Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे याचा अर्थ ज्या कोणाला
म्हणजे याचा अर्थ ज्या कोणाला याचा अनुभव येतो ते सर्व मनोरुग्ण आहेत/असावेत असा घ्यायचा का?>>>>
नाहि याउलट ज्यांना कोणति स्वप्ने पडत नाहित. ज्यांचा देवावर विश्वास नाहि किंवा साधा भास हि होत नाहि तो मानसिक रुग्ण असु शकतो.
जो भुतंखेतं मानतो त्याने
जो भुतंखेतं मानतो त्याने मनावेत...जो नाही मानत त्यान नाही मानू
असू देत की.. आपण सगळेच मोठे आहोत, कशाला कोनाला काही शिकवायला/ पटवायला जाताय?
हे ३अ याना दिलेले उत्तर असावे का? असो मी कोणाला शिकवायला / पट्वायला जाण्या एव्हडा मोठा तज्ञ वगैरे नाहि आहे,पण अनुभव मात्र बरयाचदा आला आहे, असो माझे अनुभव माझ्या बरोबर असुदेत , पण एक मात्र पट्ले कि स्वता मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे.
अनिरुद्ध
अनुभव भूतत्वाचा असेल तर
अनुभव भूत्वाचा असेल तर मनोरुग्ण
देवत्वाचा असेल तर मनोतज्ज्ञ
ये नाइन्साफी क्यों?
अनुभव लिहा कि ....
अनुभव लिहा कि ....
आमची बिल्डींग म्हणजे तळमजला
आमची बिल्डींग म्हणजे तळमजला आणि पहिला मजला असलेली लांबुळकी.
तळमजळ्यावर दोन फ्लॅट्स आणि पहिल्या मजल्यावर दोन फ्लॅट्स, असे एकाला एक जोडून चार ब्लॉक्स.
आजुबाजुला पाच मजली इमारती. त्यामुळे आमची बिल्डींग ही खूप सुरक्षीत आहे.
आम्ही पहिल्या मजल्यावर रहातो आणि आमच्या बाजुला माझा मित्र + ऑफिस कलिग रहात असे.
एकदा रात्री माझे घरीच उशीरा पर्यंत काम सुरु होते. (त्यावेळी मी धूम्रपान करत असे. त्यासाठी मी गच्चीवर जात असे.)
त्या दिवशी बाराच्या सुमारास मी गच्चीवर धूम्रपान करण्यास गेलो. डोक्यात ऑफिस कामाचे विचार होते.
इतक्यात मला समोरच कठड्यावर बाहेरच्या बाजुने उडी मारुन येताना कुत्रा दिसला. मी जरा चपापलो. पण विचार केला, की आम्ही सगळ्यांनी बाल्कनीला / खिडक्यांना बॉक्स टाईप ग्रील्स बसवल्या आहेत. हा कुत्रा कदाचित तिथे वरुनच उतरला असावा आणि आता परत आला असावा.
कठड्यावरुन तो गच्चीत उतरला आणि माझ्याकडे पहात पुढे येउ लागला. गच्चीच्या मधोमध तो मागच्या पायावर बसला पुढचे पाय उभे.
मी जिन्या जवळ होतो. मला वाटले याला जायचे असेल मला घाबरुन थांबलाय.
म्हणुन मी जिन्यापासून दूर गेलो आणि त्याला हाड हाड करत हाकलु लागतो. तो माझ्याकडे पाहून गुर्र गुर्र करु लागला आणि त्याचे भाव एकदमच बदलले.
अगदी पिसाळल्या कुत्र्यासारखे. गुर्र गुर्र करत, केव्हा माझ्यावर तुटुन पडेल हा असे मला वाटले. मी त्याच्या कडे पहात आडवा चालत हळु हळु जिना गाठला.
अर्धा जिना मागल्यापावली उतरलो मग धावत खाली पहिल्या मजल्यावर आलो. त्यावेळी चित्रपट बघायला गेलेले माझे मित्राचे कुटुंब परत आले होते त्यांचे दार उघडत होते.
मी वरच्या आणि खालच्या जिन्याची दारं लावून त्यांना सांगितले वर पिसाळलेला कुत्रा आहे, जिन्याची दारं उघडु नका.
खालचा / वरचा जिना दोन्ही हे बाह्यभागी असून एकमेकांना लागुन आहेत. दोन्ही जिन्याची दारे बंद केली तरी जिन्याच्या कठड्यांच्या खांबातून कुत्री वर जा ये करतात.
कुत्रा तसा खाली निघुन जाईल. मी घरात आलो आणि बायकोला पण सांगितले वर पिसाळलेला कुत्रा आहे. जिन्याची दारं सकाळी एकदम उघडु नको.
मग सकाळी उठल्यावर मीच गच्चीवर गेलो कुत्रा तिथे नव्हता. तो जिथे बाहेरच्या बाजुने कठड्यावर आला होता तीथे गेलो, तिथे खाली खिडकी किंवा बाल्कनी नव्हती.
सगळ्यात जवळ जी ग्रील होती. तिथुन इथे उडी मारणे शक्य नव्हते.
मग काही रात्री कधी भिती जास्त असली तर मी गच्चीवर जाण्याचे टाळु लागलो. तर कधी जिन्याजवळच उभा राहुन सिगरेट संपताच लगेच परतु लागलो.
असे आठवडाभर झाले असेल, मग एक दिवस चीड आली भितीची, साडे बारालाच गेलो गच्चीवर. जिथे तो कुत्रा आला होता त्याच जागी कठड्याला टेकुन सिगरेट शिलगावली.
कुत्रा मध्यभागी बसला होता तिथे जाऊन बसलो. सगळी गच्ची हिंडलो. तेव्हा बरे वाटले. त्यानंतर भिती न बाळगता परत गच्चीवर जाऊ लागलो.
आयुष्यात अचानक एकदाच झालेल्या अशा भ्रमाचे कारण काय असावे माहिती नाही.
शेवट वाचेपर्यंत जाम भीती
शेवट वाचेपर्यंत जाम भीती वाटत होती...कि पुढे काय झाले असेल...
पण देवक्रुपेने अस काही झालं नाही
पन्डित,
पन्डित,
"नाहि याउलट ज्यांना कोणति स्वप्ने पडत नाहित, किंवा साधा भास हि होत नाहि"
ते यन्त्र मानव असावेत का?
अनिरुद्ध
कुत्र्याच्या पेकाटात लाथ
कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालायला पाहिजे होती. परत कधी दिसला नसता.
म्हणजे? कुत्रा आहे हा भ्रम
म्हणजे? कुत्रा आहे हा भ्रम होता?
काही समजले नाही नीटसे, वाचण्यात गडबड झालीक माझी?
भ्रम असावा असे माझे मत.
भ्रम असावा असे माझे मत.
वर कुत्री असतात, दिसतात कधी, पण तसा कुत्रा परत दिसला नाही, आणि कठड्यावर बाहेरुन उडी मारुन येणारा कुठलाही तर अजिबातच नाही.
पिसाळलेल्या कुतर्याच्या
पिसाळलेल्या कुतर्याच्या पेकटात लाथ खरच शक्य आहे का?
अहो, जगात अशक्य असे काही नाही
अहो, जगात अशक्य असे काही नाही. मग हे तर कुत्रे आहे
मानव
मानव
तुमचा किस्सा वाचुन मला एका विग्रंजी पिकचर ची आठवण झाली.असाच एक हिस्त्रं कुत्रा त्यात दाखवला आहे.जो त्या माण्साला घराबाहेर पडु देत नसतो.
कुत्र्याच्या पेकाटात लाथ
कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालायला पाहिजे होती. परत कधी दिसला नसता >>>>>

>>>> नाहि याउलट ज्यांना कोणति
>>>> नाहि याउलट ज्यांना कोणति स्वप्ने पडत नाहित. ज्यांचा देवावर विश्वास नाहि किंवा साधा भास हि होत नाहि तो मानसिक रुग्ण असु शकतो. <<<<< कैच्च्याकैच हं..... मानसिक रुग्ण काय म्हणता?
अहो देवावर विश्वास नसेल अशांना "अन्निसवाले" म्हणतात किंवा ते दुसरे जे धर्माला अफुची गोळी म्हणतात.... ! 

आता तुमच्या विश्लेषणानुसार त्यांना मानसिक रुग्ण ठरवणे म्हणजे मलाही जरासे अतिच वाटतय बर्का...
Submitted by limbutimbu on 31
Submitted by limbutimbu on 31 May, 2017 - 15:01
याच साधं लौजिक सांगतो भास,भिति किंवा श्रद्धा यापाठिमागे संवेदना असतात. संवेदनशिलपणा हे उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तिच लक्षण आहे. तर कठोर स्वभाव कोणत्याहि गोष्टिच दुखः न होणं किंवा तत्सम गोष्टि हे असंवेदनशीलतेच लक्षण आहे. आणि असंवेदनशिल पणा हे मानसिकरित्या आजारि असण्याच लक्षण आहे.
अनिस वर येथे चर्चा नको
अनिस वर येथे चर्चा नको
बास करा की रे
बास करा की रे
जरा बरी अनुभव येऊ द्या की
किती पकवाल सगळ्यांना?
किती पकवाल सगळ्यांना?>>> भुतं
किती पकवाल सगळ्यांना?>>> भुतं मे महिन्याच्या सुट्टिवर आहेतं त्यामुळे अनुभव येत नाहित. P
भुतं मे महिन्याच्या सुट्टिवर
भुतं मे महिन्याच्या सुट्टिवर आहेतं त्यामुळे अनुभव येत नाहित. >>>

(No subject)
(No subject)
(No subject)
हसुन घ्या आज.
हसुन घ्या आज.
उद्या येतोय जून महिना, मग भूतं हसतील आपल्याला.
हो खरच कि..सुट्ट्या संपतील
हो खरच कि..सुट्ट्या संपतील त्यांच्यापण
"भुतं मे महिन्याच्या सुट्टिवर
"भुतं मे महिन्याच्या सुट्टिवर आहेतं त्यामुळे अनुभव येत नाहित. P"
भुताची सुट्टि कधि सम्पते? याची वाट पहावि लागेल . हा हा
हॉस्टेल मधला अनुभव आहे. तसे
हॉस्टेल मधला अनुभव आहे. तसे हॉस्टेलमध्ये बरेच अनुभव आहेत अनेकांचे, पण माझे म्हणून फक्त देतो.
आमचे जे जे चे हॉस्टेल बांद्र्याला कलानगरला आहे. जुने बांधकाम आहे. रया गेली आहे. अगदी पुराना खंडहर छाप वाटतं. इथे सरकारने भरपूर कृपा केली असल्याने सर्वच बाबतीत आनंदीआनंद असतो. इमारतीची रचना अशी आहे की खरोखर भुताटकी सारखे फिलींग येते. त्यात समजा काही हालचाल नसेल तर एकट्या दुकट्या घाबरट मुलाची तर टरकतेच.
तर असे झाले की दिवाळीची सुट्टी लागली आणि सगळी मुले गावी गेली. पण एक मुलगा जो मुस्लिम होता तो गेला नव्हता, कारण त्याचा सण नव्हता व जाण्यायेण्यात घालवण्याइतके पैसे त्याच्याकडे नव्हते. माझ्याकडेही घरी जाण्याइतके पैसे नव्हते, मग मीही थांबलो होतो. दोघांव्यतिरिक्त संपूर्ण दुमजली अस्ताव्यस्त पसरलेल्या हॉस्टेलमध्ये कोणीही नव्हते. कोणी नसल्याने वॉचमन पॅसेजचे लाईट्स बंद करुन ठेवत.
दोनच दिवस झाले आणि अलिम (तो विद्यार्थी) माझ्याकडे आला, रात्रीचे साधारण १२ वाजले असतील. मला म्हणाला, माझ्या रुममधे चल, भयंकर आवाज येत आहे. मी चटकन उठलो आणि गेलो. त्याची रुम जिथे होती तो पॅसेज तर अख्ख्या हॉस्टेलमधला सगळ्यात हॉरर दिसणारा पॅसेज होता. लाइट नव्हती. आणि जसा जसा त्याच्या रुमकडे आम्ही जात होतो, एक भयंकर हुंकार आम्हाला ऐकू येत होता. आता भास होत असेल तर दोघांनाही एकाच वेळेस कसा होईल. मानले की तो घाबरलेला असेल, पण मी तर नव्हतो. अगदी अंगावर काटा आणणारा हुंकार होता तो. जणु काही कोणी खूप धिप्पाड माणूस अगदी तुमच्या कानाजवळ येऊन, ह्म्म्म्म्म.... हम्म्म्म्म्म.... हम्म्म्म्म्म असा सातत्याने करत आहे. हा आवाज एका दिशेने न येता चहूबाजूने येत होता. एका दिशेने आला असता तर कळलेही असते सोर्स कुठे आहे. पण आवाज अगदी कुणीतरी तुमच्या समोरच आहे पण तुम्हाला दिसत नाही इतक्या अंतरावरुन येत होता. क्षणभरासाठी मी कापरलो... म्हणजे ही फिलींग ब्येक्कार असते. तुम्हाला नक्की काय घडत आहे हे समजत नाही, पुढच्या क्षणी तुमच्यासोबत काय होइल सांगता येत नाही, कुणीही साक्षीपुरावे, मदत नाही. यु फील टेरिफाइड टू योर बोन्स! अगदी भयंकर....!
माझ्यापेक्षा तर तो मुलगा जास्त टरकलेला, त्याचे डोळे विस्फारलेले, घाम ओघळत होता कपाळावरुन.... मग मी जरा शांतपणे विचार केला. आवाजाचा सोर्स कुठे आहे हे शोधूया म्हटले. दिशा खरंच कळत नव्हती आवाजाची. तरी सगळीकडे फिरुन पाहत होतो. आणि ते अजून गहिरं होत जात होतं. कारण तो हुंकार आपल्यासोबतच फिरत आहे असे वाटत होते. विश्वास-अविश्वासाच्या कडेवर मी लोलकासारखा हलत होतो. मी म्हटलं यार, आज तुमचे काही बरे वाईट झाले ना तर पुढच्या पंधरा दिवसात इथे बॉडी सडून जाइल पण कोणाला कळणार नाही. कारण सगळे सुट्टीवर. वॉचमन सुद्धा वर येऊन चेक करणार नाही इतका तो आळशी आहे हे माहितच होते.
शेवटी त्यापॅसेजला लागुन असलेल्या दुसर्या पॅसेजमध्ये गेलो तेव्हा हळू हळू आवाजाची दिशा कळायला लागली आणि पॅसेजच्या शेवटी असलेल्या एका गोष्टीने दचकवलेच.
.
.
.
.
.
.
.
पॅसेजच्या शेवटी कोणतीही खोली नव्हती तर सिमेंटची जाळी होती. ती नक्षीदार हवा येण्याजाण्यासाठी असते तशी आणि पल्याड एक मोठे झाड होते. झाडावर.... श्वास सोडा आता. तर झाडावर कोण्यातरी पक्षाचे घरटे होते, तो पक्षी आवाज करत होता. त्याचा आवाज, पॅसेजच्या जाळीतून पॅसेजमध्ये येत होता. व चौकोनी लांबलचक पॅसेजमुळे तो घुमून मोठा होत होता.. सर्वत्र एकच आवाज आणि इतका दमदार वाटण्याचे कारण होते की पॅसेजमधली हवा थांबलेली होती. बहुतेक थाबलेली हवा जास्त कंपन पावत असावी. मला खुलासा झाला, मी हे त्या मित्राला सांगायला त्याच्या रुमकडे धावलो तर... तो मित्र.
.... तो मित्र कपडे भरत होता.... यार, सुबह् होतेही निकल जाउंगा मै, नही रुक सकता, मेरी जान चली जायेगी... अरे म्हटलं, तु घाबरतो कशाला, पक्षाचा आवाज आहे. डोन्ट वरी. त्याला दाखवलेही नेऊन.... पण एकट्या असलेल्या त्याने तो आवाज माझ्यापेक्षा जास्त वेळा ऐकला होता, आणि एकांतात काय काय विचार त्याच्या मनात येऊन तो प्रचंड घाबरला होता. त्याला खुलाशाने समाधान झाले नव्हते, म्हणजे ते त्याला पटले, पण भीतीने जी त्याची अवस्था केली होती त्यातून तो बाहेर येऊ शकत नव्हता. प्रत्येकाला ते शक्य होत नाही. मला त्याच्याबद्दल अनुकंपा आहे. तो काही चूक नव्हता. परिस्थितीने जाम टरकला होता. तो सकाळी निघून गेला.
---------------
मग मी एकटाच राहिलो. खाली वाचमन असे, वर माझ्या खोलीत मी. ३० खोल्यांच्या आणि अर्धा एकर सुनसान परिसरात आम्ही दोघेच. अशाच दुसर्या तिसर्या रात्री मी माझी असाइनमेंट रंगवत बसलो होतो. रात्रीचे दोन वगैरे वाजले असतील. झोप आली मग जाम. ब्रश वगैरे धूवून घेऊया आणि झोपायला जाऊ असा विचार करुन मी आमच्या कॉमन बाथरुममध्ये गेलो. तिथे एकच ट्युब मरायला टेकल्यावर जगावर उपकार केल्यासारखी टिमटिमत होती. मी नळ सुरु केला आणि.........
..
..
..
..
..
नळातून भसाभसा, उलटी केल्यासारखे लालभडक रक्ताळलेले पाणी यायला लागले ना....
आता मात्र माझी खरोखर टरकली..... जस्ट इमॅजिन. मी तिथे एकटाच. हाक ना बोंब. खल्लास.
झोप तर सेकंदाच्या एक लाखाव्या भागाला अर्धा एकर परिसरापासून चार मैल लांब पळून गेली आणि अनामिक भीतीने शरिराचा कब्जा घेतला.
ते चार-पाच सेकंद म्हणजे आयुष्यात न विसरता येणारे....
.
.
मग हळू हळू स्वच्छ पाणी यायला लागलं. काय झालं होतं? आमच्या त्या कॉमन बाथरुममध्ये चार बेसिन होते, ज्यातला एक नळ कोणीच वापरत नव्हते. बहुतेक तो फार घट्ट व काहीतरी असेल. त्या नळातून कधीच पाणी कोणी काढलेले नव्हते. आणि हॉस्टेलचे पाइप्स लोखंडी, कित्येक वर्षापासून बदलेले नव्हते, गंजून गेलेले. तो सगळा लालसर गंज पाइपांतून खरवडून भसाभस तोटीतून उलटी केल्यासारखा बाहेर पडत होता.
मध्यंतरी भुत्याभाऊनी
मध्यंतरी भुत्याभाऊनी राजस्थानच्या भानगढचा उल्लेख केला होता. त्यावरून काही वर्षांपूर्वी वाचलेली एक भयकथा अंधुकशी आठवली. कथेचा नायक राजस्थानला काही कामानिमित्त येतो. तेथील एका जुनाट रेल्वे स्टेशनवर त्याला त्याचा जुना मित्र अचानक दिसतो. नायक त्याला हाक मारून भेटण्याचा प्रयत्न करतो. पण मित्र त्याला टाळून तिथून नाहीसा होतो. नायक मित्राच्या प्रेयसीला गाठून त्याची चौकशी करतो . त्यावेळी त्याला असे कळते कि गेल्या ६ महिन्यापासून तो बेपत्ता आहे. या मित्राचे आई-वडील नसतात त्याच्या काकाने त्याचा सांभाळ केलेला असतो. मित्राला नोकरी मध्ये अपयश आलेले असते. आणि अचानक तो नाहीसा होतो. कथेच्या नायकाला यात काही गडबड वाटते. तो तडक आपल्या गुप्तहेर मित्राला बोलवून घेतो. अनेक प्रकारे माग काढून , अडथळे पार करून ( इत्यंभूत गोष्ट आठवत नाही, परंतु मूळ कथेत हा पाठलाग खूपच रोमांचक आणि रहस्यमय मांडला आहे ) जेव्हा मित्र त्यांना भेटतो त्यावेळी तो सांगतो कि , एका गडगंज श्रीमंत माणसाने त्याला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारले आहे. येत्या काही महिन्यात त्यांच्या संपत्तीचा फार मोठा वाट ते याच्या नावावर करणार आहेत. फक्त अट एकाच होती. त्याने सगळे संपर्क तोडून,काही दिवस त्यांच्या राजस्थानमधील जुन्या हवेली मध्ये एकटे राहायचे. जुन्या कोणत्याही ओळखीच्या माणसाला भेटायचे नाही. त्यांच्या घराण्याची तशी परंपरा होती म्हणे. मित्राला तर अस्मान ठेंगणे वाटते. आणि कसलाही विचार ना करता तो हा प्रस्ताव मान्य करतो. मित्र हवेलीत राहायला येतो. अटीप्रमाणे तो एकटाच राहणार असतो , फक्त जेवण बनवायला एक नोकर येत असे. तोही संध्याकाळी लवकर निघून जात असे.मित्राला फक्त नोकराबरोबर बाहेर जाण्याची मुभा असते.( म्हणून तो नोकराच्या भीतीने नायकाला ओळख दाखवत नाही ) ती हवेली अनेक वर्ष बंद असते. प्रशस्त हवेली मध्ये एक खास खोली सोडून मित्राला कुठेही जाण्याची मुभा असते. पहिल्याच रात्री मित्राला नवीन आणि भयाण जागा असल्यामुळे झोप लागत नाही. त्यातच त्याला कोणाच्या तरी मंद हसण्याचे आवाज ऐकू येतात. आवाजच नीट मग काढला असता त्याच्या लक्षात येते कि आवाज बंद खोलीच्या दिशेने येत आहे. कसाबसा जीव मुठीत धरून तो ती रात्र घालवतो. सकाळी तो खोलीजवळ जातो . त्या खोलीला भलेमोट्ठे कुलूप आणि अनेक लाल काळे-धागे, लिंबू-मिरच्या बांधलेल्या असतात.(टिपिकल भूलभुलैया सिनेमा सारखे ) मित्राला आपण कोणत्यातरी भयंकर संकटात सापडल्याची शंका येते. परंतु आता तो काही करू शकत नाही ,कारण त्याने त्या श्रीमंत माणसाबरोबर करार केलेला असतो. सर्वस्व नशिबावर सोपवून तो तेथे राहण्यास सुरुवात करतो. रोज रात्री त्याला विविध अनुभव येऊ लागले. कधी हसण्याचे ,तर कधी रडण्याचे ,कधी घुंगरूचे , तर कधी दार ठोठावण्याची. ते आवाज एका स्त्रीचे होते.
यानंतर गोष्ट अचानक १५०- २०० वर्ष मागे जाते. हवेलीचा मालक तथाकथित राजा असतो. जो खूपच छंदी- फंदी असतो. राजाची एक राणी असते. परंतु राजाचे संबंध एका प्रसिद्ध नाचणारीशी (त्याकाळातील कोठ्यावरील बाई ) होते. फूलकुंवर तिचे नाव ,जी दिसायला खूपच सुंदर होती आणि अनेक राज्यांमध्ये तिच्या रूपाचे गुणगान होते. अनेक राजे तिला राणी बनवण्यास आतुर होते. परंतु तिचे प्रेम या राजावर होते. परंतु राजा मात्र फक्त तिचा उपवस्त्र म्हणूनच उपयोग करत असतो. असेच दिवस जात असतात. आणि एके दिवशी फुलकुंवर राजाला गोड बातमी देते. ते ऐकताच राजा खडबडून जागा होतो. नाचणाऱ्या बाईच्या मुलाला राज्याचा उत्तराधिकारी बनवण्यास राजाचे मन कदापि तयार नसते. अंततः राजा तिला संपवण्याचा निर्णय घेतो. तो फुलकुंवर ला या हवेलीवर बाळंतपणासाठी आणतो. आणि एके रात्री तिला जिवंत भिंतीत चिणतो. परंतु मरताना फुलकुंवर राजाला श्राप देते कि , तुझ्या वंशाचा नायनाट केल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. त्यानंतर हवेलीत भयानक मृत्यू चे तांडव सुरु होते. एक एक करत राजघराण्यातील सारी माणसे मारू लागतात. (पुन्हा भूलभुलैया ) मग राजा एका मांत्रिकाला बोलवून तिला त्या खोलीत कैद करतो. फक्त या सगळ्यात राजाकडून एक चूक होते कि , राजाने फुलकुंवर ला त्या खोलीत चिणले असते ,जेथून खजिन्याचंपर्यंत जाण्याचा एकमेव भुयारी मार्ग असतो. अनेक पिढ्या जातात परंतु कोणाचीही तो खजिना मिळवण्याची हिम्मत होत नाही.
नायकाच्या मित्राला दत्तक घेणारी व्यक्ती म्हणजे राजघराण्यातील तत्कालीन वारसदार असतो. जो अतिशय लालची असतो. त्याला एका अघोरी मांत्रिकाकडून कळते कि अमावास्येच्या रात्री जर एखाद्या पायाळू (ज्याचा जन्म पायाच्या बाजूने झाला असेल ) अश्या व्यक्तीचा, अथवा राजघराण्यातील वारसाचा , यज्ञ करून बली द्यावा लागेल.तरच तो आत्मा शांत होईल. त्या व्यक्तीला स्वतःचा एक मुलगा असतो परंतु स्वतःच्या मुलाचा बली कसा देणार. खूप प्रयन्त आणि शोधाशोध केल्यावर त्यांना एक पायाळू व्यक्ती सापडतो. तो म्हणजे नायकाचा मित्र.
गोष्टीचा शेवट अमावास्येच्या रात्री. मांत्रिक , आणि दोघे बाप-लेक मित्राची आहुती द्यायची पूर्ण जय्यत तयारी करतात. आणि नायक आणि त्याचा गुप्तहेर मित्र त्यांचा खेळ उधळून लावायचा प्रयन्त करतात. या धुमश्चक्रीत बाप मारला जातो. मांत्रिक आपले मंत्रपठण तसेच चालू ठेवतो. आणि तो क्षण येतो जेंव्हा फुलकुंवरचा अक्राळ विक्राळ आत्मा प्रकट होतो. आणि जोरात ओरडतो, "माझा बली कुठेय ?". तेवढ्या वेळात नायकाने मित्राला सोडवले असते. हा सगळं प्रकार सांगण्यासाठी मुलगा मांत्रिकाकडे येतो. हे ऐकून मांत्रिकाची पाचावर धारण बसते. जर का आत्म्याला योग्य तो बाली मिळाला नाही तर ती सगळं नष्ट करेल. मांत्रिक क्षणभर विचार करतो आणि मुलाला खाली पडून त्याचा गळा कापतो. फुलकुंवर ला तिचा हवा असलेला बळी मिळतो. ती निघून जाते. मांत्रिकाला नायक जेरबंद करतो. मिळालेला खजाना सगळे सरकारच्या हवाली करतात. त्याचा योग्य तो मोबदला त्यांना मिळतो. मित्राला कराराप्रमाणे दत्तकपुत्र असल्याबद्दल श्रीमंत माणसाची सगळी संपत्ती मिळते.
टीप - जेवढी जास्तीत जास्त आठवत आली तेवढी मांडण्याचा प्रयत्न केलाय. थोडेफार माझे फेरबदल
मी आणि माझी मैत्रिण १२/१३
मी आणि माझी मैत्रिण १२/१३ वर्षाच्या होतो तेव्हाची गोष्ट. मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या गच्चीवरुन पाठीमागच्या कचरापट्टीच्या मधोमध असलेले एक शौचालय दिसायचे. त्याला कुलुप लावलेले असायचे नेहमी. कुणीच ते वापरत नव्हते. एक दोन भुताटकीच्या कहाण्याही एकल्या होत्या त्या शौचालयाबद्दल. पण कधी विश्वास ठेवला नव्हता.
तर, दुपारची २/२.३० ची वेळ असेल. आम्ही गच्चीच्या कठड्याला रेलुन गप्पा मारत होतो. समोर अर्थातच कुलुपबंद शौचालय होते. अचानक आमचे लक्ष गेले तर कुलुप काढलेले होते. आम्हाला तर आत जाताना कुणी दिसले नव्हते. तरीही आम्ही एकमेकींना समजावले की आपले गप्पांच्या नादात लक्ष नसेल आणि कुणीतरी आत गेले असेल. बघुया वाट पाहुया कोण बाहेर येते ते. साधारण १०/१५ मिनिटे आम्ही टक लावुन पाहत होतो पण कुणीच येईना. आणि तीस एक सेकंदासाठी आम्ही दुसरीकडे पाहिले असेल, परत पाहतो तर काय, कुलुपबंद शौचालय. आम्ही जे पळत सुटलो ते मैत्रिणीच्या घरी जाउन थांबलो. तेथे आम्ही हा प्रकार सांगितला तर कुणी विश्वासच ठेवेना
आम्ही परत कधी गच्चीच्या त्या बाजुला उभे राहिलो नाही.
नानाकळा, राया भारि ना
नानाकळा, राया भारि ना
Pages