मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

मलाही हा अनुभव येतोय.
एखादी जाहिरात मधोमध उभी ठाकते आणि काही करू देत नाही. म्हणजे लेखनाचा एखादा धागा किंवा नवीन प्रतिसाद, पुढलं पान यांवर क्लिक होत नाही.
आजच जाणवलेलं आणखी एक म्हणजे नवीन लेखनात पुढल्या पान क्रमांकावर क्लिक होत नाही. मग पान रिफ्रेश केलं की होतं. maayboli.png

फायरफॉक्स.५२.०.१

@च्रप्स
तुमच्या ब्राऊझरची कॅश स्वच्छ करून पहा. काही जणांचा प्रश्न यामुळे सुटला आहे.
@राज
हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. परत अडचण आली तर स्क्रीनशॉट पाठवणार का? इथे दिला तरी चालेल. काही जाहिरातदार वाचकाची काळजी न घेता वाटेल तश्या जाहिराती करतात. त्या मुळे कुठली जाहिरात आहे ते कळाले तर उपयोगी होईल. मी मॅकोएस १०.१२.३ (सिएरा)/सफारी वर तपासून पाहिले पण अडचण आली नाही. त्यामुळे हा विशिष्ट जाहिरातदाराचा प्रश्न आहे (कदाचीत तुमच्या भौगोलिक प्रदेशात जाहिराती पुरता असू शकेल)

@भरत
स्क्रीनशॉबद्दल खूप धन्यवाद. तुमचा प्रश्न बराचसा समजला आहे आणि उपाय काही दिवसात जमेल असे वाटते.
अशी मधे येणारी जाहिरात दिसणे अजिबात अपेक्षित नाही. तुमच्याकडून अधिक माहिती मिळाली तर प्रश्न सोडवायला खूप मदत होईल.
१) तुम्ही फायरफॉक्स सोडून इतर ब्राऊझर वापरले तरी हा प्रश्न येतो आहे का?
२) ब्राउझरची उंची तात्पुरती कमी केली (जाहिरातीच्या उंचीपेक्षा कमी) तरीही हा प्रश्न दिसतो आहे का ?
३) सगळ्याच जाहिराती अशा दिसत आहेत का या विशिष्ट जाहिरातीवरच ही अडचण आहे?

>>त्यामुळे हा विशिष्ट जाहिरातदाराचा प्रश्न आहे <<

शक्यता आहे, त्यानंतर हा प्रॉब्लेम परत आला नाहि. बहुतेक ती जाहिरात गुगलच्या कंट्रोलमधुन निसटली असावी...

हे आधीपण दिसलं होतं. आता दिसलं तेव्हा स्क्रीनशॉट घेतला.maayboli1.png
या स्क्रीनला मायबोलीवर कुठेही क्लिक करता येत नव्हतं. रिफ्रेश करता आलं असतं बहुतेक.
ब्राउझर विंडो रिसाइझ केली (उंची कमी) तेव्हा ही जाहिरातीची जाहिरात अदृश्य झाली.
अन्य ब्राउझर इतक्यात वापरलेले नाहीत.

@भरत,
१. हा प्रश्न तुम्हाला इतर पानांवरही येतोय का फक्त http://www.maayboli.com/new4me_all याच पानावर?
२. cache स्वच्छ केल्यावरही येतोय का? किंवा सहज शक्य असेल तर दुसर्‍या ब्राऊझर मधेही येतो आहे का ते पाहणार का? स्क्रीनशॉट मधे तुमच्या कडे क्रोम आहे असे दिसते आहे
३. तुम्ही डेस्कटॉप वापरता आहात की टॅब्लेट? डेस्कटॉप (लॅपटॉप) वापरत आहात असे वाटते आहे. पण इतर काही क्लूज मुळे मायबोलीच्या सर्वरला टॅब्लेट आहे असे वाटते आहे. डेस्कटॉप आणि टॅब्लेट याच्या अगदी मधोमध सीमारेषेवर तुमच्या ब्राऊझर चा आकार येतो आहे. त्यामुळे उंची बदलल्यावर ती जाहिरात दिसली नाही. ( ती मोबाईल किंवा टॅब्लेट वर खाली दिसते तशी दिसायला लागली असेल)

१. अजूनतरी दुसर्‍या पानांवर हा प्रॉब्लेम आल्याचं आठवत नाही.
२. दुसरा ब्राउजर बघतो.
३. डेस्कटॉप.

हे (जाहिरातीचा, जाहिरातीशिवायही मायबोलीवर कुठेच क्लिक न करता येण्याचा) प्रॉब्लेम प्रत्येकच वेळी येतात असं नाही.

चैत्राली, अगं मला दिसतंय की गजालीचं पान. आता माबोच्या पहिल्या पानावरच आहे. तू कोकणी फकाणे गृपचं सदस्यत्व चेक कर. डिलीट झालं असेल तर दिसणार नाही गजाली कदाचित.

>>परत अडचण आली तर स्क्रीनशॉट पाठवणार का?<<
हा इशु बहुतेक स्टॅटिक जाहिरातींना येत नाहि, विडियो क्लिप्सना येतो. स्क्रिनशॉट घ्यायचा प्रयत्न केला परंतु कॅप्चर करेपर्यंत ती अ‍ॅड फेड आउट झाली. तरी स्क्रिन्शॉट जोडतोय...

Screen Shot 2017-03-23 at 9.51.50 PM.png

धन्यवाद निधी.
सदस्यत्व घेतल्यानंतर गजाली धागा दिसतोय.

cache स्वच्छ केले.
मायबोलीबाहेरच्या जाहिरातीने स्क्रीन अडवून धरायचा प्रकार पुन्हा झालेला नाही.
पण दुसर्‍या स्क्रीनशॉटमध्ये दाखवलेल्या मायबोलीवरच्या जाहिराती अजूनही तशाच आडव्या येतात. पान रिफ्रेश केलं की भागतंय.
तसंच जाहिरातींशिवायही मायबोलीवर कुठेही क्लिक न करता येणं हेही होतंय. इथेही रिफ्रेश करून काम भागतंय.
या दोन्ही समस्या नवीन लेखन या पानावरच आल्यात.

{पण इतर काही क्लूज मुळे मायबोलीच्या सर्वरला टॅब्लेट आहे असे वाटते आहे} म्हणजे काय? मी मायबोलीसाठी स्क्रीन ११०% इतकी झूम केलेली आहे.

भरत,
तुमचा स्क्रीनसाईज काय आहे (उदा १०६० x ८०० )?. एका ठरावीक स्क्रीनच्या आकारावरून, ब्राऊझर हे डेस्क्टॉप आहे, टॅबलेट आहे का मोबाईल आहे हे सर्वरला सांगतो. आणि त्या प्रमाणे पान बदलते. तुमच्या स्क्रीनशॉटवरून तो टॅबलेट आहे असे सांगतो आहे असे दिसते. स्क्रीन्शॉट मधल्या शेवटच्या रकान्यातले "+" फक्त टॅबलेट किंवा मोबाईलवर दिसायला हवे. पण तसे असते तर सगळ्याच पानांवर तुम्हाला ही अडचण यायला हवी फक्त नवीन लेखन पानावर नाही. आणि इतर टॅबलेट वर अडचण नाही. तुमची अडचण मला पटकन सोडवता आली असते असे वाटत होते पण आता मी जास्त बुचकळ्यात पडलो आहे. गेल्या १-२ दिवसात सगळ्याच पानावर काही छोटे बदल करून त्याची थोडी उंची वाढवली आहे आणि त्यामुळे तुमचा प्रश्न सुटला असता अशी आशा होती. मायबोलीच्या जाहिरातीही आडव्या येत असतील तर ही अडचण जाहिरातीची नाही कारण त्यात नुसत्या इमेजेस आहेत. ही अडचण तुमच्या स्क्रीनचा साईज न कळाल्यामुळे किंवा तो डेस्क्टॉप आणि टॅबलेट च्या बरोबर मधे येत असल्यामुळे येत असावा असा अंदाज आहे.
स्क्रीन फक्त १००% झूम केला (किंवा ९०% किंवा १२०% केला) तर अडचण जाते आहे का?

पुर्वी आपले स्वतःचे मायबोली प्रतिसाद तपासण्यासाठी पुढील लिंक टाईप केल्यावर प्रतिसाद यायचे ते आता येत नाहीत तर काय करावे लागेल
http://www.maayboli.com/user/युजर आय डी क्रमांक/track

निरु..

@srd
नवीन रचनेतही युट्युब embed code iframe html tag चालत नाही.
@निरु
त्या सुविधेमुळे मायबोलीच्या सर्वरवर खूप ताण येत असे त्यामुळे ती सुविधा उपलब्ध नाही. देण्याचाही सध्या विचार नाही.

<े. स्क्रीन्शॉट मधल्या शेवटच्या रकान्यातले "+" फक्त टॅबलेट किंवा मोबाईलवर दिसायला हवे. > बापरे! तुम्हाला किती डोकेफोड करायला लावली मी!
आता स्क्रीन १००% झूम केल्यावर शेवटच्या प्रतिसादाची तारीख आणि वेळही दिसू लागलेत. तसंच नवीन लेखन करा, माझे सदस्यत्व, जाण्याची नोंद हे आधी नवीन लेखनाच्या यादीच्याही खाली दिसायचं ते आता उजवीकडे दिसू लागलं.

जाहिरात अडकण्याचा प्रश्नही सुटला असावा बहुतेक.

अरे हा ! हे माझ्या मोबाइल वर पण आज चालू झालेलं.
क्लिनमास्टर app वापरुन बघितलं तेव्हा नाही आलं परत .मला वाटलं माझ्या मोबाईलाचा प्रॉब्लेम आहे हा !

`शॉर्टफिल्म्स' हे धाग्याचं नाव असं दिसतंय :

screen-shot.png

त्यामुळे हा धागा या नावाने सर्च करता येत नाही. आधी असं दिसत नव्हतं. फायरफॉक्स आणि क्रोम दोन्हींत असंच दिसतंय. (डेस्कटॉप. क्रोम व्हर्जन - ५७.०.२९८७.१३३. फाफॉ व्हर्जन - ५३.०.०.६३१२)

हे कोणी लिहिलंय का माहीत नाही.
विपु आलेली कळत नाही. माझे सदस्यत्व वर "माझी विचारपूस (१) " असं आधी दिसायचं ते दिसत नाही.

एक अडचण सांगतो, कृपया दूर करावी.

मोबाईलवर प्रतिसाद देण्याच्या खिडकीमध्ये काही लिहिले आणि त्या खालील 'प्रतिसाद तपासा' हे बटन दाबले, की दिसणाऱ्या नवीन पानाच्या सर्वात वर आपला 'कच्चा' मसुदा दिसतो.

आता आपल्याला जरका हा मसुदा पाहिल्यावर 'save' करायचा असेल तर 'save' बटन हे खिडकीच्या लगेच खाली न दिसता, खाली पूर्ण लेख दिसतो. आणि लेखाच्या सर्वात शेवटी 'save' बटन दिसते.

आता अडचण अशी आहे, की 'save' बटन दाबण्याकरिता प्रत्येकवेळी संपूर्ण लेख ओलांडावा लागतो. आणि जरका आपण दोन तीनदा 'मसुदा' बदलला तर 'प्रतिसाद तपासून' पहायला प्रत्येकवेळी लेख ओलांडणे भाग पडते. आणि जरका लेख बराच मोठा असला तर त्रासात आणखी भर पडते.

म्हणून प्रतिसाद तपासल्यावर 'save' बटन खिडकीखालीच येणे योग्य होईल.

Browser Chrome version 57.0.2987.132 dt. 29 Mar 17

हे फारच वरातीमागून घोडे होतेय त्याबद्दल क्षमस्व. हल्ली माबोवर फार रेग्युलरली येणे होत नाही त्यामुळे एवढा उशीर.
काही धाग्यांवर हेडरमधला मजकूर व प्रतिसाद यांच्यामधे खूप जास्त जागा जातेय. लॅपटॉपवर तर पूर्ण स्क्रीनच्या इतकी जातेय. त्यामुळे आपण बाफ कुठला बघतोय हे प्रतिसादांशी पोचेतो हरवले जातेय. खूप जास्त स्क्रोलिंग होतेय. हे सर्वच धाग्यांवर होत नाहीये.
उदाहरणार्थ हे चित्र
1.png
या ठिकाणी लाल रेषेच्या आतली कितीतरी जागा वाचवता येऊ शकते. वरच्या अर्ध्या भागातली सर्व माहिती ही एका ओळीत आल्यास बरे पडेल. तसेच प्रत्येक ठिकाणी मेंबराचा फोटो असायचीही गरज नाही. नाव आले पुरेसे आहे ना?

उशीर झालाय खरा पण जमत असेल तर प्लीज ती मधली जागा कमी करायचे बघा ना.

नविन फोटो होत नाही.. Happy

Pages