Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज तर मो चा ई.सी.जी बदलत होता
आज तर मो चा ई.सी.जी बदलत होता आणि त्यामुळे वि आणि मा घाबरलेले दाखवले>>> वि घाबरुन मो ला हाका मारत होता तेव्हा मा थंडपणे मो च्या खोलीत आली. विक्रांतला विचारल की काय झालं? तो म्हणाला की ई.सी.जी बघ. एका डॉक्टरला हे सांगाव लागतं?
त्या आधीच्या प्रसंगात मानसी बाळाशी खेळत होती. बाळाचे डोळे चांगले टक्क उघडे होते. मग सलिलचा फोन आल्यावर म्हणली बाळं उठले
काहिही दाखवतात.
अरे...ते सलील ला कटवायला
अरे...ते सलील ला कटवायला म्हटली असेल..
मोनिका बेशुद्ध पडल्यापासून
मोनिका बेशुद्ध पडल्यापासून सगळे संवाद पार गंडलेत.
कालची नानूमामांची समजावयची पद्धतही नाही पटली.
नातसून कोमात आहे आणि आजी आपल्या स्वैपाक करण्यावर जोक करताहेत. आता त्या वातावरण हलकं करायचा प्रयत्न करताहेत असंही वाटलं नाही.
आतापर्यंत विक्रान्त आणि मानसीचे कायम एकच एक एस्क्प्रेश्न्स असायचे, आता त्यात सलिलच्या थोबाडावर थापलेल्या आशाळभूतपणाची भर पडली.
अरे.....त्या सलिल वर एव्हढा
अरे.....त्या सलिल वर एव्हढा राग का पण?
त्यापेक्षा मोनिका कितीतरी वाईटे!
परवाच्या एपिसोडचा एंड फारच
परवाच्या एपिसोडचा एंड फारच सूचक होता. मानसी, तिच्या हातात बाळ आणि शेजारी विक्रांत अश्या फ्रेमवर संपवला एपिसोड.
मानसीने विक्रांतला मिठीच
मानसीने विक्रांतला मिठीच मारली डायरेक्ट.!!!!!!
मानसीने विक्रांतला मिठीच
मानसीने विक्रांतला मिठीच मारली डायरेक्ट.!!!!!! >>>>> हेहे . एक्दम सरलाबहूच्या श्टाईल मध्ये बातमी दिलीत
हा हा, खरंच की!
हा हा, खरंच की!
मानसीने विक्रांतला मिठीच
मानसीने विक्रांतला मिठीच मारली डायरेक्ट.!!!!!! >>>>
काही उपयोग नाही.. अगोदर सांगितल्या प्रमाणे विक्रांत गे आहे ....
तिने त्यापेक्षा सलिल वर लक्ष केंद्रीत करावे...
फारच यांत्रिक मीठी होती ती.
फारच यांत्रिक मीठी होती ती. छ्यॅ!
कशाला (म्हणजे कशाकरता) मारली
कशाला (म्हणजे कशाकरता) मारली म्हणे मिठी?
हि बया, जबडा उघडत का नाही ?
हि बया, जबडा उघडत का नाही ?
सारखं अज्जी, अजोबा ,तै , अत्या
अपण जाऊय क

>>>
मी तोंड न उघडता सगळी वाक्य म्हणून पाहिली.. इट्स सो फन्नी
मॅक्स... :-) ...तै चं आता
मॅक्स...
...तै चं आता कसं होणार म्हणून ती खूपच व्याकुळ झालेली...तेव्हा मिठी मारण्या वाचून काही पर्याय होता का ? 
चिंचे, तै च कि विक्रांतच कसं
चिंचे, तै च कि विक्रांतच कसं होणार म्हणून विक्रांतला मिठी मारली मानसीने?
म्हणजे , "ओंडका अन ओंडका
म्हणजे , "ओंडका अन ओंडका बहरून आला " शेवटी
(No subject)
झी मराठीचं अॅप डालो केलंय का
झी मराठीचं अॅप डालो केलंय का कुणी? मी केलंय. मस्त अॅप आहे, जुन्या शिरेली पण आहेत. मधली सुट्टी, जानी वगैरे.
२जी वर पण मस्त चालले काल रात्री. चुभुध्याघ्या आणि १०० डेज दोन्ही एपिसोड पाहिले. १०० डेज चा तर पहाटे ५ ला पाहिला आज
दक्षी अॅप वर फुल एपिसोड
दक्षी अॅप वर फुल एपिसोड दिसतात का? का तुकडे?
अमा फुल एपिसोड, ते पण जाहिरात
अमा फुल एपिसोड, ते पण जाहिरात विरहीत. साधारण एक एपिसोड २०-२१ मिनिटांचा असतो.
दक्षे.. फुकट आहे का विकत?
दक्षे.. फुकट आहे का विकत?
अॅपचं नावच "झी मराठी" आहे का?
फुकट
फुकट
Ditto tv aahe na ₹20 per
Ditto tv aahe na ₹20 per month
फुकट डालो करून नेट वर पहायचं.
फुकट डालो करून नेट वर पहायचं. डेटा चे पैसे लागणार.
कोमातून बाहेर आलेल्या माणसाला
कोमातून बाहेर आलेल्या माणसाला कोण डॉक्टर लगेच - आत्ताच तू मरणाच्या दारातून बाहेर आली आहेस - असं म्हणतं ? आत्याबाईंना मो जगायला नको होती की काय असं वाटतयं.
मोनिका अशीचं वागली तर दळवींची सहानुभूती कशी मिळणार तिला ?
काय मोनिका कोमातून बाहेर आली?
काय मोनिका कोमातून बाहेर आली??? काल काय झाल??
कोमातून बाहेर आलेल्या माणसाला
कोमातून बाहेर आलेल्या माणसाला कोण डॉक्टर लगेच - आत्ताच तू मरणाच्या दारातून बाहेर आली आहेस - असं म्हणतं ? आत्याबाईंना मो जगायला नको होती की काय असं वाटतयं. + १११
बिचारी मोनिका कोमातुन बाहेर आल्याआल्या सगळ्यांनी लेक्चर दिले. मा म्हणली तै तु बदललीस. तै ला पहिल्यापासुनच बाळ नको होते. ते तिनी वेळोवेळी सांगितले ही होते. वि नी पण तोमणे मारले. म्हणजे मो बद्दलचा राग खरा असला तरी हे सगळे तेव्हा बोलणे गरजेचे नव्हते.
ती अगबाई पण म्हणाली की मो शुद्धीवर आली. अगबाई, माझा विश्वासच बसत नाहीये. ,हणाजे येणार नव्हती की काय
ती अगबाई पण म्हणाली की मो
ती अगबाई पण म्हणाली की मो शुद्धीवर आली. अगबाई, माझा विश्वासच बसत नाहीये. ,हणाजे येणार नव्हती की काय >>>
पण आत्या बाईंना मो जगायला नको
पण आत्या बाईंना मो जगायला नको होतीच! त्यांनी ते व्यवस्थित दाखवून दिलं! तसेच "तै" काय बदलली? तिला नको होतंच हे मूल.
विश्वासच बसत नाहीये...असं आपण सहजही म्हणतोच की! आनंदानं सुद्धा! तसं अगंबाई म्हणाल्या असतील ..त्यात काय
अरे जरा नीट सांगा ना कोणीतरी
अरे जरा नीट सांगा ना कोणीतरी काय काय झाले?
मो शुद्धीवर आलीये आणि तिला
मो शुद्धीवर आलीये आणि तिला आता तिच्या ह्या सिच्युएशनचा फायदा घेऊन विक्रांतने घटस्फोटाची केस मागे घ्यावी अशी इच्छा आहे. एकीकडे विक्रांतची अजून कोंडी करण्यासाठी ती दळवींच्या घरात जाण्यासाठी धडपडतेय. पण सध्या अशक्तपणामुळे तिला चालताही येत नाहीये. त्यामुळे ती गप्प हॉस्पिटल मध्ये पडून आहे.
बाळ कोणते घेतले आहे ते एकदम गोड आहे. मो मात्र त्या बाळाला जवळ घ्यायला पण तयार नाहीये. आणि अर्थातच मा त्या बाळाला सांभाळते आहे. त्यामुळे मो कशी अप्पलपोटी आहे आणि तिच्या हृदयाला बाळाला बघूनही कसा पाझर फुटत नाही हे दाखवून मध्यंतरीच्या काळात प्रेक्षकांची तिच्या बाजूने वळलेली सहानुभूती पुन्हा वि कडे वळवण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.
इकडे वि वकिलाला सांगतो की बाळासाठीतरी मो ला माहेरी सोडणे सध्या शक्य नाहीये कारण ती बाळाची काळजी घेणार नाही. त्यामुळे बहुतेक तो मो ला बाळासकट दळवींच्या घरीच आणेन. आणि मो ला जे हवे आहे तेच होईल आपोआप.
इकडे मा सलील शी बऱ्यापैकी चांगलं बोलतांना दाखवली आहे फोनवर. त्यांचं जुळलं तर बरं होईल. बहुतेक मा-मो चे आज्जी आजोबा सुद्धा दळवींच्या घरात राहात आहेत आणि वेगवेगळे खयाली पुलाव पकवत प्रेक्षकांनाही पकवत आहेत.
बाकी सगळं नॉर्मल. नानुमामा बहुतेक बाळाच्या येण्याने बदलले आहेत. पण मो अजून घरी आलेली नसतांना घरातलं वातावरण जरा जास्तच आनंदी आणि हलकं फुलक आहे जे थोडे खटकते आहे. मो ला डिस्चार्ज मिळाल्यावर इतकं आनंदी वातावरण ओके वाटलं असतं. असो.. इति लेखनासीमा.
Pages