Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे शबाना चांगला असावा अस
अरेरे शबाना चांगला असावा अस वाटल होतं..
तापसीचा पिंक बघितल्यावर अजुन चित्रपट बघायची इच्छा झाली. घाझी चांगला होता पण तिला कामच नव्हतं. त्यामुळे हा बघणार होते...
वढा थोडाफार अक्की उघडा दिसला
वढा थोडाफार अक्की उघडा दिसला आहे त्यात क्लिन शेव्ह नसलेली त्याची चेस्ट बघुन>> शेव्ह दाढीची करतात ना. एक बेसिक प्रश्न
मला एकूणात अर्ची खुद्द
मला एकूणात अर्ची खुद्द स्क्रिन आणि बाहेरच्या वावरात सुद्धा बी ग्रेड आणि लाऊड वाटली.
Submitted by दक्षिणा on 5 April, 2017
>>>>>>>>>>>>>>
एखाद्याचा इतका दुस्वास करने योग्य नाही अस मला वाटत.. ति पॉलिश्ड नाही म्हणुन बी ग्रेड म्हणने हे हि अयोग्य आहे.
एक गोष्ट मान्या करायला हवी कि सैराटने मराठी सिनेमाला एका कोषातुन बाहेर काढल आहे..
११० कोटीची कमाई काय किंवा ९० मिलीयनची युट्युब व्हिवरशिप काय... ( तिच नंबर २ च्या मराठी सिनेमासाठी ७ मिलीयन जवळपास आहे ) पण तमीळ, तेलुगू वा बंगाली लोकाना मराठी चित्रपटपण असतात हे माहीत नव्हत ( स्व अनुभव) त्यानी सैराट पाहुन मराठी चित्रपट इंडस्ट्री आहे हे कळल ते पण खुप आहे...!!
या चित्रपटा मुळे मराठी सिनेमा इंडस्ट्रीच नाव होत असेल तर ते छानच आहे अस मला वाटत..
सैराटची भट्टी छान जमली होती
सैराटची भट्टी छान जमली होती पण मलाही त्यात अर्ची लाउडच वाटली होती. ती स्क्रीन आणि बाहेरही सेमच वावरली म्हणजे बोलण्याची स्टाईल वैगरे.
बाहेरच्या वावरात सुद्धा बी
बाहेरच्या वावरात सुद्धा बी ग्रेड आणि लाऊड वाटली.>> मला मात्र या उलट ती बोलायला लागल्यावर लगेच जाणवल की ही साधी ,फारस मुबई-पुणे जग न पाहिलेली गावाकडची मुलगी आहे , तिच अल्लड बोलण्यावरुनच (फक्त ) ती १४-१६ वयोगटातली दिसते.
ती १४ ते १६ वयोगटातील च आहे.
ती १४ ते १६ वयोगटातील च आहे.
एखाद्याचा इतका दुस्वास करने योग्य नाही अस मला वाटत.. ति पॉलिश्ड नाही म्हणुन बी ग्रेड म्हणने हे हि अयोग्य आहे. >> अहो मी बी ग्रेड वाटली म्हणाले, बी ग्रेड आहे म्हणाले नाही.
शिवाय लोकशाही आहे, मत व्यक्त करणे अधिकार आहे माझा... त्यातून पुण्यातली आहे त्यामुळे तर...
(मी अगदी अमेरीकेची अर्थिक उलाढाल, यावरही भाष्य करूच शकते, फिर उसके सामने अर्ची किस झाड् की पत्ती?
आणि मी दुस्वास करू? अर्चीचा? ते का म्हणून?
आपल्या मताचा आदर राखुनच मी
आपल्या मताचा आदर राखुनच मी माझे मत व्यक्त केलेल आहे... जो माझा पण आधिकार असावा अशी आपेक्षा बाळगतो.
"बाहेरच्या वावरात सुद्धा बी ग्रेड वाटते" हे मत अयोग्य आहे असे मला तरी वाटते. एखाद्यच्या वावर ( देहबोली, भाषा वा आजुन काही परिमाण तुम्ही लावली असतील) त्या नुसार एखाद्याच ग्रेडींग हे अयोग्य आहे.
ता.क. : मी सुद्धा पुण्यातीलच आहे (खडकमाळ)
त्या मुळे Quaternary Sector of the Economy ते Neuropsychopharmacology व T. S. Eliot पासुन ते अभीनवगुप्त पर्यंत सगळ्या विषयावर आपण चर्चा करु शकतो .....
( कुठलेही केस खरडले की ते
( कुठलेही केस खरडले की ते शेविंगच होते.
सर्जरी करण्यापूर्वी सर्जन ऑर्डर लिहितो ... शेव द पार्ट )
( कुठलेही केस खरडले की ते
( कुठलेही केस खरडले की ते शेविंगच होते.
सर्जरी करण्यापूर्वी सर्जन ऑर्डर लिहितो ... शेव द पार्ट )>> धन्यावाद तैमुर. असय होय..
ट्यूबलाइट पाहिला. प्रोमोज
ट्यूबलाइट पाहिला. प्रोमोज पाहून सिनेमा इतका काही बघण्यासारखा असेल असं वाटलं नव्हतं. पाहिल्यावर ते खरंच ठरलं. किक आणि बजरंगी भाईजान च्या पुढे हा फिका वाटला. पाहताना बजरंगी ची आठवण येत राहते. भाईंनी संपूर्ण सिनेमाभर ॲक्टिंगचा प्रयत्न केलाय, तो बहुतांश ठिकाणी ओव्हर वाटला. काहीकाही प्रसंगात मात्र खरंच छान ॲक्टिंग केलीये. सोहेल खानच्या ॲक्टिंगची ताकद दिग्दर्शक कबीर खान ला पुरेपुर माहित असल्याने त्याला कमीत कमी वेळ आणि डायलाॅग दिले आहेत असं वाटलं. ती चिनी अभिनेत्री आणि तो छोटा मणिपुरी मुलगा दोघेही छान वाटले. लोकेशन्स सुंदर आहेत, पण त्याच त्याच जागा, पूल, बस पाहून कंटाळलो. काही मिनीटांसाठी शाहरुख खान पण आहे. ओम पुरींचा शेवटचा सिनेमा हा कदाचित. त्यांचा नेहमीप्रमाणे सहजसुंदर वावर आहे. एकही गाणं लक्शात राहिलं नाही.
एकंदर असा सगळा मसाला असल्याने 'मुझे पुरा यकींन है' की एकदा पहायला हरकत नाही.
ट्रेलर मध्ये सलमानची निरागस
ट्रेलर मध्ये सलमानची निरागस/भोळा दिसण्याची धडपड बघून चित्रपटाची कथा ईश्वर सारखी आहे का असा संशय आला.
ट्रेलर मध्ये सलमानची निरागस
ट्रेलर मध्ये सलमानची निरागस/भोळा दिसण्याची धडपड बघून > हेच ते जे बघुन हा शिनुमा बघणार नाही असं ठरवलं मीए.
काय ते सारखं सारखं अतिभोळा अतिचांगला. असं दाखवायच्या नादात मतिमंद वाटु लागलाय सलमान.
काय ते सारखं सारखं अतिभोळा
काय ते सारखं सारखं अतिभोळा अतिचांगला. असं दाखवायच्या नादात मतिमंद वाटु लागलाय सलमान. >> + १००००००
<तो छोटा मणिपुरी मुलगा>
<तो छोटा मणिपुरी मुलगा>
तो मुलगा अरुणाचल प्रदेशातला आहे.
तो मुलगा अरुणाचल प्रदेशातला
तो मुलगा अरुणाचल प्रदेशातला आहे.>> चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद मास्तर
तोच तो सलमान खान वेग वेगळ्या
तोच तो सलमान खान वेग वेगळ्या नावांनी किती वेळा पहायचा .
आणि त्याचा तो जंत झाल्यासारखा नाच
>>>आणि त्याचा तो जंत
>>>आणि त्याचा तो जंत झाल्यासारखा नाच---
हा हा. काय परफेक्ट उपमा आहे.
त्या छोट्या मुलाने मतीनने
त्या छोट्या मुलाने मतीनने धमाल केलीये ट्यूबलाइटच्या प्रमोशन कॉन्फरस मध्ये . त्याचा व्हिडीओ अवश्य पाहा.मी फेसबुकवर बघितला
फर्स्त दे फर्स्त शो बूक केलाय
थर्द दे थर्द शो बूक केलाय ... भाइ रोक्स
हिंदी मिडीयम कसा आहे? कुणी
हिंदी मिडीयम कसा आहे? कुणी पाहिला का? Amazon prime video वर आलाय.
हिंदी मिडियम चांगला सिनेमा
हिंदी मिडियम चांगला सिनेमा आहे. एकदा पहायला हरकत नाही.
असं दाखवायच्या नादात मतिमंद
असं दाखवायच्या नादात मतिमंद वाटु लागलाय सलमान >> म्हणजे तो मतीमंद नाहीये का?? मला खरंच मतीमंदच वाटलेला.. त्यामुळे बघणे नाही
इथे कुणी ऐय्यारी किंवा आपलं
इथे कुणी ऐय्यारी किंवा आपलं माणूस बघितलाय का?
आज सुट्टी असल्याने दोघातला एक बघायचा प्लॅन आहे.
ऐय्यारी तसा एखादं दिवसात मिळेल कदाचित पण सिद्धार्थ आवडतो, नानांचा आपलं माणूस पण बघवासा वाटतोय
जर कुणी पाहीलेत हे मुव्ही तर सांगाल का कोणता चांगला आहे
इथे कुणी ऐय्यारी किंवा आपलं
इथे कुणी ऐय्यारी किंवा आपलं माणूस बघितलाय का?>> ऐयारी रिलीज होणार् १६ तारखेला नंतर बघू शकाल. आय कांट सिट थ्रू अ मराठी मूव्ही. सो आपलं माणूस ला पास.
थँक्स अमा, मला ही आत्ताच कळले
थँक्स अमा, मला ही आत्ताच कळले की ऐय्यारी 16th ला रिलीज होतोय, बुक माय शो वर
माझ्या डोक्यात जुनी तारीख 9 फेबच होती.
सो आपलं माणूस बघायचे ठरले
सो आपलं माणूस बघायचे ठरले >>
सो आपलं माणूस बघायचे ठरले >>> बघितलात कि सांगा !
आय कांट सिट थ्रू अ मराठी
आय कांट सिट थ्रू अ मराठी मूव्ही.>>>> का हो अमा? मराठी मूव्हीज पाहायला आवडत नाहीत का तुम्हाला?
आपला मानुस चान्गला आहे अस
आपला मानुस चान्गला आहे अस व्हॉट्स अॅपच्या २-३ ग्रुप मेबरानी लिहल होत
आपला माणूस(मानूस का लिहिलंय
आपला माणूस(मानूस का लिहिलंय काय माहित! घाणेरडं वाटतं ते पहायला) चांगला आहे. थोडासा मेलोड्रामा कमी केला असता तर भारी झालं असतं. पण एकाच घटनेकडे किती वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येतं हे मस्त दाखवलंय.
नाना मधूनमधून नटसम्राटमध्ये बोलल्यासारखं बोलतो. जीभ जड करून आणि उगाच सूर लावत. ते खटकतं फार.
या आणि बेळेंच्या संहितेवर आधारित बदाम राणी, गुलाम चोर या चित्रपटांमध्ये चटपटीत संवाद हे सुंदर एलेमेंट दिसतं. ती किमया बेळेंचीच म्हणावी लागेल.
आपला मानूस पाहिला. अडीच
आपला मानूस पाहिला. अडीच तासातले जवळ जवळ सव्वा-दोन तास अब्बास-मस्तान चा सिनेमा बघतोय असं वाटावं इतके ट्विस्ट्स होते. त्या मानानं शेवट अगदीच पकाऊ वाटला. तरूण पिढीचा, आई-वडिलांशी तुटलेला संवाद आणी तरूण पिढीचा बेजवाबदारपणा, हा विषय अनादि-अनंत आहे. नाना पाटेकर भावखाऊ रोल मधे चांगला वाटतो, पण त्या शेवटच्या patronizing टोन मधे उपदेश करायला लागला की पकायला होतं. अजय देवगण चा सुभाष घई झालाय (स्वतःच्या सिनेमा मधे एका फ्रेम पुरतं चमकायचं). अर्थात मराठी सिनेमासाठी तो मोठा एक्स फॅक्टर वगैरे असावा.
Pages