मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

नवीन लिखाण करता येत नाही.

"नवीन लिखाण करा" वर टिचकी मारल्यास नवीन लिखाणाचे पान उघडत नाही तर फक्त नवीन लिखाणाच्या माहिती बद्दलचे पान उघडते.

कृपया मार्गदर्शन करावे.

चामुंडराय, ज्या ग्रुपमध्ये लिखाण करायचंय त्याला सबस्क्राइब करा. आधीच केलं असेल तर त्या ग्रुपच्या नावावर क्लिक करा..उदाः कविता, कथा. तिथे (फोनवरून) तळाला आणि कॉंपवरून उजवीकडे नवीन लेखन करा दिसेल. लेखनाचा धागा निवडा.

वेबमास्तर, माझे सदस्यत्व ,.जाण्याची नोंद यांच्या सोबत दिसणारी नवीन लेखन करा ही लिंक आउटडटेड झालीय.

वेबमास्टर, गेले तीन दिवस मोबाईलवर 'Up' चे बटन फारच उजव्या बाजूला आणि स्क्रीनच्या बाहेर जायला लागलंय. प्रत्येकवेळी स्क्रीनला डावीकडे सरकवून 'Up' चे बटन दाबावे लागतेय. आणि मग वर गेलं की पुन्हा स्क्रीनला उजवीकडे सरकवावे लागतेय. हे फारच त्रासदायक होतंय.

वेमा,

एक विनंती : कुठलीही लिंक एका पानावर क्लिक केली की आपोआपच ती नवीन विंडोत उघडेल अशी व्यवस्था करता येईल काय? सध्या ओपन इन न्यू विंडो असे ऑप्शन सिलेक्ट करावे लागते. फार त्रासाचे नाही हे, परंतू एकाच विभागातले दोन तीन नवीन धागे वाचायचे तर ही सोय उपयोगी पडेल असे वाटते.

मलाही मोबाईलवर प्रॉब्लेम येतोय,

पहिल्यासारके पेज फिट टु स्क्रीन होत नाहिये अन अपचे बटन पण दिसत नाहीये (क्रोम ब्रॉऊजर )

सचिन काळे, VB
तुम्हाला ही अडचण कुठल्या पानावर येतेय ? की सगळ्याच? उदा. https://www.maayboli.com/new4me_all?page=2 किंवा इतर आतल्या पानांवर ही आहे का?
विजय दिनकर पाटील
तुमची अडचण समजू शकतो पण असं पहा कुठलीही लिंक नवीन विंडोत उघडेल असे केले तर कीती टॅब ओपन होत राहतील याला बंधन रहात नाही. सध्या आहे त्या मुळे वाचक त्याला हवे तेंव्हा नवीन विंडो असे करू शकतो. आणि तसेही तांत्रिक दृष्ट्या ते कितपत सोपे/शक्य आहे ते माहीती नाही.

@ webmaster >>>

मला ईंडेक्स पेज निट दिसतेय, पण लेख, कथा नाही.

@वेमा, मी नेहमी 'माझ्यासाठी नवीन' वापरतो.
https://www.maayboli.com/my_not_read

१) माझे हे इंडेक्स पेज फिट टू स्क्रीन (from upgradation) पूर्वीपासूनच नाही. त्यामुळे साहजिकच अप बटन स्क्रीनच्या बाहेर जात असते.

२) आतील पाने पहिल्यापासूनच व्यवस्थित फिट टू स्क्रीन आहेत, पण आतल्या पानांवर गेले तीन दिवस मोबाईलवर 'Up' चे बटन फारच उजव्या बाजूला आणि स्क्रीनच्या बाहेर जायला लागलंय.

३) अजून एक, गेले तीन दिवस मोबाइलवर धागा क्लिक केल्यावर 'maayboli.com site taking too long time to respond' असा मेसेज येऊन साईटचा संपर्क तुटतो आणि थोड्यावेळाने परत संपर्क स्थापित होतो. असे आजकाल वारंवार होते. डेटा पॅक आणि 10 mbps वायफाय स्पीडवरसुद्धा असे होते. पूर्वी असे काही होत नव्हते.

Chrome browser
Ver. 59.0.3071.125 dt.29.06.17

वेमा अजुन.एक मला सध्या लेख वा कथा वाचुन ईंडेक्स पेजला गेल्यावर त्यात काहिही बदल झालेला नसताना 'बदलुन' असे दिसतेय

@VB ते मीच केलेले काही प्रयोग आहेत . काही लेखनाच्या शीर्षकात अजिबात स्पेस नव्हती त्यामुळे ते wraparound न होता एकाच कॉलममधे जास्त जागा घेत होते. त्यामुळे कॉलमची रूंदी वाढून मोबाईलवर नीट दिसत नाही. पण ही स्पेस घालूनसुधा कुठल्यातरी लेखनाच्या शिर्षकामुळे हे होते आहे असा अंदाज आहे. डेस्क्टॉपवर पुरेशी रुंदी असल्याने हे होत नाही.

https://www.maayboli.com/node/2070 वरुन रिपोस्टः-

व्हॉट्स अप मधे नव्याने सुरु झालेल्या 'पिन चॅट' प्रमाणे, ठराविक धागे पिन करायची सोय करता येईल का. निवडक १० हे खरंतर पिन चॅट प्रमाणेच काम करतं, पण त्या करता प्रत्येक वेळी माझे सदस्यत्व>निवडक १० असा प्रवास करावा लागतोच, तसंच १० ची मर्यादा पण आहे.
पिन केलेल्या धाग्याचा चौथा टॅब 'अजून वाचायचंय' खिडकीतच करता येईल का ? (बाकीचे तीन टॅब म्हणजे- माझ्यासाठी नवीन, ग्रुपमध्ये नवीन, मायबोलीवर नवीन)

आज 'चित्रपट' गटातल्या एका बीबीवर पोस्ट एडिट केली तेव्हा वर 'You have 13544 hours left to edit this comment.' असा मेसेज आला. इथे अवर्स ऐवजी सेकंद हवंय का?

वेबमास्तरजी..
प्रतिसाद संपादित करताना एक काउंटडाउन दिसतो आहे, पण त्यात सेकंदा ऐवजी तास दाखवतो आहे. खाली स्क्रीन चित्र देतो आहे.mabo_1.jpg

Not able to open Maayboli properly on desktop as well as on Mobile(ios-safari) since yesterday. Typing in English only is allowed, not able to see any photos as well. The overall look is of old Maayboli. I can't take screenshot and post here also to show exact problem.

@ वेबमास्टर, आजकाल एक नवीन प्रकार पहायला मिळतोय. आपण जेव्हा आपला प्रतिसाद लिहीत असतो आणि तो सेव्ह करतो त्याचवेळी दुसऱ्या दोघा तिघांनी जरका प्रतिसाद लिहून सेव्ह केले असतील, तर कर्सर त्या प्रतिसादावर न जाता आपल्याच प्रतिसादावर रहातो. त्यामुळे आपल्याला ते वरचे दोन तीन प्रतिसाद आलेत हे लक्षात येत नाहीत आणि वाचायचे राहून जातात. तसेच त्यांना नवीन म्हणून सुद्धा लिहून येत नाहीये. हा प्रकार कट्ट्याच्या धाग्यावर दिसून येतो, जिथे fast बोलणे चालत असते.

मी गेले 2-3 दिवस माबोच्या "शोध" सुविधेचा वापर करून काही रेसिपी शोधायचा प्रयत्न करतेय. पण खालचा मॅसेज येतोय सतत. आधी जेव्हा कधी ही सुविधा वापरली तेव्हा काहीच प्राॅब्लेम आला नव्हता.

Unauthorized access to internal API. Please refer to https://support.google.com/customsearch/answer/4542055
powered by Google

Custom Search

गुगलवरून सर्च केलं तर माबोवरच्या रिलेटेड रेसिपी/धागे दिसतायत.

कधीकधी 'माझं सदस्यत्व' मधून विपू पाहून नंतर 'लेखन' वर क्लिक केलं की 'टोमाटो राईस' ही एकमेव एन्ट्री दिसते. आणि ती माझी एन्ट्री नाहिये. Sad पुन्हा 'माझं सदस्यत्व' वरून लेखन पाहिलं की बरोबर एन्ट्रीज दिसतात. हे काय गौडबंगाल आहे कळत नाही.

परवा पाककृतींचा धागा पाहत होते तर बर्‍याच रेसिपीजमध्ये जिन्नस, पाककृती, टिपा सगळ्यात 'क्ष' असा एक्समेनने हल्ला केल्यासारखा एकाक्षरी मंत्र दिसतोय. उदा https://www.maayboli.com/node/26899 Uhoh

पूर्वी कोणा सदस्याने आपले सदस्यनाम बदलले, तर सगळीकडे (त्याचे लेखन, प्रतिसाद, त्याने केलेली विचारपूस) नवे सदस्यनाम दिसत असे.
आता काही ठिकाणी (प्रतिसाद) जुनेच सदस्यनाम दिसते. हे हेतुतः केले नसेल, तर असे होते आहे हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद.

मायबोली शोध : कधी कधी त्या बॉक्समध्ये टाइप केलेली अक्षर रोमनच राहतात. कधी देवनागरी होतात. हे स्थानमहात्म्य आहे की कालमहात्म्य ते कळलं नाही. आता नक्की कुठे काय होतं, ते बघितलं, तर सगळीकडे (नवीन लेखनच्या बाजूचा शोध, धागा उघडून त्याच्या बाचूचा शोध, माझे सदस्यत्व वरचा शोध) देवनागरीच आलं. पण यापूर्वी अनेकदा रोमन अक्षरेच आलीत.

भरत., सगळीकडे नवे सदस्यनाम दिसायला हवे. तुम्हाला कुठे जुने दिसते आहे याचे उदाहरण माहिती आहे का? एखाद्या मायबोलीकराला डच्चू द्यावा लागला तर त्याचे आहे तेच जुने नाव गोठवले जाते आणि ते दिसत राहते. तोच सदस्य नवीन नावाने आला तर आम्ही अगोदर लिहू देतो. काही खरोखरच सुधारतात त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळते. काही जण सुधारत नाहीत त्याना पुन्हा पुन्हा काढण्याशिवाय पर्याय नसतो. तुम्हाला जुने नाव दिसत असले तर त्यांचा सदस्य क्रमांक नक्की तोच आहे हे माहिती आहे का?

मायबोली शोध : ही सुविधा पूर्णपणे गुगलला आऊटसोर्स केली आहे. पूर्वी त्यावर देवनागरीत टाईप करता येत असे. पण अचानक त्यांची आवृत्ती बदलली त्यामुळे देवनागरीत लिहणे बंद झाले. देवनागरीत लिहणे परत सुरु झाले असले तर मलाही हे नवीन आहे. कारण अजून इथे ते चालत नाही. तुम्ही मोबाईलमधे पाहिले का डेस्कटॉप्/लॅपटॉपवर? कदाचित गुगल चाचणी करून पहात असेल आणि त्यात तुमचा नंबर लागला.

सदस्यनामाबाबत काय होतंय ते तुम्हाला कळलं असेल.
मायबोली शोध - आता डेस्कटॉप आणि मोबाईल, दोहोंवरून देवनागरी अक्षरं उमटली आता.
मोबाईलचा कीबोर्डच देवनागरी होता.

कोणे एके काळी पेज पूर्ण लोड व्हायच्या आधी प्रतिसाद टाइप करायला घेतला, तर तो रोमनमध्ये उमटत असे. शोधमध्ये

Pages