चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा,

सुद्द तुपातले म्हणजे काय?
---
बाकी, स्वामी आणि आपने पराये ६० मध्ये शोभले असते. मठठ बंगाली मुलगी म्हणून शबाना शोभलीय. गाणी छान आहेत पण.

माझी लॉयल्टी तेलुगु व तमिळ सिनेमांपाशी आहे त्यामुळे मला कन्नड चित्रपट नाही आवड्त. कन्नड झिंगाट बरे आहे असे ऐकले होते. तीच एक थीम परत परत का बरे. सैराट जुना झाला. ते पुनर्जन्म पण पावले असतील एव्हाना. आय एम सो डन विथ इट. परवाच्या वीकेंडला मी नरम गरम थोडा बघितला. स्वरूप संपत. खेड्वळ गोड सौंदर्य. अमोल पालेकर. उत्पल दत्त. किरण वैराळे. बरा आहे १/३ अजून शिल्लक आहे बघायचा.

रात्रीला जेवायला कटाची आमटी व गरम भात होता. मग अंगूर सारखा जंक्षन पिक्चरच लावला. त्यामानाने नरम गरम एकदम फुळकवणी पिक्चर आहे. सुखी बाईची ओढणी ओढून पाहिला अंगूर भात आमटी ओरपत.

नाम शबाना पाहिला. पहिला हाफ आवडला. दुसरा हाफ हुकलेला वाटला. कथेचे डीटेलिन्ग करताना फार दुर्लक्श झालय. ढोबळ चुका आहेत.
तापसी ने मात्र अपेक्शेप्रमाणे जबाबदारी १००% निभावली आहे.

"अनेक पुरस्कार मिळालेला 'रंगा पतंगा' रविवारी स्टार प्रवाह वर पाहिला. फारच निराशा झाली." - मी रंगा पतंगा पहायचा प्रयत्न केला होता. ब्लॅक कॉमेडी वगैरे ठीक आहे, पण संथ चालला होता. मग बंद करून टाकला.

नरम गरम फार आवडतो चित्रपट. गंमतशीर आहे. त्यातला शत्रुघ्न सिन्हाचा सीताहरण च्या वेळचा सिन भयंकर आवडतो. चित्रपट कितीतरी वेळा बघितला तरी कंटाळा नाही येत . मध्ये मध्ये थोडा गंभीर केलाय तो करायची गरज नव्हती.
छोटीसी बात,किसीसे ना केहना, रंगबिरंगी, चष्मे बद्दुर, गोलमाल ,खुबसुरत ,नरमगरम, अंगुर ,हमारी बहु अलका ,दामाद इत्यादी चित्रपट भयंकर आवडतात.

ते झिंग झिंग झिंगाट गाणं कन्नडमधे फार बटबटीत वाटलं, रिंकूपण बटबटीत वाटली तिथे. त्या हिरोचे मला फक्त डोक्यावरचे वाढलेले केसंच दिसतात, तो काही दिसतंच नाही Lol

आपला परशा बेस्ट.

"अनेक पुरस्कार मिळालेला 'रंगा पतंगा' रविवारी स्टार प्रवाह वर पाहिला. फारच निराशा झाली." - मी रंगा पतंगा पहायचा प्रयत्न केला होता. ब्लॅक कॉमेडी वगैरे ठीक आहे, पण संथ चालला होता. >>> मी शेवटी तासभर येता जाता बघितला. राणा इन्स्पेक्टर होता त्यात.

छोटीसी बात,चष्मे बद्दुर, गोलमाल पालेकरांचा ,खुबसुरत ,नरमगरम इत्यादी चित्रपट मलाही भयंकर आवडतात.

अन्जु Happy ते बाकीचे लिहिलेले पण बघा. नक्की आवडतील.
चितचोर , रजनीगंधा विसरलेले. मस्ट आहेत ते तर लिस्ट मध्ये. बातो बातोमे , खट्टा मीठा सुद्धा अ‍ॅड करा.
कथा पण आवडतो. पण शेवटी शेवटी फारुक शेख विषयी कणव यायला लागते.

ती पदर डोक्यावर धरुन नाचणारी बाई पाहिलिस का? सगळे कसे बी ग्रेड दिसतात. >> राया अनुमोदन.

मला एकूणात अर्ची खुद्द स्क्रिन आणि बाहेरच्या वावरात सुद्धा बी ग्रेड आणि लाऊड वाटली.

रंगा-पतंगा फारच निराशाजनक होता. ना धड सटायर ना धड गंभीर. ग्रामीण-सामाजिक प्रश्नावर सिनेमा म्हणजे टाळीबाज, कोटेशनसारखे संवाद पाहिजे ही 'सामना'ने बनवलेली चौकट अजूनही चालूच आहे. तेंव्हा त्याचे नाविन्य तरी होते पण आतातरी सरळ माणसासारखे बोलणे वाटतील असे संवाद का नसावेत? शेवट तर कसेही करुन सुखांत करायचाच म्हणून केलाय.

मला एकूणात अर्ची खुद्द स्क्रिन आणि बाहेरच्या वावरात सुद्धा बी ग्रेड आणि लाऊड वाटली>>+१ सैराट कपल वन टाइम वंडर आहे. जास्त चालणार नाहित.

सैराट कपल वन टाइम वंडर आहे. जास्त चालणार नाहित.>>>मलाही आधी असच वाटल होत.मग कानावर आल की महेश मांजेरकर च्या प्रोजेक्ट मधे परश्या आहे लीड मधे.आनि वाटल व्वा.. आकाश ला मेनस्ट्रीम मधे यायचा चान्स मिळाला.आर्ची अजुन ही लहान च आहे,,मोठी दिसत असली तरी.तिला अजुन संधी मिळायला हव्या.काळ वेळ च ठरवेल किती वेळ चालतात हे वंडर कपल.बाकी अ‍ॅवॉर्ड शो मधे दोघांनी दिलेला परफॉर्मन्स मस्त होता.त्यांचा आत्मविश्वास चांगला वाटला. Happy

>>>बाकी अ‍ॅवॉर्ड शो मधे दोघांनी दिलेला परफॉर्मन्स मस्त होता.<<<

खूप मेहनत बाकी घेतात दोघं. पण बिचार्‍या दोघांना काय फालतु कपडे देतात. ... खास करून रिंकूला. इतके घाणेरडे कपडे आणि मेकाअप करत्तत लो बजेट्चा.. नवीन कलाकारांना काही चांगलं ट्रीट करत नाहीत वाटतं.

अक्षय कुमारला "रुस्तम" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

दंगल मधल्या झारा वसीम हिला सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

नेटफ्लिक्स वर आल्याने धोनी-द अन्टोल्ड स्टोरी बघितला, आणि चक्क आवडला, सुशान्तने घेतलेली मेहनत जाणवते, मुख्य म्हणजे एकदाही चित्र्पट कन्टाळवाणा होत नाही की ग्रिप सोडत नाही , दिशा पटनी खुप गोड दिसते , तिचा रोल छोटा असल्याने फार वाव नाही आहे तिला , दुसरी हिरॉइन पण छान घेतलिये आणि ती खुपच साक्षि टाइप दिसते, ५ वर्शापुर्विचा धोनीचा हेलीकॉप्टर शॉट बघताना आजही शहारे आले.

नाम शबाना बघितला. पूर्वाध मस्तच आहे. नंतर रटाळ होत जातो. तापसी खूप मस्त वाटते.>>> अगदी. फर्स्ट हाफ छान आहे. अक्षय कुमार ज्यादा वेटेज देऊन दुसरा भाग बोअर केलाय

गेल्याच्या गेल्या शनिवारी स्टार गोल्ड सिलेक्ट एचडी वर ‘वेटिंग’ पाहिला. नसिरुद्दीन शाह आणि कल्की कोचलिन.
वेगळा विषय, संवाद चांगले होते, शेवट प्रेक्षकांवर सोपवला होता. मुख्य म्हणजे सुखांत करण्याच्या फंदात कुणी पडलं नाही हे आवडलं.
दोघांची कामं छान आहेत. कल्की मला फारशी आवडत नाही, पण ती कॅमेरासमोर खूप सहजतेने वावरते हे कबूल करायलाच हवं.
यातला तिचा मेक-अप मात्र अजिबात नाही आवडला. डोळ्यांमध्ये किलो-किलोभर काजळ कोंबलेलं! कदाचित नवर्‍याच्या अपघाताने सैरभैर झालेली बायको दाखवण्यासाठी ते केलंय... आय मीन, तिचा जिंनामिदो लूक इथे चालला नसता.
गंभीर विषयाची गंभीर+हलकीफुलकी हाताळणी म्हणून आवर्जून पाहण्यासारखा.
दोघांचे आपापल्या जोडीदाराबरोबरचे फ्लॅशबॅकमधले सीन्स आधी त्रोटक आणि मग तेच सविस्तर दाखवलेले - ते मला खूप आवडलं.

ललि तु थोड्क्यात पण पाहिलेल्या सिनेमाबद्दल छानच लिहितेस, पाहण्याचा मोह होतो. तुझं परिक्षण वाचून च मी मसान पण पाहिला होता, वेटिंग चा ट्रेलर पण पाहिला होता पण आता नक्की पाहणार. Happy

>>ललि तु थोड्क्यात पण पाहिलेल्या सिनेमाबद्दल छानच लिहितेस, पाहण्याचा मोह होतो

येस्स.... एकदम क्रीस्प आणि कुतूहल जागवणारे असते परीक्षण/चित्रपटाची ओळख
आमच्यासारख्याना पानेच्या पाने लिहून जे जमणार नाही ते चक्क एखाद दोन पॅरात लिहलेले असते!

आज नाम शबाना पाहून आली...
अरिशय बेकार वाटला मला पिच्चर..
दिग्दर्शन वाईट .. संवाद खुपच पुळचट.. मनोज वाजपेयीला वाया घालवला आहे.. अ‍ॅक्शन सिक्वेन्स भंगार, एकही ठोसा किंवा बुक्की एकालाही लागेल तर शप्पथ ( स्पॉयलर : हाईट म्हणजे तिचा मित्र मरतो तेव्हा तिची आई हिच्या कानाखाली वाजवते तेव्हा तिचा हात अक्षरशः अधांतरी हवेत घुमलेला दिसतो..याक्क झालं बघुन) .. अक्कीचा फाईट सिक्वेन्स बरा आहे पण त्यातही सल्लूच ह्युमर का टाकलं असाव? नसत काही तरी जमलं असतं..
एडिटींग अतिशय घाण (पहिल्या टास्क ला जेव्हा तिला एका खबरीला वाचवायच असत त्यावेळेसचा गच्चीवरुन उडी मारायचा शॉट आणि असे अगणित शॉट) .. तापसीला अभिनयात काही चान्स नव्हता एवढा.. तिचे फाईट सिन्स खुप ओढुन्ताणून केल्यासारखे वाटले मलातरी..
डॅनी डेग्झोप्पाचं दर्शन सुखावह... अय्या मधल्या हिरोला अ‍ॅक्टींग अज्जिब्ब्बात जमलेली नाही .. सतत ते उगा कॅमेराकडे काय पाहायचं? आणि चिडल्यावर उगा चेहरा आणि चेहर्‍यावरचे मसल्स हलवायचे क्लासेस त्याने रितिक कडून घेतले असावे असे वाटतात..
अशक्य बोर झाला मला चित्रपट..
तापसीचा पुमि दाखवलेला पोरगा फार घाण अभिनय करतो.. तिची मॅचसुद्धा खुप मरगळलेली वाटली.. सुरुवातीला जो कोणी तिचा फोटो काढत होता तो मुद्दाम तिचे ब्लर आणि चेहरा पूर्ण येणार नाही असे फोटो काढत असल्यासारखा वाटला..
एक आणखी प्रश्न पडला तो म्हणजे असं कुणी ब्लँक कॉल करुन तुमच्याशी डील करत तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडून देशविरोधी काम्क्रुन घेणार नाही हे कशावरुन? असा प्रश्न एखाद्या सेन्सिबल पोरीला पडायला हवा कि नाही? कारण पुढं ती त्याला माझा धर्म आहे असा म्हणुन माझ नाव फायद्याच आहे असं बोलतेच ना...

तटी.. जेवढा थोडाफार अक्की उघडा दिसला आहे त्यात क्लिन शेव्ह नसलेली त्याची चेस्ट बघुन खिलाडी सिरीज चे दिवस आठवले Wink लगेच आता तू चीज बडी है मस्त मस्त म्हणून नाचतो कि काय असं वाटल.. Wink Happy

Pages