अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मूळातच त्याच्या कित्येक कल्पना बर्‍याच लोकांना पसंत नव्हत्या - ज्यांना होत्या त्यांच्यापेक्षा तीस लाख जास्त लोकांना नव्हत्या. नि मूर्खासारखे वागेन म्हणायचे नि तसेच वागायचे नि त्यालाच थोरपणा,शहाणपण म्हणायचे?

पुन्हा पुन्हा तुम्ही पॉप्युलर व्होट विरुद्ध इलेक्टोरल व्होट हे पालुपद का उगाळत आहात? पॉप्युलर व्होट ह्या संकल्पनेला अमेरिकन निवडणूकीत काहीही महत्त्व नाही अस कायदा सांगतो. सगळ्या व्यूहरचना ह्या इलेक्टोरल व्होट जिंकण्याकरता केल्या जातात. त्यामुळे पॉप्युलर व्होट गिनतीत ट्रंप मागे आहे हे पुन्हा पुन्हा गिरवून काहीही निष्पन्न होत नाही.

मुद्दा असा आहे की त्याच्या ओबामाकेअरला असणारा विरोध हा छुपा नव्हता. तो निवडून आल्यास ओबामाकेअर नष्ट करण्याचा तो प्रयत्न करणार हे निश्चित होते. तेव्हा त्याने ते केले म्हणून फार आश्चर्य व्यक्त करु नये.

दिलेल्या आश्वासनांपैकी १० टक्के पूर्ण केली तरी मला चालेल. माध्यमे, न्यायाधीश, सिनेट व हाऊस ह्या सगळ्यातून इतका कडवा विरोध पदोपदी होत असताना तो आपली आश्वासने पूर्ण करु शकेल असे वाटत नाही. पण ट्रंप त्याच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहे असे मला तरी वाटते आहे.

>>ओबामाच काय, ट्रंप पण देव नाही.
ट्रंप देव असल्याची शंकाही नको. ट्रंप हा दैत्य, दानव, असूर, सैतान, हैवान वगैरे असल्याचे तमाम माध्यमे ठासुन सांगत आहेत. याउलट ओबामा आलिशान जहाजावर सुट्टी साजरी करतो आहे, वॉल स्ट्रीट त्याला एका भाषणाचे ४ लाख डॉलर देत आहे ह्या गोष्टीही कौतुकभरल्या स्वरात सांगितल्या जात आहेत. माध्यमे आजही ओबामावर हुरळून गेलेली आहेत.

याउलट ओबामा आलिशान जहाजावर सुट्टी साजरी करतो आहे, वॉल स्ट्रीट त्याला एका भाषणाचे ४ लाख डॉलर देत आहे ह्या गोष्टीही कौतुकभरल्या स्वरात सांगितल्या जात आहेत <<
एका हुषार,ज्ञानी क्वालिफाईड, सुसंस्कृत माणसाला जगभरात आदर आणि मागणी असते. त्याच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग करुन घेण्यासाठी बरीच लोक पुढे येतात.
अर्थात ट्रंप रिटायर्ड झाल्यानंतर त्याच्या वाटेला असे कितीसे क्षण येतील ? याचा अंदाजा लावणे कठीण नाही.

वॉल स्ट्रीटचे लोक ओबामाच्या गहन ज्ञानामुळे प्रभावित होऊन त्याला एका तासाचे चार लाख डॉलर्स देत आहेत अशी ज्यांची श्रद्धा आहे त्यांना कोपरापासून प्रणाम! हे उघड आहे की ती डेमोक्रॅटिक पक्षाच्या यंत्रणेला राजमान्य पद्धतीने दिलेली लाच आहे. बाकीही छानछोकी जी चालू आहे ती विविध शक्तिमान उद्योगांनी दिलेली लाच आहे. जेणेकरून ओबामा ज्याचा डेमोक्रॅटिक पक्षावर अफाट प्रभाव आहे तो आपल्या बाजूने रहावा. त्यांचा पैसा आहे. हवा तसा तो उधळायला ते स्वतंत्र आहेत. पण त्याचे सामान्य माणसाने वा माध्यमांनी गुणगान गावे असे त्यात काही आहे असे वाटत नाही. उलट त्याला लाचखोरीची दुर्गंधी येत आहे.

ओबामावर जग इतके हुरळले होते की त्याने राष्ट्रपतीपद स्वीकार केले न केले तोच त्याला नोबेलचे शांतता पारितोषिक देण्यात आले. हा आगाऊपणा का केला बरे? देवास ठाऊक. कारण नंतर आठ वर्षात त्याने शांततेकरता काहीही केले नाही. पारितोषिक देण्याच्या लायकीचे तर नक्कीच नाही. त्याच्या कारकीर्दीत विक्रमी संख्येने ड्रोन हल्ले घडले आणि त्यात अनेक लोक निरपराधांसकट मारले गेले असे इतिहास सांगतो. पण एक काळा मनुष्य अमेरिकेचा अध्यक्ष झाला आहे ह्या अत्यानंदात नोबेल पुरस्कार समिती इतकी तर्र झाली होती की त्या माणसाचे कर्तृत्त्व सिद्ध होण्याआधीच त्याला नोबेल पुरस्कार देण्याचा बिनडोकपणा करती झाली. एकंदरीत माध्यमांचे आणि अन्य लोकांचे ओबामावर हुरळून जाणे हे ओबामाचे कर्तृत्त्व सिद्ध करत नाहीत. तर माध्यमे व अन्य लोक मूर्ख आणि नादान आहेत असे सिद्ध करते.

>>अन्य लोकांचे ओबामावर हुरळून जाणे हे ओबामाचे कर्तृत्त्व सिद्ध करत नाहीत.<<

ओबामाला फर्स्ट मुवर अ‍ॅड्वांटेज होता पण निष्रियतेमुळे त्याला कॅपिटलाय्ज करता आलं नाहि...

>>माध्यमे आजही ओबामावर हुरळून गेलेली आहेत.<<

शेंन, तुमच्या या निरीक्षणाची प्रचिती यायला लागलेली आहे.... Lol

पुन्हा पुन्हा तुम्ही पॉप्युलर व्होट विरुद्ध इलेक्टोरल व्होट.................................. काहीही महत्त्व नाही अस कायदा सांगतो.
मी निवडणुक अथवा इलेक्टोरल व्होट यांचा उल्लेखहि केला नाही. मला म्हणायचे होते की ट्रंपचे म्हणणे जास्त लोकांना मान्य नव्हते. नि आजहि नाही.
माध्यमे आजही ओबामावर हुरळून गेलेली आहेत

फॉक्स न्यूज, केलि अ‍ॅन कॉन्वे यांचे ऐका.
असे ना का ट्रंप मूर्ख, अज्ञानी. मान्य तर करतो आहे ना की प्रेसिडेन्ट होणे एव्हढे कठीण असेल असे वाटले नव्हते, कोरिया प्रश्न इतका साधा नाही, हेल्थ इन्शुरन्स फार कॉम्प्लिकेटेड आहे हे माहित नव्हते वगैरे
त्याने ओबामाकेअर रद्द केले, एच १ बी व्हिसा ची संख्या कमी केली म्हणजे झाले.
फार तर पुढल्या वर्षी पुनः म्हणेल हे सगळे एव्हढे काँप्लिकेटेड असेल असे वाटले नव्हते - म्हणजे किती लहान मुलासारखा निष्पाप, प्रामाणिक आहे असे म्हणून फॉक्स न्यूज वरचे लोक हुरळून जातील, मग तुम्हाला बरे वाटेल.
एक फार मोठे जग ट्रंपविरोधी लोकांचे - नि दुसरे एक छोटेसे, सुंदर, आल्टर्नेट फॅक्ट चे असे ट्रंप च्या बाजूच्या लोकांसाठी. एका जगात जे खरे ते दुसर्‍यात खोटे. तेंव्हा कुठल्या जगात रहायचे हा निर्णय आपला आपण घ्यायचा.

पण एक काळा मनुष्य अमेरिकेचा अध्यक्ष झाला आहे ह्या अत्यानंदात नोबेल पुरस्कार समिती इतकी तर्र झाली होती << या वाक्याचा एक भारतीय म्हणून निषेध व्यक्त करतो. अमेरिकेत द. आफ्रिकेत इ. ठिकाणी कृष्णवर्णियांच्यावर किती अत्याचार होतात त्यांना आधी किती दाबून ठेवले जात होते याची कल्पना असायला हवी होती. त्यातून एक व्यक्ती वर येतो आणि अशा देशाचा अध्यक्ष होतो ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. अर्थात ट्रंपच्या अंधसमर्थकांकडून कृष्णवर्णियांची नेहमी हेटाळणी होत आहे(बरेच व्हिडीओ ऑनलाईन आहे) त्यामुळे ओबामासारखे सुज्ञ माणूस तरी त्यातून कसे सुटतील म्हणा.
उद्या हेच ट्रंपसमर्थक ट्रंपला नोबल पारितोषिक मिळाल्यावर तो कसा ग्रेट, महान म्हणून जगभर सांगत फिरतील. (ट्रंप ने वादग्रस्त/ अविचारी ट्विट करणे कायमचे बंद केले तर त्यावर त्याला नोबल पारितोषिक लोक स्वतःहून देतील. )

ट्रम्प म्हणजे सावळा गोंधळ आणि उद्धटपणा आहे हे मान्य
परवा सीबीएस च्या पत्रकारा बरोबर च्या मुलाखतीचा काही भाग पाहिला आणि हसावं कि रडावं हेच कळेना

पण म्हणून ओबामा म्हणजे सगळं बरोबरच, तो काही चुकीच करूच शकत नाही हा जो काही प्रकार सुरु आहे
ते काही पटत नाही.

नोबेल पारितोषिक हे संबंधित क्षेत्रात जागतिक दर्जाची ठोस मिळकत असली तर दिले जावे असा एक संकेत आहे. उदा. भौतिक शास्त्र. जर कुण्या शास्त्रज्ञाने दैदीप्यमान असे काही संशोधन केले तरच ते पारितोषिक दिले जाते. कुणी शास्त्रज्ञ खूप खूप प्रतिभावान आहे आणि येत्या दहा पंधरा वर्षात तो नक्की काहीतरी करून दाखवेल म्हणुन आगावू पारितोषिक देऊ असे होत नाही. तसेच शांतता पारितोषिकाचे व्हायला हवे होते. केवळ आम्हाला
ह्या माणसाकडून अफाट आशा वाटते म्हणून त्याला आधीच पारितोषिक देऊन टाकू या वगैरे मूर्खपणा कुणी केला नव्हता. तो ह्यावेळी झाला.

आठ वर्षात ओबामाने शांततेकरता नक्की काय केले आणि त्याकरता त्याला जागतिक दर्जाचे पारितोषिक दिले जावे हे कुणीतरी समजावून सांगा जरा.

कुणितरी इथे समजावून सांगू शकणे कठीण आहे.
कारण, नोबेल पारितोषिक का दिले याची कारणे फक्त नोबेल पारितोषिक देणारेच सांगू शकतील.
तुम्हाला असे तर काही सूचित करायचे नाही ना की यात अमेरिकन, विशेषतः ट्रंपविरोधी लोकांचा हात होता?
आता तसे नाही असा स्पष्ट पुरावा जरी दिला तरी अमेरिकेतले काही लोक तो खोटाच आहे असे म्हणतील, तर त्यांच्याशी कशाला वाद घाला बघणार्‍यांना कळणार नाही वेडा कोण नि शहाणा कोण?

नवीन हेल्थ केअर बिल भयंकर गौड बंगाल वाटतेय. किती जण सरळ सरळ बिल वाचलेले नाही सांगताहेत. कमाल आहे.

कमाल आहे खरच.

बरं हे वाचलं का? White House advisors called Ottawa to urge Trudeau to help talk Trump down from scrapping NAFTA

ट्रंपने NAFTA रद्द करायचं असं धाडकन जाहिर केलं आणि बॅनन इ. लोकांनी एक्झिकिटिव्ह ऑर्डर ड्राफ्ट केली, जी तो दोन दिवसांत साईन करणार होता. तर आता याला कसं आवरायचं ? शेवटी दुसर्या देशाच्या पंतप्रधानाला व्हाईट हाउसने कॉल केला आणि सोनाराला कान पिळायला सांगितले.

>> नॉट श्योर व्हाय इट टूक सो लाँग

इलेक्शन च्या आधी परत एकदा इमेल स्कँडल चं पिल्लू सोडून दिल्याबद्दलची कृतज्ञता म्हणून इतका वेळ घेतला असेल.

पहिल्या १०० ते १२० दिवसांत एव्हढी उलथा पालथ कुठल्या कुठल्या अ‍ॅड्मिनीस्ट्रेशन मध्ये झाली होती ह्याबद्दल उत्सुकता आहे.

आता एफबीआयच्या रशिया इनवेस्टिगेशनचं काय होणार?
इट टूक सो लाँग कारण आत्ता फ्लिनचा गोंधळ बाहेर येतोय, आणखी काही इतक्यात नको असेल आणि सशल वर म्हणत्येय ते कारण.

अ‍ॅक्च्युअली पहिल्या १०० दिवसांतच असे सनसनाटि निर्णय घेतले जातात - टु सेट दि टोन फॉर रेस्ट ऑफ दि प्रेसिडेंसी.

इंटरेस्टिंगली, कोमी लो हँगिंग फ्रुट असुनहि ट्रंपने एव्हढा वेळ घेतला याचंच जरा नवल वाटतंय...

टु सेट दि टोन फॉर रेस्ट ऑफ दि प्रेसिडेंसी. >> म्हणजे ह्यानी एक्झिकिटिव्ह ऑर्डर काढायच्या आणि कोर्टाने त्या रद्दीत द्यायच्या. त्यावर भेटू पुढच्या कोर्टात! म्हणुन ट्विटरवर वल्गना करायच्या पण जायचं नाहीच. हा असाच टोन चालू रहाणार का?

ट्र्म्प आता अडकत चालला दिसतय. कोमी मेमो आणि सेंसेटिव्ह इनफर्मेशन लीक मुळे रिप. पण दूर जायला सुरुवात होत्येय.

सेंसेटिव्ह इनफर्मेशन लीक >> ह्यावर लोकांनी ट्वीटर वर हिलरीच्या ईमेल्स वरचे ट्रंप नि पॉल रायनचे कमेंट्स वापरून धमाल उडवली आहे.

in spite of all this काहीही न होता तो ४ वर्षे काढणार आणि पुन्हा निवडणुकीला उभा राहणार अशी भिती कोणालाच वातत नाहीये का?

पुन्हा निवडणुकीला उभा राहणार अशी भिती कोणालाच वातत नाहीये का?>>>> Lol मला तर तो पुन्हा निवडून येऊ शकतो ह्याची पण दाट शक्यता वाटते. डेम्स लोकं ग्रास रुट लेवल वर काम करत आहेत असं एकू येत आहे पण जो पर्यंत क्लियर लिडर म्हणून कोणी समोर येत नाही, तो पर्यंत काय सांगणार? त्यात ट्रंप ला खुप फुटेज पण मिळत आहे सध्या प्रेसिडंट असल्यामुळे. आपण ह्या बातम्या नीट फॉलो करतो म्हणून आपल्याला हे प्रकरण खुप जबरी शेकेल असं वाटतं. जर खरं खरं शेकलं म्हणजे त्यानी तर कायदा मोडला असेल तर प्रश्नच मिटला. पण जर तो इपिंच नाही झाला तर ह्या बातम्यांना जास्त भीक न घालणरे खुप लोकं आहेत हे ट्रंप जिंकला तेव्हाच सिद्ध झालं.

काल सॅली येट्सची अँडरसनने घेतलेली मुलाखत ऐकली. एकदम डिग्निफाईड आणि कम्पोस्ड बोलली, अर्थात २८ वर्षाचा डीओजे एक्स. ने असच बोलत असणार. पण राजकारणात नाही येणार म्हणाली Happy
>> तर ह्या बातम्यांना जास्त भीक न घालणरे खुप लोकं आहेत हे ट्रंप जिंकला तेव्हाच सिद्ध झालं.>> खरय.

हो खरे आहे बुवा. रिपब्लिकन्/कॉन्झर्वेटिव्ह मीडिया वाचला तर या बातम्या अशा स्वरूपात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसण्याची शक्यता जास्त वाटते. ज्या मीडिया मधे त्या येत आहेत त्यांच्यावर "ग्रासरूट्स" वाले विश्वास ठेवत नाहीत. फॉक्स, नॅशनल रिव्यू वगैरे मधे ज्या बातम्या येतात त्यावरून गावोगावचे स्थानिक पेपर्स व इतर मार्गाने लोकांपर्यंत पोहोचणार्‍या बातम्या कशा असतील याचा अंदाज येतो.

बातमी हा प्रकार बातम्या देणे हे ज्यांचे प्राथमिक काम आहे अशांकडून न वाचता स्वतःच्या गूगल, फेसबुक आणि व्हॉअ‍ॅ टाइपच्या मेसेजेस मधून वाचल्यामुळे आपले जे मत आहे त्याच प्रकारच्या बातम्याच फक्त मिळतात. त्याच्या विरोधी आवर्जून वाचण्यात लोकांना अजिबात इण्टरेस्ट नाही.

हे धृवीकरण सगळीकडे झाले आहे. भारतातही. यांच्या बातम्यांवर ते विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्या बातम्यांवर हे.

ट्रम्प यान्च्या मदतीला पुतिन धावले. ट्रम्प आणि रशियन परराष्ट्र मन्त्री यान्च्या दरम्यानची चर्चा (transcript) जाहिर करायची तयारी पुतिन यान्नी दाखवली आहे....

चौकशीचा ससेमिरा काही पाठ सोडत नाही, ट्रम्प बुडत्याचा पाय खोलात जात आहे.

ओबामा ८ वर्षे राष्ट्राध्यक्ष होते, ते किव्वा त्यान्च्या शेकडो स्टाफ या पैकी कुणाचेही वाद किव्वा भ्रष्टाचाराचे प्रकरण किव्वा कुठल्याही प्रकारचा टोकाचा आक्रास्ताळे पणा केल्याचे एकही प्रकरण घडले नाही. ओबामा सतत आठ वर्षे दररोज स्वत: ला पदाला किती लायक आहोत हे सिद्ध करत होते, त्यान्नी पदाची शोभा वाढवली होती.

Pages