार आतुन कोणी उघडत नाही, म्हणुन चावीवाल्याच्या मदतीने दार उघडले,
तर आत शयनगृहात आशा साहनी यांचा मृतदेह आढळून आला तो सुद्धा अगदी सांगाडा अवस्थेत,
कारण त्यांचे निधन होऊन काही आठवडे / महिने झाले होते.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-woman-s-skeleton-found-...

लोक करिअरमुळे एवढे भावनाशून्य कसे होत चालले आहेत ? वृद्ध आई एकटी कशी रहात असेल ? काय करत असेल ? कशाचीच काळजी कशी वाटली नसेल या माणसाला ? काय झाले आहे माणुसकीला ? Sad

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आजोबा (आईचे बाबा) असे अन्नपाणी सोडून मृत्युस सामोरे गेले होते. माझ्या मामा-मामीस आपले काही करावे लागू नये असा हेतू त्यात होता. ते आयुष्यभर, रोज, ११ वेळा रामरक्षा म्हणत असत. मला वाटतं त्याला प्रायोपवेशन हा शब्द आहे का? आईच्या बाजूने खूप पुण्याई माझ्या पाठीशी आहे. याचा अनुभव आहे मला.

हो सामो ताई, त्याला प्रायोपवेशन पण म्हणतात. खरे तर कृत्रिम पद्धतीने माणसाचे आयुष्य वाढवणे हेच पटत नाही, माझे विचार कदाचित अतिरेकी असू शकतील पण कायदा करून ७०/७५ वयानंतरच्या व्यक्तींसाठी व्हेंटिलेटर इत्यादी सारखे उपचार बंद केले गेले पाहिजेत, यातून फक्त मेडिकल लॉबी प्रबळ श्रीमंत होण्याखेरीज इतर काहीही सध्या होत नाही.

Pages