आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२५१ हिंदी
ल ल ग ग
द ह म प ब
न क क प क भ
प क ज ब च म

१२५१:
लौ लगाती गीत गाती
दीप हूं मैं प्रीत बाती
नैनों की कामना प्राणों की भावना
पुजा की ज्योती बनकर चरणो मे मुस्कुराती

१२५३ हिंदी
ज क ह द स क य स
ब क स फ झ त क
क त द फ क म द फ
ज ह ब

जाता कहा है दिवाने, सब कुछ यहा है सनम
बाकी के सारे फसाने झूठी है तेरी कसम
फिफ्टी, कुछ तेरे दिल मे फिफ्टी, कुछ मेरे दिल मे फिफ्टी
जमाना है बुरा

१२५४ हिंदी
म क ग ग ख क क क, क क ह ह
त ह ख म ल ज म द ह य द
अ म क ह स, अ म क ह स

१२५४:
महकी क्यूं गली गली खिली क्यूं कली कली क्या कहती है हवा
तुझे हर खुशी मिले लंबी जिंदगी मिले देती है ये दुआ
अलबेला मौसम कहता है स्वागतम

१२५५: हिंदी
प म अ च न ध
स ह न त
न क ल क
प म अ च न ध

क्ल्यु:
१. १९७०-१९७५
२. चित्रपटाचा नायक हाच या गाण्याचा गायक
३. किकु नाही
४. भजन आहे

मर्यादा २५०० ची करायची का?
>>
अरे ते आपल्यावर थोडीच असतं Lol
२०००+ पोस्टी झाल्या की मायबोली सर्व्हर वर ताण येऊन तो धागा हँग होईला लागतो का काही तरी लॉजिक आहे म्हणून नवा धागा काढावा लागतो.
याच कारणाने निग व तत्सम (ज्यांवर भरपूर फोटो टाकले जातात) अशा धाग्यांसाठी १०००चं लिमिट आहे,

या धाग्यावर अवांतर गप्पा मारण्यापेक्षा गप्पांच्या पानावर किंवा वाहत्या धाग्यांवर किंवा अगदी विपूत गप्पा मारल्यात तर लिमिट फार पटकन संपणार नाही.. अर्थात गाण्याशी रिलेटेड गप्पा नक्कीच हव्यात -जसं की त्या गाण्याबदल एखादी मेमरी, किंवा ते गाणं ओळखण्यासाठी काय काय केलं किंवा एखादी मजेदार पोस्ट...
आणखी एक सजेशन, गाणं दिलं की लगेच एक क्लू दिलात तर क्लू द्या अशी आणखी एक पोस्ट येणार नाही , ज्याने पुन्हा पोस्टींची संख्या वाचेल.
तो एखादा स्टँडर्ड क्लू हवं तर आपण ठरवून घेऊ शकतो.

अवांतराबद्दल सॉरी.
_____________________
१९७०-१९७५ चं गाणं मला ओळखता येणं अशक्य आहे. या धाग्यावर अनेक गाणी अशी आहेत जी तुम्ही सोप्पं होतं म्हणून सोडवता आणि मला ते गाणं माहीत ही नसतं Uhoh

अमिताभ बच्चन का??

हे बाकिचे कुठे गेले???
क्रुश्नाजी,पंदितजी या ना....

२रा एखादा क्ल्यु मिळेल का ???
नाहितर वेट करा सोडवेल कोणीतरी..........

मी नव्हती वाचली ती पोस्ट...इशूताईंचा प्रतिसाद पाहिल्यावर वाचली रियाची पोस्ट..
आणखी एक सजेशन, गाणं दिलं की लगेच एक क्लू दिलात तर क्लू द्या अशी आणखी एक पोस्ट येणार नाही , ज्याने पुन्हा पोस्टींची संख्या वाचेल.
तो एखादा स्टँडर्ड क्लू हवं तर आपण ठरवून घेऊ शकतो.>>> हा पॉईंट योग्य नाही वाटला मला...
कारण् सुरुवातीलाच १क्ल्यु दिला ( किंवा जो स्टँडर्ड क्ल्यु ठरवलाय त्यावर आधारित) तर खेळायला मज्जाच येणार नाही...सहज कोडी ओळखली जातील आणि हे फक्त कोडं देण आनि सोडवण एवढेच उरेल.. फक्त प्रतिसाद संख्या वाचवण्यासाठी हे अस करण चुकीच ठरेल..
इथे सर्व जण येतात कारण गाण्याची आवड आहे + थोडस मनोरंजन व्हाव..म्हनून काहीवेळेस गाण्या शी रिलेटेड गप्पा होतात ...ज्याने सर्व्जण हसतात..
अर्थात हे माझे मत आहे... Happy
सर्वांनाच अस वाटत असेल अस नाही...

सोडवा कि कोणीतरी,
मला द्यायचय कोडं...पण मला येतच नाहिये Sad
पंदितजी ओळखा बर..आणी नविन द्या म्हणजेमी सोदवते आणि देते ...

वयस्कर भाभू, अशोक कुमार,
कोणी गायक पाहुणा कलाकार म्हणून आहे का? (मन्ना डे, भीमसेन जोशी असे...)

Pages