खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनोरुग्ण विक्रान्त >> हे कसं झालं ? मी पाहिलं तेव्हा - मला तिच्यापेक्षा तुझी काळजी आहे असा काहितरी डायलॉग म्हणत होता विक्रांत.

इशा मानसी देशमुख>>>>>>>> देशपांडे
हिंदीतल्या कुठल्या तरी सिरेलीत पण लीप घेउन हिरवीण चषमा लावुन मुलीचा सांभाळ करत असते असं दाखवलंय तीच आयड्या इथेही.
पण हिंदीत ते बाळ स्वतः हिरवीण आणि जुदा झालेल्या हिरोचं आहे. लग्न झाल्यावर ते जुदा झालेत. इथे तर आनंदच आहे. नशीब नानुमामा चष्मा लावुन इशाचा सांभाळ करताना नाही दाखवले.

3 वर्ष नाही हो, (मी पूर्ण पहिला नाही भाग त्यामुळे त्यांनी च तसे म्हंटले असेल तर कल्पना नाही) पण इशा मोठी दाखवली आहे, 5+ ची तरी वाटते,
आपली बॅग स्वतः:ची स्वतः ओढत बिल्डिंग मध्ये घेऊन जाताना दाखवली आहे.

त्यांना ज्या वयाची इशाचे काम करणारी मुलगी मिळाली असेल त्या वयाचीच दाखवणार ना इशा!
काहीही..! ना आई ना बाप........... तिसर्‍याचा चवथ्यालाच व्याप.. धोपटा भुई समजून साप, निसता प्रेक्शकांच्या डोक्याला ताप!

बाप रे.. असं दाखवलंय... पाहून घेते मग आता नेट वर...
म्हणजे आता इशा मानसी ला आई न विक्रांत ला बाबा म्हणेल मग या दोन दगडांचा कळा खुलेलं बहुतेक...

चिंचे Rofl
भारी लिहिलंयस. शिरेलीला अगदी पर्फेक्ट लागू. Happy

मानसी आज्जी अजोबांना इशाला घेऊन दिल्लीला जाणार असं सांगते तो एपिसोड पाहिला आणि धन्य झाले.
इशा माझ्यासाठी प्रयोग करायाला तिथे उपलब्ध राहिल या अर्थाचं काहीतरी बोलली.. Uhoh

एखादं तान्हं बाळ घेऊन दुसर्‍या अनोळखी शहरात जाणं, तिथे स्वतःचा अभ्यास करून किंवा कॉलेज अटेन्ड करून ते बारकं बाळ सांभाळणं, इतकं सोप्पं आहे का?

>>> तिसर्‍याचा चवथ्यालाच व्याप.. धोपटा भुई समजून साप, निसता प्रेक्शकांच्या डोक्याला ताप!>> Lol Wink

विकऱ्याला मनोरुग्णाच्या भूमिकेसाठी अजिबात मेहनत घ्याची गरज नाही.... लीलया जमतंय त्याला ते... आणि विकऱ्याला आणि मांशी ला चष्मा ????? काय कू??? ... गीता काकू गायब... आणि आता खुद्द लेखिका पण मैदानात उतरलेली दिसतेय ...सगळा सावळा गोंधळ... विकर्या आणि मांशीची कळी खुलण्याअधिच मोनिकाची कळी (केव्हाच) खुलून आता त्याला 3 वर्षाचं फुल पण आल...

आता ओझीवर बघितला कालचा भाग. मा नि इशा दाखवलीच नाही. गीताकाकू बदलली. आजी आजोबांचा वैताग आला.
तो चहावाल्याचे डायलाॅग कैच्याकै दिलेत. Uhoh म्हणे आधी इथे यायचात तेव्हा खूप हसायचात , शिटी मारुन त्याला बोलवायचात. त्या मॅडम त्याच्यासोबत यायच्या (ही मा असणार) ती पण खूप हसायची तिला पण याने शिटी मारायला शिकवलं होतं . तीन वर्षांपासून हा एकटाच येतोय. .. हा वि नि मा कधी साधं हसताना मारामार तर इतकं खळखळून खूप हसायला कुठे. आणि शिटी???? हे तर कहर होतं.

शर्वरी पाटणकरला खूप दिवसांनी पाहिलं. डोळे सुखावले. अजूनही तिचा वावर उत्साही आणि सहज आहे. तिच्याकडून तरी अॅक्टींग शिका म्हणा ठोकळ्यांनो.

शर्वरी पाटणकरला खूप दिवसांनी पाहिलं. डोळे सुखावले. अजूनही तिचा वावर उत्साही आणि सहज आहे. तिच्याकडून तरी अॅक्टींग शिका म्हणा ठोकळ्यांनो. >>> लेखिका का झाली पण ही. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला पण लिहीत होते खूप मागे, पेपरात वाचलं होतं. ती सिरियल बघायचं डेरींग आधीपासूनंच नव्हतं. तसंच हीपण बघायचं नाहीये.

3 वर्ष नाही हो>>> हो 3 वर्ष झाली. भागाच्या सुरवातेला दाखवले होते. मी पुर्णा भाग बघितला नाही म्हणून चष्मा वाली मा बघितली नाही.

गीता काकू गायब... >>> गीता काकी दाखवली. ती बदलली आहे पण ती ३ वर्षांनी मोठी न दिसता ३ वर्षांनी लहान दिसली.

हा वि नि मा कधी साधं हसताना मारामार तर इतकं खळखळून खूप हसायला कुठे. आणि शिटी???? हे तर कहर होतं. >>>> + ११११

शर्वरी पाटणकरला खूप दिवसांनी पाहिलं. डोळे सुखावले. अजूनही तिचा वावर उत्साही आणि सहज आहे. तिच्याकडून तरी अॅक्टींग शिका म्हणा ठोकळ्यांनो.>>> मला पण ती आवडते.

विक्रांत मनोरोगी कसा झाला>>> मेबी मोनिकामुळे झाला असेल. बादवे, मोनिका कुठाय ३ वर्षानन्तर?

ती पण खूप हसायची तिला पण याने शिटी मारायला शिकवलं होतं>>> हो, त्यान्ना शिटया मारताना दाखवलय, तो भाग तर कहरच होता. Lol

इशा मानसी देशमुख>>>>>>>> देशपांडे>>>> आभार स्मित. Bw

काहीही..! ना आई ना बाप........... तिसर्‍याचा चवथ्यालाच व्याप.. धोपटा भुई समजून साप, निसता प्रेक्शकांच्या डोक्याला ताप!

विकर्या आणि मांशीची कळी खुलण्याअधिच मोनिकाची कळी (केव्हाच) खुलून आता त्याला 3 वर्षाचं फुल पण आल...:फिदी:

इशा माझ्यासाठी प्रयोग करायाला तिथे उपलब्ध राहिल या अर्थाचं काहीतरी बोलली.>>> प्रयोग करायला ती काय गिनिपिग आहे का?

पाच तास कॉलेज ,त्यासाठी दोन तास प्रवास , एक तास तयारीला , ४ तास अभ्यास आणि ४ तास ईशासाठी ... असा काहीतरी ती हिशोब करत असते .
पाच तास कॉलेजमध्ये , मग ईशाला कुठे ठेवलेलं ?

का ही ही सुरुय... 3 वर्षांत appearance एवढा बदलत नाही.. वय वाढलं कि चष्मा लागतोच किंवा वय वाढलं कीच चष्मा लागतो या मुळात अंधश्रद्धा आहेत..
आणि अज्जी अजोबा पण एवढे गलितगात्र होत नसतात 3 वर्षांत
केकताचं वारं लागलंय झी वाल्यांना पुढे कथानक सुचलं नाही की लीप घ्यायचा

Pages