हळदी चे पान

Submitted by Rupali Akole on 7 June, 2017 - 08:37

हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळदीचे कंद मिळतात.ते लावले की झाले.माझ्याकडे कुंडीत लावलेली आहे.
मोदक,धोंडस(काकडीचा केक),पातोळ्या इ.पदार्थ करतानाहळदीची पाने वापरतात. तूप कढवताना,काही माशांच्या आमटीत ,स्वादासाठी हळदीच्या सुक्या पानाची गुंडाळी करून घालतात

पान टाकले तर ते तुप उपवासाला चालेल का? >> आमच्याकडे चालते.

वर दिलेल्या लिंक मधे हळदी चे पान कुठे वापरायचे.??? >> प्रतिसादात लिहिलंय ना काही लोकांनी

प्रतिसादात लिहिलंय ना काही लोकांनी
>>वाचले प्रतिसाद
पानगी कशी करतात
अजुन काय उपयोग आहे हळदी च्या पानांन चा व आोल्या हळदी चा.

मला तर आल्या च्या पानांचे पण कशा कशा त वापर करता याची माहिती हवी होती पण इथे मामींना माझ्या प्रश्नांनी कोणाची तरी आठवण करुन दिली. आता बघा याचे उत्तर काय ते.
चहा मधले वापर मला माहित आहे. Happy

https://www.aayisrecipes.com/konkani-festivals/patholi/ हळदीच्या पानातले पातोळे

https://www.aayisrecipes.com/festival-food/sugarless-rice-puddingcheppi-... - हळदीची पाने घालून कांजी . मराठी खिरीला कोकणीत पाय्स म्हणतात. खीरी म्हणजे ही अगोड डिश.

http://www.aayisrecipes.com/nonveg/meckeral-in-dry-coconut-masalabangade... -- हळदीची पाने घालून बांगड्यांचं सुकं

हे माझ्या कामा चे नाही शाकाहारी आम्ही.
>>
वर मामी यांना ज्याची आठवण झाली बहुतेक त्याचीच मला पण आठवण आली. Happy

रुपाली अकोले, तुमचे इतके एकामागून एक प्रश्न पाहून कोणाची तरी आठवण झाली. >>> मामी, एक नंबर हं

धपाधप उत्तरे येतील! >>>
ओह! मग सांगूनच टाका, आम्हा नवमाबोकरांच्या ज्ञानात भर पडेल.

ओह! मग सांगूनच टाका, आम्हा नवमाबोकरांच्या ज्ञानात भर पडेल.>>>
बरोबर कोणाची आठवण झाली ते कोड़ सोडवा.

<<<वर दिलेल्या लिंक मधे हळदी चे पान कुठे वापरायचे.???>>>>

<<<<पसरट भांड्याला (लगडीला) तूपाचा हात लावून मिश्रण त्यात ओतावे>>>>> असे जिथे लिहिले आहे, त्या पसरट भांड्यात हळदीची पाने/केळीची पाने लावून (पानांना तुप लावावे), त्यावर मिश्रण ओतावे....

वर मामी यांना ज्याची आठवण झाली बहुतेक त्याचीच मला पण आठवण आली.
ऋ?... पुन्हा नविन एखादा धागा निघेल. Biggrin