Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15
ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओबामा वायर टॅपींग सारखेच
ओबामा वायर टॅपींग सारखेच प्रकरण दिसतेय हे ही
साधुसुधे घरगुती वायरटॅपिंन्ग
साधुसुधे घरगुती वायरटॅपिंन्ग नव्हे. ब्रिटिश इण्टेलिजन्स वापरून केलेले
साधुसुधे घरगुती वायरटॅपिंन्ग
साधुसुधे घरगुती वायरटॅपिंन्ग नव्हे. ब्रिटिश इण्टेलिजन्स वापरून केलेले >> मला खात्रीशीर रित्या असं वाटतं की ट्रंप जे ब्रिटिश ईंटेलिजन्स म्हणतो आहे ते म्हणजे फॉक्स न्यूजची ची ब्रिटिश सबसिडिअरी स्काय न्यूज असावी
कॉनवे सगळीकडे "I already said it on several news channel and I will repeat myself" म्हणत प्रत्येक न्यूज चॅनलवर सेम प्रश्नाला वेगळेच रिपिट करत असते. आणि "As mentioned in several articles (implied - Fox and BreitBart only) हे काय नवीन आहे कळत नाही .... FBI, CIA, Gov. Agencies, Research Stats देण्याऐवजी स्पायसर, कॉनवे वगैरे लोक फॉक्स आणि ब्राईटबार्ट मधले दाखले पब्लिक च्या तोंडावर फेकत असतात. मला तरी असं वाटतं आहे की सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज नी एकंदर असहकार पुकारला आहे ट्रंप अॅडमिनिस्ट्रेशन विरूद्धं किंवा ओबामा अॅड्मिनचे चांगले आणि खरे आकडे जे पुढे जावून वाईट होणार आहेत ते लोकांसमोर येवू द्याय्चे नाहीत असेच ठरवले आहे.
एकंदर Exec Branch स्वतःशीच
एकंदर Exec Branch स्वतःशीच झगडते आहे. Drain the swamp ?
या सगळ्याने माझं कामाच्या
या सगळ्याने माझं कामाच्या ठिकाणी लक्ष कमी झालंय. आणि न्यूज जंकी झालोय मी. Sad अरे!!! युरेका !!! हाच प्लान असणार. लिबरल नॉट बिलोन्गिंग टू कंट्री लोकांना असल्या बातम्या वाचायला लावून त्यांना कामावरून काढून टाकायचं. आणि अमेरिकन लोकं आणायचे.

असे नका करू, एव्हढ्या गंभीरपणे तिकडे बघू नका. तुम्ही आपले स्वतःची कामे चालू ठेवा. हे असले तिकडे सारखेच चालू असते.
आपल्यावर काही परिणाम होत नाही. होणार असला तरी काळजी करण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. मग काळजी कशाला?
नि बातम्या ऐकण्या ऐवजी सॅटरडे नाईट लाईव्ह, जॉन ऑलिव्हर, सॅमन्था बी असले शो बघा. चांगली कल्पना येते काय चालू आहे. नि करमणूकहि होते.
खरे, खोटे हे तुम्हाला टीव्ही बघून, वर्तमानपत्रे इ. वाचून नक्की कळणार नाहीच. कारण कुणिहि पूर्ण बातमी न देता, फक्त स्वतःला काय हवे ते सांगतात. आपणहि आपल्याला काय वाटते ते लिहावे. आजकाल खरे खोटे हे भेदभाव फार अनिश्चित झाले आहेत. What with facts and alternate facts!
जीओपी हेल्थ्केअर बील पास न
जीओपी हेल्थ्केअर बील पास न होण्याची शक्यता वाढल्याने फ्लोअरवर आपटण्याआधीच ट्रंपने पुल केले. यावरुन एक गोष्ट मात्र अधोरेखीत झाली आणि ती म्हणजे काँग्रेसमध्ये बहुमत असुनहि ट्रंपला रान मोकळं मिळालेलं नाहि. ट्रंप विरोधक, आणि आता फॅसिस्ट रेजीम येणार या भितीने घाबरुन गेलेल्यांना या घटनेमुळे दिलासा मिळेल अशी आशा करुया...
राज त्या घटनेतून फक्त
राज त्या घटनेतून फक्त एव्हढेच अधोरेखित होतेय कि शेवटी महोदयांना आपण कुठल्या बिलाला सपोर्ट करत होतो हे वाचायला वेळ मिळाला
नाहितर रायन ने एकदम मस्त उल्लू बनवलेले होते. व्हाईट हाऊस म्हणतेय कि गेले २ आठवडे बिलावर काम केले म्हणे. २ आठवडे लागले कि हे बिल पास होणार नाही हे लक्षात यायला कि कँपेनमधे नि नंतर ट्वीटरप्वर दिलेल्या आश्वसनांना सफेदी फासणारे हे बिल आहे हे कळायला हे देवच जाणे.
नवं बिल पास नाही करता आलं तर
नवं बिल पास नाही करता आलं तर ओबमाकेअर रीपील तरी करेल अशी मला आशा होती. छ्या! पहिल्या दिवशी रिपील नाही, ६१ व्या दिवशी पण रिपील नाही, ७ वर्षे कष्ट करुन बनवलेलं बिल पण पास होऊ शकलं नाही.
कमित कमी डेम्सची मेजॉरिटी तरी हवी होती काँग्रेसमध्ये. म्हणजे डेम्समुळे बिल पास होऊ शकलं नाही, ही न्युज फेक न्युज तरी नसती झाली. आता ओबामाकेअर ब्लोट व्हायची वाट बघत हरी हरी करणे आले.
आता बजेट आणि इन्फ्रा स्पेंडिंग .... अरे आणि भिंत राहिलीच. कुठुन पैसे आणणार आणि कुठुन सपोर्ट आणणार हे डील मेकर !
असामी, यु डिडंट गेट माय पॉइंट
असामी, यु डिडंट गेट माय पॉइंट. मेसेज हा आहे कि पोटस आपली मनमानी करु शकत नाहि. त्याची पार्टी दोन्हि हाउसेस मध्ये बहुमतात असुनहि त्याने आणलेलं बिल आपटु शकते.
बाकि, ओबामाकेरचं मरण आज ना उध्या ठरलेलं आहेच; अन्लेस त्याच्यात ड्रॅस्टिक सुधारणा केल्या नाहित तर...
मेसेज हा आहे कि पोटस आपली
मेसेज हा आहे कि पोटस आपली मनमानी करु शकत नाहि. >> राज, हे नव्या पोटस ला समजलं असं म्हणताय का?
पण ते बिल रायनचं नव्हे का? ते
पण ते बिल रायनचं नव्हे का? ते पास न होण्याचे अपयश ट्रंप च्या माथी का मारता बुवा?
गो आस्क फॉक्स सारखं गो आस्क रायन म्हंटलं की झालं. मिडिया ऊगीच प्रेसिडेंट ला एम्बॅरेसमेंट झाली म्हणून फेक न्यूज देत आहेत.
सामी, यु डिडंट गेट माय पॉइंट.
सामी, यु डिडंट गेट माय पॉइंट. मेसेज हा आहे कि पोटस आपली मनमानी करु शकत नाहि. त्याची पार्टी दोन्हि हाउसेस मध्ये बहुमतात असुनहि त्याने आणलेलं बिल आपटु शकते. >> maybe I missed something. Bill flopped because there was opposition within GOP. Are you sure that will happen for all bills ? How about budget that cuts from EPA ? How about one that is defuncing planned parenthood ? जोवर सोयीस्कर आहेत तोवर विरोध करतील फक्त.
ओबामाकेरचं मरण आज ना उध्या ठरलेलं आहेच; >> मरूदे ना त्याच्या मरणाने ? ७ वर्षे नि आजचा धरून ६-५० प्रयत्न झालेत (http://www.washingtonexaminer.com/no-house-republicans-havent-voted-50-t...).
>>राज, हे नव्या पोटस ला समजलं
>>राज, हे नव्या पोटस ला समजलं असं म्हणताय का?<<
नाहि, त्याला कल्पना असावी. हे बाकिच्या क्राय फाउल करणार्यांसाठी...
त्याला कल्पना असावी. >>
त्याला कल्पना असावी. >>
>>Are you sure that will
>>Are you sure that will happen for all bills ?<<
अॅब्सोल्युटली! काँग्रेसमेन, रीगार्डलेस ऑफ देअर पार्टीलाइन आर फ्री टु सपोर्ट व्हॉट दे थिंक इज राइट, अँड दे डोंट वोट टु प्लीज पोटस...
राज, मानलं तुम्हाला
राज, मानलं तुम्हाला
ट्रम्प ला तिन्ही बाजूंनी
ट्रम्प ला तिन्ही बाजूंनी पेचात पकडला आहे. ट्रॅव्हल बॅन ज्युडिशियल ब्रान्च ने अडकवला, ट्रम्पकेअर बिल लेजिस्लेटिव्ह ने. एक्झिक्युटिव्ह ब्रान्च ने ओबामा ने ब्रिटिश इण्टेलिजन्स ची मदत घेउन केलेले व दिवसांगणिक अर्थ बदलत जाणारे अॅलेजेड वायरटॅपिंग तर दुर्लक्षित केलेच, पण उलट रशिया इन्क्वायरी घेउन त्याच्याच मागे. शेवटी ट्विटर ही चौथी ब्रान्च घोषित करून त्याद्वारे सत्ता चालवेल तो आता फ्लोरिडातून.
जोक्स अपार्ट - हा वॉशिन्ग्टन सिस्टीम च्या बाहेरून उचलून आणून ठेवलेला माणूस सर्वांना लाइनीवर आणेल असा विश्वास असलेल्यांचा समज असा आहे की हा सगळा त्याच्याविरूद्धचा वॉशिन्ग्टन "स्वॉम्प" चा बनाव आहे. पण प्रत्यक्षात अगदी सर्वसामान्य/दुर्लक्षित लोकांच्या हिताचे असे नक्की किती निर्णय त्याने आल्याबरोबर घेतले आहेत? एक व्हेटरन्स अफेअर्स चे बजेट वाढवले हे सोडले तर दुसरे काही दिसत नाही.
ट्रंपजींचे माध्यमांबाबतचे
ट्रंपजींचे माध्यमांबाबतचे म्हणणे आता तरी पटेल कदाचित..
https://www.nytimes.com/2017/03/23/opinion/mr-modis-perilous-embrace-of-...
भारत का करारा जवाब - मास्टरस्ट्रोक
http://www.ndtv.com/india-news/government-questions-new-york-times-edito...
http://beta1.esakal.com/desh/new-york-times-criticises-yogi-adityanaths-...
पोटस आपली मनमानी करु शकत नाहि
पोटस आपली मनमानी करु शकत नाहि.
पोटस पूर्वी खाजगी कंपनीत मालक होता, तिथे त्याच्या पैशावर जगणार्या लोकांना तो धमक्या देऊन (नि त्यालाच डील) म्हणून काम करून घेत असे. दिवाळे काढून स्वतःचा फायदा केला, याला डील म्हणायचे! ही असली डील्स देश चालवायला चालत नाहीत!
आता सात वर्षे कष्ट करूनहि हेचि फळ काय मम तपाला म्हणायची वेळ यावी यासारखी मा़झ्यामते रिपब्लिकन पक्षाची नामुष्की नाही!
त्यांना माहित होते टी पार्टी वाले होते, मॉडरेट होते. मग इतक्या वर्षात त्यांच्याशी चर्चा करून एखादे बिल बनवता येत नाही? नुसत्या पोकळ धमक्या - तुम्ही पुनः निवडून येणार नाही! तसे चालत नाही. हा पोटस कसला डील करतो? कुणाशी डील करायचे, कशाबद्दल करायचे काही अक्कल नाही. आता इतरांना नावे ठेवत बसला आहे. तेव्हढेच येते त्याला, इतरांना शिव्या देणे, पोकळ बडबड. नि काँग्रेसमधले रिपब्लिकन तरी काय दिवे लावताहेत? इतकी वर्षे नुसते ओबामा म्हणायचे ते हाणून पाडायचे एव्हढेच केले, काही विधायक केलेच नाही - करताच येत नाही म्हणावे लागेल!
एकूण पुढली चार वर्षे धमाल आहे.
न्यु जर्सी मधे एका भारतिय
न्यु जर्सी मधे एका भारतिय बाईचा व तिच्या सहा वर्षाच्या मुलाचा त्यांच्या घरात गळा कापुन खुन करण्यात आला ही बातमी खरी आहे का?
कुठे वाचण्यात/ऐकण्यात आली
हो, इथे बातमी दिसते आहे.
बाप रे!
मुकुंद ते काही तरी पर्सनल
मुकुंद ते काही तरी पर्सनल/प्रायवेट लाईफ रिलेटेड प्रकरण दिसत आहे. हेट क्राईम नसावं बहूतेक.
टाईम्स मध्ये होते आठवड्यापूर्वी .
बरं न्यूनेझचं काय करायला पाहिजे असं वाटतंय ?
http://www.nj.com/burlington
http://www.nj.com/burlington/index.ssf/2017/03/no_arrests_yet_in_murder_...
http://www.firstpost.com/world/us-indian-woman-seven-year-old-son-found-...
हेट क्राईम नाहीये.
मला व्हॉट्स अॅप वर ही माहिती
वर सगळ्यांनी लिंक दिली आहे.
हायझेनबर्ग.. होप्..तु म्हणतो तसे हे हेट क्राइमचे प्रकरण नसावे. नुकतेच आमच्या इथे झालेल्या हेट क्राइमच्या खुनाच्या पार्श्वभुमीवर असली बातमी कानावर आली की मनात शंका येते.
अरे काय चाल्लय काय? केरी,
अरे काय चाल्लय काय? केरी, नॉर्थ केरलाय्ना मध्ये एका टीनेजरला तर स्व्तःच्याच आईच्या खुनाबद्दल अटक झालेली आहे...
अमेरिकन श्रावण बाळ!
अमेरिकन श्रावण बाळ!
आई वडिलांप्रति आदर वगैरे काही नाही - मी माझे, मला काय हवे ते मी घेणार, मधे कुणि आले तर मारून टाकणार!!
आमच्या घरापासून ५ मिनीटांवर
आमच्या घरापासून ५ मिनीटांवर ही कम्यूनिटी आहे. २०१५ डिसेंबरमधे ही घटना झाली. तेव्हापासून सगळे खूप धक्क्यामधे होते.
अवघड आहे!!
अवघड आहे!!
https://www.yahoo.com/news/angela-merkels-white-house-visit-082804360.html
वाट्टेल ते चाललय!
बाप रे!
बाप रे!
त्या मुलाचं काही समजत नाही बातम्यांवरून - आधीचं काही रेकॉर्ड, काही डोमेस्टिक प्रॉब्लेम, काही मोटिव्ह, काहीच नाही.
ट्रम्पचं अवघड आहेच!
एकदम हुषार मुलगा आहे NC State
एकदम हुषार मुलगा आहे NC State, Georgia Tech, UNC Chapel Hill सगळीकडे अॅडमिशन मिळाली आहे. त्याला ओळखणारे, त्याचे मित्र, वर्गातली मुलं, बँड मधली मुलं सगळेच म्हणताहेत की तो असं करणं शक्यच नाही. अतिशय चांगला, मदतीला तत्पर असा आहे म्हणे. त्याची मोठी बहिण लॉ करते, तिचा बॉयफ्रेंड आफ्रिकन अमेरीकन आहे, तो पण लॉ करतोय. इथली देसी लोक आधी त्याच्यावर संशय व्यक्त करत होती
काही लोक म्हणत आहेत ड्रग्जचा संबंध असू शकेल. पण कुणास ठाउक नक्की काय झालंय. इथे देसी कम्युनिटीच्या मिटींग्ज वगैरे झाल्या होत्या, लोक खुन्याला का पकडत नाहीत म्हणून वारंवार प्रश्न विचार्त होते. पोलीसांनी सव्वा वर्ष तपास करून मुलावर आरोप ठेवला. त्या कुटुंबासाठी वाईट वाटलं.
Pages