अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>त्या कुटुंबासाठी वाईट वाटलं.<<

खरंच डिस्टर्बिंग आहे. चांगला वकिल मिळुन तो मुल्गा निर्दोष सुटावा आणि खरे पर्पट्रेटर पकडले जावे, अशी आशा करुया...

हो! मलाही प्र्चन्ड डिस्ट्र्बिन्ग वाटल होत, खर काय आहे ते देवालाच माहित,

>>> चांगला वकिल मिळुन तो मुल्गा निर्दोष सुटावा आणि खरे पर्पट्रेटर पकडले जावे
+१

मला वाटतं, इतका वेळ तपास करुन शेवटी मुलावर खटला भरला ह्याचा अर्थं दे आर शुअर. आपल्याला अशक्य वाटलं तरी दोज गाईज आर राईट मोस्ट ऑफ द टाईम्स. इट्स रियली सॅड अ‍ॅण्ड अनफॉर्चुनेट.

मला पण वैद्यबुवांसारखच वाटलं की पोलिसांनी इतका वेळ घेतला म्हनजे दे रियली वाँटेड टु बी शुअर.
इन एनी केस खरच सॅड सिच्युएशन आहे.

Unorthodox is one way to put it. Crazy is another. It's going to be a long four years, folks >> Proud

काल संध्याकाळी (अमेरिकन वेळ) ट्रंपच्या आदेशावरुन सिरियन एयरबेसवर टामाहाक क्रुझ मिसल्स डागण्यात आले. सिरियन प्रेसिडेंट असादने आपल्याच लोकांवर केमिकल बाँब टाकल्यानंतर अमेरिकेने केलेला हा हल्ला असादच्या रेजीमला दिलेला स्ट्राँग मेसेज समजला जातोय. अपेक्षेप्रमाणे रशिया, इराण आणि सिरिया यांनी अमेरिकन मिलिटरी अ‍ॅक्शनचा निषेध केलेला आहे तर ऑस्ट्रेलिया, जपान, इस्रेल या देशांनी आपला पाठिंबा जाहिर केलेला आहे...

आज सी एन एन वर ख्रिस क्वोमो च्या शोवर ख्रिस ने विचारले की पूर्वी २०१३ मधे जेंव्हा असाच प्रकार आसादने केला तेंव्हा ट्रंप म्हणाला की सिरियात अमेरिकेने जायला नको, मग आता का गेला? तर त्याचे उत्तर असे की ट्रंप हा एक उत्तम क्वार्टरबॅक आहे, ऐन वेळी तो ठरवतो की काय करायचे, त्याची अशी पॉलिसी वगैरे नसते.
आता कोरा वर काही लोकांनी लिहीले आहे की हा हल्ला आसादनेच केला हे नक्की नाही कारण पूर्वीच आसादची ९७ टक्के बायॉलॉजिकल वेपन्स आंतरराष्ट्रिय समितीने नष्ट केली तेंव्हा हा हल्ला आसादच्या विरोधकांनीच केला असावा.
कुणि का केला असेना? मेले तर तिथलेच लोक मरतील. खरे खोटे काय याला महत्वच नाही अब की बार ट्रंप की सरकार मधे.

शिवाय आता लोक रशिया नि ट्रंप यांच्या संबधाच्या चौकशी बद्दल विसरून जातील. हेल्थ बिल फसले हे विसरून जातील. उलट ट्रंप किती शूर आहे, कसे चतकन निर्णय घेतो, त्याला ती निष्पाप मुले मरताना बघून त्याचे हृदय कसे भरून आले, किती दयाळू, हा ट्रंप, असे म्हणतील.
थोडक्यात, चांगले -वाईट, खरे-खोटे हे सगळे अजिबात महत्वाचे नाही. जेणेकरून ट्रंप की जय असे लोक म्हणतील ते करायचे.

रासायनिक अस्त्रांचा वापर गर्हणीय आहेच (मुळात कत्तलच गर्हणीय असते - पण यात मरणापूर्वी हाल होतात म्हणून.), पण बाकी मलाही नंद्या यांनी लिहिल्याप्रमाणेच ट्रम्प यात राजकीय फायदा बघतो आहे/बघेल असंच वाटलं होतं.

नन्द्या आणि स्वाती म्हणते तसेच मला वाटले .रशिया, बॅनन, फ्लिन, हेल्थ केअर बिल, असे झटके बसल्यावर काहीतरी "बिग " करून लक्ष हटवणे भाग होते. एखादा टुकार पोलिटिकल थ्रिलर पाहिल्यासारखे वाटत आहे.

>>थोडक्यात, चांगले -वाईट, खरे-खोटे हे सगळे अजिबात महत्वाचे नाही.<<

थोड्क्यात, येन केन प्रकारेण तुम्ही चांगल्या-वाईट गोष्टीत त्रुटी शोधत केजरीवालिझ्म जोपासणार... Wink

एक मात्र खरं लिहिलंत वर - बर्याच वर्षांनी अमेरिकेला एक चांगला क्वार्टरबॅक मिळालेला आहे; आणि चांगला क्वार्टरबॅक गेमप्लॅन आखतोच पण तो एक उत्तम क्लच प्ले हि एक्झिक्युट करतो...

कालच्या हल्ल्याने रशियन दुखावतील आणि रिटॅलिअ‍ॅट करु शकतील याची संभावना ट्रंप टिमला आली नसेल - असं तुम्हाला म्हणायचं आहे का?..

>>असे झटके बसल्यावर काहीतरी "बिग " करून लक्ष हटवणे भाग होते. <<

हो आता, ९/११ ज्या प्रमाणे धाकट्या बुशने घडवुन आणला तसाच हा ह्ल्ला ट्रंपने घडवुन आणला असं पुढे म्हटलं गेलं कि मी इथे हात टेकतो...

>>> कालच्या हल्ल्याने रशियन दुखावतील आणि रिटॅलिअ‍ॅट करु शकतील याची संभावना ट्रंप टिमला आली नसेल - असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

(संभावना म्हणजे शक्यता म्हणताय ना? मराठीत संभावना म्हणजे अपमान या अर्थी वापरतात माझ्या माहितीनुसार.)
गेल्या तीन महिन्यांत त्याच्या लक्षात आलेल्या आणि न आल्यामुळे त्याला भोवलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर... Proud

>>संभावना म्हणजे शक्यता म्हणताय ना?<<

मी दहावीत असेपर्यंत तरी तोच अर्थ होता...

आणि गेल्या ३ महिन्यातल्या भोवलेल्या गोष्टी? एक्झिक्युटिव ऑर्डर, हेल्थकेर बील वगैरे? दोन्ही बासनांत गेले आहेत का?

आता राज यांनी पुतिन ला शिक्षा देणे आवश्यक आहे लिहीले तर ते पनिशमेण्ट म्हणत आहेत की एज्युकेशन हे ही विचारून घ्यावे लागेल Happy

मला ओबामाने 'लाइन क्रॉस' करण्याबद्दल वॉर्न करून नंतर काहीच केले नव्हते हे आवडले नव्हते. तेव्हाचा अमेरिकन पब्लिक चा मूड अमेरिकेने यात पडू नये असाच होता हे अगदी खरे असले, आणि सिरीया/मिडल इस्ट मधली अत्यंत कॉम्प्लेक्स इक्वेशन्स (लेसर इव्हिल वगैरे) धरून सुद्धा असे वाटते की प्रेसिडेण्ड ने एकदा जर काही वॉर्निंग दिली तर त्याला काहीतरी अर्थ असायला हवा.

कालचा हल्ला हा चाचपणी प्रकारचा असेल असे सध्यातरी वाटत आहे. हे चूक, की ओबामाने युनो च्या मदतीने ते करायचा व चीन आणि रशिया मुळे असफल झालेला प्रयत्न चूक, हे "काळच ठरवेल" ("मला माहीत नाही" च्या ऐवजी हे भारदस्त वाटते Happy )

ही इराकची पुनरावृत्ती ठरणार असे वाटते. जर असादला हटवले तर त्याच्या जागी कोण हा प्रश्न आ वासून उभा रहाणार आहे. आणि सिरियन लोकांनी स्वीकारलेले उत्तर घातक असणार.

मी ट्रंपच्या ह्या धोरणाच्या पूर्ण विरोधात आहे.

वृत्तपत्रांनी फक्त बातमी दिली आहे, सिरिया वाले ब्लेम लावत आहेत अमेरिकेवर.

मूव तर स्तुत्य वाटत आहे फक्त रशियाशी एस्कलेशन झालं तर कसं होणार ह्याचा कितपत विचार ट्रंपनी केलाय काय माहित. त्यानी इतर प्रकरण दाबायला हे केलं असं म्हणायला वाव आहे पण सध्यातरी त्याला कॉन्स्पिरसी थियरी म्हणावं लागेल.

https://www.yahoo.com/news/five-simple-questions-donald-trumps-airstrike...
इथे तर स्पष्ट लिहिलय की ट्रंपचा तोच डाव असावा.

१. असाद हा इतका उन्मत्त आहे का की रासायनिक अस्त्रे वापरून तो शत्रूपक्षाच्या हातात आयते कोलित देईल? असादच्या नावाखाली कुठल्याशा अतिरेकी संघटनेने हे घडवून आणले असले तर?
२. अंतीम ध्येय काय आहे? असादला हाकलणे का नुसताच धाक दाखवणे? दोन चार महागडी क्षेपणास्त्रे डागून काय होणार? जर असाद उन्मत्त असेल तर तो पदच्युत झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. जर हे असादने केलेच नसेल तर ह्या शिक्षेमुळे काय निष्पन्न होणार?
३. जगभर (कधी नव्हे ते) ट्रंपची तारीफ होत आहे. त्यामुळे वहावत जाऊन ट्रंपने सैन्य सिरियात उतरवायचे ठरवले तर पुन्हा इराक होणार हे नक्की. जर असादला पदभ्रष्ट करायचे असेल तर पर्यायी नेता कोण असणार आहे?

असल्या प्रश्नांची उत्तरे माहित नसताना अशा प्रकारे आततायी कारवाई करणे घातक आहे. पुरेसे लोक ह्या प्रकाराला विरोध करतील अशी आशा करतो.

ऐकण्यात आलं कि ट्रंपला तीन ऑप्शन्स सुचवले गेले होते, त्याने लीस्ट डॅमेजींग ऑप्शन निवडला. आता त्या मागे फक्त डिवचण्याचा उद्देश होता कि स्टर्न वॉर्निंगचा हे लवकरच (रशिया/र्सिरियाच्या रिअ‍ॅक्शनवरुन) उजेडात येइल. काहि झालं तरी असादला सद्दामच्या भेटीला पाठवुन इराकसद्रुश परिस्थिती परत एकदा निर्माण होणार नाहि हा एंड गेमचा प्रमुख भाग असेल अशी आशा करुया...

कालच्या गदारोळात एक महत्वाची बातमी मात्र झाकोळली गेली. नील गोसच यांची सुप्रीम कोर्ट जस्टीस या पदावर झालेली नेमणुक; न्युक्लियर ऑप्शन इन्वोक करुन... Wink

ट्रम्प अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ने बरेच मूलभूत बदल केले आहेत टॅक्स कोड मधे.

Standard Deduction डबल केले आहे. Itemized deductions मधे होम मॉर्टगेज व चॅरिटी डोनेशन्स सोडले तर बाकी बरेचसे/सगळे ब्रेक्स रद्द केले आहेत.

कॉर्पोरेट टॅक्स बद्दल ही बरेच बदल दिसत आहे. ते डीटेल्स वाचले नाहीत अजून.

सामान्य माणसाच्या टॅक्सेस मधे बरेच बदल होतील असे दिसते. ब्रॅकेट्सही कमी केल्या आहेत.

काही बदल वरकरणी चांगले वाटतात. न्यूज चॅनेल्स व वेब साइट्स वरचया अजेंडा बेस्ड प्रतिक्रियांमधून नक्की काय आहे ते शोधावे लागेल Happy

इथल्या पब्लिक चे काय मत?

टॅक्स ब्रेक देणं/ टॅक्स ब्रॅकेट खाली आणणं निव्वळ फार्स आहे. आधीच १९.८ ट्रिलिअन डेट मध्ये असलेल्या ईकॉनॉमीवर अजून टॅक्स कमी करून करंट अकाऊंट डेफिसिटचा बोजा टाकयचा. मग तो भागवण्या साठी पुन्हा नव्याने डेट रेज करायची त्यात फॉरेन ईन्वेसटर्स ना अ‍ॅट्रॅक्ट करण्यासाठी जास्तं ईंट्रेस्ट मान्य करायचा किंवा खोर्‍याने सवलती द्यायच्या (ईपीए चे नियम शिथिल केलेच आहेत). ईंट्रेस्ट रेट रेज करून डेट वाढवून, पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार आणि तुम्ही आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जास्तीचे पैसे आणि पर्यायाने जास्तीचा टॅक्स भरणार. पुन्हा टॅक्स कमी भरावा लागल्याने कंझुमर कडून जे स्पेंडिग होणार त्याने वाढलेल्या किंमतीवर एकंदर जास्तंच टॅक्स भरला जाणार. पण लक्श्य्त कोण घेतो?

पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार >>

नाही.
लोकांचा पैसा मार्केट मध्ये आला की इन्फ्लेशन वाढत नाही, जर सरकारने पैसा आणला ( प्रिंटिंग मनी) तरच इन्फ्लेशन वाढतं.

पुन्हा टॅक्स कमी भरावा लागल्याने कंझुमर कडून जे स्पेंडिग होणार त्याने वाढलेल्या किंमतीवर एकंदर जास्तंच टॅक्स भरला जाणार. पण लक्श्य्त कोण घेतो >>
मग आत्ता तू टॅक्स भरत नाहीस का? भरतोसच की.

स्पेंडींग वाढवण्याच्या अनेक टेक्निक ओबामाने पण आणल्या होत्याच की. मग ट्रम्पने आणल्यातर आरडाओरडा का? Happy माझ्यामते सामान्य माणूस आणि श्रीमंत माणूस दोघांनाही फायदा होणार आहे.

कॉर्पोरेट टॅक्सेस कमी केल्यामुळे अनेक स्मॉल / बिग - बिझनेस परत एकदा हायरिंग करायाला सुरू करतील असा त्याचा होरा आहे.

लोकांचा पैसा मार्केट मध्ये आला की इन्फ्लेशन वाढत नाही, जर सरकारने पैसा आणला ( प्रिंटिंग मनी) तरच इन्फ्लेशन वाढतं. >> लोकांचा नाही रे, तो पैसा ते खर्च करून किंमती वाढवणारच (बुश ने २००८ मध्ये टॅक्स मनी परत दिलेला आठवतोय का, त्यानंतर काय झालं) , देशाचा करंट अकाऊंट डेफिसिट भरून काढायला आणि ट्रंप्ची डिफेन्स आणि ईंफ्राची खर्चिक फिस्कल पोलिसी रेटून न्यायला सरकारला पैसा नाही का ऊभा करावा लागणार. तिकडे फेड रेट वाढवतो म्हणतात ईकडे ट्रंप ची फिस्कल पॉलिसी ईक्स्पांडिग आहे ज्यासाठी त्याला वाढीव दराने डेट ऊभी करण्याशिवाय पर्याय्च नाही भाऊ, ते पब्लिक वरंच शेकणार आहे.
स्पेंडींग वाढवण्याच्या अनेक टेक्निक ओबामाने पण आणल्या होत्याच की. >> डेविल ईज ई द डीटेल.

नाही.>>>>> Lol एकदम ठणकावून नाही वगैरे.
लोकांचा पैसा मार्केट मध्ये आला की इन्फ्लेशन वाढत नाही, जर सरकारने पैसा आणला ( प्रिंटिंग मनी) तरच इन्फ्लेशन वाढतं.>>>>> अरे पण सरकार काय येडं म्हणून पैसे छापतं का? आणि हाबं च्या वाक्यात लोकांचा असा शब्द कुठे आहे?
"ईंट्रेस्ट रेट रेज करून डेट वाढवून, पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार" असं लिहिलय ना त्यानी?
बरोबर लिहिलय त्यानी. एकॉनॉमीला चालना मिळावी म्हणून आधी इंट्रेस्ट रेट कमी ठेवला. आता इकॉनॉमी सुधारायला लागली तशी इंट्रेस्ट रेट वाढवायला लागले आहेत. पण त्याच बरोबर डेट वाढत राहिलं तर त्याचा काय उपयोग आहे? एका साईडला मोठ्या बिझनेसेस ना आणि कन्सुमर्सना टॅक्स सवलती देऊन काय होतं? इतर ठिकाणी त्याचा बोजा वाढतो.

एक अनेकांना लागू होउ शकेल अशा विषयावरचा प्रश्नः होम मॉर्टगेज हे आयटेमाइज्ड डिडक्शन्स मधे धरले जाते ना? मग स्टॅ. डि. दुप्पट केल्याने अमेरिकेतील अनेक स्वस्त मार्केट्स मधल्या ($२००-$३००़के) घरांची मॉर्टगेजेस असतील त्यांना त्यातून मिळणार्‍या फायद्यापेक्षा स्टॅ. डि. नेच जास्त फायदा होईल ना? इथे घरांच्या किमतीपेक्षा दरमहा जे इण्टरेस्ट भरायला लागते त्याच्याशी जास्त थेट संबंध आहे हे माहीत आहे पण हा जस्ट अंदाज.

कॅलिफोर्निया सारख्या महाग मार्केट मधे इण्टरेस्ट खूप जास्त असते, त्यामुळे तेथे अजूनही मॉर्टगेज इण्टरेस्ट वापरून मिळणारे डिडक्शनच जास्त असेल, पण इतर सर्व ठिकाणी तसे होईलच असे नाही.

आणि हाबं च्या वाक्यात लोकांचा असा शब्द कुठे आहे? >>

हाबच्या वाक्यात इन्फ्लेशन हे वाक्य आहे. जे "अर्थ"साठी महत्त्वाचा आहे. मनी इन्फ्लो हा दोन मार्गांनी होतो हे त्याला माहिती असावे हे गृहितक आहे कारण तो इन्फ्लेशन हे वाक्य वापरत आहे. म्हणून ठणकावून नाही. टॅक्स ब्रेक दिल्यावर इन्फ्लेशन प्रचंड वाढत नसतं. म्हणून नाही.

बरोबर लिहिलय त्यानी. >> ओके ! ते तुझे मत आहे. जसे माझे मत बरोबर नाही असे तुला वाटते, तशीच त्या मतावरची तुझी काँमँट्री मला चुकीची वाटते. पण ओके.

दुप्पट केल्याने अमेरिकेतील अनेक स्वस्त मार्केट्स मधल्या ($२००-$३००़के) घरांची मॉर्टगेजेस असतील त्यांना त्यातून मिळणार्‍या फायद्यापेक्षा स्टॅ. डि. नेच जास्त फायदा होईल ना? इथे घरांच्या किमतीपेक्षा दरमहा जे इण्टरेस्ट भरायला लागते त्याच्याशी जास्त थेट संबंध आहे हे माहीत आहे पण हा जस्ट अंदाज. >>

अगदी महत्त्वाचा मुद्दा तू मांडत आहेस. लिहितो आहे.

टॅक्स ब्रेक दिल्यावर इन्फ्लेशन प्रचंड वाढत नसतं. >>>> टॅक्स ब्रेक दिला म्हणून इन्फ्लेशन वाढलं असंही त्याच्या वाक्यातून अर्थ निघत नाही. नीट वाचल्यास. डेट आणि टॅक्स ब्रेक दोन्हींचा उल्लेख आहे. एनिवे. ठणकावून नाही आल्यावर मला वाटलं त्याच्या मागे काहीतरी ठोस माहिती असेल पण लूक्स लाईक ईट वॉज ओन्ली मिसइंटरप्रिटेशन.

Pages