मायबोली सिक्युअर सर्टीफि़केट्बद्दल अत्यंत महत्वाची सूचना

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

गेले काही दिवस काही मायबोली सदस्याना मायबोलीला भेट दिल्यावर एरर येते आहे.
Secure certificate invalid
Secure certificate expired
This site can’t provide a secure connection
www.maayboli.com sent an invalid response.
ERR_SSL_PROTOCOL_ERROR
अशा वेगवेगळ्या प्रकारे ही एरर दिसू शकते.
मायबोलीच्या सिक्युअर सर्टीफि़केटला काही प्रॉब्लेम नाही आणि ते चालू आहे (expired नाही).

वर दिलेली Error म्हणजे तुमचा फोन किंवा संगणक यात कुठलातरी व्हायरस किंवा मालवेअर आला आहे. अशा वेळेस ब्राउझर ला मायबोलीला भेट देण्यासाठी अजिबात परवानगी देऊ नका. काही जणाना ब्राऊझरची कॅश स्वच्छ केल्यावर हा प्रश्न सुटला आहे. काही जणाना मालवेअर अपडेट करून घ्यावे लागले आहे. अशा प्रकारचे संगणकात आलेले घूसखोर पटकन लक्षात यावे म्हणूनच काही महिन्यांपूर्वी आपण मायबोली ची सुरुक्षितता वाढवली आहे.

हे फक्त मायबोलीच नाही तर इतर कुठल्याही वेबसाईट बद्दल सारखेच आहे. तुमचा ब्राऊझर तुम्हाला असुरक्षित गोष्टींपासून वाचवायचा प्रयत्न करतो आहे. त्याला bypass करण्याची परवानगी देऊ नका. ही Error फक्त काहीच वेबसाइट वर येऊ शकते त्यामुळे त्या वेबसाईटचा प्रश्न आहे असे वाटू शकते.

जर तुम्हाला तांत्रिक बाजू माहिती हवी असेल आणी ब्राऊझर मधे secure certificate कसे पहायचे माहिती असेल तर मायबोलीचे अधिकृत certificate ही माहिती दाखवेल.
Issuing country : US
Issuer: Amazon
पण ही तांत्रिक माहिती करून घेण्याची गरज बहुतेक वाचकांना अजिबात नाही. त्यासाठीच तुमचा ब्राऊझर काही गडबड लक्षात आल्यावर एरर दाखवेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मला एकदा दोनदा आली होती एरर पण कॅश क्लियर केल्यावर प्रोब्लेम सुटला.
धन्यवाद ही माहिती इथे शेअर केल्याबद्दल.

एकतर सुरुवातीला धाग्याचं टायटल मायबोली सिक्युलर सर्टिफिकेट असं वाचलं, ते जाउ द्या. Lol

माझ्यासाठी एक गमतीदार प्रकार होत होता.

साईटचे सेक्युअर सर्टिफिकेट एक्स्पायर झाले आहे, (Secure certificate expired) असा एरर कोड माझ्या दवाखान्यातल्या काँप्युटरवर कन्सिस्टंटली येत होता.
सगळी मालवेअर स्कॅन करून झाली, अँटीव्हायरस चे एव्हीजी अनइन्स्टॉल करुन कास्परस्की टाकून झाला. (दोन्ही लीगल) पण तो एरर कोड जाईना, अन मला तो बायपासही करता येईना.

नॉर्मली, फायरफॉक्स तुम्हाला सिक्युरिटी एक्सेप्शन अ‍ॅड करायचा ऑप्शन देतो.

तर, अनेकदा गूगलून मग कुठेतरी सापडली ती गम्मत खूपच सोपी होती.

मी पेशंटला ऑपरेशनची तारीख देताना काँप्युटरच्या कॅलेंडरमधे पुढचा महिना पाहिला होता, अन तो कॅन्सल करायच्या ऐवजी चुकून ओके केला होता. त्यामुळे सिस्टीम डेट एक महिना पुढची होती, अन मला ती एरर येत होती! तारीख बदलल्यावर काम झाले.

हे मुद्दाम फुलवून इथे लिहिलंय, कारण, एसेसेल एररमधे हा एक प्रकार होणे शक्य आहे, व मला सापडलेला एररचा प्रकार व त्याचे निराकरण डॉक्युमेंटेड असलेले बरे.

>एसेसेल एररमधे हा एक प्रकार होणे शक्य आहे, व मला सापडलेला एररचा प्रकार व त्याचे निराकरण डॉक्युमेंटेड असलेले बरे.
इथे लिहल्याबद्दल धन्यवाद. इतरानाही त्याचा उपयोग होऊ शकतो.

> नॉर्मली, फायरफॉक्स तुम्हाला सिक्युरिटी एक्सेप्शन अ‍ॅड करायचा ऑप्शन देतो.
या ऑप्शनचा नेमका अर्थ न कळाल्यामुळे अनेक वाचक तो वापरतात आणि त्यामुळे सुरक्षित नसलेल्या साईटवर जातात.

>अँटीव्हायरस चे एव्हीजी अनइन्स्टॉल करुन कास्परस्की टाकून झाला
अमेरिकेत कास्परस्की बॅन करण्यात येतो आहे.
https://www.theguardian.com/technology/2017/sep/13/us-government-bans-ka...

कास्परस्की मलाही अजीबात आवडत नाही, पण दुसरे उपलब्ध अँटीव्हायरस म्हणून टाकून पाहिले होते. (तुमची बॅनबद्दलची लिंक फुरसतीत वाचतो.)

नमस्कार,
मी मंगला मराठे.मी मायबोलीची सभासद आहे. काल मी मायबोलीवर एक लेख पाठविला आहे. तो मला log in केल्यावर , शोधामध्ये धागा टाकल्यावर दिसत आहे परंतू 'नवीन लेख मध्ये दिसत नाही.
या लेखाला पसंती आली तर विवाहपूर्व मार्गदर्शनाची लेखमाला लिहिण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी वाचकांना लेख दिसाला तर पाहिजे. याबाबत मला मार्गदर्शन करावे.
आपल्या उत्तराची अपेक्षा आहे.
धन्यवाद.
आ. स्नेहाभिलाषी
मंगला मराठे

उपयोगी माहिती
एरर अली नाही पण लक्षात ठेवते >>>+1