आशा साहनी यांचा दुर्दैवी अंत

Submitted by महेश on 12 August, 2017 - 05:50

बातमीचा सारांश आणि नंतर लिंक देत आहे,

ऋतुराज साहनी हा भारतीय संगणक अभियंता १९९७ मधे अमेरिकेत जाऊन राहिला आहे.
मुंबईत लो़खंडवाला येथील बेलस्कॉट टॉवर नामक सोसायटीत दहाव्या मजल्यावर त्यांच्या दोन सदनिका आहेत.
वृद्ध आई वडिल दोघेच मुंबईत रहात होते, वडिलांचे २०१३ मधे निधन झाले आहे. नंतर आई (आशा) एकटीच रहात होती.
या मुलाचा आईशी शेवटचा संपर्क झाला होता एप्रिल २०१६ मधे, त्यानंतर काही संपर्क नाही.
काही दिवसांपुर्वी तो मुंबईत आला आणि सदनिकेचे दार आतुन कोणी उघडत नाही, म्हणुन चावीवाल्याच्या मदतीने दार उघडले,
तर आत शयनगृहात आशा साहनी यांचा मृतदेह आढळून आला तो सुद्धा अगदी सांगाडा अवस्थेत,
कारण त्यांचे निधन होऊन काही आठवडे / महिने झाले होते.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-woman-s-skeleton-found-...

लोक करिअरमुळे एवढे भावनाशून्य कसे होत चालले आहेत ? वृद्ध आई एकटी कशी रहात असेल ? काय करत असेल ? कशाचीच काळजी कशी वाटली नसेल या माणसाला ? काय झाले आहे माणुसकीला ? Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरतदा, पोस्ट मस्त आणि पटली...

वर कोणीतरी लिहिलंय की 45 व्या वर्षी मुलाला बाहेर काढत नाहीत ते 18 व्या वर्षी काय काढणार... खरंच हे बदलायला नकोय का? किती वर्ष इमोशनल होऊन राहायचं?
मागच्या पिढीचं आपण काहीच करु शकत नाही, आपल्या पिढीपासून बदल घडवूयात का?

वरती एक दोघांच्या पोस्टस मध्ये आपल्या घराची असलेली attachment चा उल्लेख केलाय, खरंच मला सांगा आपल्या या 'भावनिक' गोष्टीसाठी आपल्या मुलांनी का Adjust करायचं? त्यांचं आयुष्य सोडून आपल्यासाठी इथे Adjust करायचं?

माझ्या मुलाला राहायचं असेल यूएस मध्ये तरी त्याने इथे माझ्यापाशीच राहायचं का तर मला माझ घर प्रिय आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून? Don't you think here you being selfish?
हे मी एकाला उद्देशून लिहीत नाहीये, इन जनरल प्रत्येकाने हा विचार केलाच पाहिजे असं मला वाटतं...

तुम्हाला इथे राहायचंय तर तुम्ही तुमची सोय लावा ना.... आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च केले ही अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे का? त्याचं त्याला करू द्या की, एवढं capable बनवा त्याला...

म्हणून पहिल्याच पोस्ट मध्ये मी लिहिलंय की प्रत्येकाने स्वत:ची सोय स्वत: लावायला हवी म्हणजे सगळ्याना आपल्या मनासारखं आयुष्य जगता येईल...

कोणी तरी लिहिलंय की तुम्ही टेबलच्या दुसऱ्या बाजूला जाल तेंव्हा कळेल... हम्म.. मे बी!!!
पण आत्ता माझ्यापुरतं सांगते ,मी टेबलच्या दुसऱ्या बाजूला जाईन तेंव्हा बाकी काही विचार करो ना करो पण माझ्यावरच्या प्रेमापोटी माझ्या मुलाला काही adjust करायला लागू नये म्हणून स्वतः त्याच्या म्हणण्यानुसार adjust करेन हे नक्कीच...
माझं शिक्षण मी स्वतः कर्ज काढुन केलंय आई बाबांना त्रास नको म्हणून केवळ I love them the most एवढ्याच साठी....

आता या केस बद्दल आईशी बोलत होते तेंव्हा तिने एक मुद्दा मांडला की त्या मुलाची चूक होती का नाही ही गोष्ट जरा वेळ बाजूला ठेवुयात पण आपण एकटं रहातो म्हणून का होईना त्या बाईंनी कोणाशीतरी कॉन्टॅक्ट ठेवायला नको होता का ? ही त्या बाईची चूक नाहीच ?
रोजच्या रोज कोणाच्या तरी नजरेत आपण पडूच अशी एकही व्यक्ती त्या बाईला maintain करता नाही आली? काय एवढी मजबुरी होती म्हणे?
समजा धरून चालू मुलगा नालायक होता, पण त्याने नजर कैदेत तर नव्हतं ना ठेवलं तिला? समजा ठेवलं असेल नजर कैदेत, तो अमेरिकेतून काय करू शकणार होता ती पोलिसात गेली असती तरी ? किंवा अशा अनेक गोष्टी... मुद्दा हा की एकही व्यक्ती अशी का नाही जमवली या बाईने की ज्याला आपण रोज दिसावं..

आईशी दीड वर्ष न कॉन्टॅक्ट होऊनही मूलाने काहीच का केलं नाही हा प्रश्न सगळ्याना पडलाय पण तो स्वतः कशात तरी अडकला नसेल हे कशाकरून? त्याला मी माझ्याकडून क्लीन चिट नक्कीच देत नाहीये पण मी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाही हे मात्र नक्की

रोजच्या रोज कोणाच्या तरी नजरेत आपण पडूच अशी एकही व्यक्ती त्या बाईला maintain करता नाही आली? काय एवढी मजबुरी होती म्हणे?
>>>> जिला फ्रास्त्रशन मुळे आत्महत्या करायचीय ती असा का करेल?

आईशी दीड वर्ष न कॉन्टॅक्ट होऊनही मूलाने काहीच का केलं नाही हा प्रश्न सगळ्याना पडलाय पण तो स्वतः कशात तरी अडकला नसेल हे कशाकरून?
>>> त्याच्या डायवोर्स मध्ये अडकला होता तो 1 वर्ष..असे तो म्हणतोय.. तो म्हणतोय की त्याने सोसायटी मध्ये खूप जणांना विनंती केली की चेक करा त्याची आई ठीक आहे का..
कोणी चेक नाही केल..

मुलगा नालायक आहे हे माझे मत आहे.. त्याने जेंव्हा 1 आठवडा कॉन्टॅक्त होत नव्हता, पोलीस ना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता.

आता या केस बद्दल आईशी बोलत होते तेंव्हा तिने एक मुद्दा मांडला की त्या मुलाची चूक होती का नाही ही गोष्ट जरा वेळ बाजूला ठेवुयात पण आपण एकटं रहातो म्हणून का होईना त्या बाईंनी कोणाशीतरी कॉन्टॅक्ट ठेवायला नको होता का ? >>>> खरंच आहे रिया! तुझा प्रतिसाद आवडला.

आपण एकटं रहातो म्हणून का होईना त्या बाईंनी कोणाशीतरी कॉन्टॅक्ट ठेवायला नको होता का ? ही त्या बाईची चूक नाहीच ?
रोजच्या रोज कोणाच्या तरी नजरेत आपण पडूच अशी एकही व्यक्ती त्या बाईला maintain करता नाही आली? काय एवढी मजबुरी होती म्हणे?

>>>>>>

हा देखील अर्धवट माहीतीवरून त्या बाईवर केलेला आरोपच झाला ना Happy

तिने गरजेपुरते संबंध ठेवलेही असतील. पण कोणी ती बाई बाहेर परदेशी मुलाकडे गेलीय असे भासवून तिचा मर्डर केला असेल तर...
अर्थात हा देखील अंदाजच आहे, पण यात कोणा एकावर आरोप नाही की कोणाची चुकी दाखवत नाहीये.

हुमायुन सायकोलॉजी आहे, आधीही म्हटलेय. जी वर गेलीय तिला सहानुभुती मिळतेय. जो खाली राहिला आहे त्याला शिव्या पडत आहेत. बरेच लोकांना आवडते असे तिर्हाईत व्यक्तीलाच शिव्या घालायला. जरा मन हलके होते. आणि ज्याला शिव्या घालत आहोत त्यापर्यण्त त्या पोहोचत नाहीयेत किंवा तोंडावर नाही घालत आहोत म्हणून खरे खोटे काय शोधत बसावे एवढा त्रास ते घेत नाहीत.

ईथे आता असे होते की काही लोकं जे स्वत: किंवा त्यांच्या जवळच्यांपैकी कोणी परदेशी किंवा आईवडिलांपासून दूर राहत असते त्यांना ही केस रिलेट होते आणि लोकं सरसकट परदेशी वा आईवडिलांपासून दूर राहणारयांनाच शिव्या घालत आहेत असे ते समज करून घेतात. प्रत्यक्षात ते तसे असेलच असे नाही.

वरची सगळी चर्चा वाचली.. सगळ्यावर उपाय शेवटी स्वानुभवावरून एकच सांगावेसे वाटते की एकटे राहणार्यांनी निदान १-२ नातेवाईक / मित्र/
मैत्रीणि तरी जोडुन ठेवावीत की आपल्याकडुन काही १-२ दिवस खबर नसेल तर त्यांना जाणवावे. कारण मुलांना तर सगळं हातचे सोडुन पळत येणं शक्य नसतं (भारताबाहेर असतात ते).

माझे वडिल गेल्यावर माझी आई एकटीच राहते (मला भाऊ बहिण नाहीये). मला सद्य परिस्थितीत भारतात जाणे लगेच शक्य नव्हते पण आईने स्वतः एकटी राहायची तयारी दाखवली (तीचा एक पाय अधू आहे खरंतर पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ती तरून जाते) तर मग तिने एक भाडेकरू विद्यार्थी ठेवला आहे एका खोलीत. तिला सोबत पण होते. बाकीचा मैत्रीणि परिवार तिने खूप जोडलाय गेली ३२ वर्ष तिथेच राहिल्यामुळे. त्यामुळे कोणि ना कोणी लक्ष ठेवून असतेच अगदी.

त्यामुळे असे वृद्धांनी पण सहकार्य केले तर मुलांचाही गिल्ट कमी व्हायला मदत होते.

महेश ह्यांनी सहानी केस सांगतां सांगता अचानक 'एक एक एक पकडके हो गये सहानी अनेक' तत्वावर 'लोक करिअरमुळे एवढे भावनाशून्य कसे होत चालले आहेत ' म्हणत सहानींवरून लोकांवर टुण्ण्कन ऊडी कशी मारली ते कळून घेण्यासाठी ह्या लाईनच्या आधी एक-दोन पॅराग्राफ लिहिले आहेत आणि मला ते दिसत नाहीयेत वाटून तीन-तीनदा पान रिफ्रेश केले. Sad

जे झाले ते वाईटच झाले, पण पब्लिकचा 'पहले लाथ फिर बात' टाईप ईमोशनल न्याय निवाडा खूप मनोरंजक वाटला. नो वंडर आपल्याकडे ज्युरी सिस्टिम फेल गेली.

बातमीवरून निष्कर्षापर्यंत कसं पोचू शकतं कोणी? साधं नात्यातल्या कुणी एखादं वाक्य बोललं तरी त्याला खूप मोठी पार्श्वभूमी असते बर्‍याचदा -- अनेक वर्षं झेललेल्या गोष्टींची, माणसांच्या स्वभावांची, घडलेल्या घटनांची, आपसातल्या संबंधांची.. अश्या परिस्थितीत तिर्‍हाईतांना काहीच अधिकार नाही कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्याचा. विशेषकरून आजकाल "बातमी" म्हणून जे काही समोर येतं त्याच्या खरेपणावरसुद्धा शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे, आणि इथे आपण एखाद्या बातमीतल्या संबंधित व्यक्तींबद्दल मतं बनवणं, आणि वर ती जनरलाईझ करणं अश्या गोष्टी करतोय. त्यापेक्षा जसं इथे बर्‍याच जणांनी सांगितलंय - स्वतःच्या आणि जवळच्या लोकांच्या बाबतीत अश्या गोष्टी घडू नयेत म्हणून काय करता येईल याचा विचार करावा आणि जवळपास राहणार्‍या वयस्कर व्यक्तींबाबत सतर्क राहता आलं तर पहावं.

हायझेनबर्ग , Bagz +१

पब्लिक ट्रायलची इतकी सवय झालीये कि ताबडतोब ट्रायल घेउन निर्णय घेऊन टाकत हल्ली जनता

आजकाल वयोवृद्ध लोकांनी लोक जमवून ठेवणे पन रिसकी आहे... क्राईम पेट्रोल मध्ये आशा बऱ्याच केसेस असतात जिथे हे नोकर, नातेवाईक , सिनियर सिटीझन्स ला लुबाडतात.. प्रसंगी खून करून..

जमवलेले लोकं आपल्या प्रायव्हसीमध्ये ढवळाढवळ करत असतील आणि आपल्याला ईरीटेट करत असतील तर आपण फिरून तिथेच आलो.

दुर्दैवी.
बाकी स्टिरिओटाईप पब्लिक ट्रायल बद्दल काय विचारता!
मध्यंतरी 'ट्रॅप्ड' नावाचा राजकुमार राव असलेला हिंदी चित्रपट बघितला होता त्याची आठवण झाली. किती सहज माणूस सापळ्यात अडकू शकतो त्याचं उदाहरण होतं ते.

हायझेनबर्ग,
ते ज्युरी वगैरे माहित नाही. पण
मला सर्वप्रथम जे वाटले ते लिहिले, आणि ते थोडेसे जनरलाईझ असणे मला तरी एवढे वावगे वाटत नाही,
आठवा "चिठ्ठी आयी हैं" गझलेत सुद्धा अशीच तक्रार केलेली आहे, संपर्क न करण्याची.
असतात असे बरेच लोक, ज्यांचा खुप काळ घरच्यांशी संपर्क होत नाही.

अहो "चिठ्ठी आयी है, " किती साली आला होता?
तेव्हा खरंच तशी परिस्थिती असेल,
अगदी 2000-01 पर्यंत भारतातल्या भारतात सुद्धा std फोन करायचा म्हणजे मोठी गोष्ट होती

मी एक पर्याय शोधला आहे. मुंबई पुण्यात आजकाल फ्युनरल सर्विसेस असतात आणि घरबसल्या जेरिआट्रिक सर्विसेस, हेल्थ सर्विसेस प्रोवाइड करणार्‍या कंपन्या/ सेट अप आहे त. हेल्थ स्प्रिंग वगैरे सरख्या कंपन्या तुमचे हेल्थ चेकप करवून घेतात व वेळेवर चेक अप करायचा रिमाईं डर पण करतात. त्यात आपल्या शेजा र्‍यांचा तसेच नेक्स्ट ऑफ किन चा नंबर घेतात. व एक कार्ड तसेच हेल्थ स्प्रिंग चा नंबर पण दिलेला असतो. रस्त्यावर काही झाल्यास रोडवरचे लोक फोन करू शकतात. करतीलच असे नाही. पण एक शक्यता.

तसेच एकट्या म्हातार्‍या नी जेरिआट्रिक सर्विस देणार्‍या माण सांना तसेच नर्सेस ना सांगून ठेवावे फ्युनरल सर्विस वाल्याचा नंबर देउन ठेवावा.
बॉडी फार काळ ठेवता येत नाही त्यामुळे परदेशातून येणार्‍या नातेवाइकांसाठी थांबता येत नसल्यास फ्युनरल उरकून नातेवाइकांना आल्यावर येतील तेव्हा आलेच तर अस्थी कलश देता येतो.

वकिला कडे ह्या संबंधीचे सर्व कागद पत्र व फोन नंबर देउन ठेवावे. अ‍ॅ डमिट असल्यास बॉडी / पार्ट्स डोनेट करायचे असल्यास ते कागदपत्र वकिला कडे द्यावे व हॉस्पिट ल मधील व्यक्तीला सांगून ठेवावे.

विश्वासू मोलकरीण गडी असे काही नसते. ते आपल्या स्वभावाचा गैर फायदा घेउन आर्थिक फायदा कसा होईल हेच बघतात. फार टिपे गाळू नये.
काम करवून घ्यावे व दूर ठेवावे.

पेरेंटिंग ही एक टाइम बाउंड अ‍ॅक्टिवीटी असते ती संपल्यावर पुढचे आपले जीवन भावनेच्या आधारी न जाता आखावे व इज्जतीत मरावे.

पेरेंटिंग ही एक टाइम बाउंड अ‍ॅक्टिवीटी असते ती संपल्यावर पुढचे आपले जीवन भावनेच्या आधारी न जाता आखावे व इज्जतीत मरावे.

...

सहमत

मला सर्वप्रथम जे वाटले ते लिहिले, आणि ते थोडेसे जनरलाईझ असणे मला तरी एवढे वावगे वाटत नाही, >> तेच म्हणत आहे ईमोशन्स आणि जनरलायझेशन, चांगली रेसिपी आहे तुमची एखाद्याचा निष्पक्षपणे सार्वजनिक न्यायनिवाडा करण्याची.

आठवा "चिठ्ठी आयी हैं" गझलेत सुद्धा अशीच तक्रार केलेली आहे, संपर्क न करण्याची. >> गाण्यातल्या तक्रारी आता फॅक्ट्स झाल्या का? चांगलं आहे. मग त्याच न्यायाने देशाबाहेर राहणारे सगळेच त्याच सिनेमातल्या संजय दत्त सारखे गैरमार्गानेच अर्थार्जन करतात असेही म्हणू शकता.

चान्गली चर्चा
अनेक मुद्दे आहेत जे अनुत्तरीत आहेत. मुख्य म्हणजे केस पोलीसांकडे आहे, त्यामुळे ते शोधुन काढतिल. सरसकट कोणालाही दोष देता येत नाही. आई हेकट असु शकते. बर ६३ हे वय म्हणजे खुप म्हातारी नाही. एकंदर त्यांची रहाणी व लोकॅलीटी पहाता ते उच्च वर्गीय असावेत. अश्या लोकांत नोकरांवर विश्वास फारसा नसतो. रीपोर्ट प्रमाणे तिचे नोकर नवर्‍याच्या म्रुत्यु नन्तर तिला सोडुन गेले होते. ह्याचा अर्थ ती बाई नीट वागत नसावी. मुलाचे व तिचे संबंध ही फारसे बरे नसावेत. कारण त्याने गेल्या दिड वर्षात तिच्याशी संपर्क ठेवला नाही.

ह्यात सोसायटी वाल्यांची काही तरी गोम वाटते आहे. कारण येवढे दिवस बाई दिसत नाही, मेन्टेनन्स भरत नाही, लाईट बील, फोन बील, कोणी कोणीच आलं नाही विचारायला? माझ्या आईचं नुकतच निधन झालं. ती ही एकटीच रहात होती. आर्थात आमच रोजच भेटणं होत. पण सगळ्या लोकांना कळवुनही डी २ एच वाल्याला कळवायचे राहिले. तिच पॅकेज मे मधे संपलं, तर त्यन्नी तिच्या मोबाइल वर फोन केला असणार, पण तो आम्ही बंद केला होता. त्यामुळे ते घरी आले चौकशीला. वॉच्मन ने त्यान्ना माझा नंबर दिला. मग आम्ही ते निस्तारले.

बरं ती बाई कोणाच्या तरी संपर्कात असेल!!! नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, कोणीच कसं नाही!!! बरं खुन म्हणावा तर ज्या प्रॉपर्टी किंवा घरा साठी हे झालं ते क्लेम करायला, ते घ्यायला कोणीच कसं आलं नाही ??

काहीतरी गौड बंगाल आहे. एखादी क्राईम स्टोरी असावी अशी. उगाचच माहित नसताना कोणालाही दोष देणे टाळले पाहिजे.
एकट्या लोकांचा प्रश्ण आहेच. तो सोडवायचे प्रत्येकाचे उपाय वेगळे असतात. ज्याने जमेल तसे स्वतःच त्यातुन मार्ग काढावे. आपल्या मुळे दुसरा बांधला जाणार नाही हे पहावे नक्की. आज परिस्थीतीच अशी आहे की कोण कोणाकडे राहिल ह्याची कोणतीच खात्री नाही. समाजाच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. आपणही काळानुसार बदललं पाहिजे.

आज माझ्या नात्यात एक व्रुध्ध जोडपे आहे. दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत. पैकी मोठा मुलगा/सुन कायम येवुन ह्यान्ची काळजी घेतात. मागे ३ वर्षांपुर्वी ह्यान्ना तिकडे घेवुन जातो म्हणुन त्यन्नी प्रयत्न केले. पण हे दोघे गेले नाहीत. भयंकर हट्टी आहेत. धाकट्या मुलाने ह्यांच्या मनाविरुध्ध लग्न केलं म्हणुन त्याच्याशी १५ वर्ष बोलत नव्हते. त्यामुळे तो १५ वर्ष भारतात आलाच नाही. कोणाकडे येणार? आई वडिल बोलत नाहीत!!! त्याचा फोन ही ठेवुन द्यायचे. शेवटी समेट झाला. एकदा हे त्याच्या कडे जाउनही आले. आता जो मोठा सगळी ह्यान्ची व्यवस्था लावतोय तो नको आहे, धाकटा हवा आहे. धाकट्याची परिस्थीती तिकडे फारशी बरी नाही. त्यामुळे तो ह्यन्ना तिकडे घेवुन जाउ शकत नाहीत आणि आता तर वडिल बेड वर आहेत. तरीही ते कोणत्याही मेड ला वा नर्स ला टिकु देत नाहीत. त्यान्ना त्यान्च्याच जातीची स्वयंपाकिण व मेड हवी, ती कुठुन आणणार ?? जो नोकर येइल त्याला पळवुन लावतात. घर म्हणजे उकिरडा आहे. भयानक घाण आहे. आम्ही कोणी जाताना घाबरतो.

आता ह्यात दोष कोणाला देणार? उद्या ह्यन्चं जर काही बरं वाईट झालं तर मुलं जबाब्दार आहेत का?

विश्वासू मोलकरीण गडी असे काही नसते. ते आपल्या स्वभावाचा गैर फायदा घेउन आर्थिक फायदा कसा होईल हेच बघतात. फार टिपे गाळू नये.>>>>

एकदम जनरलाइज नाही करता येणार. माझ्या आईचं निधन झालं तर तिची कामवाली माझ्या पेक्षा जास्त रडत होती. सारखी हॉस्पिटल मधे पण यायची. तीच गोष्ट तिच्या ड्रायव्हर ची. तसेच तिच्या सातार्‍याच्या फॅक्टरी ( जी आम्ही ७ वर्षांपुर्वी विकली) मधले वर्कर्स सुध्धा आले होते. ह्या लोकांचा आता काय संबंध??? पण तरीही आले होते. बाबा जाउन ८ वर्ष झाली, ऑफिस विकुन ७ वर्श झाली तरी त्यान्चा सातार्‍याचा सगळा स्ताफ आईच्या संपर्कात असायचा.

माझी पहिली कामवाली, जिने माझं काम सोडुन १५ वर्ष झाली. ते ही तिने का सोडलं तर तिच्या कर्तब्गार मुलीने तिला आपल्या कडे नेलं. आजही ती न चुकता माझ्या मुलीच्या वाढदिवसाला फोन करतेच. आज चे माझे दोन्ही ड्रायव्हर, मेड्स हे गेली १५-१६ वर्ष माझ्या कडे आहेत

नोकरही नीट प्रेमाने वागवावे लागतात. कारण ती ही आपल्या सारखी माणसं असतात, त्याना ही राग, लोभ व गरजा असतात, जश्या आपल्याला असतात. आजकालच्या एका मुलाच्या जमान्यात तर जिथे सपोर्ट सीस्टीम नाही तिकडे तर ही मोलाची माणसे "मोलाचा" सपोर्ट देतात.

आज चे माझे दोन्ही ड्रायव्हर, मेड्स हे गेली १५-१६ वर्ष माझ्या कडे आहेत
नोकरही नीट प्रेमाने वागवावे लागतात. कारण ती ही आपल्या सारखी माणसं असतात, त्याना ही राग, लोभ व गरजा असतात, जश्या आपल्याला असतात. आजकालच्या एका मुलाच्या जमान्यात तर जिथे सपोर्ट सीस्टीम नाही तिकडे तर ही मोलाची माणसे "मोलाचा" सपोर्ट देतात.>> ते बरोबर आहे. मी पण सर्वांना फार प्रेमाने व समजून घेत असते पण बियाँड अ पॉईन्ट यू आर जस्ट अ सोर्स ऑफ् इनकम फॉर देम. त्यांच्या राग लोभ गरजा फार आक्राळ विक्राळ स्वरूपाच्या असतात. व तुम्ही, तुमचे घर, तुमचे अ‍ॅसेट्स त्यांच्या नजरेसमोर इजी पिकींग म्हणून उभे असतात. त्यात मध्यमवर्गीय मानसिकतेचे लोक्स तू माझ्या मुलासारखच आहेस तू माझ्या बहिणी सारखीच आहेस करून सर्विस स्टाफ ला डोक्यावर चढवून ठेवतात. अ‍ॅक्ट्रेस देविका राणी व त्यांच्या पतीच्या इस्टेट् च्या विल्हेवाटीची कथा अगदी वाचण्या सारखी आहे. मेडने पार पॉवर ऑफ अ‍ॅट र्नी पण करवून घेतली होती व हळू हळू प्रचंड प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करवून घेत चालली होती. परत ती अगदी मुली सारखी.
हे वास्तव ज्येनांनी स्वीकारायला पाहिजे. त्यापेक्षा प्रोफेश नल सर्विस प्रोवायड र वर काम सोपवावे. तीन चार ठिकाणी क्रॉस रेफरन्स असावा म्हणजे चीटी ग चे चान्सेस कमी होतात.

माझी ड्रायवर मेड फेज संपली. मेडला घर बांधायला मोठी रक्कम हवी होती व ड्रायवह्र फायनली दारू च्या आहारी गेला. हे लोक ज्येनांना त्यांच्या सर्विसेस वर डिपें डंट करून ठेवतात. त्यातून बाहेर पडून स्वावलंबनाने वागायची सवय लावावी. जग भर म्हातारे लोक्स स्वतःला सांभाळून असतात. जपानात तर खरे च कोणी बघ णारे नाही. मी एक सी एन एन वर आर्टी कल वाचले होते इथे लिंक देते. आता आयुष्यात कोणाचाही इतका इंटरफिएअरन्स सोसत नाही. मी तर बिग बास्केट होम डिलीवरी वाला, लिफ्ट मन, वॉचमन प्लंबर इले क्ट्रिशिअन ह्यांना पण फार एंटरटेन करत नाही. कोणी घरात वर्क मेन आलेच, जसे एसी फिटर तर दार सताड उघडे व पायाशी कुत्रे अशी बसते दारा जवळ. पण एक चांगले आहे की हे सर्व लोक मराठी त बोलले व हिडिस फिडीस केले नाही तर अतिशय नीट वागतात. मुंबईत तर फारच कटथ्रोट वातावरण आहे. लोक जिथे ५०० रु साठी खून पाडतात तिथे एक म्हातारा जीव काय चीज आहे.

इंग्रजीत एक फ्रेज आहे वेस्टेड अवे तसे त्या बाईंचे झाले असू शकते. शक्ती कमी झाली अन्न आनायला कोणी नाही मग अजूनच शक्ती कमी झाली.
फोन चार्जिंग संपत आले परत चार्ज करायला उठता आले नाही. बेड वर झोपून राहिली. शेजारी फोन व पन्नास हजार रुपये ठेवलेलेल होते. जुन्या ५०० च्या नोटा. व मग बेशुद्धी आली ती परत उठली च नाही. कोणी आले असते तर अ‍ॅडमिट करू शकले असते.

अमा यांचा विचार अगदी प्रॅक्टीकल आहे. मोहन की मीरा यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.

आता होते असे की दोन्ही प्रकारची माणसे जगात असतातच. त्यापैकी आपल्याला नेमकी कोणती भेटतील हे काही सांगता येत नाही. आमच्या घरी पहिल्या बाळाच्या वेळेस जी एक वृद्ध बाई ठेवली होती, मालिश इत्यादी करायला ती स्वतः आउटऑफद वे जाऊन अनेक गोष्टी करायची व तीची त्याच्या मोबदल्यात काही सुद्धा अपेक्षा नव्हती. अगदी बाळंतीणीने खायला हवे म्हणून तीने स्वत"हून फिशमार्केटात जाऊन ताजे प्रॉन्स निवडून आणलेले (ती स्वतः कोळीण होती) आणि बनवून वगैरे बायकोला खाऊ घातलेले. ते एक निर्व्याज प्रेम असतं. पण एवढ्या वर्षात संमिश्र अनुभव आलेत घरकाम करणार्‍या बायकांचे. त्यामुळे रिस्क घेणे शक्य नसते. आमचा तर विचार असा आहे की जेवढ्यास तेवढं ठेवावं, फार लाड किंवा आपलं माणुसकी नात्याने वागायला गेले की लोक डोक्यावर बसून आपल्यालाच कामाला लावतात. त्यापेक्षा जरा वेळ जाऊद्यावा, ज्येष्ठ नागरिकांनी तर कोनावरच भरवंसा ठेवू नये. मेजॉरिटी लोक असे बघितले आहेत की ते अशा ज्येना वर लक्षच ठेवून अस्तात. सो बी सेफ दॅन सॉरी.

इथे विचारावंसं वाटतंय की प्रोफेशनल सर्विस हव्या असतील तर ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या हव्या असतात? वैद्यकिय, घरकाम, दुरुस्ती, देखभाल वगैरे तर समजलंच. अजून काही स्पेसिफिक समजू शकतं का? भारतात किंवा परदेशात कोणती कंपनी अशा सेवा पुरवते?

मला वाटते साहनींचे ऊदाहरण अतिशय मोजक्या दुर्दैवी केसेस पैकी असावे.
मुले आणि पालक ह्यांच्यातल्या बेबनावाचे प्रत्यंतर बरेचदा वयोवृद्धं पालकांच्या शारिरिक हेळसांड होण्यात होते. वयस्कर पालक असले तरी एक अ‍ॅडल्ट म्हणून स्वत:ची शारिरिक आणि मानसिक काळजी घेण्यास आणि त्यासाठी वेळीच तजवीज करण्यास ते स्वतः जबाबदार आहेत. ती जबाबदारी दुसर्‍यांवर (मुलांवर, नातेवाईकांवर) टाकून हात वर करणे त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या हिताचे नाही

बहुसंख्य पाल्यं प्रेमापोटी सेवा शुश्रुषा करतातंच, पण आर्थिक परिस्थिती बरी असल्यास वार्धक्य आणि आजारपण हे एक आजिबात टाळता न येण्यासारखे सत्यं आहे हे वेळीच ऊमगून आपल्या भल्याची तजवीज करणे ज्यात, सगळे जमून आल्यास मुला/मुली बरोबर राहणे ते एकट्याने राहणे ह्यातले परिस्थितीनुरूप जे सूट होईल ते करणे ही त्या व्यक्तीचीच तिच्या स्वत:प्रतीची महत्वाची जबाबदारी आहे.

डोमेस्टिक हेल्प असेल नसेल, मुले / नातेवाईक - शेजारी लक्ष्य देतील न देतील पण एक रेग्यूलरली वरचेवर भेटणारा समवयस्कं लोकांचा सोशल ग्रूप नक्कीच असावा. आपल्या स्वभावाशी जुळवून घेणारे कोणी तरी आसपास (अगदी घरातंच असे नाही) असण्यासाठी त्या व्यक्तीनेही ही थोडा समंजसपणा दाखावयाला हवा.

चालणे, फिरणे, हालचाल बंद असल्यास बेड रिडन असल्यास मात्रं डोमेस्टिक हेल्प शिवाय पर्याय नाही. ह्यात अजून आर्थिकदृष्ट्याही परावलंबी असल्यास मग सगळेच जवळच्या माणसाच्या प्रेमभावनेवर अवलंबून आहे.

इथे एक उदाहरण चर्चिले गेले नाही. साधारण ८० ते ९० या वयात असलेल्या पालकांची मुलेही ६०-७० दरम्यान असतात. तेव्हा जी मुले - नातवंडे - ३०-४० त असतात त्यांच्यावर बरीच मोठी जबाबदारी येऊ शकते. त्यांना वरच्या दोन पिढ्यांचेही पहावे लागते व खालच्या पिढीचेही.

पुर्वी एकत्र कुटूंबपद्धतीत खूप माणसे असल्याने व बायका केवळ चूल-मूल करणार्‍या असल्याने जबाबदार्‍या वाटल्या जायच्या. तीच अपेक्षा आजच्या काळातला एकल कुटूंबपद्धतीत व दोघांनीही नोकरी करत असतांना ठेवणे शक्य नाही.

अमा, तुमचे म्हणणे पटले. प्रत्येकाने आपापली परिस्थिती, आर्थिक ताकद, स्वभाव जाणून त्याप्रमाणे व्रृद्धाश्रम, मुले-नातेवाईकांजवळ घर घेणे, पोलिस खात्याची मदत घेणे हा सर्व विचार तटस्थपणे करावा.

Pages