अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>मिळत असेल इन स्टेट ट्युशन एच ४ वाल्याना तर चांगलं आ<<

मिळते, पण नियम युनिवर्सिटिज नुसार बदलतात. परंतु या विद्यार्थांना एफ१ वाल्यांसारखे फायदे मिळत नाहित. उदा. असिस्टंट्शिप, ओपिटी इ.

डाकासंबंधींच्या चर्चेत २०१३ च्या इमिग्रेशन बिलाची पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यात सीमेवर डबल-लेयर्ड कुंपण बांधणे, ४०००० नवीन बॉर्डर पेट्रोल एजंट्स हायर करणे, कॅनडा/युकेसारखी टॅलेंट बेस्ड इमिग्रेशन सिस्टिम तयार करणे, ग्रीन कार्ड्सची देशागणिक कोटा सिस्टिम काढून टाकणे - विशेषतः स्टेम एरियातून मास्टर्स केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड्स मिळणं अधिक सुलभ करणं या बाबी होत्या.

इथे पहा: https://en.wikipedia.org/wiki/Border_Security,_Economic_Opportunity,_and...

अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्सना अमेरिकेत आत येऊ द्यायचं नाही आणि ड्रीमर्ससारखे जे इथे वर्षानुवर्षं आहेत, त्यांनी खालील बाबींची पूर्तता केल्यास, इमिग्रेशनच्या रांगेत त्यांना शेवटी उभं केलं जाईल अशी त्यात तरतूद होती:

The bill creates a new immigration status, entitled Registered Provisional Immigrant status. Undocumented immigrants who get adjusted under the bill would not be legal permanent residents yet, but they would be in a legal status and would no longer be considered to be present illegally. They would also be permitted to work lawfully. In order to receive this status, undocumented immigrants would need to apply (which would have the effect of registering them with the U.S. government, hence the title of the status), pay both a fine and a fee, pay any owed back taxes to the IRS, learn English, and not have any disqualifying criminal history. Initially the status would be good for 6 years, with the possibility of having it extended for an additional 4 years. After a total of 10 years, then registered provisional immigrant would then have the opportunity to apply for legal permanent resident status, so long as the other triggers in the bill had taken place.

हे बिल सिनेटमध्ये ६८ - ३२ अशा मताधिक्याने पास झालं. त्यात चौदा रिपब्लिकन सिनेटर्सचाही समावेश होता. खुद्द बिलाचा मसुदा तयार करणार्‍या 'गँग ऑफ एट'मध्येही निम्मे रिपब्लिकन सिनेटर्स होते. मात्र रिपब्लिकन मेजॉरिटी असलेल्या हाऊसमध्ये हे बिल साधं चर्चेलाही घेतलं गेलं नाही. ते चर्चेला आलं असतं, तर काही बाबी बदलून ते पास झालं असतं. खुद्द रिपब्लिकन पक्षाच्या मुख्य धारेतही बॉर्डर सिक्युरिटीसाठी असणार्‍या स्ट्राँग प्रोव्हिजन्स आणि टॅलेंट-बेस्ड इमिग्रेशनमुळे याला बर्‍यापैकी पाठिंबा होता. मात्र स्टीव्ह किंगसारख्या मूठभर रेसिस्ट, हार्ड-कोअर कन्झर्व्हेटिव्हांच्या दबावाखाली येऊन आणि ओबामाला आंधळा विरोध म्हणून हाऊस रिपब्लिकन नेतृत्वाने या बिलाची अजिबात दखल घेतली नाही. त्याचा परिणाम दिसतोच आहे. डाका/अनिश्चिततता तर सोडाच, पण टॅलेंट-बेस्ड इमिग्रेशन सिस्टिम आणि ग्रीन कार्ड प्रक्रियेचे सुलभीकरण यांचं घोंगडं अजून भिजतं पडून आहे.

आपले सध्याचे प्रेसिडेंट तर सिनेट-हाऊस-सुप्रीम कोर्ट-स्टेट गव्हर्मेंट्स या सार्‍या ठिकाणी अनुकूल बहुमत असताना दर दोन दिवसांनी सिनेटमधल्या ८ डेमोक्रॅट्सबद्दल तणतणत असतात. (आजच एक कांगावाखोर ट्वीट आलंय परत!) या पार्श्वभूमीवर, ओबामाने चालना दिलेल्या या सिनेट बायपार्टिसन बिलामागचे प्रयत्न अधिक अधोरेखित होतात.

मिळते, पण नियम युनिवर्सिटिज नुसार बदलतात. परंतु या विद्यार्थांना एफ१ वाल्यांसारखे फाहयदे मिळत नाहित. उदा. असिस्टंट्शिप, ओपिटी इ>>>> H4 व्हिसा असलेल्यांना बहुतांशी इन स्टेट फि भरावी लागते. कमीत कमी १ वर्ष त्या राज्यात वास्तव्य असल्याचा पुरावा द्यावा लागतो. थोडक्यात, एक वर्ष स्टेट टॅक्स भरला असेल तर इन स्टेट ट्युशन मिळते. ओळखीतल्या H4 वर असलेल्या एका मुलीला पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे. थोडक्यात तुमचे credentials तेव्हढे असतील तर युनिव्हर्सिटीज भरपूर मदत करतात. तिथे व्हिसा स्टेटसचा बाऊ केला जात नाही.

हा धागा लवकरच राजकारण - भारताबाहेर या ग्रूपमधे हलवला जाईल. तो पाहण्यासाठी "राजकारण - भारताबाहेर" या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल. तुम्ही आताही त्या ग्रूपचे सभासद होऊ शकता.

H4 व्हिसा असलेल्यांना बहुतांशी इन स्टेट फि भरावी लागते >> होय स्वानुभवावरुन सांगतो. काही युनिवर्सिटिज मध्ये पूर्ण शिष्यवृत्ती पण मिळते.
आणि त्याच राज्यात १२वी केली तर राज्यात वास्तव्य असल्याचा पुरावा पण लागत नाही. ( at least मी ज्या राज्यात राहात होतो त्या राज्याचा तरी तसा नियम आहे)
असिस्टंट्शिप , युनिवर्सिटिज पार्ट टाईंम म्जॉब सारखे फायदे युनिवर्सिटिज द्यायला तयार असतात पण कायद्याने H4 मध्ये काम करायला परवानगी नसल्याने करता येत नाही.

आता भारताबाहेरील राजकारणासाठी वेगळा धागा आहे. सगळे विषय एकाच धाग्यावरच चर्चा करण्यापेक्षा नवीन धागे सुरु करा. हा धागा प्रतिसादासाठी बंद करतो आहे.

Pages