हळदी चे पान

Submitted by Rupali Akole on 7 June, 2017 - 08:37

हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सामो
होय एक वर्ष झालेत हळद काढायला येईल आता

आता????

हळद जुनमध्ये लावतात आणि फेब्रुवारी मार्चमध्ये काढतात. पाने आपोआप तेव्हा सुकतात, कितीही पाणी ओतले तरी.

आता पाने हिरवी असणार आणि खाली नुकतीच बोटे फुटत असणार. एवढ्यात का काढता?

हळद जमिनीत दोन वर्षे ठेवता येते. अशी दोन वर्षे राहिलेली हळद अजुन चांगल्या गुणधर्मांनी युक्त असते. आपला तो विषय नाही पण बाजारात अशा हळदीला जास्त भाव मिळतो.

आता हळद काढुन शुन्य उपयोग. पावसाळ्यात हळदीच्या पानांची वाढ झाली. आता ती पाने जमिनीखाली हळद वाढवणार. जितकी पाने जास्त तितकी खाली हळद जास्त. ऑक्टोबरपासुन ते काम सुरु होणार.

साधना हे कोणते पिक कसे वाढवायचे हे शेतीविषयक शिक्षण कृषीविद्यापीठात, मिळतं का गं?

हो. कृषि विद्यापिठात बिएस्सी अ‍ॅग्रि ही बेस पदवी मिळते ज्यात शेतीविढयक सर्व विष्स्य शिकवतात. वेगवेगळी पिके, त्यांची खते, रोग, किडी वहैरे. प्रत्येक पिकावरचे रोग न किडी वेगवेगळ्या असतात. पोस्ट ग्रॅडमध्ये यातलाच एक विषय घेऊन शिकत राहायचे. पुढे जाऊन डॉक्टरेट व त्यातच पुढे अजुन सखोल संशोधन असे करतात, चालु असते. कृषी विद्यापिठांची स्वतःची जमिन असते, मनुष्यबळ असते जिथे पिके घेऊन त्यावर सतत प्रयोग करत राहणे कृषी शास्त्रज्ञांना शक्य होते.

आजवर कृषीतले शास्त्रज्ञ व शेतकरी यांचा रोजच्या रोज संवाद
होत नव्हता तो आता इन्टरनेटच्या क्रुपेने सुरु होतोय. शेवटी त्या शास्त्रज्ञांच्या शेतकर्‍यांना लाभ व्हायला हवा तर त्याला अर्थ. तो अर्थ आता गवसतोय.

ज्यांनी आणून दिले होते कंद त्यांनी सांगितलेले काढ़ा म्हणून काही दिवसाने..
मागच्या वर्षी लवली होती.. पण नाही काढणार इतक्यात.. ठेवते अजुन काही महीने..
@ साधना..Thank you माहिती दिल्याबद्दल..

माझी कुंडीतली हळद 3 ते 4 वर्षे जुनी आहे. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ओल्या हळदीचे लोणचे करतात त्यासाठी थोडी काढावीशी वाटली होती. पण काढली नाही.

वरची पाने सुकली की हळद तयार होते पण ती ओलीच असते. लोणचे करता येते. पुड करण्यासाठी सुकवावी लागते.

काही जाती लवकर तयार होत असतीलही. दिवाळीच्या वेळेस काहींनी हळद काढल्याचे पाहिलेय. पाने आपोआप सुकणे हा निर्देशक आहे. पानातली अन्नद्रव्ये हळदीत जातात. त्याआधी काढली तर पाने फुकट जाणार. रोप मातीतच ठेऊन दोन चार कन्याकंद तोडुन घेता येतील पण मातीत राहिलेल्या कंदांना बुरशी लागण्याची शक्यता आहे.

हळद आपण जंतुनाशक वगैरे म्हणुन वापरत असलो तरी तिला मातीत बुरशी लागुन ती कुजू शकते. मी पहिल्यांदा कुजलेली हळद पाहिली तेव्हा आश्चर्य वाटले होते. हळदीला रोग लागेल हे कधी डोक्यात आलेच नव्हते Happy

देवकी, यंदाचे कन्याकंद कडक व पिवळे दिसतात आणि जुने कन्याकंद जरा आक्रसलेले, बाहेरुन काळपट दिसतात व थोडे नरम पडलेले वाटतात. ते खराब झाले समजुन टाकु नका. ते यंदाच्या कंदापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे असतात.

Pages