अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फ्लिन चांगला माणूस आहे, मिडियाने, फेक मिडियाने त्याला फार वाईट वागवले असे खुद्द ट्रंपच आज म्हणाला इस्राईलच्या प्रधानमंत्र्याच्या बरोबर झालेल्या न्यूज कॉन्फरन्स मधे. याहून जास्त काय सांगणार ट्रंपचे सपोर्टर्स? अर्थात सांगतीलहि - विनोदी आहेत लोक.
काहीतरी चुकीचे केलेच फ्लिनने , नि त्याला माहित आहे - चक्क उप राष्ट्राध्यक्षाला खोटे सांगितले! आणि म्हणजे तो सँक्शन्स बद्दल बोललाच असणार रशियान अ‍ॅम्बॅसडरशी - खोटे असते तर तो काय असा शेपूट घालून माघार घेऊन बसणार होता का? - जनरल आहे तो! कुणि फद्या राजकारणी नव्हे.

ट्रंपच्या भाषेत very हा एक पूर्ण शब्द नसून veryvery असा शब्द आहे. घाबरू नका, ट्रंपला जास्त शब्द माहितच नाहीयेत, तेंव्हा जास्त शिकावे लागणार नाहीत. जे लोक त्याला नावे ठेवतात ते सगळे ओवर रेटेड असतात. त्याने किती लोकांना नि कशाकशाला ओवर रेटेड म्हंटले आहे ते गूगल करून सापडेल.

>>ट्रंपजींचा उल्लेख शक्यतो एकेरी नको.>> Lol तुम्ही म्हणा हो त्याला ट्रंपजी वगैरे. इकडे त्याला तसं कुणी म्हणणार नाही. तोंडावर म्हणतील मि. प्रेसिंडंट वगैरे. ते असो.

हे जी नि जोडे डोक्यावर घेणे असले भारतात चालते इथे नाही.
प्रेसिडेंट आहे म्हणून त्याच्या सरकारी कामा च्या बाबतीत प्रेसिडेंट म्हणू, एरवी माणूस म्हणून यत्किंचितहि आदर नाही, त्याच्या जवळचे लोक जसे कॉन्वे, काय वाट्टेल ते खोटे बोलतात. कसा आदर वाटेल?

एरवी माणूस म्हणून यत्किंचितहि आदर नाही, >>> बहुमताचा आदर वगैरे असतो कि नाही ? तुम्ही दाखवा बरे निवडून येऊन !

>>आणि म्हणजे तो सँक्शन्स बद्दल बोललाच असणार रशियान अ‍ॅम्बॅसडरशी - खोटे असते तर तो काय असा शेपूट घालून माघार घेऊन बसणार होता का? <<

अनआॅथरायज्ड का असेना, इंटेलकडे त्या संभाषणाचं रेकाॅर्डिंग आहे - त्यावरुन सॅंक्शन्स डिस्कस केले गेले का, हे समजु शकेल.

ॲज फार ॲज आय नो, फ्लिन डिस्कसिंग सॅंक्शन्स विथ रशियन ॲंबॅसेडर इज नाॅट ए क्राईम बट डेफिनेटली इनॲप्राॅप्रिएट सिंस ओबामा वाज स्टिल इन आॅफिस. हि मिस्लेड व्हिपी ॲंड गाट फायर्ड फाॅर व्हायोलेटिंग ट्रस्ट. एन्ड आॅफ स्टोरी!

आता ते रेकाॅर्डिंग का केलं गेलं हा चर्चेचा दुसरा विषय आहे. ट्रंप (ॲडमिनीस्ट्रेशन) आणि इंटेलमधला फ्युड जुना आहे. स्कोर सेटल करण्याकरता जर इंटेलमधला कोणी वाॅरंटशिवाय फोन टॅप/संभाषण रेकाॅर्ड करत असेल, गोपनीय बातम्या लीक करत असेल तर ती चिंतेची बाब आहे...

राज, ट्रंप कॅम्पेन अनेक दिवस रशियन इंटेलशी संपर्कात होती याबातामीवर (ती बातमी कशी लीक झाली ते जाउद्या) तुमचं काय मत आहे?

>>तुमचं काय मत आहे?<<

माझं तेच मत आहे जे सर्वसामान्य नागरीकांचं आहे. खात्रीलायक पुरावा मिळाला तर जरुर ट्रंपला इंपीच करा, नो एक्सेप्शन्स...

ओबामाने मायक्रोवेव्ह कॅमेरामध्ये बदलला ते वाचलं का नाही.
सुपरहिरो रायटरना अचानक (डंब) स्पर्धा निर्माण झाल्येय.

त्या स्पायसरला असं स्टोअर मध्ये अँबुश नव्हतं करायला पाहिजे त्या बाईंनी पण अनगार्डेड मोमेंट्स मध्ये बरोबर आतल्या खर्‍या विचारसरणीनुसार माणूस रियॅक्ट करतो. Such a great country that allows you to be here. बॅनन, ट्रंप कडून सुद्धा अगदी सहजपणे असे उद्गार निघून जातात. थोडक्यात तुम्हाला आम्ही इथे येऊ दिलं आणि तुम्ही आमच्याशी आवाज करता (ही तुमची हिंमत?!) असा काहीसा आविर्भाव असतो.
त्या बाई बहुतेक यु एस बॉर्न आहेत, नसल्या तरी सिटिझन नक्की आहेत. काही विचार न करता आधी रियॅक्शन काय आली तर स्कीन कलर बघून, कंट्री अलाऊज यु टु बि हियर. थोडक्यात विसरु नका, "आम्ही" तुम्हाला अलाऊ केलं म्हणून तुम्ही इथे आहात.

+१ बुवा. आत्ता हेच लिहायला आलेलो.
त्या बाईनी नंतर ट्विटर वर लिहिलंय. गो बॅक व्हेअर? न्यूयोर्क?
लायटर नोट : नवख्या माणसाला तुम्ही कुठले? हा प्रश्न (अगदी हाच नाही, पण याचं थोडंफार पीसी वर्जन, याच शहरात रेज झालास का? इ. टाईप) विचारणे कितपत सभ्य मानतात अमेरिकेत?

I think she is not helping the cause by doing this. क्लिप मधे क्लिअरली कळते की कोणीही माणूस चिडेल असे अ‍ॅम्बुश करून असे प्रश्न विचारले तर. आर यू अ क्रिमिनल? सिरीयसली? अ‍ॅपल स्टोअर मधे?

व्हाइट रेसिजम चालू आहे त्याची उलटी आवृत्त्ती आहे ही.

मला हे असे लोकांना खिंडीत पकडून "बघा कसे रेसिस्ट आहेत" करणे अजिबात आवडत नाही. अमेरिकेत असे असंख्य लोक अजून आहेत की जे ब्राउन लोक दिसले की हे इतक्यातच तिसर्‍या जगातून इथे आलेले आहेत असे समजतात. हा बेसिक अंडरस्टॅण्डिंग चा ही प्रॉब्लेम आहे. मात्र असा विचार करणारे सगळे रेसिस्ट असतात असे नाही. डम्ब? यस. रेसिस्ट? नॉट शुअर.

ती हेल्प तर करत नाहीचे फा. नो डाउट. पण स्पायसर डंब? त्याला बेसिक अंडरस्टँडिंग नाही? आजिबात पटण्यासारखं नाही. तुम्हाला खिंडीत पकडलं म्हणून तुम्ही काहीही बोलू शकता किंवा तुम्ही जे काही बोललात त्याचा अर्थं बदलतो असं थोडीच आहे? त्या बाईंनी अर्थातच चूक केली आणि मी तर म्हणतो स्पायसरनी न चिडता हँडल केलं ते प्रकरण, पण उत्तरादाखल तोंडातून काय आलं आणि what does that tell you about his and this administration's line of thinking हा मुद्दा आहे. ह्या लोकांना एकंदरितच व्हाईट अमेरिकन सोडून इतर लोकांविषयी एंपथी कमी आहे आणि म्हणूनच असे उद्गार निघतात.

नानाकळा, काय वेगळं बोलत होतो असं तुम्हाला वाटतय ते सांगा मग सांगतो.

ह्या लोकांना एकंदरितच व्हाईट अमेरिकन सोडून इतर लोकांविषयी एंपथी कमी आहे आणि म्हणूनच असे उद्गार निघतात. >>> मान्य आहे. पण अशा अ‍ॅम्बुश मधून काय साध्य केले तिने? लिबरल बेस चा जो ठाम समज आहे तो आणखी पक्का झाला. ट्रम्प वोटर्स ना आधी त्यांच्या क्लिप्स मधून ते वाक्य न दिसता व्हाइट हाउस प्रेस सेक्रेटरीला एक "भारतीय" बाई स्टोअर मधे अ‍ॅम्बुश करून तो क्रिमिनल आहेस का असे विचारत आहे इतकेच दिसते. एखाद्याला पूर्ण क्लिप दिसलीच, तर त्यांचाही बेसिक समज स्पाइसर सारखाच असल्याने त्यांना ते खटकत नाही. तो समज एक्स्पोज करायचा उद्देश असेल तर असे स्वघोषित लिबरल उत्साही प्रतिनिधी खर्‍या लिबरल लोकांची इमेज आणखी डॅमेज करत आहेत.

दुसरा एक भाग म्हणजे तिने हेट क्राइम बद्दल विचारले असते तर बरोबर होते. एक नागरिक म्हणून सरकारला विचारायचा तिला हक्क आहे.

पण प्रश्न होता रशियाबद्दल. सरकारचा अधिकृत प्रवक्ता आहे तो, कोणाला कितीही आवडत नसला तरी. त्याला भर पब्लिक मधे तू क्रिमिनल आहेस का से विचारणे हा आचरटपणा आहे. त्या माईक पेन्स ला त्या शो च्या वेळेस असेच केले होते.

फा, अँबुश ची पद्धत चुकीची आहेच.
पुढे "ट्रम्प वोटर्स ना आधी त्यांच्या क्लिप्स मधून ते वाक्य न दिसता व्हाइट हाउस प्रेस सेक्रेटरीला एक "भारतीय" बाई स्टोअर मधे अ‍ॅम्बुश करून तो क्रिमिनल आहेस का असे विचारत आहे इतकेच दिसते.">>>>>>> इथेच मेन प्रॉबलेम आहे फा. काय प्रश्न विचारत आहे त्यापेक्षा कोण विचारतय हे बघून ट्रंप, त्याचं अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन अन त्याचे वोटर उत्तर देतात किंवा मनात एक ग्रह निर्माण करतात. इथे बळच लिबरल लोकांची बाजू घ्यायची म्हणून नाही तर लॉजिकल मुद्दा ह्या अँगलनी विचार करता बेसिक मध्ये लोचा आहे असं नाही वाटत का? ह्या असल्या थिंकिंग करताच तर ट्रंप आणि बॅनन नोटोरियसली फेमस आहेत जी टोटली चुकीची आहे.
त्यांना स्किनच्या रंगा पुढचं काही दिसत नाही. बाई दिसली की हुमन बिंग दिसायच्या आधी बाई दिसते आणि मग आपोआप बायस्ड मतं बाहेर पडतात कारण मनातला बायस हा गेलेला नाहीचे अजून. इन फॅक्ट दे आर ट्रायिंग टु जस्टिफाय इट बाय मेकिंग पॉलिसी चेंजेस दॅट से "सो व्हॉट?"

तो समज एक्स्पोज करायचा उद्देश असेल तर असे स्वघोषित लिबरल उत्साही प्रतिनिधी खर्‍या लिबरल लोकांची इमेज आणखी डॅमेज करत आहेत. >>
त्याला भर पब्लिक मधे तू क्रिमिनल आहेस का से विचारणे हा आचरटपणा आहे. >>
दोन्हीं वाक्यांबद्द्ल मला आजिबात असे नाही वाटत. तू ज्याला ऊत्साह म्हणतो तो तिचा देशाबद्दलचा आणि तिच्या फॅमिलीबद्दलचा अगदी जेन्युईन कन्सर्न असू शकेल.

ह्याच प्रसंगात जर ईंडियन ओरिजिन बाईच्या ऐवजी व्हाईट बाई किंवा ब्लॅक वेटेरन ची आई असती तर तुला तिचे प्रश्नं ग्राह्यं वाटले अस्ते का?

होय बुवा. कोणीही विचारले तरी माझे मत तेच होईल. हे थोडे न्युआन्स्ड आहे:

देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल एक नागरिक (इथे राहणारे या अर्थाने. अगदी सिटीझन असे नव्हे) म्हणून स्वतःचा कन्सर्न आहे तो सांगणे, त्याबद्दल सरकार काय करणार आहे ते विचारणे - हे अगदी योग्य आहे. तो हक्कच आहे. हेट क्राइम्स बद्दल, रेसिझम बद्दल जर ती काही त्याला म्हंटली असती तर काहीच चुकीचे नाही.

जी चौकशी अगदी नुकती सुरूच होत आहे, ज्याबद्दल खात्रीशीर काहीच माहीत नाही अशा चौकशीच्या संदर्भात अगदी सामान्य नागरिकाला सुद्धा "तू क्रिमिनल आहेस का" विचारणे - याला मी आचरटपणा म्हणतोय.

या सर्वाचा उद्देश आपला मेसेज दुसर्‍या गटातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा असायला हवा. त्याबाबतीत असल्या अतिउत्साही लोकांचे प्रकार उलट त्या लोकांना जास्त एलियनेट करतील अशी भीती आहे.

racist outburst असतो, तसा हा liberal outburst वाटला मला.

“He doesn't really think that President Obama went up and tapped his phone personally,” Spicer told reporters at the afternoon press briefing. >> हायला!! ओबामा स्वतः ट्रंप टॉवरच्या फायर एक्झिटमधून चढून वायर टॅप करतोय, असं ट्रंपला वाटतंय. (असं आम्हाला वाटतंय) असं ट्रंप ला वाटत होतं का?

फा, मी आणि हाब दुसर्‍या लाईनवर आहोत आणि तुझी लाईन वेगळी आहे. आधी आपण एका लाईनवर यायला पाहिजे. लोकांचा आउटबर्स्ट कशावर आहे? स्पायसरनी दिलेल्या उत्तरावर. बर्‍याच आर्टिकल मध्ये त्या बाईंनी सुद्धा त्या स्वतः रूड बोलल्याचे मान्य केलय आलेलं आहे.
थोडक्यात तिचे प्रश्न बरोबर जरी असले (किंवा चुकीचे जरी असले) तरी विचारयची पद्धत टोटली चुकलेली होती हे मी वर दोन वेळा मान्य केलय आणि माझ्या मते इतर लोकांना पण ते मान्य आहे.
आता प्रश्न उरतो, ह्या बाईंनी उद्धटपणा, आचरटपणा केल्यावर स्पायसर्नी काय उत्तर दिलं? त्या उत्तरात त्याला जे अभिप्रेत होतं तो विचार बघून लोकं आउटरेज्ड आहेत. आर वि ऑन द सेम पेज नाऊ?
आता विचार करुन बघ.

racist outburst असतो, तसा हा liberal outburst वाटला मला. +१

या सर्वाचा उद्देश आपला मेसेज दुसर्‍या गटातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा असायला हवा. त्याबाबतीत असल्या अतिउत्साही लोकांचे प्रकार उलट त्या लोकांना जास्त एलियनेट करतील अशी भीती आहे. +१

आणखी काही उदाहरणे :
१ ट्रम्प च्या शपथ विधी वरून परत जाणार्‍या एका चाहत्यावर एक वृद्ध हिलरी समर्थक महिला डाफरली. शेवटी तिला विमानातून बाहेर काढले गेले.
२ निवडणूकीपूर्वी अरिझोनात ट्रम्प ची सभा होती तर त्या सभेला जाणारा एकमेव रस्ता ट्रक मधे ठेवून अडविला गेला. भर उन्हात लोकांचे प्रचंड हाल झाले. कुतुहलाने आलेले अनेक जण ट्रम्प ला मत द्यायचेच अशा निशचयाने परतले.
३ तो कोण मायलो बर्कले मध्ये जेमतेम तीनशे लोकांसमोर भाषण करून परत गेला असता.

लिबरल आउटबर्स्ट किंवा बायस्ड रिपोर्टिंगचं एक नवीन उदाहरण प्रीत भरारा आणि इतर अटॉर्नीजचं फायरिंग म्हणता येइल. अ‍ॅड्मीन चेंज झालं की हे नेहमीच होतं पण ते वेगळ्या लाईट मध्ये दाखवलं जात आहे. ते समजू शकतो.
इथे परत मी तेच म्हणेन. त्या बाईंची वागणूक टोटली चुकली असली तरी स्पायसरचा रिस्पॉन्स अत्यंत बायस्ड आणि नॉन व्हाईट लोकांविषयीची मनातली खरी भावना दर्शवतो.

त्या बाईंची वागणूक टोटली चुकली असली तरी स्पायसरचा रिस्पॉन्स अत्यंत बायस्ड आणि नॉन व्हाईट लोकांविषयीची मनातली खरी भावना दर्शवतो. >> बुवा याबद्दल काहीच वाद नाही. (बाय द वे मी लिबरल लोकांचा आउटबर्स्ट म्हणत नव्हतो, त्या बाईचा आउटबर्स्ट म्हणत होतो)

पण यातून काय साध्य झाले? त्या लोकांचा समज तसा आहे हे लिबरल लोकांना माहीतच आहे. किंबहुना त्यांनी तसे ते आधीच गृहीत धरले आहे/होते. दुसर्‍या बाजूचे जे लोक आहेत त्यांना यातून फक्त हे दिसले की एक रॅण्डम व्यक्ती (त्यांच्या नजरेत रॅण्डम इण्डियन व्यक्ती) व्हाइट हाउस च्या प्रेस सेक्रेटरीला पब्लिक मधे "तू क्रिमिनल आहेस का" विचारत आहे.

हाब - जी चौकशी जस्ट चालू होत आहे त्या चौकशी बद्दल ज्यात तो स्वतः सामील असल्याची कोणतीही चिन्हे नाहीत (स्पायसर स्वतः) ,त्याला तू क्रिमिनल आहेस का विचारणे यात कोणताही जेन्युइन कन्सर्न कसा काय व्यक्त होतो?

पण यातून काय साध्य झाले?>>>> साध्य काहीच नाही फा. इथे परत तोच मुद्दा आहे. त्या बाईंच्या अ‍ॅक्शन नी काहीच साध्य नाही झाले आणि तू म्हणतो आहेस तसा उलट ट्रंप सपोर्टरांना खाद्यच मिळालं. पण अनावधानाने का होईना त्याच्या तोंडून जे काही निघून गेलं ते बरच काही सांगतं हा मुद्दा आहे.
(बाय द वे मी लिबरल लोकांचा आउटबर्स्ट म्हणत नव्हतो, त्या बाईचा आउटबर्स्ट म्हणत होतो)>>>>>> आलं लक्षात आत्ता.
काही महिन्यांपुर्वी असच इवान्का ट्रंपला पण एका माणसानी प्लेन मध्ये बडबड करुन हरॅस केलं होतं. तोही टोटल मुर्खपणा होता.

पण अनावधानाने का होईना त्याच्या तोंडून जे काही निघून गेलं ते बरच काही सांगतं हा मुद्दा आहे. >> हो आणि त्याबाबतीत मीही सहमत आहेच.

सपना,
अहो हे बघा लोक स्पायसरजी ऐवजी नुसते स्पायसर म्हणतात!! त्यांना पण कडक समज द्या.
त्यांना नेमले आहे का ट्रंपने? नाही. मग त्यांनी श्रीमान् स्पायसरजी महाराज यांना आदर दा़खवायलाच पाहिजे, नाही का?

ज्या अर्थी त्या बाईने काय नि कसे विचारले त्याबद्दल बर्‍याच लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्या अर्थी आता स्पायसर ला ( सॉरी, श्रीमान् स्पायसरजी महाराज यांना) एकजात सर्व गुन्हे माफ असेच नाही का?

आजकालच्या जमान्यात खरे काय याच्यापेक्षा राष्ट्राध्यक्षांना काय वाटते ते खरे, बाकी सगळे फेक न्यूज.
आम्ही फक्त ट्रंप, केली अ‍ॅन, स्पायसर काय बोलतात त्यावरून काय ते समजतो. ते फेक असावे.
(वरील सर्व विशेषनामांपुढे "जी" लावून घ्या. विशेषनाम म्हणजे मराठीत proper noun, जसे ट्रंप ऐवजी ट्रंपजी समजून घ्या!)

नंदूशेट, शेंडेन्क्शत्रांचं माहित नाहि पण मी आता असल्या बाबतीत फोड/उकल करुन न द्यायचं ठरवलेलं आहे. Proud

आज ट्रंपला व्हाईट हाऊस मधे येऊन जवळ-जवळ ५० दिवस झाले तरी काहि लोक त्या धक्क्यातुन सावरलेले नाहित. त्यांच्या फ्रस्ट्रेशनचा उद्रेक अर्थाचा अनर्थ (ब्लोइंङ थिंग्ज आउट ऑफ प्रपोर्शन) करण्यात होत आहे. ऊदाहरणार्थ :
#१ ट्रंप म्हणाला, "सात देशांवर बंदि घाला" - हि लोकं समजतात मुसल्मानांवर बंदि घातली.
#२ केलिअ‍ॅन म्हणाली, "ओबामा अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन कुड हॅव स्पाय्ड ऑन डानल्ड ट्रंप थ्रु मायक्रोवेव" (तिच्या म्हणण्याचा मतितार्थ एनी अ‍ॅप्लायंस कुड बी युज्ड फॉर सर्वेलंस) - हि लोकं समजतात मायक्रोवेव अवन मधे कॅमेरे.
#३ स्पायसर म्हणाला, "इट्स सच ए ग्रेट कंट्री दॅट अलाव्ज यु टु बी हियर" - हि लोकं (आणि चॉहान बाई) आरोळ्या ठोकतात हाइट ऑफ जिंगोइज्म, व्हाइट सुप्रिमसी इ. इ....

तर या परिस्थितीत मी माझ्या आवडिचं बेवरेज पित मस्तं मजा बघायचं ठरवेलेलं आहे... :काळा रेबॅन वेफेरर लावलेला डुड:

Pages