निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! हॅप्पी रोझ डे म्हणून गाजर देतेस का टीना Proud
त्या पाण्यात मीठ टाकून इजा नाही का होत त्या चकत्यांना? जनरली जमिनीत मिठाचं पाणी गेलं की ती नापीक होते असं ऐकलंय.
दिनेशदा, मग मी आता जवस बिया अशाच गार्डनात विखरून टाकते. जो होगा देखा जायेगा.

मीठ किंवा साखर दोन्हीची गरज नाही. साध्या पाण्यात गाजराच्या चकत्या ठेवल्या तर मस्त पानं फुटतात. उजेड हवा पुरेसा. पाणी एक- दोन दिवसात बदलत रहावे.
अमेरिकेतल्या पातीच्या कांद्याचे पण मुळं + वरचा भाग इन्चभर असं वाटीत, किंवा शॅलो पेल्यात घालून खिडकीत ठेवल्यात पात फुटत राहते .

मध्यंतरी एक विडीओ पाहण्यात आला..
लहान मुलांच्या अनयुझ्ड डायपर ला कापुन त्यातील वॉटर सोक करणारं स्फटीकसदृश्य सुपरजेल मटेरियल त्यांनी बाहेर काढलं अन ते मातीत मिसळलं.
कुंडी, फ्लॉवरपॉट मधे त्यांनी ते घातलं ज्यामुळे पाणी धरुन ठेवायची कॅपॅसिटी वाढेल आणि ओलावा टिकुन राहिल..
हि बघा त्या विडिओची लिंक : https://www.youtube.com/watch?v=sXb8rJ8Rm3I

सर्व फोटो, माहीती मस्त, मस्तच.

गिरीपुष्प बदलापुर पाईपलाईन रोडवर खूप आहेत, जायला हवं आता. मागच्यावर्षी मी इथेच वर्णन केलं तेव्हा उजूने मला हे नाव सांगितलं होतं.

सध्या पूर्व दुतगती महामार्गावर सगळीकडे गुलाबी फुलांची झाडे फुलली आहेत. कोणी सांगू शकेल का त्यांचे नाव?>>विक्रोळी ते घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर असेल तर तो १००% टॅबेबुयाच आहे. भरपुर झाडे आहेत या मार्गावर. Happy

मेधा कांद्याच्या पातीची नविन माहीती मिळाली धन्यवाद.

हो सगळीकडे आता गिरीपुष्प फुलला आहे. आमच्या ऑफिस बाहेर स्पॅथेडीया मस्त शेंदरी रंगात स्वतःला आकर्षून घेत आहे.

विक्रोळी ते घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर असेल तर तो १००% टॅबेबुयाच आहे. भरपुर झाडे आहेत या मार्गावर. >> जिप्सी, टॅबेबुयाचा फटू दे ना...
अब निर्मल हि बता सकता है कि उसने क्या देखा Lol

जागू,
मला भारी आवडतात स्पॅथोडीआ ची फुलं...अन त्यात जवळपास अर्ध अंग झोकुन देऊन मधुरस पिणारे पक्षी...पण ते एकदाच दिसलेले Sad

बाकी एक मज्जाच झाली.. वर्तक गार्डन मधे फिरताना तेथील वृक्षांच्या ओळखीसाठी पाट्या लावल्या आहेत तर एकावर लिहिलेलं 'पिचकारी'. आता हे काय नविन म्हणुन झाडाकडे बघावं तर तो इतका ताडमाड होता की पानं फुलं दिसेना इतर झाडांच्या गर्दितही...मग शांकली म्हणे कि स्पॅथोडीआलाच 'पिचकारी' म्हणतात.. फुलांना खाली दाबल की त्यातला मधुरस पिचकारी सारखा बाहेर येतो म्हणून...
वृक्षगान मधे सुद्धा डहाणूकर बाईंनी छान लिहिलयं या वृक्षाबद्दल...

हा वृक्ष मुळचा आफ्रिकन.. याची इतरही भरपूर नावे आहेत...
स्कारलेट बेल ट्री
ट्युलीप ट्री
फाउंटेन ट्री
स्क्वर्ट ट्री (यावरुनच ते पिचकारी नाव आलं असणार)
शास्त्रीय नाव - Spathodea campanulata

हो टिना पिचकारी नाव मी पण ऐकलय.

शांकलीने ह्याच नाव गोविंदफुल सांगितल. मला नाव आवडल. आमच्याकडे मासतोडी म्हणतात ह्याला. कंपाउंडला लावतात. ह्याचा काटा लागला की मासात घुसुन रक्त काढतो.

गोविंदफुल नावात जरा प्रेमळपणा वाटतो...
मासतोडी म्हटलं कि काहितरी खुंखार असणार असं वाटतच वाटत..
या झाडाचा पानंचा फोटोपन टाक ना असेल तर पूर्ण... कुंपणाला वापरतात म्हणजे झुडूपासारखं असणार ना..
मी बघितलय पण अंदाज नाहीयेउन राहिला या फोटोवरुन..

पिवळ्या कण्हेरीला ( बिट्टीचे झाड ) पण गोविंदवृक्ष म्हणतात. गोविंदाच्या पूजेसाठी किमान एक तरी फूल या झाडावर रोज असते म्हणून !

गोव्या च्या रिसॉर्ट च्या बागेत सापडलेले पेस्टल शेड्स मधले अप्रतिम फुल. नाव माहीत असल्यास कृपया सांगा.
closeup2.jpg

धन्यवाद . एक शन्का आहे , लॉग आउट केल्या वर मला माझे फोटो किंवा हा प्रतिसाद दिसत का नाही . मैत्रिणी च्या पी सी वर हि दिसत नाहीयेत .

खरं तर हे फुल नाही, पाने आहेत. यातच वेगळ्या रंगाचे एक पिटुकले फूल असते. ( गुलाबी प्रकारात फुल निळे असते )

खरं तर हे फुल नाही, पाने आहेत. यातच वेगळ्या रंगाचे एक पिटुकले फूल असते. ( गुलाबी प्रकारात फुल निळे असते ) >>> अरे वा. फोटो असेल तर टाका.

गोव्या च्या रिसॉर्ट च्या बागेत सापडलेले पेस्टल शेड्स मधले अप्रतिम फुल. >. हायड्रेंजिया - Hydrangea

या फोटोत फुलाच्या पाकळ्या नसून सेपल्स आहेत ( पाने नव्हेत) . ( जास्वंदाला किंवा गुलाबाला कळीच्या देठापाशी हिरवी कॉलर असते तसे )

Hydrangea flowers are produced from early spring to late autumn; they grow in flowerheads (corymbs or panicles) most often at the ends of the stems. Typically the flowerheads contain two types of flowers: small non-showy flowers in the center or interior of the flowerhead, and large, showy flowers with large colorful sepals (tepals).

इथे लेस लीफ किंवा लेसकॅप हायड्रेंजियाच्या फुलोर्‍याचे फोटो आहेत. त्यात दोन्ही प्रकारची फुलं वेगवेगळी ओळखू येतील
http://hydrangeashydrangeas.com/lacecaps.html

अन्जू, मी पण गोव्याचाच फोटो टाकला होता. तिथल्या कला अकादमीच्या आवारात भरभरून फुलतात हि फुले. शोधावा लागेल आता.

कात भारी जागू...

दवबिंदू, फोटो मस्तच आलाय...

सरिवा, अगं तो रोझ नाही रोज डे असं हवं होत माझ्या फोटोवरच टायटल Wink

सापाची कात आम्ही गावाला गेलो होतो, तेव्हा माझ्या बहीणीला मिळाली होती. झाली पाच वर्ष. पुढे बहीणीने काय केलं त्याचं आठवत नाही, विचारायलं हवं तिला आता.

Pages