खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या बाळाचे पाच सात क्लोज शॊट्स घेऊन ठेवले आहेत ...तेच दाखवतात क्लोज अप्स मधे. आणि माच्या हातात वगैरे फक्त गाठोडंच असतं !
ब्याक ग्राऊंड ला रडण्याचा आवाज!

कोणी त्या बाळाच्या रडण्याचा आवाज नीट ऐकला आहे का? मी ऐकला आहे. ते बाळ फक्त न्याय, न्या, नाय असा आवाज काढून रडतं. त्या बाळाला न्याय हवाय, त्याला कुठेतरी न्या, आणि ती ह्या पाचकळ मालिकेत काम करणार नाय असं म्हणणं असावं बाळाचं. विश्वास नसेल तर तुम्हीही ऐकून बघा.

बाकी मा आणि सिस्टरच्या हातात दुपट्यात गुंडाळलेली बाहुली असते हे सहज कळतं अगदी.

पियू... अगदी अगदी...असंच रडतंय बाळ. ते तरी बिचारं काय करणार? Happy

मो मात्र मस्त अभिनय करत्येय. फक्त तिने ते शिरा ताणून 'प्ली ss ज' म्हणणं बंद करायला पाहीजे. हिला आता नक्की काय हवंय..? बाळाच्या ओरिजीनल बाबांची एंट्री कधी? मो त्यालाही म्हणेल ,"प्लीज, आता तू माझ्या आयुष्यात येऊ नकोस ! जा इथून... प्ली sss ज"

मो बदलली नाहीये. ती तशीच आहे. तिला ही प्रेगनन्सी नकोच होती. तरी वि ने नाहीत्या तत्वाखाली तिला जबरदस्ती बाळाला जन्माला घालण्यास भाग पाडलंय. आणि आता ती जबाबदारी घेणार नाही. पण असं करुन ती दळवींच्या घरी कशी काय राहणार?

दळवीं च्या घरी बाळाची काळजी घेणारे इतके लोक आहेत कि ती जबाबदारी घेत नाहीये हे त्यांना कळायलाच मुळी चार सहा महिने लागतील..... तो पर्यंत ते बाळ मोठं होऊन मा मावशी व सलिल काकांकडे जाईलच!

दळवीं च्या घरी बाळाची काळजी घेणारे इतके लोक आहेत कि ती जबाबदारी घेत नाहीये हे त्यांना कळायलाच मुळी चार सहा महिने लागतील.. >>> हो ना . ती आजारी आहे म्हणून तिला कोणी बाळाची जबाबदारी घेउ देणार नाही . सगळे तिला जपतील .

जा इथून... प्ली sss ज" >> इथून नाही इकडून...
'मो' ला इथून च्या ऐवजी इकडून, इथे च्या ऐवजी इकडे असं म्हणायची सवय आहे.

दक्षिणा +१

दळवीं च्या घरी बाळाची काळजी घेणारे इतके लोक आहेत कि ती जबाबदारी घेत नाहीये हे त्यांना कळायलाच मुळी चार सहा महिने लागतील..... तो पर्यंत ते बाळ मोठं होऊन मा मावशी व सलिल काकांकडे जाईलच! >> +१००

कसली मजा आहे मोची! लग्न झाल्यापासुन इकडची काडी तिकडे केली नाही ...आरामच आराम. मा चा आबट चेहरा बघवत नाही!

काल एक सिन पाहीला...

मानसी ही मोनिकाच्या रुम मध्ये येते व तिथे फुलांचा बुके पाहते..( इथ पर्यंत ठिक आहे.. )
पण ति मोनिका साठी पाठवलेल्या बुके मधील कार्ड काढुन वाचते... !!!

: काय मुर्ख पणा आहे ... सकारात्म्क पात्र, ते पण एवढ शिकलेल ( डॉक्टर की काय आहे ती).... अस चोरुन दुसर्‍याला आलेल्या कार्ड वाचतात का?...

>>>>ती अशी पारोशी व constipated का दिसते नेहमी?
वैद्य पाटणकर (आयुर्वेदिक काढा) ह्यांनी स्पॉन्सर केली असती सिरीयल तर बरं झालं असतं biggrin.gif

जेव्हाही मा ला सलिल चा फोन येतो तेव्हा वि इतका काय कौतुकाने हसतो? त्याने थोडी तरी असूया, नाराजी दाखवावी.
वि आणि मा चे जेव्हा जुळेल ते काही अचानक वन फाईन डे तर त्यांच्या मनात आलेलं दाखवू शकणार नाहीत ना? मग?
कारण मा म्हणत्येय नं की इतका वेळ घेऊनही मी जर सलिल ला नकार दिला तर?

वि ला उगीचंच अगदी शांत, सरळ, सालस दाखवतात. ज्याला म्हणजे मानसीचे प्रेमही कळणार नाही लवकर! म्हणजे यांना बरं लांबण लावायला!
आणि मो तर त्याला चक्क आपल्या जाळ्यात ओढू पाहात्येय..आणि तो मुख्य म्हणजे ओढला जातोय :रागः

नक्की काय दाखवलं? Uhoh
मा च्या मनात वि बद्दल प्रेम निर्माण झालंय असं दाखवलं का पडद्यावर?

नाही...असंच काही दाखवलं नाही अजून तरी. पण त्यांच्यात अगदी निखळ (का कायसेसे) मैत्र आहे!
सलिल, वि, मा च्या प्रेमाच्या त्रिकोणाला मोनिकाचा लंब विभागणार आहे!

मो तर त्याला चक्क आपल्या जाळ्यात ओढू पाहात्येय..आणि तो मुख्य म्हणजे ओढला जातोय>> म्हणजे काय गं चिंचे?? विला मो बद्दल प्रेमवाटू लागलंय की काय??

सुप प्यायच्या सीनमध्ये मो ने कसे नजरेने हाकलुन लावले मा ला. वि चे मो वर प्रेम आहे असेच वाटले त्या सीनमध्ये. त्याला राग मो ने केलेल्या फसवणुकीचा आहे. मो ने कन्फेस करुन मनापासुन माफी मागितल्यास तो निवळेल.
वि आणि मा हे दोन रडे एकत्र असह्य होतील. वि ची जोडी मोशीच राहुदे ओ झीवाले.

कालचा बराचसा एपिसोड किचनमधून ऐकला. विक्रम आणि सलीलचा आऊटडोअर सीन होता. पार्श्वभूमीवर एका चिमणीच्या चिवचिवण्याचा आवाज होता. पूर्णवेळ अगदी एक्काच पॅटर्नमध्ये ती चिवचिवत होती. गंमत म्हणजे नंतर सलील आणि मानसीच्या (बहुतेक समुद्रकिनार्‍यावरच्या) सीनमधेही सेम तोच आणि तसाच आणि तश्याच ड्युरेशनने येणारा चिवचिवाट होता. Lol

येस... Happy नुसते नजरेने तिने मा ला सांगितले की ' इकडून फुटायचं आता!'

वि आणि मा हे दोन रडे एकत्र असह्य होतील. वि ची जोडी मोशीच राहुदे ओ झीवाले. .... rofl.gif

आणि काल मान्सी सलील ला म्हणाली की मी जे डॉ झाले ते वि आणि त्याच्या कुटूंबामुळे . म्हणजे ???
नाहीतर काय परीक्षा देणार नव्हती की काय ?? सलील समोर वि चीच टेप लावली होती.

काल आजी वि ला म्हणाली की हे असं बोलू का नको टाइप्स कुचंबत बोलणारी माणसं मला आवडत नाहीत Lol तिला आत्तापर्यंत कधीच समजलं नव्हतं का की वि असाच आहे?

Pages