Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही..मो फिसकन हसली
नाही..मो फिसकन हसली विक्रांतच्या थोबाडीत मारली तेव्हा.....
म्हणून तोंडावर हात! पण नंतर तिला पण 'प्रसाद' मिळालाच.
बिचारा सलील, मोडणार लग्न
बिचारा सलील, मोडणार लग्न त्याचं आता. >>> हो ना . त्याची आई आता मोडता घालेलं . अशा घरातली मुलगी मला सून म्हणून नको वगैरे ..
पण वि चा हा स्टँड चुकला >>> त्याचा स्टँड पहिल्यापसूनच चुकतोय . तो नक्की काय करतोय ते त्याच त्याला आणि बाकी कोणालाच कळत नाहीये . तो फक्त त्या प्रसंगापूरता विचार करतो , दूरगामी परिणाम वगैरे काही बघत नाही .
काल तो सईल सुरवातीपासुनच
काल तो सईल सुरवातीपासुनच रडवेला चेहरा करुन दुखी आत्म्यासारखा का होता? त्याच्या अंतर्मनाला आधीच पुढची चाहुल लागली होती का?
त्याला मानसी विक्रांतला
त्याला मानसी विक्रांतला भेटायला क्लिनीक ला जाते वगैरे जरा खटकलंच असेल...म्हणून तो दु:खी होता...शिवाय त्याला आपल्याला "सईल" म्हटलेंलेही आवडत नसेल .....कुणास माहिती!

म्हणजे मला तरी नसतं आवडलं बुवा!
पुढे काय झालय?
पुढे काय झालय?
कुणी नोटीस केले का ??
कुणी नोटीस केले का ??
विची आजी मोनिकाच्या तोंडात मारते तेव्हा "आम्ही स्त्री अत्याचार समर्थन करीत नाही" (किंवा असेच काहीतरी) टीव्ही च्या स्क्रीन वर दाखवत होते मात्र त्या आगोदर विकी च्या तोंडात आजी मारते तेव्हा मात्र "आम्ही पुरुष अत्याचार समर्थन करीत नाही" असे दाखविले नव्हते, म्हणजे हे झी वाले आम्ही पुरुष अत्याचार समर्थन करतात असे होते ना...

आधीच हे लोक असल्या फालतू मालिका दाखवुन मानसिक अत्याचार करत असतात आणि वरती पुरुष अत्याचार चे समर्थन पण करतात :
प्रन्या....असं नाही. कधी कधी
प्रन्या....असं नाही. कधी कधी स्त्रियांवर हात उगारलेला दिसला ..किंवा मारतांना दिसलं की बॅक ग्राऊंड माहित नसतांना उगीच इश्यू होऊ शकतो. म्हणून झी ने सेफ प्ले केलं. त्यात काही वावगं नाही.
स्त्री काही नेहमीच अगदी अगतिक ,हताशा, गरीब नसते.
स्त्री काही नेहमीच अगदी अगतिक
स्त्री काही नेहमीच अगदी अगतिक ,हताशा, गरीब नसते. >>> हे मो ने दाखवून दिलेचं आहे.
रच्याकने, साखरपुडा आणि बारसं एकाच दिवशी होतं ना ?
विक्र्या बेअक्कल
विक्र्या बेअक्कल
आणि मुर्खांचा राजा आहे. :रागः
मला एक कळत नाही आता शिरेलीत दाखवण्याजोगं उरलंय तरी काय?
विची आजी मानसी च्या तोंडात
विची आजी मानसी च्या तोंडात मारते तेव्हा >>>>> मानसीच्या नव्हे मोनिकाच्या थोबाडीत मारते ती
मला एक कळत नाही आता शिरेलीत
मला एक कळत नाही आता शिरेलीत दाखवण्याजोगं उरलंय तरी काय? >>> अगं मा आणि वि चे फुलणारे प्रेम, पण गिल्ट मधे मा तयार होणार नाही वि शी लग्न करायला. मो चा सूड, सलील चा देवदास झालेला, वगैरे वगैरे
देवा. नको बाबा आत्याचार. मी
देवा. नको बाबा आत्याचार. मी नाही पाहणार आता ही शिरेल
रच्याकने, साखरपुडा आणि बारसं
रच्याकने, साखरपुडा आणि बारसं एकाच दिवशी होतं ना ? >>> हो ना , काय झालं त्याच ?
आणि मला अजून एक कळलं नाही
आणि मला अजून एक कळलं नाही विक्रया अजून आला नाही अशी चर्चा करणारे इतर (हॉस्पिटल मधले आणि इतर लोक) विक्र्याची आजी त्याला धूण्य अगोदर अचानक कुठे गायब झाले?
नाव ठेवल्यावर सगळ्यांना खाऊन
नाव ठेवल्यावर सगळ्यांना खाऊन पिऊन घरी पाठवल्यावर मग आजीने विक्रान्तचं कोर्ट मार्शल केलं. कारण पाहुणे बारश्याला आले होते.
पण नंतरच्या कार्यक्रमासाठी सईल आणि त्याच्या आईला थांबवायची गरज नव्हती. अनलेस मानसी-सईलचं लग्न जुळायच्या आधी मोडायचं निमित्त हवं असेल.
आधी बारसं आणि साखरपुड्याचा एकत्र बेत होता, हे लेखक दिग्दर्शक विसरले किंवा सईलच्या आईचा रागरंग बघून दळवींनी बेत रहित केला.
कोर्टमार्शल करताना आजीबाई
कोर्टमार्शल करताना आजीबाई "एकसाथ विश्राम" पोजमध्ये उभ्या होत्या ते लय आवडलं. कायिक अभिनय असावा तर असा!
बाकी सईलच्या ऐ समोर हा राडा कुटायला नको होता.
मला अजुनही वाटतं आहे कि
मला अजुनही वाटतं आहे कि विक्रांत हॉस्पिटलमधे एकटाच डुलक्या मारत असताना त्याला स्वप्नं पडलं आहे. झी वरच्या मालिकेत सत्य इतक्या लवकर रिविल होणं अशक्य. आणि हे जर स्वप्न नसुन सत्यच असेल तर आजीनी काय सगळ्यांनी विक्रांतच्या तोंडात मारायला हवी. incl मोनिका.
लग्नाचे फेरे घेताना ज्या कारणासाठी सत्य लपवलं ती कारणं अचानक संपली का? ( उदा. मोनिकाच्या आजोबांची तब्येत, सत्याच्या फटक्याने ज्येष्ठांना मानसिक आघात, कुटुबाची बदनामी इ इ - तसंही होणारी सुन प्रेग. असेल तर दळवींची का बरं मानहानी व्हावी? ) विक्रांत अचानक वोकल का झाला? जर त्याला बाळाला सांभाळायचं नव्हतं तर त्याने मोनिकाला बाळ होवु देण्यासाठी का जबरदस्ती केली? बाळ होइपर्यंत बाळाचा खरा वडिल तो नाही हे का लपवलं?
मला तर वाटतं आहे कि मानसीचं लग्न ठरल्यामुळे फ्रस्ट्रेट होवुन त्याने तोंड उघडलं असणार. इतकी बेक्कार इल्लॉजिक मालिका यासारखी हीच. ( असं इथे म्हणते. दुसर्या धाग्यावर जावुन तिथेसुद्धा लॉजिक गंडलं म्हणुन कटकट करणारच आहे. सगळे लेखक इतकं बथ्थड मुद्दाम लिहितात का?)
काल तो सईल सुरवातीपासुनच
काल तो सईल सुरवातीपासुनच रडवेला चेहरा करुन दुखी आत्म्यासारखा का होता? त्याच्या अंतर्मनाला आधीच पुढची चाहुल लागली होती का? >>> कारण त्याने वि आणि मा ला एकत्र hospital बाहेर पडताना बघितलय, सो त्याचा वेगळाच गैरसमज झालाय. मे बी त्याने वि आणि मा चे hospital मधील बोलणे ऐकले असेल. वि ने माचे अश्रु स्वतः च्या हाताने पुसले हेही बघितले असेल.
रच्याकने, साखरपुडा आणि बारसं एकाच दिवशी होतं ना ? >>> हो ना , काय झालं त्याच ?>>> आता घरात एवढा मोठा bombस्फोट झाल्यावर काय डोम्बलाचा साखरपुडा होणारेय? ती सलीलची आई मोडता घालणारच हे सान्गायला आता ज्योतिषाची गरज नाही.
कोर्टमार्शल करताना आजीबाई
कोर्टमार्शल करताना आजीबाई "एकसाथ विश्राम" पोजमध्ये उभ्या होत्या ते लय आवडलं. कायिक अभिनय असावा तर असा! >>> मला तर पवित्र रिश्ताचे दिवस आठवले.
लग्नाचे फेरे घेताना ज्या कारणासाठी सत्य लपवलं ती कारणं अचानक संपली का? ( उदा. मोनिकाच्या आजोबांची तब्येत, सत्याच्या फटक्याने ज्येष्ठांना मानसिक आघात, कुटुबाची बदनामी इ इ - तसंही होणारी सुन प्रेग. असेल तर दळवींची का बरं मानहानी व्हावी? ) विक्रांत अचानक वोकल का झाला? जर त्याला बाळाला सांभाळायचं नव्हतं तर त्याने मोनिकाला बाळ होवु देण्यासाठी का जबरदस्ती केली? बाळ होइपर्यंत बाळाचा खरा वडिल तो नाही हे का लपवलं? >>>> सहमत
आजीने निर्मलाला का नाही
आजीने निर्मलाला का नाही थोबाडीत मारली? (नन्तर माचा सुद्दा नम्बर आहेच मार प्रसाद घेण्यासाठी ) तिला सुद्धा हे सत्य माहित होत ना? वि सगळ काही सान्गत असताना आत्या गप्प का उभी होती?
अगं मा आणि वि चे फुलणारे
अगं मा आणि वि चे फुलणारे प्रेम, पण गिल्ट मधे मा तयार होणार नाही वि शी लग्न करायला. मो चा सूड, सलील चा देवदास झालेला, वगैरे वगैरे>>> विमाचे लग्न आणि मग वीस वर्षाची लीप, इशा मोठी होईल, जर ती मोकडे राहिली तर आपल्या आईसारखी व्हिलन होईल, दळवीवर सूड उगवेल, विमाकडे राहत असेल तर आधी तिचा गैर समज होईल माबद्दल, नन्तर ती मोविरोधात जाईल, ती मा सारखी सदगुणी निपजेल, इशाची लवस्टोरी, तिच्या आयुष्याचे problems वै वै. हया सगळ्या रामरगाडयात सिरियल दोन वर्ष आरामशीर चालेल.
जर त्याला बाळाला सांभाळायचं
जर त्याला बाळाला सांभाळायचं नव्हतं तर त्याने मोनिकाला बाळ होवु देण्यासाठी का जबरदस्ती केली? >>>>>
आमच्याइथे जे दिसलं त्यावरून...
मागे मायेकर म्हणाले होते तसं प्रत्येकाच्या टीव्हीवर वेगळी मालिका दिसते बहुतेक.
मेडीकल काँप्लिकेशन्समुळे अॅबॉर्शन शक्य नव्हतं असं दाखवलं आहे ना? निर्मलाने पण टेस्ट्स वगैरे करून करता नाही येणार असं सांगितलं की.
वि बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे असं म्हणाला होता. मोनिकाबरोबर रहाणार नाही. आताही मोनिकाचा "बाळाचा ढाली सारखा वापर करते आहे वगैरे.. " म्हणून पेटला आणि बोलला ना ?
बाकी उषा नाडकर्णींनी कानाखाली भारी मारल्या एकदम !
मला अजुनही वाटतं आहे कि
मला अजुनही वाटतं आहे कि विक्रांत हॉस्पिटलमधे एकटाच डुलक्या मारत असताना त्याला स्वप्नं पडलं आहे. >>
मलाही असंच वाटतंय...
मला अजुनही वाटतं आहे कि
मला अजुनही वाटतं आहे कि विक्रांत हॉस्पिटलमधे एकटाच डुलक्या मारत असताना त्याला स्वप्नं पडलं आहे. >>
मलाही असंच वाटतंय... >>>>>>>>>>>>>
तस जर असेल तर हि जगातिल सगळ्यात भिकार सिरियल असेल.....
बाकी उषा नाडकर्णींनी कानाखाली
बाकी उषा नाडकर्णींनी कानाखाली भारी मारल्या एकदम ! >>> +१००. ते देखिल वि ला एकदा आणि मो ला दोनदा ............
मागे मायेकर म्हणाले होते तसं
मागे मायेकर म्हणाले होते तसं प्रत्येकाच्या टीव्हीवर वेगळी मालिका दिसते बहुतेक. Happy आमच्याइथे जे दिसलं त्यावरून...
मला वाटलेलं फक्त भरत. नि मलाच काही वेगळे शाॅट वगैरे दिसतात कि काय मालिकेत. पण पराग ना पण आमच्या सारखेच दिसते. 
मेडीकल काँप्लिकेशन्समुळे अॅबॉर्शन शक्य नव्हतं असं दाखवलं आहे ना? निर्मलाने पण टेस्ट्स वगैरे करून करता नाही येणार असं सांगितलं की.
वि बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे असं म्हणाला होता. मोनिकाबरोबर रहाणार नाही. आताही मोनिकाचा "बाळाचा ढाली सारखा वापर करते आहे वगैरे.. " म्हणून पेटला आणि बोलला ना ?>> मला तरी असंच दिसलं.
वि आधी बाळाची जबाबदारी घ्यायला तयार असतो कारण मो त्याला ती प्रेग्नंट असल्याचं माहितच नसल्याचं सांगते, त्यातही पार्टीत दारु प्यायलेली असताना जुन्या बाॅफ्रेने गैरफायदा घेतल्याची शक्यता सांगते आणि तिच्यावर विश्वास ठेऊन वि बाळाची जबाबदारी घ्यायची ठरवतो. पण जेव्हा वि ला कळतं कि मो ला लग्नाच्या आधीच ती प्रेग्नंट असल्याचं माहित होतं.. तेव्हा त्याला धक्का बसतो नि तो डिव्होर्सचा निर्णय घेतो.
यात विची काही चूक मला तरी वाटत नाही.
बाकी सगळं जाउद्या हो. आता जरा
बाकी सगळं जाउद्या हो. आता जरा अॅप्रिशिएट करुया कथा पुढे सरकल्याबद्दल आणि विक्रांत नॉर्मलला आल्याबद्दल.
इतक्यात घाई करु नका, अ
इतक्यात घाई करु नका, अॅप्रिशिएट करण्याची. हे स्वपन आहे, असे सिध्द व्ह्यायला अजुन वाव आहे. आणि मोनिका अजुन दारातच उभी आहे. परत येइल, बाळाला हातात घेईल, "मी नाही तर इशा पण नाही" असा पवित्रा घेइल, आणि आधी फक्त (वि, मा , आत्या) तिघांना ब्लॅकमेल करत होती, ती आता आजीसकट सगळ्यांना करेल.
पुन्हा पहिले पाढे ५५ , सुरु..
आजच्या भागात सिद्ध झालंय की
आजच्या भागात सिद्ध झालंय की हे स्वप्न नाहीये
मानसीचं लग्न मोड्ण्याच्या बेतात आहे, वि कडचे सगळे उध्वस्त झालेत वगैरे. इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न पडत असेल वि ला तर अवघड आहे 
निधी +१ विक्र्या अगोदर सगळी
निधी +१ विक्र्या अगोदर सगळी जबाबदारी घ्याय ला तयार असतो, पण तो भडकतो मोनिकाच्या त्या एकाच वाक्यामुळे
"विक्रांत माझं क्रेडिट कार्ड आहे... " ही ही हा हा हा हा..
Pages