Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ3, तुम्ही नाशकात राहता काय?
अ3, तुम्ही नाशकात राहता काय? भुताचा अनुभव आलेल्या लोकांशी थेटभेट घ्यायची का? किंवा भूतांशीच थेटभेट...?
स्थानिकांपैकी एक माझा मेव्हणा आहे... त्याला नियमित अनुभव येतात, 'त्रास' नाही. त्यालाच काय पण त्याच्या मित्रांनाही... हां आता तो पुड्याच सोडतो म्हणलं तर जाऊदे...
आपण पुड्या म्हणून ऐकू कि, त्यात बदनामी किंवा भावना दुखवण्यासारखे काय आहे?
तांत्रिक साधना करणारे भुतांच्या झुंडी बाळगून असतात... त्यासाठी स्थानिकांचे पूर्वज च भूत असले पाहीजेत अशी अट नाही.
खि: खि: खि:
खि: खि: खि:
इथल्या पोस्टी वाचून ३अंना
इथल्या पोस्टी वाचून ३अंना रात्री लईच भ्या वाटतं.

म्हणुन ते या गोष्टी खोट्या हाईत हे सोतालाच पटवून द्यायला तसं लिवत असतात. म्हंजी भ्या कमी होतं जरा.
(No subject)
विनिता.झक्कास - पंचवटी
विनिता.झक्कास - पंचवटी कॉलेजजवळ का?? >> होय बरोबर त्याच्या थोडा पुढे गेलात कि
३४ पोश्टी बघुन उत्सुकतेने
३४ पोश्टी बघुन उत्सुकतेने उघडला धागा तर मानवीय मतभेदांनी घाबरायला झाल.
विनीता तुमचा प्रतिसाद /उद्देश
विनीता तुमचा प्रतिसाद /उद्देश कळले नाही मला
लिंबुजी दुरुस्ती बद्दल आभारी आहे. दहा वर्षा पूर्वी गेलेलो त्यामुळे वाटेत हॉटेलला खाल्लेला पांढरा रस्सा
आठवून पटकन कोल्हापुर लिहिले. ते स्थान वाई (सातारा)येथे आहे.
काळू बाई (लक्ष्मी आई )चे मंदिर ही मूळ गोष्ट पण मध्यंतरी तो परिसर आणि एकंदर ठिकाण मांत्रिकाच्या उपासनेसाठी जास्त फेमस झालेले. बोकड बळी वगैरे फार चाले आणि एकदा यात्रेत मंदिर परिसरात आग लागून चेंगरा चेंगरी मध्ये बरीच माणसे दगावली तेव्हा पासून राज्य शासनाने पोलिस बंदोबस्त ठेवणे सुरु केले होते.
मुग्धटली
मुग्धटली
रच्याकाने: या धाग्यावर खरं तर मला बंदी असायला हवी.
मानव पृथ्वीकर >>> का हो बंदी
मानव पृथ्वीकर >>> का हो बंदी आणताय या धाग्यावर
भुत्याभाऊ ते त्यांच्या
भुत्याभाऊ ते त्यांच्या स्वतःबद्दल बोलत आहेत घाबरू नका.
मानव पृथ्वीकर तुमचा गण कोणता हो?
मानवगण आहे ना.. नावातच हिंत
मानवगण आहे ना.. नावातच हिंत आहे...
काळू बाई (लक्ष्मी आई )चे
काळू बाई (लक्ष्मी आई )चे मंदिर ही मूळ गोष्ट पण मध्यंतरी तो परिसर आणि एकंदर ठिकाण मांत्रिकाच्या उपासनेसाठी जास्त फेमस झालेले.>> अनुभव सांगा ना.
अंबज्ञ, २००६ का २००८ साली
अंबज्ञ, २००६ का २००८ साली तिथे खुप चेंगराचेंगरी/आग वगैरे होऊन बरीच (शे च्या घरात) माणसे दगावलि होति, फार भयानक अंदाधुंदीचा प्रकार होता तो. (या बद्दल म्हणजे अशा घटना घडण्याबद्दल त्या " मुद्दामहुन हुल्लडबाजी करीत घडविल्या जातात का व कुणाकडुन?" या शक्यतांबद्दलची माझी खाजगी मते वेगळी आहेत, असो )
तर मी मुद्दामहुन त्या देवस्थानास गेलो होतो. ज्या ठिकाणी असे घात-अपघात होतात व मृत्युचे थैमान घडते तिथे नंतरचा बराच काळ दिवसरात्र "अस्वस्थ" वाटत रहाते. परंतु या ठिकाणी मला तसे कणभरही जाणवले नाही...
मग काय आनंदाच्या उर्मी उसळू
मग काय आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या की काय मनात?
विनीता तुमचा प्रतिसाद /उद्देश
विनीता तुमचा प्रतिसाद /उद्देश कळले नाही मला >>> काय नाही कळले ??
तुम्ही मांढरादेवी लिहिले होते, त्यामुळे मला वाटले हि काळूबाई नसून तशाच नावाची दुसरी देवी आहे. असो.
ती काळूबाईच आहे हे आता क्लिअर झाले आहे.
पंचवटी कॉलेजजवळ का?? >> होय बरोबर त्याच्या थोडा पुढे गेलात कि >>> तिथे बर्याच जणांना असा अनुभव आला आहे. कन्नमवार पुलाजवळ स्मशानभूमी आहे. अर्थात रात्री एकटे येतांना, कोणी तरी सांगीतलेले आठवून असा भास पण होवू शकतो..
माझा अनुभव म्हणाल तर मी १ लीत असतांना माझ्या मागे एक आकाशाऐवढा राक्षस लागला आहे आणि मी जीव खाऊन पळते आहे असे स्वप्न वारंवार पडायचे
इथल्या पोस्टी वाचून ३अंना
इथल्या पोस्टी वाचून ३अंना रात्री लईच भ्या वाटतं. Wink
म्हणुन ते या गोष्टी खोट्या हाईत हे सोतालाच पटवून द्यायला तसं लिवत असतात. म्हंजी भ्या कमी होतं जरा. >>>
मानवगण आहे ना.. नावातच हिंत आहे...
काय हे भुतांचा अनुभव लिवा कि कोणीतरी ....
इथे ज्यांना प्रॉब्लेम होतोय
इथे ज्यांना प्रॉब्लेम होतोय त्यांनी काही बोलू नका बरे.... पुड्या तर पुड्या सोडुदेत की लोकांना आम्हाला आवडतंय वाचायला... इतका बवाल का करतायत लोक..... भुत्यभाऊ मस्त आहेत तुमचे अनुभव... आणि बाकीच्यांचे ही..... अजून येउद्या ... ज्यांना आवडत पटत नाही त्यांना इग्नोर करा
अनिश्का सहमत आहे.
अनिश्का सहमत आहे.
http://www.india.com/travel
http://www.india.com/travel/articles/indias-most-haunted-holkar-bridge-i...
इतक्या पोस्ट्स वाचून किस्से
इतक्या पोस्ट्स वाचून किस्से पोस्ट केले असतील म्हणून बाफ उघडला तर इथेही नेहमीच दळण . एक तरी बाफ वाद विवादापासून मुक्त असू द्या
@जाई - pan kahi lokanna vaad
@जाई - pan kahi lokanna vaad ghatla nahi kiva kahi khuspat kaadhle nahi tar anna pachat nahi
उंदराला मांजर साक्षी .
उंदराला मांजर साक्षी . इंग्रजीत लिहिले म्हणून का वेडपट पणा खरा ठरतो का? आता परांजपेची स्कीप निघू द्या बरं होळकर ब्रिजवर , लोक रात्रीतून बुकिंग करून येतील
मध्यन्तरी पुण्यामधे एका वेडसर
मध्यन्तरी पुण्यामधे एका वेडसर ST ड्राईवर ने काही जणांना उडवले होते, त्याच बसने परवा कोल्हापुर मधे गाड़ी चालवताना ड्राईवर ला हार्ट अटैक आल्याने ७ बाइक वाल्यांना उडवले त्यातील ३ जण मृत झाले. याला योगायोग म्हणावे की काही अमानवीय ? तज्ञान्चे प्रतिसाद अपेक्षित आहेत.बाकि टंकण्यात चूक असेल तर क्षमस्व.
परस्वा हे नव्हतं माहित ....
परस्वा हे नव्हतं माहित ....
बातमीची लिंक वगैरे मिळेल का??
Sleep paralysis या प्रकाराचा
Sleep paralysis या प्रकाराचा अनुभव आहे का कुणाला?
परस्वा, दोन्ही शक्यता आहेत.
परस्वा, दोन्ही शक्यता आहेत.
ल्युसिड ड्रीमिंगचा अनुभव आहे
ल्युसिड ड्रीमिंगचा अनुभव आहे का कुणाला?
मला क्वचित पडतात अशी स्वप्ने...
स्वप्नात असताना आपण अगदी प्रत्यक्षातही तरंगत उडत आहोत असा भास होतो.
बर्याचदा अगदी एखाद्या सिनेमातल्या ड्रीम सीक्वेन्ससारखं ठिकाण असतं... छान डोंगर, ढग, इंद्रधनुष्य वगैरे..
आणि स्वप्न संपता संपता आपण खूप मोठ्या उंचीवरून खाली
किंवा जमिनीवरून एखाद्या खोल गर्तेत पडतोय असा भास होतो.
शरीराला पण एक हलकासा जर्क बसल्याचा अनुभव येतो आणि घाबरून मी झोपेतून उठतो.
मध्यन्तरी पुण्यामधे एका वेडसर
मध्यन्तरी पुण्यामधे एका वेडसर ST ड्राईवर ने काही जणांना उडवले होते, त्याच बसने परवा कोल्हापुर मधे गाड़ी चालवताना ड्राईवर ला हार्ट अटैक आल्याने ७ बाइक वाल्यांना उडवले त्यातील ३ जण मृत झाले. याला योगायोग म्हणावे की काही अमानवीय ? >>>>>>>>>> कोल्हापुरची बातमी वाचली पण गाडी एकच आहे हे माहीत नव्हतं
मध्यन्तरी पुण्यामधे एका वेडसर
मध्यन्तरी पुण्यामधे एका वेडसर ST ड्राईवर ने काही जणांना उडवले होते, त्याच बसने परवा कोल्हापुर मधे गाड़ी चालवताना ड्राईवर ला हार्ट अटैक आल्याने ७ बाइक वाल्यांना उडवले त्यातील ३ जण मृत झाले. याला योगायोग म्हणावे की काही अमानवीय ? >>>>>>>>>> कोल्हापुरची बातमी वाचली पण गाडी एकच आहे हे माहीत नव्हतं >>>>>>>>>> एम एच १४ - बी टी - १५३२
Sleep paralysis या प्रकाराचा
Sleep paralysis या प्रकाराचा अनुभव आहे का कुणाला?
>>
माझ्या आजीला!
वाईला आमचं घर आहे त्याला मोठं अंगण आहे, त्या अंगाणापाशी एक विहीर आणि चिंचेचं झाड आहे. अर्थातच त्यामुळे कोणी अंगणात झोपायला तयार नसायचे, घाबरायचे लोकं..
आईच्या लहान मामाचं लग्न होतं तेंव्हा घरात खुप गर्दी होती, झोपायला जागा नव्हती म्हणून आजी म्हणाली पुरुष मंडळींनी बाहेर झोपा तर सगळे नकार द्यायला लागले..
मग आजी त्यांना मेभळट म्हणत होती म्हणून ते म्हणाले आज तू झोप, वाचलीस तर उद्या पासून आम्ही झोपतो..
आजी हो म्हणुन बाहेर झोपली.. साधारण ३ च्या सुमारास तीला एकदम कोणी तरी छातीवर बसून गळा दाबतंय असा भास होत होता.. तीने ओरडायचा प्रयत्न केला पण तोंडातुन आवाज येईना.. तीने कसंबसं शेजारचं भांदं पाडलं मग आतुन सगळे धावत आले आणि तीला कसलासा अंगरा लावला.. मग ती नॉर्म्ल झाली
आमच्याकडे कायम हे भुताची गोष्ट म्हणुन सांगितलं जातं.. मी समजावायचा प्रयत्न केला पण कोणी ऐकत नाही माझं सो मी आता एंजॉय करते
Pages