बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अचानक पु.पू च्या भेटित सापडलेले..

तुम्ही अम्रिकेत असता हे माहित नव्हतं मला
तुम्हालापण ह्याप्पी फोर्थ ऑफ जुलाय

बाकी, सुप्र पुपु
परवापासून मस्त पाऊस लागून राहिलाय

पौर्णिमा | 4 July, 2014 - 01:23
परवापासून मस्त पाऊस लागून राहिलाय>> हे वाक्य पुपुकरांच्या कीबोर्डातून कधी बरसणार?

आशूडी | 4 July, 2014 - 01:35
कीबोर्डातून वाक्य बरसली आणि केव्हाची प्रतीक्शेत तापलेली स्क्रीन ओलीचिंब झाली! वाक्यांचे थेंब दागिन्यांप्रमाणे अंगाखांद्यावर मिरवत ती प्रत्येक क्लिकनिशी रिफ्रेश होऊ लागली. तिचे हे सुस्नात रूप पाहून सीपीयू मनातल्या मनात तगमगू लागला... त्याचा पंखा जोराने गरागरा फिरू लागला. पण स्क्रीनला त्याची फिकीर नव्हती. ती आपल्याच तोऱ्यात मान वर करून रूपगर्वितेसारखी दिव्याकडे टक लावून पाहात होती...

अश्विनी के | 4 July, 2014 - 01:36
आशूडे, फारएण्ड मारेल तुला.

नीधप | 4 July, 2014 - 01:51
परवापासून मस्त पाऊस लागून राहिलाय <<
इथे पण...
एक दिवस नाही पाऊस पडला तर पाणी काय तुंबलं, मेट्रो काय गळली... ये है मुंबई मेरी जान!!!

पौर्णिमा | 4 July, 2014 - 01:55
वाह आशू! दिव्याकडे टक लावून>> हा दिवा कोणता? रुपगर्विता स्क्रीनच्या डोक्यावर असलेला, चार क्युबिकल्सना एकाचवेळी आपल्या शुभ्र, देदिप्यमान प्रकाशलहरींमध्ये भिजवणारा तोच का हा?

आशूडी | 4 July, 2014 - 02:04
हो तोच तो फ्लर्ट! आपल्या डोळ्यांच्या उघडमिटीवर इतरांचे श्वास वर खाली करणारा. नसल्यावर हुरहूर लावणारा.. तोच तो.

नीधप | 4 July, 2014 - 02:09
फारेण्ड आशूडी या शब्दावरच बंदी घालेल आता!

आशूडी | 4 July, 2014 - 02:30

शब्दांवर बंदी आणली तर माझे कसे होणार या काळजीने कीबोर्ड हैराण झाला. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागेना. त्याची ही अवस्था बघून बिचारा माऊसही कष्टी होत होता. आपल्या सोबत्याचे दु:ख हलके करत तो निपचित पडून असे. जरासे गोंजारताच मधूनच चमकणारा लाल दिवा हीच जिवंतपणाची एकमेव खूण होती. शब्दावाचून कळले सारे... असं त्या दोघांचं द्वैत होतं. पण मनातून दोघंही सतत स्क्रीनचाच विचार करायचे.
_डी

साती | 4 July, 2014 - 02:53
ण मनातून दोघंही सतत स्क्रीनचाच विचार करायचे. आखीव, तासलेल्या कोनांची, गुळगुळीत पृष्ठभागाची, टणक पाठीची गोरी गोरी स्क्रीन...>>$

अश्लील , अश्लील!

पण खरंच काय भारी वर्णन आहे.

कांदापोहे | 4 July, 2014 - 03:04

हिम्सकूल | 4 July, 2014 - 03:06

आशूडी | 4 July, 2014 - 03:14
फा, साती
"डोंट लूज युवर माईंड, लूज युवर वेट" फॉलो करून सडपातळ झाल्याने स्क्रीन हल्ली अधिकच आकर्षक दिसत होती. तिचा विपुल केशसंभार सीपीयूला हलकेच गुदगुल्या करत होता. दोनतीनच असल्या तरी तिच्या बटांना पारंब्यांची मजबूती होती. एकीला जरी धक्का लागला तरी स्क्रीन रागाने लाल होत होत काळवंडून जायची. त्यामुऴे सीपीयू, कीबो माऊ (ती ओठांचा चंबू करून अशी लाडात हाक मारते तेव्हा.. दोघांचं मन पाखरू होतं) तिच्या कुरळ्या कुंतलांची काळजी घेत. जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा.. कधीही प्ले होत नसे त्यांच्याकडून. झोपताना जेव्हा स्क्रीन झिरझिरीत पारदर्शी प्लॆस्टिक अंगावर ओढते तेव्हा या साऱ्यांच्या झोपा उडत. खडा पहारा... रात्रभर... सीपीयूची शेकोटी!

हिम्सकूल | 4 July, 2014 - 03:27
बहरात हालवणे प्लीजच...

आशूडी | 4 July, 2014 - 03:29
मोबाईलवरून शक्य नाही हिम्स.

मंजूडी | 4 July, 2014 - 03:32
अर्र्र्र्र्र्र्र्र!!
आशूला पां.शा. सापडलेली दिसतेय

आशूडी | 4 July, 2014 - 03:46
जेव्हा पांशाचा विषय निघतो तेव्हा स्क्रीन लाजेने गोरीमोरी होते. तिला खरंतर खूप काही सांगायचं असतं पण कीबोच्या धाकापुढे तिचं काही चालत नाही. पण समजूतदार सीपीयू मात्र सगळं कळून गालातल्या गालात हसत तिची तारांबळ बघत राहतो. पावसानंतर पृथ्वी हिरवागार शालू नेसते तशीच पांशा सांडल्यावर स्क्रीन पांढरी मऊ मऊ दुलई पांघरते. आधीचंच तिचं आरस्पानी सौंदर्य या नव्या वेषात अधिकच खुलतं. माऊ या साऱ्याच बाबतीत गावठी होता. नुसताच बघत बसायचा.

गजानन | 4 July, 2014 - 04:10
इथे आधी पावसाची सर आणि मग ऊन. (नो उपमा )

मयूरेश | 4 July, 2014 - 04:10
आशू, भारी डी...

गजा,पोहे आहेत का?

साती | 4 July, 2014 - 04:23
उंदराला माऊ म्हणणारी स्क्रीन चाणाक्ष की धूर्तं?

आशूडी | 4 July, 2014 - 05:10
स्क्रीन चाणाक्श अन धूर्त नव्हती. ती तर अल्लड, अवखळ आणि बिनडोक होती. सीपीयूच्या आणि दिव्यांच्या अहमहमिकेत तिची नुसती ससेहोलपट व्हायची. तिला दोघेही आवडत. पण किबो आणि माऊ हे तिचे 'फक्त चांगले मित्र' होते. एका 'कळी' च्या क्शणी तिने ते स्पष्टच दाखवून दिलं होतं. पण हल्ली ती सीपीयूशी जास्त लगट करते. दिव्याशी स्पर्धा करायला आता नवा गडी रिंगणात आलाय... यूपीएस. भरदार शरीरयष्टीचा, रूंद खांद्यांचा, अहोरात्र कष्ट करून कमावलेल्या चकचकीत कांतीचा...चहूकडे सतत नजर ठेवणाऱ्या भेदक डोळ्यांचा यूपीएस.... शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सीपीयू आणि यूपीएसची दोस्ती घट्ट होत गेली. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सीपीयू आता यूपीएसवर विसंबून राहू लागला...

कोकणस्थ | 1 August, 2014 - 12:43

नाडीचा लेंगा वापरण्यामागील धोके

(१) नाडीचा लेंगा वापरल्यास सकाळी ऑफिसला जाताना कपडे बदलताना नाडीची गाठ अडकली तर घाईच्या वेळेस ज्याम चिडचिड होते

(२) लेंग्याच्या नाडीची गाठ कधीही अडकली तर इतर कुठल्याही (घाईच्या अथवा सर्वसाधारण) वेळेस ज्याम चिडचिड होते दिवा घ्या

(३) नाडीची गाठ अडकण्याव्यतिरिक्त जाम चिडचिड होण्याचे कारण म्हणजे एका बाजूने नाडी लेंग्यात गडप होणे. अशा वेळी लेंगा सावरत फिरणारा माणूस हा अत्यंत विनोदी दिसतो व लोकांची फुकट करमणूक होते. त्यामुळे आणखी चिडचिड होते.

हा धागा कितीही वेळा वाचला तरी त्याची करमणुकप्रधानता कमी होत नाही.. ह्या धाग्यावर पुर्वी "छान" असे लिहावे वाटे पाच वर्षांनंतर लिहावे वाटे "लै भारी".

न वाहणार्या वाड्यावरच्या पोस्टींची चिंता करतात थोर लोक. Proud
आशूडी | 12 December, 2014 - 15:31
कवी मोड:अखेरीस पुपुकर लिहीते झाले
आभाळाचेही डोळे भरून आले..
*
पुल इन गटणे मोड:आणि अखेरीस १६११ चा बोळा निघाला आणि पोस्टी वाहत्या झाल्या.
*
रोसेश:
खरर्रटक कर्रर्टक कटड कटड
वाडा ओ वाडा
तुम मुझे अच्छे लगते हो
जब जब तुम बहते हो
वाडा ओ वाडा.
*
वपु: अचानक घरातलं सगळं तसंच टाकून कुलूप लावून निघण्यासारखी एक बातमी येते. लोक जातात घर आहे त्याच अवस्थेत राहतं. माणसं परतल्यावर आयुष्यं पुढे सरकलेली असतात घर मात्र तो काळ गोठवून तसंच थांबलेलं असतं. न हाललेल्या पोस्टींनी वाड्याची हालत अशीच होते.
*
खांडेकर मोड: कालच्या फुलांचं निर्माल्य विसर्जित केल्याखेरीज देवालाही पावित्र्य लाभत नाही तिथे वाड्याची काय कथा!!
*
जीए मोड: एखाद्या डोंगरावरच्या आदिम गुहेत कोरलेल्या अगम्य चित्रलिपीने गतकाळाच्या जीवनाचं अदभुत दर्शन द्यावं, त्यावरून कच्चे आडाखे बांधण्याखेरीज इलाज राहू नये तशा या वाड्यावरच्या न वाहिलेल्या पोस्टी.
*
लंपन मोड: त्या मधुमालतीच्या ग्राऊंडवर धबाधबा पाऊस कोसळायला लागल्यावर आम्ही पोरं सगळा खेळ तसाच टाकून घरी धूम ठोकतो. नाहीतर आहेच आजीचा बावीस मैल लांबीचा पट्टा. पण नंतर पुन्हा जेव्हा ग्राऊंडवर परतायचो तर ते सामान आमची वाट पाहत असल्यागत केविलवाणं वाटायचं. आईचीच आठवण यायची मला. या वाड्यावरच्या न वाहिलेल्या पोस्टीपण तशाच. तंतोतंत.

गजानन | 12 December, 2014 - 15:47
उदाहरणार्थ तुमचे ते हे राहिले की!
आणि आणखी कोणीतरी राहिले आहेय!

आशूडी | 12 December, 2014 - 16:11
गजाभाऊ हो की. Lol त्यांना पहिल्या पंगतीला बसवायला हवं होतं खरंतर, पण आपली माणसं शेवटच्याच पंगतीला थांबतात. Wink
नेमाडे मोड: दैनिक स्वच्छता हे हिंदूसंसकृतीचे आद्य धोरण आहे. स्वच्छतेत उदाहरणार्थ लक्ष्मी निवास करते. वाड्यावरच्या शिळ्यापाक्या पोस्टी भिकारणीला देऊन तिचा चरितार्थ चालवायला हवा असे शेषशायी अवस्थेत चिंतन करताना कोळ्याने हालचाल केली.
श्याम मनोहर: रोज कुणाला काही नवीन सुचत नाही. त्याच त्याच विषयांवर वेगळे तरी काय लिहीणार? उलट सुलट विचार ही माणसाला मिळालेली देणगी आहे. हे लिहून ठेवले पाहीजे. प्रत्येक गोष्ट लिहीत गेले तर वाड्यावरच्या पोस्टी वाहून जातील. तिकडे अमेरिकेत रोज पोस्टी वाहून टाकतात. आणि आपल्या इथले लोक ते संदर्भ देत राहतात. या गोष्टीचा खोल विचार व्हायला हवा.

*

आशूडी | 19 June, 2015 - 11:23

विक्रमसिंहाला लोक पुढे जाऊन विकीकाका म्हणतील हे वेताळाला समजताच तो घाबरला. त्याने शकले करायची शक्कल लढवून महाराज विक्रमादित्याला स्वत:चा आयडी बदलण्यास भाग पाडले. पण भाग पूर्ण न जाता बाकी काहीतरी उरत होतीच. मग त्याने न्यूमरोलॉजिस्टची मदत घ्यायचे ठरविले. तिथे त्याची गोष्ट सांगता सांगता अटी घालायची सवेय त्याला महागात पडली. त्या वर्ल्डफेमस बाईने गोष्ट सांगता सांगता क्लॉज टाकणे हे जीवितकार्य हायलाईट करण्यासाठी वेताळाचेच नाव सांगताक्लॉज ठेविले. हायलाईटवर जास्त जोर देण्यासाठी तिने त्याच्सा शुभ्रपांढर्या केशसंभारात एक निळा हायलाईटही मारून दिला. इकडे महाराज वाट पाहून पाहून बोर झाल्यावर वेषांतर करून नगरात फेरफटका मारू लागले. पाहतात तो सगळीकडे एकच चर्चा - जान्हवीचं पोट कधी दिसणार? त्यांना ही भानगड कळेना.म्हणून त्यांनी हा प्रश्न गूगल केला. तर उत्तर आले - काहीही हां श्री! वेताळाच्या प्रत्येक कोड्याची गाठ सुटली या आनंदात महाराज नाचत असतानाच गाणे सुरू झाले - मुक्याने बोलले गीत ते जाहले! महाराज लाजेने गोरेमोरे होऊन त्या मोरहंसीच्या अजब जोड्याकडे पाहतच राहिले. इतके दिवस आपल्या टॉल डार्क अँड हँडसम शरीरावर झिपर्या वेताळाला पाठकुळी बसवल्याबद्दल त्यांना स्वत:चीच शरम वाटली. याचे परिमार्जन करण्यासाठी विक्रमादित्य देखील स्वत:चे नाव बदलून स्वत:चे नाव आदित्त्त्यअअ... असे सांगू लागला. नावानंतर बाकी बरंच उरत असलं तरी राजाला ते हवंहवंसं वाटत होतं. इतक्यात निळा हायलाईट मारलेला सांगताक्लॉज प्रकट झाला आणि त्याने विचारले, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझी शंभर शकलं करेन. प्रश्न आहे- जय आणि आदितीच्या चेहर्यावरचे हावभाव जयच्या पोटावर कायमचा टाईमबॉम्ब लावल्यासारखे का असतात? महाराज तात्काळ उद्गारले - तुला ते हावभाव वाटत असतील तर तू एक सहृदयी प्रेक्षक आहेतटस. प्रत्यक्षात ती दोघे निर्गुण निराकार अशी होऊन स्थितप्रद्न्य झालेली आहेत. प्रेक्षकांनीच समजून घेऊन मालिका पुढे सरकवण्याचा हा अभूतपूर्व प्रयोग आहे. आता तुझे समाधान झाले असेल तर बाजूला हो, चला हवा येऊ द्या.

आशूडी | 22 June, 2015 - 12:29 नवीन

वायफाय नाही ओ, नुसतीच हायफाय आहे ती.
ते जाऊदे, फा मग तुला लगेच खाली लिहील्याप्रमाणे व्हॉटसप मेसेज आला की नाही रितीनुसार? आला नसला तर हे सत्कार्य तू कर.
व्हॉटसप मेसेज
- चार वेळा जोडलेले हात-
एक चमत्कारिक घटना!!!!
गेल्या ९१ वर्षांत न दिसलेले दृश्य आज आकाशात आकार घेणार!
हा दुर्मिळ योगायोग पाहायचे भाग्य आपल्याला लाभणार. - डोक्यावर भाग्यवर्तुळ असणारा चेहरा-
काय आहे हे दृश्य??? - इथे विचार करणार्या माणसाचे चित्र-
आज रात्री तीन वाजून एकोणपन्नास मिनीटे तेरा सेकंदांनी चंद्रकोरीला मिळणार ढगांचे सुरक्षा कवच!
गेली ९१ वर्षं चंद्रकोर निराधार आकाशात हिंडत होती. राहू केतूसारख्या दुष्ट ग्रहांच्या नजरांपासून स्वत:ला वाचवत! -इथे एकट्या मुलीचे चित्र- पण आता तिचे कष्ट संपले. तिला या शापातून मुक्त करायला ढग पुढे सरसावले. आता तिचे सौंदर्य अधिक खुलणार! -इथे नाचणारी मुलगी-
पण याने काय साध्य होणार? - पाच लाल प्रश्नचिन्हे-
१. चंद्रकोरीचे सौंदर्य वधारल्याने चंद्र जास्त तेजस्वीरित्या चमकणार. रात्रीचा चंद्रप्रकाश वाढणार.
२. रस्त्यावरच्या दिव्यांना कमी ऊर्जा लागणार. गाड्यांनाही कमी शक्तीचे दिवे वापरता येणार. - इथे कार व दिवे
३. चंद्राकर्षणामुळे समुद्र उधाणणार, रात्रीही बाष्पीभवन होणार. जलचक्र वेगात फिरणार. - समुद्राची लाट, पावसाचे थेंब
४. भरपूर पावसामुळे पीकपाणी जोरदार, सगळीकडे समृध्दी. - इथे लागतील तेवढी फळे, फुले, गवत
५. अशा प्रकारे आपले नशीब उघडणार!! -उघडलेला दरवाजा.
** फक्त या काळात चंद्रातून चमकीक किरणांचा उत्सर्ग होत असल्याने मुलांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच मोबाईलचाही डिसपले बंद पडू शकतो. तेव्हा मोबाईलला झोपवून आणि मुलांना बंद करून कपाटात ठेवून या अभूतपूर्व दृष्याचा लाभ घ्या!
श्री स्वामी समर्थ! मित्रांनो, बाकी जोक्स, कविता शेअर करण्याऐवजी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व त्यांना आनंदात सामील करून घ्या. -गुलाबाचे चित्र
- डॉ. आकाश तारेतोडे, एम.डी, क्वालंलंपूर

पूनम | 22 June, 2015 - 12:37 नवीन
तेव्हा मोबाईलला झोपवून आणि मुलांना बंद करून कपाटात ठेवून या अभूतपूर्व दृष्याचा लाभ घ्या!>> हाहा घेतो घेतो.

कांदापोहे | 22 June, 2015 - 12:39 नवीन
हाहा नशीब ते १० लोकांना फॉर्वड करा व चमत्कार बघा नाहीये.

प्राची | 22 June, 2015 - 13:04 नवीन
मोठा मेसेज वाचायचे ४० रु. पडतील. फिदीफिदी

मयूरेश | 22 June, 2015 - 13:15 नवीन
मोठा मेसेज वाचायचे ४० रु. पडतील...>>> पडले तरी तरी चालतील.मी पटकन उचलून घेईन ते.. फिदीफिदी

प्राची | 22 June, 2015 - 13:44 नवीन
आले लगेच फिदीफिदी

प्राची | 22 June, 2015 - 13:44 नवीन
आले लगेच फिदीफिदी

प्राची | 22 June, 2015 - 13:44 नवीन
आले लगेच फिदीफिदी

रैना | 22 June, 2015 - 13:52 नवीन
अर्रे प्राचीटीचा दुर्मिळ फोन पुन्ना सापडला का काय. तिनतिनदा प्रतिध्वनि. हाहा

आशू- हाहा

कांदापोहे | 22 June, 2015 - 14:36 नवीन
प्राचीटीचा दुर्मिळ फोन पुन्ना सापडला का काय>> हाहा

अमा | 22 June, 2015 - 15:09 नवीन
आशुडी, लै भारी नेहमी प्रमाणेच. तुमच्या पुपुवरील पोस्टी वरून चित्र काढायचा बेत होता पण पूर्ण वीकांत घरात गळणारे पाणी पुसण्यात गेला.

विक्रमसिंह | 22 June, 2015 - 15:42 नवीन
आशुडी या व्हाअ‍ॅ च्या प्रथितयश लेखिका असल्याच्या संदर्भातील संशोधन सिद्ध होत आहे. स्मित
प्राचीटी यांच्या मो मध्ये पूर्वीपासूनच काहिही प्रॉब्लेम नसून त्यांना प्रत्येक गोष्ट तीन तिनदा सांगावी लागत असल्याची अपरिहार्यता असल्याचे हे पुरावे आहेत. स्मित

आशूडी | 22 June, 2015 - 16:45 नवीन
*प्राचटींच्या मेसेजवर दोन निळ्या टिक्स आल्यावर बँलन्स चेक केला. तसाच होता, नशीब!
*चाणाक्ष मुलगा : रैनाताई, तीनदा प्रतिध्वनी नाही, दोनदाच. पहिला मूळ उच्चार.
(चा.मु. झोपतो.)
*अमा, तुम्हाला जलरंगात चित्र काढायचे होते ना, म्हणून जलाची सोय झाली आता रंग तुम्ही भरा. पोस्ट तुम्ही माझ्याच विपूत चिकटवलेले मी पाहिले आहे. (चा.मु. उठतो)
*तो ही प्रतिध्वनी नाही. मूळ उच्चार व प्रतिध्वनीत यात वेळेचा इतका फरक असत नाही. (चा.मु. झोपतो)
* विकाका, व्हॉटसपप्रवाहपतितयश लेखिका म्हणा.
*(चा.मु.उठतो) लिंबूकाका, तुम्ही Know Your Vavikar असा फॉर्म बनवायला घ्या बघू. कॉम्प्लायन्स चेक करायला संयोजकांना बरे पडेल. (चा.मु.झोपतो)
* आता लगेच वविच्या जाहीरातीत KYC च्या जागी KYV वाली मायबोली बँकेची चित्रे दिसली तर माझ्यावर नाव घेऊ नका. (हे चा.मु. नाही, मीच)

limbutimbu | 22 June, 2015 - 17:16 नवीन
आशूडी, चामू चामू हे पहिल्यांदा मी चिनुक्स चिनुक्स सारखे वाचले..... चष्म्याचा नंबर तपासला पाहिजे.. फिद

खडी साखर | 5 August, 2015 - 01:27 नवीन
मार्क्सच्या नावावरूनच हा मनुष्य कडू असणार याचे पुरावे मिळत जातात. कुणी असं म्हणेल की मार्क्सवाद कडवट असल्यानं त्याचं नाव कार्ल पडलं, पंण नव्या संशोधनाने हे सिद्ध झालंय की मार्क्सवाद कडवट असल्याने त्याच्या नावावरून कार्लं ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळं कडू कार्ल, तुपात घोळलं तरी ते कडूच या म्हणीचा भूतकाळ हा मार्क्सवादाच्या नंतर होता हे ही सिद्ध होऊन या म्हणीसंदर्भातला वादही संपुष्टात यायला मदत होणार आहे. कार्ल्याला पूर्वी काकडी असंच म्हणत पण मार्क्सवादाच्या प्रभावामुळे काही काकड्या कडू झाल्या आणि तिचं नाव कार्ल झालं असाही एक मतप्रवाह आहे. ज्या काकड्यांना काटे आले त्या शोषकाचं प्रतीक आहेत. शोषक हे मार्क्सवादात कडू आहेत. तसंच शोषकांच्या दृष्टीने मार्क्सवाद कडू आहे. असा एक युक्तीवाद या गटातल्या विचारवंतांकडून दिला जा्तो.

काकडी हे फळ साधारण गोड असतं. पण कार्ल म्हणजे काकडीचे जावईबापू. जावई हा कडूच. त्याला काटे असल्याने मार्क्सने काकडीचा जावई हा काटेरी असल्याची जी टिप्पणी केली ती वंशवादी असल्याचं भोपळ्यांच म्हणणं आहे. भोपळा हा समाजवादाचं प्रतीक आहे. कारण भोपळ्याला भोपळा हेच फळ येतं. मार्क्सवादात भोपळ्याचं महत्त्व शून्य आहे. म्हणून कपिल सिब्बल यांनी शिक्षणपद्धतीत मार्क्स नकोत असं म्हणत श्रेणी पद्धत अवलंबली. यामुळे विद्यार्थी शाळेपासूनच मार्क्सवादापासून दूर राहतील आणि पर्यायाने काटेरी कार्ल्याची भाजी खाऊन वंशभेदी नरसंहार होणार नाही असा विचार त्यामागे असावा.
>> हे भारी आहे त्यामुळे बहरात हलवले. Lol

टण्या | 6 August, 2015 - 11:24

पुण्यात कर्व्यांनी (?) कांडीकोळसा/स्मोकलेस चूल असे बरेच उत्पादने काढले आहेत ना? मध्य्म्तरी माबोवरच लेख पाहिला होता. एक परडी नावाचा प्रकार असे. त्यात शेतात खड्डा करुन त्यात धाटं, काटक्या घालायच्या. एका मडक्यात शेतातलीच भाजी, कणसं घालून मातेन लिंपून तोंड बंद करायचं. आणि मग त्या खड्ड्यात ते मडकं सारून जळण पेटवून द्यायचं.

ज्वारीची भाकरी ते गव्हाची पोळी हे ट्रान्झिशन मी बघितले. ९२-९३ पर्यंत घरी रोज भाकरीच होत असे. शाळूही दरवर्षी घेतला जाई शेतात, आजुबाजुच्या शेतात पण शाळु दिसे. या सुमारास शाळु-ज्वारी जी गायब झाली शेतातून आणि घरातून ती परत आलीच नाही. नजर जाईल तिकडे ऊसच दिसू लागला. नदीला लागून शेती असलेल्या सगळ्यांच्याच पाइप आणि उपसा योजना झाल्यामुळे असेल बहुतेल.

मंजूडी | 6 August, 2015 - 11:27

टण्या, त्याला पोपटी म्हणतात.

टण्या | 6 August, 2015 - 11:34

हो पोपटी, परडी नव्हे. ते मडके लिहिताना तिरडी आठवून पोपटीची परडी झाली

आशूडी | 6 August, 2015 - 11:39

पण ते मडक्यातलं शिजलंय की खाक झालंय हे कसं कळतं?
चुकून जळणऐवजी सरण लिहीलं नाहीस हे नशीब.

भरत मयेकर | 6 August, 2015 - 11:40

काहीतरी फुटल्याचा आवाज येईपर्यंत शिजवायचं असेल

नंदिनी | 6 August, 2015 - 11:41

टण्या, हे अजरामर आहे!!!!!! हाहा

आशूडी, व्यवस्थित शिजलेलं असतं . बन्वनार्‍यांना अंदाज असतो त्या पोपटीमध्ये अंडी काय खमंग होतात.

भ्रमर | 6 August, 2015 - 11:44

त्या पोपटीमध्ये अंडी काय खमंग होतात.>> तीचं 'कवटी' फुटली की शिजली असं समजायचं

आशूडी-

बघा, सगळ्यात भाव खाऊन गेले ते कोण - तत्ववेत्ता!
ग्लासभर सरबतात तरंगणार्‍या चार केशराच्या काड्याच नजरेत भरतात. पिळवटून, विरघळून स्वतःचं अस्तित्वंच विसरुन गेलेल्या साखरलिंबांचं दु:खं स्वतः चव घेतल्याशिवाय कळत नाही.

रॉबीनहूड | 8 November, 2015 - 10:25
मिठाला जेवणात पर्याय काय असा प्रश्न मी विचारला होता , त्यावर आशूडी ने पुढील उत्तर दिले आहे !

गोली. असे गब्बरमहाराज सांगून गेलेत

कांदापोहे | 24 November, 2015 - 11:47
खरच. संध्याकाळी एकदम बदल होतो आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरेल. शेताला कधीही पाऊस पडला तरी शेतकरी समाधान व्यक्त करताना बघीतलाच नाहीये गेले ५-६ वर्षात.
संपादनप्रतिसादआशूडी | 24 November, 2015 - 12:01
पाऊस हे जर का शेतकर्याचे अप्रेझल मानले, तर ही स्वाभाविक मनुष्यवृत्ती आहे.
पण याचे उलट केले, तर शेतकर्यासारखे बेभरवशी व अनियमित अप्रेझल आपले नसते तरी आपण कधी समाधानी असतो?
प्रतिसादरॉबीनहूड | 24 November, 2015 - 12:12
अन इव्हन आणि अनटाइमली डिस्ट्रिब्युशन हा आपल्या मान्सूनचा हल्लीचा ट्रेंड आहे. आपला क्रॉपिंग पॅटर्न हा मान्सूनची जी स्टँडर्ड मुवमेन्ट आहे त्यावर बेतलेला असतो. जूनम्ध्ये ज्या खरीपच्या पेरण्या होतात ती पिके रिटर्न मान्सून येण्याच्या आधी निघून येतात व रितर्न मान्सूनवर रब्बीच्या पेरण्या होतात त्याला ऑक्टोबरनण्तर पाऊस लागत नाही. नुसत्या ओलाव्यावर व गारव्यावर ही पिके साधारण जाने / फेबपर्यन्त मॅच्युअर होतात ( नव्याची पुनव ) . सध्याच्या म्हनजे वीसेक वर्षापासून जूनमध्ये पाऊस येतच नाही जुलईच्या मध्यावर सुरू होतो. त्यामुळे धूळपेरणी केलेल्याना दुबार पेरणी करावी लागते . शिवात ओलावा व तापमानात बदल झाल्याने उशीरा पेरलेल्या पिकाची वाढ नीट होत नाही. यंदा जूनला पाऊसवेळे वर आला पण नंतर दीड महिना आलाच नाहे. शेती हंगामात पिकाच्या स्थितीत साधारण दोन आठव ड्याचे टप्पे असतात. त्याला वेळोवेळी योग्य टप्प्यवर पाऊस आला की बम्पर पीक तेते. हे गॅप्स आता फार फ्लक्च्युएट होत आहेत. नम्बर ऑफ रेनी डेज कमी होत आहेत. मात्र वर्षाखेर अ‍ॅव्हरेज बॅलन्स होते. त्यात पिके मॅच्युअर झाल्यावर बदाबदा पाऊस ( गरज नसताना) व गार पीट झाल्याने पिकांचे नुकसान होते. नष्टच होतात बर्‍याचदा. आताच्या पावसाचा काहीही उपयोग नाही .फक्त धरणात पाणी येऊन पिण्याच्या पाण्याला रिलीफ तेही जिथे धरणे आहेत तिथे अन्यत्र वाटर टेबल रिचार्ज होईल एवढा हा पाऊस नाही...
पाऊ थोडा थोदा झाला तरी चालतो पण तो वेळोवेळी होणे आवश्यक आहे. नम्बर ऑफ रेनी डेज वाढले पाहिजेत.
प्रतिसादपूनम | 24 November, 2015 - 12:12
अचूक लिहिलंत रॉबिनहूड!
प्रतिसादकांदापोहे | 24 November, 2015 - 12:16
आशुडे

रॉहु तुम्ही या विषयातील दादा लोक. मुद्देसुद लिहीलेत. पटले.

संपादनप्रतिसादआशूडी | 24 November, 2015 - 12:25
खूप मस्त वाटले वाचताना रॉहू. शाळेचे शास्त्र किंवा भूगोलाचे पुस्तक वाचतोय असे वाटले.
पण नेहमी एक प्रश्न पडतो की तुम्ही म्हणता तसे हे वीस वर्षांपासून होत आहे तर पीकपेरण्या वगैरेच्या वेळापत्रकात त्यानुसार बदल केले जात आहेत का? शेतकी महाविद्यालयात यावर प्रयोग होत असतील तर ते खेडोपाडी पोचवणंही मोठं प्रोजेक्ट आहे.

प्रतिसादकांदापोहे | 24 November, 2015 - 12:40
आशुडे रॉहु बहुदा त्याच प्रोजेक्टवर काम करत आहेत. रॉहु चुभुदेघे.

पीकपेरण्या वगैरेच्या वेळापत्रकात त्यानुसार बदल केले जात आहेत का? >> पारंपारीक गोष्टीतला बदल खेड्यापाड्यात पटकन स्विकारला जात नाही पण.
संपादनप्रतिसादरॉबीनहूड | 24 November, 2015 - 13:18
समजा मुगाचे बियाणे आहे त्या चे बियाण्याच्या निरोगी जर्मिनेशनसाठी समजा क्ष तपमानाची आणि य मॉईश्चरची आवश्यकता आहे तर त्यातील एखद्या व्हेरिएबलमध्ये बदल झाला तर उगवण नीट होत नाही अथवा होतच नाही. साधारण जुनमध्ये म्हणजे मृगाच्या पावसावर लावली जाणारी पिकांची इको सिस्टीम ही जुलईत रहात नाही त्यावेळी मान्सून सेटल होणे अपेक्षित असते आणि तो जोरातही असतो. वर्षातला सर्वाधिक पाऊस जुलैत पडतो .त्यावेळी जूनमधली पिके उगवून वर आलेली असतात व ती त्या पावसाला सस्टेनही होतात. पण समजा जूनमध्ये पावसाच्या आशेवर पेरणी केली अन पाऊस आलाच नाही तर ते जमिनीतले बियाणे तसेच राहते. जुलईच्या पावसात ते जरमिनेट न होता कुजते. ह्या वर्षी जूनमध्ये वेळेवर पाऊस आला म्हणून पेरण्या झाल्या पिके उगवूनही आली पण जुलैत अजिबात पाऊसच झाला नाही ( सर्वाधिक पावसाचा महिना !) त्यामुळे जूनम्धली पिके जळाली. दुबार पेरणी करायला जुलैतहे पाऊस नव्हताच. सप्टेबर ऑक्टोबरमध्येही पाऊस न झाल्याने रब्बीच्या पेरण्याही झाल्या नाहीत. सप्टेंबर ३० ला मान्सून संपल्याचे वेधशाळा अधिकृतरी त्या डिक्लेअर करते. त्या नंतरच्या पावसाचा रब्बीच्या पिकाना उपयोग होतो . हा पाउस थोडा पण उपयुक्त असतो. रब्बीच्या पेरण्याच नसल्याने या पावसाचा शेतीला काही उपयोग नाही उलट फळपिकाना पाणी लागल्याने डाग पदणे वगरे वॅल्यू रिडक्शन करणारे परिणाम होतात. सध्या डाळिम्बे बाहेरून काळे डाग पडण्याचा प्रकार सुरू आहे आतून एक्दम क्वालिटीची असणारी डाळिम्बे केवळ दिसण्यात मार खाल्ल्याने त्याचा बाजार एकदम खाली आला आहे . ही डाळीम्बे चांगली आहेत हे ग्राहकाला पटतच नाही. त्यामुळे क्रॉपिंग पॅटर्न बदलणे एवढे सोपे नसते. पिकांचा एक हेरिटेज झालेला असतो शेतकर्‍यांचे एक ज्ञानाचे स्पेशलायझेशन झालेले असते. मराठवाड्यात गेली चार वर्षे पाऊसच झालेला नाही.
दुरदैवाने महाराष्ट्रा ची जिऑलॉजी जिरलेले पाणी साठवून ठेवण्यासारखी नाही.

प्रतिसादकांदापोहे | 24 November, 2015 - 14:55
पाऊस पडत नाही, बियाणे रुजत नाही, कुजुन जाते व तत्सम अनेक कारणांनी शेती कमी होते, महागाई वाढते, शेतकरी बियाणावर केलेल्या खर्चामुळे दबुन जातो, साठेबाजी वाढते इत्यादी अनेक कारणांकडे दुर्लक्ष करुन सरकारमुळे (कोणत्याही) आत्महत्या वाढल्या, सरकारमुळे महागाई वाढली अशी बोंब सर्वसामान्य जनता का मारत असते देव जाणे.

नव्या वर्षाची पुपुची दमदार सुरुवात:
श्रद्धा | 2 January, 2017 - 15:32
खम्मा घणी फारेंड व पुपुकर्स.. स्मित णवीण वर्षाच्या शुभेच्छा..

साजिर्‍याची ती शेर वाली वही<<<< डुलकळा... फिदीफिदी

बाकी रोम्यो जुलिएट, लैला मजनू, शीरीं फरहाद वगैरे मंडळींच्या अजरामर प्रेमकथांचे दुःखद अंत पाहता 'शोक के साथ इश्क करना' बरोबर म्हणायला हवे.

फारएण्ड | 2 January, 2017 - 20:27
डुलकळा >>> परफेक्ट हाहा

बाकी रोम्यो जुलिएट, लैला मजनू, शीरीं फरहाद वगैरे मंडळींच्या अजरामर प्रेमकथांचे दुःखद अंत पाहता 'शोक के साथ इश्क करना' बरोबर म्हणायला हवे. >> >ये भी सही है. कयामत से कयामत तक, मैने प्यार किया (कबुतर रहित व्हर्जन), सैराट या आधुनिक प्रेमकथांवरूनही हे सिद्ध होते. या सर्वांनी केवळ योग्य ष वापरला असता इश्क करताना, तर? इतिहासाला वेगळेच वळण लागले असते, असे राहून राहून (*) वाटते.

म्हणजे दुसरा बाफ उघडेपर्यंत.

श्रद्धा | 2 January, 2017 - 20:58
या सर्वांनी केवळ योग्य ष वापरला असता इश्क करताना, तर? इतिहासाला वेगळेच वळण लागले असते, असे राहून राहून (*) वाटते.<<<<<
खरेय! लैला मुळूमुळू रडत 'कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को' वगैरे रिक्वेस्ट करत न बसता झीनत अमानसारखा पोषाख (येथे मी ष चा प्रचार आणि प्रसार करायला जाणीवपूर्वक वापरला आहे ष) करून इष्काला प्रोत्साहन देणारे 'लैला मैं लैला' गायला लागली असती तर या बोल्ड मूव्हमुळेच तिच्या घरचे लोक काही अंशी नामोहरम झाले असते.

फारएण्ड | 2 January, 2017 - 21:13
तिचा पोषाखही (ष च्या प्रचाराशी षहमत) इश्काला प्रोत्साहन देणारा असे म्हणे. त्यात तिच्या बोल्ड मूव्ह्ज मधे कसलेतरी अपील असे. वास्तविक बोल्ड असेल तर अपील ची गरज नसते, असे ओरिजिनल बिली बाउडेन पासून ते सैराटमधल्या बिलीबौडीनपर्यंत कोणीही सांगतील. पण लैला एकदा बोल्ड मूड मधे गेली की 'जिसको भी देखू... मजनू बना दूँ" करत असल्याने एक लैला आणि आजूबाजूला मॅट्रिक्स च्या एजण्ट स्मिथ प्रमाणे असंख्य मजनू असे चित्र उभे राहात असावे. लोक अमेरिकेचा किंवा दुसर्‍या महायुद्धाचा आल्टरनेट इतिहास लिहीतात तसा लैला मजनूचा लिहायला हवा.

श्रद्धा | 2 January, 2017 - 23:15
वास्तविक बोल्ड असेल तर अपील ची गरज नसते, असे ओरिजिनल बिली बाउडेन पासून ते सैराटमधल्या बिलीबौडीनपर्यंत कोणीही सांगतील <<<<< परफेक्ट फारेंड कमेंट... हाहा

पण ते अपील वेगळे आणि बोल्ड झीनत अमानचे अपील वेगळे... या विषयात सर जास्त मार्गदर्शन करू शकतील.

फारएण्ड | 3 January, 2017 - 00:34
चालेल. सरांना बोलवायला पाहिजे येथे. त्यांना प्रिंका व अनुष्कांचे अपील माहीत असेल याची कल्पना होती. झीनत अमानचे ही असेल हे माहीत नव्हते.

फारएण्ड | 3 January, 2017 - 00:35
अनुष्कांचे हे आदरार्थी नव्हे. अनेकवचनी आहे. शर्मा व शेट्टी.

श्रद्धा | 3 January, 2017 - 00:44
तुम्हांला षर्मा आणि षेट्टी म्हणायचे आहे का? (... घेतला वसा असा लगेच टाकू नका!)

सरांना देविकाराणीचे सुद्धा अपील माहीत असणार.

साजिरा | 3 January, 2017 - 12:35 नवीन
फारेंडाच्या वाक्यावरून नव्याने जाणवलं, क्रिकेट नि बॉलिवुड या आपल्या देशाच्या आधारवडांचा एकमेकांना किती आधार आहे. राजकारण हा तिसरा आधारस्तंभ. या तिघांत जोवर प्रेमाचे अफेअरांचे लग्नांचे रोटीबेटी व्यवहार होतात तोवर आपल्या देशाला महासत्ता बननेसे कोई रोक नही सकता.

बाकी आमच्या हापिसातला मजनू गेला नि डुलकळांचे दिवस गेले. त्यानंतरच्या, म्हणजे बर्‍याच आधुनिकोत्तर काळात ऑफिसातल्या फाईली नि कपाटं आवरताना आम्हाला एक प्रेमपत्र सापडलं. आपल्या सिनेम्यांत 'मिसाल दी जाती है' ना, तसं अगदी मिसालेवाईक पत्र. शेवटी दोन चौकोन केलेले, आणि त्यांना हो/नाही असे नाव दिलेले. म्हणजे तिने फक्त टीक करायची. आणि अडीच पेजेस पत्र लिहून दीड पेजेस कोरी ठेवलेली, आणि 'तुजं जे काय उत्तर असेल ते इथेच खाली मोकळ्या जागेत लिव'. तिला नवीन कागदाची तर असोच, पण हो/नाही लिहायची सुद्धा तोशीस पडू नये म्हणून किती आटापिटा. क्या प्यार है.

शेवटी 'तुला गणपती, नवरात्र, दिवाळी आणि ईदच्या शुभेच्छा' असं वाचून गहिवरून आलं. एवढं कोण करतं हो आजकाल. प्रेमातसुद्धा धार्मिक एकोपा आणि सहिष्णुता दाखवणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे.

अडीच पेजेसचं पत्र परत आलं तेव्हा चार पेजेसचं झालेलं. म्हणजे तिने चक्क उरलेल्या दीड पानांत उत्तर खरोखर लिवलेलं. आणि 'नाही'वर खणखणीत टिकमार्क.
ती वेगळीच कथा. इसी पोस्ट मे वो लिखूंगा तो ये पोस्ट बुरा मान जायेगी..

श्रद्धा | 3 January, 2017 - 13:19 नवीन
अडीच पेजेसचं पत्र परत आलं तेव्हा चार पेजेसचं झालेलं. म्हणजे तिने चक्क उरलेल्या दीड पानांत उत्तर खरोखर लिवलेलं. आणि 'नाही'वर खणखणीत टिकमार्क.<<<<<<

हे अपेक्षितच होते. कारण वरच्या षुभेच्छांमध्ये नानक जयंती, ख्रिसमस विषेस नाहीत.

आणि स्वतःला अडीच तर तिला दीड अषी उपलब्ध रिसोर्सची असमान वाटणी..

तर, खम्मा घणी लोक्स...

मी दुपारचा कॉलेजातून घरी येऊन वामकुक्षी घेउन उठलोच होतो तेव्हड्यात माझ्या एका विद्यार्थ्याला घेउन त्याची आई आली. माउलीचे डोळे रडून रडून सुजले होते. मी विचारले काय झाले? 'अहो काय सांगू सर तुम्हाला, आपल्याच कंपूतल्या आयड्यांवर बेदूंध वार करून आला आहे हा आज. याचे बाबा आपला आयडी २० वर्ष टिकवून आहेत, मी स्वतः १४ वर्षे. आम्हाला का मॉडरेटरने दटावले नाही, आमच्यावर का विडंबने झाली नाहीत, आम्ही का ग्रुपातून फेकलो गेलो नाही. झाले ना सगळे. तरी आम्ही तेच आयडी टिकवले. याला फक्त एकाने रंगावरून (राजकीय, त्वचेच्या नव्हे) डिवचले तर हा तलवार चालवून आला.'
मुलगा सुन्न होवोन बसला होता. मी चहा एकच कप टाकला होता. मग थोडा बशीत ओतून त्याला दिला, उरलेला मी कपातून पिऊ लागलो.
'का चिडलास?' मी विचारले.
'मला कसेही बोलतात. त्यांना प्रिन्सिपल काहीच करत नाहीत. मग माझा संयम सुटला. किती दिवस मी संतुलित बुरखा टिकवायचा' तो हमसून हमसून रडत म्हणाला.
मला माझे दिवस आठवले. फक्त ऑफिसमधून अ‍ॅक्सेस असे. आजच्या सारखे घरी एक लॅपटॉप, ऑफिसात / घरात अनलिमिटेड ब्रॉडबँड, खिशात मोबाइलवर पण ती असणे हे लाड आमच्यावेळी नव्हते. घरी आलो की दिवसभर घातलेला आयडी झगा उतरवून धुवून परत दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये जायला तयार ठेवायला लागायचा. झगा गेला तर नवीन झगा मिळायला इमेलसुद्धा विकत घ्यायला लागण्याचे दिवस होते ते. या आजच्या मुलांना आईबापाच्या पुण्याईने हवे तितके झगे, हवे तेव्हा ये-जा करण्याचे स्वातंत्र्य आहे.
'टवणे सर, तुम्हीच काहीतरी सांगा आता त्याला. पुढला आयडी पण गेला तर कुठल्याच कालेजात अ‍ॅडमिशन नाही मिळणार. ती जुनी एक दोन कालेजं बंदच पडली आहेत. काही ठिकाणी प्रवेशाला देणगी आहे तर काही ठिकाणी तुम्ही सांस्कृतिक उच्चभ्रू असण्याची अट आहे. आम्ही दोघांनी वाहत्या पानांखेरीज आजवर कधी एक शब्द लिहिला नाही. सहित्यिक उच्चभ्रू अट कशी पूर्ण करणार?' माउलीच्या त्या आर्त हाकेने मी पटकन भानावर आलो.

फा, राडा, श्र Rofl
असं कसं श्रमाते? खोट्या सिक्क्याची जीवापाड जपणूक करत एकाच कपड्यांमधे आयुष्य कंठणारे जयराव विसरलीस का? जयराव आजूबाजूला नसताना दरवेळी तोच कसा जिंकतो अशी पुसटशी शंकाही न घेता कधीच त्यांचे खिसे न तपासणारे वीरूजी थोरच नव्हेत तर निरागसही आहेत. त्याची एक चुणूक तर होली के दिन लागलेल्या जत्रेत चक्रातल्या फिरत्या घोड्यावर बसून, झेपत नसताना उंच टाकीवर चढून आणि उतरताना घाबरून त्यांनी दाखवली आहेच. पण नुसतं पावा वाजवून समोरच्या मख्ख मुलीचे मन जिंकणे हे कृष्णानंतर कुणाला जमले असेल तर ते जयरावांनाच. त्यांनाही वंदन ! ठाकूरजींबद्दल क्योंकि मधे तुलसीने बरेच काही स्तुतीपठण केले आहे. फक्त त्यांच्यासाठी 'तेथे कर माझे जुळती' म्हणून त्यांना हिणवल्यासारखे होईल म्हणून गाडीवरून जाताना लोक दगडूशेठला स्वतःची हनुवटी स्वतःच्याच कंठाला लावून 'मी बराय, तू कसायस' असं विचारत जे जेस्चर करतात ते आपण करू. आणि रामलालची सेवाभावी वृत्ती तर सर्वज्ञात आहेच. श्रावणबाळ भक्त पुंडलिक यांनी मातापित्यांची सेवा केली पण रामलालसारखा नोकर पुन्हा होणे नाही! आज या ठिकाणी रामलाल यांना अखिल भारतीय शालपांघरे पुरस्कार देताना पुन्हा एक शालच द्यावी अशी मी विनंती करते.बाकी अहमद, त्याचे पिताजी, सुरमा भोपाली आणि जेलर ही लार्जर दॅन लाईफ मंडळी आहेत. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे त्यांच्या आयुष्यात स्त्री नसल्याने ते इतकी प्रगती करू शकले, जनमानसात अढळपद मिळवू शकले असे म्हणून त्यांनाही एक मानवंदना देऊ.
Submitted by आशूडी on 3 August, 2017 - 01:07
आशुडी, साष्टांग प्रणिपात Happy
Submitted by mi_anu on 3 August, 2017 - 01:10
आज या ठिकाणी रामलाल यांना अखिल भारतीय शालपांघरे पुरस्कार देताना पुन्हा एक शालच द्यावी<<<<<<
श्री. रामलाल यांनी सेवाव्रताची सुरुवात 'this, too, shall pass' अशा भावनेनं केली होती. त्यांना पुन्हा शालच दिल्यास 'this शाल? Too passé' अशी भावना त्यांच्या मनात येऊन त्यांना 'ब्याक टू स्क्वेअर वन' आल्यासारखे वाटेल. तेव्हा शाल नको, त्यांना केसरी टूर्सतर्फे प्रवासाला पाठवा. बिचारे रामगढ बाहेर पडलेच नसतील.
Submitted by श्रद्धा on 3 August, 2017 - 01:21
फा, ज्युमा, सिमा एकदम म्हणजे पुपु तल्या पोष्टी बहरात हलवायचा सुदीन म्हणायचा की..
Submitted by हिम्सकूल on 3 August, 2017 - 01:23
This too shall pass >> कहर Lol
तुमचे बरोबर आहे श्री. रामलाल यांनी पर्यटन करावे म्हणून त्यांना आपण रिक्षा, बस, एस्टी, रेल्वे आणि विमानाचे पास देऊ.
Submitted by आशूडी on 3 August, 2017 - 01:30
आशुडे Lol
किती ते बायपास Proud
Submitted by कांदापोहे on 3 August, 2017 - 01:38
किती ते बायपास > रोजच बायपासने प्रवास करुन करुन सवय लागलीये रे केप्या..
Submitted by हिम्सकूल on 3 August, 2017 - 01:42
आणि ते बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना मध्ये खरे तर समोर एकही कुत्रा नाही आणि हेमा काय किंवा मी काय कोणीच समोर नाचले तरी कुत्र्याला काय फरक पड्तो? असा ऑनेस्ट प्रश्न माज्या द्विबालमनाला पडला आहे. ( सेकंड चाइल्ड हूड मध्ये असल्याने)
Submitted by अमा on 3 August, 2017 - 01:56
हनुवटी कंठाला>>> Rofl
Submitted by बस्के on 3 August, 2017 - 01:57
अमा Happy
Submitted by mi_anu on 3 August, 2017 - 02:14
Lol
गाडीवरून जाताना लोक दगडूशेठला स्वतःची हनुवटी स्वतःच्याच कंठाला लावून >>> हे भारी Proud
Submitted by श्री on 3 August, 2017 - 02:34
आशू, श्रद्धा, अमा Rofl
Submitted by प्रज्ञा९ on 3 August, 2017 - 04:15
'this शाल? Too passé' >> Rofl
Submitted by मॅगी on 3 August, 2017 - 04:33
श्री. रामलाल यांनी सेवाव्रताची सुरुवात 'this, too, shall pass' अशा भावनेनं केली होती. त्यांना पुन्हा शालच दिल्यास 'this शाल? Too passé' >>> Lol
द्विबालमनाला >>> Lol
"अहमद साहब के वालिद साहब का ये किस्सा भी सुनलो" असे कोणीतरी शोले च्या सेटवर असलेल्या ने सांगितलेला एक फेक इन्साइडर किस्सा: - अहमद ला मारून घोड्यावर टाकल्यावर "घोडे जा जा जा, घोडे जा जा.. दुश्मनी की ये चिठ्ठी गाववालोंको दे आ" असे गाणे उत्साहाच्या भरात लिहून आनंद बक्षीने फिल्म मधे व फिल्म सेट वर एक सिच्युएशन निर्माण केली होती. पण ताराचंद बडजात्याचा मुलगा पुढे पिक्चर काढायचा म्हणतोय व हा सलीम जरा मुलाकरता काही जमतेय का बघा असा त्याच्या मागे लागलाय. तेव्हा त्याला थोड्या सिच्युएशन्स राहू देत म्हणून जावेदने त्याला पटवून ते गाणे कापले. तर नंतर त्या मेलेल्या अहमदभोवती कोंडाळे जमले असताना एके साहब येतात विचारत "इतना सन्नाटा क्यों है भाई" त्या सीनचे असंख्य रीटेक्स झाले. कारण पब्लिक जाम सन्नाटा होउ देइ ना. सतत कोणीतरी बडबडायचे. पण त्यामुळे प्रत्येक वेळेस एके साहब आले की लोक हसू लागत. तेव्हा चिडून ते कडाडले "आत्ता तुम्ही मला हसताय. पण बघा. एक दिवस सोशल नेटवर्क वर हाच डॉयलॉग सर्वात जास्त वापरला जाईल". आज ते खरे झाले आहे.
Submitted by फारएण्ड on 3 August, 2017 - 09:03
फा, ते शीर्षक पुलंच्या त्या संगीतिकेतूनच उचलले आहे..
त्याची series करायची म्हणजे आणखी कशावर लिहू? तो एकांडा च लेख होता. >> हो वरदा त्या संगीतिकेचा संदर्भ तेव्हाही माहीत होता. परफेक्ट रेफरन्स होता तो. सिरीज म्हणजे त्या सारखे अजून लिही अशा अर्थाने Happy
Submitted by फारएण्ड on 3 August, 2017 - 09:04
Lol फारेंड....
इतना सन्नाटा क्यों है भाई" त्या सीनचे असंख्य रीटेक्स झाले. कारण पब्लिक जाम सन्नाटा होउ देइ ना. सतत कोणीतरी बडबडायचे<<<<<
'इतना सन्नाटा...' सीन. टेक वन.
एके - इतना सन्नाटा...
गावकरी 1 - अरे भाई, ये सुसाट/ड क्या होता है?
गा 2 - अंगरेज लोग जब मरते... अरे चूप! हा टाकीच्या सीनमधला डायलॉग आहे..
डायरेक्टर - कट...
टेक 2 -
एके - इतना सन्नाटा क्यूँ...
गावकरी बाई - काहो मावशी, बसंतीला स्थळं बघताय का यंदा? माझ्या चुलतजावेच्या मावशीचा मुलगा आहे लग्नाचा..
डायरेक्टर - शूssss.. कट.
टेक 3 -
एके - इतना सन...
गावकरी मुलगा - आयमद पाय कसा झोपलाय घोड्यावर...
डायरेक्टर - अर्रे! पळ इथून... कट...
टेक 4 -
एके - इतना...
गावकरी 3 - बुढ्याले किती तरास द्याल बे? करून टाका ओके आता.
डायरेक्टर - grrrr... कट..
टेक 5 -
एके - इतना सन्नाटा क्यूँ है...
गावकरी 4 - हांगाश्शी.. झालंच झालंच! आता 'भाई' म्हणा पटकन!
डायरेक्टर - $%^^&###;*@@.. कटssssss!
......
टेक कितवातरी...
टोटली दमलेले हंगल - इतना सन्नाटा क...
घोड्याचे जोरदार खिंकाळणे ऐकू येते. मागून बंदुकीचा बार. मग घोडा पळून जाण्याचा आवाज.. 'अरे त्या धन्नोला धरून आणा.. नायतर उद्या बसंतीच्या टांग्याला एकेक गावकरी बांधेन मी...' डायरेक्टरचा आवाज.
आणि त्यादिवसाचे शूट संपते.
Submitted by श्रद्धा on 3 August, 2017 - 09:32

Pages