बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केपी, वरदा Lol कसब्याला सारखी भजनी मंडळं असायची. आणि ते दोन हत्ती न लाल पालखी. बालपणीच म्हातारं झाल्यासारखं वाटायचं. खाली पवळे चौकात गेलं तर एकदम देशभक्ती उफाळून यायची तर त्वष्टा कासारला सारखी शाळा घ्यायचे . कडबे आळीला तुकाराम वैकुंठगमन आणि दगडूशेठला मुका लखलखाट. पुन्हा जोगेश्वरीला पालखी आणि हत्ती आहेतच. नातूवाडा तर शंभर दामले मास्तर एकत्र आल्यावर जे होईल तेच - सारखं शास्त्रीय. दगडूशेठ आणि तुळशीबागेच्या, बाबू गेनूच्या चेंगराचेंगरीतून जगलो वाचलो तर मंडईचा बघता यायचा. त्याचा थाटच असा की जणू कसबा ते मंडई प्रवास केलेला गलितगात्र भक्त मोक्षप्राप्तीसाठी तिष्ठत दारात उभा आणि हा झोपाळ्यावर झुलत इकडे ढुंकूनही न बघता शारदेकडून स्वतःचेच पाय चेपून घेतोय. भक्ताच्या वेदना घेणारा, कामं करणारा देव माहीत होता पण हा प्रकार पाहून दुःखच व्हावे. अशा आमच्या पीडीत मनांना जी काय टवटवी यायची ती नातूवाडा आणि चिमण्यालाच! मुंगळा, रात काली नागिन सी हुई है जवां आणि बुजूर्गो ने .. तशा प्रकारे चढलं नसतं तर गाणपतिकदृष्ट्या आमचं बोन्साय झालं असतं. Proud तर अशा हजारो रोपट्यांचं वटवृक्षात रूपांतर करायचं महान कार्य गजाननाने तुम्हावर सोपवलं आहे. अंतर्मना ग्रॅनाईटचा विजय असो!

Submitted by आशूडी on 8 August, 2017 - 17:31

'बरं बुवा' वरून भिडे पुलावरचा एक इपिसोड आठवला. नदीत गणपती बुडवण्यावरून काही सामाजिकवाले आणि विद्यार्थी हातात माईक नि रेकॉर्डर वगैरे वगैरे घेऊन 'काय मिळतं असं नदी घाण करून? बादलीत का बुडवत नाही, याची कारणं सांगाल का..' इ. इ. विचारत असताना एका भाऊंनी हातातल्या पाटावर गणपतीला सावरत-तोलत 'माईक- रेकॉर्डर वगैरे चालू है ना?' असं रीतसर नीट विचारून 'बरं बुवा, तुम्ही म्हणाल तसं. तसंही तुम्ही करता ते (सुद्धा) एक चांगलंच काम आहे.' असं म्हणून शांतपणे नदीत गणपती विसर्जित केला.
थोडाक्यात काय, तर प्रत्येक वेळी पाट्यासदृश तुसडंच बोललं पाहिजे असं नाही. गोड बोलून, विरोध न करता सुद्धा तोच परिणाम साधता येतो. विशेषतः भिडे पुलाच्या आसपासच्या प्रदेशांत.

Submitted by साजिरा on 18 August, 2017 - 19:32

असं म्हणून शांतपणे नदीत गणपती विसर्जित केला.>>>>> :हाहा:

Submitted by वैद्यबुवा on 18 August, 2017 - 19:37

भिडे पुल खास महत्त्वाचा आहे. वर्षातून दोन-तीनदा तो ठळक वर्तमानपत्रांच्या ठळ्क मथळ्यांत तो फोटोसकट येतो. जेव्हा जेव्हा मुसळधार (पुण्यातला हां) पाऊस येतो, तेव्हा तो लगेच तोंड लपवून पाण्याखाली जातो, की लग्गेच दुसर्‍या दिवशी 'भिडे पूल पाण्याखाली' हा फोटोसकट मथळा, की लगेच पुलावर नागरिकांची गर्दी, की लग्गेच तिथे पोलिस. जुलैत जितक्या वेळा रिमझिम पाऊस पडेल तितक्या वेळा हा हिरो पाण्याखाली जाणार म्हणजे जाणारच. नंतर पुन्हा ऑगस्ट सप्टेंबरात गणपती बुडवताना नाइलाजाने पाणी सोडावं लागत असल्याने तो पुन्हा नाईलाजाने पाण्याखाली जातोच. तो पाण्याखाली गेल्याची बातमी आल्याशिवाय हायसं वाटतच नाही. असा तो एक नाईलाजाचं संस्कृतीवैभव होऊन बसला आहे.

Submitted by साजिरा on 18 August, 2017 - 19:46

साजिरा  फार दिवसांनी ब्याटींगला आलास. गूड टु सी यु. 

Submitted by वैद्यबुवा on 18 August, 2017 - 19:51

बुवा, भिडेपुलाशी फार जुनं हळवं नातं है. आता मला बोलू द्याचं. 

तर, त्याकाळी शहरातल्या नदीवर पूल बांधायची गरज वाटू लागल्यानंतर खूप कलपनाशक्ती ताणून पाण्याच्या पातळीच्या खूप वर असा एक पूल बांधण्यात आला. नंतर कायतरी चुकलं असं लक्षात आलं. म्हणजे असं बघ्ह- खडकवासला नावाच्म धरण जेमतेम दोनअडीच टीएमसी वालं. ते भरलं की हा पूल बुडणार. खडकवासल्याला हा असा उन्माद. आता हे बघून १०-२० टीएमसी वाली वरसगाव-पानशेत-पवना आणि मोप ५०-७० टीएमसीवाली उजनी-कोयना वगैरे काँप्लेक्स येऊन तोंडं लपवू लागली.
इकडे पुलाकाठच्या प्रदेशांत वेगळंच घडलं. ६१ च्या पानशेत घटनेनंतर पाण्याशी रिलेटेड कुणाला काही सांगावं असं महत्त्वाचं काही शिल्लकच न राहिल्याने 'भिडे पूल पाण्याखाली' ही आधुनिकोत्तर काळातली, दरवर्षी घडणारी महत्त्वाची घटना ठरू लागली. इअतकी, की पाऊस उशिरा आला, तर तो पाण्याखाली केव्हा जाणार, किंवा आता गेलाच नाही तर काय करायचं अशी काळजी नारायण-शनवार-सदाशिव या स्वतंत्र संस्कृती-अस्मिता-झेंड्यावाल्या प्रदेशांत पसरू लागली.
(आता संस्कृती-अस्मिता वगैरे ठीक आहे. पण 'झेंडा' हा भौतिक प्रश्न होता. आता आमचे महामहोपाध्याय सांगतात त्याप्रमाणे घराघरांत वेगवेगळ्या रंगसंगती, आकार, प्रकाराचे निरनिराळे असे (आपापले स्वतंत्र) झेंडे आढळून आले. त्यामुळे या प्रदेशाचा किंवा प्रदेशांचा नक्की झेंडा कोणता असावा याबद्दल संशोधन चालू आहे. तुर्तास हा विषय बाजूला ठेऊ.)

क्रमशः 

Submitted by साजिरा on 18 August, 2017 - 20:04

आता तुम्हीच मालक चालक असल्यामुळं कशाची चिंता? मी काय म्हणतो? दोन सवतंत्र लेखच यु द्या म्हंजी पूल अन झेंडा, जाळ अन धूर संगटच काढा!

Submitted by वैद्यबुवा on 18 August, 2017 - 20:18

इथं पूल नेहेमीच चुकीचे बांधले जातात (ही बोंब नव्या पिढीची. त्यामुळे त्यात काही अर्थ नाही. या मुर्खांना आम्ही कोणत्या परिस्थितीत दिवस काढले याची कल्पनाच नाही)- हा नवविचार आणि ब्रँड न्यु तत्त्वज्ञान उदयास आलं ते भिडे पुलानंतर. याही दृष्टीने या पुलाचं खास महत्त्व आहेच.

तर, भिडे पुलाचा हा वार्षिक सोहळा शहराच्या मानाने फारच बापडी असलेल्या पालिकेला डोकेदुखी वाटू लागला. शेवटी नाइलाजाने पालिकेने हा पूल एका मध्यरात्री नदीदोस्त करून टाकला. तेव्हा नदी एक टिपूस नव्हता त्यामुळे फारस काही बिघडलं नाही.
झालं. अस्मितावाल्या प्रदेशांत असंतोष माजला. पाऊस येवो ना येवो, पण आता दर पावसाळ्यात पेप्रात वाचायचं काय, नि इतर गावच्या लोकांना सांगायचं काय- हा कळीचा प्रश्न. कोथरूड, सहकारनगर अशा या प्रदेशांच्या अंकित असलेल्या वसाहतीही आपापल्या परीने पेटून उठल्या. भिडे पूलासाठी चौकाचौकात हजारो पोस्टरं लागली. म्हणजे उदाहरणार्थः "आता रडायचं नाही, आता 'भिडायचं' !" इ.

पालिका हटली नाही. नवा पूल वेगळा आणि वेगळया ठिकाणी बांधणार- असं पालिकेने स्प्ष्ट करून टाकलं. झेंडेवाल्या प्रदेशांनी इथपर्यंतच लढायचं नि भिडायचं हे अध्याऋत होतंच. मग असंतोषाचं प्रतीक म्हणून घराघरांत १० दिवस भिडे पूल बसवायचा- असं ठरलं. म्हणजे असं, की भिडे पूलाची साजरीगोजरी प्रतिकृती तयार करून तिला सजवून वगैरे, चतुर्थीला एका मोठ्या हौदात बुडवून टाकायची. आणि चतुर्दशीला तिला पाण्याच्या बाहेर काढून विसर्जित करायची.
या काळात भिडे पुरुष आणि भिडे सवाष्णी पवित्र आणि पुजनीय समजले जाऊ लागले. या १० दिवसांत यांना घरी बोलावून साग्रसंगीत जेऊ खाऊ घालण्याची प्रथा पडली. एकुण लोकसंख्येच्या मानाने भिडे आडनाववाले फार कमी असल्याने त्यांना प्रचंड मागणी वाढली. चतुर्थीच्या आधीच एकेकाळी गणपती बुक करायचे तसे भिडे बुक केले जाऊ लागले. 'आमचे भिडे झाले बुवा बुक', 'यावर्षी गुहागरहुन भिडे मागवावे लागले बघा' असे संवाद झडू लागले..

आता बास  धिस इज नेव्ह एंडिंग Proud

Submitted by साजिरा on 18 August, 2017 - 20:34
Lol
 

Submitted by मॅगी on 18 August, 2017 - 20:37

साजिरा पुलावर हुबं राहून भाषण का देत नाहीस? (हा आतला आवाज)
बाहेरचा आवाज : थोडक्यात काय, आगामी खंडेरावाला 'भिडेपूल पाण्याखाली' या मथळ्यांच्या अवशेषांवरुन केवळ पुलाच्या आजूबाजूला पुणेसंस्कृती होती असा शोध लागेल. आणि मग तेव्हा नदीला कधी पाणीच नव्हते तर पूल बांधायची गरज काय होती, यावर इतिहास तज्ञांच्या आणि शास्त्र, भूगोल अभ्यासकांच्या गहन चर्चा घडतील. शेवटी पुणे शहराला पाणीपुरवठ्याची गरजच नव्हती कारण तेथील लोक नुसते पाट्या लिहून किंवा बोलूनच दुसर्‍याला पाणी पाजीत, असा निष्कर्ष निघेल. "कोरड्या नदीवर जास्तीत जास्त पूल असलेले शहर" म्हणून पुण्याला नावलौकीक मिळेल तो वेगळाच.

Submitted by आशूडी on 18 August, 2017 - 20:43

या काळात भिडे पुरुष आणि भिडे सवाष्णी पवित्र आणि पुजनीय समजले जाऊ लागले. या १० दिवसांत यांना घरी बोलावून साग्रसंगीत जेऊ खाऊ घालण्याची प्रथा पडली. एकुण लोकसंख्येच्या मानाने भिडे आडनाववाले फार कमी असल्याने त्यांना प्रचंड मागणी वाढली. चतुर्थीच्या आधीच एकेकाळी गणपती बुक करायचे तसे भिडे बुक केले जाऊ लागले. 'आमचे भिडे झाले बुवा बुक', 'यावर्षी गुहागरहुन भिडे मागवावे लागले बघा' असे संवाद झडू लागले.. >. (पूर्वाश्रमीचे ) भिडे आमच्या कंपूत असल्याने आमची नाही कधि पंचाईत होत, आम्ही बोलवतोच कमी वेळा ते जाउदे पुलाखालून वाहून 

Submitted by मेधा on 18 August, 2017 - 20:48

 :हाहा:

Submitted by वैद्यबुवा on 18 August, 2017 - 20:55

राडा :खोखो:

Submitted by नीधप on 18 August, 2017 - 21:04
Lol
Submitted by श्री on 18 August, 2017 - 21:14

खातेप्रमुख श्री अमुक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तमुक यांच्या तुकडीने टेकडीवरून बाजूच्या वसाहतींमधे होणारी रेशमी किड्यांची तस्करी कशी पकडली याची रोमहर्षक बातमी. >>> Lol

'माल हासिल करनेके लिये' त्याच काडेपेटीतील एका काडीचा अर्धा-अर्धा भाग दोन्ही पार्ट्यांकडे असे. दोन्ही भाग जुळून संपूर्ण काडी बनल्यावर रेशमी किडा असलेली काडेपेटी हस्तांतरीत करण्यात येई. अशा छुप्या आणी अभिनव पद्धतीने तस्करी सुरु असल्यामुळे त्यांना पकडणे हे पोलीसांपुढे मोठेच आव्हान निर्माण झाले होते.

taskari.jpg
Submitted by मंदार on 16 May, 2018 - 12:38

Lol
टेकडीवर एका विशिष्ट ठिकाणी पोलिसांच्या खबर्‍यांना अनेक दिवस तुटलेल्या काडेपेटीच्या काड्या सापडत होत्या. आधी घातपाताचा संशय होता. परंतू काड्या पेटवून विझवलेल्या नव्हत्या. नुसत्याच मोडलेल्या होत्या. हे नक्की काय गौडबंगाल आहे याचा विचार करत असतानाच पोलिस स्टेशनमधल्या रेडिओवर 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं लागलं. चाणाक्ष पोलिस अधिकार्‍यांना एकदम 'दस की फटी हुई नोट' आठवली. त्यांनी त्याप्रमाणे सापळा लावला. टेकडीवर पहाटे झाडांना पाणी घालायच्या बहाण्याने आलेले आरोपी काड्या जुळवत असतानाच मुद्देमालासकट पोलिसांनी त्यांना पकडले.
Submitted by पूनम on 16 May, 2018 - 12:53

टेकडीवर पहाटे झाडांना पाणी घालायच्या बहाण्याने आलेले आरोपी >> Lol
Submitted by मंदार on 16 May, 2018 - 13:56

Lol
गळ्याभोवती बारीक लाल किनार असलेला फिकट तपकिरी रंगाचा मफलर अशी या टोळीची छुपी खूण होती, असेही आता अधिक तपासाअंती उघड झाले आहे. अश्या खुणेमुळे कुणाच्याही लक्षात न येता ते इतर पादचार्‍यांमध्ये बेमालूनपणे मिसळून जात.
Submitted by गजानन on 16 May, 2018 - 14:05

कुणाच्याही लक्षात न येता ते इतर पादचार्‍यांमध्ये बेमालूनपणे मिसळून जात<<<<<
'वहां से निकलने के बाद ये लोग कौन बन जाते है, हमे नही पता..'
Submitted by श्रद्धा on 16 May, 2018 - 14:36

Lol

“तुम्हें नहिं पता“?
“दिलपे लिखी बातोंको पौछ न दे तू आँचल से
मैने इस दिलपे लिख दिया तेरा नाऽऽम, किडा तस्करी, रेशमी किडा तस्करी“
Submitted by सशल on 16 May, 2018 - 17:27

Lol

अभिषेक बच्चन चे पुपुवर अनेक फॅन्स आहेत असे निष्पन्न झाले. व किमान एक छुपे फॅन आहेत, हे ही. 'युवा' पिक्चर मास्तरांनी सलग तीन शोज मधे ("३-६, ६-९, ९-१२") पाहिला असे जाहीर केले.

असं उघडउघड कबूल करणा-या, किमान मायबोलीवर तरी आपण दोघीच असू बहुतेक Wink>>>> 2नहीं 3 Proud
Submitted by प्राची on 17 May, 2018 - 18:29

अरे अभिषेक फॅन क्लब मध्ये गर्दी आहे की बरीच Lol
त्याने ऐश्वर्या ऐवजी रानी शी लग्न केलं असतं तर मला आवडलं असतं असं माझं तेव्हापासूनचं अगदी प्रांजळ मत आहे!
Submitted by सशल on 17 May, 2018 - 18:53

अरे पण रानी ला ते आवडलं असतं का हेचा कोन विचार करतय की नाही? Proud
Submitted by वैद्यबुवा on 17 May, 2018 - 18:57

जया आजींनी ही चर्चा वाचली तर लेकराचं इतकं कौतुक ऐकून त्यांचे डोळे पाणावतील. Proud
Submitted by गजानन on 17 May, 2018 - 19:13

अरे अप्पुन भी है ना ज्यु. फॅन!
Submitted by फारएण्ड on 17 May, 2018 - 20:46

अरे अप्पुन भी है ना ज्यु. फॅन! >> अप्पुन भी +१
Submitted by मंदार on 18 May, 2018 - 09:34

तो युवा मधे तुफान आवडला होता मग काय बिन्सले काय माहिती एक्दम मल्टिकास्त मधेच दिसायला लागला...
Submitted by प्राजक्ता on 18 May, 2018 - 10:11

सशल, राणीबद्दलही अगदी अगदी! हमारे खयालात कितने मिलते है... कही हम मेले में बिछडी हुई बहने तो नही Proud

बुवा, गजा Lol

Submitted by पूनम on 18 May, 2018 - 10:40

युवा मधली राणी व अभिषेक ची केमिस्ट्री जबरी होती. तो 'लल्लन' चा रोलच खत्रा होता.
Submitted by फारएण्ड on 18 May, 2018 - 11:43

युवा फार्फार्फार भारी चित्रपट होता. मी ३-६, ६-९, ९-१२ असे सलग तीन शो बघितले होते.
Submitted by चिनूक्स on 18 May, 2018 - 11:50

मास्तर Happy

ते पिक्चर बघताना एक्साइट होउन लोक खुर्चीतच हवेत फायटिंग करतात तसे मास्तर युवा मधल्या फायटिंग च्या सीन ला करत आहेत असे डोळ्यासमोर आले.

* आणि मधेच हावडा ब्रिज चा एखादा ऐतिहासिक संदर्भ किंवा कलकत्त्यातील एखादी गल्ली दिसली की "येथे रवीन्द्रनाथ टागोरांनी पहिली कविता लिहीली" किंवा "कलकत्त्यातले पहिले मांसाहारी हॉटेल हेच" अशा "फन फॅक्ट्स" आजूबाजूच्यांना पुरवत आहेत, असे ही
** म्हणजे त्या लोकांना साधारण "खुर्च्या - एक न नाट्य" ला आल्यासारखा अनुभव
Submitted by फारएण्ड on 18 May, 2018 - 11:55

लल्लन बद्दल +१
खरच केमिस्ट्रि एकदम भारी होती, फिजिक्स टोटली गंडलेलं असलं तरी. ( सा फूट + वर्सेस बेअरली ५ फूट). एका सीन मध्ये तर उचलतोच तिला डायरेक!
सस्सी!
नवीन Submitted by वैद्यबुवा on 18 May, 2018 - 16:15

अभिषेक वरून पुपुची गाडी राणीचे स्टेशन घेउन प्रिंका कडे गेली. तिची उंची (खरी. अभिनयाची वगैरे नव्हे) नक्की किती आहे यावर पुपुवरील तज्ञांत मतभेद झाले. ते पुलंच्या "तज्ञांच्या भाषेत अज्ञानाला मतभेद म्हणतात" लेव्हलचेच होते. मग प्रिंकाकी उंची तुम्हे एकही आदमी बता सकता है करत श्र ने हे म्याटर सरांकडे नेले. सर ऑलरेडी हे वाचत असणार. कारण डॉन अपने दोस्तोंका हाल पूछे ना पूछे, अपने दुश्मनोंकी खबर हमेशा रखता है.
(* शाखाचा डॉन. वरदा डॉन नव्हे. त्या पाच सहाशे पुस्तके वाचल्याशिवाय व तीन चारशे उत्खनने केल्याशिवाय दोस्त का दुश्मन ते ठरवत नाहीत).

पण मुळात सरांना हे कसे माहीत असेल यावर नवख्या लोकांना भलते प्रश्न पडू नयेत म्हणून खुलासा करावा लागला. त्यावर शीघ्रशाहीर अमितने त्यावर एक इम्प्रॉम्प्टु लावणी लिहीली. त्याची हकीकत.

प्रियंका ५'५", आलिया ५'१", दिपीका ५'९" अशी एक्स्ट्रॉ ची माहिती दिली गुगल ने.<<<<
प्रियांका ५'९" आहे म्हणे! बरोबर काय ते अरभाट सरांना विचारायला हवे.
Submitted by श्रद्धा on 19 May, 2018 - 00:11

मला तो 'दस'मध्ये पण आवडतो. टायटल ट्रॅकमध्ये काय खतरा दिसतो. >>> टोटली!

म्हणजे तर चिनूक्स च्या कोर्टात फेलनी घडली!! >>> Lol

बरोबर काय ते अरभाट सरांना विचारायला हवे. >>> हो नक्कीच

* म्हणजे सर तिच्या समोर उभे राहिले की तिच्या नजरेला नजर मिळवताना स्वतःच्या नजरेचा कोन मोजून त्यावरून तिची उंची सहज काढतील. उगाच भलते अर्थ काढू नका.
Submitted by फारएण्ड on 19 May, 2018 - 01:30

अय अरे फा Lol टोटल फुल टॉस आहे हा!
Submitted by वैद्यबुवा on 19 May, 2018 - 01:43

Lol
नजरबंदीला उभा दिसे हा नवा गडी की कोण?
जरा वाकता पदर ढळे हातर इश्काचा बाण!
उडले फेटे पडल्या नोटा अन... हा बसला मोजते कोन!!!
Submitted by अमितव on 19 May, 2018 - 02:02

अमित, ही तुझी स्वरचीत लावणी का? Lol
Submitted by सशल on 19 May, 2018 - 02:17

अमित Lol जबरी आहे
Submitted by फारएण्ड on 19 May, 2018 - 02:52

अमित Lol
Submitted by वैद्यबुवा on 19 May, 2018 - 03:39

अमित, ☺
मैं पल दो पल का शाहीर हूं Lol
Submitted by मॅक्स on 19 May, 2018 - 05:36

पायथागोरस ची लावणी का? Wink

भारी एकदम!! Happy
Submitted by कृष्णा on 19 May, 2018 - 10:43

त्याच्या १०२% परफेक्ट डान्स पर्फॉर्मन्स च्या नादात कुठेतरी बेसिक मजा हरवून बसलेला वाटतो. >> +१ माणूस कमी आणि रोबो जास्त वाटतो तो नाचताना Happy

अमित... Lol
Submitted by मनीष on 19 May, 2018 - 10:47

अमित smiley36.gif
नवीन Submitted by प्राजक्ता on 19 May, 2018 - 21:58

याच 'समरी'विषयी पुढील पोस्टी पुपुवरून साभार Proud

अमितची लावणी बहरात जायलाच हवी. हलवली आहे. कालच्या चर्चेची एक "समरी" लिहून Wink
Submitted by फारएण्ड on 19 May, 2018 - 22:17

कालच्या चर्चेची एक "समरी" लिहून >>(१) हो म्हणजे ह्या भर समरी ती "समरी" लिहिली गेलीच पाहिजे. काय समजलेत? - जनोबा रेगे
(२) इत्ले शिंपल ट्यून गाठता येईना सम री! - यच्च मंगेशराव
(३) जीवनाच्या ह्या समरी नैष्ठिक मौन पाळायला हवे. - आचार्य बाबा बर्वे
Submitted by भास्कराचार्य on 19 May, 2018 - 22:41

.......................................................................................................................

बरं वर समरी समरी चालले होते त्यात कालच 'माता दिसली समरी विहरत...' या नाट्यगीताची खुद्द मातेकडून एन्ट्री टाकायची होती. ती आता टाकते.
आईच्या बिल्डिंगसमोर नवीन उद्यान झाले आहे तिथे आत्ताच समरी विहरून आले.
Submitted by श्रद्धा on 21 May, 2018 - 00:16

श्र Lol
* बाकी आधीच्या पोस्टमध्ये यच्च मंगेशराव हे अकौंटंटही असल्याने ते 'इत्ले शिंपल अकौंट जुळवता येईना सम री' असेही म्हणू शकतात, हा पाठभेद लिहायचा राहिला त्याबद्दल श्रदेवी आमार तुमार खोमा की खम्मा घणी काय तुम्ही म्हणता ते. Proud
Submitted by भास्कराचार्य on 21 May, 2018 - 08:01

.....................................................................................................................

कोणतेच वाहते धागे 'मायबोलीवर नवीन' मध्ये दिसत नाहीत.<<<<
गप्पांचे धागे 'मोह मोह के' असल्याने ते सहजी ऍक्सेसिबल ठेवले नसतील. Proud
खम्मा घणी पुपु...
नवीन Submitted by श्रद्धा on 21 May, 2018 - 14:28

पण ते 'वाह वाह के' जातात ना! Proud
नवीन Submitted by भास्कराचार्य on 21 May, 2018 - 14:30

पुपु वर ३ लोकाचा हॅपीवाला बड्डे आणि त्यानिमित्त ची रत्ने,फुले, केकपॉप्स
तर आज इथे या ठिकाणी आपल्या "हलक्या फुलक्या गप्पा" या कार्यक्रमात पुपु वाह वाह वाहिनीतर्फे आपले स्वागत आहे. (निवेदनाचा टोन हा सह्याद्रीवरील "हॅलो डॉक्टर" च्या सूत्रसंचालकाचा अथवा कोणत्याही मराठी वाहिनीवरील बाजारात नवीन आलेल्या गॅझेट्सची माहिती देणार्‍या निवेदकाचा).

आज या ठिकाणी आपण पाहत आहात की चक्क तिन तिन थोर व्यक्तींचे वाढदिवस या ठिकाणी आज आलेले आहेत आणि समस्त पुपु या योगाने रोमांचित झालेला आपल्याला इथे दिसून येत आहे. तर आपण आता बघणार आहोत की या उत्सवमूर्तींना पुपुवरील त्यांच्या चाहत्यांनी नेमक्या कश्या प्रकारच्या आणि कोणत्या भेटवस्तू आणलेल्या आहेत.

सर्वप्रथम आपण ओळख करून घेणार आहोत सशल यांच्या भेटवस्तूकडे. सशल यांची गुणगुणण्याची आवड लक्षात घेता त्यांच्या चाहत्यांनी त्यांना एक अनोखे असे उपकरण भेट दिले आहे. या उपकरणाची खासियत अशी की याच्यापुढे तोंड नेऊन एखाद्या गाण्याची धून गुणगुणली की क्षणार्धात सदर गाणे उपकरणाच्या पडद्यावर वाजू लागते. (ते बघण्यासाठी तोंड पुन्हा थोडे मागे घ्यावे लागते.) खास सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार या उपकरणात डेटा फीड करण्यासाठी सशल यांना त्यांच्या गळ्यातून काही गाण्यांच्या धुनी काढायला लावण्यात आल्या होत्या. म्हणजे कोणत्या गाण्याची धून त्यांच्या गळ्यातून कशी निघते याचे काही नमुने घेतल्यानंतर इतर गाण्यांच्या धुनी त्यांच्या गळ्यातून कश्याप्रकारे निघतील हे अंदाज बांधण्यात आले. आणि तो डेटा उपकरणात या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. यात आणखी एक खासियत म्हणजे एखादे गाणे पाहत असता अचानक सशल यांना त्यात एखादा अचाट आणि अतर्क्य देखावा दिसल्यास उपकरणाच्या एका कळीच्या टिचकीसरशी फारेण्ड यांच्याशी तो प्रकार शेअर करण्याची सुविधा देखील या भेटवस्तूमध्ये उपलब्ध आहे***. तर अशी ही अद्भूत भेट सशल यांना आवडली असेल अशी आशा करू या आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ या.

या नंतर वळूया फारेण्ड यांच्या भेटवस्तूकडे. फारेंड यांचा अतर्क आणि अचाट व्यासंग लक्षात घेता त्यांच्या चाहत्यांनी त्यांना एक अतार्चोपेडिया भेट दिला आहे. तर श्रोते हो! काय आहे हा अतार्चोपेडिया? तर यात तुम्हाला प्रत्येक सिनेमातील अतर्क्य आणि अचाट प्रकार हा सिनेमातल्या नेमका कोणत्या दृष्यात येतो हे टिंब टिंब मिनिट आणि टिंब टिंब सेकंदापासून ते टिंब टिंब मिनिट आणि टिंब टिंब सेकंदांपर्यंत अश्या स्वरूपात संकलीत करता येतो. अश्या सगळ्या प्रकारांची एक मास्टर सूची देखील यात उपल्ब्ध आहे. याखेरीज नटनट्या, चित्रिकरणाचे लोकेशन (झुडूप, रेल्वे स्टेशन, रणभूमी इ.) यानुसारदेखील या प्रकारांचे वर्गीकरण उपलब्ध असल्याने हा अतार्चोपेडिया वापरण्यास अतिशय सुलभ आहे. (***सशल यांनी त्यांच्या उपकरणावरची ती कळ दाबताच फारेण्ड यांच्या या उपकरणाच्या सूचीवरील सदर प्रकाराच्या नावापुढे ठळक हिरवा ठिबका मिचकू लागतो.)

यानंतर आपण घेऊ छोटासा ब्रेक तोपर्यंत भाचा अमित यांच्या भेटवस्तूशी आपली ओळख करून देतीलच. Proud

सशल, फारेण्ड Light 1 Happy

Submitted by गजानन on 23 May, 2018 - 10:59
गजानन, Lol
पूनम, कोई आया धडकन कहती है! Wink
अमित च्या बाबतीत डोंबिवलीकर आपापसांत भेटीगाठी करून ह्या म्याटर चा निकाल लावणार की काय?!

Submitted by सशल on 23 May, 2018 - 11:18
धन्यवाद गजानन. फारच सुसूत्रमय होतं आपलं निवेदन. ह्यानंतर आपण पाहणार आहोत ते अमितव यांना दिल्या जाणार्‍या भेटवस्तूकडे. अमितव ह्यांचा मायबोलीवरचा एकंदर वावर पाहता त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेली भेट यथोचितच म्हणावी लागेल. ती आहे एकाच व्यक्तीसाठी असलेला सी-सॉ. लोकहो, अमित ह्यांच्या व्यक्तिमत्वास बघितल्याप्रमाणेच ही भेट बघूनही लोक अचंबा व्यक्त करत आहेत. नेहमीच्या सी-सॉला डोलत ठेवायला दोन माणसं लागतात, पण ह्या सी-सॉमध्ये बसलं, की एकच माणूस कधी ह्या बाजूचे, तर कधी त्या बाजूचे मत आपसूक मांडायला लागतो. आमच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे कधी कंझर्व्हेटिव्ह तर कधी लिबरल असं वाटायला लावणारा हा सी-सॉ आहे. एकाच विषयावर दोन्ही बाजूंनी बरोबर वाटणारी मतं मांडायला ह्याच सी-सॉमध्ये बसल्यावर छान जमावे. घरी कुटुंबासमोर कराव्या लागणार्‍या तारेवरच्या कसरतीचा सराव ह्या भेटवस्तूमुळे छान करता येतो, असे ह्या वस्तूचे अ‍ॅमेझॉन रिव्ह्यूज सांगतात. सशल ह्यांच्या उपकरणाशी ही वस्तू जोडल्यावर अमित हे कधी लावणी लिहून जातील, तर कधी जात्यावरच्या ओव्या रचतील, असे माहितगार लोक सांगतात. फारेंड ह्यांच्या भेटवस्तूशी जोडल्यानंतर एकाच सीनमध्ये कधी व्हिलनचे पारडे जड, तर कधी हीरोचे पारडे जड, असे दोलायमान कथासूत्र होऊन कथा रंगतदार होते. अश्या प्रकारे प्रत्येक भेटवस्तूशी आणि प्रत्येक माणसाशी कंपॅटिबिलीटी असणारी ही वस्तू आहे. ही भेटवस्तू अमित ह्यांना आवडेल, आणि त्या भेटवस्तूचा परिणाम होऊन उद्या ते 'ती नावडली' असे म्हणणार नाहीत, अशी आपण आशा व्यक्त करूया, हा लाखमोलाचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल श्री. गजानन ह्यांचे हार्दिक आभार मानूया, आणि आजचा सोहळा संपन्न झाला असे म्हणूया. ह्या तिघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. Proud Light 1

Submitted by भास्कराचार्य on 23 May, 2018 - 11:54
Rofl धन्यवाद.
पाच सहा वर्षे पुण्यात काढल्याने ब्राह्मण सभा, चौपाटी, कामगार मैदान, शिवाजी पार्क अशा भाषणांना गेलो की त्यापार्टी ऐवजी विरुद्ध पाटीचं मत पटतं.
(स्वगतः आणि ते बोलुन दाखवलं की भारावलेला जनसमुदाय उखडतो... अणि आपले दोन पॉईंट सर होतात! )

Submitted by अमितव on 23 May, 2018 - 12:21
ह्या पोस्ट्स बहरात जायला हव्यात!
सशल, फा आणि अमितव तुम्हाला वादिहाशु!

Submitted by जिज्ञासा on 23 May, 2018 - 12:32
Lol

Submitted by वैद्यबुवा on 23 May, 2018 - 12:42
सशल, फारएन्ड, अमितव.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

गजानन व भास्कराचार्य यांनी आतिशय मणोरंजक भेटी याठिकाणी उत्सवत्रिमूर्तींना दिलेल्या आहेत. (त्यावरणं आठवले, फारएन्डजी यांनी त्रिमूर्तीबद्दल लिहावे अशी मी त्यांला विनंती कर्ते.)

Submitted by श्रद्धा on 23 May, 2018 - 12:50
पुन्हा एकदा धन्यवाद लोकहो!

गजानन Lol जबरी आहे. मी अमित करता "सुलभ लावण्या" शोधले. पण ते "सर्च" गेले कोणत्यातरी शेती उत्पादने साइट वर. तेथून मला फोन आला की असे काय पुस्तक वगैरे वाचून लावण्या करता येत नाहीत. एकदा शेताव या मग आमचे लोक दाखवतील - इरले वगैरे आम्ही देउ म्हणे. तो मग कापणी वगैरे ही बोलायला लागला. शेती बद्दल लखू रिसबूड गिरी करता येत नसल्याने फोन ठेवून दिला. आता गाउन दाखवता येणार्‍या लावण्या असे शोधणार होतो, तेवढ्यात भांनी भेट तयार केली, त्यामुळे वाचलो. नाहीतर ते सर्च आणखी कोठे घेउन गेले असते माहीत नाही. कठीण समय येता कोण कामास येतो असे कोणी जर विचारले, तर मी "भा" हे उत्तर यापुढे देइन.

* वरती शेताव शब्द जसा ऐकला तसाच्या तसा लिहीलेला आहे.

(स्वगतः आणि ते बोलुन दाखवलं की भारावलेला जनसमुदाय उखडतो... अणि आपले दोन पॉईंट सर होतात! ) >>> Lol

ह्या पोस्ट्स बहरात जायला हव्यात! >>> टोटली. कोणीतरी डू द फेवर. कॉन्फरन्स मधे आहे.

फारएन्डजी यांनी त्रिमूर्तीबद्दल लिहावे अशी मी त्यांला विनंती कर्ते. >>> पुन्हा एकदा पाहायला हवा काहीतरी सुचायला. एकाच महिन्यात 'जैर रे जैत' व नंतर 'त्रिमुर्ती" पाहिल्याने मोहन आगाशे मन्थ होता तो.

Submitted by फारएण्ड on 23 May, 2018 - 13:57
आता गाउन दाखवता येणार्‍या लावण्या असे शोधणार होतो >> अरे गाउन घालून लावण्या!! त्यापेक्षा त्या इर्लावाल्या लावण्याच बर्‍या. Proud

Submitted by अमितव on 23 May, 2018 - 14:05
कोणीतरी डू द फेवर.<<<<< प्रियांका चोप्रानंतर असे म्हणणारे तुम्हीच! (पहा : https://youtu.be/uyh9jYSGpCg - do me a favour, lets play holi)

एकाच महिन्यात 'जैर रे जैत' व नंतर 'त्रिमुर्ती" पाहिल्याने मोहन आगाशे मन्थ होता तो.<<<<< Lol काय रेंज आहे सिनेमांची!!!

Submitted by श्रद्धा on 23 May, 2018 - 14:58
लोल ठरवून तसे नाही केले अगदी पण आपोआप झाले. मी समहाउ जैत रे जैत आधी पाहिलाच नव्हता. पहिल्यांदाच पाहिला.

पुपुमधला हलकल्लोळ सुरूच आहे. मधल्या काही पोस्ट्स गेल्यात पण पुढच्या इथे हलवतेय...

<<'हाच खरा हिम्मतवाला' <<<<<
हिम्मतवालाच्या मराठी रिमेकचं नाव वाटतंय. Proud
Submitted by श्रद्धा on 24 May, 2018 - 15:14

..........................................................................

हाच खरा हिम्मतवाला' >> Lol असं डायरेक्ट 'हाच' वर नाही जायचं. श्रेणी असते.
आधी, नुसताच, हिम्मतवाला
मग, आणखी शूर, हिम्मतवाला मर्द
मग रोम्यांटिक शेडचा, माझा हिम्मतवाला
मग परत कोअर अ‍ॅक्शनवाला, शत्रूंचा कर्दनकाळ हिम्मतवाला
मग अंतिम चरण, हाच खरा हिम्मतवाला!
Submitted by पूनम on 25 May, 2018 - 11:46

पूनम Lol
लॉजीक परफेक्ट आहे पण. पहीला मराठी रिमेक शक्यतो शब्दशः भाषांतर असतो.
उदा. खून भरी मांग = भरला मळवट रक्तानं Proud
Submitted by मंदार on 25 May, 2018 - 11:58

खून भरी मांग = भरला मळवट रक्तानं >>> बापरे! Rofl
रच्याकने, हे माहित तरी कसं आणि का असतं? काय अभ्यास! काय अभ्यास! Proud
पण मिलॉर्ड, दोन प्रश्न आहेत-
१) मांग इज नॉट इक्वल टु मळवट. द प्लेस ऍन्ड द शेड्ज बोथ आर डिफ्रंट. त्यामुळे हे चुकले आहे, बरोबर?
२) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
.
.
"हाच खरा हिम्मतवाला"चं मूळ नाव काय आहे?????
Submitted by पूनम on 25 May, 2018 - 12:33

Lol @सगळे
हाच खरा हिम्मतवाला"चं मूळ नाव काय आहे????? >>>> 'एषः खलु धैर्यवान्' | मराठीचं मूळ संस्कृतात आहे. Proud
Submitted by भास्कराचार्य on 25 May, 2018 - 12:45

'एषः खलु धैर्यवान्' | <<<<<
संस्कृतशी परिचय नसलेल्या कुणाला वाटेल, खलनायकाला लाडाने खलु म्हणतात की काय? गोंधळ होईल! Uhoh Proud
मग 'खरा हिम्मतवाला कोण?' असा एक सिनेमा काढावा लागेल.
Submitted by श्रद्धा on 25 May, 2018 - 12:50

खलनायकाच्या बाळाला लाडाने 'ए खलुल्या' म्हणत असतील काय?
Submitted by गजानन on 25 May, 2018 - 13:55

खलनायकाच्या बाळाला लाडाने 'ए खलुल्या' म्हणत असतील काय?
>>>
ते मान्यताला विचारायला हवे.
Submitted by टवणे सर on 25 May, 2018 - 14:54

पूनम ने दिलेल्या श्रेण्या >>>
खून भरी मांग = भरला मळवट रक्तानं >>>
'एषः खलु धैर्यवान्' >>>
आणि सगळे खलुज >>> Lol

आणि मान्यताचा संदर्भ समजायला दोन मिनीटे लागली Happy
Submitted by फारएण्ड on 25 May, 2018 - 16:09

\आणि मान्यताचा संदर्भ समजायला दोन मिनीटे लागली >> काय हे फा ? अभ्यास कमी पडतोय हां. मला सुद्धा समजला तो संदर्भ Happy
Submitted by मेधा on 25 May, 2018 - 17:08

आणि मान्यताचा संदर्भ समजायला दोन मिनीटे लागली <<<
शो ना हो अगदीच... दिलेला 'सम्मान' परत घेईल नेटफ्लिक्स अशाने.
Submitted by श्रद्धा on 25 May, 2018 - 17:10

Say no more! फारच औटॉफ्फॉर्म सिच्युएशन. मात्र आता एकच लक्ष्य. अ आणि अ. पुन्हा तयारी सुरू. आजच सकाळी मेहंदी बन गयी खून मधली एक फाइट पाहिली. सुपरस्टार्स सुमीत सहगल आणि आशिष चनाना. एक वकील, एक होतकरू इन्स्पेक्टर, जुही चावला आणि बर्‍याच सायकली. स्फोटक मॅटर.
Submitted by फारएण्ड on 25 May, 2018 - 17:32

दिलेला 'सम्मान' परत घेईल नेटफ्लिक्स अशाने. >>> दिलेली 'मान्यता' नाही? Proud
Submitted by भास्कराचार्य on 25 May, 2018 - 17:34

मेहंदी बन गयी खून<<<< काय चित्तथरारक नाव आहे! पण जुही चावला???
खरेतर या 'अमुक बन गया तमुक' सिनेमांवर एक स्पेशल लेख आला पाहिजे. कितीतरी एंट्रीज आहेत.
बून्द जो बन गई मोती (भौ भौ..)
ज्योती बनी ज्वाला
आंसू बने अंगारे
खिलौना बना खलनायक
फूल बने अंगारे.... इ. इ.
Submitted by श्रद्धा on 25 May, 2018 - 18:59

मेहंदी बन गयी खून >>> 'मैं हूण दी बन गयी खून' अर्थात मी आमचं रक्त झाले, मी आमच्या ग्रुपमध्ये जान आणली, असं ती पंजाबीमध्ये सांगत असेल. Proud
* मेहूण जेवायला बोलवतात, त्याच्याशी काही संबंध असल्यास माहीत नाही. मी मराठी असल्याने मला इतरांच्याच प्रथांविषयी जास्त माहिती आहे. Proud 'त्यांच्याकडे ना ...' अश्या सुरवातीनंतर बरीच ऐकायला मिळते.
Submitted by भास्कराचार्य on 25 May, 2018 - 19:17

भा Lol
खरेतर या 'अमुक बन गया तमुक' सिनेमांवर एक स्पेशल लेख आला पाहिजे >>> जबरी, श्र Happy हे कहर आहे. करायला हवे. एक ग्राफही काढता येइल सगळे "अमुक" व "तमुक" प्लॉट करून. म्हणजे "अंगारे" हा एक फेवरिट तमुक आहे. फूल व आँसू कडून तेथे एक रेघ जाईल. आँसू वरून बर्‍याच रेघा जातील एअरलाइन च्या मॅप वर हब्ज मधून निघतात तशा. एक फूल कडे, एक अंगारे कडे व बहुधा अजूनही असतील.
Submitted by फारएण्ड on 25 May, 2018 - 20:43

हूण<<<<< हूण म्हणजे पंजाबीत 'आत्ता/लगेच' टाईप्स..
आमची = अस्सां दी (बहुधा)..
पंजाबीबद्दल मी कष्ट करून माहिती गोळा करत असते. गणपुले आणि टिचकुले नावाचे मराठी लोक सराईतपणे पंजाबी, हिंदीत सजदे करताना पाहिल्यापासून महाराष्ट्रातले पंजाबीचे महत्त्व माझ्या मनावर ठसले आहे. या शिक्षणाचा एक भाग म्हणून भावाच्या लग्नात संगीत ठेवून मी काला डोरिया, लठ्ठे दी चादर वगैरे गाणी लावून उपस्थितांस डान्स करावयास सांगितला. पण पंजाबी शब्द डोक्यावरून जाऊ लागल्याने पब्लिक नागीन डान्स, कोळी डान्स स्टेप्स करू लागले. चादर शब्द ऐकून कुणीतरी डबल बेडवरची चादर काढून आणली आणि त्यात अडकून तिघे जण पडले. 'मत्थे दे चमकण वाल' ऐकून एक आजी 'उद्या मेनूत मठ्ठा आणि बिरडं आहे की काय?' असे विचारू लागल्या. एकूण मराठी जनतेत पंजाबीबद्दल पुष्कळ जागृती करणे आवश्यक आहे हे पुन्हा जाणवले. असो.
एक ग्राफही काढता येइल सगळे "अमुक" व "तमुक" प्लॉट करून. म्हणजे "अंगारे" हा एक फेवरिट तमुक आहे. फूल व आँसू कडून तेथे एक रेघ जाईल. आँसू वरून बर्‍याच रेघा जातील एअरलाइन च्या मॅप वर हब्ज मधून निघतात तशा. एक फूल कडे, एक अंगारे कडे व बहुधा अजूनही असतील.<<<<<
फारएंडजी, असा रिसर्च तर झालाच पाहिजे.
Submitted by श्रद्धा on 26 May, 2018 - 00:04

Lol हे कहर आहे. पूर्ण पॅरा एका दमात वाचू शकलो नाही. वाल-बिरडं तर टोटल लोल. अशी जागृती तुम्हीच करू शकता श्रजी. मराठी नाट्यसंगीतात "नच बलिये करू कोपा" ऐकू येइल अशी आशा तुमच्यामुळे वाटते. तसेच नुसत्या पाजी चे विविध अर्थ एक वर्ष पुरतील "हवा येउ द्या" ला.
Submitted by फारएण्ड on 26 May, 2018 - 02:02

मराठी नाट्यसंगीतात "नच बलिये करू कोपा" ऐकू येइल अशी आशा तुमच्यामुळे वाटते.<<<<< Lol
साल्सा (डान्स)मध्ये खरंच एक कोपा नावाची डान्स मूव्ह असते. असे पद गायला लागल्यावर रंगमंचावर मराठी, पंजाबी आणि लॅटिन संस्कृतीचा काय मनोहर संगम होईल! फक्त लोक भयंकर नाचून सालसाची टोमॅटो कोशिंबीर न करोत, म्हणजे झालं!
नवीन Submitted by श्रद्धा on 26 May, 2018 - 10:18

Lol
अशी नाट्यपदे सालसा* श्रद्धेने गावीत. Proud
* सालस ह्या विशेषणाचे लिंसा रूप. अधिक माहितीसाठी पहा - स्वामी चिन्मयानंद ह्यांचा 'विशेषणरत्नाकर'. किंवा दामले-खरतडकर मास्तर ह्यांचा 'दुर्गम मराठी व्याकरण कोश'.
नवीन Submitted by भास्कराचार्य on 26 May, 2018 - 10:28 >>

चुकल्याने हा जबरा प्रतिसाद आला. आई जशी गंडलेल्या पदार्थापासून छानसं काहीतरी करून खायला देते, तशीच ही श्रमाता होय. Proud
Submitted by भास्कराचार्य on 25 May, 2018 - 22:29
आई जशी गंडलेल्या पदार्थापासून छानसं काहीतरी करून खायला देते, तशीच ही श्रमाता होय.
<<<<<<<<
मराठीत लिहिताना चुका होऊ नयेत म्हणून जपतोस तसा पंजाबीतही चुकू नयेस, म्हणून जप हो श्याम...
Submitted by श्रद्धा on 26 May, 2018 - 00:08
श्रद्धा Lol
Submitted by गजानन on 26 May, 2018 - 00:13
मराठी नाट्यसंगीतात "नच बलिये करू कोपा" ऐकू येइल अशी आशा तुमच्यामुळे वाटते.<<<<< Lol
साल्सा (डान्स)मध्ये खरंच एक कोपा नावाची डान्स मूव्ह असते. असे पद गायला लागल्यावर रंगमंचावर मराठी, पंजाबी आणि लॅटिन संस्कृतीचा काय मनोहर संगम होईल! फक्त लोक भयंकर नाचून सालसाची टोमॅटो कोशिंबीर न करोत, म्हणजे झालं!
Submitted by श्रद्धा on 26 May, 2018 - 00:48
Lol
अशी नाट्यपदे सालसा* श्रद्धेने गावीत. Proud
* सालस ह्या विशेषणाचे लिंसा रूप. अधिक माहितीसाठी पहा - स्वामी चिन्मयानंद ह्यांचा 'विशेषणरत्नाकर'. किंवा दामले-खरतडकर मास्तर ह्यांचा 'दुर्गम मराठी व्याकरण कोश'.
Submitted by भास्कराचार्य on 26 May, 2018 - 00:58
Lol
Submitted by श्रद्धा on 26 May, 2018 - 01:08
अरे काय सुटलेत सगळे, हहपुवा झालीये.
सगळंच्या सगळं बहरात हलवलं आधी.
पुपु अनेको महिन्यांनी बहरून आलाय. तरी सर, मास्तर, गुर्जी इत्यादी मानकरी गायब आहेत
Submitted by वरदा on 26 May, 2018 - 02:10
HSC चे निकाल कोठे बघता येतील?
Submitted by गजानन on 26 May, 2018 - 04:05
एस एस सी बोर्डाचे वेब साइट वर
Submitted by बाबा कामदेव on 26 May, 2018 - 05:10
दामुलु गुरुजु च व्युत्प्त्यु विश्वु हा ग्रंथु पण हय ना ?
Submitted by बाबा कामदेव on 26 May, 2018 - 05:11
तसेच थ्यागराज कृथी सारिखे दामुलु पाक कृथी पन हय म्हणं...?
Submitted by बाबा कामदेव on 26 May, 2018 - 05:14
हूड बॅक इन फॉर्म!
Submitted by टवणे सर on 26 May, 2018 - 06:37
ह्याला राडा घालणे म्हणतात, सध्या फुल जोरात आहे पुपुवरचा राडा..
Submitted by हिम्सकूल on 26 May, 2018 - 08:00
तरी सर, मास्तर, गुर्जी इत्यादी मानकरी गायब आहेत >> यस आणि इतरही जुने जाणते वगैरे...
हो ते ग्रंथ, कोश, कृथी सर्व काही आहे. नुसते "व्यंजने" म्हंटलेत तर व्याकरणातली की स्वयंपाकातली असे विचारून मग योग्य ग्रंथ(राज) सुचवायचा. मग त्यावर "व्यंजने" ही मराठीत फक्त व्याकरणात येतात अशी एक सूक्ष्म धमकीवजा माहिती देउन मास्तर केवळ लोकाग्रहास्तव (व संपाकदकाग्रहास्तव) पुढच्या आवृत्त्यांमधे घातलेल्या एका परिशिष्टामधे खाण्यासंबंधी व्यंजनांचा उल्लेख करतात. लोक हिंद्याळलेले शब्द शोधत असल्याने हे करावे लागले असे त्या परिशिष्टात त्यांनी नर्मविनोदी पद्धतीने लिहीलेले आहे. गंभीर लेखक जसे कधीकधी एखादा लेख खेळकर भाषा वापरून लिहीतात तसे.
रच्याकने - "ग्रंथु" नव्हे. शब्दांना उकार लावायाची फॅशन नंतर ज्ञानेश्वरकालीन काळात आली.
Submitted by फारएण्ड on 26 May, 2018 - 11:04
दामुलु ग्रंथुलु ही म्हणता येइल....

मास्तर केवळ लोकाग्रहास्तव (व संपाकदकाग्रहास्तव) पुढच्या आवृत्त्यांमधे घातलेल्या एका परिशिष्टामधे खाण्यासंबंधी व्यंजनांचा उल्लेख करतात. लोक हिंद्याळलेले शब्द शोधत असल्याने हे करावे लागले असे त्या परिशिष्टात त्यांनी नर्मविनोदी पद्धतीने लिहीलेले आहे. गंभीर लेखक जसे कधीकधी एखादा लेख खेळकर भाषा वापरून लिहीतात तसे. >>

हो, म्हणजे ' खेळकर परि शिष्ट ' असे मास्तरांचे वर्णन तेथूनच आले आहे. कधी मास्तर, तर कधी मा स्तर अर्थात आई लेव्हल प्रेमळ, अशी विविधरूपे मास्तर धारण करतात. ऐतिहासिक मास्तरांनी ही ट्रिक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे याचि देही याचि डोळा पाहून आत्मसात केली आहे. व्युत्प्त्यु विश्वु ह्या ग्रंथाची प्रेरणा तेथूनच आली. मास्तरांची ही विविधरूपे वेगवेगळ्या धर्मांशीही निगडित आहेत. (पुण्यातली, किंबहुना पुण्याबाहेरची, निगडी नव्हे, ती वेगळी.) रविवारी माटेकराची मिसळ उडवण्याआधी 'मास तर' कर, असा उपदेश ख्रिश्चन धर्मात तेथूनच आला. भौतिकविज्ञानात प्रकाशकणाला 'मास तर' नसेल, ही शक्यता आईन्स्टाईनच्या कानात मास्तरांनीच वर्तवली, व तेथून ते विष्णुजी की रसोईमधली डाळभाजी चापायला आल्ड्स हक्स्ल्याबरोबर निघून गेले आणि त्याला त्याबदल्यात 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'चे मुद्रितशोधन करून दिले, अशी दंतकथा प्रचलित आहे. अश्या कितीतरी (गै)रसोई मास्तरांमुळेच उपलब्ध आहेत. शेवटी 'मास्तरोच्छिष्टं खाद्यसर्वं' म्हणतात, ते काही खोटे नाही.

Submitted by भास्कराचार्य on 28 May, 2018 - 11:07
….................................

मा स्तर च्या फोडीबद्दल आभार. हे दोन महिने एरव्ही फक्त आंब्याच्या फोडीबद्दल मी सहसा आभार मानतो पण हे वर्थ होते. पण मी समजत होतो संस्कृत अर्थाने धरले तर मा स्तर म्हणजे स्तर नसलेले - म्हणजे "बायको हरवली स्टॅण्डवर" ते "अस्तु/कासव" सारखे चित्रपट सहज पचवणारे, इफ्तार च्या पार्टीत खाताना पुण्यातील चित्पावनांच्या खाद्यपद्धतीवर रिसर्च करणारे - अशा अनेक गोष्टी आल्या. त्यांचे सर्वधर्मसमभावी रूप तर सर्वपरिचित आहे. मुळात माज नसल्याने नमाज त्यांना सहज जमतो. तसेच त्यांचे अष्टावधानीपण पॉप्युलर आहेच. पुलंच्या दामले मास्तरांसारखे ते अनेक वर्ग एकदम हाकतात. एकीकडे (*) देशातील ख्रिश्चन बंधू आणि (**)(***)भगिनींना मास-तर कर सांगताना दुसर्‍या बाजूला असलेल्या व्याकरणविद्यार्थ्यांना 'संधीचे नंतर पाहू, सध्या समास तर कर' असे यमकप्रधान बोलतात. तर तिसरीकडे "पुत्र व्हावा ऐसा गुंडा" तील तत्सम आणि तद्भव शब्द वेगळे करताना ते 'गुंडा' तील काव्यमय संवादांचे ही विश्लेषण करतात. तर वर्गाच्या चौथ्या क्वाड्रंट मधे बसलेल्या होतकरू शेफ्स ना बटाट्याचा प्रवास पोर्तुगाल मधून पुण्यातील मंगल कार्यालयातील पंगतीतील उदबत्तीच्या बेस पर्यंत कसा झाला ते सांगतात. तो बिर्याणीचा फेमस किस्सा तिथलाच. एकदा बिर्याणी कोठून आली हे विचारल्यावर मास्तरांनी पाचव्या शतकातील अफगाणिस्तानातून सुरूवात केली. सुमारे १५ मिनीटे झाल्यावर ते जेमतेम खैबरखिंडीपर्यंत पोहोचले होते तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी मधेच थांबवून सांगितले की ते फक्त विचारत होते की ती समोरची बिर्याणी बाजूच्या कोणत्या रेस्टॉरण्ट मधून आली.
मास्तरांबद्दलची माहिती कंसांशिवाय अपूर्ण आहे म्हणून, नोटः
(*) हे बाजू या अर्थाने. व्यक्ती या अर्थाने नव्हे
(**) भगिनींमधून योग्य त्या व्यक्ती वगळण्याकरता मास्तरांना मुभा आहे
(***) वरचा कंस चित्रमय अर्थाने घेउ नये.

नवीन Submitted by फारएण्ड on 28 May, 2018 - 19:42

अजून कल्ला चालूच आहे..

<<कुठल्यातरी व्याकरण विषयक शंका उपस्थित करा, मास्तर असतील तिथून येतील इकडे. <<
शंकानिरसनास संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला इतिहास-नागरिकशास्त्र या गाय-वासराने जितके छळले तितके कशाने छळले नसेल. शिष्ट म्हणजे आढ्यताखोर किंवा स्वतःला जरा वरच्या मजल्यावरचा समजणारा असे आंम्हास माहीत. मग शिष्टमंडळ म्हणजेच अश्या लोकांचे मंडळ म्हणजे एकाचवेळी मान वर करून सदतीस मजली इमारतीच्या वरच्या गच्चीकडे पाहिल्यासारखे आंम्हास वाटे. मान दुखू लागे. पण बाई आमचा विचार न करता तीन ब्रिटीश मंत्र्यांचे शिष्टमंडळ भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवून देत.
तर या ठिकाणी शिष्ट म्हणजे सुशिक्षित, सभ्य ते शिष्ट म्हणजे आढ्यताखोर, उर्मट अश्या अर्थायामात झुलत राहाणे या शब्दास कसे काय जमते, हे मास्तर सांगतील का?
Submitted by गजानन on 29 May, 2018 - 16:08
.....................................................................................................................

यदा यदा हि व्याकरणस्य हानिर्भवति भास्कर(आचार्य) |
अभ्युत्थानात् शुद्धलेखनस्य तदात्मानं सृजाम्यहं ||
परित्राणाय पुपुकरानाम् विनाशाय च अशुद्धलेखनानाम् |
विरामचिन्हसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
- मास्तर.

मास्तर रसाळ वाणीने शुद्धलेखनाच्या नियमांमुळे भंजाळलेल्या जनतेसाठी निरूपण करू लागतात.

"विरामचिन्हांतला पूर्णविराम मी, समासातला षष्ठी तत्पुरुष मी.. (कुणीतरी इथे 'समोश्यातला आलू मी..' म्हणून फाजीलपणा करू जातो त्यास केवळ धारदार नजरेने गप्प करण्यात येते.) कुठल्याही लेखनाची प्रस्तावना मी... कं चे भा गु बे व मधला कंस मी..मिसळीतली रामनाथ मिसळ मी (काय रामनाथ? मास्तर इतके हॉट एन स्पायसी असतील असे वाटले नव्हते.. काही स्त्रीउद्गार ऐकू येतात पण त्यांच्याकडे धारदार नजरेने पाहिले जात नाही. हे पाहून मघासचा 'आलू' अंमळ कष्टी होतो), बिर्याणीतले केशर मी.. फिरनीवरचा पिस्ता मी.." मास्तर असे त्यांच्या आवडत्या प्रांतात शिरताच अचानक श्रोत्यांना भूक लागते व लंचब्रेक होऊन मास्तरगीतेचा अध्याय तेथेच संपुष्टात येतो.
Submitted by श्रद्धा on 30 May, 2018 - 21:01

Pages