आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Prabhu jee mere avagun chit naa dharo - (2)
Samadarasee hai nam tumharo -2,
nam kee laj karo ,
Prabhu jee mere avagun chit naa dharo - (2)

देवनागरित लिहिते थाम्बा..रुमाल टाकण्यासाठी अस केलं Proud

काका Happy , अहो मग काय करू..एकपण दिलं नाहि मी सकाळपासून.. Sad

अशोक कुमार

प्रभु जी मेरे अवगुण चित ना धरो..
समदरसी है नाम तुम्हारो.
नाम की लाज करो,
प्रभु जी मेरे अवगुण चित ना धरो..

थांकु कारवी ताई.. Happy

हुश्श! आता जरा माझ्या माहितीतलं गाण देते...तुम्ही प्रयत्न करा,मी करते तसा Proud ... Happy
१२५६ ,हिन्दी २००५-२०१५
ख ह द क र ल,
ख ह ब र,न र न ,
त ब न क न र ........

तुम्ही आजकाल लिरिक्स लिहायला लागलात कि कै Wink>>

प्रयत्न केला तर आजकालच्या गीतकारांपेक्षा बरे लिहू शकेल असे उगाच वाटते मला! Wink

प्रयत्न केला तर आजकालच्या गीतकारांपेक्षा बरे लिहू शकेल असे उगाच वाटते मला! >> Lol
लिहा कि मग..तसही कविता किती छान केलेली तुम्ही Happy

रिया उत्तर आल्यावर कळेलच तुला ... Happy

व्वाव सत्यजीतजी Happy ,तुम्ही ना पंदितजींसारख माझ्या डोक्यातली गाणी वाचता वाटतं Wink
पाहिलत का क्रुश्नाजी तुम्ही लिहिलेलं आणि हे मिळतजुळत आहे ना??

१२५७.मराठी (१९६५-१९७५)
म त म त प प
म क म त ज ग

ल थ ग श य अ,क
र म त अ म त म भ

(क्ल्यु—सदाबहार रोमॅन्टीक गझल)

मी ते,'खुदा ही दर्द का..' असं काहीसं असावं वाटलं म्हणून तुक्का मारलेला! बाकी गुगलची कृपा बरसली!

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !
मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे !

लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी की
राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे !

चांगल्या कोड्याला एन्ट्री झाली आज

या गाण्याबद्दल मी असं ऐकलंय,की स्वतःची ही गझल,इतक्या उत्तमपणे गायिलेली ऐकल्यानंतर,भट साहेबांनी स्वतः गझल गाणं थांबवलं!
Salute to such legendary singers,who truly 'communicate' the words of the lyricist to the very heart of the listener!

कोडे क्र १२५८ हिंदी (२०११-२०१७)
अ म म क ब थ स ह ज
ज ध न ज ज ह म त अ
क अ ल अ ल म ह
य ल क थ म
अ ह स अ छ ल ज
म ज य ज ल ज
ख च ल य र ल ज
म ज य ज ल ज

Pages