मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..
मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.
सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.
खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.
चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन
अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..
या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
१ नंबर लिहिलय..
१ नंबर लिहिलय..
@ राज, दुसरे अजून एक दोन फोटो
@ राज, दुसरे अजून एक दोन फोटो टाकून पहा, तसंच होतंय का ते!!!
प्रतिसाद दिल्यानंतर त्याखाली
.
प्रॉब्लेम बहुतेक लॅप्टॉप्
प्रॉब्लेम बहुतेक लॅप्टॉप्/सफारीचा असावा. आय्फोन्/आय्पॅड वर फोटो सरळ दिसतोय पण लॅप्टॉप्वर नाहि. खाली लॅप्टॉप वरचा स्क्रीन्शॉट देतोय...
अरे आत्ताच एक नविन फिचर रोल
अरे आत्ताच एक नविन फिचर रोल आउट केल्याच पाहिलं, जे माझ्या मते लाँग ओवर्ड्यु होतं.
प्रतिसाद एडिट करायला कालमर्यादा (टायमर) घालण्यात आलेली आहे, बहुतेक ४ तासांची. त्यानंतर प्रतिसादातलं "संपादन" बटन गायब होणार्/होतं.
हो. आत्ताच बघितलं ते.
हो. आत्ताच बघितलं ते.
हो! आणि धागा संपादीत करायला १
हो! आणि धागा संपादीत करायला १ महिन्याची मर्यादा आहे.
आता नवीन प्रॉब्लेम झालेला
आता नवीन प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मोबाईलवरून प्रतिसाद दिल्यावर खालचं 'up' आणि वरचं 'pull down' मेनूचं बटन गायब होतंय. पेज रिफ्रेश केलं की पुन्हा दिसतंय.
काल पासून प्रतिसाद दिला की
काल पासून प्रतिसाद दिला की कंसात संपादित करण्याच्या पुढे 4hoursleft असे दिसते
ह्याचा अर्थ नक्की समजला नाही
प्रतिसाद संपादित करण्यास आता फक्त 4 तास मिळतील कॉमेंट नंतर आणि त्यापुढे तो बदलता येणार नाही असा काही बदल केलाय का ?
अंबज्ञदा मलाही तेच वाटतंय!
अंबज्ञदा मलाही तेच वाटतंय!
अंबज्ञ होय. चार तासांपेक्षा
अंबज्ञ होय. चार तासांपेक्षा जुने प्रतिसाद संपादित करता येणार नाहीत.
आणि इच्छुकांनी त्वरीत यावर वेगळा धागा काढून टाकावा अन्यथा .....
शंका निरसनाबद्दल धन्यवाद
शंका निरसनाबद्दल धन्यवाद मानवजी आणि अक्षय
वेबमास्तर विपु बद्दल काही
वेबमास्तर विपु बद्दल काही बोलतच नाहीत
१ आपल्याला आलेली विपु संपादित करण्याची सोय
२ आपल्याला आलेल्या विपुला कमेंट म्हणून दिलेलं उत्तर आपल्याच विपुत पडणं.
३ विपु आली तर सदस्यत्वात माझी विचारपूस (१) असं आधी दिसायचं ते न दिसणं.
संपादनाला चार तास राहिलेत
संपादनाला चार तास राहिलेत म्हणजे काय ते समजले नाही.
म्हणजे चार तास झाल्यावर तो
म्हणजे चार तास झाल्यावर तो प्रतिसाद संपादित करता येणार नाही?
आता तुझं अवघडये कऊ
आता तुझं अवघडये कऊ
संपादनाला चार तास राहिलेत
संपादनाला चार तास राहिलेत म्हणजे काय ते समजले नाही.
<<
आबुदोस.
+ धागा/इतरांचे प्रतिसाद न वाचताच टंकून मोकळे होणे.
उदा: जस्ट वरचे काही प्रतिसाद पुनः एकदा कॉपे:
**
Screen Shot 2017-07-14 at 2.17.09 PM.png
Submitted by राज on 14 July, 2017 - 23:51
अरे आत्ताच एक नविन फिचर रोल आउट केल्याच पाहिलं, जे माझ्या मते लाँग ओवर्ड्यु होतं.
प्रतिसाद एडिट करायला कालमर्यादा (टायमर) घालण्यात आलेली आहे, बहुतेक ४ तासांची. त्यानंतर प्रतिसादातलं "संपादन" बटन गायब होणार्/होतं.
Submitted by राज on 15 July, 2017 - 00:08
हो. आत्ताच बघितलं ते.
Submitted by अमितव on 15 July, 2017 - 00:10
हो! आणि धागा संपादीत करायला १ महिन्याची मर्यादा आहे.
Submitted by सचिन काळे on 15 July, 2017 - 05:00
<<
अवांतर : मला "सर्वज्ञ" अशी पदवी प्रदान करणारे कोण, हा विचार करू जाता काही संभावित नांवे मनीं येतात. असो.
>वेबमास्तर विपु बद्दल काही
>वेबमास्तर विपु बद्दल काही बोलतच नाहीत
माफ करा. मायबोलीची विचारपूस सुविधा ज्या मोड्युलवर आधारित आहे त्यात अनेक मोठ्या तांत्रिक अडचणी आहेत (या सध्याच्या वर्जनमधे). त्यात सुधारणा करून घेता येतील . पण त्या सुधारून घेण्यात वेळ घालवावा का याबद्दल थोडा प्रश्न आहे कारण हे मोड्यूल वापरणार्या वेबसाईट कमी होत चालल्या आहेत. आणि त्या मोड्यूल चे भविष्य काही चांगले दिसत नाही. त्यापेक्षा नवीन मोड्यूल वापरून त्या सदृष सुविधा , नवीन सुविधा आणि भविष्यासाठी सुकर मार्ग कसा ठरवता येईल याचे संशोधन चालू आहे. म्हणजे विचारपूस सुविधा चालूच राहिल पण पडद्यामागचे कोड बदलेल.
वेबमास्टर, प्रतिसाद संपादन
वेबमास्टर, प्रतिसाद संपादन वेळ ४ तास ठेवली आहे ते कायम राहणार आहे की तात्पुरतं बग आहे ?
हे फीचर आणण्यामागचं कारण समजू शकेल का ?
मायबोली वर पूर्वी (२००८
मायबोली वर पूर्वी (१९९६ ते २००८ ही १२ वर्षे) प्रतिसादासाठी २ तास आणि नवीन लेखन संपादीत करण्यासाठी ८ दिवस अशी काल मर्यादा होती.
मधे काही दिवस नव्हती पण आता परत ही कालमर्यादा सुरु केली आहे. पूर्वी जेंव्हा ही कालमर्यादा होती तेंव्हा संपादन करण्यासाठी किती वेळ राहिला आहे याची काहीच सूचना नव्हती. तुम्ही केंव्हा पोस्ट केले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच मोजावे लागे. आता ते दिसायला लागले आहे.
प्रतिसाद संपादीत करण्यासाठी ४ तास आणि लेखन संपादीत करण्यासाठी ३० दिवस अशी नवीन कालमर्यादा आहे. ती संपल्यावर प्रतिसाद /लेखन संपादीत करता येणार नाही.
अच्छा ओके
अच्छा ओके
@ Webmaster, आता नवीन
@ Webmaster, आता नवीन प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मोबाईलवरून प्रतिसाद दिल्यावर खालचं 'up' आणि वरचं 'pull down' मेनूचं बटन गायब होतंय. पेज रिफ्रेश केलं की पुन्हा दिसतंय. >>> कृपया, या बाबतीत काहीतरी इलाज करावा ही विनंती.
विपुच्या माहितीबद्दल धन्यवाद
विपुच्या माहितीबद्दल धन्यवाद वेबमास्तर.
वेमा,
वेमा,
प्रतीसाद 4 तासात संपादित केल्यास वाढीव 4 तास मिळतात हे निरीक्षण आहे.
@सचिन काळे अडचण कळाली.
@सचिन काळे अडचण कळाली. त्यावरचे उत्तर दुसर्या एका प्रश्नाशी निगडीत असल्याने दोन्ही एकत्र ८-१० दिवसांनी दुरुस्त होईल.
सद्ध्या एक तात्पुरता उपाय सांगतो. खालचे 'up' बटन गायब झाले असले तरी तिथे सध्या एक ग्रे रंगाचा चौकोन दिसायला हवा त्यावर टिचकी मारली तर तो तुम्हाला परत वर घेऊन जाईल.
@ webmaster, प्रतिसाद
@ webmaster, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. वाट पहायला काहीच हरकत नाही.
प्रतिसाद संपादित केला की
प्रतिसाद संपादित केला की कालमर्यादा पुन्हा ४ तास होतेय.
प्रतिसाद संपादित केला की
प्रतिसाद संपादित केला की कालमर्यादा पुन्हा ४ तास होतेय पण लेख संपादित केल्यावर मात्र अशी वाढीव वेळ मिळत नाहीये.
मी माझ्या ह्या धाग्यावर http://www.maayboli.com/node/62645 मैत्रीच्या देणगीदार / रकमेबाबतचा तपशील दर आठवड्याला मूळ लेखात अपडेट करत होतो; आता ते करता येत नाहीये / येणार नाही.
http://www.maayboli.com/node/13468 स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह
ह्या सारख्या धाग्यातही अशी सोय महत्वाची होती पण असो.
अशी सोय एकाला द्यायची आणि एकाला नाही असे करता येणार नाही हे कळते आहे त्यामुळे ओके
@ webmaster, @सचिन काळे अडचण
@ webmaster, @सचिन काळे अडचण कळाली. त्यावरचे उत्तर दुसर्या एका प्रश्नाशी निगडीत असल्याने दोन्ही एकत्र ८-१० दिवसांनी दुरुस्त होईल. >>> अडचण दुरुस्त झालेली आहे. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
एक अडचण सांगतो, कृपया दूर
एक अडचण सांगतो, कृपया दूर करावी.
मोबाईलवर प्रतिसाद देण्याच्या खिडकीमध्ये काही लिहिले आणि त्या खालील 'प्रतिसाद तपासा' हे बटन दाबले, की दिसणाऱ्या नवीन पानाच्या सर्वात वर आपला 'कच्चा' मसुदा दिसतो.
आता आपल्याला जरका हा मसुदा पाहिल्यावर 'save' करायचा असेल तर 'save' बटन हे खिडकीच्या लगेच खाली न दिसता, खाली पूर्ण लेख दिसतो. आणि लेखाच्या सर्वात शेवटी 'save' बटन दिसते.
आता अडचण अशी आहे, की 'save' बटन दाबण्याकरिता प्रत्येकवेळी संपूर्ण लेख ओलांडावा लागतो. आणि जरका आपण दोन तीनदा 'मसुदा' बदलला तर 'प्रतिसाद तपासून' पहायला प्रत्येकवेळी लेख ओलांडणे भाग पडते. आणि जरका लेख बराच मोठा असला तर त्रासात आणखी भर पडते.
म्हणून प्रतिसाद तपासल्यावर 'save' बटन खिडकीखालीच येणे योग्य होईल.
Browser Chrome version 57.0.2987.132 dt. 29 Mar 17 >>>
वरील अडचणसुद्धा दूर करावी अशी मी आपणांस विनंती करतो. धन्यवाद.
Pages