खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वि असाच आहे...म्हणून तो आजींना नेहमीच आवडत नाही!
वि ला आता काही समजेना झालंय की मो ला घरी येण्यापासून कसं थांबवायचं?
मोनिका काल टिपीकल बाळंतीण दिसत होती.

सगळी सिरिअलच कुचंबना शिरियल!
मोनिकाची कुचंबना, मानशी ची कुचंबना वि ची कुचंबना सलील ची मधल्या मध्ये कुचंबना! तिकडे सलीलच्या आईची व्हीडिओ कॉलिंगवर कुचंबना! नाना मामची कुचंबना, मोनेंची कुचंबना, ह्यांची त्यांची सगळ्यांची कुचंबना!
संपता कुचंबना संपेना!

आणि प्रेक्षकांची सगळ्यात जास्त कुचंबना प्राईम टायमला सिरेल लागते त्यामुळे..

झी च्या बानु पासुन तर गवरी पर्यन्तच्या सगळ्याच शिरेल मध्ये कुचंबना... आता शिव कुचंबनेत अडकलाय..

बोअर झाली सिरीयल.
कुणीच स्पष्ट बोलत नाही. ना वि, ना मा, ना मो... वि ला आता कशाची भीड पडलीये?? तो मोनिका ला भीतो का? आणि बाळाला मोनिका जर अजिबात घेत नाही तर ते बाळ कसं राहतंय? आत्या बाईंचा खमकेपणा कुठे जातो दर वेळी मोनिका समोर? सगळेच अनुत्तरीत प्रश्न !

ज्यांच्या तोंडी संवाद हवेत तिथे मिठाची गुळणी आणि ज्या लोकांनी गप्प बसले पाहिजेत ते बा़कीच्यांना फटकारत बसतात....नेम़कं काय दाखवायचं आहे निर्मात्याला? क्राइम सिरियल्स बघून काही लो़कं प्रेरणा घेतात तशी ही सिरियल दाखवून "हे शक्य आहे", इथे शिका बेमालूम खोटं कसं बोलावं, इथे शिका स्वत:चा स्वार्थ कसा साधावा, इथे शिका दुसर्याला ताकास तूर न लागू देता कसं बोलावं
हेच दाखवायचं असेल असं वाटतं....धन्य ते लेखक!

तो सलिल काय तत्व्ज्ञान सांगत असतो .. तुझ्या दिवसाची सुरुवात मस्त झाली , आता तुला दिवसभरात स्वतःसाठी वेळ मिळेल. Uhoh

तो सलील खरंच हिच्या प्रेमात पडलेला दाखवलाय आणि हि येडछाप विक्रांतला विचारत बसलीय कि मी हो म्हणू कि नको.

बरं.. त्याला हो म्हणावं कि नाही याचा विचार किंवा चर्चा करताना सलील कसा आहे किंवा तो हिच्या किती प्रेमात पडलाय वगैरे या मुद्द्यांना काही महत्त्वच नाहीये का? बोलतांना असं बोलतेय जसं काही वि ने सांगितलं तर कोणाशीही लग्न करेन. विक्रांत ने काहीही सांगितलं तरी संसार मा ला करायचाय नं? तर स्वतःला काय वाटतंय याला काहीच महत्व नाही? मोनिका या बाबतीत मा पेक्षा जास्त मॅच्युअर वाटते.

मंदपणाचा आणि रोगीट/ आजारी दिसण्याचा कळस गाठलाय मानसीने.

मो च्या डान्स पार्टी मैत्रिणी कुठे गेल्या? बाळाला बघायला एकही येवु नये? आणी दळवी, देशमुखांना कोणीच नातेबाईक नाहीत का जे भोचकपणे एवढ्या लवकर हललेल्या पाळण्याबद्दल प्रश्न विचारतील?

बिचा-या सलील ची दया येतेय . Cool आहे तो.
आणि ती मान्सी कायम खूप सर्दी झाल्यासारखी काय बोलते..
Dresses तरी जरा चांगले द्यायचे तिला. ते तरी बघत बसलो असतो .

सलील ला हो सांगायचं की नाही हा जागतिक च प्रश्न करून टाकला की.. आत्या , विक्रांत , संजय मोने ना विचारून झालं .

मो च्या डान्स पार्टी मैत्रिणी कुठे गेल्या? बाळाला बघायला एकही येवु नये? आणी दळवी, देशमुखांना कोणीच नातेबाईक नाहीत का जे भोचकपणे एवढ्या लवकर हललेल्या पाळण्याबद्दल प्रश्न विचारतील?
Submitted by राया on 7 February, 2017 >>>>>>>>>>>

मान गये राया.... एकदम परफेक्ट.... !!!!
हि सिरीयलच मुर्खाचा बाजार आहे...

राया....त्यांचे नातेवाईक आपल्या नातेवाईकांसारखे नसतील बहुधा!
Happy
आणि मुदलात मला हेच समजलं नाही की सलिल ने तिला लग्नाचं विचारलं...म्हणजे प्रपोज केलं ते का? कारण तो तर तिला मुळात विवाह मंडळातूनच भेटलेला ना? मग हे तर माहितीच आहे की लग्ना साठीचं स्थळ म्हणून ते भेटताहेत...
हे म्हणजे ताकाला जाऊन आधी भांडं लपविल्या सारखं.. आणि नंतर ते भांडं पुन्हा बाहेर काढण्या सारखं झालं!!

>>हे म्हणजे ताकाला जाऊन आधी भांडं लपविल्या सारखं.. आणि नंतर ते भांडं पुन्हा बाहेर काढण्या सारखं झालं!!>>
हाहाहा भारी

अतिशयच भिकार सिरियल मी पहात नाही.
काल चुकून थोडा भाग डोळ्यावर पडला Proud
विक्र्या मा ला विचारत होता तुला सलिल लाभेटायला आवडतं ?
मा : हो
विक्र्या : तुला त्याचे विचार पटतात?
मा :हो
पुढे मला वाटलं विक्र्या म्हणतोय तु मुर्ख आहेस त्याला पण ती होच म्हणेल Proud

मा ने सलिल ला हो म्हटलंय बहुधा.. विक्र्या तडफडायलंय तिकडं
त्याला काय कळेना

मा सलिल आणि त्याच्या औशीला घेऊन मो च्या सासरी बघायच्चा कार्यक्रम
काय भानगड आहे, मो च्या सासरी कशाला Uhoh

दक्षिणा.... विक्र्या तडफडायलंय तिकडं..... Biggrin
पण ह्या वि चं काही कळतंच नाही....तो नक्की मानसीच्या प्रेमात आहे की नाही? त्याला मो ला काडीमोड द्यायचाय की नाही? त्याला बाळाचा बाबा व्हायचंय....की नाही? त्याला आई वडिलांना सगळं स्पष्ट सांगायचंय.......की नाही....?
.
.
.
त्याला सिरीयल मधे रहायचंय............................की नाही?

ऐ ठीके. ठीके म्हणजे.....एक्सपेक्टेड फ्रॉम हर......! पण सईल...? Biggrin

धन्य आहे ती मानसी!!!!

परवा मानसीच्या तोंडून (तै प्रमाणे) `सईलची ऐ' ऐकलं आणि कान धन्य झाले. >>> हापिसात बसून मी पण म्हणून पाहिलं, सईलची ऐ....हा हा पु

कथा विशेष काही पुढे सरकलीच नाही असं दिसतयं....मी मागच्या कित्येक दिवसात पाहिली नाही...

अजून नाही ग सुलु .
गीता आजी आणि मनु मावशी तिच्याशी लाडेलाडे बोलात असतात नेहमी

कथा विशेष काही पुढे सरकलीच नाही असं दिसतयं.. >>> हळूहळू सरकते आहे कथा ............ कैच्याकै प्रकाराकडे

स्वतःच्या बाळाकडे ढूंकून सुद्धा न बघणार्‍या मो ला कोणीच कसं बोलतं नाही? अगदी आजी आजोबा सुद्धा नाही. काल मो बाहेर निघाल्यावर आजोबांनी एकदाही हे विचारलं नाही, की मग बाळाकडे कोण बघणार?

Pages